Wednesday, 27 December 2023
http://meenakshi1412.blogspot.com/: Very easy drawing picture of doll...
Very easy drawing picture of doll...
http://meenakshi1412.blogspot.com/: आडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.गजानन शिंदे सर यांन...
आडगाव शाळेचे मुख्याध्यापक श्री.गजानन शिंदे सर यांनी आज माझ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक दिवस सेवा दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार...
Friday, 22 December 2023
अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण मनोगत
Friday, 20 October 2023
असाही वाढदिवस... आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून अनन्याच्या पालकांनी शाळेला भेट दिली सुंदर पुजेचे ताट...
Wednesday, 11 October 2023
चला ३ व २ पासून चित्र काढुया...
Tuesday, 10 October 2023
चला काही नवे करूया (चित्र काढून)
Monday, 9 October 2023
आठवणीत राहणारा वाढदिवस...असाही वाढदिवस...अमन नारायण काळबांडे इयत्ता दुसरी....
*आठवणीत राहणारा वाढदिवस...असाही...
आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून शिक्षणप्रेमी श्री.नारायण प्रल्हाद काळबांडे यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव ला पंखा,फॅन भेट दिला...
*अमन नारायण काळबांडे(इयत्ता दुसरी)या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अमनच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगावला पंखा भेट दिला त्याबद्दल सौ.मनिषा नारायण काळबांडे ताईचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद....अमनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐.गेल्या दोन महिन्यांपासून एक नवीन उपक्रम सुरू झाला.वाढदिवसानिमित्त चॉकलेट मुळे मुलांचे दात खराब होतात त्यापेक्षा पुस्तक,वृक्ष,पेन,वह्या अशा वस्तू भेट देण्यात आल्या...या उपक्रमास पालकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे....*
Happy birthday dear aman
Monday, 11 September 2023
शिक्षणाचा खेळखंडोबा -बाजारीपण आणि खाजगीकरण
Saturday, 15 April 2023
माझे चौथे पुस्तक समकालीन समिक्षा
Sunday, 9 April 2023
भावना...अति लघू कथा
Saturday, 25 March 2023
जगण्याचा अर्थ सांगणारा काव्यसंग्रह म्हणजे -जगण्यामधले हेतू काही
Wednesday, 22 March 2023
http://meenakshi1412.blogspot.com/: बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्ह...
Tuesday, 21 March 2023
मिनाक्षी नागराळे सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका पुरस्काराने सन्मानित
Tuesday, 24 January 2023
मनाचे मळभ(अभंग क्र.४०)
Saturday, 21 January 2023
बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे -बालगीतांचा खजिना
Sunday, 1 January 2023
चला मुलांनो खेळ खेळूया...खेळता खेळता वाचन शिकूया... नवोपक्रम २०२२-२३
मिनाबाई पांडुरंग नागराळे (स.अ.)
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका जिल्हा वाशिम, केंद्र तोंडगाव.
पिन : 444505 मो.: 9767663257,7020384279
ई-मेल :- mpm1412@gmail.com
१)नवोपक्रर्माची शीर्षक :- चला मुलांनो खेळ खेळूया !
खेळता खेळता वाचन शिकूया !!
२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व :- इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे वाचनाचा पाया पक्का करण्यासाठी व वाचन हसत खेळत शिकण्यासाठी या नवोपक्रमाची गरज निर्माण झाली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचन विकास व संख्या वाचन अचूक करता येऊ लागले.
