Friday, 8 April 2022

संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी

*संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी*

      उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रसिद्ध लेखक,प्राध्यापक एम. ए. मराठी, सेट नेट, पी.एच.डी. प्राप्त प्राध्यापक डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी सर यांचा आठ ते दहा वर्षाचा संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी नुकताच वाचनात आला. डॉ. दीपक सूर्यवंशी सर हे मराठवाड्यातील नामांकित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सर्वपरिचित आहेत. प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांनी २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने रंगनाथ तिवारी या सदर विषयावरील सखोल संशोधनासाठी पी.एच.डी. बहाल केली. फक्त पदवी मिळविण्याकरिता अनेकजण संशोधन करणारे भरपूर मिळतात. पण एका लेखकाचा अभ्यास जगाला माहित व्हावा या उदात्त हेतूने दुसऱ्या लेखकावर लिहिणारे अत्यंत दुर्मिळच आहेत. लेखक प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सरांनी संशोधनाची शिस्त पाळूनही लेखकावर प्रचंड निष्ठा ठेवून अभ्यासपूर्ण संशोधनाचे कार्य केले आहे. डॉ. सूर्यवंशी सरांनी एका व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलाच आहे पण त्यांच्या साहित्यविश्वाचाही चिकित्सक अभ्यास देखील केल्याने नवीन पिढीला व्यक्ती आणि वाॾमय ग्रंथ रंगनाथ तिवारी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरला आहे.
          रंगनाथ तिवारी या ग्रंथाचे प्रकाशन अरुणा प्रकाशन लातूर यांनी केले असून या ग्रंथाची प्रथमावृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली सुंदर व सुरेख मुखपृष्ठ सरदार जाधव औरंगाबाद यांनी लेखक रंगनाथ तिवारी व त्यांचे साहित्य खूप सुंदर पणे रेखाटले आहे. या ग्रंथाला प्रस्तावना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, लातूर यांची लाभली असून पाठराखण प्रसिद्ध लेखक भास्कर चंदनशिव यांनी केली आहे. या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अनुदान देऊन सहकार्य केल्याबद्दल ग्रंथ अधिक मोलाचा ग्रंथ वाटतो. या ग्रंथाचे मूल्य केवळ ३५० रुपये असून व्यक्ती आणि वांॾमय त्यादृष्टीने अधिक तोलामोलाचा आहे. प्रत्येक चिकित्सक व अभ्यासू व्यक्तीने आवर्जून वाचावा आणि प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असावा असाच आहे.
           या ग्रंथाचा विषय असलेले रंगनाथ तिवारी हे हिंदीबरोबरच मराठीतील प्रतिभाशाली लेखक म्हणून सर्वपरिचित आहेत. १९७० ते ८० च्या दशकात त्यांनी लेखनास प्रारंभ केला. सलग तीन दशके रंगनाथ तिवारी यांनी साहित्याची सेवा अखंडपणे केली. रंगनाथ तिवारी हे मुलत: मराठीभाषिक नसले तरी त्यांनी मराठीतून विपुल प्रमाणात लिहिले पण मराठी लेखकाकडून उपेक्षितच राहिले. रंगनाथ तिवारी यांनी कथा, कादंबरी, नाटक आणि स्फुटलेखन करून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण सहा प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात रंगनाथ तिवारी यांचे व्यक्तिमत्त्व आणि वांड़मयीन प्रवास त्यांच्या जीवनाची जडणघडण अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून मुलाखत घेऊन, त्यांच्या सानिध्यात राहून सांगितली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक, पार्श्वभूमीवर त्यावर झालेले संस्कार यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती ही खऱ्या अर्थाने त्याच्या सभोवतीच्या पर्यावरणाची निर्मिती असते.
