*द्वितीय क्रमांक विजेते पत्रलेखन*
*विषय-* *सरत्या वर्षाला निरोप*
पत्ता-सरते वर्ष,
डिसेंबर गल्ली
गाव- 2018
पीन न-311218
आदरणीय सरते वर्षाला मिनाक्षीचा साष्टांग नमस्कार..पत्रास कारण की इकडे मी चांगली आहे पण तुम्ही तुमची खुशाली काही कळवली नाहीत म्हणून म्हणलं पत्र लिहावं तुमची चौकशी करावी कारण आजकालच्या व्हाॅटस्पच्या जमान्यात कोण हल्ली पत्र लिहीतयं? पत्र पार हरवूनच गेल्यासारखं झालयं या जगातून म्हणून हा प्रयास....
गेल्या वर्षी शेतक-याच्या शेतमालाला भाव नाही.पाऊस कमी असल्याने शेती पिकली नाही.पीकवीमा कागदावर कागदं जोडूनही अद्याप आजपावेतो मिळालेला नाही.कागदं गोळा करण्यातच शे पाचशे रूपये गेले पण दमडीभर पीकवीमा मिळाला नाही.सावकाराचं कर्ज अंगावर भलमोठं व्याज होऊन बसलं जमिन गहाण ठेवली सावकार यंदा पेरणीसाठी अडवलं त्याच्या कर्जापायी घरधनीचं डोरलं,पोत गहाण ठेवून ते पैसे व्याज म्हणून सावकाराला दिलं तवा यंदा जमिन मोकळी झाली.पण थोरल्या पोरीचं लग्नं कांही जमलं नाहीच...प्रत्येक पाहुणा हुंडा मागतोय आणि हुंड्यासाठी सोयरीक जमता जमता मोडते.आता तिच्या हुंड्याचा घोर जिवाला लागून राह्यला २०१८ तर असंच गेलं.अडचणी चणचणीतच यंदा तरी न हुंडा घेणारा नवरदेव भेटतो का नाही २०१९ या वर्षाला तुम्ही विचारावं ही माझी एका शेतक-याची विनंती...
अजून एक सांगायचं राहीलं सरत्या वर्षा ते काय जिएस.टी का फि.एसटी ती मात्र या वर्षाला नको रं बाबा...मधल्या पोरीला शाळेत पाठवायचं हुतं पण शिक्षणाचा खर्च मला काय झेपणार नाही.पोरगं तेवढं सायकलीकवर जातयं शाळेला.त्याचा ही खर्च शिक्षणाचा भागत नाही तर मधली पोरगी आणि तिची माय लोकांची तुर कापायला रोजानं जाऊन तेच्या खर्चात पोराच्या शिक्षणाचा खर्च भागवला जातोय...दोन पोरी लग्नाला येऊन बसल्या घरी.त्यांच उजवायचं कसं या विचारानं रात्रीला झोपचं येईना...निर्दयी शासनाने झोपेचं सोंग घेऊन झोपल्याला शासनाला मात्र तुला उठवता आलं तर तेवढं बघं....आणि शेती पिकना,घरखर्च भागवेना कधी कधी वाटतं त्या शेतातल्या दोन बैलजोड्या सोडून द्यावं कितीवेळा बिचा-यां सर्जा- राजा नं उपाशी राहावं?वैरणीची सोय नाही,पाणी नाही,आणि त्यांच्याच कास-यांनी जीवनयात्रा संपवून टाकावी.पण काळीज हेलावून जातयं...मग तरी शासनाला जाग येईल...
हे सरत्या वर्षा तू तरी यंदाच्या येणारा वरीस आमचा चांगला येण्यासाठी प्रयत्न कर बाबा...एवढा माझा निरोप येणा-या वर्षाला सांग बाबा माझ्याकडं काय ते व्हाॅटस्प बीट्स नाय तुझ्याकडं असेल तर तू त्यांच्यावर मेसेज का फिसेज ते पाठव...आणि न हुंडा घेणारा मुलगा मात्र आठवणीनं पाठवं....
*तुझाच रिकाम्या हाताचा*
*एक कर्जबाजारी*
*शेतकरी.....*
(हे पत्र माझ्या ब्लॉग वर प्रकाशित असल्याने नावासकट शेअर करा)
*©®कवयित्री-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍✍
No comments:
Post a Comment