३) उपक्रमाचे वेगळेपण :- इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना दररोज मध्यांनोत्तर ४ ते ५ पर्यंत एक तास खेळायचा. खेळाच्या माध्यमातून वाचन विकासाचा पक्का पाया करण्यासाठी या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसत खेळत वाचन विकास यामध्ये भाषाज्ञान व संख्याज्ञान अशा दोन विषयांचा एकत्रित सराव खेळाच्या माध्यमातून सहज करता येतो. संख्याज्ञान अचूक करता येऊ लागते अंक वाचन तसेच दोन अंकी संख्या वाचन इत्यादी. पहिलीसाठी अक्षर ओळख, साधे शब्द, कान्याचे शब्द, ऱ्हस्व व दीर्घ उकार असलेले शब्द, वेलांटीचे शब्द, मात्रेचे शब्द ते अनुस्वारापर्यंत चौदाखडीचे वाचन सहज सोप्या पद्धतीने खेळता खेळता वाचन करता येऊ लागले. हे या नवोपक्रमाचे खास वेगळेपण आहे.
या नवोपक्रमामुळे भाषा बरोबरच गणित म्हणजे संख्याज्ञानाचा फायदा या उपक्रमामुळे झाला. भाषा, गणित या विषयाबरोबरच शारीरिक शिक्षण विषयाला असा तिहेरी फायदा झाला. या नवोपपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अचूक संख्या वाचन आणि शब्द वाचन खेळाच्या माध्यमातून सहज हसत खेळत आनंददायी पद्धतीने वाचन विकास व संख्याज्ञान घेता आले. हसत खेळत आनंददायी पद्धतीने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि उपस्थिती वाढली.
४) नवोपक्रमाची उद्दिष्टे :-
१) हा नवोपक्रम खेळाच्या माध्यमातून असल्याने विद्यार्थ्यांना खूप आवडू लागला त्यामुळे उपस्थिती वाढली.
२) खेळाच्या माध्यमातून भाषा गणित व शारीरिक शिक्षण असा तिहेरी विषयाचा अभ्यास होऊ लागला.
३) भाषाज्ञान व संख्याज्ञान विद्यार्थ्यांना अचूक होऊ लागले.
४) वाचन विकास व संख्याज्ञान प्रत्येकाची वैयक्तिक तपासता येते.
५) भाषा, गणिताबरोबरच शारीरिक शिक्षण या विषयाची गोडी निर्माण झाली.
१) नवोपक्रमाचे नियोजन :-
(१) नवोपक्रमपूर्व स्थितीचे नियोजन :- हा नवोपक्रम एक जुलै २०२२ पासून सुरू केला. यापूर्वी विद्यार्थ्यांना अक्षरे वाचायचा कंटाळा यायचा. सलग क्रमाने अक्षरे वाचायची पण मधातली अदलून बदलून अक्षरे वाचायला लावल्यास अडखळाईची. शब्द वाचन करताना सलग वाचन, शब्द वाचन सहज करता येत नव्हती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अक्षर वाचन, शब्द वाचनाचा भरपूर सराव होऊ लागला. जे विद्यार्थी वाचनात मागे आहेत त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करता येणे सहज शक्य झाले. या उपक्रमामुळे ९५% विद्यार्थ्यांना वाचन सहज आनंददायी पद्धतीने करता येऊ लागले. भाषा विकासासोबत गणित विषयाची पण तयारी करण्याची युक्ती सुचली त्याप्रमाणे गणित विषयांमध्ये संख्याज्ञान,अंक ज्ञान, पक्के करण्यासाठी या नवोपपक्रमांचा चांगला उपयोग झाला.१०० % विद्यार्थ्यांना आदलून बदलून येणारे अंक सांगता येऊ लागली. दुसरी साठी पण दोन अंकी संख्यांचा चांगला सराव घेतला. १०० % विद्यार्थी संख्या वाचू लागले. संख्याज्ञान पक्के झाले.
२) संबंधित व्यक्तीशी / तज्ञांची चर्चा :- आमच्या केंद्राला मार्गदर्शन करणारे जिल्हा शिक्षक पर प्रशिक्षण संस्थेचे साधन व्यक्ती आदरणीय पांडुरंग गवळी सरांसोबत या नवोपप्रकमा बाबत चर्चा केली असता गवळी सरांनी सखोल मार्गदर्शन केले. खेळातून आनंददायी पद्धतीने घेतलेले ज्ञान विद्यार्थ्यांना खूप आवडते. कंटाळवाण्या अभ्यासापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून ते व खेळातून मिळणारे शिक्षण आनंददायी असल्याने पक्के स्मरणात राहते व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करते.
