Showing posts with label लेख. Show all posts
Showing posts with label लेख. Show all posts
Saturday, 26 June 2021
वड पुजायचा की जगवायचा?
Labels:
लेख
वड पुजायचा की जगवायचा? वैचारिक लेख
*वड पुजायचा की जगवायचा?*
आपल्या महाराष्ट्र देशात पुर्वीच्या काळापासून वडपूजन करण्याची प्रथा आहे.प्रथा वाईट नाही पण त्यामागचा वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेण्याची गरज आहे....या मागचे कारण,वास्तव, आणि आधुनिक विचार करण्याची खरी गरज आज आहे.कुणीतरी लावलेला पाच पन्नास वर्षापुर्वीचा वड पुजायला खूप मोठ्या प्रमाणात शे पाचशे बायका एकाच ठिकाणी वडाची पुजा करण्यासाठी चढाओढ करीत असतात... वेगवेगळ्या प्रकारच्या भारी साड्या घालून, नटूनथटून दिवसभर मिरवत असतात.वडसावित्री हा समजून घेण्याचा विषय आहे.पुर्वीच्या काळी सत्यवानाला जेंव्हा भूरळ आली होती.तेंव्हा सत्यवान बेशुद्ध अवस्थेत पडला होता.सावित्रीला वाटले सत्यवानाचा मृत्यू झाला.तेंव्हा ती परमेश्वराला प्रार्थना करू लागली...देवाचा धावा करू लागली. सत्यवानाच्या सावित्रीने सत्यवानाला ओढत वडाच्या झाडाच्या थंडगार छायेत नेलं.तेंव्हा काळी क्षणातच सत्यवानाला वडाच्या झाडाने सोडलेली शुद्ध हवा भरपूर प्रमाणात मिळाली आणि सत्यवान शुध्दीवर आला.सावित्रीला खूप आनंद झाला.तेंव्हापासून तेंव्हाची सावित्री आजच्या आधुनिक सावित्रीपर्यंत वडाला फे-या मारण्याची व वडाचे पूजन करण्याची प्रथा रूढ झाली.
कुणीतरी आयत्या लावलेल्या वडाला पूजत बसण्यापेक्षा आजच्या काळातील सावित्रीने या वडसावित्री सणाच्या निमित्ताने का होईना प्रत्येक स्त्रीने प्रत्येक वर्षी एक नविन वड लावला पाहिजे.आणि तो वड जगवला पाहिजे.कांही स्त्रीयांना या निमित्ताने पार्लर मध्ये जाऊन पैशाची उधळपट्टी करून स्वतः:चा डार्क मेक अप करून महागड्या साड्या परिधान करून जगात मी वड सावित्री पूजनाला चालले म्हणून मिरवण्याची भारी हौस...हा सण डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घालण्याचा विषय आहे.आजच्या कोरोनाच्या काळात कितीतरी कुटुंब उध्वस्त झालीत.लाखो लोकं अॉक्सिजन न मिळाल्याने मृत्यूमुखी पडले. वातावरणात वड,पिंपळ, कडुनिंब अशा वनस्पती भरपूर प्रमाणात ऑक्सिजन सोडतात.त्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. शुद्ध ताजी हवा मिळवायची असेल तर प्रत्येक स्त्रीने वडसावित्रीच्या निमित्ताने का होईना एक वड लावून त्याची पुजा करावी.राहिला प्रश्न हाच पती सात जन्म मिळावा म्हणून स्त्रिया कितीतरी श्रध्देने पूजा करतात.तर सर्वच स्त्रियांचे पती चांगले असतील हे ही आजच्या काळामध्ये सांगता येत नाही.एखाद्या बाईचा दारूडा नवरा असेल तर ती स्त्री याच जन्मी दारूड्या नव-याला कंटाळलेली असते मग ती पुढच्या जन्मी कशाला दारूडा नवरा मिळावा म्हणून पुजा करेल हा ही विषय फार चिंतनाचा आहे.कांही स्त्रिया विधवा महिलांना जाणिवपूर्वक हिच्यात.त्यांच्यासमोर मुद्दाम मोठमोठ्याने बोलत मी सौभाग्यवती म्हणत चला चला वड पुजायला म्हणत मिरवत असतात.बिचा-या विधवा महिलांचं तिथं खच्चीकरण होतं.त्या उदास उदास राहतात.एक महिलाच दुस-या महिलेला नकळत हिणवत असते.खरी महिला तीच जी दुसऱ्या महिलेचं दुःख समजून घेते.खरी सौभाग्यवती तीच जी विधवा स्त्रियांना हळदी कुंकूवासाठी प्रथम बोलावते.जो पर्यंत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आधुनिक विचार रूजणार नाहीत तो पर्यंत अशा प्रथा बंद होणार नाहीत.चांगले करणारे एखादीच व्यक्ती असू शकते.मग चांगले कार्य करण्यासाठी इतर लोकं बदलतील तेंव्हा मग मी बदलेन हे सोडून द्यावे.चांगल्या कार्याची सुरुवात स्वतःपासून सुरुवात करावी...कोवीड काळात ज्या महिलेचा पती वारला आहे अशा महिलेला वडसावित्रीनिमित्त आर्थिक मदत केली तर त्या महिलेचा आशिर्वाद नक्कीच मिळेल.
चल चल सये आज
करू वडाचे वृक्षारोपण
आधारवड जिवनाचा
मिळेल भरपूर ऑक्सिजन....!!
वृक्षसंवर्धन करूया गं
संतुलित राहील पर्यावरण
वड, पिंपळ, कडुनिंब लावू
होईल सा-या रोगांचे हरण...!!
चल चल सये आज
एक शपथ घेऊया
प्रत्येकीने एक वड लावून
त्याला मोठे करूया.....!!
मिळेल शुद्ध, हवा पाणी
ऐकू येतील पक्ष्यांची गाणी
घेऊ आधुनिक विचारसरणी
पुसू दुखितांच्या डोळ्यांचे पाणी...!!
चल चल सये आज...वडाला जगवूया...!!
वड पुजायचा की जगावायचा हे प्रत्येक स्त्रीने ठरवायचे आहे.एखाद्या गावात पाचशे महिला असतील तर त्या प्रत्येकीने ठरवलं की मी वर्षाला एक वड,पिंपळ, कडुनिंब लावणार.तर वर्षाकाठी एका गावात पाचशे वड जगतील...दहा वर्षात पाच हजार वड जगतील.आणि भरपूर प्रमाणात ऑक्सिजन मिळेल.भरपूर पाऊस पडेल.पक्ष्यांना निवारा मिळेल.नानाविध प्रकारचे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येईल.अन्यथा परिस्थिती फार भयानक होणार आहे.आज कोरोना काळात ऑक्सिजन विकत घ्यावे लागते.पुढच्या काळात कदाचित ऑक्सिजन' सिलेंडर ची गरज भासणार नाही.पाणी विकत घ्यावे लागणार नाही.भरपूर पाऊस पडेल.दुष्काळाचा सामना करावा लागणार नाही.सुखसमृध्दी आनंदाने डोलत राहील.मानवाची भरभराट होईल.जंगलतोड करू नका...झाडे लावा झाडे जगवा...मग ही वड सावित्रीच्या निमित्ताने फक्त बायकांनीच लावायची का? अजिबात नाही...पुरूषांनीही जर वडसावित्रीदिवशी एक वड लावला तर फार मोठे नुकसान होणार नाही.उलट पर्यावरण चांगले राखण्यासाठी आपण एक खारीचा वाटा उचललात.यापेक्षा मोठे वास्तव नाही...मोठी प्रतिज्ञा नाही...
लेखिका/कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
मो. ९७६७६६३२५७
Labels:
लेख
Saturday, 13 March 2021
खरी विद्येची देवता सावित्रीमाई फुले...
*खरी विद्येची देवता- सावित्रीमाई फुले*
ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म बाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.
सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
१ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.
शिका शिका रे विद्या शिका
मनूचे काही ऐकू नका !
कोणी मागे राहू नका
विद्या शिकूया ज्ञान घेऊया
एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!
या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.
फुले असूनी काटे वेचिले
घेतला शिक्षणाचा ध्यास
तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!
सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या.
धोंडे मुले देती| नवसा पावती|
लग्न का करती | नारी नर ||
दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
तुझ्या कार्याचा वेलू
मी गगनाला नेईन
तुझ्या विचारांचे गुट्टी
मी विद्यार्थ्यांना देईन
तुझ्या कार्याची भाऊ
किती गाऊ गौरवगाथा
धन्य धन्य ती साऊ
तुझचरणी विनम्र माझा माथा...!!
जय ज्योती....
जय क्रांती....
जय सावित्रीमाई....!!
*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७
Labels:
लेख
Tuesday, 2 March 2021
उडनपरी-कालची 'ती' आणि आजची 'ती' भारताची सुवर्णकन्या - हिमा दास
*उडणपरी-कालची 'ती' आणि आजची 'ती'*
*भारताची सुवर्णकन्या-हिमा दास-गोल्डन गर्ल*
पूर्वीचा एक काळ होता. त्या काळात स्त्री फक्त चूल आणि मूल करत होती. सावित्रीच्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. स्त्रियांना शिक्षण मिळत नसे. शिक्षणाची मक्तेदारी फक्त उच्चवर्णीयांकडेच होती. क्रांतीज्योती सावित्रीआई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अखंड समर्पक सेवेमुळे आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेताना आपल्याला दिसत आहेत.आजच्या सावित्रीच्या लेकींनी आकाश कवेत घेतले आहे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रियांनी हे जग व्यापून टाकलं आहे.
"आकाशाला कवेत घे
अशी तू भारतीय नारी
प्रयत्नांनी घे गरुडभरारी
दे उद्याला यशाची ललकारी....!!"
