*सत्य*
माणुसकी हीच खरी सेवा आणि सत्य हाच खरा धर्म मानवाचा असला पाहिजे. सत्य हे प्रखर सूर्यासारखे तेज असते.सत्याला नेहमी तेजाचे वलय असते. सत्य कधीच आयुष्यात हरत नाही आणि झाकले ही जात नाही. एखादी व्यक्ती जर सत्याला झाकत असेल तर ती फक्त कांही काळापुरतीच झाकल्या जाऊ शकते. एक ना एक दिवस सत्य हे समोर येतच असते. जसे की एखाद्या विस्तवावर काही क्षणानंतर राख दिसायला लागते आणि त्या राखेला जर फुंकर मारली तर त्यावरचा विस्तव दिसतो अगदी त्याच प्रमाणे सत्य हे फक्त विस्तवा सारखे असते फक्त कांही कालावधी करिता ते धुळीने झाकले जाते पण कायमसाठी दबले जात नाही.आज आपण पाहतो बऱ्याच घरांमध्ये मोठी माणसंच खोटे बोलताना दिसतात त्यांचं पाहूनच लहान मुलं सुद्धा अनुकरण करत असतात ज्या घरांमध्ये एखादा पालक त्यांच्या मुलाला म्हणत असेल की बाबा घरात नाहीत म्हणून सांग असं फोनवर मुलाला बोलण्यासाठी सांगितलं जातं आणि मग त्या वेळेला मुलाला आश्चर्य वाटतं की बाबा खोटं का बोलताहेत पण वडिलांच्या मर्जी खातर ते लहान मूल खोटे बोलून जातं पण खोटं बोलताना असं सांगतो "की बाबा म्हणतात बाबा घरात नाहीत म्हणून सांग" आणि लगेचच सत्य हे उघड होतं असतं म्हणून सत्य हे फार दिवस झाकले जात नाही...
आपल्यावर केवढे मोठे ही संकट आले आणि कसली ही जर वेळ आली तर माणसांनी सदैव खरेच बोलले पाहिजे.. सत्यच बोलले पाहिजे एक खोटं झाकायला अनेक वेळा खोटे बोलावे लागते.पण या ख-या खोट्याच्या नादात माणसाची पार वाट लागते..हे सुद्धा आपणाला समजायला हवं....एखादी व्यक्ती खोटी बोलली हे जेव्हा समोरच्या व्यक्तीसमोर सिद्ध होतं तेव्हा दोन कानसुलीत मारल्यागत..सण...सण..आवाज झाल्यागत वाटतं...शेवटी खरे खोटे च्या नादात.. विश्वास उडून गेला की कांहीं खरंच नसते...एकदा खोटं बोलणारा,लबाड अशी जर प्रतिमा तयार झाली तर कितीही खरं बोला...ते नेहमी मग खोटंच असत्यच वाटायला लागतं...लांडगा आला रे...गोष्टीसारखी गत होते... दररोज लांडग्याची भिती घालणारा मेंढपाळ मुलगा खोटं बोलवून लोकांना फसवत असतो आणि एक दिवस त्याच्या खोट्या बोलण्याला लोक़ विश्वासच ठेवत नाहीत आणि खरंच एक दिवस असा येतो...की खरोखर लांडगा येतो आणि सर्व शेळ्या खावून जातो..त्या मेंढपाळ मुलाच्या बोलण्यावर लक्ष देत नसतं... आणि मेंढपाळाच्या सर्व शेळ्या एक दिवस लांडगा खावून घेतात.... मेंढपाळाच्या खोटेपणामुळे त्याच्या सर्व शेळ्या लांडग्यानं खावून खाल्या....
कांहीं लोकं वय लपवण्यासाठी,वय कमी करून सांगतात..काय उपयोग कर बाबा त्या वयाचा... त्यापेक्षा एक कामं करा... खोटं बोलूच नका...खोटेच बोलले नाही तर लपवणृयाचा प्रश्नच नाही ना....
आयुष्याच्या कपड्याला
सत्याची झालर
कष्टाची किनार
जर आयुष्याला
लावली तर.....
आयुष्याचं सोनं
नक्कीच होणार....!!
सत्याची ताकद ही हजार पटीने जास्त असते...सत्य नेहमी बलवान असते...जसे आपण सुर्याचे किरण झाकू शकत नाहीत.अगदी तसेच सत्य ही झाकू शकत नाही..सुर्याच्या किरणांइतकेच प्रवावी सत्य असते.... कांहीं वेळा सत्यालाच खूप त्रास होतो.म्हणून आपण कधीच वाम मार्गाने जायचे नाही....अपयश आले तर हरायचे नाही....
सत्य हाच देव
सत्य हाच भाव
सत्य हीच पुजा
सत्य हेच शिव...!!
सत्याच्या मार्गाने जाणारा माणूस कधीच संकटात सापडत नाही.सत्य हाच देव आहे...वाममार्गाने कमवलेला पैसा,धन,टिकत नसते...तोच पैसा प्रामाणिकपणे कमवले तर तो टिकतो,व पुरतोही....जो सत्याची पुजा करतो त्यालाच शिव प्राप्त होते....सत्याचं पारडं हे कधीही जडच असते...
"चला धरूया सत्याची कास
सत्यानेच मग होईल विकास"