Thursday, 8 September 2022

दररोज बोलले जाणारे १०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 1 




1.Are You OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?


2.     Welcome. स्वागत ! सुस्वागतम !


3.     Get ready. तयार हो.


4.     Sit here. इथे बस.  इथे बसा.


5.     Who? कोण?


6.     Well done! शाब्बास ! चांगले केले.


7.     He fell.तो पडला.


8.     Hold this. हे धर. हे धरा.


9.     Leave it.  ते सोड.


10.  Run! पळ.


11.  Sit down! खाली बस ! खाली बसा.


12.  Wait here. इथे थांब. इथे थांबा.


13.  Go inside. आत जा.


14.  We saw it. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.


15.  I won . मी जिंकलो.


16.  Who am I ? मी कोण आहे ?


17.  Wow ! वाह !


18.  What's up ? काय चाललंय ?


19.  Stand up !  ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.


20.  We're shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.


21.  They won. ते जिंकले.


22.  We won. आपण जिंकलो.आम्ही जिंकलो.


23.  We talked. आम्ही बोललो.


24.  Who is it ? कोण आहे ?


25.  Use this.  हे वापर. हे वापरा.


26.  No way ! शक्यच नाही !


27.  Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?


28.  Get up ! ऊठ !


29.  Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.


30.  I know. मला माहीत आहे.


31.  Who is he ? तो कोण आहे ?


32.  I want it. मला ते हवं आहे.


33.  I'm OK. मी ठीक आहे.


34.  Listen. ऐक.


35.  Try again. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा.


36.  We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.


37.  Really ? खरंच का ?


38.  Try it on. घालून बघ. घालून बघा.


39.  Thanks. धन्यवाद.


40.  Why me ? मीच का ?


41.  I lost. मी हरलो.


42.  I saw you. मी तुला बघितलं.


43.  They lied. ते खोटं बोलले.


44.  That's it. बरोबर.


45.  Ask him त्याला विचार.त्याला विचारा.


46.  Take mine. माझे घे. माझा घे.


47.  It's new.  ते नवीन आहे.


48.  Don't ask. विचारू नका. विचारू नकोस.


49.  What for ? कशासाठी ?


50.  I shouted. मी ओरडलो. मी ओरडले.


51.  Don't cry. रडू नकोस. रडू नका.


52.  They left. ते निघाले.


53.  Who came ? कोण आलं ?


54.  Take care ! काळजी घे. काळजी घ्या.


55.  Dogs bark. कुत्रे भुंकतात.


56.  They lost. ते हरले.


57.  Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?


58.  He knits. तो विणतो.


59.  Thank you. धन्यवाद.


60.  Call me. मला फोन करा. मला बोलवा.


61.  Forget me. मला विसरून जा.


62.  He came. तो आला.


63.  Sign here. इथे सही करा.इथे सही कर.


64.  Call us. आम्हाला फोन करा. आम्हाला फोन कर.


65.  Come on ! चल ! चला !


66.  Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.


67.  He knows. त्याला माहीत आहे.


68.  Don't lie. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नका.


69.  Come in. आत ये.


70.  Forget it. विसरून जा.


71.  Take this. हे घे. हे घ्या.


72.  Fold it. घडी घाल.


73.  He left.  तो निघाला.


74.  Stay back. मागे राहा.


75.  She walks. ती चालते.


76.  I'm right. मी बरोबर आहे.


77.  Get out. बाहेर हो. बाहेर व्हा.


78.  I'm young. मी तरूण आहे.


79.  Call Dipak.दिपकला बोलव.


80.  Get down. खाली हो.


81.  Go home. घरी जा.


82.  Have fun. मजा कर.


83.  I'm fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.


84.  Sit there. तिथे बस.तिथे बसा.


85.  He runs. तो पळतो.


86.  He spoke. तो बोलला.


87.  Help us. आम्हाला वाचवा.आमची मदत करा.


88.  I'm ill. मी आजारी आहे.


89.  It's here. इथे आहे.


90.  Stay away. दूर रहा.


91.  It's me ! मी आहे !


92.  Let me go. मला जाऊ द्या.


93.  Let's ask. विचारू या.


94.  I’m Santosh.मी संतोष आहे.


95.  Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा !


96.  She cried. ती रडली.


97.  It's OK. ठीक आहे.


98.  She tried. तिने प्रयत्न केला.


99.  Me, too. मी पण. मला पण.


100.        See below. खाली पाहा.


संकलन -मिनाक्षी पांडुरंग नागराळे

Wednesday, 17 August 2022

७५ वा भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मोठ्या थाटामाटात साजरा..

 




























Friday, 10 June 2022

http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी...

http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी...:  *बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे "धाडसी राम"*          बुलढाणा जिल्ह्यातील प्रा...

Tuesday, 31 May 2022

कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी महाराष्ट्रातील समिक्षा केलेल्या पुस्तकांची यादी व लेखकांची नावे...६१ पुस्तक पुर्ण

 *कवयित्री मिनाक्षी नागराळे यांनी समिक्षा केलेल्या पुस्तकांची यादी व लेखकांची नावे*

१)वादळातील दीपस्तंभ-अरूण विघ्ने
२)जागल-अरूण विघ्ने
३) शेतकरी जगला पाहिजे- श्रीहरी येशु जाधव, उस्मानाबाद
४) अस्वस्थ स्पंदने-हिराचंद देशमाने, उस्मानाबाद
५)अंतर्मन-हिराचंद देशमाने, उस्मानाबाद
६)आभाळ पेलताना-सौ.सुमताई पवार, उस्मानाबाद
७)डिझेलगाडी-शफी बोल्डेकर, हिंगोली
८)ऐसा घडवू बालक-उषा ढेरे,बीड
९)गाठी ॠणानुबंधाच्या-सौ.संगीता पवार, बुलडाणा
१०) शिवगर्जना-शिवकवी ईश्वर मते-अकोला
११)पक्षी आणि प्राणी गाऊ त्यांची गाणी-रामदास राजेगावकर, बुलडाणा
१२)समतेचे महाकाव्य-महाग्रंथ
१३) आयुष्याच्या पानावर-अरूण पुराणिक,पुणे
१४)धाडसी राम-प्रा.देवबा पाटील
१५)नाते मनाशी मनाचे-रमेश जाधव,पुणे
१६) जीवनाच्या पायवाटेवर-प्रिती भिसे,पुणे
१७)चला खेळूया शिकूया-सोपान बंदावणे,पुणे
१८)मौनातील अर्थ-प्रा.त्रिशीला साळवे,धुळे
१९) सृष्टीकाव्य- माधुरी काकडे,पुणे
२०)प्रेमकमळ-देवबा पाटील, बुलडाणा

२१)बदबदी काठची सोनपावलं-रत्नाकर उपासे, उस्मानाबाद
२२) गावठी गिच्चा-सचिन पाटील,सांगली
२३)बिंब-प्रतिबिंब-कल्याण राऊत,लातूर
२४) शिकार(कथासंग्रह)-प्रा.डॉ.युवराज पवार,जळगाव
२५) जीवन संघर्ष-नवनाथ रणखांबे
२६)निष्पर्ण वेदना-शरद कवठेकर
२७)माझे आनंदाचे गाणे-डॉ कैलास दौंड, अहमदनगर
२८) इजू-(आत्मचरित्र)विजय वडवेराव,पुणे
२९)आम्ही माणसं मातीचे- गजानन मते, अमरावती
३०) बारीकसारीक गोष्टी (कथासंग्रह)- शिरीष पद्माकर देशमुख
३१)उजेडाच्या दिशेने निघालो-अरूण विघ्ने
३२) बाभळीचा काटा-विजय वडवेराव
३३)अक्षरबाग मधाळी-विजय वडवेराव
३४)विठुमाऊली की विठोबा-गणेश भाकरे
३५)गायी गेल्या राना-रविंद्र जवादे
३६) शब्दफुलांची शिदोरी-संतोषकुमार उईके, चंद्रपूर
३७) फुलोरा-सतीश खरात, वाशिम
३८)नभाची कोडी-प्रा.देवबा पाटील, बुलढाणा
३९)मी संदर्भ पोखरतोय-पवन नालट
४०) प्रश्न टांगले आभाळाला-नितीन देशमुख, अमरावती
४१)वात्सल्यसूक्त-प्रकाश जडे, सोलापूर
४२)ती अशीच आहे-चित्रा पगारे,मीता नानवटकर
४३)झालं कोरडं आभाळ-गणेश भाकरे, नागपूर
४४) प्राजक्त-प्रिती भिसे,पुणे
४५) नंदादीप-प्रिती जगझाप, चंद्रपूर
४६)फातिमाबी शेख-अनिसा शेख,दिलशाद सय्यद
४७)काव्यमनिषा-मनीषा रायजादे, सांगली
*बाकी*
४८)आरसा गमावलेली माणसं-विद्या प्रशांत जाधव, अहमदनगर(चालू आहे)
४९)गंमत जत्रा-स्मिता मुराळी, सोलापूर
५०) रंगनाथ तिवारी-प्रा.डॉ.दीपक सुर्यवंशी, उस्मानाबाद
५१)बा स्वातंत्र्या-शंकर घोरसे, नागपूर
५३) पिंपळ व्हायचंय मला-अरूण विघ्ने,वर्धा
५४)गावगप्पा (कथासंग्रह)-संजय महल्ले अमरावती
५५)काईमेरा(कादंबरी)-संजय महल्ले,अमरावती
५६)वारसा शिल्पकलेचा-संदीप राक्षे पुणे
५७)मधुसिंधू-माधुरी मगर/काकडे
५८) आगंतुकाची स्वगते-डॉ.कैलास दौंड
५९) अंतरातील मोरपिसे-अरूण पुराणिक पुणे
६०)बुध्द गौरवशाली मार्गदाता,चित्रा पगारे, जळगाव
६१) हिरकणी-शुभांगी पवार,सातारा


बाकी 
ओरबीन कादंबरी,गोवा



🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

बाईचं बाईपण जपणारा काव्यसंग्रह म्हणजे-हिरकणी

 *बाईचं बाईपण जपणारा काव्यसंग्रह म्हणजे-हिरकणी*

         सातारा जिल्ह्यातील आदर्श शिक्षिका ते कवयित्री शुभांगी विलास पवार( कंदी पेढा ) यांचा 'हिरकणी' हा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अजिंक्य प्रकाशन, वाशिम यांनी, तर प्रकाशक ॲड जयमला भगत यांनी प्रकाशित केले असून याची पहिली आवृत्ती २५ मार्च २०२० रोजी प्रकाशित झाली. स्त्रीचं जगणं सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे हिरकणी. या काव्यसंग्रहाचे मुल्य केवळ १५० रुपये असून यातल्या अनेक कविता स्त्रीला प्रेरणा देणाऱ्या व स्त्री जीवनाचे यथार्थ चित्रण करणा-या आहेत. या काव्यसंग्रहाला अनेक मान्यवरांच्या शुभेच्छा लागल्या असून प्रस्तावना अंजली श्रीवास्तव करमाळा यांची लाभली आहे.
                  शुभांगी विलास पवार या मुळात शिक्षिका असल्याने वाचन व लेखन हा त्यांचा अंगच आहे. स्त्री मनातील वादळे काही स्त्रियांना कागदावर लिहून व्यक्त करायला आवडतं. तर कांही स्त्रियांना नटायला थटायला आवडतं,काही स्त्रियांना शॉपिंग करायला आवडतं तर कांही स्त्रियांना फिरायला जायला आवडतं.कांही स्त्रियांना स्वतःच्या भावनांना शब्दबद्ध करून मोती गुंफायला आवडतं. अशीच होती गुंफलेल्या आहेत शुभांगी पवार या कवयित्रीने. सुंदर साध्या शब्दात व्यक्त झाल्या आहेत. प्रत्येक स्त्री ही स्वत:साठी फार कमी जगते. ती दुसर्‍यासाठीच जगते.सदैव घरच्यांची काळजी घेण्यातच आणि अनेक जबाबदाऱ्या पार पाडत स्त्री जगत असते.
            
