Friday, 31 December 2021
जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन
Tuesday, 28 December 2021
वाशिम जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांना तृतीय मानांकन
Saturday, 16 October 2021
मिनाक्षी पांडुरंग नागराळे कार्यगौरव पुरस्काराने सन्मानित
Saturday, 18 September 2021
वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
Wednesday, 8 September 2021
मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे कोवीड योध्दा म्हणून सन्मानित...
Sunday, 4 April 2021
वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांना ऑथर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित...
राज्यस्तरीय निरजा काव्य स्पर्धेत मिनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला...!!
Monday, 29 March 2021
पुरस्कार
Saturday, 13 March 2021
meenakshinagraleblogspot.com: सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्का...
सर फाऊंडेशनचे वाशिम जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार जाहीर...
Friday, 17 July 2020
उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांची लॉक डाऊन काळात भरीव कामगिरी....
उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांची लॉकडाऊन काळात भरीव कामगिरी
लॉकडाऊनमधील हिरो
मीनाक्षी नागराळे
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांना अपार मेहनत घ्यावी लागते. प्राथमिक शिक्षणाचा बेस पक्का झाल्यानंतर तो विद्यार्थी भविष्यात कुठेच मागे राहत नाही. त्यामुळे प्राथमिक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रचंड कष्ट घेतात. मात्र, यातही काही शिक्षकांचे कार्य ठळकपणे दिसून पडते. ज्या शाळा आदर्शवत ठरतात, त्या शाळांच्या आदर्शत्वामागे त्या शाळेतील शिक्षकांचे असणारे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. अशाच एक आदर्श शिक्षिका आहेत की, ज्यांनी ज्या ज्या शाळांवर ज्ञानदान केले, त्या शाळांचे रुपडे बदलण्यासह विद्यार्थ्यांनाही सुसंस्कारित करून सोडले आहे. एवढेच काय तर प्राथमिक शाळेतील मुलांचा एक बालकाव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित केला. विद्यार्थ्यांसाठी अविरत काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या ह्या शिक्षिकेने लॉकडाऊन काळातील वेळही सत्कर्मी लावला आणि आपल्या शाळेच्या भिंतींना बोलके करून शाळेचे रूपडे पालटवले. तसेच आपल्यासारख्याच राज्यभरातील शिक्षिकांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देत “ई ” शिक्षणाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले. लॉकडाऊन काळातील प्रत्येक दिवस आपल्या शैक्षणिक कार्यास समर्पित करून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. मीनाक्षी पांडुरंग नागराळे असे त्यांचे नाव.
वाशिम तालुक्यातील आणि विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असणार्या कोकलगाव या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या सहाय्यक शिक्षिका आहेत. त्यांचे मूळ गाव लातूर असले तरी, त्यांच्या नोकरीची सुरुवातच वाशिम जिल्ह्यातून झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दगड आणि शेणाचा मारा सहन करून मुलींना शिक्षित केल्याची घटनाच नागराळे मॅडमची प्रेरणा असल्याने त्यांनी नोकरीच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे ठरविले होते. त्या १४ वर्षांपूर्वी सध्या कार्यरत असलेल्या कोकलगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिल्यांदा रुजू झाल्या होत्या. तेथे चार वर्षे ज्ञानदान केल्यानंतर त्यांची वाशिम तालुक्यातीलच सुकळी या गावात बदली झाली. सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन इतर शिक्षकांच्या मदतीसह लोकसहभागातून या गावची शाळा डिजिटल केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घेतल्याने त्यांचे विद्यार्थी ठळकपणे झळकत होते. आपल्या कवयित्रीपणा आणि साहित्यकलेच्या प्रभावामुळे त्यांचे तिसरी, चौथीतील विद्यार्थीही काव्यरचना करते झाले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रचनांचा आणि बालविद्यार्थ्यांचा पहिलावहिला बालकाव्यसंग्रह “उमलती फुले” हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी याच शाळेत पार पाडले. तब्बल नऊ वर्षे सुकळी या गावात ज्ञानदान केल्यानंतर गतवर्षी त्यांची पुन्हा सुरुवातीच्या शाळेत म्हणजेच कोकलगाव येथील जि. प. शाळेत बदली झाली.