एकाच नवोपकर्मातून तीन विषयाचे अध्ययन होत असल्याने मार्गदर्शन / तज्ञ असलेल्या गवळी सरांना चला मुलांनो खेळ खेळूया ! खेळता खेळता वाचन शिकूया !! असा तिहेरी फायदा असणारा उपक्रम खूप आवडला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास होईल असे श्री पांडुरंग गवळी सर म्हणाले. भाषा विषयांबरोबरच शब्द वाचन व संख्याज्ञान पक्के स्मरणात ठेवण्यासाठी खेळाच्या माध्यमातून हा उपक्रम झिरो खर्चिक असल्याने गवळी सरांना खूप आवडला. भाषा व गणित या विषयाबरोबरच शारीरिक शिक्षण या विषयांचा खेळ घेता येऊ लागला. विद्यार्थ्यांना खेळ खूप आवडतो. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम आहे. असे तज्ञ मार्गदर्शक श्री पांडुरंग गवळी सर म्हणाले.
३) आवश्यक साधनांचा विचार :- इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे अक्षरे वाचन करतायावीत यासाठी अक्षर कार्ड तयार करण्यात आली. त्याचबरोबर शब्दकार्डे आणि संख्या कार्ड तयार करण्यात आली. या अक्षर कार्डाचा उपयोग फक्त खेळा पुरताच नाहीतर वर्गात रिकाम्या फावल्या वेळातही विद्यार्थी वेगवेगळी अक्षरे जोडून त्यांचे अर्थपूर्ण वाक्य तयार करू लागली. त्यामुळे अक्षर तयार करणे आणि शब्द कार्डांचा उपयोग शब्द वाचनासाठी चांगल्या पद्धतीने होऊ लागला. संख्या कार्डामुळे विद्यार्थ्यांना संख्याची सलग वाचन न करता आधले मधले अंक सहज वाजता येऊ लागले. कोणतीही संख्या विद्यार्थी पटकन वाचू लागले. दिलेल्या अक्षर कार्डापासून तयार होणारे अनेक शब्द मुले सांगू लागली. उदा क अक्षर कार्डापासून – कर, करवत, कपाट, कणीस, कमळ, कपडे, कपिला, कपाशी, कप इत्यादी अशी अनेक शब्द सांगू लागली. त्यामुळे नकळत शब्द संपत्ती वाढण्यास मदत झाली. शब्द वाचना बरोबर अंक वाचन ही घेता येते याची कल्पना सुचली. त्यानंतर अंक कार्ड बनवून घेतली. आखलेल्या रिंगणाभोवती अंक कार्डे सलग व क्रमाने न ठेवता अंक अदलून बदलून ठेवले. त्यानंतर एका विद्यार्थ्यावर डाव येईल त्या विद्यार्थ्यांनी रिंगणाभोवती हळूहळू धावायचे. खंजिरी किंवा इतर कोणतेही वस्तू वाजवायची. जेव्हा आवाज थांबला तेव्हा धावणाऱ्या विद्यार्थ्यांनीही थांबायचे. आणि ज्या कार्डाजवळ थांबेल त्या कार्डावरचे अक्षर किंवा संख्या किंवा शब्द वाचायचा या पद्धतीने पुढचे अक्षर असे सर्व अक्षर, शब्द व अंक वाचनाचा सराव खेळाच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने घेता येतो. ज्या विद्यार्थ्याला अंक, शब्द, अक्षर, ओळखता आले नाही तो विद्यार्थी त्या खेळामधून बाद होईल आणि तो विशेष उपचारासाठी पात्र ठरेल. त्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल. या नवोपपक्रमामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे क्षमता तपासता येते आणि प्रत्येक विद्यार्थी कुठे आहे ते समजते.
