कविता
*वाचन प्रेरणादिन*
*वाचन प्रेरणादिनाच्या हार्दिक शुभेच्छा*
वाचन प्रेरणा दिन
हाती घ्यावे पुस्तक
कलाम साहेबांची भेट
सुधारेल मस्तक....!!
भेट द्यावीत पुस्तके
करू पुस्तकांशी मैत्री
येईल यश हमखास
हीच आहे खात्री....!!
पुस्तकंच खरा मित्र
वाढेल तुमचे ज्ञान
ज्ञानामृत पिऊनी
मिळेल तुम्हांला मान....!!
स्वाभिमानी ठेवाल बाणा
पुस्तक आहेत अनमोल
चांगल्या विचारांची भर पडेल
मिनुचे धर्मांनी ठेवा बोल...!!
वाचनाची गोडी लावा
असु द्या घरी पुस्तकाचे कपाट
ज्ञानात तुमच्या भर पडेल
नाही होणार घर सपाट....!!
पुस्तकेच आहेत जगी
ज्ञानाचे अथांग सागर
वाचनाची गोडी लावून
प्रेरणादायी करू जागर...!!
वाढदिवस असो समारंभ
द्यावीत पुस्तकेच भेट
ग्रंथसंपदेबरोबरच वाढेल ज्ञान
अंतःकरणातून सांगते थेट...!!
थोर पुरुष जे होऊन गेले
वाचली त्यांनी पुस्तके अनेक
चांगल्या विचारांची पेरणी झाली
आणि विचार झाले नेक....!!
शंभर मित्र आणि एक पुस्तक
पुस्तकास तुम्ही करा गुरू
अखंड वारसा नेण्या पुढे
आजपासून सुरुवात करू....!!
*कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*
No comments:
Post a Comment