Showing posts with label मिनुच्या कविता. Show all posts
Showing posts with label मिनुच्या कविता. Show all posts

Tuesday, 22 June 2021

आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈

आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈 आयुष्यातील इंद्रधनुष्य 🌈 सात रंगांनी सजावे सुखदुःखाचे सोबती मायबाप नित्य पुजावे...!! शांततेचा रंग पांढरा संयमाने सदा रहावे त्याग,समर्पण चित्ती कधी जीवनात पहावे...!! आकाशाचा निळा रंग विशाल ह्रदयासम असावे सागराचे अवखळ पाणी झ-यासम खळखळावे....!! हिरवा शालू नेसून बसली सुंदर दिसते वसुंधरा ओंजळभर दाणे टाकत शेतकरी पोशिंदा खरा....!! विठुराया चरणी साकडे घालून करते नित्य प्रार्थना सर्वांना सुखी ठेव देवा तव शांती मज मिळेल मना...!! पिवळा रंग उठून दिसतो चाफ्यात मिश्रित भावतो नानाविध रंग निसर्गाचे चल इंद्रधनुत दावतो....!! ॠतूप्रमाणे रंग सजती आयुष्यातील इंद्रधनुष्य शोध माणसाच्या कामी पडावे आयुष्याचा घे खरा बोध....!! *मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*

Wednesday, 16 December 2020

कधी उघडेल शाळा...!!

 *कधी उघडेल शाळा*

कधी जाणार कोरोना
कधी उघडेल शाळा
गेले वर्ष हे निघून
येते आठवण बाळा....!!

शाळा पडलिया ओस
नाही करमत आता
येते याद चिमण्यांची
जेव्हा शाळेत मी जाता...!!

केल्या बोलक्या ह्या भिंती
पण लागत नाही लळा
डोळे डोकावून पाही
कधी फुलेल हा मळा....!!

पाखरांची किलबिल
कधी ऐकाया येईल
कधी येतील पाखरे
कधी कोरोना जाईल....!!

वाट पहाते मॅडम
कधी लेकरं येतील
माझी चिमणी पाखरं
हसतील नाचतील....!!

नाही करमत आता
जिव झाला खूप बोरं
कानी येतो तो आवाज
किलकिलणारी पोरं.....!!

खरं सांगू का बाळांनो
मज लागलाय लळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा....!!

कधी वाजेल ती घंटा
आई म्हणे पळा पळा
चिमुकल्या पावलांनी
कधी फुलेल हा मळा....!!

जरी ऑनलाईन शाळा
नाही ती रे खरी मजा
कोरोनाचा हाहाकार
वाटे जिवालाच सजा...!!

थोडा धीर धर बाळा
एक दिवस येईल
जसा आला तसा बघा
असा कोरोना जाईल....!!

खाली खाली वर्गखोल्या
मज बोलतीया शाळा
कुठं हरवली बाळं
माझ्या घेवून ये बाळा....!!

सारे उदासवाने हो
कधी उघडेल ताळा
कधी जाईल कोरोना
कधी उघडेल शाळा.....!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Thursday, 23 May 2019

वाट पहाते मी

Date: 23 May 2019

*स्पर्धेसाठी षढाक्षरी*

*विषय-वाट पहाते मी*

वाट पहाते मी
मृग पावसाची
भागेना तहान
चातक पक्ष्याची.....!!

येईल पाऊस
भिजेल धरती
शांत होईल रे
जमिन तापती....!!

मिळेना हो पाणी
पडला दुष्काळ
पडेल पाऊस
येईल सुकाळ....!!

मिळेना रे चारा
पडला दुष्काळ
झाडे लावू चला
येईल सुकाळ......!!

आडवा जिरवा
पावसाचे पाणी
शोषखड्डे खणा
मिळेल रे पाणी....!!

तोडून हो वृक्ष
तापली जमिन
मरतात पक्षी
रोज पाण्यावीन....!!

