Tuesday, 16 January 2024

विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे दिशादर्शक आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्याची निवड




 विदर्भ गौरव दिशादर्शक शिक्षक पुरस्कारासाठी वाशिम जिल्ह्याची निवड...


     वाशिमच्या मिनाक्षी नागराळे आदर्श दिशादर्शक पुरस्काराने सन्मानित....


      वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थीप्रिय, लोकप्रिय आदर्श शिक्षिका कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे (स.अ.) यांना दि.१४ जानेवारी रोजी नागपूर येथे आदर्श दिशादर्शक पुरस्काराने गौरविण्यात आले.विदर्भ गौरव प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने यंदाच्या लोकसत्ता विदर्भरंग दिवाळी अंकात विदर्भातल्या कृतिशील, उपक्रमशिल शिक्षकांच्या कार्याचा लेख प्रकाशित करण्यात आले होते.अशा  १९ दिशादर्शक शिक्षकांचा गौरव करण्यात आला.या कार्यक्रमाला कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस कराडचे प्रमुख सल्लागार मा.डॉ.वेदप्रकाश मिश्रा यांच्या शुभहस्ते व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव मा.डॉ.पुरणचंद्र मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली आणि लोकसत्ता दैनिकाचे निवासी संपादक मा.श्री.देवेंद्र गावंडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे डॉ.गिरीश गांधी,शंकरप्रसाद अग्निहोत्री,अॅड फिरदोस मिर्झा, प्रेमकुमार लुनावत, विष्णू मनोहर,रूपाली मोरे,बाळ कुळकर्णी,दिलीप जाधव,शुभदा फडणवीस,अतुल दुरगकर, प्रफुल्ल गाडगे,निलेश खांडेकर,आदि मान्यवरांच्या हस्ते आदर्श उपक्रमशिल , तंत्रस्नेही शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांना स्मृतिचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ, आणि विठ्ठल रखुमाईची मुर्ती देऊन सन्मानित करण्यात आले... लोकसत्ताच्या वार्ताहरांनी ५७ शिक्षकांमधून १९ शिक्षकांची निवड करताना प्रत्येक कसोटीतून तपासण्यात आले.मगच या मानाच्या पुरस्कारासाठी पात्र ठरवले गेल्याचे लोकसत्ता दैनिकाचे निवासी संपादक मा.श्री देवेंद्र गावंडे त्यांच्या भाषणातून सांगितले.

        जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात राहून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा वाढविण्यासोबतच त्यांच्यावर सांस्कृतिक, सामाजिक,व राष्ट्रीय संस्कार घडविण्याचे अप्रतिम कार्य,तसेच शाळेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन लोकवर्गणी जमा करून शाळेची दुरूस्ती, रंगरंगोटी करून, कुणाचीही कौतुकाची थाप मिळावी म्हणून निरपेक्ष भावनेने केवळ विद्यार्थ्यांसाठीच कार्य करणाऱ्या, स्वतःला शिक्षणाच्या प्रवाहात सतत क्रियाशील ठेवणा-या , तळमळीने काम करणा-या, शासनाकडून  दुर्लक्षित राहिलेल्या १९ शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी थोर समाजसेवक शिक्षणप्रेमी डॉ, गिरीश गांधी यांनी व त्यांची विदर्भ गौरव प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने पुरस्कार सोहळा आयोजित केला होता... मिनाक्षी नागराळे यांचे हजारो शैक्षणिक व्हिडिओ युट्युब चॅनलवर अपलोड असून आतापर्यंत ८० लाख लोकांनी व्हूज दिले आहेत.त्यांचा स्वतः चिमणी पाखरं या शैक्षणिक ब्लॉगवर अनेक शैक्षणिक पोस्ट, नवनवीन उपक्रम,लिप फॉर वर्ड चा उपक्रम,चला काढुया चित्र,चला शोधूया नविन काहीतरी,असे अनेक उपक्रम वर्गात राबवत असतात.त्याच बरोबर सेल्फी विथ सक्सेस,चला वाचूया संख्या भरभर,असे आव्हान मुलांना देत ते पुर्ण करणा-या विद्यार्थ्यांसोबत सेल्फी विथ सक्सेस फोटो काढून स्टेट्स ला ठेवून विद्यार्थ्यांना प्रेरणा देतात.एकीकडे मराठी शाळा बंद पाडण्याचा डाव चालू असताना अशी एक पणती त्यांच्या विद्यार्थ्यांना प्रकाश देण्याचे कार्य करते.इतकेच नाही तक्ष त्यांचे अनेक जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी डॉक्टर,.इंजिनियर,तलाठी,ग्रामसेवक इ.पदापर्यंत पोहचले आहेत.विदर्भात वाशिम जिल्ह्याचा ठसा उमटविणाऱ्या मिनाक्षी नागराळे यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..

No comments:

Post a Comment