        रंगनाथ रामदयाल तिवारी यांचा जन्म २१ जानेवारी १९३३ रोजी सोलापूर येथे संस्कृती संपन्न अशा मारवाडी कुटुंबात झाला. यांचे मूळ घराणे राजस्थानातील. तेंव्हाचे राजस्थान आजच्या इतके प्रगत नव्हते. पाऊस नसल्याने शेती पिकत नव्हती. त्यामुळे रोजगाराच्या शोधात हे कुटुंब सोलापूर येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले. रंगनाथ तिवारी बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान. त्यांना वाचन, संगीत, क्रिकेट याची खूप आवड होती. रंगनाथ तिवारी यांचा पिंडच मुळात शिक्षकाचा त्यामुळे क्लार्कची नोकरी सोडून देऊन शिक्षक झाले. अभ्यासाचा व्यासंग वाढतच होता. संपल्या सुरावटी, देवगिरी, बिलावल ही रंगनाथ तिवारी यांची कादंबरी. याचबरोबर उत्तम पुरुष एक वचन, मौनाची महासभा, गुरुदेव, बेगम समरू, अनन्वय, काया, परकाया असे अनेक साहित्य प्रसिद्ध आहे. मराठी कादंबरी विश्वात मैलाचा दगड ठरलेला वज्राघात, स्वामी, श्रीमान योगी, पानिपत या ऐतिहासिक कादंबर्‍या, परंपरेतील बेगम समरू ही रंगनाथ तिवारी यांची महत्त्वाची कादंबरी बहुचर्चित कादंबरी ठरली आहे.
          डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचा वांड़मय प्रकाराची सुंदर ओळख करून दिली आहे. लेखकाने रंगनाथ तिवारी त्यांच्या कादंबरी लेखनाची प्रमुख बलस्थाने नोंदवली आहे. कथानक, वातावरण, प्रसंग निर्मिती, निवेदन शैली, पात्र, संघर्ष आणि भाषा इत्यादी घटकांच्या माध्यमातून रंगनाथ तिवारी यांच्या कादंबरी लेखनाचा व्यापक आढावा लेखकाने घेतला आहे. रंगनाथ तिवारी यांची ऐतिहासिक कादंबरी बेगम समरू यामध्ये स्त्री जीवन किती शोषित, पीडित होते. हे खूप मार्मिकपणे मांडले आहे. याशिवाय स्वधर्म, स्वसंस्कृती, हट्टी आणि स्त्रीत्वाचा अहंकार असलेली मुत्सद्दी, राजकारणी, शारीरिक भूक आणि वखवखलेली क्रूर आणि तेवढीच प्रेमातुर अशी स्त्री जीवनाची नानाविध रूपे त्यांच्या कादंबऱ्यांमधून उभी राहतात. रंगनाथ तिवारी यांच्या उत्तम पुरुष एक वचन या कादंबरीत ताई,उमा, हौसा आणि मावशी या स्त्री व्यक्तिरेखा जागीरदार यांच्या गडीतील निजाम कालीन स्त्री जीवनाचे वास्तव प्रस्तुत व्यक्तिरेखा मधून रंगनाथ तिवारींनी समर्थपणे मांडले आहे. १९४७ नंतर मराठवाड्यात रझाकारांनी धुमाकूळ घातला. त्यांचे संवेदन गर्भ चित्रण रंगनाथ तिवारीने प्रस्तुत कादंबरीतून केला आहे.
        डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचे जीवन, जीवन संघर्ष, शिक्षण त्यांची जडणघडण त्यांचे वांड़मयीन प्रेरणा, त्यांची मुल्यदृष्टी त्यांचे चौफेर व्यासंग, त्यांच्या वांड़मयीन व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व, त्यांचे कादंबरीलेखन, मराठी वाड्मयातील कादंबरीचे अनेक प्रकार, ऐतिहासिक कादंबरीचे विशेष, क्रूर राजकारण, धार्मिक जीवन, स्त्री जीवनाचे दर्शन, साहित्यातील कलाविष्कार, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे चित्रण, त्यांची कथा लिहिण्याची विविध वैशिष्ट्ये यावर सूक्ष्मपणे डॉ.प्राध्यापक दीपक सूर्यवंशी यांनी संशोधनात्मक चिकित्सा केली आहे.
       एकाच व्यक्तीवर व त्यांच्या वाड़मयीन प्रवास सर्वांसमोर मांडण्याचा कौतुकास्पद प्रवास म्हणजे रंगनाथ तिवारी हा व्यक्ती आणि वांड़मय ग्रंथ खरंच सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे. सदरील ग्रंथ वाचताना लेखक आणि दहा वर्षे केलेली चिकित्सा जाणवल्याशिवाय राहत नाही. डॉ. दीपक सूर्यवंशी सरांची लिखाण करण्याची वेगळी हातोटी या ग्रंथामध्ये दिसून येते.
        प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!