*©®कवयित्री कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम*
✒✒✒✒✒✒✒

Saturday, 16 March 2019

विद्याधन...अभंग प्रकार

*अभंग रचना*

*विषय- विद्याधन*

विद्याधन खास। अजन्म पुरेना
चोरीता येईना।धन ऐसे॥ १॥

कळते रे ज्यास। सुखाचा प्रवास।
जीवना सुवास । विद्याधन ॥ २॥

घेती सानथोर । बुध्दीजीवी प्राणी ।
अस्सलच नाणी। विद्याधन ॥ ३॥

नसे भेदभाव। गरीब श्रीमंत ।
घेणा-या मनात। वसतसे ॥ ४॥

अजन्म विद्यार्थी । मनुष्य हो प्राणी।
नको गर्व मनी । ठेवू नये॥ ५॥

जिवाची माझीया । एकच रे आस।
तयार घेण्यास । विद्याधन ॥ ६॥

मनाच्या घराचे । उघडा हो दार।
जातील विकार । आपोआप ॥ ७॥

विद्याधन खरे। कळले बुध्दास ।
ज्ञानचा प्रवास । अंगीकारी॥ ८॥

विद्येची देवता। सावित्री शोभते ।
नमन करते। तुज माते॥ ९॥

विद्याधन तुज। कळले गे खरे।
ज्ञानदान खरे। केले माई॥१०॥

मिनू म्हणे ऐसे। विद्याधन खरे।
वाटीतच जा रे। विद्याधन ॥ ११॥

*©®कवयित्री-कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*

✍✍✍✍✍✍✍✍

Sunday, 3 February 2019

शिवकाव्य

*विषय-शिवकाव्य*

छत्रपती  शिवाजीचा
जन्म झाला शिवनेरी 
सन सोळाशे हो तीस
एकोणीस    फेब्रुवारी....

शिवछत्रपती     राजा
थोर जिजाऊ माऊली
संस्काराचा लेप लावी
शिवबाची हो सावली...

कुशीतून     उगवला
तळपता  वीर   तारा
फुटे  घाम   शत्रूलाही
नाही  शत्रूसही  थारा...

राम आणि कृष्ण सांगे
गोष्टी छान जिजामाता
न्याय  अन्याय  शिकवू
जगी   श्रेष्ठ    वीरमाता....

युध्दनिती  शिकवली
हाती   दिली तलवार
बालपणी    थरारली
तळपती      तलवार....

कर     तलवारबाजी
सपासप   वार   कर
घोड्यावर स्वार होऊ
चढू  लागे   झाडावर....

दांडपट्टा फिरू लागे
लांब जाई भालाफेक
एक  एक  धडा  घेई
माय जिजाऊचा लेक...

स्वराज्याचं स्वप्न पाही
राजमाता जिजाबाई
शूरवीर    पुरूषांच्या
नांवे गाजे जिजाआई...

स्वराज्याची हो प्रतिज्ञा
रायरेश्वरात         घेई
मुठभर   मावळ्यांना
धडे  स्वराज्याचे  देई....

शत्रू    घाबरत    असे
नांव   ऐकता शिवाजी
वीर   मावळे    सगळे
लावी जिवाचीच बाजी...

अफजलखान वीडा
शिवाजीचा उचलला
शिवबाने कोथळाच
वाघनखे ने फाडला...

कोसळला  शत्रू  खान
उडे   शत्रू   दाणादाण
शाहिस्तेखानच   जाई
घेण्या शिवबाची जान...

बोटे कापली खानाची
झोपेतही      बडबडू
धाक खावून शिवाचा
खान लागला हो रडू ...

पेटा-यात    बसूनहो
गेले  होते   शिवराय
तुरी  दिल्या  हातावर
निसटले     शिवराय...

एक   एक   गड    घेत
युध्द   करत   शिवाजी
स्वराज्यासाठीच लावी
बाजी लावी हो तानाजी....

गड  आला  पण  सिंह
धारातिर्थी   रे   पडला
एक   एक   मावळ्याने
इतिहास      घडवला.....

सिद्दी   पाठलाग   करी
वेळ आली आणिबाणी
शिवाजीची    घालमेल
बाजीप्रभु   ओळखली....

खिंड  बाजीने   लढली
पाहुनच   स्वामीभक्ती
आले  भरून  मन   रे
कांही चालेना हो शक्ती...