             कुठवर सहन करायचं?
             असं दास्यत्वाचं जगणं
              हास्याची  मुखवटे चढवून
              कृत्रिमपणे वागणं....!!

           वरील ओळीतून कवयित्री शुभांगी पवार यांनी स्त्रीचं दास्यत्व कधी संपेल? कुठवर स्त्रीनेच सगळं सहन करायचं? स्त्रीला अजून कितीही यातना सहन कराव्या लागल्या तरी चेहऱ्यावर मात्र हास्याचा मुखवटा लावून कृत्रिमपणे जगायचं असतं.अशा काळीज चिरणाऱ्या या ओळी वाचकाच्या काळजाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाहीत.
     
         खरं सांगा ना मला आई बाबा तुम्ही 
         तुम्हाला कसं काहीच आपलेपण वाटलं नाही
         माझं गर्भातील अस्तित्व 'मुलगी' म्हणून खोडताना
         तुमच्या डोळ्यात टिपूसभरसुद्धा पाणी का हो दाटलं नाही.

          वरील ओळीतून कवयित्री शुभांगी विलास पवार यांनी तमाम गर्भपात करणार्‍या बाबांना हा प्रश्न विचारला आहे.केवळ मुलगी म्हणून जर मुलीचा गर्भपात किंवा हत्या करत असाल तर तो ही तुमचाच अंश आहे ना. तिची हत्या करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही. मुलगी म्हणून माझं अस्तित्व खोडताना. माझी गर्भातच हत्या करत असताना तुमच्या डोळ्यांत टिपूसभर सुद्धा पाणी दाटले नाही. असं कोवळ्या  कळ्यांना गर्भातच खुडून टाकणाऱ्या सर्व कळ्यांच्या वतीने कवयित्रीने खडा सवाल केला आहे. वरील ओळी स्त्रीची दशा आणि दिशा यावर प्रकाश टाकणाऱ्या व प्रत्येकाचं काळीज पिळवटून टाकणा-या आहेत.

          जातीभेदाचे मूळ सगळ्यांच्या 
          डोक्यात घट्ट रुजलय
          त्याचबरोबर रूढीचे तणही
          चांगलंच माजलय...!!

           अजूनही लढतोय लढाई 
           माणसातील मानवतेसाठी
           शोधतोय औषध 
           जातरुपी दानवतेसाठी....!!

             आज आपण पाहतो भारत देश माझा आहे.सारे भारतीय माझे बांधव आहेत.असे म्हणणारे लोकं जातीभेदाचे मूळ आपल्या डोक्यात घालून आपल्याला जाती धर्मांना भडकवण्याचे काम सध्या देशात सुरू आहे. प्रत्येकाने आपापले झेंडे  पकडले आहेत. त्यांचे रंगही वाटून घेतले आहेत. एवढेच काय तर महापुरुष सुध्दा वाटून घेतले आहेत. येणार्‍या पुढच्या पिढीलाही ते शिकवणार आहेत. त्याच बरोबर रूढीचे तन सुद्धा चांगलेच माजलेले दिसते.  कुणीतरी माणसांतील माणूसपण जपणारा आहे का? माणसातील मानवतेसाठी कुणी औषध शोधणार आहे का? जातरूपी दानवतेसाठी औषध मिळालं तर बरं होईल असं जळजळीत वास्तव तमाम जातीचे स्तोम मांडणाऱ्या मनुष्य नावाच्या प्राण्याला  कवयित्री शुभांगी पवार यांनी प्रश्न विचारला आहे.

        हिरकणी बनून आपल्या बाळासाठी 
       ती झाली अमर 
       आजची नारी रोजच
       लढते आव्हानांचे समर....!

          इतिहासकालीन हिरकणीचा इतिहास अख्ख्या जगाला माहिती आहे. छत्रपती शिवरायांच्या काळात हिरकणी गडावर दूध घालायला गेली आणि गडाचे सर्व दरवाजे बंद झाले होते. हिरकणी लहान बाळाला घरी सोडून गडावर दूध घालायला गेली होती आणि सायंकाळ होताच गडाचे सर्व दरवाजे बंद झाले तेंव्हा हिरकणी गडाच्या आतच राहिली आणि बाळाच्या प्रेमापोटी अवघड बुरुज उतरून खाली आली. छत्रपती शिवरायांनी या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले. तेंव्हाच्या हिरकणीचा संघर्ष ते आजच्या हिरकणीचा होणारा दररोजचा संघर्ष काही वेगळा नाही.आजच्या काळातल्या हिरकणी सुद्धा दररोज वेगवेगळी आव्हाने पेलत आहेत. स्त्रियांचा संघर्ष, बाईच बाईपण सांगण्याचा प्रयत्न शुभांगी पवार यांनी केला आहे.

         निष्पाप त्या कळीला 
         काय कळलं होतं जग 
         उमगल्या आधीच जाणवली 
        भोगवाद्यांच्या वासनांची 
         किळसवाणी धग...!!

            वरील ओळींमधून कवयित्री शुभांगी पवार यांनी एखाद्या मुलीवर वयात  येण्याअगोदरच अत्याचार होतो. तीला जगही कळलं नव्हतं. आणखीन ऐन तारुण्यात येण्याअगोदरच वासनांध कुत्र्यांनी तिच्यावर हात मारला. असे कितीतरी उदाहरणे आपण पाहतो. कोपर्डी, निर्भया अशा किती मुलींना हैवानांनी शिकार बनवून त्यांचे आयुष्य संपवले आहे. अशा लोकांची चीड संवेदनशील मनाच्या कवयित्री वरील ओळीतून व्यक्त करतात.

         जीवन जगण्याची कला 
         शिकायला हवी माणसानं 
         क्षुल्लक त्या अपयशाने
         खचू नये उगी माणसानं...!!

         जीवन जगण्याची एक कला असते. ती साधता आली म्हणजे जिवनाच सोनं झाल्याशिवाय राहत नाही. माणसाला कितीही अपयश आले तरी माणसाने कधीच खचून जाऊ नये.वा कधी हारही मानू नये.सतत प्रयत्न केले पाहिजे. तो प्रयत्न  करतो तो यशस्वी होतो.असा खूप छान संदेश कवयित्री शुभांगी पवार यांनी दिला आहे.
      खुर्चीचे डोहाळे,स्वार्थाची परिभाषा,झोपडीत या माझ्या, स्वार्थ, मोल पाण्याचे, कुठवर सहन करायचं, बाप, निष्पाप कळी, हिरकणी, गाव तसं भलं, सलगी, धरसोड नात्यांची इत्यादी कविता अत्यंत वाचनीय आहेत.
     संवेदनशील मनाच्या कवयित्री शुभांगी पवार यांनी अनेक सामाजिक, शिक्षण व्यवस्थेला बळी जाणाऱ्या स्त्रियांच्या मुक्तीवर काव्यमाला गुंफलेल्या आहेत.  
           कवयित्री शुभांगी विलास पवार यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!!

समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 27 May 2022

सुख-दु:खाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.

 सुख-दुःखाच्या आठवणींचा पसारा म्हणजे अंतरातील मोरपिसे*

                  पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध लेखक /कवी अरुण पुराणिक यांचा अंतरातील मोरपिसे हा ललित लेखसंग्रह नुकताच वाचनात आला. यापूर्वी त्यांच्या आयुष्याच्या पानावर आणि पाऊलवाट हे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहेत. अंतरातील मोरपिसे या ललित संग्रहाचे प्रकाशन आर्या पब्लिकेशन अंड डिस्ट्रीब्युटर्स पुणे, यांनी प्रकाशित केले असून त्याची प्रथमावृत्ती ३० जून २०२१ रोजी प्रकाशित झाली आहे.या काव्यसंग्रहाचे मुखपृष्ट एक मनमोहक, सुंदर मोरपीस आहे.याचे मूल्य केवळ शंभर रुपये असून प्रस्तावना श्री संजय कुळये (कवी व गझलकार) रत्नागिरी यांची लाभली आहे. अंतरातील मोरपिसे म्हणजे आठवणींचे प्रतीक, आठवणींचा कल्लोळ,आठवणींना उजाळा देणारा लेखसंग्रह, भावभावनांचा कल्लोळ म्हणजे अंतरातील मोरपिसे होय.
             लेखक/ कवी असणारे अरुण पुराणिक यांनी वयाच्या पंच्याहत्तरी ओलांडले तरीही प्रचंड उर्जेने भरलेले आहेत. अरुण पुराणिक म्हणजे एक वेगळं रसायन आहे. अरुण पुराणिक यांना कविता लेखनाचा छंद पूर्वीपासूनच  होता. त्यात व्हाट्सअपच्या माध्यमातून अनेक लेख,काव्य वाचनात आले आणि त्यांनी रोज एका नवीन विषयाला हात घालत आपल्या लेखनाचा उपयोग ललित लेख करायला सुरुवात केली. पहिल्या ललित लेखांमध्ये श्री गणेश वंदनाचे महत्व, गणेशाची प्रतिष्ठापना कशी केली जाते? सोंडेच्या अग्रभागावरून गणपतीचे पडणारे प्रकार, गणपतीच्या पूजनाचे महत्त्व,गणपती म्हणजे पती किंवा नेता. गणपतीलाच शक्ती विधायक म्हणतात. गौराईचे महत्व, गौरीपूजन, यथासांग पूजाविधी, अरुण पुराणिक यांनी सांगितले आहेत. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव याला खूप महत्व दिले गेले आहे. महाराष्ट्रात तर एकामागून एक सणांची मांदियाळी सुरूच असते. ऋतूचक्रा नुसार सण सुध्दा फिरून फिरून येतात. महाराष्ट्रात मराठी नववर्ष हे गुढी पाडव्यापासून सुरू होते. ते वर्षाअखेरीस सण म्हणजे होळी पौर्णिमा व धुलीवंदन हा असतो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढी पाडवा म्हणतात. हा वर्षातला पहिला व साडेतीन मुहुर्तातला एक सण आहे.
              तुळस तुझ्या अंगणीचे या ललित लेखांमध्ये वारकरी संप्रदाय तुळशीचे महत्त्व सांगितले आहे.आईचे महत्व मातृदेवो भव या लेखांमध्ये आईची महती देवासमान आहे असे अरूण पुराणिक यांनी सांगितले आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या उक्तीप्रमाणे आई नसलेला देव सुद्धा भिकारी असल्याप्रमाणेच आहे. असे लेखक अरुण पुराणिक म्हणतात.
              जसे दुःखामागून सुख येते आणि सुखामागून दुःख हे येतेच.सुख, शांती ही सुखाची परिभाषा या लेखात सुखदुःखाची सरमिसळ चांगल्या पद्धतीने अरुण पुराणिक यांनी सांगितलेली आहे. मनाची अवस्था या लेखात मनाला दार असतं तर..मन कसं सुसाट पळत... पळत एकेकालाही मागे टाकतो आणि दुसर्‍या क्षणी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन परत आलेलं असतं. मन हे सदैव स्थिर नसतं. अशी मनाची व्याख्या त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितली आहे.
            कवी अरुण पुराणिक यांनी मनाची अशी व्याख्या सांगितली आहे. अशीच व्याख्या ज्ञानार्जन ललित लेखात ज्ञानार्जनाची व्याख्या सांगितली आहे.ज्ञानार्जन हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाने जोपासले पाहिजे. ज्ञानाचा वटवृक्ष होऊन त्याच्या फांद्या सर्वत्र पसरण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे.त्यामुळे विचार करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. कोणतेही काम करायचे असेल तर तयारी लागते. मी आणि सायकल या लेखामध्ये अरुण पुराणिक यांनी त्यांच्या जीवनातील सायकलचा प्रवास किती सुखकर होता हे सांगितले आहे. आजच्या काळात प्रत्येक मनुष्य कोणाला कोणत्या ना कोणत्या व्याधीने ग्रासलेला आहे. आजीचा बटवा या लेखामध्ये छोट्या छोट्या आजारांवर घरगुती उपाय किती महत्त्वपूर्ण असतात? याचे महत्त्व या लेखात सांगितले आहे.
        मानवाच्या जन्मात मानवी अवस्थांचे महत्त्व जास्त असते. शेवटची अवस्थामध्ये वृध्दावस्था  आणि आजच्या काळात होऊ घातलेली वृद्धाश्रम व याची उकल मानवी अवस्था या लेखात अरुण पुराणिक केल्याशिवाय राहत नाहीत. पण मला वाटतं वृद्धावस्था ही समस्या नाही आपण जर आपल्या मुलाला चांगले संस्कार दिले वृध्दाश्रम निघणार नाहीत. संस्कार आणि नम्रता, आजी आणि आजोबा हे लेख खूप वाचनिय आहेत. पंच्याहत्तरीच्या जवळपास असलेले कवी लेखक अरुण पुराणिक यांना  वाचनाचा व लिखाणाचा छंद आहे. हे कौतुकास्पदच आहे. अरुण पुराणिक यांच्या आठवणी म्हणजे अंतरातील मोरपीस होऊन कडू-गोड आठवणीचे अंतरातील मोरपिस होय.
      कवी अरूण पुराणिक यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