४) करावयाच्या कृतीचा क्रम :-
(१) सर्वप्रथम इयत्ता १ ली व नंतर २ री. पहिलीचे ३६ आणि २ री २४ विद्यार्थी निवडले ६० विद्यार्थी निवडले.
(२) मैदानावर एक गोल आखून घेतला.
(३) आखून घेतलेल्या गोलाभोवती तयार केलेली अक्षर कार्डे ठेवली.
(४) इयत्ता पहिलीच्या मुलांना रांगेत बसवले. त्यातील एक विद्यार्थी खेळ खेळण्यासाठी पुढे बोलावला त्याला खेळाचे नियम समजावून सांगितले.
(५) खंजिरी वाजवत राहिले तोपर्यंत खेळ खेळणारा विद्यार्थ्यांनी पळायचे.
(६) खंजिरी चा आवाज थांबला की विद्यार्थ्यांनी पण थांबायचे.
(७) विद्यार्थी ज्या ठिकाणी थांबला तिथले अक्षर वाचायचे.
(८) बरोबर अक्षर वाचल्यास खाली बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या.
(९) तोच विद्यार्थी नंतर गोलाच्या दिशेने पळणार नंतर परत खंजिरी वाजवायची पुन्हा आवाज थांबला की विद्यार्थी थांबणार जिथे थांबला तिथले अक्षर
वाचायचे.
(१०) सर्व काडे वाचून झाल्यास तो विद्यार्थी उत्कृष्ट खेळला म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे.
(११) ज्या विद्यार्थ्याला जे अक्षर ओळखता आले नाही. त्या विद्यार्थ्यांचा त्या अक्षराचा किंवा अंकाचा सराव करून घ्यायचा.
(१२) ज्या विद्यार्थ्याला अंक किंवा अक्षर ओळखता आले नाही किंवा अंक व अक्षराचे वाचन करता आले नाही तो विद्यार्थी त्या खेळातून बाद होईल.
त्याच्या विद्यार्थ्याला विशेष मार्गदर्शन व उपचार करायचे.
(१३) एक आठवडा अक्षरांचा खेळ घेतला.
(१४) दुसऱ्या आठवड्यात एक ते दहा पर्यंत अंक वाचन सराव घेतला.
(१५) तिसऱ्या आठवड्यात अक्षरापासून तयार होणारे साधे शब्द वाचन घेतले जसे कप, कर, कस,कट,कन,खत,गट,घर,चट, अशा दोन अक्षरी, तीन अक्षर,
चार अक्षरी शब्दाचे वाचन करून घ्यायचे.
(१६) चौथ्या आठवड्यात दोन अंकी संख्यांचे वाचन जसे ११ ते २० पक्के करण्यासाठी दोन आठवडे हेच वाचन करून घ्यायचे.
(१७) पाचव्या आठवड्यात इंग्रजीचे अल्फाबेट्स वाचन करून घ्यायचे.
(१८) म्हणजे मराठी, गणित, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, अशा चार प्रकारे विद्यार्थ्यांना फायदा होतो.
(१९) दुसऱ्या वर्गाला दोन अंकी संख्या वाचन त्यानंतर शब्दापासून वाक्य तयार करून सांगा असा खेळ घेऊ लागले.
(२०) तिसऱ्या वर्गाला तीन अंकी संख्या.
(२१) चौथ्या वर्गाला चार अंकी संख्या वाचन किंवा उतारा वाचन या पद्धतीने घेऊ शकतो.
(२२) या नवोपकक्रमामुळे विद्यार्थ्यांचा हसत खेळत आनंददायी पद्धतीने भाषा विकास व संख्याज्ञान, संख्यावाचन, पक्के झाले.
(२३) एका खेळाचे अनेक फायदे झाल्याचे दिसून आले.