समीक्षिका/ लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम 
मो. 9767663257

Thursday, 7 April 2022

कोल्ह्याची फजिती (मजेशीर गोष्ट)

कोल्ह्याची फजिती 



Tuesday, 5 April 2022

वाक्प्रचार आणि त्याचे अर्थ...

 💁‍♀️वाक्प्रचार आणि अर्थ भाग 1.
1.     अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे. 

2.     अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.

3.     अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे. 

4.     अभंग असणे - अखंड असणे. 

5.     अमलात आणणे - कारवाई करणे. 

6.     अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे. 

7.     अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे. 

8.     अट्टहास करणे - आग्रह धरणे. 

9.     अवाक् होणे – आश्चर्यचकित होणे. 

10.  अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे. 

11.  अनमान करणे - संकोच करणे. 

12.  अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे. 

13.  अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे. 

14.  अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे. 

15.  अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे. 

16.  अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे. 

17.  अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे. 

18.  अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे. 

19.  अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे. 

20.  अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस. 

21.  आयोजित करणे - सिद्धता करणे. 

22.  आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे. 

23.  आत्मसात करणे – मिळवणे,अंगी बाणणे. 

24.  आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे. 

25.  आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट. 

26.  आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे. 

27.  आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे. 

28.  आड येणे - अडथळा निर्माण करणे. 

29.  आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे. 

30.  आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे. 

31.  आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे. 

32.  आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे. 

33.  आच लागणे - झळ लागणे. 

34.  आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे. 

35.  आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे. 

36.  आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे. 

37.  आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे. 

38.  इतिश्री करणे - शेवट करणे. 

39.  उखाळ्या-पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे. 

40.  उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे. 

41.  उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील न होता सल्ले देणे, मनापासून काम न करणे,दूरवरून निर्देश देणे. 

42.  उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे. 

43.  उदास होणे - खिन्न होणे. 

44.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे. 

45.  उताणा पडणे - पराभूत होणे. 

46.  उदास होणे - खिन्न होणे. 

47.  उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे. 

48.  उत्पात करणे - विध्वंस करणे. 

49.  उसंत मिळणे - वेळ मिळणे. 

50.  उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे. 

51.  उताणे पडणे - पराभूत होणे. 

52.  उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे. 

53.  ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे. 

54.  उध्वस्त होणे - नाश पावणे. 

55.  उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती. 

56.  उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे. 

57.  उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे. 

58.  उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे. 

59.  उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे. 

60.  उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे. 

61.  ऊर भरून येणे – गदगदून येणे.

 62.  उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे. 

63.  एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे. 

64.  ओनामा – प्रारंभ. अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे. 

65.  ओढा असणे - कल असणे. 

66.  ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे. 

67.  अंग धरणे - लठ्ठ होणे. 

68.  अंगावर काटा येणे - भीती वाटणे. 

69.  अंग काढून घेणे - संबंध तोडणे. 

70.  अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे. 

71.  अंगाला होणे - अंगाला छान बसणे. 

72.  अंगवळणी पडणे – सवय होणे. 

73.  अंगाची लाही होणे – अतिशय संताप होणे,खूप राग येणे. 

74.  अंगी बाणणे – मनात खोलवर रुजणे.

 75.  अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे. 

76.  अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे. 

77.  अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे. 

78.  अंगावर शेकणे – नुकसान सोसावे लागणे. 

79.  अंगी ताठा भरणे – मगरुरी करणे. 

80.  अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीनुसार खर्च करणे. 

81.  अंग चोरणे – फारच होडे काम करणे. 

82.  आंदण देणे - देऊन टाकणे. 

83.  आंबून जाणे – विटून जाणे,थकणे. 

84.  कणीक तिंबणे - खूप मार देणे. 

85.  कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे. 

86.  कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे. 

87.  कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे.

88.  कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे. 

89.  कान उपटणे – कडक शब्दात समज देणे. 

90.  कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे. 

91.  कानावर हात ठेवणे – नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे. 

92.  कान टोचणे – खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे. 

93.  कानउघाडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे. 

94.  काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे. 

95.  कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे. 

96.  कानाने हलका असणे – काशावरही पटकन विश्वास ठेवणे. 

