Monday, 22 June 2020

फक्त पाच दिवसांत केल्या १०० ऑनलाईन टेस्ट... उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुहाचा अनोखा उपक्रम...

Date: 17 May 2020

    *राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहाचा अनोखा उपक्रम*

*फक्त पाच दिवसात केल्या शंभर ऑनलाइन चित्ररूप टेस्टची निर्मिती*

       सध्या करणामुळे राज्यात "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या धर्तीवर राज्यातले अनेक टेक्नोसॅव्ही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी वर्क फ्रॉम होम साठी ऑनलाईन धडे देत आहेत. घरी रहा सुरक्षित रहा या अनुषंगाने "राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका" समूहाने त्यांच्या समूहात वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करुन तंत्रस्नेही बनण्यासाठी प्रयत्न करत एक अनोखा विक्रम शिक्षिका भगिनींनी करून दाखवला आहे.
          तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज असल्यामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जिद्द मनात ठेवणाऱ्या उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका व समूह प्रशिका कुमारी मीनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम यांनी या समूहात एका हप्त्यात एक कार्यशाळा ठेवून समूहातील शिक्षिकांना तंत्रज्ञानाचे धडे देत त्यांना तंत्रज्ञान अवगत करून देण्याची संधी निर्माण करुन दिली आहे.
         उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहाची निर्मिती २०१७ मध्ये झालेली असून आजपर्यंत या समूहावर अनेक उपक्रम व अनेक कार्यशाळा घेण्यात आलेले आहेत.यामध्ये लॉकडाऊन पिरेडमध्ये या महिन्यातली *पहिली कार्यशाळा* ४ मे २०२० ला ब्लेंड कॉलेज ॲप द्वारे शैक्षणिक साहित्य निर्मिती कशी करायची? याचे तज्ञ मार्गदर्शन समूहाच्या समूह प्रशासिका कु. मीनाक्षी नागराळे, वाशिम यांनी ऑनलाइन कार्यशाळा घेतली. त्यात समूहातील सर्व शिक्षिका भगिनीने आवडीने सहभागी होत प्रतिसाद नोंदवून साहित्याद्वारे म्हणी,कोडी ,समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादीचे उदाहरणे तयार करून ही साहित्य तयार करून त्याची पीडीएफ बनवून ती फ्लीप बुकसाठी शेअर करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पर्यंत पालकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
          *दुसरी कार्यशाळा* -दुसरी कार्यशाळा समूहात दिनांक ११ मे २०२० रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत जळगावच्या तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती सोनाली मधुकर साळुंके यांनी घेतली आहे. त्यांनी गुगल फॉर्मवर चित्रांचा वापर करून ऑनलाईन टेस्ट कशी तयार करायची? याची कार्यशाळा खूप छान पद्धतीने घेतली त्यामुळे समूहातील अनेक जिल्ह्यातील शिक्षिका भगिनींना सहभागी होता आले. आणि प्रत्येकीने एक नमुना चाचणी तयार करून दाखवली.समूह प्रशासिका कु.मिनाक्षी  नागराळे यांनी श्रीमती सोनाली साळुंखे यांचे आभार मानले.
         "अवघे होऊ तंत्रस्नेही" या उक्तीप्रमाणे बघता-बघता समूहातील सर्व शिक्षिका भगिनींना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. व अवघ्या पाच दिवसात एकूण शंभर चाचण्या तयार करून एक अनोखा उपक्रम करून दाखवला आहे. या उपक्रमामुळे केंद्रप्रमुख नामदेव सरदार सर वाशिम यांनी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. आतापर्यंत या चाचण्या राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत. चाचणी सोडवल्यानंतर क्षणातच रिझल्ट पाहता येतो. किती गुण मिळाले ? हे विद्यार्थ्यांना पटकन दिसत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा "work from home" ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालकांना समाधान वाटत आहे.

तिसरी कार्यशाळा-सुचिता कुलकर्णी जालना या तज्ञ मार्गदर्शक म्हणून दिनांक १८/५/२०२० ला फ्लीप बुक तयार करण्याची कार्यशाळा घेणार आहेत.