या वरील उक्तीप्रमाणे कालची 'ती' ने आजच्या 'ती' ला पार बदलून टाकले आहे. आज प्रत्येक क्षेत्रांमध्ये अनेक स्त्रियांनी बाजी मारलेली आहे. आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे -काल परवाच उडीसा सरकारने जिल्हा (डीएसपी) पोलिस उपअधीक्षक बनवले आहे. असे जिचे कर्तुत्व, भारताची उडानपरी,भारताची सुवर्णकन्या म्हणून अख्ख्या जगाला जी ची ओळख झाली ती 'हिमा दास' होय. जिला गोल्डन गर्ल म्हणून आज ओळखले जाते. ही भारताची पहिली सुवर्णकन्या ठरली आहे. ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू पी. व्ही.सिंधू, जागतिक स्पर्धेतील पदक विजेता कुस्तीपटू बजरंग पूनिया यांच्या मागोमाग आता गोल्डन गर्ल 'हिमा दास' हिच्यामुळे जगात भारताची मान या सावित्रीच्या लेकीमुळे आज अभिमानाने उंचावली आहे.
हिमा दास हिचा जन्म ९ जानेवारी २००० मध्ये आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी या छोट्याशा गावात झाला. तिचे वडील रणजीत दास आणि आई जोनाली दास हे भात शेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वात लहान आहे. तिचे शिक्षण धिंग पब्लिक स्कूलमध्ये झाले. लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पण श्याम शुक्ल हक यांच्या सूचनेवरून हिमा दास ने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षक प्रशिक्षक शहा यांनी तिच्या नागाव स्पोर्ट्स असोसिएशन च्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमादास नंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाली. आणि तिने या क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली.ही स्पर्धा २०१८ मध्ये 'आशियाई क्रीडा स्पर्धेत' महिला ४०० मीटर धावणे मध्ये रोपे पदक मिळविले. या स्पर्धेत मिश्र रिले ४×४०० मीटर मध्ये रोप्य पदक मिळविले.आणि २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला रिले ४×४०० मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. तेंव्हा भारत सरकारने हिमा दास यांना अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यांनंतर IAAF जागतिक २० वर्षांखालील अजिंक्यपद स्पर्धेमध्ये महिला ४०० मीटर मध्ये हिमाने एक सुवर्णपदक जिंकले.आणि २०१९ मध्ये विविध स्पर्धेमध्यें खालीलप्रमाणे यश संपादन केले.
पदक. २०१९मधील विविध स्पर्धा. महिला
सुवर्ण पोझनान ॲथलेटिक्स. २००मीटर
सुवर्ण कुत्नो ॲथलेटिक्स स्पर्धा, . २०० मीटर
पोलंड महिला
सुवर्ण टाबोर स्पर्धा, महिला २०० मीटर
चेक प्रजासत्ताक
सुवर्ण क्लादनो स्पर्धा, महिला २०० मीटर
चेक प्रजासत्ताक
सुवर्ण नोव मेस्टो ग्रांप्री,
चेक प्रजासत्ताक महिला ४०० मीटर
अशा अनेक स्पर्धेत एकूण सहा सुवर्णपदक व दोन रोप्य पदक मिळवणारी हिमा दास ने बालपणीचे स्वप्न पूर्ण केलं.
"जिंकण्याची उमेद हवी
हरण्याची तमा नसावी
सातत्य व प्रयत्नांनी
जिंकण्याची जिद्द असावी....!!"
अशा प्रसिद्ध धावपटू हिमा दास ला २६ फेब्रुवारी २०२१ मध्ये आसाम पोलीस विभागात वयाच्या एकविसाव्या वर्षी पोलीस विभागात उपअधीक्षक डीएसपी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. लहानपणी पाहिलेले पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न आज अखेर यशस्वी झालं. कालची 'ती' आज 'पोलीस अधिकारी पदावर' फक्त तिच्या कर्तृत्वाने सिद्ध झाली आहे. हिमा दास यांना आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. गुवाहाटीत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात पोलीस महासंचालकांसह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला त्या वेळी हिमादास म्हणाल्या "मी लहानपणापासून पोलीस अधिकारी बनण्याची इच्छा होती मी हे स्वप्न पाहिलं होतं. शालेय दिवसापासूनच मला पोलिस अधिकारी व्हायचं होतं. माझ्या आईचे देखील हेच स्वप्न होतं. आई मला दुर्गापूजेच्या काळात खेळ म्हणून बंदूक घ्यायची आई म्हणते "पोलिसांची कामे करून मी चांगले माणूस बनावं"
हिमा दासचं जेवढं कर्तृत्व तेवढंच दातृत्व सुद्धा दिसून येते. हिमा दास ने पहिला पगार कोरोना संकट काळासाठी आसाम सरकारला दान देणार आहे. इतकच नाही तर २०१८ मध्ये हिमा दास चा अपघात झाला. त्यावेळी तिला जबर दुखापत झाली होती. तरी १८ महिन्यांच्या कालावधीनंतर हिमा दास ने पुन्हा खंबीरपणे आपले ध्येय साध्य करण्यासाठी, नवीन ऊर्जेने उभी राहिली. पहिल्या स्पर्धेत २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.इंडियन ग्रा.पी. २ च्या महिला गटात तीने हे यश मिळविले. आसाम मध्ये जेव्हा पूरस्थिती आली होती. तेंव्हाही हिमाने अर्धा पगार पूरग्रस्तांसाठी मदत केली होती. एका शेतकर्याच्या मुलीने खूप संघर्ष करीत सामाजिक व स्पोर्ट्स क्षेत्रात देशाचे नाव जगात मोठे केले. या हिमा दास ला कुणी उडनपरी म्हणून ओळखतं, तर कुणी सुवर्णकन्या म्हणून ओळखतं, तर कुणी गोल्डन गर्ल म्हणून ओळखतं...
"ध्येय साध्य करण्यासाठी
उत्तुंग भरारी घेऊया
परिस्थितीवर मात करण्या
बाणा करारी ठेऊया....!!"
आजच्या काळातील तरुण मुला-मुलींनी हिमादास चा आदर्श घ्यायला पाहिजे. अशा करारी बाण्याच्या सावित्रीच्या लेकीला, सुवर्णकन्येला, गोल्डन गर्लला मानाचा मुजरा...
खरं तर हा उत्सव तिच्या आत्मसन्मानाचा उत्सव फक्त एका दिवसाचा नसून सदैव तिच्या अस्मितेचा, तिच्या करारी बाण्याचा उत्सव ३६५ दिवस मनवला गेला तरी तोडकेच....!!
सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
लेखिका/समिक्षिका/शिक्षिका/संपादिका/कवयित्री
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७
Labels:
लेख
Saturday, 13 February 2021
*वीरांगना झलकारीबाई*
*थोर विरांगना झलकारीबाई*
देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारी इतिहासकालीन थोर विरांगणा म्हणजे झलकारीबाई. जिचे नाव आजही बऱ्याच स्त्रियांना माहिती नाही. झलकारी बाईचा जन्म उत्तर प्रदेशातील झांसी जवळच्या भोजला या छोट्याशा गावात कोळी समाजामध्ये झाला. वडील सदोवा सिंह आणि आई यमुना देवी यांच्या पोटी २२ नोव्हेंबर १८३० रोजी त्यांचा जन्म झाला. झलकारीबाई खूप छोटी असतानाच बालपणी त्यांच्या आईचा मृत्यू झाला. वडिलांनी त्यांना मुला प्रमाणे सांभाळले. स्वसंरक्षणाचे सर्व धडे झलकारीबाईना देऊ लागले. तलवार चालवणे, घोड्यावर बसणे, भाला फेकणे, अशा सर्व युद्ध कौशल्यात झलकारीबाई पारंगत झाल्या.
झलकारीबाई शूरवीर, धाडसी, पराक्रमी योद्धा होत्या. एकदा झलकारीबाई जंगलात गेल्या असताना अचानक त्यांच्यासमोर वाघ आला. वाघ भुकेने व्याकुळ झालेला डरकाळी फोडत धावत झलकारी बाईच्या अंगावर चवताळून येणार इतक्यात झलकारीबाईनी कमरेला अडकवलेली कु-हाड वाघावर भिरकावली. तेवढ्यात वाघ रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला. स्वतःचे रक्षण करणारी धाडसी स्त्रीचा इतिहास वाचला तरी आजच्या काळातील स्त्रियांच्या अंगावर काटा येतो. इतकेच नाही तर एक वेळ चोरांनी एका व्यापार्याला लुटलं होतं. तेव्हा झलकारीबाई वाऱ्याच्या वेगाने घोड्यावर बसून त्या चोराच्या दिशेने जाऊन त्यांच्या सोबत लढाई करून सर्व चोरांना सळो-की-पळो करून सोडले. आणि लुटलेला माल तिथेच टाकून आपला जीव मुठीत घेऊन चोर पसार झाले.झलकारीबाईच्या शौर्याचे किस्से पंचक्रोशीत सर्वदूर पसरले होते.
झलकारी बाईचा विवाह तोफखान्याचे काम करणाऱ्या शूर सैनिक पुरणसिंग यांच्याशी झाला. झलकारी बाईच्या धाडसाचे, शौर्याचे किस्से राणी लक्ष्मीबाई ऐकून होत्या. एकवेळ पूजेच्या समयी दोघींची भेट झाली. आणि काय आश्चर्य राणी लक्ष्मीबाई अचंबित झाल्या. झलकारीबाई दिसायला हुबेहूब त्यांच्यासारखीच होती. नंतर राणी लक्ष्मीबाईने स्त्री लष्करात झलकारीबाई यांना सामील करून घेतले. पुढे झलकारीबाई त्यांची मुख्य सल्लागार बनल्या.
