बालवयातच मुलांना बोधकथा, संस्कारकथा,छान छान गोष्टी खूप आवडतात. गोष्टीमधून योग्य ते संस्कार रुजवले जातात.बालकांच्या भावविश्वाशी निगडित असणाऱ्या प्राण्या-पक्षांच्या,आजोबा-आजींच्या,निसर्गाच्या, परींच्या कथा बालकांना खूप आवडतात.गाण्यापेक्षाही मुलांना कथा जास्त आवडतात.अशाच कथांचं पुस्तक माझ्या वाचनात आले आहे.त्याचं नाव आहे बारीक सारीक गोष्टी. लेखक आहेत शिरीष पद्माकर देशमुख. चपराक प्रकाशन यांनी प्रकाशन केले असून याची प्रथम आवृत्ती १७ सप्टेंबर २०२० ला प्रकाशित झाली आहे. या कथा संग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय देखणे आहे. पाहताक्षणी वाचण्याची उत्कंठा निर्माण करणारे आहे. या कथासंग्रहात एकूण पंधरा गोष्टी असून त्याचे मूल्य फक्त ९९रूपये आहे. पण यातल्या सर्वच कथा बालकावर योग्य संस्कार करणा-या आहेत.
जालना जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखक शिरीष देशमुख यांचा बालबोध करणारा कथासंग्रह बारीक-सारीक गोष्टी या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.कथा छोट्या छोट्या असल्या तरी गहन आशयाच्या आहेत. आज बऱ्याच पालकांच्या तक्रारी असतात की या मोबाईल मुळे मुले बिघडायला लागली आहेत. मुलं खूप हट्टी होत आहेत. त्यांना शिस्त नाही. रागीष्ट झालेत अशी अनेक पालकांच्या तक्रारी असतात पण मुलांवर योग्य वयात योग्य ते चांगले संस्कार करण्याची गरज आहे. बालवयात केले गेलेले संस्कार आयुष्यभर पुरतात, टिकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे माँसाहेब जिजाऊ होय. मासाहेबांनी शिवरायांवर बालपणीच उत्तम संस्कार केले. स्त्रियांचा आदर करणे रयतेचे रक्षण करणे, रयतेच्या सुखासाठी अपार त्रास सहन करणे, आपले कर्तव्य बजावणे हे सारे संस्कार बालवयातच रामायण-महाभारतातल्या सारख्या कथा सांगून योग्य ते संस्कार पेरले होते म्हणून जगाच्या इतिहासात छत्रपती शिवरायांचे नाव प्रथम येतील अशा संस्कार घडवणाऱ्या या कथा प्रत्येक बालकांनी तर वाचाव्यात पण पालकांनी ही आवर्जून वाचाव्यात अशाच आहेत.
लेखक शिरीष देशमुख यांनी बालकांना वळण लावणाऱ्या बालकांवर संस्कार घडवणाऱ्या, बालकांच्या व पालकांच्या पचनी पडतील अशा कथांचा खजिनाच वाचकांसमोर ठेवला आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. बुजगावणं या कथेत एक हरिणी आपल्या पाडसांना हिम्मत येण्यासाठी बुजगावणं पाडून दाखवते नंतर सर्व पाडसाची भीती आपोआप दूर होते.बालकांच्या जीवनातला सर्वात मोठा गुरु म्हणजे आई असते तीच जीवनाला योग्य आकार देत असते. हे या कथेतून प्रकर्षानं जाणवतं
मार्जिन या कथेमध्ये मार्जिन पेक्षा निसर्ग किती मोठा ? तो कोणत्या पद्धतीने वाचवला पाहिजे हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारा यश प्राप्त प्रात्यक्षिकासंह आपल्या प्रिन्सिपल मॅडमला समजावून सांगतो.वेळ प्रसंगी सरांच्या छड्या खाणाऱ्या यशचे निसर्गावर चे प्रेम निसर्ग, वाचवण्याचे उपाय अगदी छोट्या कृतीतूनही धीटपणे सांगणारा यश त्याच्या धाडसाचे कौतुक वाटल्याशिवाय राहणार नाही ही कथा वाचल्यानंतर खरंच आपण का मार्जिन सोडतो असा सवाल वाचकाला पडतो.
शाळेत जायला नको म्हणून रडणारा राजू चित्रकला स्पर्धेत प्रथम येतो आणि आपलं बक्षीस बाबांना दाखवतो तेव्हा राजूच्या रागामुळे घरातलं झालेलं नुकसान, दूध सांडणे, रिमोट फोडणे बाबा समजावून सांगितल्याने राजुचा राग किती वाईट आहे ? ते कळतं. आजकाल मुलांना हल्ली ही भाजी आवडत नाही. ती भाजी आवडत नाही. असे म्हणणाऱ्या मुलांसाठी खास कथा आहे. दाता तला राक्षस या कथेत अनंता सूर बंटीच्या स्वप्नात येऊन ब्रश कर बदल दम देतो.त्याच बरोबर बिस्कीट चहा किती वाईट आहे ते सांगतो. त्यामुळे घाबरलेला बंटी दररोज ब्रश नियमितपणे करतो हे आजच्या प्रश्न करणाऱ्या कंटाळवाण्या मुलांवर खास औषधच आहे.