    फक्त पाच दिवसात १०० चाचण्या तयार करण्यासाठी राज्यातल्या अनेक तंत्रस्नेही शिक्षिकांनी पुढाकार घेऊन या अनोखा उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये मीनाक्षी नागराळे वाशिम (समुह प्रशासिका) सोनाली साळुंखे जळगाव,सुचिता कुलकर्णी जालना, उषा ढेरे बीड, शीला अनासपुरे, माधवी सातूनकर, प्रतिभा पगारे, टेंकाळे ए.ए., रेणुका काटकर,जया कुलथे, प्रिति  रामढवे,भावना पाटील, मनीषा सोळसे, अनिता जाधव, सुनिता जाधव, अर्चना वैद्य, सुनीता पवार,योगिता लोखंडे, साधना पवार,राणी जगदाळे,ज्योती परदेशी,आशा कोवे, उज्वला फटांगरे,वंदना देवकर, हेमलता यादव, अर्चना पवळे, आम्रपाली दातार, नेहा मांडवगडे, चंदा ढोले, जयश्री भड, गायत्री शिंदे, आम्रपाली गडदणे, नेहा मांडवगडे, शोभा दळवी, संगीता तांबे, वैशाली यादव, नीता मनवर,सुवर्णा पाटोळे,योगिता लोखंडे, मेघा जाधव, श्री.नामदेव सरदार (केंद्रप्रमुख) नारायण काळबांडे (स.शि)
      यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हा अनोखा उपक्रम पूर्णत्वास नेला आहे.या उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून खुप कौतुक होत आहे. सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जास्त ऑनलाईन टेस्ट सोडवल्याचा रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.

     *लेखिका, कवयित्री, शििक्षिका,समुह प्रशासिका*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
(उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुह)

सावित्रीच्या ख-या वारसदार...

 *सावित्रीच्या खऱ्या वारसदार*

कार्येषु दासी करणेषु मंत्री
रुपेषु लक्ष्मी क्षमाया धरित्री
भोज्येषु माता शयनेषु रभ्भा
षटकर्मयुक्ता कुलधर्मपत्नी
    कार्यप्रसंगात मंत्री, गृह कार्यात दासी भोजन बनवताना माता, रती प्रसंगात  रंभा, लक्ष्मीच्या रूपात धर्मकार्यासाठी अनुकूल क्षमा करताना धरतीप्रमाणे असे स्त्रियांचे वर्णन संस्कृत पुराणात केलेले आहे. पण आता एकविसाव्या शतकात याहीपुढे जाऊन स्त्रिया प्रत्येक क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत.अगदी आकाशाला सुद्धा गवसणी घातली आहे. अशाच आहेत आमच्या उपक्रमशील व तंत्रस्नेही समूहाच्या शिक्षिका. शाळेत जाऊन फक्त मुलांना शिकविणे एवढेच आपले काम नसून, आपल्या पुढे असणारे चिमुकले बालक हे या देशाचे आधारस्तंभ आहेत असा विचार करून त्यांना घडवण्यासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. सतत नावीन्याचा ध्यास आणि माझ्यातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना कसे देता येईल याचा विचार त्या करतात. गेली दोन महिने मी या व्हाट्सअप समूहाला  जोडले गेले यातील प्रत्येक शिक्षिके मध्ये वेगळेपण दडले आहे.
         समूह प्रशासिका आहेत कु. मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे ज्या स्वतः उपक्रमशील शिक्षिका सोबतच उत्तम कवयित्री, लेखिका व तंत्रस्नेही सुद्धा आहेत. त्यांची अनेक पुस्तके व कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कोरोना काळात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या जीवनावर 'थोर क्रांतिकारक' नावाचे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये असे क्रांतिकारक की जे समाज व शासनाकडून उपेक्षित राहिले आहेत, अशांची नोंद त्यांनी या पुस्तकात घेतली आहे. तसेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांसोबत आपल्या सर्वस्वाचे बलिदान करणारे मावळे यांच्या जीवनावर 'स्वराज्याचे मावळे' नावाचा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला या काव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. स्वराज्यातील मावळ्यांच्या जीवनावर अशा प्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक काव्यसंग्रह आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. 
  