१८५७ च्या युद्धात जनरल ह्यू रोज या इंग्रज अधिकाऱ्याने अफाट सैन्यानिशी झांसीवर आक्रमण केले.२३ मार्च १८५८ मध्ये सैन्यानिशी झांसीवर आक्रमण करण्यासाठी दाखल झाले. त्यावेळी राणी लक्ष्मीबाई पेशव्यांकडून मदतीची अपेक्षा धरत बसल्या होत्या. पण कोणाचीही मदत मिळाली नाही. एवढ्या बलाढ्य सेनेपुढे आपला टिकाव लागणार नाही. असे राणी लक्ष्मीबाईंना वाटू लागले. कारण तात्या टोपे हे जनरल ह्यु रोज कडून पराभूत झाले होते. बघता बघता इंग्रजांचे सैन्य झाशीमध्ये पोहचले. इतक्यात झलकारीबाई ने राणी लक्ष्मीबाईचे प्राण वाचविण्यासाठी स्वतः राणीच्या वेशात समोर आली. व जोरदार लढाई सुरू केली. तोपर्यंत राणी लक्ष्मीबाई निसटून पळून जाण्यासाठी वेळ मिळाला. इकडे युद्धात झलकारीबाई राणी लक्ष्मीबाई सारखा वेश परिधान केल्याने व दिसायला हुबेहूब लक्ष्मीबाई सारखी दिसत असल्याने लढाई सुरू केली.आपण राणी लक्ष्मीबाईशींच लढत आहोत याचं भ्रमात इंग्रज राहिले. तेवढ्यात झलकारीबाई जनरल ह्यु रोज यांना भेटण्यासाठी गेल्या. इंग्रजांना मोठा आनंद वाटला की झांसी तर आपल्या ताब्यात आली आहे. पण त्यांची राणी सुद्धा आपल्या ताब्यात आली. तेवढ्यात तिथला एक सैनिक झलकारीबाई यांना ओळखत होता त्यांनी सांगितले की ही राणी लक्ष्मीबाई नसून त्यांची सैनिक झलकारीबाई आहे. तेवढ्यात राणी लक्ष्मीबाई सुखरूप स्थळी जाऊन पोचल्या होत्या.
जनरल ह्युजने झलकारीबाईना एक प्रश्न विचारले तो असा ....तुमच्या सोबत काय करायला पाहिजे? त्यावर मनाने खंबीर असणाऱ्या झलकारीबाईने उत्तर दिले की.... मुझे फासी दे दो | झलकारीबाईचे इतके साहस पाहून ह्यु रोज प्रभावित झाला आणि म्हणाला .... "यदि भारत की एक प्रतिशत महिलांये भी उसकी जैसी हो जाये, तो ब्रिटिश सरकार को जल्द ही भारत छोडना पडेगा |
अशी धाडसी विरांगणा अखेरपर्यंत इंग्रजांविरुद्ध लढत राहिली. त्यातच त्यांना वीरमरण आले. जेव्हा इंग्रजांना माहिती झाले की ज्या महिलेने त्यांना युद्धात सळो कि पळो करुन सोडले होते ती महिला राणी लक्ष्मीबाई नसून झलकारी राणी होती. तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला...भारत सदा ही अशा नारींचा सन्मान सदैव करेल...
कवी मैथिलीशरण गुप्त यांनी तिच्या शौर्याचे वर्णन अशा प्रकारे केले आहे.
"जाकर रण में ललकारी थी |
वह तो झांसी की झलकारी ती |
गोरों से लढना सिखा गयी |
है इतिहास मे झलक रही
वह भारत की ही नारी थी |"
अशा या महान विरांगणेचा भारत सरकारने २२ जुलै २००१ रोजी झलकारी राणीच्या स्मरणार्थ पोस्टात एक तिकीट काढले आहे. त्यांचे स्मारक अजमेर,राजस्थान व उत्तर प्रदेश सरकारने एक प्रतिमा आग्रा येथे स्थापन केली आहे. लखनऊमध्ये झलकारीबाई वर एक हॉस्पिटल उघडण्यात आले आहे. अशा या महान विरांगणीचा इतिहास आजच्या काळातील सर्व स्त्रियांना माहीत असला पाहिजे. ८ मार्च जागतिक दिनाच्या निमित्ताने अशा धाडसी विरांगणेला माझा मानाचा मुजरा....!!
सर्वांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
झलकारीचे शौर्य घे
घे जिजाऊचे संस्कार
आकाशाला कवेत घे
कर सावित्रीचे स्वप्न साकार....!!
घे अहिल्येचा कणखर बाणा
मुक्ता साळवेचे धाडस घे
रमाईचा त्याग शिक जरा
ताराराणीची कार्यकुशलता घे....!!
अन्यायावर मात करण्या
कधी तानुबाई बिर्जे हो तू
अंध:काराला दूर सारण्या
हो कधी दिव्याची वात तू.....!!
फातिमॉं बी सारखी तळमळ ठेव
रख्माबाई राऊत सारखी सेवा कर
सावित्रीची खरी लेक हो तू
अन्यायावर उठून प्रहार कर....!!
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
फोन ९७६७६६३२५७
Labels:
लेख
Saturday, 23 January 2021
शापित भूमीतून साकारले हिँदवी स्वराज्य...
Labels:
लेख
Saturday, 2 January 2021
विद्येची खरी देवता -सावित्रीआई फुले...
*खरी विद्येची देवता- सावित्रीमाई फुले*
ज्या काळात स्त्रियांना फक्त चूल आणि मूल सांभाळावे लागायचे. स्त्री शिकली की धर्म वाटला.स्त्री शिकली की पाप वाटायचे. अशा काळात अनेक संघर्ष करत सावित्रीमाईंनी आपल्या अंगावर शेण,चिखल, दगड-गोटे, खरकटे पाणी लोक फेकत असत तरीही न डगमगता, न घाबरता साऊंनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. त्याच्यामुळेच आज भारतातल्या स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली झाली आहेत. ती सावित्रीआई म्हणजे खरी विद्येची देवता आहे. सावित्रीमाईचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलां नाव खंडोजी नेवसे पाटील. आई सत्यवती नेवसे पाटील. सावित्रीआई अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. त्यावेळी ज्योतिरावांचे वय फक्त १३ वर्ष होते. तर सावित्री आईचे वय फक्त ९ वषाचे होते.पूर्वीच्या काळी बालविवाह पद्धत होती.सावित्री आईचे सासरे गोविंदराव फुले हे फुरसुंगीचे गोरे होते. परंतु पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली. म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांचे फुले हे आडनाव पडले. जोतिबांचे लहानपणीच आईचे छत्र हरवले त्यामुळे त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. त्यांची मावस बहीण सगुणा-आऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला सगुणाऊ एका इंग्रज अधिकाऱ्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या त्यामुळे त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग ज्योतिरावांना प्रेरित करण्यासाठी केला.
सावित्रीआईंना लग्नापूर्वी एका ख्रिश्चन मिशनऱ्यांनी एक पुस्तक भेट दिले होते. ते लग्न झाले यावर सावित्री आईने सोबत आणले होते.त्यावरून ज्योतिबांना एक नवा मार्ग सापडला आणि त्यांनी सगुणाऊ व सावित्री दोघींनाही शिक्षण दिले.
१ जानेवारी १८४८ रोजी बुधवार पेठेतील पुणे येथे भिड्याच्या वाड्यात सावित्रींना शाळा सुरू करून दिली. आणि एक नाही, दोन नाही तर तब्बल वीस शाळा सुरू केल्या. सावित्रीच्या अंगावर कर्मठ लोकांनी शेण फेकले, खरकटे पाणी फेकत, सर्व त्रास सहन करीत आपल्या निश्चयाच्या मार्गांवरून तसूभरही त्या डगमगल्या नाहीत. कारण ज्योतिबाची खंबीर साथ होती.आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया उंच भरारी घेत आहेत. फक्त सावित्रीमाईमुळेच.त्याकाळी विधवा स्त्रियांना समाज जगू देत नव्हता.सावित्री नसती तर आजही विधवा स्त्रियांना आपला जीव गमवावा लागला असता आणि सर्व मुलं सांभाळत राहावं लागलं असतं. पण एका गोष्टीचे वाईट वाटते. जेवढ्या स्त्रिया शिकून मोठ्या पदावर गेल्या ख-या पण आजही व्रतवैकल्यांच्या मागे लागलेल्या आपणांस पाहायला मिळतात. भोंदू बाबा, महाराज,बुवा,बापू इ.ची पूजाअर्चा,व्रत-वैकल्य,उपासतापास यामध्ये गुरफटलेल्या आहेत.खरी पूजा मानवसेवा. खरा धर्म म्हणजे सत्य हाच धर्म. मानव हाच देव जोपर्यंत स्वीकारून सत्यशोधक होणार नाहीत तोपर्यंत सावित्रीमाईनी केलेल्या कष्टाचे चीज होणार नाही. १८८४ मध्ये पुण्यात आलेल्या हंटर कमिशन पुढे सर्व जाती-धर्माच्या बारा वर्षाखालील मुला मुलींना प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करण्याचा आग्रह धरला.
शिका शिका रे विद्या शिका
मनूचे काही ऐकू नका !
कोणी मागे राहू नका
विद्या शिकूया ज्ञान घेऊया
एक होऊया, स्वावलंबी होऊया...!!
या उक्तीप्रमाणे अस्पृश्य लोकांना शिक्षण देऊन मुलांना शाळेत पाठविण्यासाठी आग्रह करीत.सावित्रीने शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.शूद्रातिशूद्र, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन या ध्येयपूर्ती ने झपाटलेल्या सावित्रीमाईंची विचारशक्ती व प्रतिभा प्रगल्भ होती. शिक्षणामुळेच पशुत्व नष्ट होते आणि मनुष्यत्व येते. असे साऊला वाटायचे. शिक्षण हे समाज परिवर्तनासाठी आहे असे सिद्धांत मांडणाऱ्या सावित्रीमाईच आद्य भारतीय शिक्षिका, पहिल्या मुख्याध्यापिका व प्रथम शिक्षिका होत्या. त्या काळामध्ये सावित्रीला ज्योतिबाची खंबीर साथ होती. त्याकाळात शाळा बांधायला ना कुठले अनुदान होते. ना कुठला साधील खर्च होता. सावित्रीबाईंना पगार नव्हता. म्हणून सावित्रीआई हीच खरी विद्येची देवता आहे. म्हणून मी तिला सावित्रीबाई न म्हणता सावित्रीआई म्हणते. आणि माझ्या शाळेतील सर्व विद्यार्थी सुद्धा सावित्रीआई, सावित्री माता, क्रांतीज्योती असे म्हणतात.