 समीक्षिका /लेखिका/ शिक्षिका /कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि. वाशिम 
मोबाईल ९७६७६६३२५७

Wednesday, 25 May 2022

ग्रामिण मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे-आगंतुकाची स्वगते

 *ग्रामीण मातीशी नाळ जोडणारा काव्यसंग्रह म्हणजे- आगंतुकाची स्वगते*

        अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी डॉ. कैलास दौंड यांचा पाचवा काव्यसंग्रह नुकताच वाचनात आला. गावच्या मातीची ओढ असणारा कवी डॉ. कैलास दौंड यांच्या यापूर्वी 'उसाच्या कविता' हा पहिला काव्यसंग्रह त्यानंतर वसाण,भोग ,सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा आणि त्यानंतर पाचवा काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन चपराक प्रकाशन, पुणे, प्रकाशक घनश्याम पाटील यांनी प्रकाशित केले असून याची प्रथमावृत्ती १२ जानेवारी २०२१ रोजी प्रकाशित झाली. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ ११० रुपये असून सर्वच कविता गावाची ओढ लावणार्‍या आहेत.
             डॉ. कैलास दौंड हे गाव-खेड्यात राहणारा सामान्य माणूस पण कविता लेखनाचा छंद त्यांना २००१ सालापासून झाला. त्यांच्या अनेक कविता महाराष्ट्रातल्या नामवंत मासिक, साप्ताहिक,दिवाळी अंक तसेच अनेक दैनिक वृत्तपत्रातून सतत प्रकाशित होत असतात. या काव्यसंग्रहातील  पहिली कविता वाचकाला खूप भावते. शेतकऱ्याचे जगणं कसं असतं ? याचे चित्रण चित्रफिती सारखे डोळ्यासमोरून तरळून जाते.
       
                जमुनिया ढग आभाळात आले 
                कुणब्याचे मन वावधानी झाले 
                पावसाचे वारे फिरले बाजारी 
                कुणब्याची माय पडली आजारी..

        जगाचा पोशिंदा असलेल्या कुणब्याला ढग आभाळात आले की कुणब्याच्या मनाची अवस्था सैरवैर होते. बी-बियाणे कशाने आणायचे?  खत नांगरणी पेरणी कशाने करायची? या विचाराने शेतकरी हवालदिल होतो. जसे पावसाचे वारे येईल तसे कुणब्याचे मन बाजारी फिरून येते. कारण कुणब्याची माय म्हणजे त्याची शेती. त्यासाठी त्याच्या कडे पैसे नसले की कुणाला बी-बियाणे घेण्यासाठी सावकाराच्या व्याजाचा फास दिसायला लागतो आणि मग दुसरा पर्यायही नसतो. 'कुणब्याचे मन' हे जगण्याचा अर्थ शोधणारी कविता थेट वाचकाच्या काळजाला भिडते.

                गोंदलेले मातीवर
               बांधांचे चौकोन
               तसतसे खुजे झाले 
               माणसाचे मन 

               पाणी मातीस शोधते 
               रुजताना खोल
               अख्ख्या नदीला मिळेना 
               माणसाची ओल....!!

     वरील ओळीतून डॉ. कैलास दौंड यांनी खूप अर्थगर्भित मतितार्थ मांडला आहे. नांगरलेल्या मातीवर शेतात जसे बांध घालून त्याचे चौकोन आखले जातात. अगदी त्याप्रमाणेच आज माणसाची मनी देखील खुजी झाली आहेत. माणसाच्या मनाचा खुजेपणा स्पष्ट दिसून येतोय. आज नात्यात देखील प्रेम राहिलेले नाही. पाणी मातीत शिरताना जसे खोल खोल जाते. तसे अख्ख्या नदीत जरी पाहिलं तरी माणसाला माणुसकीची ओल मिळत नाही. माणसामाणसांमध्ये देखील मायेचा ओलावा राहिलेला नाही. अशी खंत वरील ओळीतून कवी कैलास दौंड यांनी केली आहे.

           आहे आजव मरणाची आस बाळगणार्‍या
           म्हातारीला चकवून गेला म्हातारा देवाघरी
          लेकराच्या हातावर फुटका रुपया ठेवायला 
           न धजावणारा म्हातारा 
          म्हातारीच्या हातावर देऊन गेलाय तुरी...

       समाजातलं भयाण वास्तव कवी डॉक्टर कैलास दौंड यांच्या कवितेतून दिसून येते.वृद्धपणी नको असलेलं, खंगत चाललेलं शरीर. त्यात म्हातारा म्हातारीच्या जीवाला चुटका लावून देवाघरी निघून जातो. लेकरांच्या हातावर फुटका रुपया ठेवायला न धजावणारा म्हातारा म्हातारीच्या हातावर तुरी देऊन जातो. न सांगताच म्हातारीची नजर चुकवून जातो. आज कित्येकांना वृद्धा मायबाप नकोशी वाटतात. त्या मायबापांनी स्वतः खस्ता खाऊन मुलांना लहानाचं मोठं केलेलं असतं शेवटी तेच मायबाप म्हातारपणी मुलांना ओझे वाटायला लागतात. अशी खंत वरील कवितेतून दिसून येते.
         कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अगदी ग्रामीण भागाशी, गावच्या मातीची, गावाची ओढ लावणा-या आहेत. इतकंच नाही तर समाजातील भयाण वास्तव,ढोंगीपण, माणसाचा आशावाद, शेतकऱ्याचे जीणं, नात्यांचा ढोंगीपणा, आटत चाललेला प्रेमाचा झरा, हरवत चाललेली माणुसकी, आटत चाललेली माया, गावाची ओढ सोडून शहराकडे चाललेली माणसं, कोपत चाललेला निसर्ग, वावर पडीत ठेवलं तर काय होईल ? असा विचार करायला लावणाऱ्या ओळी, मराठीची गोडी, स्वतःचा शोधणारा तळ, जीवनातले गूढ, हा गाव तुझा नाही, गावाबद्दल असणारी ओढ, गावचे वातावरण, माणसापेक्षा पक्षी थोर, इथे मानवता शहारली. इत्यादी कविता वाचकाच्या काळजाला हात घालणा-या आहेत. कित्येक पिढ्या गमावल्यानंतर ही कविता माणसाला विचार करायला लावणारी आहे. शाहु-फुले-आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणाऱ्या या सर्वच कविता वाचकाला भावल्या शिवाय राहत नाहीत.
       कवी डॉ. कैलास दौंडड यांच्या कविता दुष्काळाचा सामना कसा करावा? आज उजाड होत चाललेली गाव, राजकारणांनी नासत चाललेली गाव, विस्थापितांचे शहराकडे निघालेले लोंढे, यावर प्रकाश टाकणा-या कविता आहेत. लेकी-बाळांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण करणारे चित्र आणि जाती-जातीत गुरफटत चाललेली माणसं अशा सा-या समस्या भीषण, भयाण वास्तव  दर्शवणारे काव्यसंग्रह म्हणजे अगंतुकाची स्वगते होय.
       कवी डॉ. कैलास दौंड यांच्या सर्वच कविता अत्यंत वाचनीय व सत्यता मांडणा-या आहेत.या काव्यसंग्रहाची पाठराखण नागनाथ कोतापल्ले( माजी कुलगुरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,औरंगाबाद) यांची लाभली आहे. 
          कवी डॉ.कैलास दौंड यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समीक्षिका /लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
 मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम 
मो.९७६७६६३२५७

Tuesday, 24 May 2022

बुद्ध: गौरवशाली मार्गदाता:-जीवनाकडे सृजनात्मक दृष्टीने पहायला लावणारे पुस्तक.

*जीवनाकडे सृजनात्मक दृष्टीने पाहायला लावणारे पुस्तक म्हणजे बुद्ध:गौरवशाली मार्गदाता*

