Thursday, 30 April 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज....



*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज*

        सर्वधर्मसमभाव हे या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल, १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला.त्यांचे पुर्ण नांव माणिक बंडोजी इंगळे असे होते.त्यांच्या गुरुचे नांव अडकोजी महाराज असे होते....अडकोजी महाराजांनी त्यांचे माणिक है नांव बदलून तुकडोजी असे ठेवले.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल? याविषयीची जी उपाययोजना महाराजांनी सुचविली होती. ती अतिशय परिणामकारक ठरली.ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे,ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट, कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केले.
         भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल. अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल? याविषयी त्यांनी चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्याच्या  स्थितीची पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे ग्राम विकासाच्या मूलभूत समस्यांचा विचार केला.
     तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी प्रभावी खंजिरी भजनातून विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. म्हणून त्यांनी कारावासही भोगला. कुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते. हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले.
          राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज खरी समाजाला आहे. सर्वधर्मसमभाव सर्वांनी सारखा जपला पाहिजे पण आजच्या काळात प्रत्येक जण माझा धर्म कसा मोठा? मी कसा मोठा? हे दाखविण्यात गुंतला आहे. लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचे वेगवेगळे रंग ही वाटून घेतले आहेत.आणि राष्ट्रपुरुष सुद्धा वाटून घेतले आहेत. जे थोर पुरुष त्यांनी कधीही कोणत्याही धर्माबद्दल तिरस्कार केला नाही. सर्वधर्मसमभावाची भावना पुरस्कृत केली. आज त्याच महामानवांना आजच्या समाजाने वाटून घेतले आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
        राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटायचे की देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे रक्षण करू शकतील.पण आजच्या समाजातील तरुण हे व्यसनाच्या आहारी गेलेले दिसत आहेत. व्यायाम करून बलोपासक तर दूरच सर्व तरुण मंडळी त्या मोबाईलच्या आभासी दुनियेत टिकटॉक बघण्यात तासन्तास गुंतलेली आहेत.समाजाचे तर सोडाच, देशाचे पण यांना घेणेदेणे राहिलेली नाही. त्यामुळेच तर देशात दर मिनिटाला एका मुलीवर अन्याय, अत्याचार होतो आहे. सुसंस्कार पोरका झाल्यासारखा वाटत आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात स्वतः सोडून येणारी ही आजच्या काळातली पिढी आहे. काही अपवाद असतीलही पण खरंच आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे.
          आजच्या काळातल्या तरुण पिढीने त्यांचे १०१ मौलिक विचार जरी वाचून आत्मसात केले. तरी खूप झाले. केवळ मूर्ती पुजेच्या मागे न लागता आपले ध्येय प्राप्तीकरिता मुख्य चरित्राचे चिंतन करून त्याचे गुण अंगी बाणवणे. ही खरी पूजा आहे. त्यामुळे मनाचा संकल्प दृढ होऊन वृत्ती ध्येयरूपी तदाकार होते. हे आजच्या समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही मनुष्यमात्रात जेंव्हा कांही कमतरता दिसून येईल तेंव्हा त्याचा उपवास करू नका. त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या. आणि त्याचा जन्म सफल करा. याच्या इतके पुणे जगात दुसरे नाही... कसं वागावं? कसं जगावं? कसं राहावं? हे जर आजच्या समाजातील लोकांना समजत नसेल तर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता वाचून आचरण त्याप्रमाणे करावे तेव्हा या  सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
         धर्म हा धंदा म्हणून आचरणाचा विषय नव्हे, किंवा ते एक विचित्र पुढेही नव्हे, तर तो व्यष्टीसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो. म्हणूनच त्यांची मूलतत्त्वे अबाधित असतात. मानवाने प्रत्येक धर्माची जी मूलतत्वे आहेत. ते मुलतत्वे अभ्यासावेत. ती उन्नतीकरिता दिलेली आहेत. पण आज माणूस मुलतत्वे बाजूला सारून ती मुलतत्वे किंवा महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी धर्म किंवा त्याच्या धर्मातील महापुरुष डोक्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.
      अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे तुकडोजी महाराज यांच्या विचारांची खरी गरज आजच्या समाजाला आहे आज अंधश्रद्धेपायी मोठमोठे खून होताना ,निष्पाप जनावरे बळी जाताना दिसताहेत स्वतःची सदसद्विवेकबुद्धी  जागृत ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणसाने पाहिले पाहिजेत. भारत देशाच्या रक्षणासाठी युवकांनी सदैव तयार असले पाहिजेत.
      
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 24 April 2020

छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र....!!




*छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र*

    स्वराज्याचे स्वप्न जिजाऊ माँसाहेबांचे पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांसह भक्ती,शक्ती,युक्ती या त्रीसंगमाचा  वापर करून मोठ्या पराक्रमाने, धैर्याने,निकराने परकीय सत्तांशी लढा देऊन ३५०गड किल्ले जिंकून, मोगलशाही, पातशाही,आदिलशाही, निजामशाही,डच, फ्रेंच,पोर्तुगीज अशा सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेल्या महाराष्ट्राच्या मातीत, पवित्र संताच्या भूमीत,धाडसी मातेच्या कुशीत जन्म घेतलेल्या शिवरायांनी सर्व सत्ता धुडकावून लावल्या. शत्रूला सळो कि पळो करून सोडले. ज्यांची कीर्ती अख्ख्या जगाला विश्ववंदनीय आहे अशा महाराष्ट्राच्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बघितला तर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
           महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा अदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. प्रजेवर जुलूम करणारे होते. खूप अन्याय करणारे होते.या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. त्या काळात उघडपणे पूजाअर्चा लोक करू शकत नव्हते. रयतेला  पोटभर अन्न मिळत नसे. सुरक्षित निवारा नव्हता. सर्वत्र अन्याय माजला होता.
          राजमाता जिजाऊंनी हे सर्व पाहिले आणि स्वतःचे स्वराज्य उभ करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बाल शिवबाला सुरुवातीपासूनच युद्धाचे धडे देत तयार केले. सर्वच क्षेत्रात निपुण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने शस्त्र नसतानासुद्धा मूठभर मावळ्यांच्या मदतीने एक एक गड जिंकत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जाती-धर्माच्या सगळ्यांना सोबत घेऊन न्यायाचे, लोकहिताचे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.छत्रपती शिवरायांच्या फौज मध्ये अठरापगड जातीचे लोकं सामील होते. वेळप्रसंगी जिगरबाज मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत स्वराज्यासाठी बलिदान दिले होते.त्यांच्या फोजेमध्ये महार,मांग, मातंग, रामोशी, वडार,चांभार, धनगर, बंडगर, मुस्लिम अशी अनेक अठरापगड जातीतले मातब्बर शूरवीर मावळे सोबत होते. सर्वांच्या मनात एकच होतं ते म्हणजे "स्वराज्य" आपल्या धन्यासाठी व धनी रयतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूला मातीत घालणारे जिगरबाज मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष आजही गड-किल्ले देत आहेत.
         छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा संताचा वारसा लाभलेला. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.प्रत्येक मावळा आपल्या  राजासाठी जिवाची बाजी लावायला तयार असायचे यातच त्यांचे सर्वस्व समजून घ्यायला हवं....छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. त्रासलेल्या रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करून राज्याभिषेक करून घेतला. शेतकऱ्यांच्या काडीलाही कोणी धक्का लावणार नाही असा आदेश जारी केला. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणा-यांचे हात पाय कलम करून न्याय दिला स्त्रियांचा आदर करणार, मान सन्मान करणारे प्रत्येक स्त्रीला मातेसमान पाहणारे छत्रपती जगाच्या पाठीवर दुसरे होणे शक्यच नाही. हिरकणीची गोष्ट समजताच हिरकणी ला साडीचोळी देऊन मान सन्मान केला‌. आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले. वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश जिंकून साडेतीनशे किल्ले जिंकले छत्रपती शिवरायांनी अनेक संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्याजोगे होते.
         छत्रपती शिवरायांनी वनदुर्ग, जलदुर्ग, गिरीदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. राजगड, प्रतापगड,सिंधुदुर्ग या सारखी नवीन किल्ले छत्रपती शिवरायांनी बांधलेले गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था महाराजांनी केली होती प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार,मुजुमदार, सबनीस, कारखानीस हे सुरक्षितेसाठी ठेवले होते. तोफा तयार करून घेतल्या होत्या. तोफा खराब होऊ नये म्हणून त्यावर मेणाचा लेप लावत असत.अनेक आरमार उभे केले.स्वराज्याच्या आरमारातील कोळी, भंडारी,आगरी यासारखे विविध जाती धर्मातील लोक होते... छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर खाते खूप छान होते त्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे होते.
       गनिमी कावा -गनिमी कावा म्हणजे युद्धतंत्र... आपल्या सोयीच्या ठिकाणी शत्रूवर हल्ला करून शत्रु सावरतो न सावरतो तोपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचणे याला गनिमी कावा असे म्हणत. स्वराज्य व्यवस्थित चालावे म्हणून राज्यकारभाराची आठ खात्यात विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. राज्यात प्रजेला अन्न,वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण केल्या स्त्रियांचा सन्मान केला कोणावरी अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. पटकन प्रजेला न्याय दिला जायचा.शेती आणि उद्योगधंद्याचा विकास होऊ लागला प्रजा सुखासमाधानाने राहू लागली.
           गरजू गरीब शेतकऱ्यांना छत्रपती शिवरायांनी बैल जोड्या दिल्या पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता त्या काळात घेतली जायची. जंगले नष्ट होणार नाहीत. याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. आरमारासाठी जहाजे, वल्ले,सॉर्ट इत्यादी तयार करून घेतले.एकही झाड तोडू नये असा हुकूम छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत होते...गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे रयतेचे उत्पन्न वाढले.स्वराज्यात रयतेला कधीही दुष्काळ जाणवला नाही. पावसाळ्यापूर्वी स्थळे व टाक्या बांधून पावसाचे पाणी अडवले जायचे. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत. व सारा माफ करीत असत. सरकारी कोठारातील धान्य रयतेला मोफत वाटून देत असत.प्रत्येकाला रोजगार मिळवून देत असत. बारा बलुतेदारांच्या हाताला काम देऊन रोजगाराची संधी निर्माण करून देत असत त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बलुतेदार व कारागीर सुद्धा सुखी झाले होते.
      स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून बाहेरुन येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला.स्वराज्यात मिठाचा व्यापार वाढला.स्वराज्यात व्यापार उद्योग धंद्याची वाढ केली.कर्नाटकातील गडीच्या रक्षणार्थ "मलमा देसाई" या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिला धाकटी बहीण मानून गडी व गाव सन्मानपूर्वक साडीचोळीसाठी भेट दिले व तिला "सावित्रीबाई" हा किताब दिला... इतकेच नव्हे तर स्वच्छतेविषयी छत्रपती शिवाजी महाराज फार जागरूक होते प्रत्येकाच्या घरात शेजारी स्वच्छता पाहण्यासाठी सूचना केल्या जायच्या.
         मोठ्या बाजारपेठेत कचरा राहणार नाही याची दक्षता घेतली जात असत‌.कचरा जाळून टाकून त्याची राख भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावे अशी आज्ञा केली होती. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दारूगोळा आरमार पर्यावरणाचे संरक्षण, जलव्यवस्थाप,,सागरी व्यापार व्यापार पेठा स्वच्छतेविषयी दक्षता, महिलांचा मानसन्मान, न्याय कायदा सुव्यवस्था, सैनिक त्यांचे धार्मिक धोरण आणि अठरापगड जातीधर्माच्या लोकांना एकत्र ठेवून शेतकऱ्यांना रयतेला प्रजेला सुखी ठेवण्याचे तंत्र आजही महाराष्ट्राला दिशा दर्शक असा आहे. त्याकाळी कोणीही आत्महत्या करीत नसत सर्व प्रजा सुखाने नांदत होती म्हणून तर जगाच्या पाठीवर फक्त छत्रपतीनाच लोककल्याणकारी जाणता राजा असे म्हणतात....
महाराष्ट्राच्या कडेकपारी गड किल्ल्यातून सह्याद्रीच्या कणाकणातून एकच नाद घुमतोय...