फुले असूनी काटे वेचिले
घेतला शिक्षणाचा ध्यास
तुझ्यामुळेच शिकलेल्या नारी
आणि सुरू झाला शिक्षण प्रवास...!!चे
सावित्रीमाई फक्त शाळा काढून थांबल्या नाहीत. तर काही ब्राम्हण विधवा स्त्रिया त्या काळी गरोदर होत्या. त्या विहिरीत जीव देण्यासाठी जाऊ लागल्या. अशा शंभर स्त्रियांना अभय देऊन त्यांची बाळंतपणे सुद्धा सावित्रीमाईंनी केली. पूर्वीच्या काळी फार विचित्र प्रथा होत्या. पती मरण पावल्यावर त्यांच्या पत्नीचे केशवपन करून त्या स्त्रियांना आयुष्यभर कुठलेही धार्मिक कार्य करण्यास बंदी असायची. सावित्री माईंनी या वाईट प्रथांना आळा घालण्यासाठी न्हाव्याचा संप घडवून आणला. एवढेच नाही तर एकूण १८९६ या दुष्काळात हजारो लोकांना मोफत अन्नछत्र चालवले सावित्रीआई स्वतः भाकऱ्या करून लोकांना जेऊ घालत.
जोतिबांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. आणि सावित्रीमाईंनी ते चालवले. बालहत्या प्रतिबंधक गृहातल्या सर्व अनाथ बालकांना सावित्रीमाईनी आपलीच मुले मानली. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले.त्याचे नाव यशवंत ठेवले. तोच पुढे डॉक्टर झाला. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीमाईंचा मोठा सहभाग होता. महात्मा फुले यांच्या निधनानंतर ही सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा सावित्रीआईने आपल्या खांद्यावर पेरून धरली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केले.त्या काळातल्या प्रसिद्ध कवयित्री,थोर लेखिका सावित्रीमाई होत्या.त्यांनी काव्यफुले,बावनकशी, सुबोध रत्नाकर, हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. इ.सन १८९६-९७ ला पुणे परिसरात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेऊ लागला. हा आजार संसर्गजन्य असल्याने ब्रिटिश शासनाने संभाव्य रुग्णांना स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यावरून उद्भवणारे हाल ओळखून सावित्रीमाईंनी पुण्याच्या ससाने माळरानावर दवाखाना सुरू केला.त्या रोग्यांना व कुटुंबियांना आधार देऊ लागल्या.रोग्यांची सेवा करताना सावित्रीआईंनाही प्लेग ची लागण झाली. त्यातच १० मार्च १८९७ रोजी त्यांचे निधन झाले.
ज्योतिराव यांच्या निधनानंतर सुद्धा सतत सात वर्ष सावित्रीने घेतलेला वसा त्यांचे कार्य अविरत चालू ठेवले. डगमगून किंवा धीर सोडून रडत बसल्या नाहीत. तर संघर्ष करीत समाज सेवा अखंड करत राहिल्या. सावित्रीआईंना इंग्रजी सुद्धा खूप छानपणे येत होती. इंग्रजीचे ज्ञान सर्वांनी घ्यावी असे त्यांना मनापासून वाटायचे.अंधश्रद्धेवर सुद्धा कडाडून टीका करणाऱ्या सावित्री या ख-या विज्ञानवादी विचारसरणीच्या होत्या.
धोंडे मुले देती| नवसा पावती|
लग्न का करती | नारी नर ||
दगडाच्या मूर्तीला नवस करून जर मुले होत असतील तर लग्न करायची गरजच काय ? असा सवाल त्यांनी देवभोळ्या लोकांना केला आहे. सावित्री होत्या म्हणून आज आम्ही शिकलो आणि स्पर्धेच्या युगात टिकलो. आज स्वतःच्या पायावर उभे आहोत. माझ्या आयुष्यात कितीही अडचणी आल्या तर मला सावित्रीचा संघर्ष आठवतो आणि मला लढण्याचे, जगण्याचे बळ मिळते. आज शिकल्या सवरलेल्या महिला मोठ्या पदावर आहेत पण आजही त्यांच्या पायामध्ये, हाताला काळा दोरा बांधलेला आहे.आजही व्रतवैकल्यांमुळे तिचे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होत चालले आहे. इथेच खरंतर विचार करण्याची गरज आहे.सावित्रीआईचे विचार डोक्यावर घेऊन मिरवण्यापेक्षा डोक्यात घातले पाहिजे.तुझ्या विचारांची गुट्टी मी माझ्या विद्यार्थ्यांना नक्कीच पाजणार आहे.
तुझ्या कार्याचा वेलू
मी गगनाला नेईन
तुझ्या विचारांचे गुट्टी
मी विद्यार्थ्यांना देईन
तुझ्या कार्याची भाऊ
किती गाऊ गौरवगाथा
धन्य धन्य ती साऊ
तुझचरणी विनम्र माझा माथा...!!
जय ज्योती....
जय क्रांती....
जय सावित्रीमाई....!!
*©️®️लेखिका कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो ९७६७६६३२५७
Labels:
लेख
Wednesday, 16 December 2020
अशी मायेची माणसं...!!
अशी मायेची माणसं
अशी मायेची माणसं
कुठं गेलीत निघून
जीव कासावीस होई
फोटो तयांचा बघून....!!
कोण फिरवील हात
मन येतसे भरून
कोण करील गं लाड
गेले दिवस सरून......!!
उसावल्या त्या नात्यांना
कोण शिवून देईल
कसे स्वार्थाने भरले
कधी समज येईल.....!!
कसा ओढतोय जीव
आईवडीलांचा फार
किती खाऊनिया खस्ता
सोसलासा सारा भार ....!!
नाही वेळ कुणा आज
नाही राहिले ते प्रेम
बदलली ती माणसं
सारे झाले आता सेम....!!
काळवेळ बदलला
आपुलकी रे दिसेना
नात्यानात्यांतच तेढ
माणुसकी ना वसेना...!!
नशिबाचा खेळ सारा
जन्मदाते हिरावले
येई सदा आठवण
डोळे आज पाणांवले....!!
अशी मायेची माणसं
पुन्हा कधी भेटतील
साचलेल्या दुःखासही
कधी कवेत घेतील...!!
किती देऊ आर्त हाक
कधी परत येणार
दुरावल्या या जिवाला
कधी जवळ घेणार.....!!
कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
Labels:
लेख
Saturday, 5 September 2020
जातीय विषमतेवर प्रहार करणारी- मुक्ता साळवे"
मुक्ता साळवे यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन....
"जातीय विषमतेवर प्रहार करणारी- मुक्ता साळवे"
सावित्री ज्योतिबांच्या शाळेतील पहिली दलित विद्यार्थिनी...
शिक्षणरत्न महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीआई फुले यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे मातंग समाजातील लहुजी साळवे यांची नात म्हणजे मुक्ता साळवे होय. मुक्ता साळवे यांचा जन्म ५ सप्टेंबर १८४३ मध्ये झाला.गंज पेठेत वास्तव्यास असणारी अवघ्या दहा- अकरा वर्षाची मुक्ताबाई ज्योती सावित्री च्या शाळेत १८४८ मध्ये दाखल झाली. ही घटना ऐतिहासिक ठरली. कारण मुक्ताबाई चा जन्म अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीत झाला.अस्पृश्य समाजातील एक मुलगी ज्ञान संपादनासाठी सत्यशोधकांच्या शाळेत प्रवेश करते आणि नुसती मुळाक्षरे गिरवून आकडेमोड करून न थांबता सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे पहिले सत्यशोधक निबंध लिहून उगवत्या बुद्धिजीवी वर्गाची भागीदार बनते. ही एक ऐतिहासिक व क्रांतिकारी गोष्ट आहे.
मुक्ता साळवे यांनी लिहिलेला निबंध जातिव्यवस्थेने लादलेल्या दुःखाबद्दल, समाजव्यवस्थेने लादलेल्या स्थानाबद्दल, तर स्पृश्य-अस्पृश्यतेवर प्रहार करणारीआहे. सत्यशोधक संस्कारामुळे मुक्ताला इतिहास, धर्म,संस्कृती, याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. १८५५ मध्ये ज्ञानोदय च्या अंकात १५ फेब्रुवारी व १ मार्च च्या अंकात तिचा निबंध प्रसिद्ध झाला. या निबंधातून मुक्ताची सत्यशोधक लेखन शैली व विचारपद्धती प्रतीत होते.मुक्ताने तिच्या निबंधातून स्त्रियांचे दुःख, दलितांच्या होणाऱ्या कत्तली याबद्दलचे विवेचन मांडले. आहे मुक्ता साळवे म्हणजे विषमतेवर प्रहार करणारी धाडसी वृत्तीची स्त्री... त्या निबंधात लिहितात ब्राम्हण लोकं म्हणतात कि इतर जातीने वेद वाचू नयेत.याचा अर्थ आम्हास धर्मपुस्तक नाही मग आम्ही धर्म रहित आहोत का ? तर हे भगवान आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग?
शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञाती बांधवांना शिक्षण घेण्याचे आव्हान या निबंधात केले होते.मुक्ता साळवे पुढे म्हणतात अहो दारिद्र्य आणि पडलेले मांग महार लोकंहो तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हज-या घेतात त्या बंद होतील.तर आता उठून अभ्यास करा.दलित जातीवरील गुन्हेगारीच्या शिक्षक या विषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते अवघ्या तेरा चॏदा वर्षाची मुक्ता डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निबंध लिहून विषमतेविरुद्ध प्रहार करते. अवघ्या दीड पानाच्या लेखनात तिने जाती, पुरूषसत्ताक समाजातील शोषणाचे धागेदोरे उलगडून दाखविले. सत्यशोधकी बना हे तिच्या निबंधाचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाचे सार्वत्रीकरण झाल्याशिवाय खरेखुरे समाज परिवर्तन होऊ शकत नाही. हे मुक्ताने जाणले होते. आपल्या समाजाला आजार झाला आहे. म्हणून ज्ञानरूपी रगुट्टी दिली पाहिजे असे उपायही मुक्ताने सुचवले आहेत.