       जळगाव जिल्ह्याच्या लेखिका चित्रा पगारे यांचा बुद्ध गौरवशाली मार्गदाता हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. आपल्या विचारांवर आपण अवघे जग निर्माण करू शकतो. असे म्हणणारे, जगाला शांततेचा संदेश देणारे, तथागत गौतम बुद्ध यांचा अष्टांग मार्ग, धम्माची आवश्यकता का? बुद्धांनी सांगितलेला मध्यम मार्ग, त्यांनी सांगितलेले कर्मसिद्धांत, बुद्ध तत्त्वज्ञानाचे बहुआयामीत्व, सामाजिक समस्या व त्यावर तत्वज्ञानाचे उपयोजन, बुद्धवाणी, त्यांनी दाखविलेला मार्ग आज जगाला प्रेरक बनू शकते. मार्गदर्शक ठरू शकतो. असे या ग्रंथाचे सार आहे.
           या ग्रंथाच्या लेखिका कुमारी चित्रा पगारे या असून प्रकाशक ग्रॅव्हिटी पब्लिकेशन, अकोला यांनी प्रकाशित केले आहे.याची प्रथमावृत्ती १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पाचवे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन, अकोला येथे प्रकाशित केले आहे. मुखपृष्ठ अतिशय सुंदर, ध्यानस्थ बसलेल्या गौतम बुद्धाचे आहे. मूल्य केवळ ७० रुपये असून प्रस्तावना श्री विश्वनाथ शेगावकर (आय.ए.एस निवृत्त प्रधानसचिव तामिळनाडू राज्य) अकोला यांची लाभली आहे.
        कोरोना काळामध्ये जैविक युद्ध रुपी महाभयंकर महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडले होते.डिप्रेशन, ताणतणाव, नैराश्य,समायोजन, मानसिक अपयश इत्यादी अनेक सामाजिक समस्या उद्भवल्या होत्या.या सर्वांचा आशय लक्षात घेऊन कवयित्री /लेखिका चित्रा पगारे यांनी जगाला विश्व शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा आणि शिकवणीचा अभ्यास करण्याकडे कल धरला. त्यातूनच महत्त्वपूर्ण सिद्धांत या पुस्तकातून मांडण्याचा प्रयत्न केला. बुद्धतत्वज्ञान काळाची गरज आहे. म्हणून लेखिका चित्रा पगारे यांनी सखोल चिंतन, मनन, करून हा ग्रंथ लिहिलेला आहे.
            जगाला युध्दाची नाही तर गौतम बुद्धाची गरज आहे. या उक्तीप्रमाणे आज संपूर्ण जग कसल्यातरी भय व ताणतणावाखाली जगत आहेत.त्यात विज्ञानाने सर्व प्रकारच्या शस्त्रांची निर्मिती केली आहे.मानवाने विध्वंसाची जी साधने स्वतः निर्माण केली आहेत आणि त्यातून त्याला बाहेर पडणे गरजेचे वाटू लागले आहेत.त्यामुळे बुद्ध नीति संपूर्ण जगाला द्या. करूणा,प्रेमभाव, शांती व अहिंसेचा संदेश दिला आहे. विश्वात संपूर्ण सजिवांशी, परस्परांशी करूणाभाव ठेवणे गरजेचे आहे. म्हणून आज जगाला युध्दाची नाही तर बुद्ध धम्माची आवश्यकता आहे.
          तथागत बुद्धांनी सांगितलेल्या धम्माला विज्ञानाचा आधार आहे. धम्म हा प्रतित्यसमुत्पाद या सिद्धांतावर आधारित आहे. म्हणूनच जगातील वैज्ञानिक तथागत बुद्धाला जगाचा पहिला वैज्ञानिक म्हणून स्वीकारतात. प्रतित्यसमुत्पाद म्हणजे एका वस्तूच्या प्राप्तीवर दुसऱ्या वस्तूची उत्पत्ती होणे.तथागत गौतम बुद्धांनी प्रतित्यसमुत्पाद सिद्धांत आणि अनित्यतेचा सिद्धांत असे महत्त्वाचे सिद्धांत सांगितले आहेत.लेखिका चित्रा पगारे यांनी तथागत गौतम बुद्धाने शोधलेले मानवी जीवनातील दुःखाचे कारण खूप अभ्यासपूर्ण व तत्वज्ञान पूर्ण पद्धतीने सांगितले आहे. यामध्ये चार आर्यसत्य सांगितले आहेत. पहिले१) आर्यसत्य जगात दुःख आहे.२) दुःख निर्माण होण्याची कारणे.३) दुःखापासून मुक्त होता येते.४)  दुःखावर मात करण्याचा उपाय.
       जीवनात दुःख आहे पण दुःखावर काहीच इलाज नाही असे नाही. दुखाच्या वास्तवाला मिटवून टाकता येते. दुःखाच्या प्रत्येक व्यक्तीचा पराभव करता येतो. दु:खाना पराभूत करण्याचा बुद्धाने सांगितलेला मार्ग म्हणजे अष्टांग मार्ग होय. बुद्धाने सांगितलेला अष्टांगिक मार्ग एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. यामध्ये एकूण आठ भाग येतात. त्याला अष्टांग मार्ग (मध्य मार्ग) असे म्हणतात. यामध्ये १) सम्यक दृष्टी २)सम्यक वाचा ३) सम्यक संकल्प ४)सम्यक कर्म ५) सम्यक आजीविका ६) सम्यक स्मृती ७ सम्यक व्यायाम ८)सम्यक समाधी शब्दाचा अर्थ यथार्थ योग्य असा होतो बुद्धाने सांगितलेला मध्य मार्ग हा एक प्रकारचा जीवन मार्ग किंवा जीवन शैली आहे.
          विपश्यना ही बुद्धाने सांगितलेले बौद्ध धर्माची पद्धती आहे.हे जगाला जे महत्त्वपूर्ण तत्वज्ञान सांगितले त्यातील महत्त्वाचा विषय म्हणजे ध्यान विपश्यना. या शब्दाचा अर्थ स्वतःच्या आत डोकावणे असा होतो बुद्धांनी स्वतःच्या ध्यान पद्धतींचा अभ्यास करून अंतर्ज्ञान प्राप्त केले आहे. ही विपश्यना ध्यान पद्धति आत्मसात केल्यानंतर व्यक्ति स्वतःकडे तटस्थपणे पाहायला शिकतो.
       'अत्त दीप भव'  हा उपदेश बुद्धाने जगाला सांगितलेला आहे. आणि तो मानवी जीवनाचा परम आदर्श आहेत. मनुष्य स्वतः स्वतःचा मार्ग दीप होणं गरजेचे आहे. बुद्धाने सांगितलेल्या कर्म सिद्धांतानुसार कर्म आणि त्याचे मिळणारे फळ ही त्याची प्रतिक्रिया. हे मन, राग मुक्त लोभ मुक्त दोषमुक्त असेल तर चांगले कर्म घडून येतात. तेच मोह, लोभ, द्वेष यांच्या आहारी गेले तर वाईट कर्म घडून येतात. मनुष्याला कर्मानुसार त्याची फळे मिळत असतात. त्यासाठी मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. असं बुद्ध म्हणतात
          तथागत गौतम बुद्धांच्या अष्टांग मार्ग, तत्व सिद्धांत, त्यांचे तत्वज्ञान , बुद्धांनी सांगितलेल्या अहिंसेचा सिद्धांत लोकशाही आणि बुद्ध तत्वज्ञान आणि बुद्ध धम्म आणि समाजशास्त्र बुद्ध तत्त्वज्ञान आणि संत साहित्य यांचा संबंध विपश्यना प्रणाली व सामाजिक मानसिक शांतता सामाजिक समस्या, प्रति बुद्ध तत्त्वज्ञानाचा दृष्टिकोन बुद्धवाणी, तथागत बुद्धाने मांडलेले सुविचार,प्रेमाबद्दल मांडलेले सुविचार, कर्माबाबत मांडलेले सुविचार, शांतते बाबत मांडलेली सुविचार, बुद्धांचे प्रेरणादायी विचार आनंदा विषयीचे सुविचार, मैत्री बद्दलची शिकवण,यशाबद्दल ची शिकवण या सार्‍या मार्गदर्शक विचारांचा सखोल अभ्यास कुमारी चित्रा पगारे यांनी अभ्यासपूर्ण हा ग्रंथ निर्माण केला आहे.
        कुमारी चित्रा पगारे यांना बुद्धाचा प्रवास त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळेच तर त्या अत्यंत मौलिक व मार्गदर्शक असणाऱ्या ग्रंथाची निर्मिती चित्राताईकडून झाली हे गौरवास्पद आहे.बुद्ध तत्वज्ञान काळाची गरज आहे.म्हणून चित्रा पगारे यांनी सखोल चिंतन मनन करून हा ग्रंथ लिहिलेला आहे त्यात प्रतित्यसमुत्पाद आणि त्याचा सिद्धांत कर्मसिद्धांत बुद्धांचे अष्टांगिक मार्गाचे तत्वज्ञान, मादक पदार्थांच्या सेवनावर ईल उपाय आणि बुद्ध तत्त्वज्ञानाचे आयामीत्व इत्यादी बुद्ध विनया वर लेखिकेने केलेल्या ग्रंथाची मांडणी आकर्षक झाली आहे या सर्व बाबींमुळे हा ग्रंथ निश्चितच वाचनीय आणि संग्रही ठेवण्यासारखा आहे.
              लेखिका चित्रा पगारे यांना पुढील साहित्य निर्मितीसाठी खूप खूप शुभेच्छा 

समीक्षिका/ शिक्षिका/ लेखिका /कवियित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि. वाशिम 
मोबाईल -९७६७६६३२५७

Saturday, 21 May 2022

नवकाव्याची निर्मिती करणारा काव्यसंग्रह म्हणजे मधुसिंधू

*नवकाव्याची निर्मिती करणारा काव्यसंग्रह म्हणजे -मधूसिंधू*

       पुणे जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवयित्री सौ माधुरी काकडे यांनी संपादित केलेला प्रातिनिधिक काव्यसंग्रह म्हणजे मधुसिंधू.मधुसिंधू हा नवनिर्मिती केलेला नवीन काव्याचा प्रकार पुण्याच्या सो माधुरी काकडे यांनी संपादित केलेला आहे.महाराष्ट्रातील एकूण ३५ कवयित्रींच्या प्रत्येकी १० मधुसिंधू कविता घेऊन बनलेला सर्वच  स्त्रीया असलेला हा पहिला काव्यसंग्रह. या काव्यसंग्रहाचे प्रकाशन अनुराधा प्रकाशन पुणे यांनी केली असून मुखपृष्ठ चित्रकार रंजीत वर्मा, नांदेड यांनी अतिशय देखणे रेखाटले आहे.या काव्यसंग्रहाची प्रथमावृत्ती 12 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित झाली असून प्रस्तावना जगन्नाथ शिंदे यांची लाभली आहे. या काव्यसंग्रहाचे मूल्य केवळ दोनशे रुपये असले तरी नवीन काव्य, नवीन नव कवींना आवडण्यासारखे आहेत.
        सतत नवनिर्मिती करणा-या माधुरी काकडे यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह सुष्टीकाव्य प्रकाशित केला. त्यात सर्व कविता निसर्गावर आधारित आहेत. हा त्यांचा दुसरा प्रातिनिधिक काव्यसंग्रह असून याची निर्मिती त्यांनी केली. यात नवीन काव्यप्रकाराचा शोध माधुरीताईने लावला आहे. अलीकडच्या काळात नवनवीन कवी /कवयित्री  एकत्र येत आहेत. त्यांनी अनेक नवनवे शोध लावत, नवीन प्रकार शोधले आहेत.म्हणतात ना.गरज ही शोधाची जननी आहे. असे माधुरीताईने पूर्वीच्या पारंपारिक काव्यप्रकाराचा सखोल अभ्यास करून नवीन काव्य निर्मिती केली आणि त्याला मधुसिंधू हे काव्य नाव दिले. या काव्यप्रकारात एकूण 22 अक्षरे आहेत.त्याचे नियम असे आहेत पहिल्या ओळीत व चौथ्या ओळीत पाच अक्षरी दुसर्‍या व तिसर्‍या ओळीत सहा अक्षरे अशी एकूण २२ अक्षरे आहेत.

      शपथ घेऊ 
     वाढदिवसाला 
      वृक्षारोपणाला 
      प्राधान्य देऊ....!!

       या प्रकारे पहिल्या व चौथ्या ओळीत यमक असावे आणि दुसऱ्या व तिसऱ्या ओळीत समान यमकअक्षर असावे.तिसऱ्या व चौथ्या ओळीत विचारांची कलाटणी देण्याचा प्रयत्न केला तर रचनेचा गभितार्थ आणखीन छान दिसून येतो.
   प्रत्येक स्त्रीला तिच्या भावना असतात. त्या शब्दरूपाने व्यक्त करायला अनेक जणींना आवडते. आज समाजात आपण पाहतो चुलीपासून ते अवकाशा पर्यंत सर्व जबाबदाऱ्या पेलत स्त्रीने मजल मारली आहे. शिक्षण, शिवार, शेत, राजकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय एवढेच काय बसचा कंडक्टर ड्रायव्हर पासून ते सीमेवर शत्रूपासून संरक्षण करण्यापर्यंत महिला कार्यरत आहेत. जोपर्यंत साहित्यलेखन राहणाऱ्या अनुभवणाऱ्या हातून लिहिले जात नाही तोपर्यंत साहित्य जिवंत होत नाही मधुसिंधू तर राबणाऱ्या अनुभवसंपन्न महिलांची निर्मिती आहे.
      
