*बाई माझ्या*
माझ्या बाईंना समर्पित रचना...
*बाई माझ्या छान*
*गालात हसायच्या*
*उंचापु-या सडपातळ*
*गो-या छान दिसायच्या....*✒
*शब्द असो की उजळणी*
*नियमितपणे पहायच्या*
*काळ्याभोर वेणीला*
*गजराही माळायच्या....*
*पाढे २ ते ३० पर्यंत रोज*
*अचूक म्हणून घ्यायच्या*
*कंटाळवाने झाले की*
*झुकझुकगाडी घ्यायच्या...*✒
*चुकलं कधी तर जवळ*
*बोलावून मायेनं सांगायच्या*
*कौतुकाची थाप पाठीवर*
*आठवणीने द्यायच्या....*✒
*हावभावासह गोष्टी*
*छान छान सांगायच्या*
*दूध आणि सुगडी*
*खायला द्यायच्या....*✒
*आवाज होता मंजुळ*
*गोड गीत म्हणायच्या*
*राष्ट्रगीत सुरेल सुरात*
*पेटीवर म्हणायच्या....*✒
*मंत्रमुग्ध व्हायची मुले*
*जेव्हा मॅडम वर्गात यायच्या*
*शिस्त फार होती अंगी*
*फार कडक दिसायच्या....*✒
*इंग्रजीत एकदम परफेक्ट*
*इंग्रजीच बोलायच्या*
*शब्दांसाठा फार महत्त्वाचा*
*समजावून सांगायच्या....*✒
*आजारी असलं कोणी*
*विचारपूस करायच्या*
*पारले -G घेवून सोबत*
*पहायला घरी यायच्या....*✒
*वक्तृत्व कला छान*
*भाषण छान करायच्या*
*एखादा गुलाब दिला की*
*प्रेमाने जवळ मला घ्यायच्या...*✒
*अशा माझ्या काळेबाई*
*जणू आईच भासायच्या*
*काळाआड गेली मुर्ती*
*आठवणी मनी उरायच्या...*✒
*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍
(माझ्या ब्लाॅगवर प्रसारित केली आहे त्यामुळे नावांसह शेअर करावी.)
No comments:
Post a Comment