 14 मे पासून त्यांच्या मार्गदर्शनात समूहातील इतर शिक्षिका यांनी मिळून अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. 'जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे 
शहाणे करूनी सोडावे सकलजन'
या उक्तीप्रमाणे या सर्व शिक्षिका इतर मैत्रिणींना आपल्या जवळचे ज्ञान वाटण्याचे काम करतात. यामध्ये

1ब्लेंड कोलाज-मीनाक्षी नागराळे

2 ऑनलाइन टेस्ट तयार करणे-सोनाली साळुंखे

3 फ्लिप बुक तयार करणे-सुचिता कुलकर्णी

4 पोस्टर तयार करणे गायत्री शिंदे

5 पीडीएफ तयार करणे-सोनाली साळुंखे

6 फेसबुक वरील व्हिडीओ डाऊनलोड करणे-सुनीता पवार

7 लोगो तयार करणे-मीनाक्षी नागराळे
अशाप्रकारे विविध विषयावरील सात कार्यशाळा त्यांनी घेतल्या. लॅाकडाऊन मुळे सर्व मंडळी घरात बसून कंटाळले आहेत पण या सर्व शिक्षिका रोज नवनवीन शिकतात व शिकवतात. कार्यशाळेची वेळ तीन ते पाच च्या दरम्यान ठेवतात म्हणजेच घरातील सर्व कामे आटोपून यांना कार्यशाळेला हजर होता येईल. प्रत्येकीच्या   मागे घरातील भरपूर काम आहे. सुट्टी असल्यामुळे सर्व मंडळी घरी, विविध पदार्थ बनवून सर्वांना खाण्यासाठी देणे ,कामवाल्या बाया बंद असल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे. हे सर्व करून उरलेल्या वेळेमध्ये काही तरी नवीन शिकण्याचा ध्यास खरंच कौतुकास्पद आहे. कार्यशाळेच्या नंतर दोन-तीन दिवसातच त्या कार्यशाळेत झालेल्या विषयावर एक स्पर्धा आयोजित करतात. नंतर दोन-तीन दिवसांमध्ये त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करणे, सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देणे हे सर्व नियोजन करण्यासाठी त्यांचा कितीतरी वेळ यासाठी त्या खर्ची घालतात.सर्वजणी ठरलेल्या वेळी ऑनलाईन येऊन प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडतात. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नियोजित करतात. सर्वांचे टाळ्या वाजून स्वागत करतात. सावित्रीचा फोटो गृप वर टाकतात.लगेच फोटोला हार घालतात. सर्वजणी टाळ्या वाजवतात प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या सखीला पेढा किंवा स्वीट पदार्थ पाठवतात. हे सर्व पाहताना मला फार मज्जा वाटते. किती उत्साहाने  करतात हे सर्व. याबरोबरच उन्हाळाभर रोज विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेणे व होमवर्क देणे हे काम सुद्धा त्यांचे सुरूच आहे गुगल फॉर्म वर अनेक टेस्ट सोडवायला त्यांनी दिलेले आहेत. होमवर्क पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल वरच व सन्मानचिन्ह सुद्धा पाठवतात.म्हणजे स्वतः सतत बिझी व विद्यार्थ्यांनाही सतत बिझी ठेवतात. यापैकी अनेक शिक्षिकांचे युट्युब चॅनल सुद्धा आहेत स्वतःच्या शाळेचे ब्लॉग सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत, भरपूर व नवनवीन  उपक्रम राबवतात. बऱ्याच शिक्षिका लेखिका, कवयित्री व विविध पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत स्त्रियांबद्दल ची लोकांची धारणा होती की स्त्रियाच स्त्रियांना मागे ओढतात पण हे चुकीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी ज्या उदात्त हेतूने मुलींच्या शिक्षणासाठी  सर्वस्व अर्पण केले, त्याचे सार्थक होत आहे असे वाटते. शिक्षकांच्या तुलनेत शिक्षिका या जास्त प्रयत्नशील व कृतीशील आहेत सतत नवनवीन प्रयोग करणे ज्ञानरचनावाद, हसत खेळत शिक्षण, या ना त्या मार्गाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्या प्रयत्न करतात .ज्याप्रमाणे आई ही पहिली गुरु असते त्याप्रमाणे शिक्षिका गुरु आणि आई अशा दोन्ही भूमिका निभावत असतात व विद्यार्थ्यांना परिपूर्ण करतात. या समूहातील शिक्षका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातील आहेत. सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव नाशिक ,अमरावती, वाशिम अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या सर्व शिक्षिका एकत्र येऊन आपल्या ज्ञानाचा वसा एकमेकींना देत  आहेत हेच तर अपेक्षित होते सावित्रीबाईंना.