           चांगले कर्म 
           आपल्या हातात 
           मोद पेरतात 
            जाणा हे मर्म....!

       वरील ओळीतून कवयित्री अनिला मुंगसे असे म्हणतात. चांगले कर्म करणे हे माणसाच्या हातात आहे. ज्याला त्याची जाणीव आहे त्याला आनंद झाल्याशिवाय राहत नाही.
    
           शब्दास धार 
           जाण्या तडीपार 
            करती निर्धार 
            कष्ट अपार....!!

       वरील ओळीतून अनुष्का गोवेकर यांनी मधुसिंधू या काव्यातून खूप छान व्यक्त झाल्या आहेत. आपल्याला जर तडीपार जायचे असेल तर आपल्या शब्दांला धार पाहिजे. आपला निर्धार पक्का पाहिजे. त्यासाठी आपण अपार कष्ट केले पाहिजेत असे कवयित्रीला वाटते.
   
          करा संगीत
          प्रकट भावना 
          शमवी यातना 
          सुरेल गीत....!!

       वरील ओळीतून कवयित्री आशा नष्टे म्हणतात की संगीताने मानवी मनातील भावना प्रकट करता येतात. आपल्या मानवी जीवनातील दुःख संगीताने नाहीसे होते. तानतनाव मनावर असला आणि सुरसंगीत ऐकले तर तणाव हलका होऊन जातो आणि मनाला मनःशांती मिळते. त्यामुळे मानवी मनाचे त्रास, दुःख, नैराश्य कमी होते.

         माणूस सुखी 
         चांगले विचार
         चांगला अचार 
         न होई दु:खी....!!

        कवयित्री कीर्ती म्हात्रे म्हणतात की माणसाला जर सुखी राहायचे असेल.समाधानी राहायचे असेल तर मनुष्याच्या ठायी चांगले विचार असले पाहिजेत. त्याचे आचरण शुद्ध व सात्त्विक असले पाहिजे. मनाने तो निर्मळ असला पाहिजे तरच त्याला दुःखाचा लवलेशही लागणार नाही. चांगले विचार असले की माणसाचे चांगलेच होते.
   
          त्याग भावना 
          ठेवा देशासाठी 
         कार्य सर्वांसाठी 
          निश्चयी बना....!!

     वरील ओळीतून कवयित्री माया देशमुख म्हणतात की माणसाच्या अंगी त्याग भावना असली पाहिजे. समर्पणाची वृत्ती असली पाहिजे. मानवाने एकजुटीने राहिले पाहिजे. प्रत्येकाचे देशाप्रती काही कर्तव्य आहेत. कांही कार्य आहेत. ते सर्वांनी मनोभावे पूर्ण केली पाहिजेत त्यासाठी निश्चित करण्याचा उद्देश कवयित्री देताना दिसून येतात.
           संसार, कष्ट, प्रगती, प्रतिष्ठान आत्या, मावशी, मामा, पोस्टमन , अभियंता, गवळण, पुरुष,पुत्र ,शेतकरी शास्त्रज्ञ आई बहिणाबाई लेख अशा व्यक्ती सापेक्ष मधून मधुसिंधूधरचना त्यांच्या फार सुंदर आणि वाचनीय आहेत. त्याच बरोबर निसर्ग, झाडे,  फळे, फुले, प्राणी, पक्षी प्रदूषण अशा निसर्गावर आधारित कविता सुरेख पद्धतीने नटून-थटून आलेले आहेत. इतकेच नाही तर महाराष्ट्राला पूर्वीपासून संतांची परंपरा लाभली आहे.त्यांची शिकवण माणसाला माणूस बनवते. अशा थोर संतांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या अनेक कवयित्रीनी संत मुक्ताबाई,संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मीराबाई, संत नामदेव, संत गोरा कुंभार, संत बहिणाबाई, संत जनाबाई, संत गाडगेबाबा अशा अनेक संतावर आधारित मधुसिंधू रचना फार सुरेख रचल्या आहेत. प्राणी,जंगल, वनस्पती,  सामाजिक जाणिवेतून समाज,देश, संस्कार, समर्पण, संविधान, संकट, समाजकारण, शिक्षण, प्रतिष्ठा इत्यादी महत्त्वाच्या विषयाला अनेकांनी हात घातला असून मधुसिंधूला 4 चंद्र लावल्या सारखेच भासतात.
      मधुसिंधू या नवीन काव्य प्रकारांमध्ये एकूण 35 कवयित्रींनी सहभागी झाल्या आहेत .350 कविता अत्यंत वाचनीय सोप्या, सुलभ, भाषेत लिहिले असल्याने या काव्यसंग्रहाचे मोल वाचकांच्या नजरेत नक्कीच वाढेल यात तिळमात्र शंका नाही सतत नाविन्याचा शोध लावणाऱ्या व इतरांसाठी सतत काहीतरी करू पाहणाऱ्या माधुरी काकडे यांनी नवीन काव्याची निर्मिती करून पुढील पिढीला एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
         कवयित्री माधुरी काकडे यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..!!

समीक्षिका/ शिक्षिका /लेखिका/ कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि. परि. प्राथमिक शाळा कोकलगाव 
ता. जि. वाशिम 
मोबाईल 9767663257

Friday, 13 May 2022

निसर्ग सौंदर्यातील अद्भुत शिल्पकलेचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे - वारसा शिल्पकलेचा

 *निसर्ग सौंदर्यातील अद्भुत शिल्पकलेचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे वारसा शिल्पकलेचा*

