Showing posts with label समिक्षण. Show all posts
Showing posts with label समिक्षण. Show all posts

Tuesday, 1 February 2022

मानवी अंतःकरणातील भावभावनांची अखंड ज्योत म्हणजे नंदादीप

 *मानवी अंतःकरणातील भावभावनांची अखंड ज्योत म्हणजे नंदादीप*
          मानवाचे अंत:करण म्हणजे भाव-भावनांनी भरलेले समुद्रच.मानवाला जसे सुख हवे असते तसेच सुखामागून दुःखही येतच असते. मनुष्य आपल्या भावभावना, राग, द्वेष, प्रेम,आपुलकी, जिव्हाळा, वात्सल्य अशा अनेक गुणांनी युक्त ओतप्रोत भरलेला असतो. निसर्गाने सर्वांना दिलेली देणगीच. प्रत्येकाच्या अंतकरणात वेगवेगळ्या भावना असू शकतात. अशीच एक भावना चंद्रपूर जिल्ह्यातल्या कवयित्री सौ. प्रीती जगझाप यांनी आपल्या जन्मदात्रीच्या नावाने 'नंदादीप' च्या रुपाने भावभावनांचा कल्लोळ व्यक्त केला आहे.
       संवेदनशील मनाच्या कवयित्री सौ. प्रीती जगझाप यांचा हा पहिलाच काव्यसंग्रह जरी असला तरी त्यांना वर्ग आठवी पासून कविता लेखनाची आवड आहे.मध्यंतरी काही कालावधीसाठी खंड पडला पण लग्न झाल्यावर कवयित्री आपल्या भावभावना कवितेच्या माध्यमातून पत्र लेखन करू लागल्या. पूर्वी मोबाईल,टेलिफोन अशी सुविधा नसल्याने कवितेच्या मनातील भावना कागदावर उमटू लागल्या. नंतर सौ प्रितीताईनी पतीदेवांची खंबीर साथ व इतर कवींचे मार्गदर्शन लाभले. त्यामुळे नंदादीप प्रकाशात आला.
          प्रिती जगझाप यांनी आईविषयी कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे वडील स्वर्गीय तुळशीराम रामटेके व विठ्ठल रामटेके (काका) यांच्या चरणी हा काव्यसंग्रह अर्पण केला आहे. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समिक्षा पब्लिकेशन पंढरपूर यांनी केले असून, मुखपृष्ठ श्रीकृष्ण ढोरे यांनी अतिशय सुंदर नावाला साजेसे  बनवले आहे. या काव्यसंग्रहाची प्रथम आवृत्ती 5 सप्टेंबर 2021 रोजी प्रकाशित झाली. नंदादीप या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 120 रुपये असले तरी यातल्या सर्वच कविता जीवनाचा अर्थ सांगणा-या आहेत. यात शंकाच नाही.
       कवयित्री प्रीती जगझाप यांची पहिली कविता आई विषयीचे ऋण व्यक्त करणारी आहे. नंदादीप म्हणजे देवापुढे रोज लावला जाणारा दिवा. शांत जळणारी ज्योती. ती स्वतः जळते पण सर्वांना प्रकाश देते. त्या प्रकाशातुन नवी ऊर्जा, नवी चेतना निर्माण होते.तसेच कवयित्री प्रीती ताईंच्या मनमंदिरी त्यांच्या आई वसल्या आहेत. त्यांच्या आईचे नाव नंदा यांच्या नावाने हा पहिला कविता संग्रह नुकताच माझ्या वाचनात आला. माझ्या वाचनात आलेल्या कवितासंग्रहापैकी आईच्या नावाने निघणारा हा पहिलाच काव्यसंग्रह वाचून माझे अंत:करण अगदी भरून आले. आजच्या काळात अनेक कवी स्वतःच्याच नावाने काव्य संग्रह संग्रह काढताना मी पाहिले. पण कवयित्री प्रीतीताईंनी आईविषयी कृतज्ञता सदोदित स्त्रवत राहावी या उद्देशाने केलेला हा शब्दप्रपंच. कवयित्री प्रीती जगझाप यांनी आईबरोबरच दुसरे स्थान विद्येची देवता सावित्रीमाई यांना दिले आहे.
       
        सावित्री तू नसतीस तर 
        आजही मी तिथेच 
         खितपत पडले असते 
         सुशिक्षित निरक्षरांचा गर्दीत...!!
   
       पूर्वीच्या काळी स्त्रीवर होणारा अन्याय, त्रास, हाल-अपेष्टा, गुलामी, रांधा वाढा, उष्टी काढा, चूल आणि मूल इतक्याच बंदिवान असलेली स्त्री आज मुक्त विचाराने स्वातंत्र्य आणि अवकाश झेप घेऊ शकते हे फक्त सावित्री मुळेच. सावित्री नसती तर अख्ख्या भारत देशातील स्त्रिया आजही अज्ञानाच्या अंधकारात विझून पडल्या असत्या. अंधारात खितपत पडल्या असत्या. सुशिक्षित निरक्षरांचा गर्दीत. सावित्रीनेच ज्ञानाची कवाडे खुली केली. तिच्यामुळेच आजच्या स्त्रियांच्या पंखात बळ मिळाले आहे. शिक्षणाचे, स्वातंत्र्याचे,अभिमानाचे,अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मिळाले आहे.नाही तर या मनुनी काय केलं असतं? कुणास ठावुक? अशी खंत प्रीती ताईंनी वरील ओळीतून व्यक्त केली आहे.
         कवयित्री प्रिती जगझाप यांनी जन्मदात्रीचे ऋण व्यक्त करण्यासाठी पहिली कविता आई. ज्ञानाईचे ऋण मानण्याकरिता दुसरी रचना.सावित्रीच्या चरणी समर्पित केली. तर तिसरी रचना ही आज्जी ही कविता. प्रत्येकालाच एक आज्जी असावी ही आशा प्रज्वलित करते. चौथी कविता अख्ख्या विश्वातील समस्त नारीला नमन करणारी आहे. स्त्रीची शक्ती, तिचा करुणाभाव,तिचे वात्सल्य, तिची रूपे,  तिचा जिव्हाळा, तीच  जगाची स्वामिनी. तुझ्या शक्तीनेच हे विश्व चालते. तू नररत्नांची खाण असे अनेक पैलू समस्त स्त्रीजातीविषयीचा आदर दर्शविणारी आहे.
           सडेतोड विचारांची कवयित्री सौ प्रीती जगझाप यांनी वास्तवाचे भान राखत, सत्याची कास धरत, प्रत्येकाला न्याय देत, वास्तव आपल्या कवितेच्या माध्यमातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि ते कौतुकास्पदच आहे. महाराष्ट्राचे गीत गात, मोठेपणा सांगत, आजच्या काळात माणसाची माणुसकी कशी हरवत चालली आहे? ही हरवलेली माणुसकी या कवितेतून कळते तर दुष्काळाचा सामना करणाऱा शेतकरी पाऊस पडल्यावर कसा अहवालदिल होतो ते दुष्काळ या कवितेतून दिसून येते.

       घरी झाली मोठी पण 
       मन झालीत हो छोटी 
        हातो- हाती मोबाइल 
        शब्द नाहीत हो ओठी...!!

       वरील ओळीतून आजच्या काळातील भयान वास्तव कवयित्री प्रीती जगझाप यांनी व्यक्त केले आहे.आज अनेक शहरात, ग्रामीण भागातही मोठमोठाली घरी झालीत पण माणसांची मने मात्र छोटी होत चालली आहेत. आज प्रत्येकाच्या हाती मोबाईल दिसतो पण या मोबाईलच्या आभासी जगात माणूस माणसापासून कसा दूर चालला आहे? नात्यातला संवादात मुका झाला आहे.कुणाच्याही  ओठी शब्द नाहीत भावना व्यक्त करायला.माणूस बोलतो तो फक्त मोबाईलशीच. तोही मुक्यानेच अशी खंत प्रीती ताईंनी व्यक्त केली आहे.
         हळव्या मनाच्या कवयित्री प्रीती जगझाप यांचे स्त्री मनाशी असलेले गाढ नाते, स्त्रीपूजेच्या त्या उपासक आहेत. त्यांच्या बहुविध कविता या स्त्रीवर आहेत. स्त्री विषयी नितांत आदर त्यांना आहे. व प्रत्येकानेही स्त्रीचा आदर करावा असे कवयित्रीला मनोमन वाटते. त्याच बरोबर त्यांना वृध्दांविषयी आपुलकी आहे.

            मन सुन्न, भावना सुन्न 
            विचार सुन्न सारे 
             कशास हवे वृद्धाश्रम 
             बंद करा सारे....!!

        संवेदनशील मनाची कवयित्री प्रीतीताईंनी वृद्धाश्रम या कवितेतून त्यांचे मन सुन्न होते. विचार सुन्न होतात.कशाला वृद्धाश्रम काढतात सारे? वृद्धाश्रम बंद करा. वृद्धांना आपुलकीचा मायेचा हात द्या.वृध्दच आपल्या घराचा आधार आहेत.वृद्धांना म्हातारपणी पैसाअडका काही हवं नसतं. त्यांना फक्त मायेची ऊब द्या. साथ द्या. हात द्या. त्यांच्यासोबत भरपूर वेळ घालवा. त्यांच्यासोबत चांगली वागणूक असावी. त्यांना काहीच कमी पडू देऊ नका. तुम्हाला ही काहीच कमी पडणार नाही. अशी आर्त हाक कवयित्री प्रीती जगझाप यांनी वरील ओळीतून व्यक्त केली आहे.
      कवयित्रीचे मन जेवढे हळवे,संवेदनशील आहे तेवढेच पिंपळा सारखे कणखर देखील आहे. त्यांना जेवढा स्त्रियांबद्दल जिव्हाळा आहे, आदर आहे. तेवढीच त्या निसर्गाच्या  पूजक आहेत. निसर्गाशी वेगळे जवळचे नाते आहे. कवयित्रीच्या आतल्या सुप्त भावना,अभिव्यक्ती,शब्द माधुर्य, जिव्हाळा, वृद्धांना बद्दलचा नितांत आदर, मैत्रीभाव, आई बद्दलची माया, आजीचे प्रेम, प्रेमभाव, समाजातील भयान वास्तव, शेतकर्‍याबद्दलची काळजी, प्रेमावरची निष्ठा, गावाची ओढ, जीवनसाथीचे प्रेम, तसेच मासिक पाळी सारख्या विषयाला हात घालत नैसर्गिक देणगी ती. त्यातून केलेले मतपरिवर्तन. जिद्द, चिकाटी,जीवनाचा खरा अर्थ, माय मराठी बद्दलचे प्रेम हे सर्व कवयित्री प्रीतीताईच्या कवितेतून स्पष्टपणे दिसून येते.
      'नंदादीप' या काव्यसंग्रहात एकूण ६६ कवितांचा खजिना आणि त्यात लपलेल्या कवयित्रीच्या भाव-भावना यांचा सुरेख संगम दिसून येतो. एकूण ८० पृष्ठ असलेल्या या काव्यसंग्रहाची पाठराखण डॉक्टर पद्मरेखा धनकर, चंद्रपूर यांनी अतिशय सुरेखपणे केलेली आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असाच हा काव्यसंग्रह म्हणजे 'नंदादीप' होय.
    कवयित्री प्रिती जगझाप यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!

समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका,जिल्हा वाशिम
मो ९७६७६६३२५७

Saturday, 29 January 2022

सावित्रीमाईची सोबतीण-देशातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख

 *सावित्रीमाई फुलेंची सोबतीण-देशातील पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमाबी शेख*

      क्रांतीज्योती ज्ञानज्योती आद्य भारतीय शिक्षिका व मुख्याध्यापिका ज्ञानाई सावित्रीबाई फुले यांची सोबतीण फातिमा शेख यांनी सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचे पवित्र काम केले. जेंव्हा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले या दाम्पत्यांना गोविंदरावांनी घराबाहेर काढलं. या उभयतांचे जीवन वाऱ्यावर होते. अशा तातडीच्या नितांत निकडीची  काळात उस्मान शेख अन त्यांच्या बहिण फातिमाबी शेख यांनी फुले दाम्पत्यांना भरभक्कम साथ दिली. स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था केली.तिथून खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाच्या बहराचा काळ सुरू झाला. सावित्रीआईच्या  कार्यात फातिमाबी शेख यांनी तोलामोलाची साथ दिली. सावित्रीमाईच्या खांद्याला खांदा लावून ज्ञानदानाचे काम केलं नाही तर सावित्रीमाईंना जेवढा त्रास सहन करावा लागला तेवढाच त्रास सहन करावा लागला पण आज त्याचं  समाजाकडून उपेक्षित राहिल्या.
        फातिमाबीच्या कार्याला उजाळा देण्यासाठी समाजाला फातिमामाईच्या कार्याची ओळख व्हावी. या उदात्त हेतूने ग्रामीण मुस्लीम मराठी साहित्य संस्थेचे संस्थापक कवी शफी बोल्डेकर यांच्या सहकार्याने कवयित्री अनिसा सिकंदर शेख, पुणे व कवयित्री दिलशाद यासीन सय्यद, अहमदनगर यांच्या कल्पनेतून फातिमाबी शेख  या विषयावर मराठीतला पहिला वहिला प्रातिनिधिक कविता संग्रह प्रकाशित केले. दोन भिन्न जिल्ह्यातल्या दोन कवयित्री विचारांनी जेंव्हा एकत्र आल्या तेंव्हा अतिशय देखण्या स्वरूपात फातिमाबी विषयी यांच्या जीवन कार्यावर पहिला ग्रंथ निर्माण झाला. राज्यभरातून व्हाट्सअप समूहाच्या माध्यमातून 153 च्या आसपास कविता जात आणि धर्मापलीकडे जाऊन या संग्रहात समाविष्ट झाल्या हे खरं वैचारिक सोनं आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
       या काव्यसंग्रहात अभंग,गझल, छंद, मुक्तछंद, पोवाडा, गीत, काव्य आदी विविध प्रकारात कविता समाविष्ट आहेत. सावित्रीमाई फुलेंच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा गंधही नव्हता. मुलगी शिकली की धर्म बुडाला असा समज लोकात पसरलेला होता. स्त्रीला स्वातंत्र्य नव्हतं. फक्त चूल आणि मूल इतकंच स्त्रीचं अस्तित्व होतं. मानसिक गुलामगिरीत स्त्री-जगत होती. तो काळ धार्मिक रीतिरिवाज, अज्ञानाच्या अंधकाराने दाटलेला होता. हाच अंधकार दूर लोटण्याचे महान कार्य आपल्या महाराष्ट्रातील दोन महान लेकीने केले. सावित्रीमाई आजारी असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा माईने ज्ञानदानाचे काम केले. इतकेच नाही तर सावित्री माय आजारी असताना त्यांची संपूर्ण जबाबदारी फातिमा माईने  स्वतःच्या खांद्यावर पेलली.अशा युगस्त्रीला  कृतज्ञतापूर्वक अभिवादन करणारा हा काव्यसंग्रह होय.
      
