Tuesday, 25 December 2018

वाशिम जिल्हा...

*वाशिम जिल्हा*

वाकाटक राज्याची राजधानी
"वत्सगुल्म"  होतं जुनं नांव
बच्छोम,बासम,वात्सुलग्राम
प्रचलित वाशिम सर्वांना ठावं....✒

निर्मिती झाली या जिल्ह्याची
१ जुलै 1998 साली
अकोला जिल्ह्यातून विभक्त
अशी वाशिमची निर्मिती झाली....✒

वत्सगुल्म नगरी राजधानी
फार फार प्रसिद्ध होती
वाकाटकाच्या राज्यात
फार मोठी राजधानी होती....✒

नगरीच्या चारही बाजुला
चार वेशी मजबूत व सिध्द
आजही पद्मतीर्थ आणि
बालाजी मंदीर आहे प्रसिद्ध....✒

नंतर राजा "चालुक्य"
यांचे राज्य आले
आणि हळूहळू वाशिमचे
महत्त्व कमी होऊ लागले....✒

पुन्हा नव्याने राजा यादवांची
राजवट सुरू झाले...
पुन्हा वाशिमचे महत्त्व
आपोआप वाढू लागले.....✒

वाशिम इथेच होती
निजामांची टाकसाळ
नंतर इंग्रजाच्या राज्यात
व-हाडाशी जुळली नाळ....✒

वाशिम हा व-हाडातला जिल्हा
व-हाडी इथली मायबोली महान
विदर्भातला जिल्हा म्हणून
व-हाडी साहित्याची ओळख छान....✒

याच नगरीत आश्रयाला होते
श्रेष्ठ कवी संत कालीदास
प्रेमळ यांची भाषा आहे
वेगळाच आहे आत्मविश्वास...✒

पवित्र नदी "पैनगंगा"
याच जिल्ह्यातून वाहते
इ.स.पुर्व ३०० पासून वाशिमध्येच
सातवाहन राजाचे राज्य होते....✒

अनेक तिर्थक्षेत्रे प्रसिद्ध
म्हणून वाशिमची ओळख अशी
वाशिम जिल्ह्यातच येते
पोहरादेवी बंजारा समाजाची काशी...✒

सोयाबीन,तूर,कापूस
ही इथली प्रमुख पिके
तापमानाचा पारा चढतो
हिवाळ्यात दिसती धुके....✒

साधीसुदी माणसं इथली
आहेत मोठ्या मनाची
आदर,प्रेमभावना इत्यादी
भेट खास ईश्वराची.....✒

कर्मभुमी माझी ही
माझाच जिल्हा मानते
माझ्या नावांसमोर सुध्दा
वाशिमचेच नाव लावते...✒

*©®कवयित्री-कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*

✍✍✍✍✍✍✍✍

Wednesday, 14 November 2018

दिवाळी नंतरचे चार दिवस...