'हमे भी हवा के साथ चलना आ गया
हमे भी रुख बदल ना आ गया
हमे जो ठोकर लगी रस्ते मे
जमाने को संभलना आ गया
रहो होशियार अब दरिया की मॊजो
किनारो को भी उछलना आ गया'
मैत्रिणींनो सलाम तुमच्या कार्याला.

*सौ.हर्षा अविनाश पसारकर*
*प्राचार्य विठाबाई पसारकर विद्यामंदिर केकत उमरा*
*जि .वाशिम*

Saturday, 13 June 2020

My logo


Friday, 12 June 2020

मराठी साहित्य मंच ई काव्यसंग्रह जून २०२० अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न ...

मराठी साहित्य मंच ई काव्य संग्रह जून २०२० अंकाचा ऑनलाईन प्रकाशन सोहळा संपन्न 

बीड (प्रतिनिधी) ,मराठी साहित्य मंच  ई -काव्य  संग्रह जुन-२०२० मासिक अंक ऑनलाईन प्रकाशन सोहळा 
  सुप्रसिद्ध कवयित्री /लेखिका/तंत्रस्नेही शिक्षिका/ संपादिका व साहित्य क्षेत्रातील कोहिनूर
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
मुळ रहिवासी-धाराशिव उस्मानाबाद
मु.पो.कोकलगाव(कर्मभुमी)
ता.जि.वाशिम
यांच्या शुभहस्ते  ११ जुन २०२० रोजी ११ :११ वाजता अगदी थाटात व उत्साहात  संपन्न झाला ,या वेळी नक्षत्राधीस कवी वादळकार राजेंद्र सोनवणे हे ही समूहात  उपस्थित होते 
काव्य संग्रहाचे संपादक काव्यरत्न प्रा.रावसाहेब राशिनकर(साहेब)
मु.पो.चांदा,ता.नेवासा, जि. अहमदनगर-
(राज्यस्तरीय कुसुमाग्रज गौरव पुरस्काराने सन्मानित)
यांनी या सोहळ्यास मोलाचे योगदान देऊन सहकार्य केले 
तसेच प्रशासक समितीचे नंदकुमार शेंदरे सर,सौ. शालू विनोद कृपाले मॅडम,विशाल पाटील वेरुळकर यांनी ही विशेष सहकार्य केले 
या अंकात अनेक सुप्रसिद्ध साहित्यिक व नवं लेखकांच्या 
कवीता प्रकाशित झाल्या 
  मुख्य संपादक श्री अंगदजी दराडे आणि प्रा. रावसाहेबजी राशिनकर (साहेब) , तसेच प्रशासक समिती आणि संपूर्ण टीम यांनी सर्वांनी खूप मेहनत घेऊन हा ई- काव्य संग्रह  तयार केला
यातील सर्व कवीता अगदी आकर्षक,वाचनीय आणि सर्वच विषयांना न्याय देणारा आहे.मुखपृष्ठ तर अगदीच बोलके आहे.या अंकांतील राशिनकर साहेब , मुख्य संपादक अंगद दराडे आणि मिनाक्षीताई यांच्या मनोगताची शब्दगुंफन वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणारी आहे.काव्यसंग्रह प्रत्येकाने संग्रही ठेवावा असाच आहे.या काव्यसंग्रहामध्ये आई,पावसाचे रूप,वृक्षतोड, मन,पुन्हा ते दिवस येतील,आमची गरिबी, मुखवटे,शेवटची इच्छा,ढवळ्या पवळ्या, त्याग,माणुसकी ,माझं गाव ,माहेर या आणि अशा इतर एकूण 62 कवितांचा समावेश आहे.
.या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून नवकवी आणि कवयित्रींच्या लेखणीला वाव आणि लेखनाची संधी नक्कीच मिळाली आहे.
 या मध्ये युवा कीर्तनकार गणपत माखने महाराज , प्रा.डॉ.संतोष तागड , गजानन दराडे , मयूर बागूल , जयश्री बापट , भारती सावंत , भाग्यश्री पटारे , हर्षदा वाकचौरे , दिलीप धायगुडे, विक्रांत शेवारे , बाल कवी अनोमा मालसमीदर , अंजु येवले , उषा ढेरे- करपे,पुजा बागुल,श्रद्धा कुलकर्णी, निशा खापरे,योगिता शिरोरे,कल्पना म्हापुसकर,शोभा वागळे, सुचित्रा कुंचमवार यांसह नामवंत कवी-कवयित्रींच्या रचनाचा समावेश आहे 