97.  कान निवणे – ऐकून समाधान होणे. 

98.  काढता पाया घेणे – विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे. 

99.  कानावर घालणे – लक्षात आणून देणे. 

100.     कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे. 

101.     काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्‍या शत्रूचा पराभव करणे. 

102.     काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे. 

103.     कावराबावरा होणे – बावरणे. 

104.    कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे. 

105.    कानशिलांची भजी होणे – गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे. 

106.    काळीज उडणे - भीती वाटणे. 

107.    कुणकुण लागणे - चाहूल लागणे. 

108.    कच्छपी लागणे - नादी लागणे. 

109.     काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे. 

110.     कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे. 

111.    कूच करणे - वाटचाल करणे. 

112.    काळजी घेणे – चिंता वाहने,आस्था असणे. 

113.    कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे. 

114.    कंपित होणे - कापणे थरथरणे. 

115.    कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे. 

116.    कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे. 

117.    किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे. 

118.    कारवाया करणे – कट करणे,कारस्थाने करणे. 

119.    कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे. 

120.    कहर करणे - अतिरेक करणे. 

121.    कोडकौतुक होणे - लाड होणे. 

122.    काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे. 

123.    काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द. 

124.     कंठस्नान घालने - ठार मारणे. 

125.     काकदृष्टीने पाहाणे – अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहाणे. 

126.     कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे. 

127.     कंठ दाटून येणे – गहिवरून येणे. 

128.     कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे. 

129.    कुंपणाने शेत खाणे – ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे. 

130.    केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे. 

131.    कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे. 

132.    कोपरापासून हात जोडणे – काहीही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे. 

133.    खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे. 

134.    खपणे – कष्ट करणे,झिजणे. 

135.    खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे. 

136.    खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे. 

137.    खसखस पिकणे - मोठ्याने हसणे. 

138.    खूणगाठ बांधणे - निश्चय करणे. 

139.    खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे. 

140.    खडे फोडणे - दोष देणे. 

141.    खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. 

142.    खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे. 

143.    खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला न मिळणे. 

144.    खाल्ल्याघरचे वासे मोजणे - उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे. 

145.    खितपत पडणे - क्षीण होत जाणे. 

146.    खो घालने - विघ्न निर्माण करणे. 

147.    गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे. 

148.    गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे. 

149.    गळ्यातील ताईत होणे – अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे. 

150.    गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे. 

151.    गळ घालणे - अतिशय आग्रह करणे. 

152.    गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने. 

153.    गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे. 

154.    गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे. 

155.    गुजराण करणे - निर्वाह करणे. 

156.    गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे. 

157.    गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे. 

158.    गाडी अडणे – खोळंबा होणे. 

159.    ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे. 

160.    गट्टी जमणे - दोस्ती होणे. 

161.    गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे. 

162.    गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे. 

163.    गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे. 

164.    गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे. 

165.    गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे. 

166.    गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे. 

167.    गौडबंगाल असणे – गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे. 

168.    घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे. 

169.    घागरगडचा सुभेदार – पाणक्या. 

170.    घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे. 

171.    घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे. 

172.    घाम गाळणे - खूप कष्ट करणे. 

173.    घालून-पाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे. 

174.    घोडे मारणे - नुकसान करणे. 

175.    घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे. 

176.    घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे. 

177.    घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे. 

178.    चतुर्भुज होणे - लग्न करणे. 

179.    चक्कर मारणे - फेरफटका मारणे. 

180.    चाहूल लागणे - मागोवा लागणे. 

181.    चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे. 

182.    चेहरा खुलणे - आनंद होणे. 

183.    चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे. 

184.    चंग बांधणे – निश्चय करणे. 

185.    चितपट करणे – कुस्तीत हरविणे.

 186.    चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे. 

187.    चुरमुरे खात बसणे - खजील होणे. 

188.    चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे. 

189.    चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे. 

190.     चौदावे रत्न दाखवणे - मार देणे. 

191.    छाननी करणे - तपास करणे. 

192.    छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे. 

193.     जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे. 

194.     जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे. 

195.     जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे. 

196.     जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलणे. 

197.     जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे. 

198.     जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे. 

199.     जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे. 