     निसर्गाची अत्यंत आवड असणारा निसर्गप्रेमी, प्रवासाची आवड,साहित्याची जाण, गायन, लेखन, प्रवास, भटकंती,गरजूंना मदत करणं, संवेदनशील हाडाचा शिक्षक, अभ्यासू व्यक्तिमत्व, चित्रपट निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पुणे जिल्ह्यातील आमचे मानस बंधू संदीप दादा राक्षे यांचा प्रवास वर्णन असणारे पुस्तक म्हणजे 'वारसा शिल्पकलेचा'हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. तसे राक्षे दादांना गड-किल्ले, जंगल सफारी, शिल्पमंदिरे, पुरातन वास्तू इत्यादी पाहण्याचा छंद आहे. ते पाहून इतर लोकांच्या मनात ते ठिकाण पाहण्याची उत्सुकता जागृत होते. या पुस्तकातील प्रत्येक प्रवास वर्णन मी जेंव्हा फेसबूक वर पाहते. तेंव्हा खरंच दादासोबत आपणही प्रवास करतोय असं वाटते आणि कॅमेरातले चित्र पाहिले की स्वतः पाहिल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. हे मात्र तितकेच खरे.
      वारसा शिल्पकलेचा या प्रवासवर्णन पुस्तकाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले असून मुखपृष्ठ अतिशय देखणे नजरेत साठवून ठेवणारे सुप्रसिद्ध चित्रकार 'अरविंद शेलार' सर यांनी कोरीव अशा सुंदर शिल्प मंदिराचे रेखाटले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १० मार्च २०२२ रोजी माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशित झाली असून याचे मूल्य केवळ १८० रुपये असले तरी प्रवास वर्णन करणाऱ्या, भटकंती करणार्‍या, निसर्गप्रेमी लोकांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरणारी आहे.
        सांस्कृतिक दृष्ट्या व इतिहासकालीन प्राचीन मंदिरे म्हणजे भारताचा सांस्कृतिक वारसा जपत जगाला नव्याने ओळख देणारा भारत संतांची भूमी, शूर वीरांची भूमी, समजली जाते इतर देशातील लोकं आपल्या देशात आल्यावर आपल्या भारताची माती आपल्या स्वतःच्या कपाळाला लावतात. निसर्गप्रेमी, कलाप्रेमी, शिल्पवास्तू प्रेमी असणारे संदीप दादा राक्षे यांना निरनिराळ्या शिल्पकलेची, निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, भटकंती करायला, तेथील दृश्य डोळ्यात साठवायला आणि त्यावर सुंदर प्रवासवर्णन लिहायला आवडते. जणू त्यांचा युगानयुगांचा छंदच आहे. असाच छंद वाचकाला पण प्रेक्षणीय स्थळांची उत्सुकता वाढवणारा आहे. संदीप राक्षे यांनी या पुस्तकात ऐतिहासिक वास्तू, शिल्प मंदिरे, गडकिल्ले पाहत असताना प्रामुख्याने तेथील स्थळ, समाज, रूढी,परंपरा,लोक, संस्कृती यांची माहिती करून घेत पुरातन शिल्प मंदिर व स्थापत्य मंदिर यांचा सखोल अभ्यास करीत मंदिराच्या बाह्य अंगावर शिल्पित केलेल्या सुरसुंदरी, मकतोरण, जालवातायन, रंगशीला, विज्ञान, कीर्तीमुख, गजथर,देवकोष्ठ इ. कोरण्याचे प्रयोजन समजून घेऊन त्यावर लिहिण्याचा प्रयत्न संदीप राक्षे करतात. त्यामुळे वाचकाला वाचताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा भास होतो.वारसा शिल्पकलेचा या पुस्तकात एकूण तेरा ठिकाणचे सुंदर प्रवासवर्णन मनाला भुरळ पाडणारे आहेत.
        पहिले रम्य ठिकाण म्हणजे पुण्यामधले अद्भुत त्रिशुंड गणेश मंदिर.पुण्यातील सोमवार पेठे पासून जवळच असणारे हे ठिकाण. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला ही पवित्र भूमी. पावन भूमी. अशा ठिकाणचे हे त्रिशुंड म्हणजे तीन सोंड असलेले गणेश मंदिर. जिथे सुवर्ण पाषाण त्रिशुंड गणेशाची शिल्प वास्तू.शिल्प या मंदिराचे एक खास आकर्षण अनेक वेगवेगळ्या शिल्पाकृती चा सुंदर नमुने या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीप राक्षे यांनी फोटोसहीत छापल्याने वाचकाला प्रत्यक्ष शिल्पाकृती पहावयास मिळतात. दुसरे ठिकाण म्हणजे पेडगावचा धर्मवीर गड. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरुळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट किल्ला देखभालीसाठी होता. मोगलांच्या ताब्यातून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोडवून घेतला. या किल्ल्याच्या आत उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आणि त्या मंदिरावर देखणे शिल्प कोरीव काम केलेले दिसते. याच मंदिरात लक्ष्मीनारायणाची अद्भुत कलाकृती दिसते. जिथे किरणोत्सव जूनमध्ये पाहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच वास्तू छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य स्मृती असलेले स्थळ म्हणजे धर्मवीर गड.
      तिसरे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गुप्तेश्वर. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धारासुर गावचे गुप्तेश्वर मंदिर. मंदिराची भव्यता व शिल्पाकृती पाहून कोणीही मंत्रमुग्ध होईल यात शंकाच नाही. हे मंदिर चालुक्य काळातील अकराव्या शतकातील. या गुप्तेश्वर मंदिराचे शिखर अजूनही शाबूत दिसते. चौथे ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील कुकडेश्वर शिवालय ९१०व्या  दशकात झंझ राजाने बांधलेले कुकडेश्वर शिवालय हे मंदिर हरिश्चंद्रगडावरील शिवालय प्रति बद्रिनाथ-केदारनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिमाभिमुख असलेले हे शिवालय आतून बाहेरून अनेक शिल्पांनी नटलेली आहे. रायगड जिल्ह्यातील कोथळी गडाचा प्रवास वर्णन ऐकून मन भारावून जातं. पण गडाच्या पाय-या चढायला खूप अवघड जातं. गड चढायला लेखकाला संदीप राक्षे सरांना आईचे दूध आठवत होते. त्यात सोसाट्याचा वारा गड चढू देत नव्हता अशा परिस्थितीत द्राक्षे सरांच्या सोबत असलेली बालचमू मंडळी कशीबशी गड चढून वर जाते आणि राक्षे सर खाली धबधब्याजवळ उभे राहतात.कारण निसर्गाच्या समोर माणसाचे काही चालत नाही. धबधब्याजवळ रान हळदीची पिवळीधम्मक फुले मनाला भुरळ घालणारी आहेत. या गडावर अद्भुत आश्चर्य म्हणजे वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरते ठरलेली दगडी भुयार होय.
     पुढचे दैवत कोहिंडे बु.गावचा कोहिडेश्वर. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यांमध्ये असणारे कुंडेश्वर महादेवाचे मंदिर. वनराईने नटलेले कुंडेश्वराचे डोंगर सात किलोमीटर घाटाचा रस्ता चढून मग कुंडेश्वराच्या दर्शनाला जावे लागते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे निमगिरी किल्ला. या किल्ल्यावर पूर्वीचे असे काहीच राहिले नाही. वरती फक्त छप्पर वजा मंदिर तयार केलेले आहे. त्यात गजलक्ष्मी व महादेवाची पिंड आहे पण दर्शन घेतल्यावर जी ऊर्जा मिळते ती स्वर्गसुखाचा पेक्षाही श्रेष्ठ आहे. असे संदीप राक्षे दादा सांगतात. या ठिकाणी घनदाट झाडीत ५० वीरगळी एका रांगेत आहेत.वीरगळ म्हणजे एखाद्या व्यक्तीला लढताना रणांगणावर वीरमरण तेथे त्यांच्या स्मृतीत वीरांचे दगडांच्या शिळेवर विशिष्ट प्रसंगाचे शिल्पांकन करून तो पाषाण स्तंभ स्मृती स्वरूपात जतन करणे.
   पुढचे ठिकाण आहे ओतूरच्या कपार्दिकेश्‍वराचे मंदिर. मांडवी नदीच्या तीरावर वसलेले हे तीर्थक्षेत्र पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नव्या दशकात झंझ राजाने हे मंदिर बांधले होते .अप्रतिम शिल्पाकृती व सुंदर नक्षीकाम केल्यामुळे सभागृह अत्यंत देखणे दिसत होते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे पळशीचे विठ्ठल मंदिर. पारनेर तालुक्यातील पळशी गावचे विठ्ठल मंदिर. नागर शैलीतील बांधकाम व शिल्पकाम ज्या अठरा षटकोनी शिल्पजडित  स्तंभावर उभे आहे. शाळिग्राम दगडापासून कृष्ण अवतारात बनवलेली मूर्ती अतिशय देखणी, सुंदर रूप,कमरेवर हात, गळ्यामध्ये तुळशीचे हार, कस्तुरी-टिळाच्या आकाराची कुंडले असे मनोहारी रूप माणसाच्या काळजात साठवल्याशिवाय राहत नाही. जांबचे विष्णू मंदिर तसेच काठापुरचा वाघ वाडा डोळ्यात साठवण्याचे ठिकाण. या वाड्यात छोटी छोटी आणि सुंदर नक्षीकाम केलेली ऐतिहासिक  वास्तू आणि तिची आजच्या काळात झालेली दुरावस्था. हिंदवी स्वराज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांनी हा वाडा १७५० साली बांधला होता. पानिपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ यांना वीरमरण आले. त्यानंतर मल्हारराव होळकरांनी १७६५ साली सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना दिला. त्यानंतर ते आजपर्यंत हा वाडा वाघ वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. इतक्या मोठ्या वैभवाची साक्ष देणारा हा वाडा आज अखेरचा श्वास घेत असल्याची खंत लेखक संदीप राक्षे व्यक्त करतात.
      पुढचे ठिकाण म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आपेगाव. सूर्यदेवाचे किरण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखकमलावर विराजमान झाले. ना भूतो न भविष्यति असा चमत्कार लेखक संदीप राक्षे यांनी अनुभवला. पर्यावरणाची शिल्पकलेची, ऐतिहासिक, पुरातन वास्तूंची, गड किल्ल्यांची आवड असलेला हा अवलिया महाराष्ट्रातला पहिलाच आहे असं मला वाटतं. आज पर्यंत त्यांची अनेक प्रवास वर्णन व फोटो मी त्यांच्या फेसबुक पेजला पाहत होते पण आज त्यांचे पुस्तक वारसा शिल्पकलेचा हे वाचून व आतील चित्र पाहून स्वतः प्रवास केल्याचा अनुभव मला आला. खरंच शासनाने महाराष्ट्राचा अमोल ठेवा म्हणजे ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, पुरातन मंदिरे यांचा जिर्णोध्दार  करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेही तितकंच खरं आहे.
          सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे प्रवासवर्णन असणारे 'वारसा शिल्पकलेचा' हे पुस्तक प्रत्येक घरातील मुलांना वाचण्यास द्यावे.जेणेकरून मुलांना पुरातन वास्तूची जाण होईल. यात खूप सुंदर व सखोल माहिती आमचे माणस बंधू संदीप दादा राक्षे यांनी करून दिली आहे.
           संदीप राक्षे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Monday, 9 May 2022

*दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे काईमेरा*

 *दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे -काईमेरा कादंबरी*

      विदर्भाच्या मातीत जन्मलेले प्रसिद्ध लेखक संजय महल्ले यांची विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा नुकतीच वाचनात आली. २०२०-२१ साली अख्ख्या जगावर कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले होते. लाखो जीवांचे खूप हाल झाले.लाखो जीव व्हेंटिलेटरवर न ठेवल्याने मरण पावले. स्मशानापर्यंत जायला ही जागा मिळत नव्हती. असा भयानक काळ सर्वांनी अनुभवलाय.काईमेरा म्हणजे एका महाभयंकर विषाणू ची जन्म . कथा एका महाभयंकर विषाणूच्या जन्माचे रहस्य उलगडून दाखवणारे विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा
       काईमेरा या कादंबरीचे लेखक संजय महल्ले अमरावती यांनी खूप अभ्यास पूर्वक इतिहास व चीनच्या चीनच्या मानवी महत्त्वकांक्षीची , युद्धखोर नीतीची आणि मगर राष्ट्रवादाची मराठी साहित्याला ओळख करून देणारे विदर्भाच्या मातीतून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा रूप आणि आशयाच्या विविध संकेत आसन उगवलेली काईमेरा ही पहिलीच कादंबरी असावी. या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिशिंग हाऊस , अमरावती असून लेखकांचे स्वतःचे प्रकाशन आहे.याची प्रथम आवृत्ती २६ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली. या कादंबरीचे मूल्य केवळ १५० रुपये असून याचे मुखपृष्ठ कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीचे दृश्य दाखवणारे,मास्क घातलेल्या व्यक्तीचे आहे. या कादंबरीची मांडणी अत्यंत उत्कृष्ट असून प्रस्तावना प्राध्यापक राजेंद्र राऊत यांची लाभली आहे. पाठराखण डॉ. संजय लोहकरे यांची लाभली आहे. ही कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच असून ती ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
         covid-19 च्या रूपाने अत्यंत गंभीर परिणाम सर्वच देश भोगत असताना काईमेरा ही कादंबरी समस्त वैज्ञानिक जगताला डोळेसता प्रदान करते. सामरिक स्पर्धेत चीन अमेरिकेपुढे हतबल होत असतानाच शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रो.यांग महाभयंकर विषाणूचा प्रयोग करू इच्छितात. ते अमेरिकेतील प्रख्यात व विषाणूतज्ञ डॉ. डेव्हिड यांना बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनचे प्रख्यात जैवविषाणूतज्ञ डॉ.डेव्हिड यांना चीनला बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनची प्रख्यात व्हॉयरॉलॉजिस्ट डॉ.फेन देतात. पुढे कथानक जसे जसे वळण घेत जाते तसतशी वाचकाची उत्सुकता वाढत जाते.
       जगावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या चीनचा जगाला कसा धोका होऊ शकतो?  मानवी जीवन न युद्ध करता कसे संपवता येईल?  जैविकाचे शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल? याची संपूर्ण तयारी चीन देश करीत होता. याचे सखोल चित्रण या कादंबरीत आले आहे. यांत्रिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या चीन या देशाचे सुरक्षा सल्लागार प्रो.यांग यांनी कोलंबिया विद्यापीठात ऍडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लिट करीत असताना त्यांचे अमेरिकेचे मित्र डॉ. डेव्हीड यांना चीनमध्ये संशोधन करण्यासाठी बोलावतात. डेव्हिड यांनी बरीच वर्ष त्यांचा आग्रह टाळला होता.कालांतराने डेव्हिड यांच्या यांच्या एका अतिशय संशोधनाबद्दलची चर्चा प्रो.यांग यांच्या कानावर आली.काही जातीच्या वटवाघुळामुळे जिवंत मानवी शरीराला कुजवू शकतील असे महाभयंकर घातक विषाणू असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्याचा संसर्ग झाल्यास अतिशय वेगाने पसरू शकणाऱ्या या महामारीने संपूर्ण मानवी जीवन संकटात येईल. असा इशाराही त्यांनी दिला होता. या संशोधनासाठी डॉ.डेव्हिड यांनी अमेरिकाच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेतील घनदाट जंगले ही पालथी घातल्याचे प्रो.यांग यांना समजले होते.
       प्रो.यांग यांनी तायवानवर हल्ला करून तो ताब्यात घेण्यासाठी 'ऑपरेशन १००' ही गुप्त मोहीम काढली होती. या मोहिमेत जैविक शस्त्रांचा वापर गुप्तपणे करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी प्रो.यांग यांनी डॉ.डेव्हीड यांची निवड केली होती. डॉ. डेव्हिड वर अतिविश्वास असलेल्या प्रो.यांगने जैविक युद्धाची तयारी दर्शवली होती. शास्त्रज्ञ यांना सोबत घेऊन पुरोहित यांनी एक प्लॅनिंग संरक्षण मंत्र्यांना दिलं. डॉ. डेव्हिड यांनी हॉर्स शूली दोन वेगवेगळे कोरोना विषाणू संक्रमित केले. एकाच वेळी एकत्रितपणे दिले त्यामुळे दोन विषाणूच्या युतीतून जन्माला येईल तिसरा महाभयंकर स्ट्रॉंग विषाणू काईमेरा. निसर्गात कुठेही आढळून येणार नाही असा घातक विषाणू म्हणजे काईमेरा होय.
        डॉक्टर डेव्हिड यांनी महाभयंकर विषाणूची निर्मिती केली खरी पण तो महाभयंकर न ठेवता फक्त श्वसनाचा जास्त त्रास होणाऱा विषाणू तयार केला. मला फसवलं ही बातमी जेव्हा मेजर प्रो.यांग यांना सांगितलं. तेव्हा कोणाचाच विश्वास बसेना असा झाला चिनी लष्कराने तायवान विरुद्ध ऑपरेशन 100 ही गुप्त मोहीम उघडण्याची व त्यात जैविक शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी घातक विषाणूचा शोध सुरू केल्याची कुणकुण अमेरिकेला लागली होती. त्यामुळे ते ऑपरेशन फेल करण्याची जबाबदारी गुप्तहेर डॉ.डेव्हिड यांच्यावर सोपविण्यात आली. यांनी त्यांच्या स्वभाव बद्दल माहिती होते मानवी शरीर कुजणाऱ्या विषाणूची खोटी बातमी ॉक्टर डेव्हिड यांनी पसरली आणि ऑपरेशन 100 ठेवले त्याची सर्व माहिती अमेरिकेला पुरवली. एक दिवस डॉक्टर वटवाघुळ और प्रयोग करून फरार झाले जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांचा स्वतःवरच विश्‍वास बसेना त्याची मती गुंग झाली.
      दोन देशाचा महासंग्रामात एका महाभयंकर विषाणूचा जन्म होतो.तो म्हणजे काईमेरा. संजय महल्ले यांनी तिसऱ्या महायुद्धाची जैविक आणि जैविक युद्ध करू पाहणाऱ्या चीनची पोल-खोल अतिशय सविस्तरपणे, तपशिलासह, विनोदी प्रसंग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा घातकी दुरुपयोग या कादंबरीच्या रुपाने प्रकाशित केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन काईमेरा ही विज्ञान कादंबरी साहित्य क्षेत्रातील पहिलीच कादंबरी असावी....
      प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशीच विज्ञानाधारित कादंबरी म्हणजे काईमेरा 
       लेखक संजय महाले यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