१३,१५ वर्षे वयाच्या मातंग समाजातील या विद्यार्थिनीने निबंध लिहिला व सदर निबंध तत्कालीन वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध झाला होता. इंग्रज सरकार मधील मेजर कँडी यांनी सण १८५५ मध्ये मुक्ताचा पुण्यात सत्कार केला होता. या निबंधात मेजर कँडी यांनी महागडे चॉकलेट आणले होते. मुक्ताने नम्रपणे चॉकलेट स्वीकारण्यास नकार दिली व म्हणाली sir please " give us good books not chocolate's धर्माचा किडा वळवळ करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. धर्मचिकित्सेचे धाडस दाखवत, सामाजिक विषमता, महिलांचे शोषण, याविरुद्ध निबंधातून आवाज उठवला आहे. आज एकविसाव्या शतकातही ऑनर किलिंग, बलात्कार, जाती-धर्माच्या नावावर होणारी हिंसा अशा अनेक घटना घडत असताना मुक्ता साळवे यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही.
अशा धाडसी सत्यशोधक लिखाण करणाऱ्या व पहिली निबंधकार असणाऱ्या मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....
*लेखिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
ता.जि.वाशिम....
Labels:
लेख
Friday, 17 July 2020
आत्महत्या नको... जगायला शिका... वैचारिक लेख
Labels:
लेख
Tuesday, 14 July 2020
कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योद्धा वीर बाजी पासलकर
Labels:
लेख
स्वातंत्र्य देवता राजमाता जिजाऊ
*स्वराज्य संकल्पीका राजमाता जिजाऊ मासाहेब*
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी.... या उक्तीप्रमाणे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या पूर्ण विश्वामध्ये एक कर्तबगार स्त्री म्हणून ओळखल्या जाते जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सकाळी सहा वाजता सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नांव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव होते. जिजाऊंना अगदी लहान वयात मध्येच वयाच्या दहाव्या वर्षी सर्व शिक्षणामध्ये पारंगत झाल्या होत्या. त्यांना अनेक भाषा त्याकाळी अवगत होत्या. सर्व युद्धकलेचे शिक्षण जिजाऊनी घेतले होते. अख्या विश्वामध्ये एका वीर पुरुषाची वीर आई म्हणून राजमाता जिजाऊ माँसाहेब ओळखले जातात.... जिजाऊंना युद्ध शिक्षण, राजनीति, भाषा, अनेक खेळ, समाजशास्त्र, अर्थशास्त्र युद्धशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रात पारंगत केले होते. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला....
त्या काळामध्ये महाराष्ट्रावर आदिलशहा, निजामशहा यांच्या स्वा-या होवून लढाया होत होत्या.तो काळ फार अंधाधुंदीचा होता.जिकडे तिकडे स्वैराचार माजला होता.स्त्रीया सुरक्षित नव्हत्या,ना रयत सुरक्षित होती...ते रयतेवर जुलूम करायचे.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित घर नव्हते. सगळीकडे अन्याय माजला होता.हे सर्व पाहून जिजाऊंना सतत वाटायचे आपले स्वराज्य निर्माण करायचे....शहाजी राजांची साथ होतीच. बाल शिवबाला अगदी लहान वयापासूनच जिजाऊंनी शूरवीरांच्या,रामाच्या, महाभारताच्या ,भिमाच्या, अभिमन्यू च्या कथा सांगितल्या. न्याय-निवाडा कसं करायचं छत्रपती शिवरायांना जिजाऊ सांगत असत इतकंच नाही तर त्यांना अगदी लहान वयापासून झाडावर चढणे, दांडपट्टा फिरवणे, भाला फेकणे धावत्या घोड्यावर बसणे,तलवारबाजी चालवणे इत्यादी युद्ध कलेमध्ये निपून करण्यासाठी जिजाऊ मासाहेब स्वतः शिवरायांना शिकवायच्या... त्यांचे शिक्षण त्यांना येणाऱ्या सर्व भाषा याकडे सुद्धा लक्ष द्यायच्या अगदी लहान वयापासूनच न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शिवबांना गादीवर बसवायच्या.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत....एवढेच नाही तर जिजाऊ मासाहेब शिवबांना म्हणायच्या भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र..... श्रीरामचंद्रांनी दृष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधव यांचे पूर्वज श्रीकृष्ण त्यानेसुद्धा दुष्ट कंसाचा ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील तु सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या या उद्देशाने शिवरायांना हुरूप यायचा... रामकृष्ण,भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवायच्या हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण सुद्धा लढावे त्यांनी दुष्टाचा नाश केला तसा आपण सुद्धा करावा आणि प्रजेला सुखी करावे आपण न्यायी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटायचे आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे....
शहाजीराजे निजामशाहीत लढाया करत वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानगा शिवबा शिकत होता. शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते त्यांनी बंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना संस्कृतमध्ये तरबेज केले. त्याचबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात मावळे ठेवले अंदाधुंदी चा काळ संपला आणि जिजाऊ शिवराय शिवनेरीच्या मातीत बाल शिवबा खेळत जिजाऊ पुण्यात राहू लागल्या आसपासच्या लोकांना ते समजले आणि त्या लोकांना मोठा धीर आला. जिजाऊनी सर्व लोकांना जवळ बोलावून दिलासा दिला. अनेक लोक पुण्यामध्ये येऊ लागले आणि शेतावर जाऊ लागले जिजाऊनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागले गाव लोकांनी गजबजू लागले अंधश्रद्धेच्या भीतीने लोकांनी गाव सोडून गेलेले होते पुण्यामध्ये काही कर्मट लोकांनी एका विशिष्ट जागेवर पहार रोवून त्याला फाटकेतुटके खेटर, फाटका झाडू बांधून टाकले होते. याशिवाय जाहीर दवंडी दिली होती की या भूमीवर कोणी वस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा निर्वंश होईल. अशी अंधश्रद्धा त्या काळामध्ये पसरवली गेली होती. या धार्मिक दहशतवादाला व अंधश्रद्धांना जिजाऊंनी प्रथम लाथ मारली....सोबत तरुण मावळ्यांची पोरं एकत्र करून ती पहार जिजाऊने उपटून फेकले आणि त्याच जागेवर सोन्याचा नांगर लावून ती जागा ताब्यात घेतली.... आणि या जागेवर लाल महाल बांधला अंधश्रद्धांना फाटा देणाऱ्या कर्मकांडांना लाथाडून अंधश्रद्धेमध्ये अडकवून ठेवणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवला... राजमाता जिजाऊंनी त्या काळामध्ये अनेक स्त्रिया पतीचे निधन झाले की त्याच चितेमध्ये उडी मारून आपला जीव द्यायच्या.... सती जात होत्या अशा स्त्रियांना सती जाण्यापासून विरोध केला त्यांना रोखलं आणि अशा स्त्रियांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या मुलाबाळांत घालवण्यासाठी आवाज उठवला...प्रचार सुरू केला अशा लोकांचे उद्बोधन केलं....कोणाला ही पती वारल्यानंतर जास्त गरज ही आधाराची,मायेची असते हे समजून सांगितले....कितीतरी बहिणींना त्यांच्या मनाविरुद्ध सती जायला भाग पाडणा-या भटांचा खरपूस समाचार घेतला..आणि कितीतरी लहान मुलांना त्यांची आई मिळवून देत अशा अनिष्ठ रूढी परंपरा, अंधश्रद्धा अशा गोष्टींना थारा न देता अशा गोष्टींचा प्रखर विरोध करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ ह्या त्या काळातील एक धाडशी, धैर्यवान कर्तृत्ववान स्त्री म्हणून आदर्श आहेत. त्या काळांमध्ये अंधश्रद्धा लाथाडून दिली नसती तर कदाचित आजचे पुणे शहर हे त्या जागी कधीच बसले नसते. एक शापित भूमी मधून राहिले असते बाल शिवबाला तयार करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी सर्व प्रकारचे बळ एकत्रित केले अनेक किल्ले घेण्यासाठी बाल शिवबांना प्रवृत्त केलं एक-एक किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंचा विचार घ्यायचे आणि त्या अनुषंगाने लढाया करायचे. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ म्हणायच्या "स्वराज्याची किल्ले ही आपली खाजगी मालमत्ता नाही" याची प्रखर जाणीव त्यांनी करून दिली जिजाऊने राजनीतीचा अवलंब करून शहाजीराजांची मुक्तता केले आणि स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्य स्थापन करायचं स्वराज्य हे माझं स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं" असं शिवाजी महाराजांना सांगितलं स्वराज्य निर्मितीसाठी कोणतेही नाते, कोणतीही भिंत नाही स्वराज्य निर्मिती हे जिजाऊंचे एकमेव स्वप्न ठरले होते. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊंनी निर्माण केला होता. अशा प्रचंड जिद्दीची व करारी बाण्याची जिजाऊ स्वराज्यनिर्मितीसाठी तयार झाली. शिवबा तयार नसते तर स्वतःच्या हाती तलवार घेऊन जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली असती. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊ माँ साहेबांच्या मध्ये होता एकवटला होता. त्यासाठी त्यांनी राजनीतीचा अवलंब करून स्वराज्याचा पसारा वाढवत गेल्या. सर्वांचे सहकार्य मिळावे म्हणून शिवबाचे एकूण आठ विविध कुटुंबात वैवाहिक संबंध जोडले.... त्यामुळे आठ शूरवीर घराणे भोसले घराण्यांशी जोडले गेले पुण्याच्या नैऋतेला 64 किलोमीटर वर कानद खो-यात तोरणा किल्ला जिंकला आणि याच किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले....