*स्पर्धेसाठी लेख*

*विषय-दिवाळी नंतरचे चार दिवस*

*अगदी खराखुरा स्वतः अनुभवलेला लेख*

दिवाळीच्या सुट्ट्या लागणार या ओढीनेच स्वजिल्ह्यात दिवाळी सणाला जाण्यासाठी  चार दिवस अगोदरच बॅग भरून ठेवलेली. दिवाळी सुट्टी एकदाची लागली रे लागली की बॅग उचलायची आणि गावाला निघायचं...गावाची ओढं काही वेगळीच असते.दिवसभर प्रवास करून सुध्दा मन थकलं नव्हत.पावलं घराच्या दिशेनं आपोआपच वळत होती.घरात प्रवेश केल्याबरोबर अंगणी दिवे लावलेली होती.दिव्यांच्या प्रकाशाने अंगण व मन दोन्ही उजळून दिसत होतं...घरात प्रवेश केल्यावर फराळाचा खमंग वास येत होता.बुंदीचे लाडू हसत होते,करंज्या समाधानानं फुगून बसल्या होत्या.चकल्या मनाला गरगर फिरवत स्वतःकडे ओढत होत्या.शंकरपाळे खळखळून हसून फुटली होती.कुरकुरीत चिवड्याचा खमंग वासनांध घर डोलत होतं अनारशी गालात हसत होती.आणि बालुशाही गड जिंकून आलेल्या राजासारखी ऐटीत बसली होती...फटाक्यांची अतिशबाजी अजिबातच नव्हती...पण दिव्याच्या,लाईटींगच्या माळांनी घर चमकत होती...
      नवख्या माहेरवाशिनीनी माहेरी हजेरी लावली होती.उटण्याचा सुगंध घरभर पसरला होता.सकाळी सकाळी पहाटेला मोती साबणाचा सुवास अंतरमनाला प्रफुल्लित करत होता...बघता बघता लक्ष्मीपुजन झाले.गुडीपाडवा झाला.आणि भाऊबीज ही झाली आणि पाच दिवसात दिवाळी संपलीही...त्यानंतर दिवाळीनंतरचे चार दिवस सर्वत्र शांतता होती.हळूहळू रोशनाई कमी होत होती.
    इकडे मला एक वेगळीच ओढं लागली होती ती म्हणजे माझ्या  *डि.एड्* काॅलेजचं गेट टुगेदर ठरलेलं त्याची एक महिना व्हाॅटस्प ग्रुपवर नियोजन अगोदरच ठरलेलं..मी बॅग भरायला सुरूवात केली.घरातून केंव्हा निघायचं,कुठं थांबायचं? कोणती साडी घालायची?कोणता ड्रेस घालायचा सर्व नियोजन करून लगबगीनं बॅग भरली आणि माझी पावलं ११ नोव्हेंबर ला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्था म्हणजे लठ्ठे ज्यु काॅलेज ऑफ एज्युकेशन आष्टा ता.वाळवा जि.सांगली इकडे निघाली..संध्याकाळी सर्व माजी विद्यार्थी आपापल्या सोईनुसारं येणार होती.रात्र उजाडल्यानंतरचा दिवस म्हणजे गेट टुगेदरचा होता.तब्बल १२ वर्षानी सर्वजण एकमेकांना भेटणार होतो.त्याची एक अनामिक ओढ मित्रमंडळींना तर होतीच पण त्याहीपेक्षा आम्ही जिथे विद्यार्थी म्हणून घडलो त्या आमच्या आदरणीय गुरूजनांना भेटणार होतो.हळूहळू सर्व डि.एड् ची माजी विद्यार्थी
काॅलेजवर जमली सर्वजण मिळून तयारी करू लागली त्यातली काहीजण सुत्रसंचालनाचं नियोजन करत होती तर कुणी शाल,श्रीफळ,गुच्छ,हार इ.ची लीस्ट बनवून ते खरेदी करण्यासाठी बाजारात गेली होती.मी मात्र माझ्या ग्रंथालय सांभाळणा-या व मुलींच्या हाॅस्टेलवर खूप बारीक नजर ठेवून आम्हांला आईसारखी माया देणा-या आदरणीय पाटील मॅडमला माझे डोळे शोधीत होती.मॅडम ऑफीस मध्ये दिसताक्षणिच अय्या मिनाक्षी कशी आहेस? म्हणून एकदम मिठी मारली आणि मन कसं भरून आलं...त्याचं वर्णन शब्दांत करणं अशक्यच...
      मॅडमसोबत खूप गप्पा मारल्या मग माझ्या सर्व गुरूवर्यानी मला ऑफीसात बोलावून आदराने विचरपूस केली.आदरातिथ्य केले.चहा व नाष्ट्याची सोय आमच्या काॅलेजनीच केली होती.आजी विद्यार्थ्यांनी कर्मवीरांच्या पुतळ्यासमोर सुंदर अशी रांगोळी,फलकलेखन केलं होतं,पाय-यावर सुध्दा खूप छान रांगोळी काढली होती.माझी सर्व मित्रमंडळींनी बारा वर्षानी भेटत होतो.सर्वाच्या चेह-यावर हास्य,समाधान,ओढ,झळकत होती.एकमेकांची विचारपूस केली.ब-याच जणांमध्ये फार बदल दिसत होता.कुणी थोडं जाड झालेली तर कुणी थोडे बारीक झालेली तर कुणाचे केस गेलेले तर मुलांना दाढीमिशा आलेले असे वेगवेगळे चेहरे पण आपापल्या जिल्ह्यात समाधानाने चांगले कार्य करत राहणारे असे सर्वजण भेटलो...
