Wednesday, 25 September 2019

'बाप्पास पत्र'

Date: 15 Sep 2019

*स्पर्धेसाठी*

*विषय-बाप्पास पत्र*

                                      *प्रिय बाप्पा*
                                      *मु.गांव तिथे गणपती*
                                      *पो-प्रत्येक घर*
                                       *ता.बच्चेकंपनी*
                                        *जि-ह्रदय*

        प्रिय लाडक्या बाप्पाला साष्टांग नमस्कार....तुम्ही आमच्या घरी आलात आणि आनंदाला उधान आलं.तुमच्या येण्याची तयारी आम्ही बच्चेकंपनी कित्येक दिवसांपासून करत होतो...मक्कर कसा बनवायचा डेकोरेशन कसे करायचे? सर्व तयारी करून ठेवली होती...तुमच्या आगमनाची आतुरतेने वाट पहात होतो.तुम्ही आलात त्या दिवशी सकाळी लवकर स्नान करून नवीन कपडे घालुन तुमच्या आगमनासाठी जय्यत तयारी झाली.
      मक्कर सजला, दारी सुंदर रांगोळी काढली...दारी तोरण बांधले, धुपदीप, पंचामृत,प्रसाद,फळे,बेल, फूल,आगरडा, हराळी,पुजेचे ताट, समई लाईटींग सर्व तयारी झाली...माझ्या आईने लाडक्या बाप्पासाठी त्यांना आवडणारे उकडीचे मोदक, तळलेल्या मोदकाचा वास घरात पसरला होता.....आपले आगमन झाले...पुजाअर्चा झाली...सकाळ-संध्याकाळ आरती घेता मन प्रसन्न झाले....गणपती बाप्पा मोरया...खूप जोशाने सर्वजण म्हणत आनंदाने प्रसाद घ्यायचो....
        बाप्पा तुम्हांला सर्वजण गणाधिशा, गणनायका, सुखकर्ता, दु:खहर्ता ,विघ्नहर्ता असे म्हणतात....अशी कित्येक 108 नांव तुमची आहेत...पण बाप्पा माझ्या मनात एक प्रश्न नेहमी पडतो.तोच प्रश्न मला फार सतावतो आहे.त्याचे तुम्ही उत्तर द्याल अशी आशा आहे. तुम्हांला सर्व लोकं विघ्नहर्ता म्हणून प्रत्येक कामं सुरू करताना तुमची पुजा करतात.तुम्हाला विघ्नहर्ता म्हणतात...तर तुम्ही या वर्षी केवढा महापूर आला...कित्येक लोकं पुरात वाहून गेली.गावच्या गांव पाण्याखाली गेली. पुराने थैमान घातले. नाहक कित्येक लोकांचे बळी गेले...बाप्पा तुम्ही ते विघ्न का टाळले नाहीत???
          पुराची बातमी ऐकून मला फार दु:ख झाले...लहान लहान मुलंबाळं, गुरंढोर, बायामाणसं पुरात वाहून गेली,पाण्याने गरिबांची मातीची घरे पडली.लोकं रस्त्यावर आली.कित्येक मुलांचे दप्तर गेले वह्यापुस्तके पुरात गेली...तेव्हा बाप्पा तुम्ही फक्त बघतच राहीलात का???
          शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला धावून आला. जातपात विसरून कित्येक लोकंआनी स्वतःचा जीव धोक्यात घालून इतरांचा प्राण वाचवला....लोकं एकमेकांना मदत करत होती. तू मात्र हा खेळ मस्त हातावर हात ठेवून पहात होतास का?
             तू विघ्नहर्ता आहेस तर मग इवढा पाऊस का पाडलास...अरे बाप्पा त्या लातूर,बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात लोकांना प्यायला पाणी मिळेना तिकडे थोडा पाऊस पाडायचाच होता तर तिकडेही पाडू शकला असतास पण नाही...तुला लोकांना झालेला त्रास पाहून आनंद वाटतो का?
       तरीही लोकं पुरातली मंडळींनी ही तुझी स्थापना केली.मनोभावे पुजा केली.मग तुच असा का वागतोस हा माझ्या बालमनाला पडलेला प्रश्न आहे बाप्पा....मी तुला हात जोडून विनवणी करतो...सर्वांना सुखात ठेव...असले नैसर्गिक विघ्न तुझं तू सारं...यापुढे बाप्पा लोकांना त्रास देवू नकोस...नाहीतर लोकांचा तुझ्यावरचा विश्वास उडून जाईल...आणि तुला विघ्नहर्ता न म्हणता विघ्नकर्ता म्हणतील हे ध्यानात ठेव...मी विचरलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे  मला तूही पत्र पाठवून किंवा दिदीच्या व्हाट्सप वरून कळवलास तरी चालेल...
        दिदिचा  what's app no.9767663257 या नंबरवर व्हाट्सप मेसेज करून कळव...आणि पुढच्या वर्षी लवकर या....गणपती बाप्पा मोरया....
             
                               *तुझाच लाडका*
                                 *सोन्या*

~~~~~~~~~~~~~~~~
*©®कवयित्री -कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