        दलितांसाठी रोज लढणारी
        सावित्री होती रणरागिनी 
        जग कल्याणास्तव  झटणारी 
        फातिमा ती शूर विश्वकल्याणी...!!

          बहुजनांना, दलितांना शिक्षण देण्यासाठी सावित्रीमाईनी, ज्योतिबां फुले यांनी आयुष्यभर काटे वेचले. सावित्रीमाईंनी लोकांचा छळ सोसला पण ज्ञानदानाचे पवित्र काम सोडले नाही. सावित्रीमाई रणरागिनी होती. तर जगाचं कल्याण करणारी झटणारी फातिमा विश्वकल्याणी होती या दोन लेकींचं काम जोपर्यंत सूर्य,चंद्र, तारे आहेत तोपर्यंत समाज कधीच विसरणार नाही. उशिरा का होईना समाजावरच्या डोळ्यावरची बांधलेली पट्टी निघाल्या शिवाय राहणार नाही.

     फातिमा तो पेटवली घरोघरी शिक्षणाची पणती 
    अजूनही अंधारात, महापुरुषात नाही तुझी गणती...!!

            या काव्यसंग्रहाच्या संपादिका कवियत्री अनिसा शेख  यांनी वरील ओळीतून फातिमा माईचे कार्य विशद केले आहे. तूच घरोघरी शिक्षणाची ज्योत पेटवली आहेस आणि आज अजूनही महापुरुषांच्या रांगेत तुझं नाव दिसत नाही. याबद्दल अंतःकरणास भिडणारी  खंत वरील ओवीतून  व्यक्त केली आहे.

           काट्यातल्या वाटा 
            खडतर होत्या 
            अक्षर प्रणेत्या 
             त्या काळात.....!!

            फातिमाबीने काट्याचा खडतर रस्ता तुडवीत हाल-अपेष्टा, अन्याय सहन करत, अहोरात्र शिक्षणासाठी चंदनाप्रमाणे झिजणा-या फातिमा बी यांच्याबद्दल कवयित्री दिलशाद सय्यद यांनी त्यांना अक्षर प्रणेत्या म्हणत  आदरभाव वरील ओळीतून व्यक्त केला आहे.

        तोडिल्या कर्मठ रूढी,बंधन
        फुले दांपत्याची प्रतिमा 
        स्त्रीशिक्षणाचा घेतला वसा 
         सात सखी माई फातिमा.....!!

            कर्म रूढी-परंपरा तोडणारी ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुले यांनी फातिमा बी उस्मान शेख यांना सोबतीला घेऊन त्या काळात शिक्षणाची ज्ञानगंगा देशात आणली. त्यांनाच वसा मैत्री फातिमामाईंनी घेतला. सावित्रीमाईँना शेवट पर्यंत साथ देणारी फातिमा बी आपल्या ध्येयापासून तसूभरही हल्ल्या नाहीत. क्रांतीची मशाल खऱ्या अर्थाने देशात पेटवली. स्त्रिया अशिक्षित होत्या त्या शिक्षण घेऊ लागल्या असे प्रतिपादन कवी प्रदीप जाधव यांनी आपल्या काव्यातून व्यक्त वरील ओळीतून सांगितले आहे.
          युगस्त्री ज्ञानाई, फातिमामाई यांच्या जीवनावरचा पहिला पहिला काव्यसंग्रह नक्कीच समोरच्या पिढीला दिशादर्शक ठरेल यात शंकाच नाही. उत्कृष्ट अशा काव्यसंग्रहाला प्रस्तावना बदिऊज्जमा  बिराजदार, सोलापूर यांची लाभली आहे. तसेच विदर्भाचे ज्येष्ठ लेखक, कथा-कादंबरीकार बाबाराव मुसळे, एॅडवोकेट सिकंदर शेख चांदणी नदाफ( पुणे महानगरपालिका सदस्य महिला व बालकल्याण समिती पुणे ) यांच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. तर पाठराखण डॉ. श्रीपाल सबनीस (  89 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुणे) माजी अध्यक्ष यांनी दिली आहे. प्रत्येकाने आवर्जून वाचावे जेणेकरून ज्ञानात भर पडेल व फातिमा माई चे कार्य जगाला समजेल असा ज्ञानाचा भूक भागविणारा ग्रंथ म्हणजे फातिमाबी शेख होय.

  प्रकाशन-वेदांत प्रकाशन
  प्रकाशक-सौ् सुप्रिया कुलकर्णी
  प्रथम आवृत्ती-२०२१
   संपादक- अनिसा सिकंदर शेख मो.९२७००५५६६६
                  दिलशात यासिन शेख मो.९८५०९२३९६१
   मूल्य :- २५०रूपये फक्त

समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका,जिल्हा वाशिम 
मोबाईल 9767663257

Wednesday, 19 January 2022

संघर्षाचे दुसरं नाव म्हणजे-झालं कोरडं आभाळ

 *संघर्षाचे दुसरं नाव म्हणजे- झालं कोरडं आभाळ*

   अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सावत्र आईच्या हाताखाली राहून मोलमजुरी करून शाळा शिकून सीमेवर देशाची सेवा करणारा हिम्मतबाज,जिगरबाज सैनिक कै.लक्ष्मणराव मानकर व त्यांच्या पत्नी कै.मनोरमाबाई मानकर या उभयंताचा मृत्यू झाला. कोरोना कालावधीत अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांचे जावई संवेदनशील मनाचा सच्चा दिलाचा माणूस गणेश भाकरे यांनी सासू-सासऱ्यांचा जीवन प्रवास त्यांचा त्याग, धैर्य, शौर्य, माया, जिव्हाळा, आपुलकी भाव, त्यांचा आदर्श समाजासमोर प्रेरणादायी ठरावा यासाठी केलेला हा शब्दप्रपंच. माणसाला संघर्ष करायला शिकवतो.साहसी बनायला शिकवतो.संघर्षाचं दुसर नाव म्हणजे - झालं कोरडं आभाळ आभाळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन २७ ऑक्टोबर २०२१ मध्ये झाले असून प्रकाशन  शब्ददीप प्रकाशन मुर्तीजापुर यांनी प्रकाशित केले आहे. सुंदर मुखपृष्ठ मिलिंद इंगळे यांनी सुरेख व्यक्तिमत्व असलेले बोलके चित्र साकारले आहे .या काव्यसंग्रहात एकूण ८० कविता असलेल्या देखण्या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 170 रुपये असून यातल्या कविता अर्थगर्भित व काळजाला भिडणा-या आहेत.
      संघर्षाशिवाय जीवन नाही. जीवना शिवाय संघर्ष नाही. या उक्तीप्रमाणे बऱ्याच जणांना दोन वेळचे पोटभर जेवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. परिस्थिती माणसाला खूप काही शिकवून जाते. परिस्थिती घडवते आणि बिघडवते सुद्धा. असा प्रेरणादायी प्रवास कवी  गणेश भाकरे यांनी आपल्या आदर्श असणाऱ्या सासु-सासरे (आई-वडीलासमान) असणारे यांना शब्दांच्या मखमली झालरीमध्ये ठेवण्याचा संकल्प केला. प्रत्येक वेळी नातं रक्तातच असावं लागतं असं नाही. आज आपण पाहतो कित्येक पोटची मुलं देखील स्वतःच्या जन्मदात्यांना वृद्धपणी सांभाळत नाहीत. त्यांना वृद्धाश्रम ठेवतात. इथे मात्र संवेदनशील मनाचा जावई कवी गणेश भाकरे यांनी प्रत्येक आठवण शब्दबद्ध करत खरी साहित्याची सेवा केली आहे. खरी शब्द सुमनांजली अर्पिली आहे.
    
            काय केलं आई अण्णा 
            गेले एकामागे एक 
            विसरले कसे सांगा 
            दूर गावातली लेक....!!

             सांगा सासर सोडून 
             येऊ कुणाचे भेटीला 
             असं कसं फेकलं हो
             दूर दिव्याच्या वातीला....!!

           एका मुलीचे आई वडील देवाघरी गेल्यावर जेवढे दुःख होतं तितकच दुःख जावयाला होते हे वरील ओवीतून विषद होते.प्रत्येक जावई आपल्या सासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या रूपात पाहत असेल तर कोणत्याच स्त्रीला हुंड्यासाठी सासरवास होणार नाही. माय बाप गेल्यावर मुलीवर कोसळणारा दुःखाचा डोंगर, दुःखाचा आभाळ कोसळलं की मुलीला आयुष्यभर आभाळ कोरडं झाल्यासारखं वाटतं. त्याची उणीव भासत राहणार. सहचारिणीचे दुःख कवीने आपल्या काव्यातून व्यक्त केले. तसेच यापुढे सासरवाडीला कोणासाठी येऊ असं कसं दिव्याच्या वातीला म्हणजे लेकीला तुम्ही दूर फेकलं अशी खंत कवीमनाला वाटते.

          प्रत्येकाच्या
         मनी भीती 
         नाही दिली 
         मूठमाती
 
         जवळचे 
         खूप दूर 
         जीव गेला
         रिते घर....!!

    कोरूना नावाच्या भयंकर महामारीमुळे अख्खं जग पार हादरून गेलं. लाखो लोक मरण पावले.स्मशानाने भयाण रूप धारण केलं होतं. कोणत्याही व्हाट्सअप समुह उघडला की कुणीतरी जवळचे मित्र व नातेवाईक,ओळखीचे आपल्यातून निघून गेलेली असायची आणि भावपूर्ण श्रद्धांजली ने समूह भरून जायचा. काळजात धस्स व्हायचं. कित्येक लोकांच्या नशिबी माती करण्याचे भाग्य  सुद्धा लाभले नाही. प्रत्येकाच्या मनात भीतीचे वातावरण होतं. जवळचे दूर झाले. जवळचे मेले.जीव गेला तरी  काहीजण मातीला गाठू शकले नाहीत. अशी अवस्था अनेकांची झाली होती. तीच खंत कवी गणेश भाकरे यांनी उपरोक्त ओवी मधून करण्याचा प्रयत्न केला आहे.

            आई गेल्यावर ! सारे दूरदूर 
            खिडक्या आणि दार | बंद केले ||
 
           अंतर ठेवून | राहिले असते 
           कशी ही दिसते | जाता जाता ||

     कोरोना काळ जगाला खूप काही शिकवून गेला. कोरोना महामारीत कोरोनांने आणि खूप लोकं भितीपोटी मेली. स्मशानात भयान वाटणाऱ्या चितेच्या अग्नीतांडव घातलेला स्मशान लोकं जाळायला  पण जागा नव्हती. अशा बिकट परिस्थिती मध्ये काही लोकं भीतीनेच मेले. तर काही लोक इतर आजारांनी मेले.कुणी अटॅकने गेले,कोणी नातेवाईक निसर्गतः जरी मेला तरी कुणी कुणाच्या मातीला जाईना अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशी परिस्थिती कवी गणेश भाकरे यांच्या सासुबाई वारल्यावर झाली होती. आई गेल्यावर सगळे नातेवाईक दूर गेले. सर्वांनी खिडक्या आणि दार बंद केले. कोणीही मैयतीला आले नाही.रिपोर्ट निगेटिव्ह असून सुद्धा. तिला लोक आले नाहीत.अंतर ठेवून आले असते आणि शेवटचे दुरूनच पाहिले असते.अशी खंत कवी गणेश भाकरे यांनी वरील अभंगातून  केली आहे.

             आई अण्णा वैकुंठात 
             आता माहेरात काय 
             पुण्या विटेवरी शोधू
             माथा टेकविण्या पाय...||

             आई-वडील नसल्याचे दुःख जेवढे एका मुलीला होते तेवढे दुःख जगात कोणालाच होत नाही. मुलगी सासरी जरी गेली तरी तिचे डोळे, तिचे अंतकरण, सतत आई-वडिलांकडे माहेरी पिंगा घालत असतं. माय बापा विना कोणत्याच मुलीला माहेरी करमत नाही. पाया पडण्यासाठी कोणती विठ शोधू? असा खडा  सवाल लेकीच्या भावना कवींनी व्यक्त केले आहेत.' जे देखे कवी ते ते न देखे रवी ' या उक्तीप्रमाणे कवी कोणाच्याही भावना व्यक्त करू शकतो. कवी कोठेही पोहचू शकतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे संवेदनशील मनाचा कवी गणेश भाकरे होय.
 
              त्यांच्यामुळे वाटे मला
              माझं माहेर पंढरी 
              त्यांच्या भेटीसाठी माझी 
               असते एकादशी वारी....!!

     प्रत्येक मुलीला तिचे माहेर म्हणजे तिच्यासाठी पंढरीच असते. जणू स्वर्गच असतो. आणि त्या स्वर्गातले मायबाप म्हणजे देवच. आई वडिलांच्या भेटीसाठी मुलगी धावत माहेर गाठते. मुलीला तिच्या माहेरची भेट म्हणजे एकादशीची वारीच वाटत असते. हे त्रिकालाबाधित सत्य चार ओळीतून  कोणीच नाकारू शकत नाही.

               मित्रानो
               स्मशानातल्या लिंबाच्या झाडाखाली
               तोंडावर मास्क लावून
               एक एक जरी उभा राहीला असता.   
               निरोप द्यायला तर 
                माजी ऑक्सिजन लेवल 
                किती तरी पटीने वाढली असती.
                माझ्या मायला शेवटचा
                निरोप देताना....!!