स्वराज्याचे  ध्येय  होते
शिवाजीला   गाठायचे
जिवावर   आले   होते
बाजीप्रभु    सोडायचे....

सुरू    झाली   लगेचच
झुंज  खिंडीत  शर्थीची
पराक्रमी      बाजीप्रभु
झाली कोंडी हो शत्रूची...

शत्रूचीही    घामाघूम
घोडखिंड    लढवली
झाली पावनखिंड हो
तोफ  मग  कडाडली....

स्वामीभक्त बाजीप्रभु
धारातिर्थी  कोसळला
इतिहास   मावळ्यांनी
शिवबाच्या   घडविला.....

राजधानी      रायगड
एक   अपूर्व   सोहळा
शिवबाच्या राज्यासाठी
लढे   एकेक   मावळा.....

सर्व  धर्मांना  प्रजेला
न्याय व सुख देणारा
स्वराज्याचे स्वप्न स्वतः
पुर्णपणे      झटणारा....

असा  शूरवीर   राजा
होता न्यायी दिलदार
भल्याभल्या शत्रूनींही
होती  घेतली  माघार....

माझा जाणता राज्याचा
भरे     छान      दरबार
स्वराज्याचं स्वप्न  पाही
घुमे         जयजयकार....

महाराष्ट्र दैवत मानते
करी मानाचा  मुजरा
शिवजयंतीचा   सण
चला करू हो साजरा....

*कवयित्री-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
*मो.9767663257*

Saturday, 5 January 2019

स्वप्नसुंदरी.. कन्या

*स्वप्नसुंदरी*

स्वप्नसुंदरी एक
आली माझ्या स्वप्नी
नाजुक,कोमल अन
रूपानं ती देखणी....✒

म्हणाली मजला
येणार आहे मी पाहुणी
लाडाची मी कन्या होईल
आनंद बहरेल जीवनी...✒

खूप करील माया
लावीन तुम्हां लळा
पाहु द्या मला जग
नका घोटू  गळा...✒

करीन मी खूप काम
तुम्हांला मदत करीन
करून खूप अभ्यास
कलेक्टर मी होईन....✒

नाही हुंडा लागणार
आहे मी शहाणी
स्वतःच्या पायावर मी
ठामपणे उभी राहीन....✒

येऊ द्या जन्माला मला
आईची मज कुस हवी
कांहीच नाही मागणार
ना कपडे,पुस्तक ना वही...✒

आईबाबा तुम्हां करते
मी हात जोडून विनवणी
होईन मी सा-यांची लाडकी
आहे मी फार फार गुणी....✒

*©®कवयित्री-कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍✍

Thursday, 25 October 2018

माती...अष्टाक्षरी रचना ..

     *व-हाडी काव्य रचना*

*अष्टाक्षरी रचना*

*विषय-माती*

काळी माती माझी माय
उभ्या आयुष्य सपान
पिक डोलतया रानी
धनी चालतो जोमानं.....

काळी माती मऊ मऊ
पिकविते     हिरेमोती
शेतकरी सुखी होण्या
घाम   शेतात   गाळती....

माती माझी माय हाय
लेणं उभं आयुष्याचं
सुख लागे पोराबाळा
मोल जाणावं मातीचं.....

जन्म  घेई    मायपोटी
काळीमाती खरी माय
जिच्या घरी तिचा वास
त्योच चार घास खाय.....

राबराबे         शेतकरी
कष्ट   उपसतो     रानी
काळीमाती त्याले माय
गातो सुखाची रं गाणी.....

काया काया मातीमधी
घाम  गाळीतो  रं  बळी
बळी  पोशिंदा  जगाचा
घास    उतरतो     गळी....

कष्ट करूनिया धान
जवा आणलं घरात
चार घास सुखाचे रे
तवा जाती रे पोटात....

पोरंबाळं माझी माय
तुझ्यामुळं जगताती
काय तुले सांगु लेका
मह्या मातीची महती ....

*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*



Saturday, 13 October 2018

कास्तकरी.....