येथे आल्यानंतर त्यांना या शाळेची दुरावस्था तसेच गावकऱ्यांची शाळेबद्दल असलेली अनास्था स्वस्थ बसू देत नव्हती. या शाळेला अत्याधुनिक करत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पालकांनी या शाळेत आपली मुले टाकण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी पाऊल उचलले, पुढाकार घेतला. त्यानंतर गावातील शिक्षणप्रेमींना प्रोत्साहित करण्याचे काम सुरू केले. म्हणतात ना, “इच्छा तेथे प्राप्ती” या उक्तीनुसार नागराळे मॅडमच्या शाळेसंदर्भातील तळमळीमुळे गावातील शिक्षणप्रेमी युवकांनी या शाळेकडे विशेष लक्ष घालून गावात शाळा बचाव समितीच्या माध्यमातून काही पैसा उभा केला. आणि शाळेच्या रंगरंगोटी ला सुरुवात झाली. त्यानंतर कळकट मळकट दिसणार्या शाळेच्या भिंती सुंदर रेखाटन चित्रांनी खुलून दिसू लागल्या. अश्याप्रकारे या शाळेचे रुपडे बदलण्याच्या कामाला गती येताच कोरोना या महामारीचा राज्यात शिरकाव झाला आणि लॉकडाऊन सुरू झाले. मात्र, नागराळे मॅडम यांनी पुढाकार घेत सुरू केलेले शाळेच्या रंगरंगोटीचे काम सुरूच ठेवले. आणि महिना दोन महिन्यात शाळेला एक नवा आयाम दिला. पेंटिंग काम करणाऱ्या पेंटरला योग्य मार्गदर्शन करून शाळेच्या प्रत्येक भिंतीला बोलके केले, आणि लॉकडाऊन काळातही आपले कर्तव्य चोखपणे बजावले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी पालकांचा “माझी जि प शाळा” हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला आणि शैक्षणिक बाबींची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू ठेवले. जे आजही अव्याहतपणे सुरू आहे. एप्रिल महिन्यात
त्यांनी तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मुलांना कसे शिकवावे . याचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभरातील शिक्षिकांचा “राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका” हा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. स्वतः ॲडमिन होऊन त्यांनी राज्यभरातील शिक्षिकांना सहभागी करून घेत एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी चार वेळा ऑनलाइन तंत्रस्नेही कार्यशाळा घेतली. या माध्यमातून "ई" शैक्षणिक साहित्य निर्मिती, ऑनलाईन चाचण्या कशा करणे, क्लिप बुक चा वापर, व्हिडिओ निर्मिती अशा विविध प्रकारांचे ऑनलाईन प्रशिक्षण त्यांनी दिले. या कार्यशाळेत सहभागीतांची स्पर्धा घेत त्यांनी प्रमाणपत्रेही दिलीत. नागराळे मॅडम यांनी यापूर्वीही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतांनाचे शेकडो प्रकारचे विविध उपक्रमशील व्हिडिओ आपल्या यु ट्युब चॅनल प्रकाशित केले आहेत. त्यांचे “मीनाक्षी पी नागराळे” या नावाचे यूट्यूब चॅनल असून या चॅनल वर त्यांनी संगितमय पाढे म्हणतांनाचा विद्यार्थ्यांचा टाकलेला व्हिडिओ तब्बल ३३ लाख लोकांनी आजवर पाहिला आहे. हा "यु ट्युब" क्षेत्रातील विक्रमच म्हणता येईल. या व्हिडिओ मुळे त्यांचे नावलौकिक संपूर्ण राज्यभर आहे.
त्या कवी आणि साहित्यिक सुद्धा आहेत. आजवर त्यांची चिमणी पाखरे, उमलती फुले, आणि स्वराज्याचे मावळे हे काव्यसंग्रह प्रकाशित असून थोर क्रांतिकारक आणि माणुसकीचा झरा हे दोन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांना कवी म्हणून तीन पुरस्कार तर आदर्श शिक्षिका म्हणून १८ पुरस्कार मिळाले आहेत. ऑनलाइन स्पर्धेतील प्रमाणपत्र तर १ हजार च्याही वर त्यांना मिळाली आहेत. लॉकडाऊन काळात त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, शिक्षिकांची ऑनलाईन तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यासह विविध विषयांवर ३० लेख प्रकाशित केले आहेत. अशाप्रकारे शिक्षण क्षेत्रात अत्युच्च आदर्श ठरणारे कार्य नागराळे मॅडम यांच्या हातून होत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा त्यांनी घेतल्यामुळे विद्यार्थीच नव्हे तर एक संस्कारक्षम पिढी घडविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.