काव्य संग्रह सोहळा संपन्न होताच अनेक नामवंत साहित्यिकांनी त्यांचे लेखी अभिप्राय समूहात पाठवले 
व काव्यसंग्रहाचे संपादक रावसाहेब राशिनकर व अंगद दराडे यांनी सर्वांचे अभिनंदन करत आभार मानले.

Tuesday, 9 June 2020

जननायक शहीद बिरसा मुंडा....

 Date: 6 Jun 2020

*जननायक शहीद बिरसा मुंडा*

     आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी जननायक शहीद बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या छोट्याशा खेड्यात १५ नोव्हेंबर१८७५ मध्ये झाला.वडील सुग्ना व आई करमी यांच्या पोटी झाला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्यामुळे बिरसाचा नंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांची आत्या दासकिर यांच्या आयुभातू या गावी गेले. बालपणापासूनच अत्यंत हुशार व शिक्षणाची आवड असलेले बिरसा मुंडा होते. बासरी व टुईला वाजविणे नृत्य व नकला करणे, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंद त्यांच्या अंगी होते. जी.सी.एल मिडल स्कूल मधून त्यांनी उच्च माध्यमिक पास केली. मिशनरी आदिवासींना आदिवासी,चोर,डाकू म्हणू लागले. त्यावेळी त्यांना मिशनर्‍यांना खडसावून प्रत्युत्तर दिले व शाळा सोडून दिली त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले.
         बिरसा मुंडा यांचा विवाह हिराबाई यांच्याशी झाला पण पुढे लवकरच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. संगीताबरोबरच नृत्याची आवड बिरसांना होती.  ते उत्तम बासरी वाजवायचे त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला. रानात गुरे चारायला नेत त्यामुळे जंगली वनौषधी बद्दल चांगले ज्ञान बिरसांना होते. आजारग्रस्त लोकांना जडीबुटी औषध तयार करून देऊन त्यांचा आजार त्यांचा बरा करत असत. म्हणून लोक त्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणू लागले.
         सन १८६९ मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली. सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या जमिनी हडप केल्या. त्याबद्दल आदिवासींनी एकही शब्द न करण्याचे आदेश इंग्रजांनी दिले होते.त्यामुळे आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्ध बिरसा यांनी १८९० मध्ये व्यापक "क्रांती उलगुलान" ची घोषणा केली १८९५ मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले जंगल, जमीन,संपत्ती आमचा अधिकार आहे. यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येऊन लढायचे आव्हान केले. न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतले बिरसा यांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिले. त्यामुळे त्यांना ९ ऑगस्ट १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांना अटक झाली.
           ३० नोव्हेंबर १८९७ ला बिरसा तुरुंगातून बाहेर आले.त्यावेळी आदिवासी समाजाची केविलवाणी परिस्थिती पाहून पुन्हा अन्यायाविरुद्ध पेटून उठले. बिरसा हे उत्तम योद्धा व कुशल प्रशासक होते. १८९८ मध्ये बिरसांनी "डुंबारी बुरुज"  या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली. फादरच्या घरावर हल्ले करायचे ठरवले जानेवारी १९००मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकार्‍याला बिरसा यांच्या हल्ल्याची माहिती मिळाली इंग्रजांनी "डुंबारी बुरुजावर" गोळीबार सुरु केला. आदिवासींनी दगडफेक व धनुष्यबाण करत प्रतिकार केला. या नरसंहारात दोनशेपेक्षा अधिक आदिवासी लोक मारले गेले.इंग्रजांनी बिरसा यांना अटक केले. व तुरुंगात अतोनात छळ केला ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. न्याय व हक्कासाठी लढणारा क्रांती सूर्याचा अंत झाला. अशा या महान शूरवीर क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम आज ९ जून रोजी  स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