*व-हाडी कविता*

             *कास्तकरी*

राब राब राबतोया
महा कास्तकरी बाप
कोरडे नक्षत्र सोबतीला
लागे चालताना धाप....✒

पाण्यानं दिलं दगा
जगायाचा झाले वांदा
आभायाला पडली ठिगय
सवस्त झाला कांदा....✒

कास्तक-याचं जीनं
यंदा महाग होवून राह्यले
वा-यावरच्या वरातीचं घोडं
गंगेतच न्हावून राह्यले...✒

कास्तकरयाले भौ
कायचे दिन अच्छे आले
दुष्काळ अनं महागाईनं
जीव मेताकुटीले आले.....✒

कुठंवर कंबर कसायचं ?
कुठंवर बळंच उसनं अवसान आणायचं
कास्तक-याच्या नशिबाचं भोग
सांगा कुठवर भोगायचं....✒

नशिबाले दोष देत
जगलं कास्तकरयाचं जीवन
उघड्या डोळ्यांनी बघतायेत
कास्तकरयाचं मरण....✒

कास्तक-याच्या बाईचा
डोईवर पदर फाटका
कास्तकरयायचं जीवन बघा
लागुन राहील जीवाले चुटका...✒

*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍

Monday, 8 October 2018

चालु घडामोडी वर अभंग....

*अभंग काव्य प्रकार*

*विषय-चालु घडामोडी*

किती महागाई। पाऊस पडेना।
पीकही पीकेना। अवर्षण ॥

चिंतातूर झाला। शेतकरी राजा।
मिळतेय सजा। सर्वाघरी ॥

शेतमाल भाव । झाला खूप कमी।
सरकारी हमी। कोरडीच॥

रिते आश्वासन। शासना रे देते।
पाठ भिरविते। हटकून ॥

पेट्रोलचे भाव। गगनाला गेले।
त्रस्त जन झाले। सर्वजण॥

महागाई झाली। येईना शासना।
जाग रे शासना। आतातरी॥

जि.एस.टी. टॅक्स। सि.एस.टी आहे।
इनकम पाहे। नेटवर॥

विठुराया ये रे। धाव बा विठ्ठला।
भाव दे मालाला। आतातरी।

थकला रे जीव। मोडली कंबर।
कर कटेवर। काढआता।

मरमर केली। उभ्या आयुष्यात।
नको आता घात। देवराया॥

*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*

Saturday, 6 October 2018

व-हाडी कविता

*ऑनलाईन पिरेम*

*ऑनलाईन पिरेम बा*
*लय झॅक वाटलं*
*जवातवा वाॅट्सअॅप*
*आणि फेसबुकनं थाटलं...*.✒

*उठसुठ सेल्फी घ्याचं*
*नादच  लय खुळा*
*हाय,हॅलो,जानू,वानू*
*कधी म्हणे बाबू,बबल्या बाळा...*✒

*ऑनलाईनच्या पिरेमात*
*चॅटींग करत राह्यतं*
*दिनरात टेटस डी.पी.फीपी*
*सारखं पाहत राह्यतं....*✒

*गुरूगुरू सारखच लेका*
*मोबाईल वर बोटं फिरवतं*
*इतराला पाह्यता येऊ नये*
*म्हणून पॅटरन लाॅक टाकतं..*.✒

*ऑनलाईन पिरेमात लेका*
*लय झॅक वाटतं*
*ऊतू जायतं पिरेम*
*आणि मजनूच वाटतं..*..✒

*ऑनलाईन पिरेमात*
*नसलं जरी समोर दिसत*
*ईडीओ काॅल करूनसनी*
*एकमेका पाह्यता येतं....*✒

*ऑनलाईन पिरेमात*
*ज्यो त्यो टुचूक टुचूक*
*न बोलता तरी सुदीक*
*बोलणं होतं अचूक...*✒

*डोळ्यांची भाषा आणि*
*बोटायचा  सारा खेळ*
*मिसेज द्वारे मनातलं*
*करत राह्यते भेळ....*✒