अफजल खानाच्या भेटीसाठी शिवबास प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत पाठवणा-या जिजाऊ ह्या खरंच एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून अख्ख्या विश्वाला वंदनीय अशाच आहेत त्यावेळी जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की शिवबा अफजलखानाला कडून जर तुला काही दगाफटका झाला तर आम्ही बालशंभूला गादीवर बसून राजकारभार करेन. इतकी धाडसी,कर्तुत्वान स्त्री जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही.
"हीच जिजाऊ जीच्या प्रेरणेने उजळे स्वराज्यज्योती
हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती"
याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये व बाल संभाजींना घडवण्यामध्ये त्यांना आकार देण्यामध्ये राजमाता वीर माता जिजाऊ मासाहेबांचा हात आहे वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी राजांनी पन्हाळगडावर बुधभुषण नावाचा संस्कृत,राजकीय सामाजिक स्वरूपाचा ग्रंथ लिहिला शंभूराजांनी एकूण चार ग्रंथ लिहिले एवढा प्रचंड बुद्धिमान भाषापंडित शूरवीर,करारी, मुत्सुद्दी, बुद्धिवान, निर्व्यसनी, जिद्दी छत्रपती संभाजीराजे तयार केले त्यांना सर्व शिक्षण माँसाहेब जिजाऊंनी दिले एवढेच नव्हे तर आपली नातसून म्हणजेच महाराणी येसूबाई यांना सुद्धा धर्मनीती, राजनिती,संस्कृत, युद्धनीती या सर्व बाबीवर या सर्वांचे शिक्षण जिजाऊंने दिले होते. छत्रपती संभाजी राजांनी नखशिक, सातसतक नायिकाभेद या तीन ग्रंथांची रचना केली. शंभुराजासारखा आदर्श, कवी,साहित्यिक,पहिली तोफ निर्माण करणारा, शूरवीर, पराक्रमी,मुद्सुदी ,एकही लढाई न हारणारा, आदर्श राजा शोधुनही सापडणार नाही....
अशा साहसी,धाडसी, कर्तृत्ववान , वेळप्रसंगी हाती तलवार धरून अन्यायाचा प्रतिकार करणा-या आदर्श मातेचा आदर्श समस्त स्त्रीयांनी घेण्यासारखा आहे....
१७जून १६७४रोजी माँसाहेब जिजाऊ यांचा स्मृतिदिनी विनम्र अभिवादन....
*लेखिका/ कवयित्री -कु. मीनाक्षी विजयाई पांडुरंग नागराळे,
जि.प.प्राथ.शाळा कोकलगाव ता.वाशिम
जिल्हा-वाशिम*
---
Shared using https://www.writediary.com/getapp
Labels:
लेख
Monday, 13 July 2020
देव तारी त्याला कोण मारी.... मुलगी वाचवा... लेख.... स्वाभिमानी छावा मध्ये प्रकाशित
Labels:
लेख
Thursday, 2 July 2020
कृषितज्ञ वसंतराव नाईक...
Date: 30 Jun 2020
*कृषीतज्ञ -वसंतराव नाईक*
महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व कृषीतज्ञ वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ मध्ये महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव राठोड असे होते.परंतु त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी गहुली खेडे वसविले होते. पुढे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजेच पुढारी झाले. चतुरसिंग यांचा मुलगा फुलसिंग यांना राजूसिंग व हाजूसिंग अशी दोन मुले झाली. हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले. वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले .वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे खेड्यात झाले. पुढील शिक्षण अमरावतीमध्ये घेऊन नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून पदवी घेतली व नंतर एल. एल. बी.ही पदवी मिळवली. विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची छाप पडली होती.
१९४३-४७ मध्ये पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. १९४६ मध्ये पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.१९५२-५६ मध्ये पहिल्या निवडणुकीत ते मध्यप्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. १९५६ नंतर राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबईच्या द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात १९५७ मध्ये कृषिमंत्री झाले. १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. पण कन्नमरावांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने १९६३ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.या पदावर त्यांनी बारा वर्षे काम केले या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.
प्रथमत: त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल? याकडे लक्ष दिले. रोजगार हमी योजना याचे बरेचसे श्रेय वसंतरावांना जाते.नव्या शेती तंत्राला चालना देण्यात आली, संकरित बी बियाणे वाटप बरोबरच, पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेला प्रोत्साहन देण्यात आले, पशुपालन, कुक्कुटपालन उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आले,कृषी विद्यापीठाची स्थापना, कृषिमालाच्या भावावर नियंत्रण, एकाधिकार धान्य खरेदी,शेतीमालाला किंमत ई.यासाठी धोरण आखण्यात आले. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले. त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन खूप व्यवहारी होता. शेतीविषयक त्यांना तळमळ होती. दारूच्या हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचार विनिमय करून सोडवत. त्यांना शेती व शिक्षण या दोन गोष्टीत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या विशेषत: पाझर तलाव व वसंत बंधारा त्याच्या निर्मितीचे श्रेय त्यांना जाते 20 फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज व सवलती देण्यात आल्या. शेतीक्षेत्रातील वसंतराव नाईक यांचे योगदान अतुलनीय आहे. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहणार आहे. वसंतराव नाईक यांच्या कार्याला मानाचा मुजरा...
विनम्र अभिवादन...
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा
कोकलगाव
ता.जि.वाशिम.
Labels:
कृषीतज्ञ वसंतराव नाईक,
लेख
Monday, 22 June 2020
फक्त पाच दिवसांत केल्या १०० ऑनलाईन टेस्ट... उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुहाचा अनोखा उपक्रम...
Date: 17 May 2020
*राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहाचा अनोखा उपक्रम*
*फक्त पाच दिवसात केल्या शंभर ऑनलाइन चित्ररूप टेस्टची निर्मिती*
सध्या करणामुळे राज्यात "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या धर्तीवर राज्यातले अनेक टेक्नोसॅव्ही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी वर्क फ्रॉम होम साठी ऑनलाईन धडे देत आहेत. घरी रहा सुरक्षित रहा या अनुषंगाने "राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका" समूहाने त्यांच्या समूहात वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करुन तंत्रस्नेही बनण्यासाठी प्रयत्न करत एक अनोखा विक्रम शिक्षिका भगिनींनी करून दाखवला आहे.
तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज असल्यामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जिद्द मनात ठेवणाऱ्या उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका व समूह प्रशिका कुमारी मीनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम यांनी या समूहात एका हप्त्यात एक कार्यशाळा ठेवून समूहातील शिक्षिकांना तंत्रज्ञानाचे धडे देत त्यांना तंत्रज्ञान अवगत करून देण्याची संधी निर्माण करुन दिली आहे.
उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहाची निर्मिती २०१७ मध्ये झालेली असून आजपर्यंत या समूहावर अनेक उपक्रम व अनेक कार्यशाळा घेण्यात आलेले आहेत.यामध्ये लॉकडाऊन पिरेडमध्ये या महिन्यातली *पहिली कार्यशाळा* ४ मे २०२० ला ब्लेंड कॉलेज ॲप द्वारे शैक्षणिक साहित्य निर्मिती कशी करायची? याचे तज्ञ मार्गदर्शन समूहाच्या समूह प्रशासिका कु. मीनाक्षी नागराळे, वाशिम यांनी ऑनलाइन कार्यशाळा घेतली. त्यात समूहातील सर्व शिक्षिका भगिनीने आवडीने सहभागी होत प्रतिसाद नोंदवून साहित्याद्वारे म्हणी,कोडी ,समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादीचे उदाहरणे तयार करून ही साहित्य तयार करून त्याची पीडीएफ बनवून ती फ्लीप बुकसाठी शेअर करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पर्यंत पालकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
*दुसरी कार्यशाळा* -दुसरी कार्यशाळा समूहात दिनांक ११ मे २०२० रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत जळगावच्या तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती सोनाली मधुकर साळुंके यांनी घेतली आहे. त्यांनी गुगल फॉर्मवर चित्रांचा वापर करून ऑनलाईन टेस्ट कशी तयार करायची? याची कार्यशाळा खूप छान पद्धतीने घेतली त्यामुळे समूहातील अनेक जिल्ह्यातील शिक्षिका भगिनींना सहभागी होता आले. आणि प्रत्येकीने एक नमुना चाचणी तयार करून दाखवली.समूह प्रशासिका कु.मिनाक्षी नागराळे यांनी श्रीमती सोनाली साळुंखे यांचे आभार मानले.
"अवघे होऊ तंत्रस्नेही" या उक्तीप्रमाणे बघता-बघता समूहातील सर्व शिक्षिका भगिनींना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. व अवघ्या पाच दिवसात एकूण शंभर चाचण्या तयार करून एक अनोखा उपक्रम करून दाखवला आहे. या उपक्रमामुळे केंद्रप्रमुख नामदेव सरदार सर वाशिम यांनी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. आतापर्यंत या चाचण्या राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत. चाचणी सोडवल्यानंतर क्षणातच रिझल्ट पाहता येतो. किती गुण मिळाले ? हे विद्यार्थ्यांना पटकन दिसत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा "work from home" ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालकांना समाधान वाटत आहे.
तिसरी कार्यशाळा-सुचिता कुलकर्णी जालना या तज्ञ मार्गदर्शक म्हणून दिनांक १८/५/२०२० ला फ्लीप बुक तयार करण्याची कार्यशाळा घेणार आहेत.
