Saturday, 20 January 2024

मातृभूमी आणि शब्दशिल्प दैनिक या वृत्तपत्राने घेतली दखल...

Thursday, 18 January 2024

संघर्षमय जीवन जगणं सांगणारा कथासंग्रह म्हणजे -खोडा

 *संघर्षमय जीवन जगणं सांगणारा कथासंग्रह म्हणजे -खोडा*


      वाढती महागाई आ म्हणून तोंड वासत चाललेली, साधारण व गरिबातल्या गरीब माणसाला जीवन जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष, नात्या नात्यामधला संपत चालेला जिव्हाळा, बदलत्या काळाबरोबर ग्रामीण आणि शहर यात होत चाललेला अमुलाग्र बदल,बदलती जीवनशैली, त्याचबरोबर हरवत चाललेली माणुसकी मराठवाड्यातील सुप्रसिद्ध लेखक श्री उमेश मोहिते सर यांच्या खोडा काव्यसंग्रहातून पहावयास मिळते.

        अतिशय सुंदर मुखपृष्ठ  असून जीवन जगण्यासाठी स्त्रियांना पडलेली भ्रांत ,आ वासून समोर येत असलेली महागाई, मागासलेपण,फाटक्या संसाराला ठिगळं लावणा-या स्त्रिया,  अशा समस्या, त्यात होणारी कुटुंबाची होरपळ, स्त्रियांचे  मन हेलावून टाकणारे नाजूक मन, त्यावेळी झालेले घाव वाचकाला शेवटपर्यंत बांधून ठेवले जाते.एक आगळीच ओढ निर्माण करते. लेखक श्री उमेश मोहिते सर यांचा कथासंग्रह नुकताच वाचनात आला. अतिशय सोपी, बोलीभाषा वाचकाच्या थेट काळजाला जाऊन भिडल्याशिवाय राहत नाही.

      शाळा शिकण्याची अतोनात धडपड असणारी सविता वाढत्या वयात भावनांना आवर घालत आई-वडिलांना शिकण्याची इच्छा व्यक्त करते आणि आई वडील दोघेही सविताला शिकण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आलेल्या लग्नाच्या स्थळाला नकार देतात. नकळत प्रेमात पडू पाहणाऱ्या मोहनला योग्य 'निर्णय' सांगणारी सविता वयाच्या उंबरठ्यावर असताना देखील स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीचा वापर करीत तिची शिकण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी लग्नाला नकार देणारी निर्णय कथा आजच्या काळात पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे.

       काबाड कष्ट करणाऱ्या सारजाबाईच्या जीवनात संकटावर संकटे येतात.अवकाळी निसर्गाच्या कोपानं सारजाबाईच पार कंबरडच मोडून जातं. निसर्ग गरिबांची खूप परीक्षा पाहतो. परिस्थिती पुढे मनुष्य हातबल होतो. अवकाळी या कथेतून लेखक उमेश मोहिते सरांनी काळीज पिळवटून टाकणारी ही कथा वाचकाच्या थेट काळजाला जाऊन भिडते. कोरोना काळात लॉकडाऊन लागलं आणि अख्ख जग जाग्यावर थांबलं. हे सर्व धंदे बंद पडले असताना सामान्य माणसाला जीवन जगण्याची भ्रांत पडली होती. तेंव्हा दोन वेळचं पोटभर जेवण मिळण्यासाठी कावेरीची चाललेली धडपड तिला सहकार्य करणाऱ्या गोदा काकू आज एकमेकीवर जळफळाट करणाऱ्या स्त्रियांना जबरदस्त चपराकच हाणली आहे. ती होरपळ या कथेतून आजच्या काळात एखाद्याचा धंदा चांगला चालत असेल तर तो दुसऱ्याला बघवतच नाही. पण त्याच्या धंद्याची माहिती दुसऱ्याला तो देतच नाही हे जरी वास्तव असले तरी होरपळ या कथेतून गोदा काकूंनी कावेरीला केलेली मदत, सहकार्य वाखाण्याजोगेच आहे. लॉकडाऊनच्या काळात कावेरी स्वतःच्या आईच्या अंतिम दर्शनाला पण जाऊ शकत नाही. कोरोनामुळे सर्वत्र संचार बंदी असल्याने कावेरीच्या होणा-या जीवाची घालमेल आईचं शेवटचं तोंड पण पाहता येणार नाही. याची कावेरीला होणारी खंत मानवी मनाला अस्वस्थ करणारी आहे.

        लेकीला नोकरदार नवरा करावा म्हणून खस्ता खाणारी गजरा स्वतःच्या भावाच्या पोराला मुलगी सुरेखाचा हात देत नाही. धडकपणे भावाला नकार देते. आणि सांगून टाकते की माझ्या सुरेखाला एक दोन एकर वावर विकून का होईना आपण मुलीला नोकरदार मुलगाच बघून द्यावा म्हणणारा तळमळणारा गजराचा जीव. वाचकाला प्रत्यक्षदर्शी समोर घटनेत असल्याचा भास धडक या कथेतून होतो.

