सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराची सुरूवात केली आहे.शिक्षकांमधील शैक्षणिक उत्तरदायित्व, शैक्षणिक काम, सामाजिक काम, साहित्यिक रुची, समाजासाठी स्वतः चे अर्थिक योगदान, स्वतःची वाढवलेली शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टींचा विचार करून ट्रस्टच्या वतीने निवड केली जाते.यावर्षी साधारण ७०प्रस्ताव महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांकडून प्राप्त झाले होते त्यातील सर्वोच्च २०शिक्षक निवड समितीने निवडले आहेत.त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव जि.प.शाळेच्या आदर्श उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांना त्यांच्या साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.दरवर्षी प्रस्ताव न मागवता एक विशेष पुरस्कार दिला जातो तो यावर्षी अक्षरनंदन शाळेचे आदर्श शिक्षक अनिल आंधळे यांना जाहीर झाला आहे.
ही माहिती प्रकल्प प्रमुख सोपान बंदावणे,कार्यकारी विश्वस्त राधाताई शिरसेकर,सुरेश धनकवडे,प्रभा गोगावले, रजनीताई धनकवडे,ज्योती मते,संगिता गोवळकर यांनी दिली . पुरस्कार वितरण रविवार दि १२मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध साहित्यिक व ९५व्या साहित्य संमेलन अध्यक्ष मा भारत सासणे यांच्या उपस्थितीत उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ,पुणे येथे सायं ४वा संपन्न होणार आहे.
नुकताच या वर्षी मिनाक्षी नागराळे यांनी नवोपक्रम स्पर्धेत वाशिम जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक पटकावला आहे.त्यांचे अनेक नवोपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.मिनाक्षी नागराळे यांचे चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.चिमणी पाखरं,उमलती फुले, स्वराज्याचे मावळे (महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह -जृयांची निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयात निवड झाली आहे आणि महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.) समकालीन समिक्षा -(पि.एच.डी.करणा-यांसाठी संशोधन ग्रंथ) अशी चार पुस्तके प्रकाशित असून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.मिनाक्षी पी.नागराळे नावाचे शैक्षणिक युट्यूब चॅनल प्रसिध्द असून लाखो लोकांची पसंती दर्शविली आहे.संगीतमय पाढे या त्यांच्या व्हिडिओ ला ६० लाख लोकांनी पाहिला आहे.त्याचबरोबर त्यांचे http://meenakshi1412.blogspot.com या ब्लॉगवर अनेक शैक्षणिक पोस्ट आहेत.
No comments:
Post a Comment