    कार्यक्रमाला सुरूवात झाली.सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पुतळ्यास हारार्पण करून सर्वानी मानवंदना केली.व फोटो काढुन त्या गोड आठवणी आपल्या मोबाईल मध्ये कैद करण्याचा प्रयत्न केला...आमच्या आदरणीय गुरूजणांनी कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.आमच्या वेळी आम्हांला असलेले सर्व शिक्षक आमचे गुरू आमच्या समोर बसले होते प्रत्येकामध्ये बदल दिसत होता.त्यातले सर्वजण रिटायर्ड झाली होती फक्त पाटील मॅडम व पाटील सर हे दोघेच कार्यरत होते.आदरणीय पाटील सर आमचे क्लास टीचर होते ते आता प्राचार्य झाले होते.त्यामुळे ते असेपर्यंतच आम्ही रयत शिक्षण संस्थेला शताब्दीवर्ष व गेट टुगेदरचा संगम याच वर्षी घडवून आणला होता.
      सर्व गुरूवर्याना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून सर्वाचा सत्कार करण्यात आला.आजी व माजी अशा दोन्ही गुरूवर्याना सन्मानित केल्याबद्दल आम्हांला फार बरं वाटत होतं.माझा तर आनंद गगणाला मावेनासा झाला होता.कारण सर्व गुरूवर्याच्या चेह-यावर एक वेगळीच चकाकी एक वेगळच तेज दिसत होतं त्यामुळे चेहरा आणखीच खुलत होता.आजी विद्यार्थ्यांनी सुध्दा फार मेहनत घेवून आदर्श असल्याचं सिध्द केलं होतं.आमच्या आजी विद्यार्थ्यांचा सुध्दा काॅलेजच्या वतीने सर्वाचा सत्कार,सन्मान करण्यात आला.आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी जे एका वटवृक्षाखाली ज्ञान घेतलं होतं ते सर्व फांद्या एकत्र येवून काॅलेजसाठी आपापल्या परीने *आर्थिक* कृतज्ञता म्हणून सहकार्य केले.खूप सुंदर स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला.असं वाटलं आयुष्यातला एक दिवस संपुर्ण गोष्टीचा विसर पडला होता.आमच्या डोळ्यासमोर फक्त डि.एड् चे ते दिवस आणि आठवणी समोर दिसत होत्या...
      बघता बघता चार कधी वाजले समजलेच नाही आणि मग घरी जायची लगबग प्रत्येकाची सुरू झाली.महाराष्ट्रातच्या कानाकोप-यातून आलेली काॅलेजप्रेमी,मैत्रीप्रेमी मुलं परतीच्या प्रवासासाठी निघाली.मी मात्र एकटी लेडीज असल्याने संध्याकाळचा प्रवास टाळला.आणि आमच्या क्लासमधील श्री.पोवार सर यांच्याघरी निघाली.जाता जाता सरांनी पन्हाळा,शूरवीर शिवा काशीद यांची समाधी स्थळ भेट,आणि ज्योतीबाचे दर्शन करून घरी पोहचलो...कोल्हापूरचा ज्योतीबाच्या डोंगरकुशीत वसलेले पोवार सरांचे पोहाळे गांव खूप सुंदर आणि तिथली साधी पण मोठ्या मनाची माणसं दाट घरांमध्ये राहत होती.छोटंसं पण टुमदार गांव ज्योतीबाच्या डोंगरकुशीत वसलेले पण सर्वत्र हिरवाईने नटलेलं मनाला फार आल्हाददायक वाटलं.मी मुळतः मराठवाड्यातली असल्यानं असं गावाशेजारी डोंगर कधी पाहिलाच नव्हता..सरांच्या घराशेजारी हिरवागार ऊस पहायला मिळाला...एक रात्र मुक्काम करून दुस-या दिवशी माझ्या परतीच्या प्रवासासाला निघाले..आणि असा तीन दिवसाचा माझा प्रवास करून न केल्यासारखा वाटत होता कारणं आपल्या काॅलेजला आपण दिलेली  भेट कायम नजरेसमोर दिसत होती त्यामुळेच सारा शीण गेला असावा....

