*वाशिम जिल्हा*
वाकाटक राज्याची राजधानी
"वत्सगुल्म" होतं जुनं नांव
बच्छोम,बासम,वात्सुलग्राम
प्रचलित वाशिम सर्वांना ठावं....✒
निर्मिती झाली या जिल्ह्याची
१ जुलै 1998 साली
अकोला जिल्ह्यातून विभक्त
अशी वाशिमची निर्मिती झाली....✒
वत्सगुल्म नगरी राजधानी
फार फार प्रसिद्ध होती
वाकाटकाच्या राज्यात
फार मोठी राजधानी होती....✒
नगरीच्या चारही बाजुला
चार वेशी मजबूत व सिध्द
आजही पद्मतीर्थ आणि
बालाजी मंदीर आहे प्रसिद्ध....✒
नंतर राजा "चालुक्य"
यांचे राज्य आले
आणि हळूहळू वाशिमचे
महत्त्व कमी होऊ लागले....✒
पुन्हा नव्याने राजा यादवांची
राजवट सुरू झाले...
पुन्हा वाशिमचे महत्त्व
आपोआप वाढू लागले.....✒
वाशिम इथेच होती
निजामांची टाकसाळ
नंतर इंग्रजाच्या राज्यात
व-हाडाशी जुळली नाळ....✒
वाशिम हा व-हाडातला जिल्हा
व-हाडी इथली मायबोली महान
विदर्भातला जिल्हा म्हणून
व-हाडी साहित्याची ओळख छान....✒
याच नगरीत आश्रयाला होते
श्रेष्ठ कवी संत कालीदास
प्रेमळ यांची भाषा आहे
वेगळाच आहे आत्मविश्वास...✒
पवित्र नदी "पैनगंगा"
याच जिल्ह्यातून वाहते
इ.स.पुर्व ३०० पासून वाशिमध्येच
सातवाहन राजाचे राज्य होते....✒
अनेक तिर्थक्षेत्रे प्रसिद्ध
म्हणून वाशिमची ओळख अशी
वाशिम जिल्ह्यातच येते
पोहरादेवी बंजारा समाजाची काशी...✒
सोयाबीन,तूर,कापूस
ही इथली प्रमुख पिके
तापमानाचा पारा चढतो
हिवाळ्यात दिसती धुके....✒
साधीसुदी माणसं इथली
आहेत मोठ्या मनाची
आदर,प्रेमभावना इत्यादी
भेट खास ईश्वराची.....✒
कर्मभुमी माझी ही
माझाच जिल्हा मानते
माझ्या नावांसमोर सुध्दा
वाशिमचेच नाव लावते...✒
*©®कवयित्री-कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍
No comments:
Post a Comment