फक्त पाच दिवसात १०० चाचण्या तयार करण्यासाठी राज्यातल्या अनेक तंत्रस्नेही शिक्षिकांनी पुढाकार घेऊन या अनोखा उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये मीनाक्षी नागराळे वाशिम (समुह प्रशासिका) सोनाली साळुंखे जळगाव,सुचिता कुलकर्णी जालना, उषा ढेरे बीड, शीला अनासपुरे, माधवी सातूनकर, प्रतिभा पगारे, टेंकाळे ए.ए., रेणुका काटकर,जया कुलथे, प्रिति रामढवे,भावना पाटील, मनीषा सोळसे, अनिता जाधव, सुनिता जाधव, अर्चना वैद्य, सुनीता पवार,योगिता लोखंडे, साधना पवार,राणी जगदाळे,ज्योती परदेशी,आशा कोवे, उज्वला फटांगरे,वंदना देवकर, हेमलता यादव, अर्चना पवळे, आम्रपाली दातार, नेहा मांडवगडे, चंदा ढोले, जयश्री भड, गायत्री शिंदे, आम्रपाली गडदणे, नेहा मांडवगडे, शोभा दळवी, संगीता तांबे, वैशाली यादव, नीता मनवर,सुवर्णा पाटोळे,योगिता लोखंडे, मेघा जाधव, श्री.नामदेव सरदार (केंद्रप्रमुख) नारायण काळबांडे (स.शि)
यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हा अनोखा उपक्रम पूर्णत्वास नेला आहे.या उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून खुप कौतुक होत आहे. सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जास्त ऑनलाईन टेस्ट सोडवल्याचा रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.
*लेखिका, कवयित्री, शििक्षिका,समुह प्रशासिका*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
(उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुह)
Labels:
लेख
Tuesday, 9 June 2020
जननायक शहीद बिरसा मुंडा....
Date: 6 Jun 2020
*जननायक शहीद बिरसा मुंडा*
आदिवासी समाजक्रांतीचे जनक व एक स्वातंत्र्यसेनानी जननायक शहीद बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या छोट्याशा खेड्यात १५ नोव्हेंबर१८७५ मध्ये झाला.वडील सुग्ना व आई करमी यांच्या पोटी झाला. त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.त्यामुळे बिरसाचा नंतर सर्व कुटुंब उदरनिर्वाहासाठी त्यांची आत्या दासकिर यांच्या आयुभातू या गावी गेले. बालपणापासूनच अत्यंत हुशार व शिक्षणाची आवड असलेले बिरसा मुंडा होते. बासरी व टुईला वाजविणे नृत्य व नकला करणे, चित्र रेखाटणे, आखाड्यात जाणे इत्यादी छंद त्यांच्या अंगी होते. जी.सी.एल मिडल स्कूल मधून त्यांनी उच्च माध्यमिक पास केली. मिशनरी आदिवासींना आदिवासी,चोर,डाकू म्हणू लागले. त्यावेळी त्यांना मिशनर्यांना खडसावून प्रत्युत्तर दिले व शाळा सोडून दिली त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले.
बिरसा मुंडा यांचा विवाह हिराबाई यांच्याशी झाला पण पुढे लवकरच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. संगीताबरोबरच नृत्याची आवड बिरसांना होती. ते उत्तम बासरी वाजवायचे त्यांचा आवाज भारदस्त होता. पुढे हाच आवाज आदिवासींच्या अन्यायाविरुद्ध उठला. रानात गुरे चारायला नेत त्यामुळे जंगली वनौषधी बद्दल चांगले ज्ञान बिरसांना होते. आजारग्रस्त लोकांना जडीबुटी औषध तयार करून देऊन त्यांचा आजार त्यांचा बरा करत असत. म्हणून लोक त्यांना भगवान बिरसा मुंडा म्हणू लागले.
सन १८६९ मध्ये वन संरक्षण कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे जंगलावर होणारी उपजीविका बंद झाली. सावकार व ठेकेदारांनी आदिवासींच्या जमिनी हडप केल्या. त्याबद्दल आदिवासींनी एकही शब्द न करण्याचे आदेश इंग्रजांनी दिले होते.त्यामुळे आदिवासींवर मोठे संकट उभे राहिले. या अन्यायाविरुद्ध बिरसा यांनी १८९० मध्ये व्यापक "क्रांती उलगुलान" ची घोषणा केली १८९५ मध्ये समाजसुधारणेचे अभियान आपल्या हातात घेतले जंगल, जमीन,संपत्ती आमचा अधिकार आहे. यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येऊन लढायचे आव्हान केले. न्याय व अधिकारासाठी शस्त्र हाती घेतले बिरसा यांनी अन्यायी सावकार व जमीनदारांच्या घरांना आग लावून दिले. त्यामुळे त्यांना ९ ऑगस्ट १८९५ ला बिरसा व त्यांच्या वडिलांना अटक झाली.
३० नोव्हेंबर १८९७ ला बिरसा तुरुंगातून बाहेर आले.त्यावेळी आदिवासी समाजाची केविलवाणी परिस्थिती पाहून पुन्हा अन्यायाविरुद्ध पेटून उठले. बिरसा हे उत्तम योद्धा व कुशल प्रशासक होते. १८९८ मध्ये बिरसांनी "डुंबारी बुरुज" या पर्वताच्या पायथ्याशी सभा बोलावली. फादरच्या घरावर हल्ले करायचे ठरवले जानेवारी १९००मध्ये रांचीच्या इंग्रज अधिकार्याला बिरसा यांच्या हल्ल्याची माहिती मिळाली इंग्रजांनी "डुंबारी बुरुजावर" गोळीबार सुरु केला. आदिवासींनी दगडफेक व धनुष्यबाण करत प्रतिकार केला. या नरसंहारात दोनशेपेक्षा अधिक आदिवासी लोक मारले गेले.इंग्रजांनी बिरसा यांना अटक केले. व तुरुंगात अतोनात छळ केला ९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला. बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला. न्याय व हक्कासाठी लढणारा क्रांती सूर्याचा अंत झाला. अशा या महान शूरवीर क्रांतिकारकाला कोटी कोटी प्रणाम आज ९ जून रोजी स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...
लेखिका/ कवयित्री कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका जिल्हा वाशिम...
---
Labels:
लेख
Monday, 8 June 2020
ललित लेख... "संशयाचे भूत"
Date: 7 Jun 2020
*संशयाचे भूत*
सुधाचा चांगला सुखात संसार चालला होता. दोन गोंडस मुले होती. नवरा जॉबला होता. ७० हजार पगार नवऱ्याला होता. नवरा फार दयाळू कनवाळू होता. कोणालाही अडीअडचणीत पटकन मदत करणारा,स्त्रियांचा मान सन्मान, आदर करणारा गावातल्या कोणालाही अडचणीमध्ये मागेपुढे न बघता पटकन मदत करणारा नवरा नशिबाने सुधाला मिळाला होता. पण तेसुद्धा सुधाला आवडायचं नाही. ती नवऱ्याकडे सारखे डोळे वटारून पाहत असायची. मदत करायला माझाच नवरा उरला की काय? यासाठीच माझ्यासोबत लग्न केले की काय ? तडतड करत, त्रागा करून घेत, सुधा पाय आपटत,दात कटकट चावत निघून जायची. तिच्या नवऱ्याचा स्वभाव घरातल्या सर्व मंडळींना ठाऊक होता पण ते सुधाला मान्य नव्हतं ती विनाकारण नव-यावर संशय घ्यायची.
"संशयाचे भूत" सुधाच्या असं काही मानगुटीवर बसलं होतं की त्याचा इलाज जगातल्या कुठल्याच मांत्रिकाकडे किंवा डॉक्टर कडे नव्हता. सुधा कितीही आदळआपट केली. तरी तिचा नवरा मात्र खूप संयमी व मितभाषी होता. तो अगदी शांतपणे ऐकून घ्यायचा आणि पुढे निघून जायचा. एक दिवस गावातल्या एका बाईचे बँकेचे खाते उघडण्यासाठी सुधाचा नवरा राम बँकेत गेला होता. सोबत बिचारी ती बाई होती तिने खूप गयावया करून तिचं काम करण्यासाठी विनंती केली होती. त्यामुळे राम त्या बाईला सोबत घेऊन बँकेत गेला होता. बँकेतले काम झाल्यावर राम निघून दुसऱ्या कामाकडे वळला. राम वर लहानपणापासूनच खूप चांगले संस्कार झाले होते.आई-वडिलांच्या संस्कारात वाढलेल्या रामला वाटेवर चालता चालता जर कोणी अडचणीत दिसला तर त्याला पटकन मदत करायचा हा रामचा स्वभाव धर्म होता.आणि त्या दिवशीही तसेच झाले त्या बाईचे बॅंकेचे काम केले. आणि पासबुक वर लावण्यासाठी घेतलेला एक फोटो राम कडेच राहिला.रामच्या पाकिटातला तो फोटो सुधाने रात्री घरी आल्यावर पहिला आणि घरात अख्खं कुरुक्षेत्र उभं केलं.जणू महाभारत सुरू झाला आणि सुधा तांडवनृत्य करू लागली.सारं घरं डोक्यावर घेतलं. खूप जोरजोरानं नवऱ्याला भांडू लागली.
सुधाची वयात आलेली पोरं भिरभिरे सुधाकडे पाहत होती. पण सुधा जास्त शिकलेली नव्हती. आणि समंजसही नव्हती. विनाकारण राम सोबत खूप भांडण केलं आणि तरातरा निघून माहेरी गेली. रामची यात काहीच चूक नव्हती. त्यामुळे राम आपला शांतच बसला होता.कारण रामच्या नजरेत आपण कोणाला मदत करणे हे वाईट नव्हतंच मुळी.सुधा माहेरी राहून राहून किती दिवस राहणार आठ-दहा दिवसात परत घरी आली.पण तिच्या मनातलं संशयाचं भूत कांही निघतच नव्हतं. प्रत्येक गोष्टीला ती संशयाने पाहायची. आता राम सुद्धा तिच्या अशा वागण्याला, बोलण्याला फार कंटाळून गेला होता. रामा जर आनंदी असला तरी सुधारला ते आवडायचं नाही.सुधा नवऱ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची "संशयाचं भूत" लय वाईट.चांगल्या सुखी संसारात विघ्न घालत विष कालवण्याचं काम हे संशयाचे भूत करत असतं. अनेक रोगावर औषध आहे पण संशयी स्वभावाला औषध नाही. आजपर्यंत जगाच्या पाठीवर कुठेही औषध निघाले नाही. त्यामुळे दिवसेंदिवस सुधाच्या आयुष्यात जास्त कटकटी भांडण, आदळ-आपट मुलांकडे लक्ष देणे नको, चांगल्या कांही वाचन नको, किंवा चांगल्या गोष्टींकडे चांगल्या दृष्टीने पाहण्याचा दृष्टिकोनही राहिला नव्हता.त्यामुळे सुधाची मनस्थिती फार बिघडली होती. सुधाचा नवरा जर छान ड्रेस घातला. दाढी कटिंग केली तरी सुद्धा सुधा त्याच्याकडे संशयाने बघू लागली. हा माझा नवरा आहे आणि मी त्याच्यावर शंभर टक्के विश्वास ठेवायचे तर दूरच उलट भांडणाचा सुळसुळाट व्हायचा....कितेकांचे सुखी संसार अशा संशयाने उध्वस्त झाले आहेत.एखादा भुकंप झाला तर त्याचा आवाज होतो.पण मनाच्या भिंतींना तडे गेलेली मात्र अजिबात दिसत नाहीत.