*लेखिका-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*

*लेख आवडला असल्यास जरूर प्रतिक्रिया कळवा प्रवासवर्णन पहिल्यांदाच करण्याचा एक प्रयत्न*

Friday, 26 October 2018

प्रकल्प यादी...200 शालेय प्रकल्प...

प्रकल्प यादी 200
शालेय  प्रकल्प  यादी 🌀
========================
---------'---------------------------------------
1) थोर संताची माहिती  मिळविणे
2) थोर समाजसेवकांची माहीती
3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती
4) थोर समाजसेविकांची  माहिती
5) आदर्श महिलांची माहिती
6) नामवंत खेळाडूंची माहिती
7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती
8) थोर शास्त्रज्ञांची माहिती
9) थोर विरांगनांची माहिती
10) श्रेष्ठ गायिकांची माहिती
11) श्रेष्ठ गायकांची माहिती
12) आदर्श शिक्षक
13) आदर्श शिक्षिका
14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक
16) माझा भारत महान
17) थोरांचे विचार
18) थोर हुतात्मा
19) राष्ट्रीय स्मारके
20) राष्ट्रीय प्रतिके
21 )प्राचीन मंदिर
22) ऐतिहासिक वाडे
23) महाराष्ट्रातील किल्ले
24) जलाशय  तलाव
25) धरणे
26) सरोवरे
27) खनिज  संपत्ती
28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती
29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती
30) औषधी वनस्पती
31) वाहतुकीचे नियम
32) वाहनांची घ्यावयाची दक्षता
33) माझे आवडते वाहन
34) रेल्वे स्टेशन
35) बसस्थानक
36) निबंध  कसा  लिहावा?
37) विरामचिन्हांचा वापर
38) पत्रलेखन  कसे करावे ?
39)कथा  कशी  सांगावी ?
40) कथालेखन कसे करावे?
41) कवितांचा संग्रह
42) भावगीतांचा संग्रह
43) सारलेखन कसे  करावे ?
44) मुद्यांवरून गोष्ट
45) चित्रमय गोष्ट
46) संवाद लेखन
47) वक्तृत्व कसे करावे ?
48) नृत्यप्रकार ओळखणे
49) वाद्यांची ओळख
50) हुमाउपंथी मंदिरे
51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे
52) म्हणींचा संग्रह करणे
53) सुविचारांचा संग्रह करणे
54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे
56) श्लोकांचा संग्रह करणे
57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह  करणे
58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह
59) 'आई' या विषयावरील  कवितांचा-गीतांचा संग्रह
60) गणितातील गमतीजमती
61) आकाशवाणी
62) दूरदर्शन
63) वर्तमानपत्र
64) प्रदर्शन खेळण्याचे
65) प्राणिसंग्रहालय
66) पशुसंग्रहालय
67) पुरातनवस्तु संग्रहालय
68) भाजीपाला मंडई
69) किराणा दुकान
70) आपली वाहने
71) बियांचा संग्रह
72) जुन्या टिकिटांचा संग्रह
73) नाण्यांचा संग्रह
74) भेटकार्डांचा संग्रह
75) लग्नपत्रिकांचा संग्रह
76) निसर्ग चित्रांचा संग्रह
77) पिसांचा संग्रह
78) खेळण्यांचा संग्रह
79) मातीचे नमुने
80) खडकांचे प्रकार
81) दगडांचे नमुने
82) वैज्ञानिक खेळणी
83) शंख -शिंपल्यांचा  संग्रह
84) राख्यांचा संग्रह
85) दो-यांचा संग्रह
85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह
86) माझी शाळा
87)  फुलांच्या चित्रांचा संग्रह
88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह
89) विविध धर्मियांची प्रार्थना  स्थळे
90) नूतन वर्षांभिनंदन
91) भारतीय सैनिकांची  शौर्यगाथा
92) आपला आवडता छंद
93) आवडते पुस्तक
94) आवडता  लेखक
95) आवडता गायक
96) आवडती गायिका
97) आवडता चित्रकार
98) आवडते गीत
99) आपल्या  जवळचा मित्र
100) ग्रामदेवता
101) माझा देश