 समीक्षिका /शिक्षिका/ लेखिका/ कवियित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता. जि.वाशिम
मोबाईल -9767663257

Thursday, 21 April 2022

शाळापूर्व तयारी अभियान २०२२/२३

 https://drive.google.com/file/d/1XU8u4Xjv-l0q6auWm3I6Oe4NVvX__Bfb/view?usp=drivesdk

Friday, 8 April 2022

संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी

*संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी*

      उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रसिद्ध लेखक,प्राध्यापक एम. ए. मराठी, सेट नेट, पी.एच.डी. प्राप्त प्राध्यापक डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी सर यांचा आठ ते दहा वर्षाचा संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी नुकताच वाचनात आला. डॉ. दीपक सूर्यवंशी सर हे मराठवाड्यातील नामांकित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सर्वपरिचित आहेत. प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांनी २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने रंगनाथ तिवारी या सदर विषयावरील सखोल संशोधनासाठी पी.एच.डी. बहाल केली. फक्त पदवी मिळविण्याकरिता अनेकजण संशोधन करणारे भरपूर मिळतात. पण एका लेखकाचा अभ्यास जगाला माहित व्हावा या उदात्त हेतूने दुसऱ्या लेखकावर लिहिणारे अत्यंत दुर्मिळच आहेत. लेखक प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सरांनी संशोधनाची शिस्त पाळूनही लेखकावर प्रचंड निष्ठा ठेवून अभ्यासपूर्ण संशोधनाचे कार्य केले आहे. डॉ. सूर्यवंशी सरांनी एका व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलाच आहे पण त्यांच्या साहित्यविश्वाचाही चिकित्सक अभ्यास देखील केल्याने नवीन पिढीला व्यक्ती आणि वाॾमय ग्रंथ रंगनाथ तिवारी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरला आहे.
          रंगनाथ तिवारी या ग्रंथाचे प्रकाशन अरुणा प्रकाशन लातूर यांनी केले असून या ग्रंथाची प्रथमावृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली सुंदर व सुरेख मुखपृष्ठ सरदार जाधव औरंगाबाद यांनी लेखक रंगनाथ तिवारी व त्यांचे साहित्य खूप सुंदर पणे रेखाटले आहे. या ग्रंथाला प्रस्तावना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, लातूर यांची लाभली असून पाठराखण प्रसिद्ध लेखक भास्कर चंदनशिव यांनी केली आहे. या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अनुदान देऊन सहकार्य केल्याबद्दल ग्रंथ अधिक मोलाचा ग्रंथ वाटतो. या ग्रंथाचे मूल्य केवळ ३५० रुपये असून व्यक्ती आणि वांॾमय त्यादृष्टीने अधिक तोलामोलाचा आहे. प्रत्येक चिकित्सक व अभ्यासू व्यक्तीने आवर्जून वाचावा आणि प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असावा असाच आहे.
           या ग्रंथाचा विषय असलेले रंगनाथ तिवारी हे हिंदीबरोबरच मराठीतील प्रतिभाशाली लेखक म्हणून सर्वपरिचित आहेत. १९७० ते ८० च्या दशकात त्यांनी लेखनास प्रारंभ केला. सलग तीन दशके रंगनाथ तिवारी यांनी साहित्याची सेवा अखंडपणे केली. रंगनाथ तिवारी हे मुलत: मराठीभाषिक नसले तरी त्यांनी मराठीतून विपुल प्रमाणात लिहिले पण मराठी लेखकाकडून उपेक्षितच राहिले. रंगनाथ तिवारी यांनी कथा, कादंबरी, नाटक आणि स्फुटलेखन करून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण सहा प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात रंगनाथ तिवारी यांचे व्यक्तिमत्त्व आणि वांड़मयीन प्रवास त्यांच्या जीवनाची जडणघडण अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून मुलाखत घेऊन, त्यांच्या सानिध्यात राहून सांगितली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक, पार्श्वभूमीवर त्यावर झालेले संस्कार यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती ही खऱ्या अर्थाने त्याच्या सभोवतीच्या पर्यावरणाची निर्मिती असते.
        रंगनाथ रामदयाल तिवारी यांचा जन्म २१ जानेवारी १९३३ रोजी सोलापूर येथे संस्कृती संपन्न अशा मारवाडी कुटुंबात झाला. यांचे मूळ घराणे राजस्थानातील. तेंव्हाचे राजस्थान आजच्या इतके प्रगत नव्हते. पाऊस नसल्याने शेती पिकत नव्हती. त्यामुळे रोजगाराच्या शोधात हे कुटुंब सोलापूर येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले. रंगनाथ तिवारी बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान. त्यांना वाचन, संगीत, क्रिकेट याची खूप आवड होती. रंगनाथ तिवारी यांचा पिंडच मुळात शिक्षकाचा त्यामुळे क्लार्कची नोकरी सोडून देऊन शिक्षक झाले. अभ्यासाचा व्यासंग वाढतच होता. संपल्या सुरावटी, देवगिरी, बिलावल ही रंगनाथ तिवारी यांची कादंबरी. याचबरोबर उत्तम पुरुष एक वचन, मौनाची महासभा, गुरुदेव, बेगम समरू, अनन्वय, काया, परकाया असे अनेक साहित्य प्रसिद्ध आहे. मराठी कादंबरी विश्वात मैलाचा दगड ठरलेला वज्राघात, स्वामी, श्रीमान योगी, पानिपत या ऐतिहासिक कादंबर्‍या, परंपरेतील बेगम समरू ही रंगनाथ तिवारी यांची महत्त्वाची कादंबरी बहुचर्चित कादंबरी ठरली आहे.
          डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचा वांड़मय प्रकाराची सुंदर ओळख करून दिली आहे. लेखकाने रंगनाथ तिवारी त्यांच्या कादंबरी लेखनाची प्रमुख बलस्थाने नोंदवली आहे. कथानक, वातावरण, प्रसंग निर्मिती, निवेदन शैली, पात्र, संघर्ष आणि भाषा इत्यादी घटकांच्या माध्यमातून रंगनाथ तिवारी यांच्या कादंबरी लेखनाचा व्यापक आढावा लेखकाने घेतला आहे. रंगनाथ तिवारी यांची ऐतिहासिक कादंबरी बेगम समरू यामध्ये स्त्री जीवन किती शोषित, पीडित होते. हे खूप मार्मिकपणे मांडले आहे. याशिवाय स्वधर्म, स्वसंस्कृती, हट्टी आणि स्त्रीत्वाचा अहंकार असलेली मुत्सद्दी, राजकारणी, शारीरिक भूक आणि वखवखलेली क्रूर आणि तेवढीच प्रेमातुर अशी स्त्री जीवनाची नानाविध रूपे त्यांच्या कादंबऱ्यांमधून उभी राहतात. रंगनाथ तिवारी यांच्या उत्तम पुरुष एक वचन या कादंबरीत ताई,उमा, हौसा आणि मावशी या स्त्री व्यक्तिरेखा जागीरदार यांच्या गडीतील निजाम कालीन स्त्री जीवनाचे वास्तव प्रस्तुत व्यक्तिरेखा मधून रंगनाथ तिवारींनी समर्थपणे मांडले आहे. १९४७ नंतर मराठवाड्यात रझाकारांनी धुमाकूळ घातला. त्यांचे संवेदन गर्भ चित्रण रंगनाथ तिवारीने प्रस्तुत कादंबरीतून केला आहे.
        डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचे जीवन, जीवन संघर्ष, शिक्षण त्यांची जडणघडण त्यांचे वांड़मयीन प्रेरणा, त्यांची मुल्यदृष्टी त्यांचे चौफेर व्यासंग, त्यांच्या वांड़मयीन व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व, त्यांचे कादंबरीलेखन, मराठी वाड्मयातील कादंबरीचे अनेक प्रकार, ऐतिहासिक कादंबरीचे विशेष, क्रूर राजकारण, धार्मिक जीवन, स्त्री जीवनाचे दर्शन, साहित्यातील कलाविष्कार, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे चित्रण, त्यांची कथा लिहिण्याची विविध वैशिष्ट्ये यावर सूक्ष्मपणे डॉ.प्राध्यापक दीपक सूर्यवंशी यांनी संशोधनात्मक चिकित्सा केली आहे.
       एकाच व्यक्तीवर व त्यांच्या वाड़मयीन प्रवास सर्वांसमोर मांडण्याचा कौतुकास्पद प्रवास म्हणजे रंगनाथ तिवारी हा व्यक्ती आणि वांड़मय ग्रंथ खरंच सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे. सदरील ग्रंथ वाचताना लेखक आणि दहा वर्षे केलेली चिकित्सा जाणवल्याशिवाय राहत नाही. डॉ. दीपक सूर्यवंशी सरांची लिखाण करण्याची वेगळी हातोटी या ग्रंथामध्ये दिसून येते.
        प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!

समीक्षिका/ लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम 
मो. 9767663257

Thursday, 7 April 2022

कोल्ह्याची फजिती (मजेशीर गोष्ट)

कोल्ह्याची फजिती 



Tuesday, 5 April 2022

वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ...

 💁‍♀️वाक्प्रचार आणि अर्थ भाग 1.
1.     अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे. 

2.     अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.

3.     अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे. 

4.     अभंग असणे - अखंड असणे. 

5.     अमलात आणणे - कारवाई करणे. 

6.     अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे. 

7.     अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे. 

8.     अट्टहास करणे - आग्रह धरणे. 

9.     अवाक् होणे – आश्चर्यचकित होणे. 

10.  अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे. 

11.  अनमान करणे - संकोच करणे. 

12.  अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे. 

13.  अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे. 

14.  अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे. 

15.  अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे. 

16.  अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे. 