     संवेदनशील मनाचे कवी गणेश भाकरे यांना त्यांचे जवळचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या कठीण समयी, त्यांच्या दुःखात सहभागी झाले नाहीत. याची सल कायम त्यांना बोचत राहते. मित्र फक्त सुखात सोबत असून उपयोग नाही तर वेळप्रसंगी संकटात, दुःखात साथ देणारेच खरे मित्र.कवी गणेश भाकरे यांच्या आई सासुबाई वारल्यानंतर मित्रमंडळी दूर दूर जरी उभी राहिली असती स्मशानात. तरी माझी ऑक्सिजन लेवल किती तरी पटीने वाढली असती.असा शेवटचा निरोप देते समयी अशी खंत कवी गणेश भाकरे यांनी केली आहे.
        कोरोनाच्या काळात अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये कवी गणेश भाकरे यांना सासू-सासरे यांच्या निधनानंतर झालेले दुःख. शब्दातून वाट मोकळी करत कांही रचना अष्टाक्षरी तर काही अभंग प्रकारात काही मुक्तछंदातल्या तर काही चाराक्षरीत आहेत. अष्टाक्षरी काव्यप्रकारात गेम साधणा-या रचनांचा कवी गणेश भाकरे यांचा वेगळाच हातखंडा दिसून येतो. सासू-सासरे यांच्या जाण्याने कवीचा मायेचा पसारा हरवल्यासारखं वाटतं. झालं कोरडं आभाळ या पुस्तकाच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले आहे. प्रत्येक कविता वाचताना आभाळ भरून आल्यासारखं अंतःकरण भरून येतं. अशा या काव्यसंग्रहात ८० कविता वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे- झालं कोरडं आभाळ या शीर्षकावरूनच कवी गणेश भाकरे यांच्या दुःखाची वलयाची कल्पना दिसून येते. आणि नकळत वाचकांची ही डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.

     कवी गणेश भाकरे यांच्या पाचव्या काव्यसंग्रहाला व पुढील कारकीर्दीला अनंत शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

शब्दसौंदर्याने नटलेला काव्यसंग्रह म्हणजे -'प्राजक्त'

 *शब्दसौंदर्याने नटलेला काव्यसंग्रह म्हणजे- प्राजक्त*

       प्राजक्ताचा सडा अंगणात सर्वत्र पसरतो आणि चोहिकडे सुगंध ज्याप्रमाणे दरवळत राहतो. अगदी तसाच निसर्गसौंदर्याने भरभरून नटलेला काव्यसंग्रह म्हणजे पुण्याच्या प्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती भिसे यांचा दुसरा काव्यसंग्रह 'प्राजक्त' होय. कवयित्री प्रीती भिसे यांचा काव्यसंग्रह खर्‍याखुर्‍या प्राजक्ता प्रमाणेच मनमोहक असून वाचकांच्या जीवनात देखील आनंद पेरणारा, वाचकांचे मंदिर सुगंधित करणारा हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अॅंन्ड डिस्ट्रीब्युटर्स सासवड, पुणे यांनी १ मार्च २०१९ रोजी प्रकाशित केला असून या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ शंभर रुपये असले तरी प्रत्येक कविता या शब्द सौंदर्याने नटलेल्या वाचकाच्या मनाला गारवा देणा-या आहेत. या काव्य संग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे प्राजक्ताची फुले असणारा प्राजक्त निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवतो. वाचकाला वाचनाची गोडी वाढवून जातो.
          कवयित्री प्रीती भिसे या अत्यंत श्रद्धाळू, मायाळू असल्याने त्यांनी शब्द फुलांची परडी सुरुवातीलाच गणेश वंदना ने केली आहे. प्राजक्ताचे फुल जरी नाजूक असले तरी संध्याकाळी पडणारा प्राजक्ताचा सडा पाहून मन हर्षित झाल्याशिवाय राहत नाही. प्रा:त काळी उठल्याबरोबर अंगणात प्राजक्ताचा सडा पाहून जसं मन सुगंधित होते त्याच प्रमाणे प्रीतीताईंच्या कविता वाचून मन सुगंधित होते.

        अल्पायुषी प्राजक्त असा आहे सुंदर देखणा
        श्रीहरीसही मोहवितो हा नाजूकही तेवढा
        दुसऱ्यासाठी सुगंधित अविरत घालतो तो सडे 
        बागेतून प्राजक्त कसा गं सुवासिक दरवळे...!!

         प्राजक्ताचं फूल जेवढं नाजूक आहे. तेवढेच अल्पायुष्यी आहे. पण प्राजक्ताच्या सुगंधाने संपूर्ण परिसर सुगंधित होतो. देवाला सुद्धा खूप आवडतो. तेवढाच नाजूकही असतो. नुसत्या वाऱ्याच्या झुळकेनेसवे प्राजक्ताचा सडा अंगणी पडतो. त्याचा सुवास सर्वांना मोहून टाकतो. वरील ओळीतून कवयित्री प्रीती भिसे व्यक्त होताना दिसतात.

          वाटे माझिया मनाला, स्वच्छंदी पाखरू व्हावे
          माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे 
          दाराच्या जवळ जुई, सुगंधी प्रसन्न वाटे
          अंगणात सुबकशी, रांगोळी नक्षी थाटे
          आईची प्रेमळ हाक,आनंद नभी न मावे
          माहेरच्या अंगणात, उडत उडत जावे...!!

              संवेदनशील मनाच्या कवयित्री प्रीती भिसे यांचे मन सदैव माहेरच्या अंगणात घिरट्या घालताना दिसून येतं. कवयित्रीला स्वच्छंदी पाखरू होऊन सतत माहेरी जावं वाटतं. माहेरच्या अंगणात दाराच्या जवळ असलेल्या जुईचा सुगंध घेतल्यावर कवयित्रीला प्रसन्न वाटतं. अंगणातली सुबक अशी रांगोळीची नक्षी कवितेच्या मनात घर करून राहते.  त्यात आईची प्रेमळ हाक ऐकल्यावर कवित्री प्रीती भिसे यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. म्हणून कवयित्रीचे मन सारखं माहेरच्या अंगणी गिरट्या घालताना दिसतं.
          कवयित्री प्रितीताई जेवढी निर्मळ तेवढी स्वच्छंदी पाखरू असल्यासारखी आहे. त्यांनी अनेक कविता माती, आकाश, प्रेम, सूर्य, चंद्र, तारे, चांदण्या, वेली, झाडे, पशू, पक्षी, डोंगर, वसुंधरा इ.वर केलेल्या आहेत.त्यामुळे कवयित्री प्रीती भिसे यांचे सृष्टीशी खूप छान जवळचे नाते आहे. कवयित्री जेवढ्या हळव्या मनाची आहे. तेवढीच श्रद्धाळू ,मायाळू आहे. हे पहिल्या कवितेतूनच दिसून येते. कवयित्रीला भारत माते विषयी खूप प्रेम आहे.खूप आदर आहे,खूप अभिमान आहे.
      कवयित्री प्रितीताई भिसे यांचा 'जीवनाच्या पायवाटेवर' हा पहिला काव्यसंग्रह वाचकाच्या खूप पसंतीस उतरला आहे. जीवनाच्या पाय वाटेवरून चालताना त्यांचा दुसरा काव्यसंग्रह प्राजक्त वाचकांच्या पसंतीस उतरणारा आहे. कारण त्यांच्या अनेक कविता छंदबद्ध वृत्तामध्ये असल्याने  चार चॉंद या काव्यसंग्रहाला लागले आहेत. जेवढ्या कविता वृत्तबद्ध किंवा लगावली मध्ये लिहिली जाते. तेवढी कविता सर्वोत्तम व दर्जेदार बनतील यात संशय नाही. या काव्यसंग्रहात कवयित्रीने अनेक छंद वृत्तामध्ये गझल लिहिल्या आहेत.कवयित्री प्रीती ताईंना निसर्ग सौंदर्या प्रमाणेच शब्द सौंदर्याची देणगी परमेश्वराकडून मिळालेली आहे.
    
          आभाळाचे पंख लावू
          प्रयत्नांना देव मोका 
          यश शिखरा भिडून 
          उंच जाई माझा झोका...!!
  
        वरील अष्टाक्षरीमधून गरूडा प्रमाणे उंच भरारी घेणाऱ्याला जमिनीचं ओझं नसतं त्याप्रमाणे प्रितीताईना आभाळाचे पंख लावून प्रयत्नांनी यशाचे शिखर गाठण्यासाठी उंच झोका घ्यायचा आहे. अशी जिद्द प्रितीताई यांच्या अष्टाक्षरी ओवीतून दिसून येते. जिद्द चिकाटीला गुरु मानणारी कवयित्री प्रेरणेला साथीदार करून साहित्याचा कल्पतरू बनू पाहात आहे. अहंकारा विषयी अत्यंत चीड असणारी कवित्री संवेदनशील ही तितकीच आहे. त्यांची सांजवेळ,आयुष्यात साथीचे स्थान, फुलाला सुगंध मातीचा, तुळस, शब्द मनोरा, रविकिरण, निवांत क्षण, स्वप्नातली सृष्टी, सृष्टीसौंदर्य निसर्गाचे,नववधू, आठवणी, तुझ्या मुळे बहरलं नातं, अवनी,आकाश यासारख्या कविता अत्यंत वाचनीय होऊन वेगवेगळ्या रूपात आपल्यासमोर येताना दिसतात. काही अष्टाक्षरी काव्य कधी शेलकाव्य, कधी शिरोमणी काव्य, तर कधी गजल होऊन तर कधी भुजंगप्रयात, आनंदकंद तर कधी आनंद ज्वाला वृत्त, उद्धव मात्रा वृत्त, पादाकुलक वृत्त असे वेगवेगळ्या मात्रा वृत्तात मांडण्याचा वेगळाच हातखंडा कवयित्री प्रीती ताईंचा दिसून येतो.
         कवयित्री प्रितीताई चे अनेक रचनातून त्या धार्मिक असल्याचं दिसून येतं. प्रीती ताईच्या या काव्यसंग्रहाला प्रस्तावना जरी प्रदीर्घ असली तरी मुद्देसूद व काव्यसंग्रहाला न्याय देणारी आहे. प्रस्तावना सौ.मीरा भागवत मीतेश्री यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक विजय काकडे, बारामती यांनी मोजक्या शब्दांत पण सुरेखपणे मांडली आहे. या काव्यसंग्रहात एकूण 61 कविता असून त्या प्राजक्त च्या रूपाने सृष्टी सौंदर्यात व साहित्यात वाचकाला शब्द सौंदर्याने नकळत प्राजक्ता सारखा फुलवीत सुगंधित करणा-या आहेत. 
          कवयित्री सौ.प्रिती भिसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
©️®️मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Monday, 10 January 2022

स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे ती अशीच आहे

 *स्त्रीच्या अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे ती अशीच आहे*

     ती च्या मनातील घालमेल फक्त तीच जास्त ओळखू शकते. एका स्त्रीच्या मनातले भाव, शब्दमाधुर्य,प्रेमरसाने बहरत जाऊन, ती च्या काव्याचा सुगंध सर्वत्र दरवळत राहतो. असाच एक काव्यसंग्रह म्हणजे 'ती अशीच आहे'  कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर या दोन जिवाभावाच्या मैत्रिणी यांचा एक काव्यसंग्रह.मी आजपर्यंत प्रातिनिधिक काव्यसंग्रह अनेक वाचले पण दोन कवयित्रीचे संयुक्तिक काव्यसंग्रह प्रथमच माझ्या वाचनात आले. दोन भिन्न व्यक्तींचे विचार एकत्र जुळणे ही बाब खरोखरच कौतुकास्पद व खऱ्या मैत्रीचे प्रतीक आहे. आजकाल आपण पाहतो बऱ्याच मैत्रिणी या शॉपिंग पुरत्या,पार्टीपुरत्या  किंवा इतर कार्यक्रमापुरत्या असतात. पण दोन भिन्न जिल्ह्यातल्या कवयित्री एकत्र येऊन काव्यसंग्रह काढतात. ती च्या शोधात म्हणजे स्त्रीच्या जीवनावर आधारित विचार यांचा सुरेख संगम जिथे जुळून येतो तिथे खरोखर माझे कर आपोआप जुळतात.
       'ती अशीच आहे' या काव्यसंग्रहाचे प्रकाशन परिस पब्लिकेशन पुणे यांचे असून मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी स्त्री (ती) चे कर्तव्यदक्ष असणारे हात व त्या झाडावर बसलेली ती चिमणी काढलेले बोलके चित्र बघताक्षणीच काव्यसंग्रह वाचनाची गोडी वाढवते. या काव्यसंग्रहाची पहिली आवृत्ती १७ ऑक्टोबर २०२१ मध्ये प्रकाशित झाली असून मुल्य केवळ दीडशे र१५०/ असले तरी ती चे स्थान प्रत्येकाच्या आयुष्यात किती महत्वाचे आहे? ते शेवटी मनाला पटते. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना धनंजय मुळे भंडारा व विष्णू संकपाळ यांची लाभली आहे.

        ती अशीच आहे
        फुलापेक्षाही नाजुक 
         नारळासारखे कठीण
         पण आतून कोमल 
         रागामागेही जिचे अतुट प्रेम आहे
         भांडूनही जी हक्काने हवे ते मागून घेते.

            निसर्गाने स्त्रियांना अद्भुत शक्ती प्रदान केली आहे. स्त्रियांच्या स्त्रियांना जेवढी सहनशक्ती दिली आहे तेवढेच संवेदनशील मन ही तिच असतं.ती जेवढी फुलासारखी नाजुक आहे. तेवढीच बाहेरून नारळासारखी कठीण आहे. पण आतून खूप कोमल आहे. मायेचा सागर आहे. पुराणात पुरातन काळापासून स्त्रीला खूप महत्त्व आहे. तिच्या रागा मागेही अतूट प्रेम दडलेलं असतं. एखादी स्त्री आपल्या मुलाला एक चापट जरी मारली तरी दिवसभर तिला रुखरुख लागून राहते की मी उगाच चापट मारली. तिची माया अगाध आहे. तिचं मन अगदी लहान मुलाप्रमाणे निरागस आहे. ती नसली तर ती च्या अस्तित्वाच्या खुणा घरभर पसरलेल्या असतात. ती जितकी धांदरट आहे तितकीच समजदार आहे. ती च्या मनाचा ठाव कोणालाही घेता येणार नाही. अशी परमेश्वराची ती खास निर्मिती आहे.
        स्त्रियांच्या जबाबदाऱ्या, ती च्यावर लादलेली बंधने, तिचा कणखर करारी बाणा, ती चं उदार असणारं अंतःकरण, तिचे निरागस भाव, घरासाठी समर्पित होणारी ती, ती च्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा, ती च्या शिवाय तो नाही, तिच्यावर होणारा अन्याय, ती ची होणारी उपेक्षा, ती चा संघर्ष, ती च्या आयुष्याची जडणघडण, ती ने खाल्लेल्या खस्ता,तीचे कष्ट, मेहनत, ती ची जिद्द, ती चं सौंदर्य, ती च फुलपाखरासारखं भिरभिरणारं मन,ती चा तो स्पर्श, ती चा तो आपुलकी भाव, अनेक नात्यात गुंफिली जाणारी ती, आयुष्याचा खडतर प्रवासाची ती सोबतीन, अशा सर्वांगाने व्यापून गेलेली ती, ती च्याविषयीचे उत्कट भाव कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मिता नानवटकर यांनी "ती अशीच आहे" यातून व्यक्त केल्या आहेत.