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र शूरवीरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा....
आम्ही धन्य धन्य झालो आमचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला....

जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

कवयित्री लेखिका शिक्षिका
कुमारी मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
तालुका जिल्हा वाशिम
मो.९७६७६६३२५७


उर्जा देणारा काव्यसंग्रह म्हणजे वादळातील दीपस्तंभ

 कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी केलेले रसग्रहण ! धन्यवाद ताईंचे !
__________________________________
"नवऊर्जा देणारा काव्यसंग्रह: "वादळातील दीपस्तंभ "

आजच्या तरूणाईला नवऊर्जा प्रदान करून जगायची प्रेरणा देणारा काव्यसंग्रह म्हणजे मु.आर्वी, जि. वर्धा येथील माझे मार्गदर्शक शिक्षक व प्रसिद्ध कवी, समिक्षक अरूण विघ्ने यांचा "वादळातील दीपस्तंभ " ! त्यांचा पहीला काव्यसंग्रह "पक्षी " सन 2000 मध्ये प्रकाशीत झाला .
     या काव्यसंग्रहाची प्रस्तावना घाटंजी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक , प्रसिद्ध साहित्तिक क.वि. नगराळे यांनी समर्पक व कवितेला न्याय देणारी लिहीली आहे . मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे . एकेकाळी काही विशिष्ट लोकांना शिक्षणाचा हक्क नव्हता . त्यांची लेखणी ही बंदिस्त होती . पण बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाने हे हक्क बहाल केले आणि पिढ्यांपिढ्याच्या बंदीस्त लेखणीचे बंध तोडलेत .सर्वांसाठी शिक्षण खुले झाले . ही संकल्पना मुखपृष्ठावरील चित्रात चित्रकाराने हुबेहुब साकारली आहे .तलवार ही रक्तरंजीत क्रांती करते पण लेखणी ही रक्तविरहीत क्रांती करते . बाबासाहेबांच्या लेखणीने जगविख्यात रक्तविरहीत क्रांती केली आहे. हा काव्यसंग्रह परीस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केला असून त्यात विविध काव्य प्रकारातील , विविध विषय आणि आशय असलेल्या  एकूण 110 कवितांचा समावेश आहे .
   अरूण विघ्ने हे हाडाचे शिक्षक असले तरी त्यांच्या कविता शेतक-यांच्या शेतीमातीशी कृतज्ञतेचा भाव जपणा-या ,सैनीकाबद्दल आदरभाव जपणा-या, आई-वडील, बहीण यांच्याबद्दलचा प्रेमभाव जपणारा, वीरांच्या कार्याशी नतमस्तक होणारा,  राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले , डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे छ.शिवाजी महाराजांविषयी आदरभाव व्यक्त करणारा आहे.
कवींना त्यांचे कवीमन स्वस्थ बसू देत नव्हते .त्यांचे निसर्गाशी आपुलकीचे नाते असल्याने पाणी, शेती, पशु, पक्षी अनेक सजीव, निर्जीव वस्तूवर प्रेम करायला शिकविणारी त्यांची कविता वाचक मनाला भावणारी  आहे . परिस्थितीपायी ज्या बालकांना काम करावं लागतं ही त्यांच्याविषयीची मांडलेली व्यथा " बालकामगारांचं शल्य " या कवितेतील हृदय हेलावून टाकणारी आहे .

" पोटाची खळगी भरण्या
बनावं लागतं बाल कामगार
समजू नये कुणी हौस आमची
नाही स्वमर्जीने हे काम करणार ! "

या ओळीतून परिस्थितीशी झुंज देणा-या बाल कामगारांची सल कवींनी खुप भावनीकतेने मांडली आहे .समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे अंधश्रद्धा . या अंधश्रद्धेपायी समाजातील अनेक निष्पाप लोकांचे हकनाक बळी गेलेले आहेत . म्हणून कवी आपल्या "अंधश्रद्धा " या कवितेत म्हणतात ...!

" विज्ञानाच्या कसोटीवर
बघा ती घासून श्रद्धा
स्विकारा तीला डोळंस
मग कशी होईल अंधश्रद्धा ? "

या ओळीतून अंधश्रद्धेची पट्टी बांधून वावरणा-या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातण्याचा प्रयत्न केला आहे. हळव्या मनाच्या कवीमध्ये खुळचटपणाची भावना अजीबात कुठेही दिसून येत नाही .
 " उध्वस्त वावरातले रस्ते " या कवितेतून कवी होणा-या भ्रष्टाचारावर वार करतात. त्यांच्या कवितेतून आपल्याला त्यांची विद्रोही भावना दिसून येते . ते म्हणतात..!

" तुम्ही खुशाल बांधा
उध्वस्त वावरात रस्ते
आणि आमच्या करपलेल्या भावनांचे बंगले ...
बंगल्यावर चढवा बिनधोक इमलेच इमले ,
आमच्या उजेडाच्या स्वप्नांच्या कत्तली करून ..!"

गोरगरीब शेतक-यांचा जीव की प्राण म्हणजे त्यांची शेती . आणि शासन ती शेती कवडीमोल भावाने अधिग्रहीत करून त्यांच्या शेतात कुचकामी मोठमोठे रस्ते बांधतात . बिचा-या त्या शेतक-याला भूमीहीन करून माय लेकराला वेगळे केल्याचे पाप जेव्हा येथे घडते, तेव्हा कवींच्या मनात हळहळ, चीड, राग, विद्रोह निर्माण होतो आणि मग अशी कविता जन्मास येते .
     अंधारात चाचपडणा-यां लोकांना अरूण विघ्नेंचा  " वादळातील दीपस्तंभ " हा कवितासंग्रह प्रकाश देणारा, दिशादर्शक आहे . कवी हे मुळात शिक्षकी व्यवसायातील असल्याने त्यांच्या कविता संस्कार करणा-या, प्रगल्भ चिंतन करायला लावणा-या , अन्यायाविरूद्ध विद्रोह करायला लावणा-या , वादळातील समस्त दीपस्तंभांवर प्रेम करायला लावणा-या आहेत .

" गीत जीवनाचे । गाऊ आनंदानं ।
राहू दोघंजनं । सुखामंदी ।। 

मागे हा अरूण । एकची वचन ।
नको अभिमान । मनाठायी ।। "

या अभंगातून कवी जीवनाच्या वाटेवर आनंदानं रहायला, गीत सुखाचे गायला सांगतात .येणा-या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आनंदानं जगून घ्यावं. हा जन्म पुन्हा नाही असं सांगतात . तसेच हळव्या मनाचे कवी स्वतःला कुठलाच अभिमान नको , अभिमानाचा, गर्वाचा लवलेशही नको असं मागनं मागतांना दिसतात .
   अस्पृश्यतेच्या नावाखाली अनेक अन्याय, जुलूम अत्याचार केलेल्या व्यवस्थेला कवी 14 आँक्टोबर 1956 चा महीमा सांगण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे .

"महीमा तो काय ।
वर्णावा बाबांचा । 
कोटी वंचितांचा ।
उद्धारक ।। "

या अभंगातून वर्णव्यवस्थेवर कवी कडाडून हल्ला चढवत जनतेला जगण्याची नवी दिशा देणा-या बाबासाहेबांचा परीचय नव्या पिढीला करून देतात .

" अवघे करूया
सिमोल्लंघन अनिष्ट रूढीचे
पापी विचारांचे
मनोभावे !"

या काव्यांजली प्रकारातील रचनेत कवी अनिष्ट रूढी परंपरांवर कडाडून हल्ला चढवितांना दिसतात . हा माणुसपण नाकारणारा विचार मनातून हद्दपार करूया आणि बंधुभावाने सारे मिळून जगूया असा संदेश देतात .
     कवी शब्दांचा दीवा हाती घेऊन अंधारातून प्रकाशपर्वाच्या दिशेने वाट शोधीत सक्षमपणे वादळातील दीपस्तंभाप्रमाणे पुढे सरकतो आहे . त्यांच्या अनेक कविता ह्या समाजभान ठेऊन वाईट गोष्टींचा बिमोड करणा-या ठरतात . एकूणच हा काव्यसंग्रह वाचकांच्या मनाला भावणारा आहे . तो दिशादर्शक वाटतो . नव्या पिढीला नवऊर्जा देणारा वाटतो . वाचक निश्चितच याचे स्वागत करतील . असा मला ठाम विश्वास आहे . त्यासाठी कवी अरूणजी विघ्ने यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देते !

कु. मिनाक्षी पांंडुरंग नागराळे
(स.शिक्षिका,कवयित्री,लेखीका, संपादिका)
वाशीम, 
मो. 9767663257

Wednesday, 22 April 2020

शेती-मातीशी नाळ जोडणारा वऱ्हाडी काव्यसंग्रह म्हणजे "जागल"

 Date: 20 Apr 2020

शेती-मातीशी नाळ जोडणारा व-हाडी काव्यसंग्रह म्हणजे-"जागल"

~~~~~~~~`~~~`~~~~~~~~~~~~~~~~~~~~

                 शेतकऱ्याची नाळ मातीशी जोडलेली असते. असा शेतकरी पुत्र असलेला व-हाडी भाषेला आई माननारा, पेशाने जरी शिक्षक असला तरी शेतीशी, शेतातल्या मातीशी नाळ जोडणारा कवी म्हणजे अरुण विघ्ने सर यांचा दुसरा काव्यसंग्रह म्हणजे जागल होय एका शेतकऱ्याचे सर्व स्वप्न निसर्गावरच अवलंबून असते.निसर्गाने साथ दिली तर शेतकरी शेती पिकवू शकतो. आणि त्याच्या भरवशावरच जगू शकतो. म्हणून शेतकर्‍याला जगाचा पोशिंदा असे म्हणतात ....
              कवी अरुण विघ्ने सरांचा  हा व-हाडी  काव्यसंग्रह म्हणजे आपली बोलीभाषा व-हाडीचा गोडवा,सुरेख पद्धतीने मांडला आहे. "जागल" म्हणजे शेतकरी रात्रीला शेतामध्ये पिकांची किंवा धान्याची राखण करण्यासाठी एका विशिष्ट ठिकाणी शेतात बसतो,कुणी गुरंढोरं, जनावरे आपल्या पिकांची हानी करू नये म्हणून राखण करत बसतो ती जागा म्हणजे जागल होय....
             "जागल" या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके व आकर्षक असून त्यावर पौर्णिमेचा चंद्र उगवला आहे.अशा पौर्णिमेच्या रात्रीला शेतकरी शेतावर जागरण करण्यासाठी, धान्यांच, पिकांची राखण करण्यासाठी  शेताला जाताना चित्र आहे शेतकऱ्याच्या हातामध्ये वेळूची काठी आणि डाव्या हातामध्ये कंदील आहे. त्याला अंधार या रस्त्यावरून मार्ग दाखवण्यासाठी, स्वतःचे रक्षण करण्यासाठी, शेतकऱ्यांनी आपल्या हातात कंदील घेतले आहे...व हातामध्ये काठी घेतली आहे. एका शेतकऱ्यांना पीक काढायचे म्हणून रात्रंदिवस कष्ट करावे लागतात हेच सांगणारे हे मुखपृष्ठ शेतकऱ्या विषयी आपुलकी, स्नेह, आदर, निष्ठा व कष्टाची जाणीव करून देणारा हा शेतकरी आपल्या हाडांची काडं करून जगाचं पोषण करत असतो.
            प्रसिद्ध कवी अरुण विघ्ने सर यांचा जागल या काव्यसंग्रहाचे प्रकाशन संवेदना प्रकाशन नागपूर यांनी केले आहे. तर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने रेखाटन केली आहे. या काव्यसंग्रहाची किंमत१५०/ रुपये असून त्यात एकूण .१५०.पृष्ठेआहेत...प्रस्तावना प्रसिद्ध वराडी कवी श्री. पुष्पराज गावंडे अकोला यांची लाभली आहे. यात एकूण ८५ व-हाडी कविता निसर्ग व मातीशी नाळ जोडणाऱ्या मराठी पण व-हाडी भाषेत आहेत .सुप्रसिद्ध कवी ज्ञानेश वाकुडकर नागपूर यांनी पाठराखण शुभेच्छा देऊन केली आहे.
               विदर्भातली बोली भाषा म्हणजे व-हाडी भाषा होय. व-हाडी कविता म्हणजे व-हाडीचा अस्सल बाज, मराठीचा अस्सल साज, व-हाडी भाषा नरम-तलम -मुलायम आणि गुळाइतका गोडवा  भरणारी आहे. कुणीही तिच्या प्रेमात पडावे इतकी मधुर भाषा याच भाषेचा साज चढवत 'जागल' हा काव्यसंग्रह नटला आहे.
  
              *ल्याली श्रृंगार माती*
              *तिले हिरवाकंच शालू*
              *नखशिखांत सजली*
               *मह्या व-हाडीची कालू...!!*

        मातीशी घट्ट नाळ जोडणारा कवी म्हणतो यांनी शृंगार माती. मातीने शृंगार केला आहे. आणि या धरतीने हिरवा शालू जनू घातलाय आणि नव्या नवरीसारखी ही माती नटुन-थटुन बसली आहे. माझ्या व-हाडी ची काळी माती ही अगदी नवीन नवरी सारखीच भासते आहे असे कवीला वाटते.

         अलंकार झाडाझुडपांची 
         कशी दिसते नवी नवरी 
         नाकीडोळी रूपवान
         पोत दव मोत्या नवी कोरी....!!

     ही माती जिच्यावर शेतकरी बळीराजाचे पोट आहे. बळीराजाच्या जीवांवर अख्खं जग पोसतं आहे.अशी ही पावित्र्य माती या पवित्र मातीने झाडाझुडपांचे अलंकार जनु घातले आहेत. नव्या नवरीसारखी नटुन थटुन बसली आहे. नाका डोळ्यांने देखणी,रूपवान असणारी आणि तिच्या पानावरचे दव हे जणू तिच्या गळ्यातली पोतं म्हणजे मंगळसूत्रा प्रमाणेच कविला भासत आहेत. कवीला माती हिरवा साज लेवून नवीन नवरी सारखी दिसत आहे. श्रावण मासात ही माती. ही काळी आई जणू हिरवा शालू घालून नेसून बसते असे सर्वांना वाटते. तीचं अनोखं रूप पाहून मानवाला निसर्गाची भुरळ पडते. आणि या मातीवर झाडंझुडपं येतात ते झाडंझुडपं म्हणजे जनू मातीच्या अलंकाराचं आहेत. त्या अलंकार मुळे नवीन नवरीसारखी ही धरणीमाय शोभून दिसते आहे....

         *आता लागला मिरुगं* 
         *माती ढगाकळं पाहे*
          *कवा येसीन पावसा?*
          *वाट भीरभीर पाहे....!!*

          *येनं येनं गा पावसा*
          *कास्तकार पाहे वाट*
          *तुह्या स्वागताले उभं*
           *माह्य बियानाचं ताट.....!!*

      मराठी भाषेचे हे बोल काळजाला भेटल्याशिवाय राहणार नाहीत. अशी मृदू,कोमल भाषा एक वेगळा साज लेवून मराठी व-हाडी भाषेत कवींनी मांडली आहे. उन्हाळ्यात मातीची ढेकळं तप्त उन्हात तापून मृग पावसाची वाट बघत असतात. मृग नक्षत्रामध्ये आभाळात ढग दिसायला लागतात.तसे शेतातली ढेकळं आभाळाच्या दिशेने पावसाची वाट बघत असतात.कधी एकदा पाऊस येईल आणि तहानलेल्या मातीला तृप्त करून जाईल अशी आशा मातीला असते. पाऊस राजा कधी येणार? याची वाट माती पाहते. खूप आतुरतेने जसे गोठ्यातले वासरू आपल्या आई ची वाट पाहते तसे शेतकरी राजा आभाळाकडे रोज पावसाची वाट आतुरतेने पाहत असतो. पाऊस यावा म्हणून मनोमन प्रार्थना करीत असतो. बळीराजा बी बियांणे घरी आणून ठेवून पावसाची वाट देवाप्रमाणे पाहत असतो. पावसाच्या स्वागताला हाती बियाणाचे ताट  घेऊन शेतकरी उभा असतो. पाऊस हा शेतकऱ्याचा श्वास आहे. पाऊस आल्यावर शेतकरी जिवंत असतो. दुष्काळ पडल्यानंतर जिवंत असून मेल्या सारखाच असतो....

       माती उगवते झाळं
       धांडे उगवते कणसं 
       या दाण्याची भाकर
       जगवते सारी माणसं...!!

       मातीतच जलमते
       मातीतच पुरते 
       मातीचा थो गोया
       मातीतच जगवते....!!

    मराठी भाषेत झाडाला झाळं म्हणतात...मातीत झाडे उगवतात आणि ही झाडे,फुले,फळे, पाने, औषधी वनस्पती,डिंग,कागद,बिया इत्यादी देतात. ज्या मातीत झाडाचे पोषण होते त्याच मातीच्या जीवावर शेतकरी व जग जगते.म्हणून जन्म देणारी आपली आई जरी असली तरी जगवणारी माती सुद्धा आपली काळी माय आहे दुसरी आईच आहे. आपण या मातीत उगवणाऱ्या पिकावर जीवन जगतो. माती नाही तर काहीच नाही. मातीत धान्य उगवते आणि धान्यावर जगातली सारी माणसं जगतात.
      माणूस जरी मानवाच्या पोटाला जन्माला आला तरी नऊ महिन्यानंतर गर्भाच्या बाहेर आल्यापासूनच जगणं आपलं मातीवरच अवलंबून असतं. आणि शेवटी माणूस मेल्यावर सुद्धा याच काळ्य आईच्या कुशीत जातो. माणूस मातीचा गोळा. शेवटी माती
च जगवते.
    "जागल"  करणारा शेतकरी खूप कष्टाने, घामाने, आपले शेत भिजवतो आणि पिकवतो. त्याला सत्याची, नीतिमत्तेची,चांगल्या विचारांची, पेरणी करतो. त्याची काळजी, घरादाराची लेकीसुना, बाळांची यासाख्या जगाचा पोशिंदा हा शेतकरी स्वाभिमानाचं खत घालून,रक्ताच पाणी करून, विज्ञानाची कास धरून, अपार मेहनत करून, धान्य पिकवत असतो. असा हा मराठी भाषेतला शेतकऱ्याविषयी प्रेम, जिव्हाळा, आदर,पुढच्या तरुण पिढीला शेतीविषयी आवड निर्माण करणारा, व-हाडी मातीला माय म्हणून संबोधणारा व काळ्या मातीच्या प्रति ऋण व्यक्त करणारा काव्यसंग्रह खरोखरच वाचनीय व तरुण वर्गाला दिशादर्शक असा आहे. तो सर्वांनी अवश्य वाचावा असाच आहे. शेतकऱ्याविषयी अतोनात प्रेम असणाऱ्या, संवेदनशील मनाचे कवी अरुण विकणे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....


     लेखिका/समिक्षिका/शिक्षिका/कवयित्री
    कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
     मु.पो.कोकलगाव
    ता.जि.वाशिम
     पीन ४४४५०५
     मो.९७६७६६३२५७

Friday, 10 April 2020

"एका विषाणूने शिकवलं"....!

 *"एका विषाणूने शिकवलं...."*

        आज संपूर्ण जगामध्ये कोरूना covid 19 या विषाणूने थैमान घातले आहे.चीन,अमेरिका, इटली सारख्या देशात हजारोंच्या संख्येने लोक मरत आहेत. मोठमोठ्या प्रगत राष्ट्रांमध्ये भरपूर प्रमाणात सुख-सुविधा दवाखाने असून सुद्धा हा महाभयंकर आजार आटोक्यात यायला बराच वेळ लागतो आहे. भारतासारख्या देशात लवकरच लॉकडाउन केल्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य झाले आहे. तरीसुद्धा प्रत्येक नागरिकांनी "मीच माझा रक्षक" म्हणून घरात थांबावयाचे आहे. तरच आपण या महामारी विरुद्ध लढा देऊ शकतो. आणि हा महाभयंकर आजार आटोक्यात आणू शकतो.
             आज पहिल्यांदा असे झाले आहे की संपूर्ण भारत 21 दिवसांसाठी (पुढे वाढतील ही) जागेवर थांबला आहे. आज सारे प्राणी, पक्षी मुक्तपणे बाहेर निसर्गात संचार करताना दिसतात. पण दुर्दैवी गोष्ट आहे की मनुष्यप्राणी मात्र घरात कोंडून घेतला आहे.आणि ते फार गरजेचे, महत्त्वाचे आहे. सर्वांनी बाहेर जाणे काटेकोरपणे टाळले पाहिजे.तरच आपण निशस्त्र होऊन या कोरोना विरुद्ध लढा देऊ शकतो आणि त्याला हरवू शकतो.
            निसर्गात फार मोठी ताकद आहे.आज वर्षानुवर्षे होत असलेली नैसर्गिक हानी आता भरून निघत आहे. असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. आपण पाहतो कित्येक वर्ष झाली रस्त्यावर गाड्यांचा साम्राज्य, होणारा गाड्यांचा धूर, वाढते प्रदूषण, कारखाने, गर्दी माणसांची वेगळी आणि वाहनांची वेगळी, बाहेर मोठ्या शहरात जीव गुदमरल्यासारखा वाटायचा पण या २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या काळात सर्व वातावरण कसे छान,प्रसन्न, स्वच्छ झाले आहे.मोठमोठ्या शहरांमध्ये स्वच्छ वातावरण झाले. नाही कसला धूर, ना दमट हवा, दमट वातावरण नाही,ना  कसले व्यसन, ना कुठले हॉटेल्स उघडे, ना हॉटेल्समध्ये पिझ्झा-बर्गर खाणारी पिढी. आज मोठ्या शहरांमध्ये लोक जीवाच्या आकांताने खेडे गावाकडे धाव घेत आहेत.स्वार्थापोटी आई-वडील खेडेगावात सोडून श्रीमंतीची हाव उराशी कवटाळून मृगजळासारखी स्वप्न पाहणारी लोकं शहराकडे धाव घेणारी सुसक्षित मंडळी आज अचानकपणे गावाची आठवण आली आणि गावाकडे निघून आली आहेत.सर्वजण गावी येऊन आई-वडिलांसोबत घरात कुटुंबासमवेत जगताना दिसताहेत हे सारे एका विषाणूने शिकवलं....
            आयुष्यभर पैशासाठी मरमर करणारा माणूस जागेवरच थांबला. आता मानवाला कळून चुकलं की जीवन जगायला खूप काही लागत नाही. फार कमी गरजा आहेत मानवाच्या ...तसं पाहिलं तर अन्न,वस्त्र, निवारा या तीनच मुख्य गरजा आहेत पण खोट्या दिखाव्यापोटी अति पैसा कमावण्याच्या नादात मोठे उद्योगधंदे,कारखाने उभे करण्यासाठी पर्यावरणाशी, निसर्गाशी अन्याय मानवाने केला आहे. मोठी जंगले शेती नष्ट करून त्यावर दहा-वीस मजली  मोठमोठ्या इमारती सिमेंटच्या उभ्या केल्या आहेत. आज केवढी मोठी बंगले ओस पडली आहेत. शहरात कोरोना येईल आणि आमच्या जीवाला धोका होईल हे ओळखून आज ग्रामीण भागात लोकांनी धाव घेतली आहे. आणि हा बाहेरून येणारा रोग आज काही अंशी ग्रामीण भागात सुद्धा पोहोचला आहे.
         ग्रामीण भागात शहरी भागाइतका मोठा धोका नाही. ग्रामीण भागातला शेतकरी आजही शेतीची कामे करतोय. आणि देशाला पुरेल असा धान्य पिकवतो.तोच जगाचा खरा पोशिंदा आहे माझा बळीराजा... काबाडकष्ट करतो आहे. देवाच्या रूपात आज रस्त्यावर पोलीस, डॉक्टर्स, नर्स उभे आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून... या संसर्गजन्य रोगाचा प्रतिकार करण्यासाठी रात्रंदिवस सज्ज आहेत.ज्या मंदिराला जरी कुलूप लागली असली तरी मंदिराच्या ट्रस्ट या संस्था अशा या कोरोनाला  हरविण्यासाठी कोटी ने मदतीचा हात देत आहेत. मोठे अभिनेते, उद्योगपती, दानशूर लोक,खेळाडू या चांगल्या कार्यासाठी सर्वोत्परी मदतीचा हात देत आहेत... हे सारे एका विषाणूंनी शिकवलं....
        आज कितीतरी लोक घरात बसून चांगल्या कामाची सुरुवात करीत आहेत. मुलाबाळांची कमी होत चाललेला संवाद धावत्या युगात सोबत पाळणारा माणूस आणि आईवडिलांसोबत बायकोसोबत वेळ घालवीत आहे. मायेने पाहण्याचा दृष्टीकोण या विषाणूने शिकवला आहे.किती पुरुष मंडळींनी या सुट्ट्या छान उपयोग केलेला दिसतो आहे. प्रत्येकाची वेगवेगळी कला बाहेर पडताना दिसते....
         बऱ्याच जणांनी या लॉकडाऊन च्या काळात घराची स्वच्छता,नीटनेटकेपणा करून घर स्वच्छ, छान ठेवले आहेत. कितीतरी जणांनी रोज नवनवीन पदार्थ करून आपल्या बच्चेकंपनीला आई-वडिलांना पत्नीला खाऊ घातले आहेत. काही जणांनी बगीच्या सुंदर करण्याचा, बाग काम करण्याचा प्रयत्न केला आहे... बाहेरचे हॉटेलमधले पिझ्झा बर्गर नूडल्स हे सर्व खाणे बंद होऊन साधेच घरच्या घरी पदार्थ आवडीने खात आहेत. जिभेचे चोचले पैसे उधळून बंद झाले आहे.
         इतर वेळेस मॉलमध्ये, कपड्याच्या दुकानात, शॉपिंग सेंटर वर हॉटेलवर भरगच्च दिसणारी लोक आज घरात घुसून बसली आहेत. कितीतरी पैसा खर्च करणारे लोक आज त्यांच्या खिशातला एक रुपयाही हल्ला नाही. ना कसला खर्च नाही तर बऱ्याच जणांना पगारही पुरायचा नाही आणि चैनीसाठी कर्ज काढणाऱ्या लोकांना आळा बसला आहे आज लोकांना पैसा हे साधन आहे हे कळाले आहे.. साध्य होणार  मुळीच नाही... आपला जीव सर्वात महत्त्वाचा आहे हेच खरे सत्य आहे.... तू जीव जपण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहे काही हातावरच्या बोटावर मोजण्याइतकी लोक सोडली तर सर्वजण लॉकडाऊनचा नियम पाळत आहेत.इतर राज्यातले जे मजूर लोक लोक अडकून पडले आहेत. अशा लोकांना मदतीचा हात देण्यासाठी अनेक लोक समोर येऊन माणुसकीचे दर्शन घडवताना दिसताहेत मदतीचा हात देताना दिसत आहेत आणि प्रत्येक जण मनोमन प्रार्थना करीत आहे की हे देशावरचे संकट टळू दे अशी आर्त हाक ईश्वराला देत विनंती करीत आहे...
              एकंदरीत मानवाचा वाढता अतिरेक कमी झाला आहे. कुठेतरी ब्रेक लागला.खर्च कमी झाला.गरजा कमी झाल्या. साध्यासाध्या आधारासाठी दवाखान्यात पळणारी लोक घरच्या घरीच काळजी घ्यायला लागली आहेत.रिकाम्या वेळेत पेंटिंग,चित्रकला ,टाकाऊ वस्तु पासून टिकाऊ वस्तू तयार करता येऊ लागल्या. फोर व्हीलर, टू व्हीलर, बसेस रात्रंदिवस पळणाऱ्या गाड्या जाग्यावर थांबल्या आहेत.मनुष इतरांपेक्षा स्वतःची काळजी घ्यायला लागला हे सारे एका विषाणूने शिकवलं......
             गावाला जाऊन मोकळं वातावरण,आपली माणसं, गावाकडची नाती गोती, गावाकडची माती इत्यादीची  नाळ जोडता आली.इतिहासात आतापर्यंत कधीही न थांबलेला पूर्ण भारत एका जाग्यावर थांबला. नातेवाईक मित्रमंडळी यांच्यामध्ये आपुलकीची, भावना वाढीस लागली आहे एकमेकांची काळजी करण्यासाठी संवाद साधू लागली आहेत.अचानक मरण डोळ्यांना दिसताना आपुलकी स्नेह माया प्रेम वाढले आहे. एकमेकांना मदतीची भावना निर्माण झाली डॉक्टर्स, नर्स, पोलीस इत्यादीच्या रूपात देव दिसायला लागला आहे. पोलिसांची आदरयुक्त भीती निर्माण झाली आहे गजबजलेले शहर नकोशी वाटणारी गर्दी,निर्मनुष्य रस्ते बरे वाटायला लागली आहे हे सारं एका विषाणूंनी शिकवलं....!!

©️®️ *लेखिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे*
*वाशिम*

Wednesday, 8 April 2020

स्वातंत्र्यदेवता...स्वराज्य संकल्पीका राजमाता जिजाऊ माँसाहेब...

 Date: 5 Jan 2020

*स्वराज्य संकल्पीका राजमाता जिजाऊ मासाहेब*

        जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी.... या उक्तीप्रमाणे  राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या पूर्ण विश्वामध्ये एक कर्तबगार स्त्री म्हणून ओळखल्या जाते जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सकाळी सहा वाजता सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नांव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव होते. जिजाऊंना अगदी लहान वयात मध्येच वयाच्या दहाव्या वर्षी सर्व शिक्षणामध्ये पारंगत झाल्या होत्या. त्यांना अनेक भाषा त्याकाळी अवगत होत्या. सर्व युद्धकलेचे शिक्षण जिजाऊनी घेतले होते. अख्या विश्वामध्ये एका वीर पुरुषाची वीर आई म्हणून राजमाता जिजाऊ माँसाहेब ओळखले जातात.... जिजाऊंना युद्ध शिक्षण, राजनीति, भाषा, अनेक खेळ, समाजशास्त्र, अर्थशास्त्र युद्धशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रात पारंगत केले होते.  जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला....
           त्या काळामध्ये महाराष्ट्रावर आदिलशहा, निजामशहा यांच्या स्वा-या होवून लढाया होत होत्या.तो काळ फार अंधाधुंदीचा होता.जिकडे तिकडे स्वैराचार माजला होता.स्त्रीया सुरक्षित नव्हत्या,ना रयत सुरक्षित होती...ते रयतेवर जुलूम करायचे.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित घर नव्हते. सगळीकडे अन्याय माजला होता.हे सर्व पाहून जिजाऊंना सतत वाटायचे आपले स्वराज्य निर्माण करायचे....शहाजी राजांची साथ होतीच. बाल शिवबाला अगदी लहान वयापासूनच जिजाऊंनी  शूरवीरांच्या,रामाच्या, महाभारताच्या ,भिमाच्या, अभिमन्यू च्या कथा सांगितल्या. न्याय-निवाडा कसं करायचं छत्रपती शिवरायांना जिजाऊ सांगत असत इतकंच नाही तर त्यांना अगदी लहान वयापासून झाडावर चढणे, दांडपट्टा फिरवणे, भाला फेकणे धावत्या घोड्यावर बसणे,तलवारबाजी चालवणे इत्यादी युद्ध कलेमध्ये निपून करण्यासाठी जिजाऊ मासाहेब स्वतः शिवरायांना शिकवायच्या... त्यांचे शिक्षण त्यांना येणाऱ्या सर्व भाषा याकडे सुद्धा लक्ष द्यायच्या अगदी लहान वयापासूनच न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शिवबांना गादीवर बसवायच्या.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत....एवढेच नाही तर जिजाऊ मासाहेब शिवबांना म्हणायच्या भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र..... श्रीरामचंद्रांनी दृष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधव यांचे पूर्वज श्रीकृष्ण त्यानेसुद्धा दुष्ट कंसाचा ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील तु सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या या उद्देशाने शिवरायांना हुरूप यायचा... रामकृष्ण,भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवायच्या हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण सुद्धा लढावे त्यांनी दुष्टाचा नाश केला तसा आपण सुद्धा करावा आणि प्रजेला सुखी करावे आपण न्यायी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटायचे आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे....
             शहाजीराजे निजामशाहीत लढाया करत वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानगा शिवबा शिकत होता. शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते त्यांनी बंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना संस्कृतमध्ये तरबेज केले. त्याचबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात मावळे ठेवले अंदाधुंदी चा काळ संपला आणि जिजाऊ शिवराय शिवनेरीच्या मातीत बाल शिवबा खेळत जिजाऊ पुण्यात राहू लागल्या आसपासच्या लोकांना ते समजले आणि त्या लोकांना मोठा धीर आला. जिजाऊनी सर्व लोकांना जवळ बोलावून दिलासा दिला. अनेक लोक पुण्यामध्ये येऊ लागले आणि शेतावर जाऊ लागले जिजाऊनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागले गाव लोकांनी गजबजू लागले अंधश्रद्धेच्या भीतीने लोकांनी गाव सोडून गेलेले होते पुण्यामध्ये काही कर्मट लोकांनी एका विशिष्ट जागेवर पहार रोवून त्याला फाटकेतुटके खेटर, फाटका झाडू बांधून टाकले होते. याशिवाय जाहीर दवंडी दिली होती की या भूमीवर कोणी वस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा निर्वंश होईल. अशी अंधश्रद्धा त्या काळामध्ये पसरवली गेली होती. या धार्मिक दहशतवादाला व अंधश्रद्धांना जिजाऊंनी प्रथम लाथ मारली....सोबत तरुण मावळ्यांची पोरं एकत्र करून ती पहार जिजाऊने उपटून फेकले आणि त्याच जागेवर सोन्याचा नांगर लावून ती जागा ताब्यात घेतली.... आणि या जागेवर लाल महाल बांधला अंधश्रद्धांना फाटा देणाऱ्या कर्मकांडांना लाथाडून अंधश्रद्धेमध्ये अडकवून ठेवणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवला... राजमाता जिजाऊंनी त्या काळामध्ये अनेक स्त्रिया पतीचे निधन झाले की त्याच चितेमध्ये उडी मारून आपला जीव द्यायच्या.... सती जात होत्या अशा स्त्रियांना सती जाण्यापासून विरोध केला त्यांना रोखलं आणि अशा स्त्रियांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या मुलाबाळांत घालवण्यासाठी आवाज उठवला...प्रचार सुरू केला अशा लोकांचे उद्बोधन केलं....कोणाला ही पती वारल्यानंतर जास्त गरज ही आधाराची,मायेची असते हे समजून सांगितले....कितीतरी बहिणींना त्यांच्या मनाविरुद्ध सती जायला भाग पाडणा-या भटांचा खरपूस समाचार घेतला..आणि कितीतरी लहान मुलांना त्यांची आई मिळवून देत अशा अनिष्ठ रूढी परंपरा, अंधश्रद्धा अशा गोष्टींना थारा न देता अशा गोष्टींचा प्रखर विरोध करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ ह्या त्या काळातील एक धाडशी, धैर्यवान कर्तृत्ववान स्त्री म्हणून आदर्श आहेत. त्या काळांमध्ये अंधश्रद्धा लाथाडून दिली नसती तर कदाचित आजचे पुणे शहर हे त्या जागी कधीच बसले नसते. एक शापित भूमी मधून राहिले असते बाल शिवबाला तयार करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी सर्व प्रकारचे बळ एकत्रित केले अनेक किल्ले घेण्यासाठी बाल शिवबांना प्रवृत्त केलं एक-एक किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंचा विचार घ्यायचे आणि त्या अनुषंगाने लढाया करायचे. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ म्हणायच्या "स्वराज्याची किल्ले ही आपली खाजगी मालमत्ता नाही" याची प्रखर जाणीव त्यांनी करून दिली जिजाऊने राजनीतीचा अवलंब करून शहाजीराजांची मुक्तता केले आणि स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्य स्थापन करायचं स्वराज्य हे माझं स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं" असं शिवाजी महाराजांना सांगितलं स्वराज्य निर्मितीसाठी कोणतेही नाते, कोणतीही भिंत नाही स्वराज्य निर्मिती हे जिजाऊंचे एकमेव स्वप्न ठरले होते. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊंनी निर्माण केला होता. अशा प्रचंड जिद्दीची व करारी बाण्याची जिजाऊ  स्वराज्यनिर्मितीसाठी तयार झाली. शिवबा तयार नसते तर स्वतःच्या हाती तलवार घेऊन जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली असती. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊ माँ साहेबांच्या मध्ये होता एकवटला होता. त्यासाठी त्यांनी राजनीतीचा अवलंब करून स्वराज्याचा पसारा वाढवत गेल्या. सर्वांचे सहकार्य मिळावे म्हणून शिवबाचे एकूण आठ विविध कुटुंबात वैवाहिक संबंध जोडले.... त्यामुळे आठ शूरवीर घराणे भोसले घराण्यांशी जोडले गेले पुण्याच्या नैऋतेला 64 किलोमीटर वर कानद खो-यात तोरणा किल्ला जिंकला आणि याच किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले....
          अफजल खानाच्या भेटीसाठी शिवबास प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत पाठवणा-या जिजाऊ ह्या खरंच एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून अख्ख्या विश्वाला वंदनीय अशाच आहेत त्यावेळी जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की शिवबा अफजलखानाला कडून जर तुला काही दगाफटका झाला तर आम्ही बालशंभूला गादीवर बसून राजकारभार करेन. इतकी धाडसी,कर्तुत्वान स्त्री जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही.

        "हीच जिजाऊ जीच्या प्रेरणेने उजळे स्वराज्यज्योती   
         हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती"

       याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये व बाल संभाजींना घडवण्यामध्ये त्यांना आकार देण्यामध्ये राजमाता वीर माता जिजाऊ मासाहेबांचा हात आहे वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी राजांनी पन्हाळगडावर बुधभुषण नावाचा संस्कृत,राजकीय सामाजिक स्वरूपाचा ग्रंथ लिहिला शंभूराजांनी एकूण चार ग्रंथ लिहिले एवढा प्रचंड बुद्धिमान भाषापंडित शूरवीर,करारी, मुत्सुद्दी, बुद्धिवान, निर्व्यसनी, जिद्दी छत्रपती संभाजीराजे तयार केले त्यांना सर्व शिक्षण माँसाहेब जिजाऊंनी दिले एवढेच नव्हे तर आपली नातसून म्हणजेच महाराणी येसूबाई यांना सुद्धा धर्मनीती, राजनिती,संस्कृत, युद्धनीती या सर्व बाबीवर या सर्वांचे शिक्षण जिजाऊंने दिले होते. छत्रपती संभाजी राजांनी नखशिक, सातसतक नायिकाभेद या तीन ग्रंथांची रचना केली. शंभुराजासारखा आदर्श, कवी,साहित्यिक,पहिली तोफ निर्माण करणारा, शूरवीर, पराक्रमी,मुद्सुदी ,एकही लढाई न हारणारा, आदर्श राजा शोधुनही सापडणार नाही....
        अशा साहसी,धाडसी, कर्तृत्ववान , वेळप्रसंगी हाती तलवार धरून अन्यायाचा प्रतिकार करणा-या आदर्श मातेचा आदर्श समस्त स्त्रीयांनी घेण्यासारखा आहे....
माँसाहेब जिजाऊ जयंती च्या सर्वांना मनःपूर्वक शिव शुभेच्छा.....

*लेखिका/ कवयित्री -कु. मीनाक्षी विजयाई पांडुरंग नागराळे, वाशिम*

माझा परिचय-कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम.... कवयित्री, शिक्षिका, लेखिका,संपादिका...

 Date: 31 Oct 2019
Subject: माझा परिचय

*परिचय*
*स्वतःचे नाव* *-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*शाळेचे नाव-जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा. कोकलगाव*
*तालुका*-वाशिम*
*जिल्हा*-वाशिम*
*मोबाईल नं*-9767663257
*शिक्षण-M.A.D.ED..D.S.M*

🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका,लेखिका, संपादिका, कवयित्री म्हणून राज्यभर ओळख🔷️
🔷️विद्यार्थीप्रिय शिक्षिका म्हणून गावात ओळख🔷️
🔷️उपक्रमशिल व तंत्रस्नेही म्हणून राज्यस्तरीय विविध उपक्रमाचे आयोजन🔷️

*🌈शाळेत राबवत असलेले*
*उपक्रम-🌈*
🛌🛏🛌Ⓜ💲🅿🛌🛏🛌

🔶️लोकसहभागातून शाळा व सर्व वर्ग डिजिटल केले.
🔷ज्ञानारचनावादी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी.
🔷प्रत्येक वर्गात कॉम्प्युटर.एल.इडीद्वारे अध्ययान अध्यापन उपक्रम. 
🔶पहिलीचा वर्ग जिल्ह्यात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात नसेल असा मोडेल क्लास तयार केला. 
🔷विध्यार्थ्यांना रायटिंग टेबलची सोय.
🔶प्रत्येक वर्गात वाचन कोपरे.
शाळेच्या प्रांणागनात  वाचन कट्टा.
🔷२०००पुस्तकचे वाचनालय.
🔶तंत्रस्नेही शिक्षकांच्या सहायाने कॉम्प्युटर .प्रोजेक्टर द्वारे अध्ययन अध्यापन.
🔷गणिताचे संगीतमय पाडे.
🔶 गणिताची सूत्रे उखाण्याच्या रूपाने पाठांतर.
🔷हसत खेळत इंग्रजी उपक्रम.
🔶परिपाठात विज्ञान प्रयोगाचे सादरीकरण 
🔷शैक्षणिक सहल.
🔶 FANCY ड्रेस स्पर्धा.
🔷वार्षिक स्नेहसंमेलन /आनंदोत्सव
🔶प्रवेश उत्सव 
🔷कचऱ्रयापासून खात निर्मिती.
🔷आदर्श इंग्रजी हिंदी मराठी परिपाठ.
🔶झकास T.V.
🔷१०० टक्के पटनोंदणी व उपस्थिती.
🔶१०० टक्के विध्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप.
🔷स्पोकन इंग्लिश .
🔶पहिली फोकस क्लास
🔷पाचवी शिष्यवृती नओदय ज्यादा तासिका.
🔶अभ्यासात मागे असलेल्या मुलांना वैयक्तीक मार्गदर्शन .
🔷️विविध उपक्रमाद्वारे अध्यापन 
🔶️दररोज नवनवीन उपक्रम घेवून जिल्ह्यातून उपक्रमशिल     तंत्रस्नेही ग्रुपवर कार्यशाळा घेऊन मार्गदर्शन करणे. 
🔷️कला,कार्यानुभवमध्ये वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करणे.
🔶️विद्यार्थ्यांचे उमलती फुले हे बालकाव्य संग्रह प्रकाशित करून जिल्ह्यातील पहिले बालकाव्य म्हणून घेतली पत्रकार बंधूनी नोंद....
🔷️गणित विषयात अब्ज पर्यंत संख्यावाचन 
🔶️शाब्दीक कोडे,जनरल नाॅलेज इ.पुरेपूर सराव
🔷️बालआनंद मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन
🔶️ माझे मिनाक्षी पी नागराळे नावाचे युट्यब चॅनलद्वारे 
अध्यापन अध्ययन पध्तीच्या वेगवेगळ्या ट्रीक्स 
🔷️प्रत्यक्ष मतदान करून लोकशाही व मतदानाचा अनुभव विद्यार्थ्यांना देणे.
🔶️किशोरवयीन मुलींना विशेष मार्गदर्शन 
🔷️लेक वाचवा अभियाना द्वारे विशेष काव्यातून जनजागृती 

..

  *🌈साहित्य क्षेत्रातील कामगिरी🌈*

*प्रकाशित झालेले पुस्तकाचे नाव*-
1) *चिमणी पाखरं*  (बालकवीता संग्रह)
2) *उमलती फुले*  (विद्यार्थ्यांचे बालकविता संग्रह संपादन करून जिल्ह्यातला पहिला बालकाव्य संग्रह ठरला) 11मार्च 2019
3) *माणुसकीचा झरा* प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
4) *स्वराज्याचे मावळे* 
5) *माझी शाळा माझे उपक्रम*  पुस्तक प्रकाशनाच्या  वाटेवर आहे....
6)*थोर क्रांतिकारक...प्रकाशनाच्या वाटेवर*
7)दैनिक लोकमत मध्ये 12 जानेवारी 2018 ला जिजाऊ जयंतीनिमित्त *मातृतिर्थ-अखंड उर्जास्तोत्र* हा  लेख प्रकाशित झाला आहे.
8)काव्यमय दिनदर्शिका मध्ये *मला वाटते*
ही कविता प्रकाशित
9)आम्ही सावित्रीच्या लेकी विशेषांकामध्ये
*आम्ही सावित्रीच्या लेकी* ही कविता प्रकाशित...
10) मराठवाडा मुक्तिसंग्राम मराठवाडा विशेषांकामध्ये  *माझी आई* ही कविता प्रकाशीत
11) शिवकाव्य संग्रहात  *शिवाजी राजा*
ही कविता प्रकाशित
12)गाडग्यातली अमृतवाणी मध्ये  *संत
 गाडगेबाबा*  ही कविता प्रकाशित...
13)"दारूची नशा" ही कविता तेजोमय या साप्ताहिकातून प्रकाशित
14) लोकमत मध्ये  *शेतकरी राजा*  ही कविता प्रकाशित
15) स्टोरी मिरर 52 कविता प्रकाशित
16) लवकरच "परिवर्तनवादी चारोळ्या" चारोळी संग्रह प्रकाशना च्या वाटेवर.
17) स्वतःच्या 3000 च्या वर कविता वेगवेगळ्या प्रकारातील केलेल्या आहेत.
18) वयाच्या 12 व्या वर्षापासून कविता लेखनाचा छंद आहे....
19)राजस्तरीय  *शिवारातील कविता*  संग्रहात *"बाप"* नावाची कविता प्रकाशित ...
20) राजस्तरीय "माय मराठी" महाकाव्य ग्रंथात  *माय मराठी* कविता प्रकाशित....
 21) जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह प्रकाशन केल्याबद्दल मा.शिक्षणाधिकारी मा.मानकर साहेब यांच्या हस्ते सन्मान....
22) दरवर्षी जिजाऊ जयंतीनिमित्त लेख वाशिम मध्ये सकाळ पेपरला प्रकाशित झाला...
23) 500 च्या वर ई प्रमाणपत्र उत्तेजनार्थ ते सर्वोत्कृष्ट पर्यंत राज्यस्तरीय मिळालेले आहेत...
24) शिवजयंतीनिमित्त शिवाजी राजा ही कविता प्रकाशित...
25) अनेक स्पर्धामधून रोख पारितोषिके मिळवले...
26)मा.शरदचंद्ररावजीसाहेब पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 60 ओळींचा कविता....
सहभाग प्रमाणपत्र मिळाले पण आजपर्यंत जेवढे प्रमाणपत्र मिळाले त्या सर्व प्रमाणपत्रापैकी सर्वात मोठे प्रमाणपत्र...
27) प्रा.बी.टी, चव्हाण सर(प्रा.शिक्षणाधिकारी) यांचे अभिनंदनीय पत्र 
28)जागतिक महिला दिनानिमित्त शेकडो महिलांच्या उपस्थितीत गावातील दारूबंदीचा ठराव घेऊन गावातील दारूची दुकाने बंद करून लोकांची मने परिवर्तन केलीत..
29) शिवजयंतीनिमित्त 108 ओळींची कविता करून शिवरायांना मानाचा मुजरा...
30)बचत गटाचे महत्व सांगून बचत गट करण्यास मदत करणे.
31) शाळेतल्या किशोरवयीन मुलींना आरोग्य व मासिक पाळी बद्दल विशेष मार्गदर्शन करणे. 
32)जिल्ह्यातील पहिली डिजिटल शाळा लोकवर्गणीतून केली.व लोगसहभाग व शिक्षकांच्या आर्थिक मदतीतून शाळेची रंगरंगोटी करणे.
33)  राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रशांत वाघ सर यांच्या घर वास्तूशांती निमित्त 180 कवितांमधून घर ही कविता सर्वोत्कृष्ट क्रमांका ने विजेती अहमदनगर येथे सन्मानित...34) स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेतील अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे साहेब यांच्या हस्ते "स्वराज्याचे मावळे" पुस्काचे प्रकाशन... 
35) डहाणू मित्र मुंबई या वृत्तपत्रात "माती", "चला सबल करूया लेकीना","असे असावे जीवन", "गडकिल्ले", अशा अनेक कविता प्रकाशित....
36)स्वाभिमानी छावा सोलापूर या वृत्तपत्रात माझी "भाग्य उजळले तुझे" आणि "अत्याचार" ही कविता प्रकाशित....
37) राजमाता जिजाऊ हा लेख जिजाऊ विशेषांकात प्रसिद्ध...
38) "शेतकरी जगला पाहिजे" पुस्तक समीक्षण स्वाभिमानी छावा सोलापूर या दैनिकात प्रकाशित...
39) ऑनलाईन १००० च्या वर प्रमाणपत्र आजपर्यंत प्राप्त झाले....
40)"क्रांतिरत्न" या १००० पानांचा महाग्रंथात खरी विद्येची देवता लेख प्रकाशित....
41)५००० कवितांचे समतेचे महाकाव्य या ग्रंथात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील कविता प्रकाशित...
42) स्वताच्या ब्लॉगवर अनेक लेख, उपक्रम, कविता प्रकाशित...
*==========================================*

 🔷️मला मिळालेले पुरस्कार🔷️

*1) 2009 मध्ये पंजाबराव देशमुख शिक्षक संघटने तर्फे *राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..*

*2) *आम्ही सावित्रीच्या लेकी*  राज्यस्तरीय आदर्श *कवयित्री पुरस्कार* पुणे येथे सन्मानित करण्यात आले...2015*

*3) मराठा सेवा संघातर्फे *राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार* 2009 मध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले...*

4) *आम्ही सावित्री च्या लेकी राज्यस्तरीय उपक्रमशिल व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका* *पुरस्काराने सन्मानित करण्यात आले* .2018*

*5) ग्रामस्थांनाकडून आदर्श शिक्षिका सन्मान...जि.प.शाळा.सुकळी येथे.2016*

*6) पं.स वाशिम येथे तंत्रस्नेही व उपक्रमशिल शिक्षिका सन्मान शिक्षण विभाग 2018..*

*7) राज्यस्तरीय महाकाव्य स्पर्धेत उत्कृष्ट क्रमांकांनी सन्मानित केलं...स्मृतीचिन्ह प्रमाणपत्र देवून सन्मानित*

*8)ऑनलाईन रोख पारितोषिके प्राप्त*

*9) सर्वोत्कृष्ट,उत्कृष्ट,प्रथम,द्वितीय,तृतीय ते उत्तेजनार्थ असे 500 च्या वर प्रमाणपत्र*

*10)स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील आधारित शोधनिबंध लिहीला त्याचा राज्यातून प्रथम क्रमांक...नागपूर रामकृष्ण मठ धंतोली येथून प्रमाणपत्र व रोख रक्कम मिळाली आहे...*

*11)डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक संघटनेतर्फे ग्रंथभेट देवून*
*"आदर्श शिक्षिका" म्हणून सन्मानित केले...दि.21-9-2018*

*12) राजस्तरीय ऑनलाईन काव्य स्पर्धेत टाॅप टेन मध्ये आल्याने लातूर येथे सन्मानित...*

*13) अभिजात मराठी शिक्षक परिषदेतर्फे निवडक 1072 कवितामधून १०१ कवितामध्ये निवड झाल्याबद्दल अमरावती येथे सन्मानित 2018*

*14)लठ्ठे ज्यु.काॅलेज ऑफ एज्युकेशन इन आष्टा ता.वाळवा  जि. सांगली येथील माजी आदर्श विद्यार्थी म्हणून सन्मानित* 2019

*15)सेवक सेवाभावी संस्था, जळगाव तर्फे "राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार 2019)*

*16) ९२ वे आखिल भारतीय साहित्य संमेलन यवतमाळ येथे  "बाप" या कवितेची निवड झाल्याबद्दल सन्मानित...* 2019

*17) स्वकतृत्वावर विश्व निर्माण करणा-या महिलांना प्रेरणा फाऊंडेशन, ठाणे तर्फे  राज्यस्तरीय  *"रणरागिनी पुरस्कार"* ठाणे2019* 

*18) राजस्तरीय नारीरत्न पुरस्कार सहारा एज्युकेशन अँड वेलफेअर फाऊंडेशन तर्फे परभणी येथे 24 मार्च 2019*

*19)महाराष्ट्र शिक्षक अॅडमिन पॅनल तर्फे वाशिम जिल्ह्यातून आदर्श शिक्षिका म्हणून राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने औरंगाबाद येथे होणार सन्मानित...31 मे 2019 पुरस्कार जाहीर*

*20)मराठा सेवा संघातर्फे जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षिका म्हणून सन्मानित*

*21)डाॅ. पंजाबराव देशमुख शिक्षक (वाशिम)संघटनेतर्फे आदर्श शिक्षिका म्हणून ग्रंथभेट देवून सन्मानित*

*22) राज्यस्तरीय अष्टाक्षरी काव्य स्पर्धेत "घर" ही कविता   सर्वोत्कृष्ट विजेती झाल्याबद्दल अहमदनगर येथे सन्मानित...*

*23) चिमणी पाखरं व उमलती फुले हा बालकाव्य जिल्ह्यातील पहिला बालकाव्य ठरल्याबद्दल शिक्षण सभापती गोळे साहेबांच्या हस्ते वाशिम जिल्हा परिषेमार्फत सन्मानित....

24) राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नारिरत्न पुरस्कार, नागपूर 

25) आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार परिषदेमध्ये गुणवंत आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित...२२ फेब्रुवारी २०२०

  🔷️*आवड व छंद*🔷️
*खास आवड/छंद-1 कविता लिहीणे,
*अॅमबाॅस पेंटींग,ग्लास पेंटींग,रिमझिम पेंटींग*
*रोज एक उपक्रम घेणे*
*शैक्षणिक साहित्य तयार करणे...*
*रांगोळी काढणे,मेहंदी काढणे*
*ओळख करून घेणे*
*शैक्षणिक विडीओ तयार करणे*
*शैक्षणिक साहित्य निर्माण करणे*
*शिकणे आणि शिकविणे...*
*विद्यार्थ्यांना सर्व क्षमता प्राप्त होईपर्यंत नवनवीन प्रयोग व विविध उपक्रम घेणे*
*ऑनलाईन तंत्रस्नेही कार्यशाळा घेणे*
*ऑनलाईन उपक्रम घेणे*
*कला,कार्यानुभव या विषयावर आधारीत कलाकुसरीचे साहित्य स्वतः करणे व विद्यार्थ्यांकडून करवून घेणे*
*विद्यार्थी हेच दैवत या उक्तीप्रमाणे शाळेतला एक एक मिनीट विद्यार्थ्यांसाठी खर्च करणे*
*दरवर्षी आई किंवा वडील नसलेल्या एका विद्यार्थ्याला दत्तक घेणे*
*स्वतःचा वाढदिवस अनाथ आश्रमातील मुलांच्या उपयोगी साहित्य देवून साजरा करणे*

सत्य....

 Date: 7 Apr 2020

*सत्य*


    माणुसकी हीच खरी सेवा आणि सत्य हाच खरा धर्म मानवाचा असला पाहिजे. सत्य हे प्रखर सूर्यासारखे तेज असते.सत्याला नेहमी तेजाचे वलय असते. सत्य कधीच आयुष्यात हरत नाही आणि झाकले ही जात नाही. एखादी व्यक्ती जर सत्याला झाकत असेल तर ती फक्त कांही काळापुरतीच झाकल्या जाऊ शकते. एक ना एक दिवस सत्य हे समोर येतच असते. जसे की एखाद्या विस्तवावर काही क्षणानंतर राख दिसायला लागते आणि त्या राखेला जर फुंकर मारली तर त्यावरचा विस्तव दिसतो अगदी त्याच प्रमाणे सत्य हे फक्त विस्तवा सारखे असते फक्त कांही कालावधी करिता ते धुळीने झाकले जाते पण कायमसाठी दबले जात नाही.आज आपण पाहतो बऱ्याच घरांमध्ये मोठी माणसंच खोटे बोलताना दिसतात त्यांचं पाहूनच लहान मुलं सुद्धा अनुकरण करत असतात ज्या घरांमध्ये एखादा पालक त्यांच्या मुलाला म्हणत असेल की  बाबा घरात नाहीत म्हणून सांग असं फोनवर मुलाला बोलण्यासाठी सांगितलं जातं आणि मग त्या वेळेला मुलाला आश्चर्य वाटतं की बाबा खोटं का बोलताहेत पण वडिलांच्या मर्जी खातर ते लहान मूल खोटे बोलून जातं पण खोटं बोलताना असं सांगतो "की बाबा म्हणतात बाबा घरात नाहीत म्हणून सांग" आणि लगेचच सत्य हे उघड होतं असतं म्हणून सत्य हे फार दिवस झाकले जात नाही...
         आपल्यावर केवढे मोठे ही संकट आले आणि कसली ही जर वेळ आली तर माणसांनी सदैव खरेच बोलले पाहिजे.. सत्यच बोलले पाहिजे एक खोटं झाकायला अनेक वेळा खोटे बोलावे लागते.पण या ख-या खोट्याच्या नादात माणसाची पार वाट लागते..हे सुद्धा आपणाला समजायला हवं....एखादी व्यक्ती खोटी बोलली हे जेव्हा समोरच्या व्यक्तीसमोर सिद्ध होतं तेव्हा दोन कानसुलीत मारल्यागत..सण...सण..आवाज झाल्यागत वाटतं...शेवटी खरे खोटे च्या नादात.. विश्वास उडून गेला की कांहीं खरंच नसते...एकदा खोटं बोलणारा,लबाड अशी जर प्रतिमा तयार झाली तर कितीही खरं बोला...ते नेहमी मग खोटंच असत्यच वाटायला लागतं...लांडगा आला रे...गोष्टीसारखी गत होते... दररोज लांडग्याची भिती घालणारा मेंढपाळ मुलगा खोटं बोलवून लोकांना फसवत असतो आणि एक दिवस त्याच्या खोट्या  बोलण्याला लोक़ विश्वासच ठेवत नाहीत आणि खरंच एक दिवस असा येतो...की खरोखर लांडगा येतो आणि सर्व शेळ्या खावून जातो..त्या मेंढपाळ मुलाच्या बोलण्यावर लक्ष देत नसतं... आणि मेंढपाळाच्या सर्व शेळ्या एक दिवस लांडगा खावून घेतात.... मेंढपाळाच्या  खोटेपणामुळे त्याच्या सर्व शेळ्या लांडग्यानं खावून खाल्या....
      कांहीं लोकं वय लपवण्यासाठी,वय कमी करून सांगतात..काय उपयोग कर बाबा त्या वयाचा... त्यापेक्षा एक कामं करा... खोटं बोलूच नका...खोटेच बोलले नाही तर लपवणृयाचा प्रश्नच नाही ना....

      आयुष्याच्या कपड्याला
     सत्याची झालर
     कष्टाची किनार
     जर आयुष्याला 
    लावली तर.....
    आयुष्याचं सोनं
    नक्कीच होणार....!!

          सत्याची ताकद ही हजार पटीने जास्त असते...सत्य नेहमी बलवान असते...जसे आपण सुर्याचे किरण झाकू शकत नाहीत.अगदी तसेच सत्य ही झाकू शकत नाही..सुर्याच्या किरणांइतकेच प्रवावी सत्य असते.... कांहीं वेळा सत्यालाच खूप त्रास होतो.म्हणून आपण कधीच वाम मार्गाने जायचे नाही....अपयश आले तर हरायचे नाही....

       सत्य हाच देव
       सत्य हाच भाव
       सत्य हीच पुजा
       सत्य हेच शिव...!!

       सत्याच्या मार्गाने जाणारा माणूस कधीच संकटात सापडत नाही.सत्य हाच देव आहे...वाममार्गाने कमवलेला पैसा,धन,टिकत नसते...तोच पैसा प्रामाणिकपणे कमवले तर तो टिकतो,व पुरतोही....जो सत्याची पुजा करतो त्यालाच शिव प्राप्त होते....सत्याचं पारडं हे कधीही जडच असते...
       "चला धरूया सत्याची कास
       सत्यानेच मग होईल विकास"

      *©️®️लेखिका/ कवयित्री कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे , वाशिम*

"स्वराज्याचे मावळे" तरूणांना स्फुर्ती देणारा काव्यसंग्रह...समीक्षण श्री.सुदाम साळुंके सर

Date: 26 Mar 2020

*"स्वराज्याचे मावळे"* तरूणांना स्फुर्ती व प्रेरणा देणारा काव्यसंग्रह.....

=====================
               शिक्षण क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी.     
     "स्वराज्याचे मावळे " 
या शीर्षकाखाली शिवछत्रपतींच्या तीस  जिगरबाज शूर मावळ्यांच्या शौर्याचे व पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे.    
 वाशिमच्या अजिंक्य प्रकाशनाने हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे.      
    मुखपृष्ठावर सिंहासनारुढ राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज , माँसाहेब जिजाऊ व
सोबत भगव्या पताका हाती घेतलेले स्वराज्याचे मावळे रेखाटले आहे. तर मल पृष्ठावर मीनाक्षी ताईंनी आपल्या कार्याचा परिचय चित्रीत केला आहे. 
       वाशिम जिल्ह्यातील या कवयित्रीने " स्वराज्याचे मावळे "  या  काव्यसंग्रहातून प्रत्येक मावळ्याच्या व्यक्तिवैशिष्टयांचे व त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीचे अप्रतिम वर्णन केले आहे. 
 " स्वराज्य रक्षक संभाजी " या मराठी ऐतिहासिक  मालिकेचे मुख्य अभिनेते खासदार डॉ. अमोल कोल्हे   यांनी  आपल्या संदेशात म्हटले आहे, समाजाला माहित नसणाऱ्या ३० मराठा , मुस्लिम शूर मावळ्यांचा इतिहास आपण   "स्वराज्याचे मावळे " या काव्य संग्रहाच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचवणार असल्याबद्दल मिनाक्षीताईंना शुभेच्छा दिल्या आहेत.
     प्रस्तुत काव्यसंग्रहाला चित्रपट निर्माते कवी , लेखक , समिक्षक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व  असलेले   श्री. संदीप राक्षे  सर यांनी प्रस्तावना  लिहीली आहे. 
   या काव्य संग्रहाचे एक आगळे वेगळे वैशिष्टये म्हणजे यामध्ये शिवरायांच्या जीवनात त्यांच्या लहानपणापासून जीवनभर त्यांच्याशी एकनिष्ठेने राहून आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्या प्रत्येक मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाचे काव्यमय वर्णन या काव्यसंग्रहातून केले आहे. 
   या काव्य संग्रहातून कवयित्री मीनाक्षीताई यांनी स्वराज्याच्या कामी शिवाजी महाराजांना साथ देणाऱ्या वेगवेगळ्या जाती धर्मातील  ३० मावळ्यांना अतिशय मानाचे स्थान देवून यथोचित वर्णन केले आहे. " हर हर महादेव , छ्त्रपती शिवाजी महाराज की " अशा घोषणा दिल्या की आज ही अंगात नव चैतन्य संचारते . त्याच गर्जना देत या मावळ्यांनी शिवरायांच्या साथीन इतिहास घडविला . मावळा म्हटल की घोडयावर स्वार झालेला कमरेला तलवार , पाठीला ढाल असणा-या सरदाराचे चित्र डोळ्यांपुढ उभे राहते . 