*आजकाल सा-यांच* *पोट्टायांकडं*
*भारी भारीच अँन्ड्राईडच हाय*
*उठल्या उठल्या टायकीत राह्यत्यात*
*हाय गुड माॅर्निंग, गुड नाईट आणि बाय...*✒

*ऑनलाईन पिरेमात*
*ज्यो पडला त्यो येडा*
*कांही कामधंदा नाय*
*घुसला व्हाॅटस्प चा किडा..*.✒

*ऑनलाईनच्या पिरेमानं*
*सखी झाली येडी*
*म्हणली गण्याले हसून एकदा*
*शाॅपक्लस ची मागव मले साडी.*..✒

*ऑनलाईनच्या पिरेमानं*
*पिढी झाली बरबाद*
*कवा सुटल कुणास ठाऊक*
*ऑनलाईनचा खुळा नाद...*.✒

*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जा.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍

ऑनलाईन पिरेम...व-हाडी कविता

*ऑनलाईन पिरेम*

*ऑनलाईन पिरेम बा*
*लय झॅक वाटलं*
*जवातवा वाॅट्सअॅप*
*आणि फेसबुकनं थाटलं...*.✒

*उठसुठ सेल्फी घ्याचं*
*नादच  लय खुळा*
*हाय,हॅलो,जानू,वानू*
*कधी म्हणे बाबू,बबल्या बाळा...*✒

*ऑनलाईनच्या पिरेमात*
*चॅटींग करत राह्यतं*
*दिनरात टेटस डी.पी.फीपी*
*सारखं पाहत राह्यतं....*✒

*गुरूगुरू सारखच लेका*
*मोबाईल वर बोटं फिरवतं*
*इतराला पाह्यता येऊ नये*
*म्हणून पॅटरन लाॅक टाकतं..*.✒

*ऑनलाईन पिरेमात लेका*
*लय झॅक वाटतं*
*ऊतू जायतं पिरेम*
*आणि मजनूच वाटतं..*..✒

*ऑनलाईन पिरेमात*
*नसलं जरी समोर दिसत*
*ईडीओ काॅल करूनसनी*
*एकमेका पाह्यता येतं....*✒

*ऑनलाईन पिरेमात*
*ज्यो त्यो टुचूक टुचूक*
*न बोलता तरी सुदीक*
*बोलणं होतं अचूक...*✒

*डोळ्यांची भाषा आणि*
*बोटायचा  सारा खेळ*
*मिसेज द्वारे मनातलं*
*करत राह्यते भेळ....*✒

*आजकाल सा-यांच* *पोट्टायांकडं*
*भारी भारीच अँन्ड्राईडच हाय*
*उठल्या उठल्या टायकीत राह्यत्यात*
*हाय गुड माॅर्निंग, गुड नाईट आणि बाय...*✒

*ऑनलाईन पिरेमात*
*ज्यो पडला त्यो येडा*
*कांही कामधंदा नाय*
*घुसला व्हाॅटस्प चा किडा..*.✒

*ऑनलाईनच्या पिरेमानं*
*सखी झाली येडी*
*म्हणली गण्याले हसून एकदा*
*शाॅपक्लस ची मागव मले साडी.*..✒

*ऑनलाईनच्या पिरेमानं*
*पिढी झाली बरबाद*
*कवा सुटल कुणास ठाऊक*
*ऑनलाईनचा खुळा नाद...*.✒

*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जा.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍

Tuesday, 2 October 2018

हवी पेन्शन....

*पेन्शन दिंडी*

*किती काढायच्या दिंड्या?*
*किती करायची उपोषणं*
*वर्षामागणं वर्ष चालली*
*किती करायची आंदोलनं....?✒*

*हिवाळी अधिवेशन झालं*
*घंटानाद आंदोलन झालं*
*टक्कल सुध्दा  केली*
*आता भीक मागो राहीलं...*.✒

*आजपर्यंत किती गुरूजी गेले*
*अपघातात अचानक मरणं*
*असं का झोपलयं सरकार?*
*पोकळच यांची आश्वासनं...*.✒

*ठाणे   ते  मुंबई  मोर्चा  बघा*
*चालला   गांधी  जयंतीदिनी*
*2 आॅक्टोबर ला गुरूजी जमले*
*काढण्या दिंडी निघाले पायदळी....*✒