*_============================_*

101 प्रक्रल्पांची नावे  .....

1) दिनदर्शिका  तयार  करणे
2) प्रादेशिक  शब्द -अर्थ
3) नदी  किनारा
4) समुद्र किनारा
5) सागर  सहल
6) कुडींतील लागवड
7) हातरूमालाचा वापर
8) शालेय  दप्तर
9) मातकामातील वस्तू
10) शिवणकामातील  लहान   -लहान कपडे
11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार  करणे
12) वाया गेलेल्या  कागदापासून वस्तू  तयार करणे
13) पुठ्ठा कामातून वस्तू  तयार  करणे
14) भरती  ओहोटी  कारणे
15) सागरी  लाटा  फायदे- तोटे
16) आदर्श शाळा
17) पाण्यावरील नाव- होडी
18) हाऊस बोट  जहाज
19) पाण्याचा वापर  कसा करावा
20) वर्गमुळ-घनमुळ यांचा  तक्ता
21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार  तक्ता
22) हवेतील  तापमान  कसे  ओळखावे
23) विविध  अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे
24) समानार्थी शब्द
25) विशेषण  विशेषनाम
26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग
27) विरुद्धधार्थी  शब्द
28) श्रम  हाच  देवता /श्रम  हीच पूजा
29) स्वच्छता  हाच  परमेश्वर 30) आई  हिच  देवता
31) उत्तम  आरोग्य
32) राखण्याचे  उपाय
33) परिश्रम  हिच  पुजा
34) कुलदैवत  हेच  वैभव
35) आदर्श  गाव
36) आदर्श विद्यार्थी
37) आदर्श  बालक
38) वीर  बालक- बालिका
39) रोपवाटिका
40) आरोग्य  हिच  संपत्ती
41) कलावंताची  माहिती
42) पावसाची  गाणी -कविता
43)  स्वरांपासून प्रतिकृती  तयार  करणे
44) परसबाग
45) फुलझाडांची लागवड
46) गच्चीवरील  बगीचा
47) शैक्षणिक  खेळणी
48) मासे  यांची  चित्रे  काढणे
49)  प्राण्याची  चित्रे काढणे
50) पक्ष्यांची  चित्रे काढणे
51) परिसरातील  झाडे
52) परिसरातील  उद्याने
53) परिसरातील मंदिरे
54) परिसरातील  घरे
55) स्वातंत्रगीतांचा  संग्रह  करणे
56) ग्रामसभा  आयोजित  करणे
57) ग्रामपंचायतीची  रचना
58) महापुराचे  वर्णन
59) धूर  विना  चूल
60) फळझाडे
61) आमराई
62) नारळी -फोफळीच्या बागा
63) माझा  कोकण
64) कोकण  वैभव
65) रात्रीचे  चांदणे
66) सुर्यदेवता
67) वर्षादेवता
68) जलदेवता
69) खेडूत  जिवन
70) मेंढपाळ
71) शेळीपालन
72) शेतातील  पिके
73) वृक्षदेवता