लेखिका/ कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
तालुका जिल्हा वाशिम...

---
ShuusShuus

Monday, 8 June 2020

ललित लेख... "संशयाचे भूत"

 Date: 7 Jun 2020

*संशयाचे भूत*

        सुधाचा चांगला सुखात संसार चालला होता. दोन गोंडस मुले होती. नवरा जॉबला होता. ७० हजार पगार नवऱ्याला होता. नवरा फार दयाळू कनवाळू होता. कोणालाही अडीअडचणीत पटकन मदत करणारा,स्त्रियांचा मान सन्मान, आदर करणारा गावातल्या कोणालाही अडचणीमध्ये मागेपुढे न बघता पटकन मदत करणारा नवरा नशिबाने सुधाला मिळाला होता. पण तेसुद्धा सुधाला आवडायचं नाही. ती नवऱ्याकडे सारखे डोळे वटारून पाहत असायची. मदत करायला माझाच नवरा उरला की काय? यासाठीच माझ्यासोबत लग्न केले की काय ? तडतड करत, त्रागा करून घेत, सुधा पाय आपटत,दात कटकट चावत निघून जायची. तिच्या नवऱ्याचा स्वभाव घरातल्या सर्व मंडळींना ठाऊक होता पण ते सुधाला मान्य नव्हतं ती विनाकारण नव-यावर संशय घ्यायची.
        "संशयाचे भूत" सुधाच्या असं काही मानगुटीवर बसलं होतं की त्याचा इलाज जगातल्या कुठल्याच मांत्रिकाकडे किंवा डॉक्टर कडे नव्हता. सुधा कितीही आदळआपट केली. तरी तिचा नवरा मात्र खूप संयमी व मितभाषी होता. तो अगदी शांतपणे ऐकून घ्यायचा आणि पुढे निघून जायचा. एक दिवस गावातल्या एका बाईचे बँकेचे खाते उघडण्यासाठी सुधाचा नवरा राम बँकेत गेला होता. सोबत बिचारी ती बाई होती तिने खूप गयावया करून तिचं काम करण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे राम त्या बाईला सोबत घेऊन बँकेत गेला होता. बँकेतले काम झाल्यावर राम निघून दुसऱ्या कामाकडे वळला. राम वर लहानपणापासूनच खूप चांगले संस्कार झाले होते.आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या रामला वाटेवर चालता चालता जर कोणी अडचणीत दिसला तर त्याला पटकन मदत करायचा हा रामचा स्वभाव धर्म होता.आणि त्या दिवशीही तसेच झाले त्या बाईचे बॅंकेचे काम केले. आणि पासबुक वर लावण्यासाठी घेतलेला एक फोटो राम कडेच राहिला.रामच्या पाकिटातला तो फोटो सुधाने रात्री घरी आल्यावर पहिला आणि घरात अख्खं कुरुक्षेत्र उभं केलं.जणू महाभारत सुरू झाला आणि सुधा तांडवनृत्य करू लागली.सारं घरं डोक्यावर घेतलं. खूप जोरजोरानं नवऱ्याला भांडू लागली.