*3आॅक्टोबर पासून करणार*
*बेमुदत उपोषणाचा इशारा*
*कंटाळून गेले बिचारे  सारे*
*दिसतो डोळ्यादेखत संसार सारा....*✒

*बिचा-या  याच गुरुजींनी*
*शिक्षणसेवक  ही भोगलं*
*त्यांच्याच माथी सुध्दा कस*
*नवी पेन्शन योजनेन गाठलं....*✒

*किती गेले बळी आतापर्यंत*
*त्या घरचे फक्त हालच झाले*
*द्या आम्हांला जुनी पेन्शन*
*नविनगुरूजी हवालदिल झाले ......*✒

*निर्दयी शासना कधी करशील*
*करशील आमच्या पेन्शनचा विचार*
*किती काढायचे दिंड्या आणि मोर्चे*
*नविन पेन्शनवाले बनलेत रे लाचार...*✒

*म्हातारे मायबाप,जिम्मेदारी घरची*
*मनी चिंता खायी जुन्या पेन्शनची*
*घरपरिवार टकटक दिसतो डोळ्यासमोर*
*माझ्या माघारी कशी होईल हालत घराची...*.✒

*3 आॅक्टोबर पासून अमरण उपोषण*
*गाजराची पुंगी दाखवून देत अश्वासन*
*गाजराची पुंगी काय वाजली तर वाजली*
*नाहीतर होईल येणा-या  प्रत्येकाचं मरण ....*✒

*आमची पेन्शन आहे आमच्या हक्काची*
*सध्या आम्हांला आहे फक्त एकच टेन्शन*
*समान काम आणि समान वेतन*
*पाहिजेच आम्हांला आमच्या हक्काची पेन्शन ....*✒

*हवी आहे आम्हांला आमच्या हक्काची पेन्शन*
*हक्काची पेन्शन...हक्काची पेन्शन.....*✒

*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍

Monday, 1 October 2018

शूर संभाजी

*स्पर्धेसाठी वीररस काव्य*

*विषय-शूर संभाजी*

पराक्रमी,शूरवीर
सईबाईचे संभाजीपुत्र
स्वराज्याचे वारसदार
जाणिले बारकावे युध्दनितीसुत्र....

सईबाईचे पोटी
जन्मला वीर
थरारली धरणी
किल्ले पुरंदर.......

वयाच्या नवव्या वर्षी
लिहीला ग्रंथ महान
नाव तयाचे "बुधभुषण"
होते चौदा भाषांचे ज्ञान......

बालपणापासून घेतले
युध्दनितीचे धडे
नावं ऐकता शंभुचे
लागे शत्रूही धडधडे....

केली फितुर स्वकियांनी
पकडून दिले शंभूना
पराक्रमी धर्मवीर त्यांनी
नमविले शत्रूंना.......

औरंगजेबाला कोडे पडले
कसे नमवावे शंभूना
बांधीले साखळदंड
छावा शंभू काही वाकेना......

हालहाल करून मारू लागले
रोज एक शिक्षा देवू लागले
वाघाचं काळीज शंभुचे सिंहाची छाती
नाही विव्हळले नाही कण्हनले .....

लालभडक तप्त सळया
शंभुच्या डोळ्यात घातले
जीभ कापली,हात कापले
चामडी सुध्दा सोलले....

सोडला अखेरचा श्वास पण
नाही आपला धर्म बदलला
अपार छळले माझ्या शंभूना
पण शंभू नाही नमला शत्रूला.....

शौर्य,पराक्रम गाजविला
माझ्या शूरवीर शंभुराजांनी
महाराष्ट्राचा धगधगता सुर्य
अमर इतिहासाच्या पानोपानी .....