200.    जळफळाट होणे - रागाने लाल होणे. 

201.    जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे. 

202.    जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे. 

203.     जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे. 

204.     जीव अधीर होणे - उतावीळ होणे. 

205.     जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे. 

206.     जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे. 

207.     जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे. 

208.     जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे. 

209.     जिवाचा धडा करणे – पक्का निश्चय करणे. 

210.    जीव वरखाली होणे – घाबरणे. 

211.     जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे. 

212.     जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे. 

213.     जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे. 

214.     जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे. 

215.     जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे. 

216.     जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे. 

217.     जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे. 

218.    ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे. 

219.     झाकले माणिक – साधा,पण गुणी मनुष्य. 

220.     झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे. 

221.    झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे. 

222.     त्राटिका - कजाग बायको. 

223.     टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे. 

224.     टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे. 

225.     टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.

 226.    टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे. 

227.     टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे. 

228.    ठसा उमटवणे - छाप पाडणे. 

229.    ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे. 

230.     डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे. 

231.     डाळ शिजणे – थारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे. 

232.    डाव येणे - खेळात राज्य येणे. 

233.    डोक्यावर घेणे - अति लाड करणे. 

234.    डोळे फिरणे  - खूप घाबरणे. 

235.    डोळा असणे – पाळत ठेवणे. 

236.    डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे. 

237.     डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे. 

238.     डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे. 

239.     डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे. 

240.     डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे. 

241.     डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे. 

242.     डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे. 

243.     डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे. 

244.     डोळे निवणे - समाधान होणे. 

245.     डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे. 

246.    डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे. 

247.    डोळ्यातून थेंब न काढणे – दु:खद प्रसंग असूनही न रडणे.  

248.    डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे. 

249.    डोळे वटारणे - रागाने बघणे. 

250.    डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे. 

251.    डोळ्यांस धारा लागणे – अश्रू वाहणे,रडणे. 

252.     डोळ्यांत खुपणे - सहन न होणे. 

253.     डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे. 

254.     डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. 

255.     डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे. 

256.     डोळे दिपवले - थक्क करून सोडणे. 

257.     डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे. 

258.     डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे. 

259.     डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे. 

260.     डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे. 

261.     तडीस नेणे - पूर्ण करणे. 

262.    तगादा लावणे – पुन्हा:पुन्हा मागणी करणे. 

263.     ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे. 

264.     तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे. 

265.     तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.

 266.    ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे. 

267.    तारांबळ होणे - घाईगडबड उडणे. 

268.    ताट वाढणे - जेवायला वाढणे. 

269.    तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे. 

270.    तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे. 

271.     तिलांजली देणे – सोडणे,त्याग करणे. 

272.    तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे. 

273.    तोंडून अक्षरं न फुटणे - घाबरून न बोलणे. 

274.    तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे. 

275.    तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे. 

276.     तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे,नाहीसे होणे. 

277.     तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे. 

278.     तोंडाला पाने पुसणे – फसवणे. 

279.    तजवीज करणे - तरतूद करणे. 

280.     तळहातावर शीर घेणे - जीवावर उदार होणे. 

281.     तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे. 

282.     तोंडघशी पाडणे – विश्वासघात होणे,अडचणीत येणे. 

283.     तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे. 

284.     तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे. 

285.     तोंडसुख घेणे – दोष देताना वाट्टेल तसे बोलणे. 

286.     तोंड टाकणे – अद्वातद्वा बोलणे. 

287.     तोंडावाटे ‘ब्र’ न काढणे - एकही शब्द न उच्चारणे. 

288.     थांग न लागणे - कल्पना न येणे. 

289.     थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे. 

290.    दुमदुमून जाणे - निनादून जाणे. 

291.     दगा देणे – फसवणे. 

292.     दबा धरून बसणे - टपून बसणे. 

293.     दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्‍हाणे सांगून न्याय मागणे. 

294.     दात धरणे - वैर बाळगणे. 

295.     दाढी धरणे - विनवणी करणे. 

296.     दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द. 

297.     दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे. 

298.     दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे. 

299.    दक्षता घेणे - काळजी घेणे. 

300.    दडी मारणे - लपून राहणे. 