(२४) हा खेळ विद्यार्थ्यांना खूप आवडू लागला.
(२५) हसत खेळत आनंददायी पद्धतीने वाचन व संख्या ज्ञान सोपे झाले. प्रत्येक विद्यार्थी सहज वाचन करीत असल्याने खूप समाधान वाटले.
(२६) साध्या सोप्या उपक्रमातून भाषा, गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, शारीरिकशिक्षणाच्या पाच विषयांचा विविध अंगाने सराव झाला.
(२७) प्रत्येक दिवशी नवा प्रयोग घेता येऊ लागला त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिक सराव होऊ लागला.
(२८) विद्यार्थ्यांच्या वाचनाचा वेग वाढला.
(२९) विद्यार्थ्यांचा अधिक उत्साह व आत्मविश्वास दिसू लागला.
(३०) 0 रुपये खर्च असल्याने हा नवोपक्रम खूप यशस्वी ठरला त्यामुळे खेळाच्या माध्यमातून गुणवत्ता विकास घडून आले. त्यामुळे मला एक वर्ग शिक्षिका
म्हणून जो आनंद झाला तो शब्दात सांगू शकत नाही. ( फोटो १,२,३,४,५ )
६) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण :-
(१) विद्यार्थ्यांना सर्व अक्षरे अंक,शब्द वाचता येऊ लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.
(२) वैयक्तिक मार्गदर्शन करता येऊ लागले.
(३) कोणताही विद्यार्थी नेमका कुठे आहे ते समजले.
(४) खेळातून शिक्षण असल्याने आनंददायी शिक्षण वाटू लागले.
(५) खेळातून हसत खेळत शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली.
(६) या नवोपक्रमामुळे वाचनाची आवड निर्माण झाली.
(७) फावल्या वेळात ही विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून स्वतःच हा खेळ खेळता खेळता शिकू लागला.
(८) या नवोपक्रमामुळे तीन ते चार विषयाचा अभ्यास घेता येणे शक्य झाले.
(९) भाषा विषयाबरोबरच अंकज्ञान, संख्यावाचन, इंग्रजीचे अल्फाबेट्स,शारीरिक शिक्षण अशा चार विषयांचा अभ्यास घेता येऊ लागला.
(१०) अक्षरे, शब्द, वाक्य, तसेच अंक नंतर दोन अंकी संख्यांचे वाचन लहान मोठा सांगता येणे अशा पद्धतीने वाचन स्तर सहज वाढवता येवू लागला.
(११) सर्व विद्यार्थ्यांना नवोपक्रम खूप आवडल्यामुळे व वाचन करता येऊ लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूप वाढला.
१२) लहान वर्गापासून ते मोठ्या वर्गापर्यंत या खेळामध्ये कल्पकता घेऊन क्षमता स्तर वाढवता येऊ लागला.जसे तिसरीला तीन अंकी संख्यांचे वाचन
चौथीला चार अंकी संख्यांचे वाचन इंग्रजी अक्षरापासून इंग्रजी शब्द सांगा स्पेलिंग सांगा इत्यादी.
१३) खेळामधून शिक्षण असल्यामुळे हा नवोपक्रम विद्यार्थ्यांच्या खूप आवडीचा ठरला.
१४) विद्यार्थ्यांमध्ये समाधीटपणा वाढलेला दिसून आला.
१५) निर्णय क्षमता वाढलेली दिसून आली.
७) कार्यवाहीचे टप्पे :- ( वेळापत्रक )
हा उपक्रम दररोज ४ ते ५ या वेळात घेतला जायचा.
वर्ग १ ला (अक्षर वाचन, शब्द वाचन, अंक वाचन, इंग्रजी अल्फाबेट्स. ४ ते ५ या वेळेत.)
वर्ग २ रा (वाक्य वाचन, अक्षरा पासून शब्द तयार करून सांगा.शब्दावरून वाक्य तयार करा व दोन अंकी संख्यांचे वाचन. वेळ ३ ते ४.)