74) भौमितिक  आकृतींच्या 75) साहाय्याने प्रतिकृती करणे
76) भौमितिक  आकृत्यांचा परिचय
77) प्राथमिक  आजार -उपाय  78) रोगप्रसार व उपाय
79) गोबर गॅस
80) पाना -फुलांची  चित्रे काढणे
81) विद्युत  उपकरण  दुरुस्ती
82) संत  महिलांचा परिचय
83) तुळशीच्या  वृंदावनाचे
84) चित्र काढा
85) रांगोळी  काढा (साधी )
86) नक्षीदार  रांगोळी
87) रांगोळीचा गालिचा
88) पणत्यांची  प्रतिकृती
89) खडू तयार करणे
90) धूपबत्ती तयार  करणे
91) मी  पाहिलेली  जत्रा
92) आमच्या  गावाची  जत्रा
93) विविध  खाद्य पदार्थ
94) पदार्थाच्या चवी  उदा.खारट,तिखट इ.
95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार
96) जाहिरात  संग्रह
97) वृक्षांची  आकृती  उदा.आंबा
98) सुचीपर्णी वृक्ष
99) नारळाचे  झाड
100) चिंचेचे  झाड
101) अशोकाचे  झाड

संकलित-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे....
जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी ता. जि.वाशिम....

प्रकल्प यादी...200 शालेय प्रकल्प...

प्रकल्प यादी 200
शालेय  प्रकल्प  यादी 🌀
========================
---------'---------------------------------------
1) थोर संताची माहिती  मिळविणे
2) थोर समाजसेवकांची माहीती
3) थोर राष्ट्रपुरूषांची माहिती
4) थोर समाजसेविकांची  माहिती
5) आदर्श महिलांची माहिती
6) नामवंत खेळाडूंची माहिती
7) थोर शिक्षकतज्ञांची माहिती
8) थोर शास्त्रज्ञांची माहिती
9) थोर विरांगनांची माहिती
10) श्रेष्ठ गायिकांची माहिती
11) श्रेष्ठ गायकांची माहिती
12) आदर्श शिक्षक
13) आदर्श शिक्षिका
14) माझा गाव /आदर्श गाव 15) आदर्श समाजसेवक
16) माझा भारत महान
17) थोरांचे विचार
18) थोर हुतात्मा
19) राष्ट्रीय स्मारके
20) राष्ट्रीय प्रतिके
21 )प्राचीन मंदिर
22) ऐतिहासिक वाडे
23) महाराष्ट्रातील किल्ले
24) जलाशय  तलाव
25) धरणे
26) सरोवरे
27) खनिज  संपत्ती
28)जलसंपत्ती /समुद्र  संपत्ती
29) वनसंपत्ती/वन हिच संपत्ती
30) औषधी वनस्पती
31) वाहतुकीचे नियम
32) वाहनांची घ्यावयाची दक्षता
33) माझे आवडते वाहन
34) रेल्वे स्टेशन
35) बसस्थानक
36) निबंध  कसा  लिहावा?
37) विरामचिन्हांचा वापर
38) पत्रलेखन  कसे करावे ?
39)कथा  कशी  सांगावी ?
40) कथालेखन कसे करावे?
41) कवितांचा संग्रह
42) भावगीतांचा संग्रह
43) सारलेखन कसे  करावे ?
44) मुद्यांवरून गोष्ट
45) चित्रमय गोष्ट
46) संवाद लेखन
47) वक्तृत्व कसे करावे ?
48) नृत्यप्रकार ओळखणे
49) वाद्यांची ओळख
50) हुमाउपंथी मंदिरे
51) वाक्प्रचारांचा संग्रह करणे
52) म्हणींचा संग्रह करणे
53) सुविचारांचा संग्रह करणे
54) सुभाषितांचा संग्रह करणे 55) अभंगाचा संग्रह करणे
56) श्लोकांचा संग्रह करणे
57) देशभक्तीपर गीतांचा संग्रह  करणे
58) राष्ट्रीयगीतांचा संग्रह
59) 'आई' या विषयावरील  कवितांचा-गीतांचा संग्रह
60) गणितातील गमतीजमती
61) आकाशवाणी
62) दूरदर्शन
63) वर्तमानपत्र
64) प्रदर्शन खेळण्याचे
65) प्राणिसंग्रहालय
66) पशुसंग्रहालय
67) पुरातनवस्तु संग्रहालय
68) भाजीपाला मंडई
69) किराणा दुकान
70) आपली वाहने
71) बियांचा संग्रह
72) जुन्या टिकिटांचा संग्रह
73) नाण्यांचा संग्रह
74) भेटकार्डांचा संग्रह
75) लग्नपत्रिकांचा संग्रह
76) निसर्ग चित्रांचा संग्रह
77) पिसांचा संग्रह
78) खेळण्यांचा संग्रह
79) मातीचे नमुने
80) खडकांचे प्रकार
81) दगडांचे नमुने
82) वैज्ञानिक खेळणी
83) शंख -शिंपल्यांचा  संग्रह
84) राख्यांचा संग्रह
85) दो-यांचा संग्रह
85) वाहनांच्या चित्रांचा संग्रह
86) माझी शाळा
87)  फुलांच्या चित्रांचा संग्रह
88) प्राण्यांच्या चित्रांचा संग्रह
89) विविध धर्मियांची प्रार्थना  स्थळे
90) नूतन वर्षांभिनंदन
91) भारतीय सैनिकांची  शौर्यगाथा
92) आपला आवडता छंद
93) आवडते पुस्तक
94) आवडता  लेखक
95) आवडता गायक
96) आवडती गायिका
97) आवडता चित्रकार
98) आवडते गीत
99) आपल्या  जवळचा मित्र
100) ग्रामदेवता
101) माझा देश