      सुभानरावची सावकारी जात राजारामजी गरीबी मुळे होणारे हे सांड सखूचा म्हशीत अडकलेला जीव शेवटी सुभानराव सावकार व्याजाच्या पेशात राजाराम व सखुची म्हैस घेऊन जातो राजाराम व सखू यांना जीवन जगण्यासाठी होणारे दमकुंडी या कथेत लेखक उमेश मोहिते सर अगदी रुदयद्रावक घटना प्रसंग मांडताना मानवी मनाच्या काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहत नाही.

      कोरोनाच्या काळात कावेरीला शाळेतल्या मॅडमनी केलेली मदत ती केवळ मदत नसून तर त्यांना स्वावलंबी बनविण्याचे ट्रेनिंग मॅडम देऊन गरिबांना जीवन जगण्यासाठी आणि परिस्थितीशी दोन हात करत रस्ता दाखवणारी कथा वाचकाला प्रेरणा देऊन जाते आणि माणुसकी नकळत शिकून जाते आजच्या भावी पिढीला सुशिक्षित बेरोजगार म्हणून हातावर हात ठेवून बसलेल्या लोकांना ही कथा प्रेरणादायी वाटते.

     पेरणीसाठी सावकाराकडून काढलेलं कर्ज पार्वतीला भेटता येत नसल्याने पुन्हा पैशाची गरज भासली. तेंव्हा पार्वतीला सख्खा भाऊ पण मदत करत नाही उलट तिची देखणी मुलगी स्वतःच्या मुलासाठी मागतो पार्वती त्याला स्पष्ट नकार देते आणि सावकाराकडे स्वतःचा वाडा गहाण ठेवून पैसे काढते पुढच्या आणि पाठच्या पण खोडा घालतात थोड्या या कथेत विधवा पार्वतीने नवरा मेल्यावर लेकर जतन करण्यासाठी खालेल्या खस्ता मानवी मनाला अस्वस्थ करून टाकतात बिस्कुट आणि झुंज कथाही खूप वाचनीय आहेत.

      खोडा या कथासंग्रहात एकूण 11 कथांचा समावेश आहे .लेखक उमेश मोहिते सरांनी ग्रामीण भागातल्या कष्टकरी, गरीब, शोषित, पीडित कुटुंबाचे हाल त्यांच्यावरील संकटे. समस्त श्री जातीला फटक्या संसारासाठी लावावी लागणारी ठिगळं  त्यांनी खालेल्या खस्ता त्यांच्या हाल अपेष्टा इच्छा अपेक्षा आणि त्यांच्यापासून कशा उपेक्षित राहणाऱ्या स्त्रियांची व्यथा कथा म्हणजेच खोडा कथासंग्रह होय.

       लेखक उमेश मोहिते यांची अस्सल ग्रामीण भागातली साधी सरळ बोलीभाषा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कष्टकरी स्त्रियांच्या जाणिवा वाचकाला अंतर्मुख करायला भाग पाडतात. वाचकाला स्वतःच त्याच कथेत असल्याचा भास होतो. एवढी ताकद लेखक उमेश मोहिते सरांच्या लेखणीत आहे. वाचकाच्या पसंतीस पडेल हा कथासंग्रह यात शंकाच नाही लेखक उमेश मोहिते यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...


कथासंग्रहाचे नाव -खोडा 

लेखक -उमेश मोहिते 

प्रकाशक -तेजश्री प्रकाशन,कोल्हापूर 

मुखपृष्ठ -सरदार जाधव 

मूल्य -केवळ २०० रुपये 

पुस्तक बोलवण्यासाठी संपर्क 7666186928


समीक्षिका लेखिका 

कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 

तालुका जिल्हा वाशिम 

पिन नंबर 444505 

मोबाईल नंबर 9767663257




वाशिमच्या मिनाक्षी नागराळे विदर्भ गौरव दिशादर्शक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित....

 




Tuesday, 16 January 2024

विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे दिशादर्शक आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्याची निवड




 विदर्भ गौरव दिशादर्शक शिक्षक पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्याची निवड...


     वाशिमच्या मिनाक्षी नागराळे आदर्श दिशादर्शक पुरस्काराने सन्मानित....


      वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीप्रिय, लोकप्रिय आदर्श शिक्षिका कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे (स.अ.) यांना दि.१४ जानेवारी रोजी नागपूर येथे आदर्श दिशादर्शक पुरस्काराने गौरविण्यात आले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने यंदाच्या लोकसत्ता विदर्भरंग दिवाळी अंकात विदर्भातल्या कृतिशील, उपक्रमशिल शिक्षकांच्या कार्याचा लेख प्रकाशित करण्यात आले होते.अशा  १९ दिशादर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे प्रमुख सल्लागार मा.डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या शुभहस्ते व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव मा.डॉ.पुरणचंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकसत्ता दैनिकाचे निवासी संपादक मा.श्री.देवेंद्र गावंडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे डॉ.गिरीश गांधी,शंकरप्रसाद अग्निहोत्री,अॅड फिरदोस मिर्झा, प्रेमकुमार लुनावत, विष्णू मनोहर,रूपाली मोरे,बाळ कुळकर्णी,दिलीप जाधव,शुभदा फडणवीस,अतुल दुरगकर, प्रफुल्ल गाडगे,निलेश खांडेकर,आदि मान्यवरांच्या हस्ते आदर्श उपक्रमशिल , तंत्रस्नेही शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांना स्मृतिचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ, आणि विठ्ठल रखुमाईची मुर्ती देऊन सन्मानित करण्यात आले... लोकसत्ताच्या वार्ताहरांनी ५७ शिक्षकांमधून १९ शिक्षकांची निवड करताना प्रत्येक कसोटीतून तपासण्यात आले.मगच या मानाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरवले गेल्याचे लोकसत्ता दैनिकाचे निवासी संपादक मा.श्री देवेंद्र गावंडे त्यांच्या भाषणातून सांगितले.

        जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात राहून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासोबतच त्यांच्यावर सांस्कृतिक, सामाजिक,व राष्ट्रीय संस्कार घडविण्याचे अप्रतिम कार्य,तसेच शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणी जमा करून शाळेची दुरूस्ती, रंगरंगोटी करून, कुणाचीही कौतुकाची थाप मिळावी म्हणून निरपेक्ष भावनेने केवळ विद्यार्थ्यांसाठीच कार्य करणाऱ्या, स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात सतत क्रियाशील ठेवणा-या , तळमळीने काम करणा-या, शासनाकडून  दुर्लक्षित राहिलेल्या १९ शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी थोर समाजसेवक शिक्षणप्रेमी डॉ, गिरीश गांधी यांनी व त्यांची विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित केला होता... मिनाक्षी नागराळे यांचे हजारो शैक्षणिक व्हिडिओ युट्युब चॅनलवर अपलोड असून आतापर्यंत ८० लाख लोकांनी व्हूज दिले आहेत.त्यांचा स्वतः चिमणी पाखरं या शैक्षणिक ब्लॉगवर अनेक शैक्षणिक पोस्ट, नवनवीन उपक्रम,लिप फॉर वर्ड चा उपक्रम,चला काढुया चित्र,चला शोधूया नविन काहीतरी,असे अनेक उपक्रम वर्गात राबवत असतात.त्याच बरोबर सेल्फी विथ सक्सेस,चला वाचूया संख्या भरभर,असे आव्हान मुलांना देत ते पुर्ण करणा-या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी विथ सक्सेस फोटो काढून स्टेट्स ला ठेवून विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात.एकीकडे मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव चालू असताना अशी एक पणती त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रकाश देण्याचे कार्य करते.इतकेच नाही तक्ष त्यांचे अनेक जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी डॉक्टर,.इंजिनियर,तलाठी,ग्रामसेवक इ.पदापर्यंत पोहचले आहेत.विदर्भात वाशिम जिल्ह्याचा ठसा उमटविणाऱ्या मिनाक्षी नागराळे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

Wednesday, 3 January 2024

कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात साजरी.....








 जय जिजाऊ....जय सावित्री.... 🙏

        ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 💐💐💐💐

      भारतात स्त्री शिक्षणाची गंगोत्री आणणारी विद्येची देवता सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीआईना अभिवादन व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज दिवसभर आडवे कुंकू लावून शालेय कामकाज केले.... आम्ही सावित्रीच्या लेकी कार्यक्रमांचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथे करण्यात आले... कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.वाकुडकर सर,प्रमुख पाहुण्या- मिराताई जाधव, (ग्रामपंचायत सदस्य),सौ.वंदना सिताराम काळबांडे (आशा वर्कर),शकुंतलाबाई मोरे(आशा वर्कर) आणि कोकलगाव शाळेच्या आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम तसेच विसावे सर उपस्थित होते.सूत्रसंचालन सिद्धार्थ ढोले सर यांनी केले.सावित्रीच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकीत चिमुकल्या सावित्रीच्या लेकींनी भाषणं केली.विसावे सरांनी फलखलेखन केले.ढोले सरांनी सावित्रीमाईचा संघर्षमय संपूर्ण जीवनपट उलगडून सांगितला आणि सुंदर आवाजात गीत सादर केले.मिनाक्षी नागराळे मॅडम यांनी सावित्रीला नमन करण्यासाठी स्वरचित सावित्री वंदना सादर करून सावित्रीमाईनी खालेल्या खस्ता,सावित्रीमाईचे  विज्ञानवादी लिखाण,त्यांचे लिखाण, साहित्यिक कामगिरी, प्लेगच्या साथीत सावित्रीमाईचे धैर्याचे पाऊल...इ.वर प्रकाश टाकला...तर शकुंतला मोरे बाईंनी सावित्रीनेच वाजवली पहिली घंटी गीत सादर केले....सौ. वंदनाताईनी मुलांनी अभ्यास कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री रामकिसन वाकुडकर सरांनी सावित्रीच्या कार्याचा आलेख सांगून कार्यक्रमांची सांगता केली....

       कवयित्री शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना बालिकादिनानिमित्त चॉकलेट खाऊ वाटप करण्यात आले.

      कसे विसरू माई सांग तुझे उपकार....

Tuesday, 2 January 2024

Happy new year 2024...z.p. school kokalgaon...