     
            
  

Friday, 1 April 2022

महागाई (निरजा काव्य)

 निरजा काव्य
विषय-महागाई

कशी वाढली महागाई
 गोरगरीब जनता
     हाल
    अपेष्टा
  नाहक सहन
करते आज तरूणाई...!!

महागाई खूप वाढली
  हवालदिल झाले
    छोटे
    कामगार
  कागदी योजना
 सांगा कुणी काढली....!!

पेट्रोल डिझेल वाढले
    महाग खाद्यपदार्थ
         जीवन
          गाडा
     कसा हाकावा
शक्क्ल कुणी काढले....!!

येणार कुणास कीव
  वाढत्या महागाईमुळे
       युध्द
       तुटवडा
   सारखे शब्द
आज घेतात जीव....!!

महागाई वाढली खूप
  ग्राम शहर
    एकसारखे
     भासती
    बदलले जग
आणि पृथ्वीचे रूप....!!


मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा कोकलगाव
ता. जि.वाशिम

Wednesday, 30 March 2022

समानार्थी शब्द (४००)

 🌳समानार्थी शब्द🌳


1.    अभिनेता – नट


2.   अश्व – घोडा ,तुरग,वारू,तुरंगम,वाजी


3.   अपराध -गुन्हा


4.   अग्नि – विस्तव,वन्ही ,पावक ,अनल,आग


5.   अत्याचार – जुलूम,अन्याय


6.   अचल – पर्वत,स्थिर,शांत


7.   अपाय – इजा,त्रास


8.   अमृत – संजीवनी,सुधा,पीयूष


9.  अवचित – अचानक,एकदम


10.अवर्षण – दुष्काळ


11. अमित – अगणित,असंख्य,अमर्याद


12.  अस्त – मावळणे


13.   अविरत – अखंड,सतत


14.   अर्थ – मतलब,उद्देश,हेतू,भावार्थ,तात्पर्य,भाव


15.  अक्षय – न संपणारा


16. अही – भुजंग,सर्प,साप


17. अवहेलना – अपमान


18. अनर्थ – संकट,अरिष्ट


19. अनुरक्ता – प्रेमात पडलेली


20.अभियान – मोहीम


21. अभिषेक – अभिशेष,अभिषव


22.अभ्यास – सराव,व्यासंग,परिपाठ


23.अरण्य – वन,रान,कानन,जंगल,विपिन,अटवी


24.अभिनय – हावभाव,अंगविक्षेप


25. अहंकार – घमेंड,गर्व


26. आगत्याने – स्वागतशील दृष्टीने


27. अर्जुन – पार्थ,भारत,किरीट,फाल्गुन,धनंजय


28.आई – माय,माऊली,माता,जननी,जन्मदात्री,मातोश्री


29.आमूलाग्र – मुळापासून शेंड्यापर्यंत


30.आरसा – दर्पण


31. आकांक्षा – इच्छा


32. आण – शपथ


33.आकाश – नभ,गगन,अंबर,आभाळ,खग,व्योम,तारांगण,अवकाश,अंतरिक्ष


34.आयुष्य – जीवन


35.आळशी – ऐदी,कामचुकार,सुस्त,मंद,निरुद्योगी,उठाळ,आळसट


36.आनंद – आमोद,हर्ष,तोष,मोद,संतोष,प्रमोद


37.आस्था -जिव्हाळा,आदर,अगत्य,आपुलकी


38.आश्चर्य – अचंबा,नवल,विस्मय


39. आज्ञा – हुकूम,आदेश


40. आपत्ती – संकट


41.आकाशवाणी – नभोवाणी


42.आहार – भोजन,खाद्य


43.आमरण – मरेपर्यंत


44.आसन – बैठक


45. आठवण – स्मरण,स्मृती


46.आस – इच्छा,मनीषा


47.आसक्ती – हव्यास,लोभ


48.अंग – तनू,काया,शरीर,देह


49. अंगार – निखारा