*कवयित्री-मिनाक्षी  पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
9767663257

Monday, 24 September 2018

मन

*मन*

*मन धुंद गारवा*
*मन पाऊस पाऊस*
*मन भिरभिरता पारवा*
*मन हाऊस हाऊस...१*✒

*मन स्वच्छंदी*
*मन आनंदी आनंदी*
*मन शिवार शिवार*
*मन परोपकार...* २✒

*मन पाखरू पाखरू*
*मन नाचणारे मोर*
*मना आवरू आवरू*
*मन लागले सावरू...३*✒

*मन उदास उदास*
*मना लागलीया आस*
*मन आभास आभास*
*जाई भेटाया सखेस...४*✒

*मन धुंद वारा वारा*
*मन घेई भरारा*
*मन पाऊस नवा*
*मन उडणारी हवा...५*✒

*मन थुईथुई नाचे*
*मन मनात साचे*
*मन साजना साजना*
*मन लागेना लागेना...६*✒

*मन क्षणार्धात उडे*
*मन बेभान गडे*
*मन बेधुंद नशा*
*मन फिरे दाहीदिशा...७*✒

*मन खळखळतं पाणी*
*मन मनातली गाणी*
*मन कविता कविता*
*मन मनास लाविता..८*✒

*मन मंजुळ गाणी*
*मन पाणी पाणी*
*मन आवरू आवरू*
*मन लागले सावरू...९*✒

*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
माझी कविता माझ्या  ब्लाॅगवर  प्रसारित केली आहे त्यामुळे नावासह शेअर करावी...
✍✍✍✍✍✍✍✍

Sunday, 9 September 2018

जातीअंत

*परिवर्तनाच्या कविता स्पर्धेसाठी मुक्तछंद*

          *जातीअंत*

*सोडून दे जातीची बंधने*
*कितीवेळ त्यातचं गुरफटणार आहेस?*
*मानवानेच मानवाला घातलेल्या*
*नरकयातनाचं हे घोंगड किती* *दिवस भिजवणार आहेस....?*✒

*जातीपातीची ही दलदल मुद्दाम*
*पसरवलेली आहेस..झटकून टाक ते*
*चिखल किती दिवस त्याच त्या*
*चिखलात अडकत बसणार आहेस...*✒

*सर्वाचं सारखंच रक्त सर्वचजण* *हाडांमासाचीच...मग का इतका तांडव*
*तूच करत बसणार आहेस?*
*मळकटलेल्या मेंदूवर अजून किती दिवस*
*धूळ टाकणार आहेस?*✒

*मानव जातीला लागलेली ही घाणेरडी*
*"जाती" ची  किड कधी सुटणार आहे?*
*माझी जात श्रेष्ठ तुझी जात कनिष्ठ*
*असं किती दिवस अजून म्हणार आहेस?*✒

*हाडामासाच्या देहाला "जात"*
*नावाच्या महाभयंकर कॅन्सरने गाठलय*
*कुठल्या तज्ञाकडं जावं त्यासाठी विलाज करायला*
*हे सुध्दा एक कोडचं पडलयं....*✒

*जातीपातीच्या ह्या मजबूत भिंती*
*का दगडाने बांधलेल्या आहेत*
*का मानसाचे मन हेच दगडासारखे*
*निगरघट्ट बनत चाललेले आहेत?*✒

*"सत्य हाच धर्म आणि माणुसकी"*
*हीच एकच जात असावी*
*सर्व माणसं एकाच भूमातेची*
*ती सोज्वळ मुले असावी..*.✒

*जातीजातींमधला भेद*
*दिवसेंदिवस वाढत चालला आहे*
*का माणुसकी इतकी महागडी झाली*
*तिचा -हास होत चालला आहे..?*✒

*स्पृश्यास्पृश्यता,उच्च नीच,मानसिकता*
*वरचेवर वाढत चालली आहे.*
*जातीची किड* *(वाळवी)वरचेवर माणसाला*
*पोखरत चाललेली आहे...*✒

*प्रत्येक जातीचा वेगळा झेंडा*
*अमुक जातीचा हा झेंडा* *तमुक जातीचा हा झेंडा...ह्या* *जातिचा मेळावा त्या जातीचा मेळावा* *गल्लोगल्ली फ्लॅक्स लागले आहेत...*✒

*माणसांपुरतच मर्यादीत राहीले नाहीत तर*
*यांनी महामानवांच्या पण वाटण्या*
*करून महामानव प्रत्येक समाजाने आपापले*
*वाटून घेतले आहेत...*✒