वर्ग ३ रा (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तीन अंकी संख्यांचे वाचन. इत्यादी वेळ १२ ते १ )
वर्ग ४ (वाक्यप्रचाराचा अर्थ सांग, शब्दावरून गोष्ट सांग, चार अक्षरी संख्या वाच इत्यादी. वेळ ११ ते १२)
उपक्रमासाठी इतरांची मदत :-
(१) माझ्या शाळेतील माझे सहकारी शिक्षक श्री. रामकिसन वाकुडकर सर यांची खूप मदत झाली.
(२) अंक कार्ड व अक्षर कार्ड बनविण्यासाठी माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक श्री उमेश खुळे सर यांची मदत झाली.
(३) हा नवोपक्रम घेण्यासाठी इयत्ता पहिलीचा वर्ग मॉनिटर श्रेयश काळबांडे याची मदत झाली. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी समर्थ माधव लोखंडे याची मदत
झाली. इयत्ता तिसरीचा विद्यार्थीनी किरण राजू राऊत तर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी संतोषी गोकुळ गोडघासे या विद्यार्थी ची मदत झाली.
उपक्रमासाठी सादर करावयाची पुरावे :-
१)उपक्रम घेताना चे फोटो
(२) उपक्रमाचे युट्युब वर अपलोड केलेले व्हिडिओची लिंक .
https://youtu.be/QSpFDuuyw_0
https://youtu.be/Tvj22L4ZXGk
https://youtu.be/8Hn1leQsy4k
https://youtu.be/B9mHEjGDXWg
https://youtu.be/Yg2s-rkLVyc
https://youtu.be/xbPGsZwyqC4
https://youtu.be/JnUigDpY_0w
नवोपक्रमाची कार्यपद्धती :-
१ पूर्वस्थितीचे निरीक्षणे व त्याच्या नोंदी :-
(१) पूर्वी विद्यार्थ्यांना वाचन, अंक ओळख, बोजड व कंटाळवाणे वाटायचे.
(२) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास खूप कमी होता.
(३) अक्षर, शब्द, वाक्य, वाचायला विद्यार्थ्यांना भीती वाटायची.
(४) चार भिंतीच्या आत कोंदट कंटाळवाणे वाटायचे .
(५) शिक्षणामध्ये रस व आनंद वाटायचा नाही.
(६) प्रत्येक विषयाला विशेष प्राधान्य देता येते.
(७) भाषाज्ञान व संख्याज्ञान म्हणजे FLN पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या नवोपपक्रमाच्या माध्यमातून मिळाल्याने पहिलीचा पाया पक्का होण्यास मदत झाली.
(८) प्रत्येक विषयाला वेगळा स्वतंत्र वेळ दिल्याने वेळ जास्त लागायचा.
(९) या नवोपक्रम पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.
(१०) तिहेरी विषयाचा अभ्यास एकाच खेळातून हसत खेळत दिल्याने विद्यार्थ्यांचा उत्सव खूप वाढला.
(११) १ ते ४ साठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
(१२) इय्यतावार क्षमता वाढवत नेह्ता येत असल्याने सर्व वर्गासाठी या नवोपक्रमाचा उपयोग घेता येतो. फक्त काठीण्य पातळी वाढवत नेण्याची गरज असते.
२) कार्यवाही दरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन :-
१) खेळाच्या माध्यमातून हा नवोपक्रम असल्याने हसत खेळत आनंददायी वाटतो.
(२) सर्व विद्यार्थी आवडीने सहभागी होऊ लागली.
(३) एकच खेळातून या नवोक्रमाद्वारे इतर भाषा,गणित, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, अशा चार विषयांचा सराव होऊ लागला.
(४) पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान पक्के होऊ लागले.
(५) अक्षरे, शब्द, वाक्य, सांगण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागली.