नागराळे मॅडम यांचे वडील शेतकरी होते. त्यांना दोन भाऊ आहेत. त्यांचे दहावीचे शिक्षण झाल्यानंतरच त्यांचे लग्न झाले होते. मात्र, विवाहानंतर अवघ्या चार वर्षांनंतरच त्यांच्या पतींचे निधन झाले होते. त्यावेळी त्यांना एक मुलगा झाला. पतीच्या निधनानंतर त्यांनी खचून न जाता आपल्या मुलाला वडिलांकडे ठेवून बारावीचे शिक्षण घेऊन नंतर डी एड पूर्ण केले. आणि शिक्षकाच्या नोकरीसाठी त्या पात्र ठरल्या. पुढे त्यांनी शिक्षकी नोकरी करतांनाच एम ए ची पदवी प्राप्त केली. आज त्यांचा मुलगा वैभव हा बी ए एम एस हे डॉक्टरकिचे शिक्षण घेत आहे. त्याला पुढे एम डी करण्यासह एम पी एस सी किंवा यु पी एस सी ची तयारी करून अधिकारी बनविण्याचा त्यांचा मानस आहे. अशाप्रकारे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत एक आदर्श शिक्षिका म्हणून आपल्या कार्याचा आमिप ठसा उमटविनाऱ्या मीनाक्षी नागराळे मॅडम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे असून कौतुकास पात्र ठरणारे आहे. त्यांच्या या एकूणच कार्यासह त्यांनी लॉकडाऊन काळात केलेल्या विशेष कार्याची आम्ही प्रकर्षाने दखल घेतली आहे. त्यांचे हे कार्य आमच्या “लॉकडाऊनमधील हिरो” या सदरासाठी पात्र ठरले असले तरी त्यांना आम्ही महिला भगिनी या नात्याने “लॉकडाऊनमधील हीरोईन” म्हणून संबोधत आहोत. त्यांच्या या एकूणच कार्यास आम्ही “दै. सिटीन्यूज सुपरफास्ट” च्या वतीने मानाचा मुजरा करत आहोत. सॅल्युट करत आहोत.
गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम...
Monday, 22 June 2020
सावित्रीच्या ख-या वारसदार...
Thursday, 28 May 2020
स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन...
Saturday, 16 March 2019
जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह प्रकाशन करून सुकळी शाळेने रोवला मानाचा तुरा.....
कवयित्री मिनाक्षी नागराळे यांच्या चिमणी पाखरं व उमलती मुले या जिल्ह्यातील पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले मोठ्या थाटामाटात....
शिक्षणाधिकारी मानकर साहेब यांच्या हस्ते होणार प्रकाशन
वाशिम तालुक्यातील उकळी पेन केंद्रशाळे अंतर्गत असलेल्या जि.प. शाळा सुकळी येथील कवयित्री असलेल्या सहायक शिक्षीका मिनाक्षीताई नागराळे यांच्या बालकांच्या भावविश्वाशी संबंधीत ' चिमणी पाखरं ' व ' उमलती फुले ' या काव्यसंग्रहांचे प्रकाशन कार्यक्रम सोमवारी ११ मार्च रोजी वाशिम येथील लाखाळा परिसरातील केमीस्ट भवनमध्ये दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आले होते.उमलती फुले या बालकविताचे प्रकाशन संपादिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे मॅडमनी करून जिल्ह्यातला पहिला बालकविता संग्रह म्हणून सुकळी शाळेने मानाचा तुरा रोवला आहे...
लहान लहान विद्यार्थी किती चांगल्या प्रकारे कविता करू शकतात याचा उत्तम नमुना म्हणजे उमलती फुले....
जागतिक महिला दिनाच्या निमीत्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश जिल्हा परिषद केंद्रप्रमुख संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष अशोकराव महाले राहणार असून जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर साहेब यांच्या हस्ते काव्यसंग्रहांचे प्रकाशन होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, मराठा सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस नारायणराव काळबांडे चित्रपट निर्माता तथा साहित्यीक सत्येंद्र राऊत, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा संजीवनीताई बाजड व प्रमुख उपस्थितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती आर.एच.वाघ, सुरेश सरनाईक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक परसराम भोयर, सेवानिवृत्त उच्चश्रेणी मुख्याध्यापक संजय डवरे, उकळी पेन केंद्राचे केंद्रप्रमुख नामदेव सरदार, केंद्रप्रमुख संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव बोरकर, साहित्यीक तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय काळे, डॉ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलासराव सोळंके, शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष तथा केंद्रप्रमुख विलास गोटे, साने गुरुजी शिक्षक सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष मधुकर महाले, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष देवबा शिंदे, अजिंक्य प्रकाशनच्या संचालक अॅड. जयमाला भगत, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष दत्तराव इढोळे, युक्टा जिल्हाध्यक्ष दिपक जावळे, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष शत्रुघ्न गवळी, केंद्रप्रमुख शेषराव गोटे, रामेश्वर दंडे, ज्ञानेश्वर भोयर, बापूराव महाले, दिलीपराव गवई, अ.भा. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विजय मनवर, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विनोद घुगे, शिक्षक पतसंस्थेचे संचालक नागेश कव्हर, केशवराव वाबळे, नारायणराव सरनाईक, पुरोगामी शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष मंचकराव तायडे, वऱ्हाडी कवि भारत लादे आदीे उपस्थित होते...
विद्यार्थ्यांनी आपल्या कविता सादर करून मोठ्या माणसाला विचार करायला लावले.तंबाखू सोडा ही कविता...व्यसनानी कसा घात होते हे सांगून गेली....
मिनाक्षी नागराळे मॅडम या संवेदनशील शिक्षिका व आदर्श कवयित्री असल्याने हे शक्य झाले असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी मा.मानकर साहेब यांनी सांगितले....