        सुधाची वयात आलेली पोरं भिरभिरे सुधाकडे पाहत होती. पण सुधा जास्त शिकलेली नव्हती. आणि समंजसही नव्हती. विनाकारण राम सोबत खूप भांडण केलं आणि तरातरा निघून माहेरी गेली. रामची यात काहीच चूक नव्हती. त्यामुळे राम आपला शांतच बसला होता.कारण रामच्या नजरेत आपण कोणाला मदत करणे हे वाईट नव्हतंच मुळी.सुधा माहेरी राहून राहून किती दिवस राहणार आठ-दहा दिवसात परत घरी आली.पण तिच्या मनातलं संशयाचं भूत कांही निघतच नव्हतं. प्रत्येक गोष्टीला ती संशयाने पाहायची. आता राम सुद्धा तिच्या अशा वागण्याला, बोलण्याला फार कंटाळून गेला होता. रामा जर आनंदी असला तरी सुधारला ते आवडायचं नाही.सुधा नवऱ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची "संशयाचं भूत" लय वाईट.चांगल्या सुखी संसारात विघ्न घालत विष कालवण्याचं काम हे संशयाचे भूत करत असतं. अनेक रोगावर औषध आहे पण संशयी स्वभावाला औषध नाही.  आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही औषध निघाले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुधाच्या आयुष्यात जास्त कटकटी भांडण, आदळ-आपट मुलांकडे लक्ष देणे नको, चांगल्या कांही वाचन नको, किंवा चांगल्या गोष्टींकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोनही राहिला नव्हता.त्यामुळे सुधाची मनस्थिती फार बिघडली होती. सुधाचा नवरा जर छान ड्रेस घातला. दाढी कटिंग केली तरी सुद्धा सुधा त्याच्याकडे संशयाने बघू लागली. हा माझा नवरा आहे आणि मी त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवायचे तर दूरच उलट भांडणाचा सुळसुळाट व्हायचा....कितेकांचे सुखी संसार अशा संशयाने उध्वस्त झाले आहेत.एखादा भुकंप झाला तर त्याचा आवाज होतो.पण मनाच्या भिंतींना तडे गेलेली मात्र अजिबात दिसत नाहीत.
          सुधाचा रात्रंदिवस नवऱ्याबद्दल संशय वाढत चालला होता. तिला सारखं वाटायला लागलं की मी नवऱ्याला आवडतच नाही.नवरा चांगला वागला तरी सुद्धा त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची. त्यात सुधाला एक मैत्रीण मिळाली होती. तीही तशीच त्यात आणखीन भर टाकायची. आणखीन तेल ओतायची. तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करु लागली. सुधाला वाटायचं की हर एक गोष्ट आपल्या मैत्रीला सांगावं पण मैत्रीण उलट सुधाच्या डोक्यात नको ते भरून द्यायची आणि मग परत सुधा आणि राम ची कडाक्याचे भांडण व्हायचे. नवऱ्याचा गरीब स्वभाव बघून निर्व्यसनी सरळ स्वभावाच्या रामला  सुधा सारख्या धमक्या द्यायची. रामला  कांही सुचेनासं झालं... जावे तरी कुठं आणि करावं तरी काय? असा प्रश्न रामला पडला होता. रामला वाटायला लागलं माझं काहीतरी पाप आहे त्यामुळे कमी डोक्याची ही सुधा माझ्या गळ्यात पडली. राहून राहून रामला सारखं पश्र्चाताप व्हायचा. आपण उगाच लग्न केले असे रामला वाटायचे पण सुधाचे "संशयाचं भूत" मात्र काही केल्या उतरत नव्हतं...


लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम