*समज- गैरसमज*
समजून घेतले तर समज...न समजून घेता जो वेगळाच विचार केला जातो तो गैरसमज... तसं पाहिलं तर समज हा शब्द जितका सरळ साधा आहे तितका सोपा नाही.एखाद्याला समजून घेण्याची कला फार कमी लोकांकडे असते...तेच लोकं जिवनात सफल होतात.समोरच्याला समजून घेऊन राहतात.त्यामुळे बरीच भांडणे होत नाहीत.समजून घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतच नाहीत...पण समजून घेणारा व्यक्ती तेवढाच समजदार असायला हवा.... एखादं मोठं कुटुंब असो किंवा मोठी शाळा असो सर्वानी एकमेकांना समजून घेऊन राहिलं की प्रेम,जिव्हाळा,आपुलकी वाढते... आणि चांगले संबंध टिकून राहतात...
आजकालच्या मोबाईलच्या युगात व धावत्या जिवन शैलीमुळे प्रत्येकाला प्रार्थना, किंवा गीत,गाणे म्हणामला वेळच नाही..अशी माणसं,मुले, काही अंशी स्त्रीया चिडचिड करताना दिसतात..."प्रार्थना हे मनाचं उत्तम स्थान आहे" या उक्तीप्रमाणे जो प्रार्थना म्हणतो किंवा एखादा तरी छंद जोपासतो.तो जास्त चिडचिडा होतं नाही...जे लोक स्वत:ला कामामध्ये गुंतवणूक घेतात..त्यांना एक वेगळं समाधान असतं ते पण चिडचिड करीत नाही... एखाद्या सारखं टि.व्ही पाहणा-या मुलाला पहा...त्याचा स्वभाव चिडचिड करणारा असतो.आणि जे लोकं मानसिक तणावाखाली राहतात..ते ही फार चिडचिडे होत जातात...
मागच्या महिन्यात मी एक पेपरला बातमी वाचली.की मोबाईल चे रिचार्ज करायला आई पैसे देत नाही म्हणून आईच्या डोक्यात काठी घालून आईचा जीव घेतला...अशा घटना ऐकून मन सुन्न होतं...एक आईच असते आपल्या मुलाला लहानाचे मोठे करण्यासाठी रात्रीचा दिवस करते...हाताचा पाळणा करते...जीवापाड काळजाच्या घडाला जपते...तिथं एकमेकांना जीव लावून प्रेमाने राहणे फार महत्त्वाचे आहे... एकमेकांना समजून घेणं फार महत्त्वाचं आहे...एकाच घरातल्या सासू सुनेनी एकमेकीला समजून घेतलं तर त्या घराचं नंदनवन होईल... आणि छोट्या छोट्या गोष्टीत न समजून घेतल्याने गैरसमज वाढले तर फार मोठी भांडणं लागायला वेळ लागणार नाही...
गैरसमज- एखाद्या गोष्टीचा वेगळाच अर्थ काढून मनात गृह निर्माण करणे म्हणजे गैरसमज... अनेक वेळा पुढचा व्यक्ती स्वत:च्या भल्याकरता कांहीतरी सांगत असतो...तर समोरच्याला वाटतं माझं चांगलं झालेलं बघवत नाही... यावरून गैरसमज निर्माण होतो आणि वाद सुरू होतात...प्रत्येक व्यक्तीने गैरसमज करून घ्याच्या अगोदर दहा वेळा विचार करावा...समोरचा व्यक्ती माझ्याच भल्यासाठी सांगत आहे ना याची शहानिशा करून तो विषय समोरासमोर क्लीयर केला तर गैरसमज होणारच नाहीत...
गैरसमज हा खूप घातकी असतो.यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झालेले पहायला मिळतात... गैरसमज हा असा रोग आहे.ज्याला जडला तो आतल्या आत कुढत राहतो.त्यामुळे द्वेश,राग,मत्सर,वाढायला लागतो.म्हणून प्रत्येक कृती ही विचारपूर्वकच करायला हवी....प्रत्येकाला समजून घेण्याची गरज आहे....
एकमेकां समजून घेवू
सारे आनंदाने राहू
एकमेकांचा आदर बाळगू
प्रेमाने चला पाहू....!!
नको कोणता गैरसमज
नकोत कसली भांडणं
विचारांचे आदानप्रदान
द्यावं सुखाचं चांदणं.....!!
या वरील उक्तीप्रमाणे एकमेकांना समजून घेऊन राहीलं तर एकमेकांचा आदर केला..तर घराचं नंदनवन व्हायला वेळ लागत नाही.. आणि गैरसमज करून घेतलं तर एकत्र कुटुंब पध्दतीत रहायला फार अवघड होवून जाते....मानव हा विचार करणारा विचारशील प्राणी आहे... म्हणून समजून घेण्याची भावना आपल्या सर्वामध्ये रूजली पाहिजे... समजून घेण्याची एक कला आहे...ती प्रत्येकाने शिकली पाहिजे...ज्या घरात दोन भाऊ एकमेकांना समजून घेतात..तिथे जगातली कोणतीच ताकद त्यांना वेगळं करू शकत नाही... समजून घेऊन राहिलं तर एक आदर्श कुटुंब म्हणून त्या घराकडे बघितलं जातं...
समज के समजना भी एक समजदारी है। चला तर मग सर्वानी गैरसमजच्या जाळ्यातून बाहेर पडुया...एक समजदार,शिस्तप्रिय नागरिक बनू या.....
*©️®️कवयित्री/लेखिका:- कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
---
No comments:
Post a Comment