Thursday, 23 May 2019

वाट पहाते मी

Date: 23 May 2019

*स्पर्धेसाठी षढाक्षरी*

*विषय-वाट पहाते मी*

वाट पहाते मी
मृग पावसाची
भागेना तहान
चातक पक्ष्याची.....!!

येईल पाऊस
भिजेल धरती
शांत होईल रे
जमिन तापती....!!

मिळेना हो पाणी
पडला दुष्काळ
पडेल पाऊस
येईल सुकाळ....!!

मिळेना रे चारा
पडला दुष्काळ
झाडे लावू चला
येईल सुकाळ......!!

आडवा जिरवा
पावसाचे पाणी
शोषखड्डे खणा
मिळेल रे पाणी....!!

तोडून हो वृक्ष
तापली जमिन
मरतात पक्षी
रोज पाण्यावीन....!!

*©®कवयित्री कु मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम*
✒✒✒✒✒✒✒