आजच्या धावत्या युगात पालकांनी आपल्या मुलाबरोबर वेळ कसा घालवावा याची महती सांगणारा, बालकांच्या भावना पालकांपर्यंत पोचणारी कथा संजू तप करतो या कथेतून शिरीष देशमुख यांनी अगदी मार्मिकपणे मांडली आहे त्यामुळे पालक नक्की जागृत होतील यात संशय नाही. शेतकऱ्याला पोटासाठी सालभर किती कष्ट करावे लागतात. याची प्रचिती देणारी कथा म्हणजे ' पांढरा चिखल' पावसामुळे होणारे शेतकऱ्याचे नुकसान ,मुलगा जेव्हा डोळ्यांनी पाहतो तेव्हा मला सायकल नको म्हणून रडणारा मुलगा व बाप यात मुलांचा समंजसपणा, मोठेपणा दिसून येतो. गारपीठीमध्ये गोरगरिबांचे संसार उघड्यावर आलेल्या लोकांना मदत करून खऱ्या अर्थाने शिवजयंती कशी साजरी करतात हे शिव संस्कार या कथेतून घेण्यासारखे आहे हरवलेल्या हरिणीच्या पाडसाला झालेली जखम पाहून तळमळणारा कोवळ्या मनाचा राजा पाडसाला जीवापाड प्रेम करतो.राजा आणि पाडस या कथेमध्ये प्राणीमात्रावर दया कशी करावी? हे दिसून येते
भोळ्याभाबड्या यशला पाच रुपयाचा नाना सापडतो. हे पैसे माझी नाहीत मी नको ठेवायला. अशीच सद्सद्लतविवेक बुद्धीने वागणारा सापडलेले पैसे देवाच्या पेटी मध्ये टाकण्यासाठी जातो पण मंदिराबाहेर भुकेने व्याकूळ झालेला मुलगा पाहून भीक मागणाऱ्या मुलाला पैसे न देता त्याला स्वतःचे दोन रुपये टाकून दुकानात जाऊन पाच रुपये ची वही व दोन रुपयाचा पेन देतो. हे या डॉलर या कथेतून त्याचा प्रामाणिकपणा वाखाणण्याजोगा आहे. इतरांना मदत करणारे भाव- भावना काळजाला स्पर्श करून जाते. माझी आईत्याची आई या कथेतून ग्रामीण भागात राहणाऱ्या कष्ट करून घामाने स्वाभिमानाने प्रामाणिकपणा रे राहणारी महेश ची आई रोहन आपल्या आईबरोबर तुम्हाला करून पाहतो पण रोहनला माहेरची आई परिस्थितीने दरिद्री पण मनाने श्रीमंत असलेली आई अधिक महत्त्वाची वाटते
रवी च्या बर्थडेला रवी चे चित्र स्केच करून वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी झिप्री या कथेतून निस्सीम निखळ प्रेम दिसून येतो रविवार माझ्या आवडीचा म्हणणाऱ्यांना रविवार किती कंटाळवाणा आहे तो दिसतो. दररोज रविवार असेल तर सगळी कामं कशी ठप्प पडतात? तेच सोमवारची कहाणी या कथेतून दिसून येते.राजकन्या आणि परीस यांची ही कथा खूपच मनोरंजक आहे परिसाचा दगड फेकून देणाऱ्या राजकुमारीला परिसराचे महत्त्व कळत नाही तोच दगड लोहारा ला ठेचून बघा करण्यासाठी दिला जातो आणि लोहाराच्या आयुष्याचं सोनं होतं मायेची गोष्ट या कथेमध्ये मुक्या प्राण्यावर जीवापाड प्रेम करणारा लहानग्याला दासुच अपार प्रेम दिसून येतं.
लेखक शिरीष देशमुख यांनी बारीक-सारीक गोष्टी या बाल संग्रहातून विद्यार्थ्यांवर,बालकांवर योग्य संस्कार होतील अशा सर्वच कथांचा खजिना आजच्या मोबाईलच्या आहारी गेलेल्या बालका समोर ठेवला आहे. बालवयातच योग्य संस्कार मुलांवर होतात त्यासाठी प्रत्येक बालक व पालकांनी बारीक-सारीक गोष्टी आवर्जून वाचावे असा कथासंग्रह. आज साहित्यामध्ये महिलाचा दगड ठरला आहे. यातल्या सर्वच कथा बालमनाला आवडतील अशा सर्वच कथा चित्ररूप असल्याने व बालकांच्या पुस्तक हाताळण्याच्या दृष्टीने पाणी दर्जेदार प्रतीची असल्याने थेट कथा काळजाला भिडतात. वाचकाला वाचताना जणू चित्र डोळ्यासमोर उभे राहते असे संस्काराचा खजिना प्रत्येक शाळेत घरात आवर्जून ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे.
लेखक शिरीष देशमुख यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा
समीक्षिका/लेखिका /शिक्षिका /कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता. जि. वाशिम