*_============================_*

101 प्रक्रल्पांची नावे  .....

1) दिनदर्शिका  तयार  करणे
2) प्रादेशिक  शब्द -अर्थ
3) नदी  किनारा
4) समुद्र किनारा
5) सागर  सहल
6) कुडींतील लागवड
7) हातरूमालाचा वापर
8) शालेय  दप्तर
9) मातकामातील वस्तू
10) शिवणकामातील  लहान   -लहान कपडे
11) कापडी बॅचेस(बिल्ले )तयार  करणे
12) वाया गेलेल्या  कागदापासून वस्तू  तयार करणे
13) पुठ्ठा कामातून वस्तू  तयार  करणे
14) भरती  ओहोटी  कारणे
15) सागरी  लाटा  फायदे- तोटे
16) आदर्श शाळा
17) पाण्यावरील नाव- होडी
18) हाऊस बोट  जहाज
19) पाण्याचा वापर  कसा करावा
20) वर्गमुळ-घनमुळ यांचा  तक्ता
21) बेरीज -वजाबाकी-भागाकार गुणाकार  तक्ता
22) हवेतील  तापमान  कसे  ओळखावे
23) विविध  अक्षरांवरून वाक्यप्रचार तयार करणे
24) समानार्थी शब्द
25) विशेषण  विशेषनाम
26) लिंग -पुल्लिंग -स्त्रीलिंग
27) विरुद्धधार्थी  शब्द
28) श्रम  हाच  देवता /श्रम  हीच पूजा
29) स्वच्छता  हाच  परमेश्वर 30) आई  हिच  देवता
31) उत्तम  आरोग्य
32) राखण्याचे  उपाय
33) परिश्रम  हिच  पुजा
34) कुलदैवत  हेच  वैभव
35) आदर्श  गाव
36) आदर्श विद्यार्थी
37) आदर्श  बालक
38) वीर  बालक- बालिका
39) रोपवाटिका
40) आरोग्य  हिच  संपत्ती
41) कलावंताची  माहिती
42) पावसाची  गाणी -कविता
43)  स्वरांपासून प्रतिकृती  तयार  करणे
44) परसबाग
45) फुलझाडांची लागवड
46) गच्चीवरील  बगीचा
47) शैक्षणिक  खेळणी
48) मासे  यांची  चित्रे  काढणे
49)  प्राण्याची  चित्रे काढणे
50) पक्ष्यांची  चित्रे काढणे
51) परिसरातील  झाडे
52) परिसरातील  उद्याने
53) परिसरातील मंदिरे
54) परिसरातील  घरे
55) स्वातंत्रगीतांचा  संग्रह  करणे
56) ग्रामसभा  आयोजित  करणे
57) ग्रामपंचायतीची  रचना
58) महापुराचे  वर्णन
59) धूर  विना  चूल
60) फळझाडे
61) आमराई
62) नारळी -फोफळीच्या बागा
63) माझा  कोकण
64) कोकण  वैभव
65) रात्रीचे  चांदणे
66) सुर्यदेवता
67) वर्षादेवता
68) जलदेवता
69) खेडूत  जिवन
70) मेंढपाळ
71) शेळीपालन
72) शेतातील  पिके
73) वृक्षदेवता

