Saturday, 13 October 2018

कास्तकरी

*व-हाडी कविता*

             *कास्तकरी*

राब राब राबतोया
महा कास्तकरी बाप
कोरडे नक्षत्र सोबतीला
लागे चालताना धाप....✒

पाण्यानं दिलं दगा
जगायाचा झाले वांदा
आभायाला पडली ठिगय
सवस्त झाला कांदा....✒

कास्तक-याचं जीनं
यंदा महाग होवून राह्यले
वा-यावरच्या वरातीचं घोडं
गंगेतच न्हावून राह्यले...✒

कास्तकरयाले भौ
कायचे दिन अच्छे आले
दुष्काळ अनं महागाईनं
जीव मेताकुटीले आले.....✒

कुठंवर कंबर कसायचं ?
कुठंवर बळंच उसनं अवसान आणायचं
कास्तक-याच्या नशिबाचं भोग
सांगा कुठवर भोगायचं....✒

नशिबाले दोष देत
जगलं कास्तकरयाचं जीवन
उघड्या डोळ्यांनी बघतायेत
कास्तकरयाचं मरण....✒

कास्तक-याच्या बाईचा
डोईवर पदर फाटका
कास्तकरयायचं जीवन बघा
लागुन राहील जीवाले चुटका...✒

*©कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍

No comments:

Post a Comment