Saturday, 5 January 2019

स्वप्नसुंदरी.. कन्या

*स्वप्नसुंदरी*

स्वप्नसुंदरी एक
आली माझ्या स्वप्नी
नाजुक,कोमल अन
रूपानं ती देखणी....✒

म्हणाली मजला
येणार आहे मी पाहुणी
लाडाची मी कन्या होईल
आनंद बहरेल जीवनी...✒

खूप करील माया
लावीन तुम्हां लळा
पाहु द्या मला जग
नका घोटू  गळा...✒

करीन मी खूप काम
तुम्हांला मदत करीन
करून खूप अभ्यास
कलेक्टर मी होईन....✒

नाही हुंडा लागणार
आहे मी शहाणी
स्वतःच्या पायावर मी
ठामपणे उभी राहीन....✒

येऊ द्या जन्माला मला
आईची मज कुस हवी
कांहीच नाही मागणार
ना कपडे,पुस्तक ना वही...✒

आईबाबा तुम्हां करते
मी हात जोडून विनवणी
होईन मी सा-यांची लाडकी
आहे मी फार फार गुणी....✒

*©®कवयित्री-कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍✍

No comments:

Post a Comment