74) भौमितिक  आकृतींच्या 75) साहाय्याने प्रतिकृती करणे
76) भौमितिक  आकृत्यांचा परिचय
77) प्राथमिक  आजार -उपाय  78) रोगप्रसार व उपाय
79) गोबर गॅस
80) पाना -फुलांची  चित्रे काढणे
81) विद्युत  उपकरण  दुरुस्ती
82) संत  महिलांचा परिचय
83) तुळशीच्या  वृंदावनाचे
84) चित्र काढा
85) रांगोळी  काढा (साधी )
86) नक्षीदार  रांगोळी
87) रांगोळीचा गालिचा
88) पणत्यांची  प्रतिकृती
89) खडू तयार करणे
90) धूपबत्ती तयार  करणे
91) मी  पाहिलेली  जत्रा
92) आमच्या  गावाची  जत्रा
93) विविध  खाद्य पदार्थ
94) पदार्थाच्या चवी  उदा.खारट,तिखट इ.
95) पोस्टबाॅक्सचे चित्र - आकार- प्रकार
96) जाहिरात  संग्रह
97) वृक्षांची  आकृती  उदा.आंबा
98) सुचीपर्णी वृक्ष
99) नारळाचे  झाड
100) चिंचेचे  झाड
101) अशोकाचे  झाड

संकलित-कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे....
जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी ता. जि.वाशिम....

Thursday, 25 October 2018

माती...अष्टाक्षरी रचना ..

     *व-हाडी काव्य रचना*

*अष्टाक्षरी रचना*

*विषय-माती*

काळी माती माझी माय
उभ्या आयुष्य सपान
पिक डोलतया रानी
धनी चालतो जोमानं.....

काळी माती मऊ मऊ
पिकविते     हिरेमोती
शेतकरी सुखी होण्या
घाम   शेतात   गाळती....

माती माझी माय हाय
लेणं उभं आयुष्याचं
सुख लागे पोराबाळा
मोल जाणावं मातीचं.....

जन्म  घेई    मायपोटी
काळीमाती खरी माय
जिच्या घरी तिचा वास
त्योच चार घास खाय.....

राबराबे         शेतकरी
कष्ट   उपसतो     रानी
काळीमाती त्याले माय
गातो सुखाची रं गाणी.....

काया काया मातीमधी
घाम  गाळीतो  रं  बळी
बळी  पोशिंदा  जगाचा
घास    उतरतो     गळी....

कष्ट करूनिया धान
जवा आणलं घरात
चार घास सुखाचे रे
तवा जाती रे पोटात....

पोरंबाळं माझी माय
तुझ्यामुळं जगताती
काय तुले सांगु लेका
मह्या मातीची महती ....

*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*