        खुल्या आभाळाखाली निर्भय अन् 
        उघड्यावरचा संसार मी थाटला आहे 
        कष्टाने पेटलेल्या चुलीवरती कधी 
        मी माझाच हात भाजला आहे.

             वितभर पोटाची खळगी भरण्यासाठी गरिबांना किती कष्ट सोसावे लागतात. किती खस्ता खाव्या लागतात. हे फक्त गरिबांना माहिती असतं. गरिबांना घरादाराचा आधार नसला की खुलं खुल्या आभाळाखाली कसली भीती नाही आणि उघड्यावरचा संसार त्यांनी थाटलेला असतो. कष्टाने पेटलेल्या चुलीवर गरिबांचा हात भाजतो. अशी व्यथा मी कामगार बोलतोय कवितेतून संवेदनशील मनाच्या कवयित्री चित्रा पगारे यांनी मांडली आहे.

          भेटी साजनाचा ह्रदयात ध्यास आहे
         डोळ्यात आसवांचा पाऊस खास आहे
         ओढ अनामिक आता ध्येयात गुंतलेली 
          दरवळतो भोवताली तुझा सुवास आहे.

          कवयित्री नीता नानवटकर यांनी वरील शेर आनंदकंद या वृत्तपत्रातील लिहीला असून त्यांनी स्त्रीला साधणार्‍या साजनाच्या भेटीची ओढ, त्याच्या आठवणी व साजनाच्या प्रेमाचा दरवळणारा सुवास गझलेतून व्यक्त केला आहे.कवयित्री मीता नानवटकर यांच्या गझलेचा वेगळाच थाट या काव्यसंग्रहाला मखमली लेस लावून जातो. स्त्रियांचं जगणं.. जगता-जगता होणारी परवड, तिचे स्वातंत्र्य, तिची ती बंदिस्त अवस्था, ती चर्या साठी धडपडणारी ती सावित्री, सावित्रीचे ते कार्य, सावित्री मुळे झालेली स्त्री जातीची प्रगती, तिने घेतलेली गरुड झेप, ती च्यातली ती समर्पण करणारी वृत्ती, ती ची विरह भावना, ती चे प्रेम करणारी ती कळी, तिच्यावर लादलेली अनेक बंधनं  झुगारून देऊन ती ने केलेला तो प्रवास हे सारे काही कवयित्री मिता नानवटकर यांनी अगदी सुरेखपणे मांडले आहे.

        पेलून संकटांना मी वाकणार नाही
        वाटेत आयुष्याच्या मी थांबणार नाही

        चाखून वेदनांना पाहील धाडसाने 
        डोहात आसवांच्या मी वाहणार नाही....!

            कवयित्री मीता नानवटकर यांनी एक स्त्री संकटावर कशी मात करते? अनेक संकटं झेलण्याचे धाडस स्त्रीमध्ये असते. आयुष्याच्या वाटेवर ती कधीच थांबत नाही. संकटसमयी सुद्धा स्त्री वेदनेने व्याकुळ न होता धाडसाने समोर जाते.इतकेच नाही तर दुःखाचा डोंगर कोसळला तरी आसवांचा डोहात मी वाहणार नाही. अशी खंबीर स्त्री म्हणजे 'ती ती अशीच आहे'  ईश्वराने स्त्रीचे मन जरी हळवे बनवले असले तरी ती ला धाडसी सुद्धा बनवले आहे. परमेश्वराची खास कलाकृती म्हणजे स्त्री 'ती अशीच आहे'.
           कवयित्री चित्रा पगारे व मीता नानवटकर या दोघींच्या कवितेचा संयुक्तिक काव्यसंग्रह स्त्री म्हणजे ती. ती च्या अस्तित्वाचा शोध घेणारा असल्याने रसिकांच्या, वाचकांच्या हृदयाला स्पर्श करणारा आहे. कवयित्री नीता नानवटकर यांच्या अनेक गझल खूप काही सांगून जातात. वास्तवतेचे दर्शन घडवणाऱ्या, तिचं जगणं,खूलनं,फुलनं, ती च अस्तित्व व्यक्त करणाऱ्या कविता सरळ काळजाला जाऊन भिडणा-या अशाच कविता या काव्यसंग्रहात आहेत. काही कविता सामाजिक भान जपणाऱ्या तर काही कविता प्रकाश टाकणा-या आहेत. या काव्यसंग्रहात एकूण 80 कविता असून अत्यंत उत्कृट दर्जाच्या आहेत.
        कवयित्री चित्रा पगारे व कवयित्री मीता नानवटकर यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 3 December 2021

बापलेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

*बाप-लेकीच्या वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वात्सल्यसूक्त*

         आपण आजपर्यंत आई मुलींच्या नात्यावर अनेक कविता वाचल्या. मायलेकींचे ही भरपूर साहित्य प्रकाशित झाले पण बाप लेकीच्या कविता प्रथमच माझ्या वाचनात आल्या. दैनिक स्वाभिमानी छावा या वृत्तपत्रात दररोज बाप लेकीच्या कविता प्रकाशित व्हायच्या आणि मी त्या दररोज आवर्जून वाचायचे. प्रत्येक कविता काळजाला स्पर्शून जायची आणि लेकीविषयीचे प्रेम उत्कट व्हायचं.साहित्याचे गाढे अभ्यासक कवी, लेखक प्रकाश जडे सर यांच्या बापलेकीवरच्या कविता खरच बाप-लेकीचे नाते किती अतूट असते हे सांगून जातात. लेकीने बापाच्या गळ्याला मारलेली मिठी तीच लेक सासरी जाताना बापाच्या जीवाची होणारी घालमेल कळते. हे सारे प्रकाश जडे यांच्या कवितेत आविर्भूत आहे. प्रत्येक कविता वाचताना अंतकरण भरून येते आणि नकळत डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन जातात.
        सोलापूर जिल्ह्याचे कवी प्रकाश जडे यांचा वात्सल्यसूक्त  या काव्यसंग्रहाचे प्रकाशन दिगंबर दगडू भगरे यांनी जानेवारी २०२१ मध्ये प्रथमावृत्ती प्रकाशित केली असून मुखपृष्ठावर बापलेकीचा हात धरून चाललेले  पाठमोरी असलेले बोलके चित्र काव्यसंग्रह वाचण्याची उत्कंठा वाढवते.मलपृष्ठावर महाराष्ट्र साहित्य परिषद दामाजी नगरच्या डॉक्टर श्रुतीश्री वडगबाळकर यांनी पाठराखण केली आहे. पहिल्या पानावर लेकीने बापाला मारलेली घट्ट मिठी चित्र प्रणोती पोद्दार यांनी रेखाटलेली मनाला अधिक भावून जाते. या पुस्तकाचे मुल्य केवळ 120 रुपये असून यातली प्रत्येक कविता काळजाला भिडणारी आहे.
      साहित्याचे गाढे अभ्यासक व स्वाभिमानी छावा या दैनिक वृत्तपत्राचे सहसंपादक, संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत.हाडाचा शिक्षक असल्यामुळे त्यांना अनेक साहित्यिक व शैक्षणिक आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्री प्रकाश जडे सर खरं तर विज्ञानाचे विद्यार्थी असून ते साहित्याचे वारकरी पण आहेत.ते आपल्या कवितेतून अधिक उत्कटपणे व्यक्त होतात.वात्सल्यसूक्त या काव्यसंग्रहात एकूण 52 कविता एकाच विषयावर आहेत. बाप लेकीच्या नात्याला शब्द फुलांनी फुलवीत नात्यांची घट्ट वीण एकेका ओळींमधून गुंफीत जाणारा कवी म्हणजे प्रकाश जडे सर होय.
        लेकी विना 
       का घर असते?
       निरर्थक होते 
       जिणे बापाचे...!!

       अगदी कमी शब्दात भावपूर्ण, अर्थ गर्भित, सखोल अर्थ दडलेल्या वरील ओळीतून बापाचा लेकीसाठी तुटणारा जीव, लेकीवरचे अतोनात प्रेम, उत्कट प्रेमभावना, वात्सल्याचा निर्मळ झरा, शब्दांशब्दांतून पाझरतो आहे. संवेदनशील मनाचा कवी प्रकाश जडे सर लेकीविना घर घर राहात नाही. ज्या घरात लेक नाही त्या बापाचे जगणे निरर्थक होते. त्या बापाच्या जीवनाला काही अर्थच नाही लेक वंशाची पणती असते. माहेर आणि सासर अशा दोन्ही घरात प्रकाश देणारी लेक बापाचा जीव की प्राण असते. लेक बापाच्या आयुष्याची कविताच असते असे कवी वरील ओळीतून व्यक्त होतात.

              लेक म्हणजे
               उंबराचं फूल
               नुसतीच
               भूल ....!

                लेक माझी
                लाखात एक 
                काळजात मेख 
                सोनियाची...!!

                आईची
                 येता सय
                 लेक होते 
                 माझी माय....!!

       वरील ओळीतून लेक म्हणजे उंबराचं फूल नुसतीच भूल अशी मनाला भुरळ पाडणाऱ्या ओळी बापावरुन जीव ओवाळून टाकणाऱ्या लेकीची महती कवी विशद करण्याचा प्रयत्न करतो. लाखात एक जणू सोन्याची मेख अशा सुवर्णमयी शब्दांमध्ये लेकींच्या नात्याला गुंफणारा कवी प्रकाश जडे यांचे लेकीवरचे अतोनात प्रेम दिसून येते. आईची आठवण येता क्षणी लेक माझी माय होते. खरोखर लेकीचे निरागस प्रेम ज्याला लेख आहे. त्याला चांगल्या प्रकारे अनुभवता येते. मी आज पर्यंत मायलेकी वरच्या अनेक कविता वाचल्या, लिहिल्या पण आहेत पण बाप लेकी वरच्या कविता  प्रकाश जडे सरांचे लेकीवरचे प्रेम, त्यांच्या  कविता थेट काळजाला भिडणार्‍या आहेत. स्पर्श करणा-या आहेत.बापलेकी वरच्या कविता माझ्या प्रथमच वाचनात आल्या असल्यामुळे लेक नसल्याची हुरहूर स्वस्थ बसू दिली नाही. वात्सल्यसूक्त बाप-लेकीचे नाते दृढ करणारा कवितासंग्रह माझ्या मनाला खूप भावला सर्व रसिक वाचकांनी आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह...

           लेक आपली असली तरी 
           लेकीचं घर आपलं नसतं
           बऱ्याच वेळा 
           लेकीचे घर लेकीच नसतं...!

           आपल्या अंगणातील वेल 
            दुसऱ्याच्या बांधावर
            मोहरताना, फुलताना, फळताना
            दुरूनच पाहायचे असते
            कधी डोळ्यांचे बांध फुटले तरी
            मनाचे बांध रेटता येत नाहीत 
            मागे-पुढे..!!

        लहानपणी बाबांच्या अंगाखांद्यावर खेळणारी लेक कधी मोठी होते बापालाच कळत नाही. तिच्या नाजूक पैंजणाचा आवाज, तिचे बोबडे बोल, बाप काळजात साठवून ठेवतो. एक दिवस प्रत्येक लेकीला तिच्या नवऱ्याच्या घरी जावं लागतं पण जेव्हा लेक सासरी जाते तेव्हा ती परक्याची होते.तिचं घर आपलं नसतं. बऱ्याच वेळा लेकीचं घर लेकीचं नसतं. बापाच्या घरासारखी सत्ता नवऱ्याच्या घरी नसते वडिलांच्या घरासारखं स्वातंत्र्य नसतं. प्रत्येक गोष्टीवर मर्यादा येतात हे वास्तव.  प्रकाश जडे सर आवर्जून सांगितल्याशिवाय राहत नाही. आपल्या अंगाणातील वेल दुसऱ्याच्या बांधावर मोहरताना, फुलताना, फळताना लेकीला बापाने दुरूनच पाहावा लागते. ती माहेरी आली तरी दोन दिवसाची पाहुणी म्हणूनच येते. आणि चिमणी सारखी परत उडून जाते. बापाच्या डोळ्याचे बांध फुटले तरी बापाच्या मनाचा बांध काही अडवता येत नाही. बापाला सर्वात जास्त त्रास लेक बापाचं घर सोडून जाते तेंव्हा होतो. बाप आतल्याआत रडत असतो. त्याला मोठ्यांनीही रडता येत नाही कारण तो बाप असतो. लेकीचा आधारवड असतो. 
       वात्सल्यसूक्त हा आगळावेगळा बाप लेकीच्या नात्यावर प्रकाश टाकणारा प्रकाश जडे सर यांचा कवितासंग्रह वाचकाच्या थेट काळजाला भिडणारा आहे. प्रत्येक वाचकाने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह म्हणजे वाचले वात्सल्यसूक्त होय.
          कवी प्रकाश जडे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Saturday, 16 October 2021

जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न


*जगातल्या अनमोल रत्नांपैकी एक रत्न म्हणजे क्रांतीरत्न होय*

     स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या,ज्ञानाचा दीप लावणाऱ्या क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आलेख जगाला एक महाग्रंथाची ओळख करून देणारा (संदर्भग्रंथ )महाग्रंथाची निर्मिती प्रेरणा राजेश खवले यांच्या संकल्पनेतून प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक,लेखक, कवी, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्रितपणे चालवलेला उपक्रम म्हणजे क्रांतिरत्न जगातल्या अनमोल रत्ना पैकीच एक रत्न होय.
       शिक्षणाचे बीजारोपणपन करणारे फुले दांपत्य यांचे कार्य आद्वितीय आहे. 'फुले असुनी काठी वेचिले' या उक्तीप्रमाणे आयुष्यभर इतरांसाठी झटणारे,त्याग,समर्पण करणारे, स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारे महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीआई फुले यांच्या जीवनावर आधारित महाराष्ट्रातून १९४ लेखकांनी लिहिलेले लेख या महा ग्रंथामध्ये समाविष्ट आहेत.या ग्रंथाचे प्रकाशक वर्षा चिमणकर अकोला, मुद्रक- सुरज कार्ड, नागपूर, मुखपृष्ठ सचिन थेटे, रेखाचित्र रवींद्र शिरसागर यांची आहेत. या ग्रंथाचे मार्गदर्शक विश्वनाथ शेगावकर (आय.ए.एस.से.नि.) तथा प्रधान सचिव तामीळनाडू व अशोक गेडाम (उपजिल्हाधिकारी) सेवानिवृत्त हे आहेत तर निर्मिती मंडळ प्रकाश अंधारे( विशेष कार्यकारी अधिकारी) प्रताप वाघमारे (तहसीलदार )नागपूर, विजय लोखंडे (तहसीलदार आकोला ) अतुल दोड (खनिकर्म अधिकारी औरंगाबाद )राहुल तायडे (तहसीलदार नांदुरा) विनय गोसावी (उपजिल्हाधिकारी जळगाव) इ. आहेत.१००० पानांचा महाग्रंथ तयार करण्यासाठी एका प्रतिसाठी आठशे रुपये खर्च हा फक्त छपाईसाठी लागला आहे. प्रत्येक घरातली स्त्री शिकली पाहिजे म्हणून आयुष्यभर त्याग करणाऱ्या फुले दांपत्याच्या कार्याची माहिती येणाऱ्या पिढीला माहित होण्यासाठी प्रत्येक घरात हा महाग्रंथ असला पाहिजे. हा महाग्रंथ येणाऱ्या पिढीला दिशादर्शक ठरणार आहे.या ग्रंथाच्या मुख्य संपादक डॉक्टर पुष्पा तायडे, सहसंपादक डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ. सतीश पावडे, डॉ.चंद्रकांत सरदार, सतीश दामोदर , प्रकाश अंधारे आहेत. फुले दाम्पत्याने दांभिक रुढी परंपरेला छेद देऊन, अंधश्रद्धेची मूठमाती करून, सत्यशोधक समाजाची स्थापना करून, बाल हत्या, बालविवाह प्रतिबंधक कायदा करून, विधवांना स्वावलंबनाचे धडे गिरवायला शिकवून, विधवांचे केशवपन थांबवून, स्त्रियांच्या शिक्षणासाठी अहोरात्र मेहनत करून, शिक्षणाचे ध्येय साध्य करण्याकरिता संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. त्यांच्या कार्याला अभिवादन करण्याकरता या ग्रंथाची निर्मिती झाली. त्यामुळे क्रांतिरत्न हे जगातील अनमोल रत्न पैकी एक रत्न आहे असे म्हणावे लागेल. या महान ग्रंथनिर्मितीस अनेक मंत्री, खासदार, आमदार व अनेक विद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठाचे कुलगुरू इत्यादी जणांच्या शुभेच्छा  लाभल्या आहेत. महाराष्ट्रातील थोर प्राध्यापक, लेखक,कवी,पत्रकार, शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्कृष्ट लेख निवडून घेतले आहेत या ग्रंथांमध्ये सुरुवातीला महात्मा फुलेंचा संपूर्ण जीवनक्रम व सावित्रीआईचा संपूर्ण जीवनक्रम दिलेला आहे. त्यानंतर लेखकांची अनुक्रमणिका यादी देण्यात आली आहे.
          स्त्री शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा पाया रचला. सावित्री आईची खंबीर साथ होती म्हणून फुले दाम्पत्यांने समाजातल्या स्त्रिया शिकल्या पाहिजेत यासाठी अहोरात्र मेहनत करून अनेक समाजोपयोगी कामे केलीत. अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली.समाजातील अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण हेच ध्येय गाठले. समाजातल्या स्त्रिया शिक्षित करण्यासाठी अनेक अन्याय सहन केले पण आपल्या मार्गांवरून तसूभरही हलले नाहीत. विधवा पुनर्विवाह घडवून आणले, विधवा केशवपन,बाल प्रतिबंधक कायदा बनवला.  विधवा आत्महत्या थांबवून, शंभर विधवा गरोदर मातांची बाळंतपणे स्वतःच केलीत. इतकेच नाही तर प्लेगच्या साथीमध्ये अनेकांना जेवण मिळत नव्हते तेंव्हा स्वतः अन्नछत्र चालवले. अशा महान क्रांतीज्योतीस खरं तर भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार द्यायला हवा आहे पण ती एक शोकांतिकाच ठरली आहे. आज सावित्री ज्योतिबा मुळेच अनेक स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये उंच भरारी घेताना दिसत आहेत. क्रांतिरत्न या महान ग्रंथामुळे समाजाला व येणाऱ्या भावी पिढीला एकाच ठिकाणी फुले दाम्पत्यांच्या कार्याची ओळख एक संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडेल यात शंकाच नाही. या महान ग्रंथ निर्मिती साठी झटणार्‍या प्रत्येक व्यक्तीचे  मनापासून अभिनंदन... आज पर्यंत सावित्री- ज्योती यांच्या जीवनावर आधारित १००० पानांचा  महाग्रंथ कुठेही प्रकाशित झाला नाही. या ग्रंथाची द वर्ड ऑफ गिनीज बुक मध्ये नोंद होणार आहे. त्यासाठी सर्व टीमचे अथक प्रयत्न चालू आहेत. असा महान ग्रंथ प्रत्येक घरातल्या प्रत्येकाकडे असायलाच हवा. महाराष्ट्रात ११ एप्रिल २०२१  रोजी या ग्रंथाचे १३१ ठिकाणाहून एकाचवेळी प्रकाशन होणार आहे. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा....!!
            ग्रंथ हवा असल्यास मा. प्रकाश अंधारे सर यांच्याशी खालील नंबर वर संपर्क साधू शकता
मोबाईल नंबर- 8484906992
     क्रांतिरत्न म्हणजे सावित्रीआई आणि ज्योतिबा फुले यांच्या कार्याचा आलेख जगासमोर मांडणारा एकमेव महाग्रंथ होय.

      कलेक्टर ते तहसीलदार
      यांनी केले अथक प्रयत्न
      साऊज्योतिस अभिवादन करण्या
       निर्मिले महाग्रंथ क्रांतिरत्न....!!

समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Sunday, 19 September 2021

सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे मी संदर्भ पोखरतोय


*सामाजिक अस्तित्वाचा शोध घेणारा काव्यसंग्रह म्हणजे मी संदर्भ पोखरतोय*

       समकालीन वास्तवात सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक अंगाला भेटणार्‍या निरनिराळ्या अवस्थांच्या कविता काळजाला स्पर्श करतात तेव्हा मानवी मन अस्वस्थ होऊन जातो अशाच कवितांचा काव्यसंग्रह म्हणजे अमरावती जिल्ह्याचे प्रसिद्ध कवी पवन नालट यांचा मी संदर्भ व करतोय हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला या काव्यसंग्रहाचे प्रकाशन राजहंस प्रकाशन पुणे यांनी पहिली आवृत्ती 1 फेब्रुवारी 2019 रोजी प्रकाशित केली असून प्रस्तावना दगो काळे यांची लाभली आहे या काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर माणसाच्या मनाचा पक्षी अनेक जाणिवांचा अर्थ शोधणारा नावाला साजेसे संदर्भ पोखरणारा आहे या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ 280 रुपये असून त्यातल्या सर्वच कविता सामाजिक राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत.
           कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता माणसाला विचार करायला लावणारे आहे सामाजिक-राजकीय ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडणारे आहे ती शिक्षणव्यवस्थेतील भीषण विदारक ्पष्ट करणार्‍या आहेत राजकीय व्यवस्थेवर प्रकाश टाकणाऱ्या आहेत वास्तवाच्या जाणिवेतून अस्तित्वाचा अर्थ शोधणारे आहेत कवी पवन नालट यांच्या सर्वच कविता मुक्तछंदात असल्यातरी सुंदर व अर्थ शोधणाऱ्या आहेत माणसाला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारे आहे.

            मी संदर्भ पोखरतोय
            माझ्या मनाचा 
            असंख्य विचारांचा 
             संदिग्धतेचा
             मी निरभ्र होतोय 
             निर्विकार होतोय 
             तळ शोधतोय
             न जमणाऱ्या 
             तडजोडीचा....!!

        असंख्य विचारांचा, संदिग्धतेचा संदर्भ शोधणारा कवी पवन नालट संदर्भ शोधता शोधता निरभ्र होतोय.निर्विकार होतोय, तळ शोधत राहतोय न जमणाऱ्या तडजोडीचा त्यासाठी तो राबतोय,करपतोय, हरवतोय,जगतोय एखाद्या श्वापदाच्या सारखा. वरवर दिसणारी शांतता कवीला स्वस्थ बसू देत नाही कवीच्या आत मध्ये वादळ उठलेले आहे. त्याला कुठला संदर्भ लागत नाही त्याच्या डोक्यात अनेक प्रश्न आहेत. जाणिवांच्या विळख्यात कवी जाळं विनतोय.न  उमजणाऱ्या संदर्भाचे. संवेदनाहीन भावविश्वाची कारणमिमांसा वरील ओळींतून कवी करण्याचा प्रयत्न करतो.

              मी जगतोय स्वातंत्र्यात 
              बघतोय गुलामी 
              स्वातंत्र्याची 
              मला नाही हक्क 
              इथल्या व्यवस्थेविरूध्द बोलण्याचा 
              तरी मी अभिव्यक्तीच्या 
             अधिकाराची मालकी 
            खिशात घेऊन फिरत असतो 

         आज स्वातंत्र्य मिळून सुद्धा गुलामी भोगत आहेत काहीजण इथल्या व्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. इथल्या भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही आणि बोललं तर संध्याकाळपर्यंत बोलणारा जिवंत राहील याची गॅरंटी नाही तरीसुद्धा अभिव्यक्त होण्यासाठी गुलामीच्या बेड्या तोडण्यासाठी कवी अधिकारांची मालकी खिशात घेऊन फिरतो. लोकांचा प्रामाणिकपणा मोजत असतो. तिथल्या अर्थकारणाशी, समाजकारणाची, संस्कृतीशी शब्दरूपाने शस्त्र उठवत लेखणीच्या माध्यमातून कवितेच्या रूपाने व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवत असतो. कारण कवीने अजून आत्म्याचा लिलाव केला नाही एकमेकांचा चोंमडेपणा करणाऱ्या भ्रष्टाचार उराशी कवटाळून माणुसकीचा खोटा आव आणणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध कवी पवन नालट वरील ओळीतून प्रहार केल्याशिवाय रहात नाही.

              कवीला लावता येत नाही
              संवेदनाच नेलपॉलिश
              शिवता येत नाहीत 
              उसवलेल्या काळजाचे टाके
              कपाळावर लावता येत नाही 
              आंदोलनाचा काळा बुक्का 
               तो वैशाख नसतो 
                तो श्रावण नसतो
                तो नसतो भैरवीतली आर्तता 
                व्यवस्थेच्या पायातले साखळदंड 
                शब्दांतून शस्त्र 
                पेरणारा कवी 
                मातीतून महावस्त्र देत असतो
                मानवतेच्या आरस्पानी देहाला....

           कवी कसा असावा? याचे उत्तम उदाहरण म्हणजे कवी पवन नालट होय.कवीचं काळीज किती संवेदनशील असतं.कवी विद्रोही असतो.कवी संवेदनशील असतो. कवी अन्यायाविरुद्ध शब्दाच्या शस्त्राने प्रहार करणारा असतो. कवी वैशाख किंवा श्रावण नसतो. कवी व्यवस्थेच्या पायातील साखळदंड शब्दांचे शस्त्र करून पेरणारा,मातीतून महावस्त्र कवी मानवाला देत असतो. असा गहन अर्थ असणार्‍या, मानवाच्या थेट काळजाला भिडणार्‍या कविता कवी पवन नालट यांच्या आहेत.
        मी संदर्भ पोखरतोय या काव्यसंग्रहात एकूण ६० कविता माणसाच्या मेंदू वरची मरगळ झटकणा-या, माणसाला विचार करायला लावणार्‍या,व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारणाऱ्या, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणाऱ्या, भ्रष्ट, लाचारी,गरिबी, गुलामीची चिरफाड करणाऱ्या, शब्दाशब्दांतून विद्रोह करणार्‍या,स्पष्टवक्त्या आहेत. प्रत्येक कवीने आवर्जून वाचावा असाच काव्यसंग्रह मी संदर्भ पोखरतोय हा आहे. शब्द न शब्द थेट काळजाला भिडणारा आहे.
       कवी पवन नालट यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!
       पुस्तक मागवण्यासाठी कवीचा मो.नं ९९६०३९०७५३

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम

Saturday, 28 August 2021

बालकांच्या सकस बुध्दीचा आहार म्हणजे-'नभाची कोडी'(विज्ञानाधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)

 *बालकांच्या बुद्धीचा सकस आहार म्हणजे- नभाची कोडी(विज्ञानधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)*


     मुलांना कोडी खूप आवडतात. बालपणी मुलांची बुद्धी फार तल्लख व फार चिकित्सक असते. आपल्या आजूबाजूला शेजारीपाजारी एखादे लहान मूल असते. त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की लहान मुलं खूप प्रश्न विचारतात व घरातील आई-बाबांना भंडावून सोडतात. का? असेच का? तसेच का? असे का नाही? तसे का नाही? कुठे गेला ? केंव्हा येणार? अशा प्रश्नांची मालिका सुरूच असते. काही लहान लहान मुलं तर आकाशातला चंद्रच मागतात. मग आई त्याची समजूत काढते. तो चांदोमामा आहे.आपल्यापासून खूप दूर असतो तेवढ्या लहानपणापासून चंद्र, चांदण्या,आभाळ, ढग, पाऊस, दिवस-रात्र यांच्याविषयी उत्सुकता वाढायला लागते. त्यात मुलांना खेळ, गाणी,गोष्टी,कोडी तर फारच आवडतात.अशाच विज्ञानाधारित कोड्यांची मेजवानी म्हणजे- नभाची कोडी. 

             बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील लेखक, कवी,प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचा नुकताच प्रकाशित झालेला कोड्यांचा बाल काव्यसंग्रह नभाची कोडी हा बाल काव्यसंग्रह वाचनात आला.या पुस्तकाचे मुखपृष्ठ बाल मनाला आकर्षित करणारे असून विद्यार्थ्यांची वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारे देखणे मुखपृष्ठ आहे. प्रत्येक पानावर बालकांच्या चित्रासह आश्चर्य दाखवणारे, उत्साहवर्धक,मनोवेधक चित्रे रेखाटली आहेत. या पुस्तकाचे  प्रकाशन श्री राजू बर्वे पुणे यांनी दिलिपराज प्रकाशन द्वारा केले आहे.याची प्रथमावृत्ती ५ऑगस्ट २०२१ ला प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाला प्रस्तावना प्राध्यापक, डॉ.राणे अंबरनाथ यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक डॉ.किसन पाटील जळगाव यांनी केली आहे. या पुस्तकाची किंमत 120 रुपये असली तरी यातल्या कोडे कविता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या  बुद्धीचा कस वाढवणाऱ्या आहेत.

          'नभाची कोडी'  या पुस्तकातील सर्वच कविता कवितेचा हात धरून विज्ञानाकडे नेणाऱ्या आहेत. ज्ञानदायी आहेत. सर्व कविता या भूगोल व खगोल शास्त्राची ओळख करून देणार्‍या आहेत. प्रत्येक कवितेत तालबद्ध, रंजकता उत्सुकता व उत्साह भरभरून भरलेला आहे. मुलांना कल्पनाशक्तीच्या जगात घेऊन जाणार्‍या रहस्यमय कविता मुलांना खूप आवडतात. या पुस्तकातील भाषा कवी देवबा पाटील यांनी आकलनसुलभ, सहजरित्या, साधी, सरळ, सोपी भाषा वापरली असल्यामुळे अतिशय मनोरंजक व उत्साह वाढवणार्‍या या सर्वच कविता आहेत. यातल्या बर्‍याच कविता मोठ्यांच्या ज्ञानात भर घालणा-या आहेत.


         खांब नाही 

         सरी नाही 

          दांडे नाही 

          टेके नाही 

   

           खाली मुळीच 

            पडत नाही 

            वर जाता 

            वरच जाई


              आदी नाही 

              अंत नाही 

              ग्रहताऱ्यांनी

              व्यापून राही


                निळा निळा 

                 त्याचा रंग 

                ओळखा तयास

                 होऊन दंग....!!


          बालमनाचा उत्साह व उत्सुकता वाढवणारी कोडी मुलांना शेवटपर्यंत कोड्यात टाकणारे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन बुद्धीचा कस वाढवणारी आहेत.विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून कुतूहल वाढवणाऱ्या बालकविता प्राध्यापक देवपा पाटील यांनी रचल्या आहेत. प्राध्यापक  देवबा पाटील हे प्राध्यापक असले तरी लहान मुलांना समजतील अशा बालकथा व बाल कवितांचे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. प्राध्यापक देवबा पाटील हे खरे तर विज्ञानाचे शिक्षक परंतु लहान मुलांच्या प्रति त्यांचा असलेला लळा वाचकास दिसून येतो. प्राध्यापक देवबा पाटील यांची 'धाडसी राम'  ही कादंबरी खूप वाचनीय व प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे 'नभाची कोडी' हा विज्ञानाधारित कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या अत्यंत उपयोगी आहे. 'नभाची कोडी' या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, चंद्र, पृथ्वी, आभाळ,संधिप्रकाश, वारा, पाऊस, गारा, इंद्रधनुष्य, ढगफुटी,उल्का, धूमकेतू, चांदण्या, सौर ऊर्जा, कृत्रिम उपग्रह, इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रत्येक कविता अतिशय मनोरंजक असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करणारी आहे. या नभाची कोडी या काव्यसंग्रहामध्ये एकूण 23 कोडे कवितेच्या रुपात प्राध्यापक देवबा पाटील यांनी रचली आहेत.शेवटी प्रत्येक कोडे कवितेची उत्तरे शेवटच्या पानावर दिली आहेत.

         प्राध्यापक देवबा पाटील यांची आज पर्यंत एकूण 53 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या विविध पुस्तकांना अनेक पुरस्कार आज पर्यंत मिळाले असून त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असतात.नभाची कोडी हा कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर घालणारा असल्याने प्रत्येक घरात, प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच आहे.


    प्राध्यापक देवबा पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....


समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री

कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

पीन ४४४५०५

मो.९७६७६६३२५७


Tuesday, 3 August 2021

*हळव्या भावनांना शब्द फुलाने फुलवणारा चारोळी संग्रह म्हणजे फुलोरा होय.*

*हळव्या भावनांना शब्द फुलाने फुलवणारा चारोळी संग्रह म्हणजे फुलोरा*

     वाशिम जिल्ह्याचे कवी सतीश खरात यांचा दर्जेदार चारोळी संग्रह नुकताच वाचनात आला. हळव्या मनातील भाव बंधांची शब्द गुंफण करून फुलोरा फुलविणारे कवी सतीश खरात यांचा हा पहिला चारोळी संग्रह होय. चारोळी संग्रह म्हणजे चार ओळीची आशयघन व यमक साधून केलेली रचना. या चारोळी संग्रहाचे मुखपृष्ठ जालिंदर पावसे यांनी उत्तम प्रकारे नावाला साजेसे असे रेखाटले असून प्रकाशक मेहता पब्लिकेशन हाऊस अमरावती यांनी प्रकाशित केली आहे. या चारोळी संग्रहाची प्रथमावृत्ती १५ जून २०२१ रोजी प्रकाशित झाली. या चारोळी संग्रहाला प्रस्तावना सौ निशा संजय डांगे यांची लाभली असून मूल्य केवळ ५० रूपये आहे. पण यातील सर्वच चारोळ्या पुन्हा पुन्हा मनात रुंजी घालणाऱ्या व वाचकांच्या पसंतीस पडणाऱ्या आहे.

             प्रिय आईस
        जिच्या परिसस्पर्शान
        माझं जीवन सोनं झालं 
        तिच्या अथांग प्रेरणेनं 
        शब्द रचण्याचं बळ आलं....!!

      कवी सतीश खरात यांनी पहिल्यावहिला चारोळी संग्रह आपल्या माता पित्यांना अर्पण केला आहे.पहिली चारोळी आईच्या चरणी समर्पित केली आहे.प्रत्येक मानवाच्या आयुष्याला आकार देणारी प्रथम गुरु म्हणजे आई असते. "स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी" या उक्तीप्रमाणे जीवनात आई वडीलाचे स्थान श्रेष्ठ दर्जाचे आहे. कवी सतीश खरात वरील चारोळी तून म्हणतात की आईच्या स्पर्शाने माझ्या जीवनाच सोनं झालं आहे. तिच्या अथांग  प्रेरणेने, आईच्या मायेनं, आईच्या वात्सल्यानं मला शब्दरचनाचं बळ माझ्या अंगी आले आहे. जगात आईची माया बाळासारखी विशाल आणि सागरासारखी अथांग असते याची प्रचिती कवी सतीश खरात आवर्जून शब्द फुलोरा यातून व्यक्त करतात.
      
        काळजात सामावलं 
         तुझं हसणं लाजणं 
         तुझा नाजुक स्पर्श 
         तुझा पवित्र स्पंदन....!!

        प्रेम किती पवित्र असतं? जगात प्रेमाला उपमा नाही पण खऱ्या प्रेमाला खरोखरच तोड नाही. निस्वार्थी प्रेम सर्वांना आवडतं.प्रेम पाहिलं तर अडीच अक्षरे फक्त. पण त्याच्यावाचून मनुष्य जगू शकत नाही. माणसाने कोणावर कधी प्रेम केलं नाही असं होऊ शकत नाही. कारण प्रेम हा स्थायीभाव आहे मानवी अंतर्मनाचा. प्रेमाशिवाय माणसाचे आयुष्य फुलतच नाही. कवी प्रेमात त्याच्या प्रेयसीला म्हणतो तुझं हसणं लाजणार काळजात सामावलं आहे तुझा नाजूक स्पर्श तुझं पवित्र बंधन माझ्या काळजात कोरलेल्या मूर्ती सारखं आहे मनातले भाव कवितेच्या माध्यमातून आहेत.

           चंदना सारख्या रूपाचा
           चंद्रासारखा मुखडा आहे 
            गालावरचा तीळ मात्र 
            माझ्या काळजाचा तुकडा आहे...!!

    "जो देखे कवी तो न देखे रवि" या उक्तीप्रमाणे कवी खूप काही मोठे स्वप्न पाहू शकतो. कवी शब्दांच्या माध्यमातून कुठेही धाऊ शकतो. जिथे रवी म्हणजे पाहू शकत नाही ते कवी पाहू शकतो.त्याच्या कल्पनाशक्तीच्या जोरावर ....कुठेही असू शकतो कवी सतीश खरात यांनी प्रेयसीचे कौतुक भारीच केला आहे चंदना सारख्या रुपाची प्रेयसीच्या चंद्रा सारखा मुखडा हे प्रेयसीचा चेहरा चंद्राचा मुखडा आहे आणि तिच्या गालावरचा तीळ मात्र माझ्या काळजाचा तुकडा आहे असे काळजाला भिडणारे शब्द कवी सतीश खरात यांनी आजच्या एकतर्फी प्रेमाने भरकटलेल्या तरुण पिढीला प्रेम म्हणजे काय असतं? हे शिकवणारे अनमोल रत्न म्हणजे फुलोरा हा चारोळी संग्रह होईल

      आपणच आपल्यासाठी 
      असं झाडांनी वागलं पाहिजे 
       दुसऱ्याच्या आधाराने जगणं 
       आता वेली नही सोडलं पाहिजे....!!

      वरील चारोळीमध्ये खूप आशयघन अर्थ लपला आहे. झाडांची परोपकारीता दिसून येते.झाड इतरांना फक्त देतच राहतात फळ,फूल, सावली, डिंक ,औषध ,लाकूड इत्यादी देतच असतात झाडांना फक्त द्यायचं माहीत असतं ,पण माणूस खूप स्वार्थी आहे मनुष्य सर्व घेतच असतो झाडे जंगले तोडून तिथे तिथे सिमेंट काँक्रेटच्या बिल्डिंग तयार करत असतो अनेक झाडांची कत्तल करतो माणूस स्वार्था साठी काहीही करायला तयार असतो असं झाडांनाही माणसासारखं आपणच आपल्यासाठी जगलं पाहिजे त्याचबरोबर वेली झाडाच्या आधाराने जगते . तसं माणसांनाही दुसऱ्याच्या आधारावर जगणं सोडून दिले पाहिजे असा मौलिक, वैचारिक संदेश वरील चारोळी मधून कवी सतीश खरात यांनी देण्याचा प्रयत्न केला आहे

     चार भिंतीच्या देऊळ तरी 
      माणूस म्हणून जपून धरतं 
     दोन दिवसांच आयुष्य मात्र 
     जाती धर्माचा उदय करतो...!!

     परमेश्वराला सर्व लेकरं सारखीच कोणत्याही देवळात देव माणूस कोणत्या धर्माचा आहे हे पाहत नाही. ईश्वराला सर्वजण सारखेच. मंदिराच्या ठिकाणी भेदभाव देवाने कधीच निर्माण केला नाही भेदभाव निर्माण करणारा माणूसच फक्त दोन दिवसाच्या आयुष्यात मनुष्य किती भेदभाव करतो ,? उचनिच,जात, धर्म,चालीरीती इत्यादी घाण फक्त माणसाच्या डोक्यातच असते.वरील चारोळी मधून जातीविरुद्ध विद्रोह कमी खरात यांनी केला आहे
     कधीकधी अख्खं पुस्तक वाचून जे समजत नाही तेवढे फक्त चार ओळींतून समजतं इतकी ताकद शब्दांची आहे शब्दात खूप मोठे सामर्थ्य आहे एका शब्दाने एखाद्याच्या आयुष्याला कलाटणी मिळू शकते अशा दर्जेदार स्वरूपाच्या चारोळ्या सतीश खरात लिखित फुलोरा या चार ओळी संग्रहातून वाचायला मिळतील. एखाद्या सुगंधी झाडाचे फुल जसे सर्वांना आकर्षित करते तसंच फुलोरा चारोळी संग्रह हातात वाचायला घेतल्यावर शेवट कधी होतोते कळतच नाही बरेच जण चारोळी म्हणलं की फक्त प्रेमावरच करतात. कवी खरात यांचा तसं नाही, कवी  सतीश खरात यांच्या चारोळ्या आम्हाला मनाला भिडणार्‍या,आई-वडिलांना समर्पित असणाऱ्या,विद्रोह करणार्‍या ,निसर्गावर प्रेम करायला लावणाऱ्या झाडांची उदारता शिकवण्याचा हक्क आणि कर्तव्य सांगणाऱ्या आयुष्याचं सत्य मांडणाऱ्या माणुसकीवर प्रकाश टाकणाऱ्या सहज सरळ सोप्या भाषेत असल्याने वाचक त्यांच्या अंतर्मनाला खिळवून ठेवत, प्रेमभाव निर्माण करणाऱ्या आहेत सर्व वाचकांनी आवर्जून वाचावा असाच चारोळी संग्रह म्हणजे फुलोरा होय...!!