           या कवितेचे प्रथम पुष्प स्वराज्यासाठी बलिदान देणारा शूर योध्दा प्रति शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवा काशिदचे गुंफले असून शेवटचे पुष्प बेलसरच्या लढाईत मर्दुमकी गाजवणाऱ्या समशेर बहाद्दर बाजी सर्वेराव जेधे यांच्या पराक्रमाचे काव्य पुष्प गुंफले आहे .
      होता जिवा म्हणून वाचला  शिवा अशी ओळख असलेल्या कुस्तीवीर जिवा महाला, आग्ऱ्याच्या कोठडीतील मदारी व  हिरोजी फर्जंद. आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणत ज्याने सिंहगडावर पराक्रम गाजवणाऱ्या शूर वीर  तानाजीचे , शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ , औरंगजेबाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या संताजी - धनाजी, समुद्र किनारी दरारा असणाऱ्या कान्होजी आंग्रे, घरदार , जमीन विकून रायगड किल्ला बांधणाऱ्या हिरोजी इंदलकर ,संभाजी राजांना शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणाऱ्या कवी कलश यांचे वर्णन काव्यातून केले आहे.

    वेशांतर करी । नकला हो करी।
    बोलण्यात भारी । पडतसे।।

    या वरील ओळींमध्ये बहिर्जी नाईकांची चपळाई लपली आहे..शत्रूच्या समोर त्यांच्या सैनिकात वेशांतर करून जरी बहिर्जी घुसले तरी शत्रूला ते समजत नसे...इतके पटाईत सराईतपणे वेशांतर करून शत्रूच्या छावणीत घुसून खडानखडा माहिती काढणारे बहिर्जी नाईक हे गुप्तहेर खात्याचे प्रमुख होते...

      शेवटचा श्वास । लढत राहिले ।
      शौर्याने लढले । संताजीही ।

या अभंग प्रकारात ओवलेल्या उक्तीप्रमाणे आपल्या जिवाजी पर्वा न करणारा,स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे धनाजी व संताजी यांनी फार त्वेशाने, शौर्याने शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्यासाठी लढले...केवढी ती निष्ठा आणि केवढे ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आदर,जिवाला जीव देणारे मुठभर मावळ्यांना एकत्र घेवून लढणारे छत्रपती शिवाजी महाराज हे सा-या विश्वाला वंदनीय,पुजनीय व स्फुर्ती देणारे आहेत...

       वीर, शूरवीर , झुंजार,रण झुंजार  , सरनोबत, समशेर बहाद्दर , रांगडागडी , पैलवान, गुप्तहेर , प्रति शिवाजी असे प्रत्येक शुराचे वर्णन आपल्या काव्यमय उपाधीने करून त्यांच्या कार्याचे वर्णन या काव्यसंग्रहात केले आहे. या काव्यसंग्रहामधील स्वराज्याच्या मावळ्यांचे रसमय वर्णन काव्यांजली , अभंग, मुक्त छंद, अष्टाक्षरी या काव्यरचना प्रकारांमध्ये केले आहे. 
 प्रत्येकाकडे "स्वराज्याचे मावळे " हा काव्यग्रंथ  असावा व तो अवश्य वाचावा असे मला वाटते. 

स्वराज्याचे वीर I वीर शौर्यगाथा ॥
टेकविते माथा I मिनाक्षीचा ॥

         या काव्यपंक्ती मधून कवयित्री मिनाक्षी ताईंनी आपला या शूर वीरांबद्दल आदर व्यक्त केला आहे.चिमुकल्या विद्यार्थ्यांना इतिहास जेवढा शिकवावा आणि मिनाक्षी ताईचे जेवढे कौतुक करावे तितके कमीच आहे... महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलांदा इतिहासावर काव्य रचले गेले आहे.याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे...प्रत्येक शाळेत व घराघरात बालकांच्या हातात असावे असेच हा "स्वराज्याचे मावळ" हा काव्यसंग्रह आहे...

   मिनाक्षीताईंबद्दल दोन शब्द
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे या एक आदर्श शिक्षिका असून त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्या एक उपक्रमशील शिक्षिका असून त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवला आहे. 
  मिनाक्षीताई नागराळे आमच्या राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाच्या ONLY SUPER ACTIVE समुह प्रशासक आहेत. गेल्या ४/५ वर्षापासून त्या समुहामध्ये काम करत असून त्यांनी  अनेक ऑनलाइन कार्यशाळांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील महिलांना तंत्रज्ञानाचे धडे शिकविले आहे. त्या आमच्या समुहाच्या ONLY SUPER ACTIVE  तंत्रस्नेही प्रशासक असल्याचा आम्हाला अभिमान आहे.
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे (साळुंके) पाटील यांना या संग्रहानिमित्ताने मनःपूर्वक शुभेच्छा  ! 


 --- श्री. सुदाम नारायण साळुंके सर
           तंत्रस्नेही  शिक्षक
             समुह प्रमुख - 
राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूह
प्रशासक - प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र 
  कोपरगाव , जि. अहमदनगर 
    मो. 8830334810

Tuesday, 7 April 2020

समज-गैरसमज

 Date: 5 Apr 2020

*समज- गैरसमज*

    समजून घेतले तर समज...न समजून घेता जो वेगळाच विचार केला जातो तो गैरसमज... तसं पाहिलं तर समज हा शब्द जितका सरळ साधा आहे तितका सोपा नाही.एखाद्याला समजून घेण्याची कला फार कमी लोकांकडे असते...तेच लोकं जिवनात सफल होतात.समोरच्याला समजून घेऊन राहतात.त्यामुळे बरीच भांडणे होत नाहीत.समजून घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतच नाहीत...पण समजून घेणारा व्यक्ती तेवढाच समजदार असायला हवा.... एखादं मोठं कुटुंब असो किंवा मोठी शाळा असो सर्वानी एकमेकांना समजून घेऊन राहिलं की प्रेम,जिव्हाळा,आपुलकी वाढते... आणि चांगले संबंध टिकून राहतात...
       आजकालच्या मोबाईलच्या युगात व धावत्या जिवन शैलीमुळे प्रत्येकाला प्रार्थना, किंवा गीत,गाणे म्हणामला वेळच नाही..अशी माणसं,मुले, काही अंशी स्त्रीया चिडचिड करताना दिसतात..."प्रार्थना हे मनाचं उत्तम स्थान आहे" या उक्तीप्रमाणे जो प्रार्थना म्हणतो किंवा एखादा तरी छंद जोपासतो.तो जास्त चिडचिडा होतं नाही...जे लोक स्वत:ला कामामध्ये गुंतवणूक घेतात..त्यांना एक वेगळं समाधान असतं ते पण चिडचिड करीत नाही... एखाद्या सारखं टि.व्ही पाहणा-या मुलाला पहा...त्याचा स्वभाव चिडचिड करणारा असतो.आणि जे लोकं मानसिक तणावाखाली राहतात..ते ही फार चिडचिडे होत जातात...
       मागच्या महिन्यात मी एक पेपरला बातमी वाचली.की मोबाईल चे रिचार्ज करायला आई पैसे देत नाही म्हणून आईच्या डोक्यात काठी घालून आईचा जीव घेतला...अशा घटना ऐकून मन सुन्न होतं...एक आईच असते आपल्या मुलाला लहानाचे मोठे करण्यासाठी रात्रीचा दिवस करते...हाताचा पाळणा करते...जीवापाड काळजाच्या घडाला जपते...तिथं एकमेकांना जीव लावून प्रेमाने राहणे फार महत्त्वाचे आहे... एकमेकांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे...एकाच घरातल्या सासू सुनेनी एकमेकीला समजून घेतलं तर त्या घराचं नंदनवन होईल... आणि छोट्या छोट्या गोष्टीत न समजून घेतल्याने गैरसमज वाढले तर फार मोठी भांडणं लागायला वेळ लागणार नाही...
      गैरसमज- एखाद्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढून मनात गृह निर्माण करणे म्हणजे गैरसमज... अनेक वेळा पुढचा व्यक्ती स्वत:च्या भल्याकरता कांहीतरी सांगत असतो...तर समोरच्याला वाटतं माझं चांगलं झालेलं बघवत नाही... यावरून गैरसमज निर्माण होतो आणि वाद सुरू होतात...प्रत्येक व्यक्तीने गैरसमज करून घ्याच्या अगोदर दहा वेळा विचार करावा...समोरचा व्यक्ती माझ्याच भल्यासाठी सांगत आहे ना याची शहानिशा  करून तो विषय समोरासमोर क्लीयर केला तर गैरसमज होणारच नाहीत...
     गैरसमज हा खूप घातकी असतो.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले पहायला मिळतात... गैरसमज हा असा रोग आहे.ज्याला जडला तो आतल्या आत कुढत राहतो.त्यामुळे द्वेश,राग,मत्सर,वाढायला लागतो.म्हणून प्रत्येक कृती ही विचारपूर्वकच करायला हवी....प्रत्येकाला समजून घेण्याची गरज आहे....

      एकमेकां समजून घेवू
       सारे आनंदाने राहू
       एकमेकांचा आदर बाळगू
        प्रेमाने चला पाहू....!!
 
         नको कोणता गैरसमज
           नकोत कसली भांडणं
           विचारांचे आदानप्रदान
            द्यावं सुखाचं चांदणं.....!!

      या वरील उक्तीप्रमाणे एकमेकांना  समजून घेऊन राहीलं तर एकमेकांचा आदर केला..तर घराचं नंदनवन व्हायला वेळ लागत नाही.. आणि गैरसमज करून घेतलं तर एकत्र कुटुंब पध्दतीत रहायला फार अवघड होवून जाते....मानव हा विचार करणारा विचारशील प्राणी आहे... म्हणून समजून घेण्याची भावना आपल्या सर्वामध्ये रूजली पाहिजे... समजून घेण्याची एक कला आहे...ती प्रत्येकाने शिकली पाहिजे...ज्या घरात दोन भाऊ एकमेकांना समजून घेतात..तिथे जगातली कोणतीच ताकद त्यांना वेगळं करू शकत नाही... समजून घेऊन राहिलं तर एक आदर्श कुटुंब म्हणून त्या घराकडे बघितलं जातं...
       समज के समजना भी एक समजदारी है। चला तर मग सर्वानी गैरसमजच्या जाळ्यातून बाहेर पडुया...एक समजदार,शिस्तप्रिय नागरिक बनू या.....

           
*©️®️कवयित्री/लेखिका:- कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*

---
Shared using https://www.writediary.com/getapp