50.अंगना – स्त्री


51. अंत – अखेर,शेवट


52.अंतरिक्ष – अवकाश


53. इहलोक – मृत्यूलोक


54.इशारा – खूण,सूचना


55. इंदू – चंद्र


56. इंद्र – देवेंद्र ,सुरेन्द्र


57. इच्छा – मनीषा,अपेक्षा,आशा,वासना,आराजू,आकांक्षा


58. ईश्वर – प्रभू,परमेश्वर,देव,ईश,अलक्ष,अलक,आनंदघन


59. उणीव – न्यून,न्यूनता,कमतरता


60.उपवन – बाग,बगीचा,उद्यान,वाटिका


61. उदर – पोट


62. उतारू – यात्रिक,प्रवासी. यात्रेकरू


63. उदास – खिन्न,दु:खी


64.उपनयन – मुंज


65.उंट – उष्ट्र,उष्टर


66.उत्कर्ष – भरभराट,वाढ,संपन्नता


67.उपद्रव – छळ,त्रास


68.ऊर्जा -शक्ती


69.ऊन – ऊर्ण,लोकर


70. ऋषि – साधू,मुनी


71. एकजूट – ऐक्य,एकता,एकी


72.ऐतोबा – काम न करणारा


73.ऐश्वर्य – वैभव,श्रीमंती


74. औक्षण – ओवाळणे


75. कष्ट – मेहनत,श्रम


76.करमणूक – मनोरंजन


77.कट – कारस्थान


78.कटी – कंबर


79.कृष्ण – मुरलीधर,देवकीपुत्र,मुरारी,कन्हैया,वासुदेव,कान्हा


80.कठोर – निर्दय,निष्ठुर


81.कनक – कांचन,सोने,सुवर्ण,हेम


82.कमळ – अंबुज,पंकज,राजीव,पुष्कर,कुमुदिनी,सरोज,पद्म,नलिनी,नीरज,अब्ज


83.कपाळ – भाल,लल्लाट,मस्तक,कपोल,अलिक,निढळ


84.काठ – किनारा,तीर,तट


85.कासव – कूर्म,कच्छ,कमठ,कच्छप


86.काळजी – आस्था,फिकीर,कळकळ,चिंता


87.कान – श्रवण,श्रोत्र,कर्ण


88.काळोख – तिमिर,अंधार,तम


89.कावळा – एकाक्ष,काक,वायस,काऊ


90.काष्ठ – लाकूड


91. किल्ला – तट,दुर्ग,गड


92.किंकर – अनुचर,सेवक,दास,भृत्य


93.किरण – रश्मी,कर,अंशु,मयुख


94.किमया – चमत्कार,जादू


95.क्रीडा – मौज,खेळ,विहार,विलास,मनोरंजन


96.कुटी – झोपडी


97. कुरूप – बेढब,विद्रूप,आकाररहित


98. कोकीळ – पिक,कोयल,कोगुळ


99.कृपण – चिक्कू ,कंजूष,हिमटा,खंक,कोमटा


100.कृश – हडकुळा


101.खडक – पाषाण ,खूप मोठा दगड


102.खटाटोप – मेहनत,प्रयत्न,धडपड


103.खल – दुष्ट,नीच,दुर्जन


104.    खळ – दुर्जन


105.    खजिना -भांडार,तिजोरी,द्रव्य,कोश


106.    खग – विहग,पक्षी,द्विज,अंडज,शंकुट


107.    खड्ग – तलवार


108.    खूण – निशाणी,चिन्ह,संकेत


109.    खून – हत्या,वध


110.     खेडे – ग्राम,गाव


111.      खंत – दु:ख,खेद


112.     ख्याती – कीर्ती,प्रसिद्धी


113.     गवई – गायक


114.     ग्रंथ – पुस्तक


115.     गरज – निकड,आवश्यकता,जरूरी


116.     गनीम – अरी,शत्रू


117.      गर्व – अहंकार


118.     गरुड – खगेंद्र,द्विजराज,वैनतेय,खगेश्वर


119.     गणपती - लंबोदर,गौरीसुत,गजानन,विनायक,एकदंत,प्रथमेश,गजवदन,गौरीनंदन,गणेश,विघ्नहर्ता,गणराय,चिंतामणी