    कवी सतीश खरात वाशिम यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Wednesday, 28 July 2021

सुखदुःखाच्या वाटा म्हणजे बाभळीचा काटा

 *सुखदुःखाच्या वाटा म्हणजे - बाभळीचा काटा*

       प्रत्येक मनुष्य सुखासाठी झटत असतो आणि सुख शोधत असतो.सुखाच्या एका क्षणाची आतुरतेने वाट पाहात असतो. खरंतर सुखाचा मार्ग खूप खडतर असतो त्यातून ही स्वतःच्या जिद्दीने, प्रयत्नाने, दुःखाचे काटे तुडवित, अपयशाचे अडथळे खात शेवटी सुखा पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. तो माणूस पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी, गझलकार,गायक, शिक्षक असणारे विजय वडवेराव यांचा काव्यसंग्रह "बाभळीचा काटा" नुकताच वाचनात आला. अतिशय देखणे मुखपृष्ठ माय चुलीवर भाकरी थापत आहे. समोर लहान मुल अंगात फक्त चड्डी घालून माय समोर बसले आहे. त्याची गरीबी जणूकांही मुलाच्या अंगाला बाभळीच्या काट्यांप्रमाणे टोचत आहे. असे सुंदर मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून परीस पब्लिकेशन यांनी याची प्रथमावृत्ती १० ऑक्टोबर २०१९ रोजी प्रकाशित केली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ १५० रुपये आहे. पण यातल्या सर्वच कविता जीवनाशी समरस होत काळजाला भिडणा-या,अडथळे ओलांडून यशाकडे नेणा-या आहेत. या काव्यसंग्रहाची पाठराखण लोककवी प्रशांत मोरे यांनी केली आहे.
          स्वतःच्या जीवनावर अत्यंत प्रेम करणारा, गरिबीचे चटके अतिशय जवळून सोसणारा, सुखदुःखाच्या वाटा तुटवित यशाचा मार्ग शोधणारा,झोपडपट्टीत राहून सुद्धा आकी व आबा चे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आतून तळमळून अभ्यास करून शिक्षकी पेशात पदार्पण करणारा, हाडाचा पण संवेदनशील मन असणारा कवी विजय वडवेराव यांचा हा दुसरा कवितासंग्रह आहे. यापूर्वी त्यांचा "वेशीवरचा दगड" हा काव्यसंग्रह महाराष्ट्रात बऱ्यापैकी नावारूपाला आला आहे. "बाभळीचा काटा" हा कविता संग्रह म्हणजे वेदनादायी अनुभूतीचे भकास माळरान त्यातच एक नाजूक  रंगीबेरंगी फुलबाग सुद्धा आहे.
    
              तू गं गुलाबाच फूल 
              मी गं बाभळीचा काटा 
               माझं जगणं फाटकं
               तुझ्या मखमली वाटा...

                तुझं पिढ्या न पिढ्याचं
                बागायती गं शिवार
                माझ्या गावकुसापोटी
                सदा भुकेचं निखारं

             वरील ओळीतून कवी प्रियेसीला आपल्या परिस्थितीची जाणीव करून देत आहे. गुलाबाचं फुल सर्वांनाच आवडतं पण त्याचे काटे कोणालाच आवडत नाहीत त्यामुळे कवी आपल्या काव्यातून प्रियेसीला म्हणतो तू गुलाबाचे फुल आहेस तर मी बाभळीचा काटा आहे. माझं जगणं फाटकं आहे. माझी परिस्थिती नाजूक आहे. तुझ्या जीवनाची मखमली वाट आहे. तू पिढ्यानपिढ्या गर्भश्रीमंत आहेस. तुझ्या शेतात बागायती शिवार आहे. तर माझं घर गावकुसाबाहेर आहे.त्यात भुकेचे निखारे आहेत. आणि तेच माझं वास्तव आहे. मनापासून प्रेम करणार्‍या वेड्या मनाच्या कवीला गरीब श्रीमंतीची दरी दिसते. आणि हळव्या मनाचा कवी आपल्या शब्दात मांडताना दिसतो आहे.

                कानी तव्याच्या गाताना 
                माय भाकरीच गाणं 
                 साऱ्या घराच्या भुकेचं 
                 झुले चुलीला तोरण

                 जीव लावाया पिठाला 
                 तिनं सारता काकण 
                  उभ्या आभाळात घुमे
                  तीच भाकरी थापणं....!!

           ग्रामीण भागातली माय चुलीवर जेव्हा भाकरी थापते तेंव्हा तिच्या हातातील काकणाचा आवाज भाकरीच गाणं गातो.साऱ्या घराच्या भुकेचं तिच्या चुलीला तोरण जणू लावला आहे.भाकरी करताना माय पीठ मळताना तिने पिठाला किती जीव लावलेला आहे. तिच्या हातातल्या काकणाला मागे सारत आवाज आणि तीच भाकरी थापणं आभाळात घुमत आहे. एका एका भाकरीसाठी माय किती हाताला चटके  जणू तिच्या हातावर गोंदन केल्याप्रमाणे तरीही अख्ख्या जगाची भूक भागविण्यासाठी माय भाकरी थापत राहते अशी माईचं व भाकरीचं गाणं व ऋण व्यक्त करणारी कविता वाचकाच्या अंतर्मनाला भिडल्याशिवाय राहत नाही. संवेदनशील मनाचा कवी विजय वडवेराव यांची प्रत्येक कविता सुखदुःखाची सरमिसळ आहे. त्यात आनंद, दुःख, वेदना विरह,त्याग इत्यादी स्पष्ट दिसतो.

         बाप माझा हाय विठू 
          माई रखुमाई खरी 
          पांडुरंगा सांग मग 
          मी का पहावी पंढरी? 

           कसा राबतोय माझा 
           बघ बाप हा शिवारी 
           टपटप घाम वाजे 
           जसा मृदूंग गाभारी....!!

           आई वडिलांवर अतोनात प्रेम करणारा कवी विजय वडवेराव स्वतः च्या बापाला विठ्ठलाच्या रूपात पाहतो. माझा बाप विठू आहे. आणि माझी आईच रखुमाई आहे. माझ्या घरीच विठ्ठल रुख्माई असताना मी पंढरीला का जावं? असा खडा सवालही त्यांनी वरील ओळीतून व्यक्त केला आहे. देवाला प्रत्येकाच्या घरी जाता येत नाही म्हणून देवाने घरातच देवासमान आई-वडील प्रत्येकाला दिले आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवून देवाची खोटी भक्ती करणाऱ्या ढोंगीच्या डोळ्यांत झणझणीत अंजन कवी विजयरावांनी कवितेच्या माध्यमातून घातले आहे. माझा बाप शेतात कसा राबराब राबतो. कष्ट करतोय. माझ्या बापाच्या घामाचा टपटप आवाज विठ्ठलाच्या गाभाऱ्यात मृदंग वाजल्याप्रमाणे वाजतो आहे. साऱ्या जगाचा देव जरी पंढरपूरचा पंढरी असेल पण माझा देव माझ्या घरी आहे. माझा बाप स्वतः उपाशी राहून जगाला भाकरी देतो. अशा शब्दांत आपल्या अंतर्मनातील भावना कवीने व्यक्त केल्या आहेत.

          वेदनेच्या चिखलात 
          मूळ धरते कविता 
          ज्याचं काळीज जिवंत 
          त्याला कळते कविता....!!

         वरील ओळीतून कविता म्हणजे काय असते? कविता म्हणजे फक्त अक्षरे किंवा शब्दच नाहीत तर जेंव्हा मनुष्याला खूप दुःख होते, वेदना होते, तेव्हा कवितेचा आपोआप जन्म होतो. त्याच्या हृदयात कविता जन्माला येते. आणि त्याचं काळीज जिवंत आहे. त्यालाच ती कविता कळते. संवेदनशील मनाचा व्यक्तीलाच कवीच्या भावना सहज कळतात. जेंव्हा आपले नातेवाईक, सगेसोयरे सर्वांनी साथ सोडतात तेंव्हा कवीच्या सोबत कविता सुद्धा वनवास भोगले सारखी जगते. जर एखादा कवी एकटा पडला असेल तर त्या कवीला जीव कविता लावते. आणि त्याच्या अंगाखांद्यावर छान कविता खेळते. असे इतकं कवितेचे अनन्यसाधारण महत्त्व कवीच्या जीवनात आहे.
         निसर्ग सौंदर्य, सौंदर्यदृष्टी, साद घालणारा हळवं मन, सखी, प्रियेसी, आई-वडील, सुख-दुःख, गंधाळली रात, कवीनं भोगलेला वनवास, पाऊस, पौर्णिमेचा चंद्र, चांदण्या, बापाचा विरह, शेतकऱ्यांचे दुःख, कष्ट, बळीराजाचचे दुःख हे सार कवी विजय वडवेराव यांनी आपल्या काव्यातून मुक्तपणे तर काही गेय प्रकारात हळुवारपणे व्यक्त केले आहे. त्यामुळे विजय रावांची प्रत्येक कविता काळजाचा ठाव घेत पुढे जाते. गरिबीचे चटके भोगणारा कवी विजय वडवेराव यांनी अपार मेहनत, जिद्द, कष्ट, शिकण्याची हौस, गरिबी, दुःख हे सारे सोबतीचे प्रवासी घेऊन शिक्षक, गायक, कवी, लेखक ते गझलकार पर्यंतचा सारा प्रवास सुखदुःखाच्या वाटा तुडवित उदयाला आला आहे. "बाभळीचा काटा" प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच हा कवितासंग्रह आहे. कवी विजय वडवेराव यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा...!!

समीक्षिका /लेखिका/शिक्षिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
ता.जि. वाशिम
मो.9767663257

Wednesday, 14 July 2021

बोलक्या जगातील सामाजिक जाणिवा मांडणारा काव्यसंग्रह म्हणजे शब्दफुलांची शिदोरी

*बोलक्या जगातील सामाजिक वेदना मांडणारा काव्यसंग्रह म्हणजे-शब्दफुलांची शिदोरी* माणसांच्या जगात माणूस शोधणारा कवी संतोषकुमार उईके, चंद्रपूर जिल्ह्यातील वैनगंगेच्या तीरावर वसलेल्या निलसनी पेडगावचे रहिवाशी असून गरिबीने पीचलेल्या कुटुंबात जन्माला आल्यामुळे लहानपणापासूनच आई-वडिलांचे काबाडकष्ट बालवयात बघणारे, शेतमजुरी, मोलमजुरी करणे, विटा बनविणे, तेंदूपत्ता तोडणे ही सगळी कष्टाची कामे करत शिक्षणाची जिद्द अंगी धरून यशाच्या मार्गाने जाताना गरिबीचे चटके सहन करत खूप सार्‍या वेदना समस्या हाल-अपेष्टा पिळवणूक दडपशाही अशा संकटाचा सामना करत शिक्षकी पेशात पदार्पण करून बोलक्या जगातील सामाजिक वेदना मांडणारा काव्यसंग्रह शब्द "फुलांची शिदोरी" सामाजिक जाणिवा वर प्रकाश टाकणारा काव्यसंग्रह जन्मास घातला आहे. "शब्दफुलांची शिदोरी" या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ नावाला साजेसे असून प्रकाशक राजेश बहाळे शब्दजा प्रकाशन, अमरावती यांनी प्रकाशित केले असून याची प्रथम आवृत्ती एप्रिल 2019 ला प्रकाशित झाली आहे. या काव्यसंग्रहाला प्रस्तावना प्रसिद्ध साहित्यिक बाबाराव मडावी सर यांनी दिली असून पाठराखण ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांची लाभली आहे. यातल्या सर्वच कविता दर्जेदार असून लाखमोलाच्या आहेत. सामाजिक वास्तव मांडणा-या आहेत. अनेक कविता या वृत्तपत्रे,साप्ताहिके, मासिके इत्यादी मधून प्रकाशित झालेल्या व जनसामान्यांच्या दाद मिळालेल्या आहेत. कवी संतोषकुमार उईके यांच्या कविता झाडीबोली साहित्य झाडीपट्टीतील माणसांची जगणं मराठीचा पदर संगतीला घेऊन ताठ मानेने विद्रोह करीत जगासमोर यायला घाबरत नाहीत. आदिवासी कविता क्रांती घेऊन फुलणारी, वास्तव जगासमोर सांगणारी, जंगलातल्या व्यथा मांडणा-या सामाजिक आणि मानवतेचे गुणगाण गाणारी आहे. कवी संतोषकुमार उईके हे हाडाचे शिक्षक तर आहेतच पण त्याचबरोबर समाजाच्या अनेक अंगाचा विचार करत "शब्दफुलांची शिदोरी" हा काव्यसंग्रह जन्मास घालणारे, सामाजिक समस्येची जाणीव असणारे, शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारे, निसर्गाच्या प्रेमात पडणारे, माणसांचा रंगढंग ओळखणारे, माणसांच्या जगात माणूस शोधणारे, फुले, शाहू, आंबेडकरांचे विचार पोसणारे, शब्दांचे शस्त्र घेऊन विद्रोह करणारे,अन्यायाचा प्रतिकार करणारे, सामाजिक भान असणारे, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे कवी संतोष कुमार उईके आहेत. समाज उध्दारा | काव्याचीच साथ | सज्ज राहो हात | लढण्यास || वरील अभंगाच्या ओळीतून कवी संतोषकुमार उईके म्हणतात की शब्दांच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करू शकतो. संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज इत्यादी थोर संतांनी आपल्या शब्दांच्या जोरावर समाजाचा उद्धार केला आहे. भरकटत चाललेल्या लोकांना अंधश्रद्धेपासून दूर राहण्यासाठी शब्दांचे शस्त्र वापरून वार केला आहे. त्याप्रमाणेच कवी संतोषकुमार सुद्धा काव्याच्या माध्यमातून समाजाचा उद्धार करण्यास निघाले आहेत. त्यासाठी कवीचे हात लढण्यासाठी सदैव सज्ज आहेत. त्यासाठी शब्दांची शिदोरी त्यांच्यासोबत आहे. बोटांमधील अंगठ्यांनी काळ बदलवता येते का? खरंच ते घातल्याने संकट आपले टळते का ? हातावरच्या रेषा का भविष्य घडवले असते तर गरिबांचे हात कोरडेच राहिले असते....!! वरील ओळीतून संतोषकुमार उईके यांनी अंधश्रद्धेवर कडाडून टीका केली आहे. आजच्या विज्ञानवादी युगामध्ये बरेच लोक बोटात वेगवेगळ्या ग्रहांच्या अंगठ्या, पायात हातात काळा दोरा बांधलेले दिसतात.खरंच अशा अंगठ्या, गंडेदोरे घातल्याने काळ बदलतो का ? खरंच असे गंडेदोरे बांधल्याने अंगठ्या घातल्याने माणसावरचे संकट टळते का? हातावरच्या रेषांनी जर माणसांचे भविष्य घडवले असते तर गोरगरिबांच्या हातावरच्या रेषा कोरड्याच राहिल्या असत्या का ? गोरगरिबांना कशाला इतके कष्ट आणि श्रम करावे लागले असते असा खडा सवाल हातावरच्या रेषा दाखवून भविष्य पाहणाऱ्या भोंदू बाबांच्या नादी लागून अंगठ्या घालणाऱ्या लोकांना कवी संतोष कुमार उईके यांनी केला आहे. जगी नाही जादू | नाही भूतबाधा तरी लोक गधा | बनतात || भूतपिशाच्च हे | मानवाचे खूळ मेंदूवर धूळ | बसलेली || या जगात जादू नाही. भोंदूबाबांनी आपले स्वतःचे पोट भरण्यासाठी खोटा चमत्कार करून जगाला भुलवतात भूतबाधा जादूटोणा करणे वगैरे काही नसतं तरी लोकं गाढवासारखे का वागतात ? हे भूत पिशाच्चे भोंदूबाबाने माणसाच्या डोक्यात घातलेलं खूळ आहे. कारण माणसाच्या मेंदूवर धूळ बसलेली आहे. माणूस खोट्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायला लागला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कवी संतोषकुमार उईके यांच्या विचारावर नरेंद्र दाभोळकर,पानसरे,कलबुर्गी यांच्या विचारांचा प्रभाव वरील अभंगाच्या ओळी ओळीतून दिसून येतो. कवडीमोलाने धान्य,व्यापाराला विकले मी कर्ज फेडता फेडता, पूर्ण आहे थकलो मी....!! तरी कर्ज काही केल्या, नाव संपाचे घेईना पाटलाच्या कर्जातून, काही सुटका होई.....!! शेतकरी जगाचा पोशिंदा आहे. शेतात राब राब राबून, सावकाराचे कर्ज काढून शेतात बियाणे पेरतो. त्यात वेळेवर पाऊस येत नाही. कसेबसे आलेच धान्य तर व्यापारी कवडी मोलाने विकत घेतो. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी बनतो. कर्जावर कर्ज काढतो आणि फेडता फेडता थकून जातो. कर्ज संपता संपत नाही. पाटलाच्या कर्जातून सुटका होत नाही. त्यामुळे एक दिवस शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतो आणि स्वतःची जीवन यात्रा संपवितो. संवेदनशील मनाचे कवी संतोषकुमार उईके यांनी वरील ओळीतून शेतकऱ्याचं जगणं-मरणं व्यक्त केले आहे. संवेदनशील मनाचा कवी संतोष कुमार उईके यांनी समाजातील वास्तव आपल्या कवितेतून मांडले आहे. आज हुंडाबळी कायदा होऊनही आजही हुंड्यासाठी मुलींना त्रास दिला जातो. कितीतरी मुली जाचाला कंटाळून आत्महत्या करतात. हे कुठेतरी थांबले पाहिजे. प्रत्येक मुलीच्या बापाने मी हुंडा देणार नाही. हुंडा घेणार नाही अशी भूमिका ठामपणे बजावली पाहिजे. विवाहितेचा छळ या काव्यातून हुंडाविरोधी शब्दरूपी तक्रार कविने केली आहे. प्रत्येक पालक जागृत व्हावा यासाठी संवेदनशील व योग्य विषयाला कवींनी हात घातला आहे. कवी संतोषकुमार उईके यांच्या सर्वच कविता या वास्तववादी व निरपेक्ष आहेत. विज्ञानवादी दृष्टिकोन मांडणाऱ्या आहेत. अंधश्रद्धेला मूठमाती देणा-या आहेत. सामाजिक समस्यांची पोल खोलणा-या आहेत. भ्रष्टाचार विरोधात लढणा-या आहेत. अनाथाबद्दल कळवळा असणाऱ्या बळीराजाची व्यथा मांडणाऱ्या आहेत. गरिबीची जाण सांगणाऱ्या, स्त्री-पुरुष समानता दर्शविणाऱ्या आणि स्वच्छतेची कास धरणाऱ्या, संताचा महिमा सांगणाऱ्या व माय मराठीची गोडी असणाऱ्या, झाडीपट्टीला न्याय देणाऱ्या व आदिमानवाला आत्मभान जागे करायला लावणाऱ्या, पोलिसांचे कर्तव्य सांगून, बहिणीवर अपार माया करणाऱ्या, बहिणीची महती सांगणाऱ्या, माय-मातीची ओढ लावणा-या या सर्वच कविता थेट काळजाला भिडणा-या आहेत. सर्वांनी आपल्या संग्रही ठेवावा असाच हा "शब्दफुलांची शिदोरी" हा काव्यसंग्रह आहे. या काव्यसंग्रहात एकूण 83 कविता माणसातला माणूस शोधायला लावणा-या आहेत. कवी संतोषकुमार उईके यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे जि.प. प्राथ.शाळा कोकलगाव ता. जि. वाशिम मो.9767663257