(६) खेळाच्या माध्यमातून हा नवोपक्रम असल्याने विद्यार्थ्यांना जास्त मनोरंजक वाटू लागला.
(७) भाषा, गणित, विषयाबरोबर शारीरिक शिक्षण विषयाची गोडी वाढली.
(८) विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होऊ लागला.
(९) प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येऊ लागले.
(१०) अपात्र विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करता येऊ लागले.
(११) काहीच खर्च लागत नसल्याने वेळ व पैसा वाचवता येऊ लागला.
उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी :-
(१) विद्यार्थ्यांना कोणत्याही अक्षराचे शब्दाचे संख्याचे वाचन अचूकपणे करता येऊ लागले.
(२) दोन अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द व दोन संख्या जोडून संख्या तयार होणारी संख्या सांगता येऊ लागली.
(३) खेळाच्या माध्यमातून हा नवोपक्रम असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली.
(४) भाषा, गणित, जनरल नॉलेज, शारीरिक शिक्षण या विषयाबद्दल रुची अधिक वाढली.
(५) विद्यार्थ्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढलेला दिसून आला.
(६) शब्दावरून वाक्यरचना तयार करता येऊ लागली.
(७) विद्यार्थ्याचे जनरल नॉलेज सामान्य ज्ञान वाढले.
(८) सहज साधा सोपा उपक्रम असून पण त्याची परिणामकारकता दिसून आली.
(९) शब्दावरून वाक्य तयार करताना विचार करण्याची पातळी वाढली.
(१०) हसत खेळत पहिलीचा पाया पक्का सहज करता येऊ लागला.
कार्यवाहीत आलेल्या अडचणी :-
(१) प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी शिक्षकाची कसरत वाढायची.
(२) एकाच खेळात अनेक विषयाची कार्ड सांभाळावी लागायची.
माहितीचे विश्लेषण :-
विषय | जुलै | ऑगस्ट | सप्टेंबर | ऑक्टोबर | नोव्हेंबर | डिसेंबर | जानेवारी | फेब्रुवारी |
मराठी | अक्षर ओळख | स्वर ओळख | शब्द वाचन | काना लावून शब्द वाचन | वेलांटी लावून शब्द वाचन | उकार व मात्रा, २ मात्रे लावून शब्द वाचन | वाक्य वाचन | शब्दावरून वाक्य तयार करणे |
गणित | १ ते १० पर्यंत अंक ओळख | १ ते १० पर्यंत आंख वाचन | तोंडी बेरीज | ११ ते २० अंक वाचन | २१ ते ३०, ४१ ते ५० अंक वाचन | ५१ ते ६० ६० ते ७० ७० ते ८० | ८० ते ९० ९० ते १०० तोंडी वजाबाकी | एकक दशक सांगणे |
इग्रजी | A,B,C,D,….. अल्फाबेट | A TO Z ओळख व वाचन Big Letter | abcdef small letters ओळख | a to z ओळख व वाचन small letters | Small words ओळख | I, YOU, WE, GO, TO, | RHYME,SINGING, | DO THE ACTION |
या पद्धतीने वेगवेगळे विषयाच्या वेगवेगळ्या घटक आनंददायी पद्धतीने घेण्यात आला विद्यार्थ्यांचा उत्साह खूप वाढलेला दिसून आला या नवोपक्रमाचा खूप फायदा झाला.
६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पती (उद्दिष्टानुसार) :-
१) या नवोपक्रमामुळे १०० % विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, अक्षर वाचन, शब्द वाचन करता येऊ लागले
२) खेळातून शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना आनंददायी वाटले.
३) यांना उपक्रमामुळे १०० % विद्यार्थ्यांना अंकज्ञान समजले प्रत्येक अंकाची अचूक वचन करू लागले.
४) भाषा, गणित या विषयाबरोबरच इंग्रजी विषय घेतले गेल्याने इंग्रजी विषय सोपा वाटू लागला.