सुधाचा रात्रंदिवस नवऱ्याबद्दल संशय वाढत चालला होता. तिला सारखं वाटायला लागलं की मी नवऱ्याला आवडतच नाही.नवरा चांगला वागला तरी सुद्धा त्याच्याकडे वेगळ्याच नजरेने बघायची. त्यात सुधाला एक मैत्रीण मिळाली होती. तीही तशीच त्यात आणखीन भर टाकायची. आणखीन तेल ओतायची. तिच्या आयुष्यात ढवळाढवळ करु लागली. सुधाला वाटायचं की हर एक गोष्ट आपल्या मैत्रीला सांगावं पण मैत्रीण उलट सुधाच्या डोक्यात नको ते भरून द्यायची आणि मग परत सुधा आणि राम ची कडाक्याचे भांडण व्हायचे. नवऱ्याचा गरीब स्वभाव बघून निर्व्यसनी सरळ स्वभावाच्या रामला सुधा सारख्या धमक्या द्यायची. रामला कांही सुचेनासं झालं... जावे तरी कुठं आणि करावं तरी काय? असा प्रश्न रामला पडला होता. रामला वाटायला लागलं माझं काहीतरी पाप आहे त्यामुळे कमी डोक्याची ही सुधा माझ्या गळ्यात पडली. राहून राहून रामला सारखं पश्र्चाताप व्हायचा. आपण उगाच लग्न केले असे रामला वाटायचे पण सुधाचे "संशयाचं भूत" मात्र काही केल्या उतरत नव्हतं...
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.शाळा.कोकलगाव
Labels:
लेख
Sunday, 31 May 2020
*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*
Date: 30 May 2020
*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*
इतिहासाच्या पानांमध्ये एक सुवर्णाक्षरी पान म्हणजे दानशूर,कर्तुत्वान आणि कुशल राज्यकर्ती स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर होय.त्यांचा जन्म ३१ मे १७२५ अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी या छोट्याशा गावात झाला.धनगर समाजात जन्माला आलेल्या अहिल्याबाई चे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेरावाशी झाला. त्यांना दोन अपत्ये झाली. मुलगा मालेराव व मुक्ताबाई ही कन्या... खंडेराव यांचा कुंभारी येथे लढाईत मृत्यू झाला. अहिल्याबाईंना वयाच्या २८ व्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले.प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण सासरे मल्हारराव होळकरांनी "प्रजाहितासाठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य तुम्हाला सांभाळायची आहे" असे म्हणल्यामुळे त्यांचा मान राखला व राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.मल्हाराव ज्यावेळी मोहिमेवर जात तेव्हा अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोखपणे राखीत असत.
मल्हाराव होळकर यांना पेशव्याने इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती.दौलतीचा कारभार मोठा होता पण १७६६ मध्ये मल्हाररावांचे निधन झाले.त्यामुळे आलेल्या अहिल्याबाईवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. पुढे २८ वर्षे राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला.अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने आहिल्याबाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.
राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
आहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
अशा महान कर्तबगार धाडसी स्त्रीव्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा... विनम्र अभिवादन....
लेखिका/कवयित्री
©️®️कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम...
Labels:
लेख
उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहातील तंत्रस्नेही शिक्षिकांनी तयार केलेलीऑनलाइन चाचणी सिरीयल भाग 3
*उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
🌹 *भाग ३*🌹
*उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
🌹 *भाग ३*🌹
*101) योगिता लोखंडे*
https://forms.gle/u4VrADzJQwd1uydo7
*102)उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/k7hgoswsNXFLAVL26
*103)गायत्री शिंदे*
https://forms.gle/zVNdzcYbxtWaD1G69
*104)उषा ढेरे, बीड*
https://forms.gle/Cp4VNfuKrQ5JSLXs6
*105)Urmila Lasurkar https://forms.gle/atf4bEro7Nya1Vn5A
*106)https://forms.gle/uAgvd6iGnEWtAKPm8
*107)उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/wurYoWwGtKX1HiyS8
*108) मिनाक्षी नागराळे वाशिम*
https://forms.gle/wy2qvaz9KXqJffD57
*109) चंदा श्रीराम वानखडे वाशिम https://forms.gle/nWLsquaLuFHbDYLP8
*110)उषा ढेरे बीड*
https://forms.gle/G279rxnB4CTR5aBh7
*111) मिनाक्षी नागराळे, वाशिम*
https://forms.gle/kwgUdfgYr9JMVRH19
*112)भावना पाटील*
https://forms.gle/ZPTVZCeGAwHbNpLy6
*113)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/dxEcpb2vfPeEpMEn6
*114)हेमा यादव*
https://forms.gle/bgCNdRvjA9JYKX7f9
*115) साधना पवार*
https://forms.gle/u8zJCgfwqCNKXABE6
*116) मीनाक्षी नागराळे, वाशिम*
*वासाची किंमत-इयत्ता-३री*
https://forms.gle/5vZPYTfG4czUCecy8
*117)श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/sgAPLpKfCer4Ry12A
*118) *सोनाली साळुंखे,जळगाव*
https://forms.gle/YUpaQ2k5A8PtH1jQ6
*119)*हेमा यादव*
https://forms.gle/xKZaKY8A6NmbQqWu8
*120)https://docs.google.com/forms/d/16EKbmJ9hKnxKpGB-54Gk-pH_MUmR_mlMBMTBmUcWJd8/edit संगीता किसन तांबे मुंबई
*121)श्रीमती आम्रपाली टेंकाळे,हिंगोली
https://forms.gle/k8K2gauoA2v4fPbY7
*122)कु.अर्चना वैद्य वाशिम
https://forms.gle/9xRffgr2FPu8cHwg9
*123) मिनाक्षी नागराळे, वाशिम*
http://online.fliphtml5.com/kspr/duyf/
*124)मेघा जाधव, वाशिम*
https://forms.gle/fBB2twBrb7v5EEon8
*125) मेघा जाधव,वाशिम https://forms.gle/PhTNpVt8riRqhkEP8
*126)देशमुख शोभाताई अहमदनगर*
https://forms.gle/bPj2NFCY16NmRgLw7
*127) मिनाक्षी नागराळे वाशिम*
https://forms.gle/iZFnHFbAwUpvL5Kp8
*128)https://forms.gle/q8Z9fkyRSyRLrMWn7
*योगिता लोखंडे जळगाव*
*129)https://forms.gle/PJyq4Ak8QL4YiPvM9
*अनुपमा अरुणकुमार यादव*
*130)https://forms.gle/TmfRb3mhDG2ECtsY6देशमुख शोभाताई अहमदनगर
*131)उज्ज्वला फटांगरे
https://docs.google.com/forms/d/1XgrU5-XUb36jB8fz6O_LB0hEDPp1KEc6qDUKoZYUQMk/edit
*132)उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/UmfFB4Kjoqzd7ggV7
*133)मिनाक्षी नागराळे, वाशिम*
https://forms.gle/8CDG8DsRRJ3PjoKR9
*134) उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/9hL1PQALU7CRbFBS8
*135) योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/oa5mb1PoTW5ZAidF9
*136) उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/!
137) प्रतिभा पगारे
इयत्ता - ३ री
विषय - भाषा
https://forms.gle/rEEBZgARefCKFnuZ8
138) https://forms.gle/vsFtuYjviMnr8WDY8
Urmila Lasurkar
Z.P. Primary school Sutarkhede, Taluka: Chandwad, Dist: Nashik.
139:-) *राणी जगदाळे, सातारा*
https://forms.gle/dCFG82b8GGprXt2X9
140) *yogita lokhande*Jalgaon
https://forms.gle/Ztit6fZXmQgFdj
141) सौ.हेमा यादव
https://forms.gle/Qp91AZ5yiYYDLCRQ8
१४२)सौ.वैशाली भोईर
https://docs.google.com/forms/d/1P5nCFuG234CZJYm_iEn10CEEJOQWKz51AQ2uqcfKX-A/edit
143) जयश्री भड, कारंजा https://forms.gle/98mtKxbisYH93b7L8
144) सुनिता शिरसाठ https://forms.gle/Xoryu9Cx3ChdBGZx9
(145) वंदना देवकर ,हिंगोली https://forms.gle/tvbL7MAZgEjEsYPw5
(146)वंदना देवकर(ढोकणे) https://forms.gle/stDNWRSWodoQxqLS7
148)*योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/XXSDn9viEJkCeUsr7
(149) श्रीमती वंदना देवकर,ढोकणे ,हिंगोली https://forms.gle/iSyjRotSRzrho8
qw6
*150)सुनिता शिरसाठ* https://docs.google.com/forms/d/1YRcSaqE2Pa_LC-DSEEXTDj2m4agjXu0P-kLb9wZPDiI/edit
Labels:
लेख
Thursday, 28 May 2020
बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार...
Labels:
लेख
Subscribe to:
Posts (Atom)