Friday, 11 June 2021

ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा ललितलेख संग्रह म्हणजे गाई गेल्या राना..

 *ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा ललितलेख संग्रह म्हणजे -गाई गेल्या राना*

   अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील लेखक रवींद्र जवादे सर यांचा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. ग्रामीण संस्कृतीची ओळख करून देणारा हा ललित लेखसंग्रह आहे.या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर गाई रानात जातानाचे मालकासहचे दृश्य दिसत आहे.असे देखणे सुंदर मुखपृष्ठ सुप्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले असून प्रकाशन शब्ददिप प्रकाशन मुर्तीजापुर अकोला यांनी दिनांक १ फेब्रुवारी २०१९ रोजी याची प्रथमाआवृत्ती प्रकाशित केली आहे. या पुस्तकात एकूण 20 ललित लेख ग्रामीण संस्कृतीची ओढ लावणारे आहेत. प्रस्तावना वाशिम चे ख्यातनाम कादंबरीकार जेष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांची लाभली असून पाठराखण अशोक कोतवाल यांनी केली आहे. या पुस्तकाचे मुल्य केवळ २२० रुपये असले तरी सर्व ललित लेखन गावच्या मातीची ओढ लावणारी आहेत.
         प्रसिद्ध लेखक श्री रवींद्र जवादे यांचे यापूर्वी 'ऋतुगंध' व *दिवेलागण ह्या*  दोन ललित लेखसंग्रह प्रकाशित झालेले असून दिवेलागण या ललितलेख संग्रहाला महाराष्ट्रातून आत्तापर्यंत अकरा पुरस्कार लाभले आहेत. दिवसभराचे एक जगणं एक स्थीर वर्तुळ यात आलेला आहे जगणं कुणाचेही असो गाईचं ,बाईचं ,माणसाचा त्याला सुख दुःखाचे अनेक व्यामिश्र पदर असतात.त्यातील ललित लेख महाराष्ट्रातील प्रसिद्ध दिवाळीअंक मासिक पक्षी तसेच अनेक वर्तमान पत्राच्या पुरवण्या मधून प्रकाशित झालेले आहेत.
                  पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये एक तरी गाय असायची.अनेकांच्या घरी गोकुळ नांदत असावं जणू ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरी गोठ्यातल्या गाईच्या गळ्यातल्या घंटीचा आवाज आज सकाळच्या समयी संपूर्ण घरभर, गोठा गावभर,ऐकू यायचा, धारा काढताना चा आवाज घरातील थोरामोठ्यांची चाललेली कामाची लगबग, गायीला ढुसण्या देणारे वासरू , दूध पिताना चे दृश्य आणि गाय घरमालकाच्या हाताला जिवेन चाटणारा उमाळा अंगणी पडणारा प्राजक्ताचा सडा, दारात काढलेली सुंदर टिपक्याची रांगोळी,समोर तुळशीवृंदावनात लावलेल्या अगरबत्तीचा घरभर पसरणारा सुवास त्या दारात बसलेल्या मोत्या आणि दुधाची चरवी हातात घेऊन आई घरात आल्या बरोबर मधोमध दोन पायाच्या आत घुटमळणारी मांजर हे सारं काही आजच्या काळात हळूहळू लोप पावत चालले आहे. पाऊस रुपयाचा येतो या ललित लेखांमध्ये पावसाचे अतिशय सुंदर असे वर्णन कवी रवींद्र जवादे सर यांनी केले आहे. पावसाच्या आगमनाने सुगंधित झालेली माती हिरवेगार फुटणारे कोवळे  गवत कुरणे रस्त्याच्या दुतर्फा, बाजूने डोलणारी रानफुलं, अंगणात फुलून आलेला मोगरा, ढगाआड लपलेला चंद्र, सार मनाला भुरळ घालणार आहे.
         
         कशाला काशी जातो रे बाबा 
         कशाला पंढरी जातो ?
          संत सांगती ते ऐकत नाही 
          इंद्रियांचे ऐकतो 
           कोंबडे बकरे खातो रे बाबा 
            कशाला पंढरी जातो?

       ग्रामीण भागात मंदिरामध्ये किंवा कोणाच्याही घरामध्ये भजनाचा वेग वाढलेला असतो. त्या भजनाच्या ओळी संतांनी सांगितलेल्या खूप काही सांगून जातात. वरील ओळीतून कोंबडे बकरे खातो आणि कशाला पंढरीला जातो? असा खडा सवालही वरील ओळीतून गाडगे बाबांनी केला आहे. अशा परिवार परिवर्तनवादी विचारांच्या भजनातून ग्रामीण भागातल्या लोकांच्या डोक्यात प्रकाश पडतो. ग्रामीण भागातली शुद्ध,मोकळी हवा संध्याकाळचे गंध वातावरण, गावातल्या गोठ्यातल्या गायी हंबरणा-याचा आवाज, सायंकाळी मंदिरामागे चालणारा हरिपा,गाईचं दूध पिणारे वासरू,गवताचा गुळचट वास, अंगणातल्या तुळशीसमोर आईने लावलेल्या दिव्याचा प्रकाश, शांत मोकळे आकाश सांज काळोखात पसरणाऱ्या मोगर्‍याचा सुवास हे सार सांज ये गोकुळी या ललित लेखसंग्रहात अगदी हुबेहूब डोळ्यासमोर चित्र उभे राहतो.
          आषाढात पडणारा पाऊस घननीळ दिसणारा आभाळ त्याचे झोके घेणारा अल्लड वारा , कोकिळेची सुंदर धून, मातीचा सुगंध दरवळलेला अमृतासारखे पडणारे पावसाचे थेंब. चिंब पावसात मनसोक्त भिजणारी मुलं हे सारं अगदी जसेच्या तसे नभ उतरू आलं या ललित लेखात पाहायला मिळतं ग्रामीण भागातले लेखक रवींद्र जवादे यांनी खूप बारकाईने गाव कुसाच्या ग्रामीण भागातल्या आठवणींना उजाळा देणारे क्षण हुबेहूब पुणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. पोराचं सुंदर देखणेपण रानात नाचला मोर या ललित लेखात खूप सुंदर पद्धतीने लेखक रवींद्र जवादे सरांनी रेखाटले आहे निसर्गाने मोराला भरभरून दिलेल्या देखणं रूप म्हणजे एक वरदान म्हणजे मोराचा देखणं रूप रंग त्याच्या मोरपिसां-राचा सुरेख रंग कधी अधि मोराचा देखणं रूप त्याच्या जीवावर बेतलं .आजही ग्रामीण भागात माळरानी एक कटाक्ष टाकला किंवा भटकंती केली तर नजरेला मोर पडतातच पावसाळ्यात मात्र मोर जास्त दिसू लागतात असं सुंदर वर्णन लेखकांनी केलेलं आहे.
        लेखक रवींद्र जवादे सरांच्या लेखणीला तोड नाही. प्रत्येक लेख अगदी साधी सोपी पण रसाळ मधुर गोड भाषाशैलीमुळे हा ललितलेख संग्रह संपेपर्यंत हातातून सोडून देऊ नये असच  वाटल्याशिवाय रहात नाही. निस्सीम निसर्गप्रेमी , पशू प्रेमी असलेले संवेदनशील मनाचे लेखक रवींद्र जवादे सर यांनी सुंदर ललित लेख संग्रह लिहिण्यासाठी निसर्गाने खरे दान त्यांना दिले आहे. यात शंकाच नाही ग्रामीण भागातल्या कौलारू घरात पावसाळ्यात पडणारे पावसाचे थेंब,थेम्बाना पकडण्यासाठी भांडे लावण्यासाठी चाललेली धावपळ, पावसाळी रात्र, वाढलेला गारवा, पेटवलेली शेकोटी अंगणाने व घराणे दिलेला जिव्हाळा हे सारे इवलसं घर या ललित लेखसंग्रहात न दिसून येते. ऊन वाऱ्यापासून बचाव करणाऱ्या घराचं कौतुक रवींद्र जवादे सरांनी सुरेखपणे मांडले आहे. 'सर्पाची लागण' या ललित लेखांमध्ये ग्रामीण भागातल्या रानात बांधावर सर्पाची जोडी अचानक दिसल्याने गावकरी चिंतित पडलेली असतात हे खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे.
           लेखक रवींद्र जवादे यांची साधी सरळ भाषा आणि सर गाने निसर्ग सौंदर्याने ओतप्रोत भरलेली वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी वाचकाला भुरळ पाडणारी आहे. ग्रामीण भागातल्या संस्कृतीची ओळख करून देणारी, झऱ्याप्रमाणे खळखळणारी लाभली आहे. शब्द माधुर्य व शब्द सौंदर्याने भरभरून नटलेली असल्याने मन उल्हसित करणारी आहे. गायी गेल्या राणा या ललित लेखसंग्रहात पशुपक्षी आणि मानवी जीवन यांची चित्तवेधक वर्णन वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते . गाई गेल्या राहा ललित लेख संग्रह म्हणजे ग्रामीण लोकसंस्कृतीचा उत्कृष्ट आविष्कारच आहे रोजच्या जगण्यातील छोट्या छोट्या भाव गर्भित प्रसंगाने वाचक कधी आनंदी होतो तर कधी अस्वस्थ होतो बिबट्याने घातलेला धुमाकूळ पाहून गावातील लोकांनी बिबट्याला मारण्यासाठी काढलेल्या वेगवेगळ्या क्लुप्त्या वाचकाच्या अंगावर शहारा आणणा-या आहेत.
        आजच्या इंटरनेटच्या धावत्या काळात हरवून बसलेलं मामाचं पत्र आज खेड्यावर सुद्धा येत नाही. पूर्वी खेड्यापाड्यात पोस्टमास्टर सायकल वर गावोगाव फिरून पत्र वाटप करायचा त्या पत्राची अनामिक ओढ, मायेचा ओलावा, जिव्हाळा, आपुलकी गोडी पत्रातले ते शब्दधन व्हाट्सअप व इंटरनेटच्या आजच्या काळात पार हरवून गेल्याची खंत कवी रवींद्र जवादे यांनी अगदी सुंदर सुरेखपणे मांडली आहे कवी रवींद्र जवादे पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा

 समीक्षिका /लेखिका/ कवयित्री/ शिक्षिका 
कु.मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७