५) खेळातून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक विषय वेगळे घेण्याची गरज भासली नाही. म्हणजे शारीरिक, बौद्धिक, मानसिक असा
विकास झाला.
६) खेळातून शिक्षण असल्याने आनंददायी हसत खेळत खेळ विद्यार्थ्यांना खूप आवडला.
७) शब्दापासून सुरू होणारे वाक्य मुली सांगू लागली.
८ ) वाचून सुधारले व अचूक वाचन करू लागले.
९) प्रत्येक महिन्यात नवनवीन व वेगवेगळे विषय शिकता येऊ लागले.
१०) अक्षरे जुळवून विद्यार्थी शब्द स्वतःतयार करू लागले.
११) भाषाज्ञान पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान पक्के झाली.
१२) एकच खेळातून चार विषयाचा अभ्यास घेता आला.
१३) विद्यार्थ्यांचा वचन स्तर वाढला.
१४) विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूप वाढला.
१५) अंकज्ञान व गणितासारखा किचकट विषय सोपा वाटू लागला.
१६) या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली.
१७) खेळता खेळता शिकता येऊ लागल्याने हा नवोपकर्म खूप महत्त्वाचा उपयोगही ठरला.
१८) विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला.
१९) वैयक्तिक संधी मिळाल्याने प्रतेकाकडे वैयक्तिक लक्ष देता येऊ लागले.
२०) विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासणीसाठी हा नवोपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.
२१) या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला.
२२) चला मुलांनो खेळ खेळूया खेळता खेळता वाचन शिकूया ! या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना शिक्षकांना खूप फायदा झाला.
२३) विद्यार्थ्यांना खेळ खूप आवडतो खेळातून आनंददायी शिक्षण खूप आवडत असल्याने या उपक्रमामुळे उपस्थिती वाढण्यास मदत झाली.
२४) नवोपक्रम हजर खेळत असल्याने विद्यार्थ्यांचा ताण व दडपण कमी झाले.
२५) प्रत्येक इयत्ता नुसार व त्यांच्या क्षमतानुसार या नवोपक्रमातून क्षमता वाढवून हा खेळ घेता येतो.इयत्ता चौथीसाठी शब्द वाचन, उतारा वाचन,
अक्षरापासून शब्द तयार करणे, चार अंकी, पाच अंकी, संख्या सांगता येणे इंग्रजीचे शब्द वाचन करता येऊ लागले.
युट्युब वरील लिंक https://youtube.com/@MEENAKSHEEPNAGRALE
७) समारोप :-(१०० शब्द )
चला मुलांनो खेळ खेळूया खेळता खेळता वाचन शिकूया या नवोपक्रमामुळे इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांचा वाचनाचा पाया पक्का झाला खेळातून आनंददायी पद्धतीने अक्षर वाचन, शब्द वाचन, उत्तरा वाचन, अंक वाचन, संख्या वाचन, वाक्य वाचन सहज करता येऊ लागले नवोपक्रम खेळाच्या माध्यमातून असल्याने विद्यार्थ्यांना खूप आवडला प्रत्येकाच्या क्षमता तपासता येऊ लागल्या या नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक बौद्धिक मानसिक विकास झाला. चार विषयांचा अभ्यासातून व खेळातून वाचन विकास व संख्याज्ञान पक्के झाले या नवोपक्रमामुळे १०० % विद्यार्थ्यांना वाचन करता येऊ लागली. त्यामुळे उपस्थिती वाढली हा नवोपक्रम विद्यार्थ्यांना, शिक्षकांना खूप आवडला पायाभूत साक्षरता,संख्याज्ञान (FLN) विद्यार्थ्यांचे पक्के झाले. नवोपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरला.
८) संदर्भसूची व परिशिष्टे :-
१) जीवन शिक्षण मासिक
२) इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचे पाठ्यपुस्तक
३) दिशा उपक्रमाची पुस्तक