17.  अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे. 

18.  अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे. 

19.  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे. 

20.  अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस. 

21.  आयोजित करणे - सिद्धता करणे. 

22.  आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे. 

23.  आत्मसात करणे – मिळवणे,अंगी बाणणे. 

24.  आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे. 

25.  आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट. 

26.  आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे. 

27.  आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे. 

28.  आड येणे - अडथळा निर्माण करणे. 

29.  आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे. 

30.  आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे. 

31.  आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. 

32.  आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे. 

33.  आच लागणे - झळ लागणे. 

34.  आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे. 

35.  आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे. 

36.  आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे. 

37.  आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे. 

38.  इतिश्री करणे - शेवट करणे. 

39.  उखाळ्या-पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे. 

40.  उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे. 

41.  उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील न होता सल्ले देणे, मनापासून काम न करणे,दूरवरून निर्देश देणे. 

42.  उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे. 

43.  उदास होणे - खिन्न होणे. 

44.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे. 

45.  उताणा पडणे - पराभूत होणे. 

46.  उदास होणे - खिन्न होणे. 

47.  उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे. 

48.  उत्पात करणे - विध्वंस करणे. 

49.  उसंत मिळणे - वेळ मिळणे. 

50.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे. 

51.  उताणे पडणे - पराभूत होणे. 

52.  उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे. 

53.  ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे. 

54.  उध्वस्त होणे - नाश पावणे. 

55.  उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती. 

56.  उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे. 

57.  उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे. 

58.  उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे. 

59.  उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे. 

60.  उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे. 

61.  ऊर भरून येणे – गदगदून येणे.

 62.  उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे. 

63.  एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे. 

64.  ओनामा – प्रारंभ. अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे. 

65.  ओढा असणे - कल असणे. 

66.  ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे. 

67.  अंग धरणे - लठ्ठ होणे. 

68.  अंगावर काटा येणे - भीती वाटणे. 

69.  अंग काढून घेणे - संबंध तोडणे. 

70.  अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे. 

71.  अंगाला होणे - अंगाला छान बसणे. 

72.  अंगवळणी पडणे – सवय होणे. 

73.  अंगाची लाही होणे – अतिशय संताप होणे,खूप राग येणे. 

74.  अंगी बाणणे – मनात खोलवर रुजणे.

 75.  अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे. 

76.  अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे. 

77.  अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे. 

78.  अंगावर शेकणे – नुकसान सोसावे लागणे. 

79.  अंगी ताठा भरणे – मगरुरी करणे. 

80.  अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीनुसार खर्च करणे. 

81.  अंग चोरणे – फारच होडे काम करणे. 

82.  आंदण देणे - देऊन टाकणे. 

83.  आंबून जाणे – विटून जाणे,थकणे. 

84.  कणीक तिंबणे - खूप मार देणे. 

85.  कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे. 

86.  कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे. 

87.  कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे.

88.  कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे. 

89.  कान उपटणे – कडक शब्दात समज देणे. 

90.  कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे. 

91.  कानावर हात ठेवणे – नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे. 

92.  कान टोचणे – खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. 

93.  कानउघाडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे. 

94.  काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे. 

95.  कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे. 

96.  कानाने हलका असणे – काशावरही पटकन विश्वास ठेवणे. 

97.  कान निवणे – ऐकून समाधान होणे. 

98.  काढता पाया घेणे – विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे. 

99.  कानावर घालणे – लक्षात आणून देणे. 

100.     कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे. 

101.     काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे. 

102.     काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे. 

103.     कावराबावरा होणे – बावरणे. 

104.    कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे. 

105.    कानशिलांची भजी होणे – गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे. 

106.    काळीज उडणे - भीती वाटणे. 

107.    कुणकुण लागणे - चाहूल लागणे. 

108.    कच्छपी लागणे - नादी लागणे. 

109.     काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे. 

110.     कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे. 

111.    कूच करणे - वाटचाल करणे. 

112.    काळजी घेणे – चिंता वाहने,आस्था असणे. 

113.    कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे. 

114.    कंपित होणे - कापणे थरथरणे. 

115.    कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे. 

116.    कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे. 

117.    किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे. 

118.    कारवाया करणे – कट करणे,कारस्थाने करणे. 

119.    कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे. 

120.    कहर करणे - अतिरेक करणे. 

121.    कोडकौतुक होणे - लाड होणे. 

122.    काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे. 

123.    काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द. 

124.     कंठस्नान घालने - ठार मारणे. 

125.     काकदृष्टीने पाहाणे – अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहाणे. 

126.     कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे. 

127.     कंठ दाटून येणे – गहिवरून येणे. 

128.     कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे. 

129.    कुंपणाने शेत खाणे – ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे. 

130.    केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे. 

131.    कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे. 

132.    कोपरापासून हात जोडणे – काहीही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे. 

133.    खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे. 

134.    खपणे – कष्ट करणे,झिजणे. 

135.    खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे. 

136.    खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे. 

137.    खसखस पिकणे - मोठ्याने हसणे. 

138.    खूणगाठ बांधणे - निश्चय करणे. 

139.    खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे. 

140.    खडे फोडणे - दोष देणे. 

141.    खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. 

142.    खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे. 

143.    खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला न मिळणे. 

144.    खाल्ल्याघरचे वासे मोजणे - उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे. 

145.    खितपत पडणे - क्षीण होत जाणे. 

146.    खो घालने - विघ्न निर्माण करणे. 

147.    गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे. 

148.    गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे. 

149.    गळ्यातील ताईत होणे – अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे. 

150.    गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे. 

151.    गळ घालणे - अतिशय आग्रह करणे. 

152.    गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने. 

153.    गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे. 

154.    गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे. 

155.    गुजराण करणे - निर्वाह करणे. 

156.    गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे. 

157.    गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे. 

158.    गाडी अडणे – खोळंबा होणे. 

159.    ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे. 

160.    गट्टी जमणे - दोस्ती होणे. 

161.    गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे. 

162.    गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे. 

163.    गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे. 

164.    गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. 

165.    गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे. 

166.    गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे. 

167.    गौडबंगाल असणे – गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे. 

168.    घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. 

169.    घागरगडचा सुभेदार – पाणक्या. 

170.    घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे. 

171.    घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे. 

172.    घाम गाळणे - खूप कष्ट करणे. 

173.    घालून-पाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे. 

174.    घोडे मारणे - नुकसान करणे. 

175.    घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे. 

176.    घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे. 

177.    घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे. 

178.    चतुर्भुज होणे - लग्न करणे. 

179.    चक्कर मारणे - फेरफटका मारणे. 

180.    चाहूल लागणे - मागोवा लागणे. 

181.    चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे. 

182.    चेहरा खुलणे - आनंद होणे. 

183.    चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे. 

184.    चंग बांधणे – निश्चय करणे. 

185.    चितपट करणे – कुस्तीत हरविणे.

 186.    चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे. 

187.    चुरमुरे खात बसणे - खजील होणे. 

188.    चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे. 

189.    चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे. 

190.     चौदावे रत्न दाखवणे - मार देणे. 

191.    छाननी करणे - तपास करणे. 

192.    छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे. 

193.     जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे. 

194.     जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे. 

195.     जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. 

196.     जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलणे. 

197.     जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे. 

198.     जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे. 

199.     जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे. 

200.    जळफळाट होणे - रागाने लाल होणे. 

201.    जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे. 

202.    जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे. 

203.     जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे. 

204.     जीव अधीर होणे - उतावीळ होणे. 

205.     जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे. 

206.     जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे. 

207.     जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे. 

208.     जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे. 

209.     जिवाचा धडा करणे – पक्का निश्चय करणे. 

210.    जीव वरखाली होणे – घाबरणे. 

211.     जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे. 

212.     जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे. 

213.     जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे. 

214.     जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे. 

215.     जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे. 

216.     जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे. 

217.     जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे. 

218.    ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे. 

219.     झाकले माणिक – साधा,पण गुणी मनुष्य. 

220.     झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे. 

221.    झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे. 

222.     त्राटिका - कजाग बायको. 

223.     टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे. 

224.     टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे. 

225.     टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.

 226.    टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे. 

227.     टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे. 

228.    ठसा उमटवणे - छाप पाडणे. 

229.    ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे. 

230.     डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे. 

231.     डाळ शिजणे – थारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे. 

232.    डाव येणे - खेळात राज्य येणे. 

233.    डोक्यावर घेणे - अति लाड करणे. 

234.    डोळे फिरणे  - खूप घाबरणे. 

235.    डोळा असणे – पाळत ठेवणे. 

236.    डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे. 

237.     डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे. 

238.     डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे. 

239.     डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे. 

240.     डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे. 

241.     डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. 

242.     डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे. 

243.     डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे. 

244.     डोळे निवणे - समाधान होणे. 

245.     डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे. 

246.    डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे. 

247.    डोळ्यातून थेंब न काढणे – दु:खद प्रसंग असूनही न रडणे.  

248.    डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे. 

249.    डोळे वटारणे - रागाने बघणे. 

250.    डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे. 

251.    डोळ्यांस धारा लागणे – अश्रू वाहणे,रडणे. 

252.     डोळ्यांत खुपणे - सहन न होणे. 

253.     डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे. 

254.     डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. 

255.     डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे. 

256.     डोळे दिपवले - थक्क करून सोडणे. 

257.     डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे. 

258.     डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे. 

259.     डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे. 

260.     डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे. 

261.     तडीस नेणे - पूर्ण करणे. 

262.    तगादा लावणे – पुन्हा:पुन्हा मागणी करणे. 

263.     ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे. 

264.     तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे. 

265.     तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

 266.    ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे. 

267.    तारांबळ होणे - घाईगडबड उडणे. 

268.    ताट वाढणे - जेवायला वाढणे. 

269.    तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे. 

270.    तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे. 

271.     तिलांजली देणे – सोडणे,त्याग करणे. 

272.    तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे. 

273.    तोंडून अक्षरं न फुटणे - घाबरून न बोलणे. 

274.    तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे. 

275.    तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे. 

276.     तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे,नाहीसे होणे. 

277.     तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे. 

278.     तोंडाला पाने पुसणे – फसवणे. 

279.    तजवीज करणे - तरतूद करणे. 

280.     तळहातावर शीर घेणे - जीवावर उदार होणे. 

281.     तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे. 

282.     तोंडघशी पाडणे – विश्वासघात होणे,अडचणीत येणे. 

283.     तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे. 

284.     तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे. 

285.     तोंडसुख घेणे – दोष देताना वाट्टेल तसे बोलणे. 

286.     तोंड टाकणे – अद्वातद्वा बोलणे. 

287.     तोंडावाटे ‘ब्र’ न काढणे - एकही शब्द न उच्चारणे. 

288.     थांग न लागणे - कल्पना न येणे. 

289.     थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे. 

290.    दुमदुमून जाणे - निनादून जाणे. 

291.     दगा देणे – फसवणे. 

292.     दबा धरून बसणे - टपून बसणे. 

293.     दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे. 

294.     दात धरणे - वैर बाळगणे. 

295.     दाढी धरणे - विनवणी करणे. 

296.     दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द. 

297.     दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे. 

298.     दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे. 

299.    दक्षता घेणे - काळजी घेणे. 

300.    दडी मारणे - लपून राहणे.