*फुले माझे तर आंबेडकर तुझे*
*अहिल्या माझी तर सावित्री तूझी*
*शिवराय माझे तर अण्णाभाऊ तुझे*
*बिरसा माझा तर टिळक तुझे* *अशा वाटण्या झाल्या आहेत..*.✒

*यात भरडला जातोय तर* *साधारणपणे*
*जगणारा साधारण माणूस*
*वेगवेगळ्या धर्माच्या,जातिच्या नावाखाली*
*इथं दंगेफसाद,बॉम्बस्फोट,खून,मारामा-या*
*खुलेआम घटना घडत आहेत...*✒

*बिचारी भारतमाता धाय मोकलून रडते आहे*
*पण तिची दया कोणालाच नाही..*
*तिच्या देहावरून वेगवेगळ्या* *रंगाची झेंडे हाती घेवून मार्चे निघत आहेत...*✒

*कोणास ठाऊक कसे कधी या जनतेला*
*कळणार आहे?* *अजून आपला देश किती दिवस जातीपाती मध्येच खितपत पडणार आहे..."परिवर्तनवादी* *समुहाकडून नक्कीच जातीअंत" ला न्याय मिळणार आहे..*.✒

*"जातीअंत" करायचा असेल तर*
*"एकतेची" मशाल आधी पेटवू*
*"आम्ही सारे भारतीय एक आहोत"*
*"जातीअंत" चला सारे जन मिटवू...*✒

*शाहु,फुले,आंबेडकरांच्या विचारांची*
*"पेरणी या परिवर्तनसमुहाकडून" करू*
*"जातीअंत" समूळ नष्ट जगातून करण्यासाठी*
*चला क्रांतीची एक मशाल हाती धरू...*✒

✍✍✍✍✍✍✍✍
*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि वाशिम*
*Mob-9767663257*

Thursday, 6 September 2018

बाई माझ्या

*बाई माझ्या*
माझ्या बाईंना समर्पित रचना...
*बाई माझ्या छान*
*गालात हसायच्या*
*उंचापु-या सडपातळ*
*गो-या छान दिसायच्या....*✒

*शब्द असो की उजळणी*
*नियमितपणे पहायच्या*
*काळ्याभोर वेणीला*
*गजराही माळायच्या....*

*पाढे २ ते ३० पर्यंत रोज*
*अचूक म्हणून घ्यायच्या*
*कंटाळवाने झाले की*
*झुकझुकगाडी घ्यायच्या...*✒

*चुकलं कधी तर जवळ*
*बोलावून मायेनं सांगायच्या*
*कौतुकाची थाप पाठीवर*
*आठवणीने द्यायच्या....*✒

*हावभावासह गोष्टी*
*छान छान सांगायच्या*
*दूध आणि सुगडी*
*खायला द्यायच्या....*✒

*आवाज होता मंजुळ*
*गोड गीत म्हणायच्या*
*राष्ट्रगीत सुरेल सुरात*
*पेटीवर म्हणायच्या....*✒

*मंत्रमुग्ध व्हायची मुले*
*जेव्हा मॅडम वर्गात यायच्या*
*शिस्त फार होती अंगी*
*फार कडक दिसायच्या....*✒

*इंग्रजीत एकदम परफेक्ट*
*इंग्रजीच बोलायच्या*
*शब्दांसाठा फार महत्त्वाचा*
*समजावून सांगायच्या....*✒

*आजारी असलं कोणी*
*विचारपूस करायच्या*
*पारले -G घेवून सोबत*
*पहायला घरी यायच्या....*✒

*वक्तृत्व कला छान*
*भाषण छान करायच्या*
*एखादा गुलाब दिला की*
*प्रेमाने जवळ मला घ्यायच्या...*✒

*अशा माझ्या काळेबाई*
*जणू आईच भासायच्या*
*काळाआड गेली मुर्ती*
*आठवणी मनी उरायच्या...*✒

*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍
(माझ्या ब्लाॅगवर प्रसारित केली आहे त्यामुळे नावांसह शेअर करावी.)