120.    गरुड – द्विजराज,वैनतेय,खगेंद्र


121.     गृहिणी – घरधनीण


122.     गर्दी – खच,दाटी


123.    गाणे – गीत


124.    गाय – गो,धेनू,गोमाता


125.     गोष्ट – कहाणी,कथा


126.    गौरव – सत्कार,सन्मान,अभिनंदन


127.     गंध – परिमळ,वास


128.    घर – गृह,सदन,निवास,निकेतन,आलय,भवन,धाम


129.    घोडा – अश्व,हय,तुरग,वारू


130.    घास – कवळ,ग्रास


131.     चेहरा – मुख,तोंड,आनन,वदन


132.     चौफेर – सर्वत्र,चहूकडे


133.    चंद्र – शशांक,शशी,राजनीनाथ,इंदू,सुधाकर,सोम,हिमांशु,शुधांशु,निशानाथ,विधू


134.    चांदणे – ज्योत्स्ना,चंद्रिका,कौमुदी


135.     चवताळणे – रागावणे,चिडणे


136.    छडा – आवड,नाद


137.     छिद्र – भोक


138.    जरा – म्हातारपण


139.    जरब – दबदबा,दरारा,धाक,दहशत,वचक


140.     जयघोष – जयजयकार


141.     जमीन – भू,भूई,भूमी


142.    जिन्नस – पदार्थ


143.    जीवन – पाणी,आयुष्य,जल


144.    जिव्हाळा – प्रेम,माया,ममता


145.    जीर्ण – जुने


146.    ज्येष्ठ – वरिष्ठ,मोठा


147.     जल – जीवन,पाणी,नीर,सलिल,उदक


148.    झाड – तरु,वृक्ष,द्रुम,पादप,शाखी,अगम


149.    झुंबड – रीघ,गर्दी,थवा,दाटी,खच


150.    झुंज – संग्राम,लढा,संघर्ष


151.     झेंडा – निशाण,ध्वज,पताका


152.     झोका – हिंदोळा


153.     टंचाई – कमतरता


154.    ठसा – खूण


155.     ठग – लुटारू


156.    ठक – लबाड


157.    ठेकेदार – मक्तेदार,कंत्राटदार


158.    डोके – शिर,मस्तक,माथा,शीर्ष


159.    डोंगर –नग,पर्वत,अचल,शैल


160.    डोळे – अक्ष,चक्षू,नेत्र,लोचन,नयन,आवाळू


161.     ढग – जलद,मेघ,अंबुद,अभ्र,पयोद


162.    ढीग – रास


163.    तलाव – सारस,कासार,तळे,तटाक,तडाग,सरोवर


164.    त्वेष – आवेश,स्फुरण


165.     तरुण – युवक,जवान


166.    तारुण्य – ज्वानी,यौवन,जवानी


167.     ताकद – बल,शक्ती


168.    तोंड – तुंड,मुख,आनन,वदन


169.    तारे – चांदण्या,नक्षत्रे,तारका


170.    तारू – गलबत,जहाज


171.      तलवार – खड्ग,समशेर


172.     तिमिर – काळोख,अंधार


173.     तृष्णा – लालसा,तहान


174.     तृण – गवत


175.     तुरुंग – कैदखाना,कारागृह,बंदीखाना


176.     थंड – गार,शीतल,शीत


177.     थवा – घोळका,गट,समुदाय,जमाव,चमू


178.     दंत – दात


179.     दंडवत – नमस्कार


180.    दास – नोकर,चाकर


181.     दारा – पत्नी,बायको


182.    दानव – दैत्य,असुर,राक्षस


183.    दागिना – भूषण,अलंकार


184.    दिन – वासर,दिवस,अह,वार


185.    दीन – गरीब


186.    दुजा – दुसरा


187.     दुनिया – जग


188.    दुर्दशा – दु:स्थिति,दुरवस्था


189.    दुर्धर – गहन,कठीण


190.    दूध – दुग्ध,पय,क्षीर


191.     दैत्य – असुर,राक्षस,दानव


192.    देव – ईश्वर,ईश,सुर,परमेश,अमर,परमेश्वर


193.    दैन्य – दारिद्रय


194.    देऊळ – देवालय,राऊळ,मंदिर


195.    धरती – पृथ्वी,वसुंधरा,धरणी,क्षोणी,वसुधा,धरित्री,मही,भूमी,रसा,अवनी


196.    धवल – शुभ्र,पांढरे


197.     धनुष्य – कोदंड,चाप,तिरकमठा,धनू,कमटा,कार्मुक


198.    धन – संपत्ती,पैसा,वित्त,संपदा,द्रव्य,दौलत


199.    धूर्त – भांडखोर,लबाड,लुच्चा,चलाख,अरकाट,लफंगा,कावेबाज


200.  नगर – पूर,पुरी,शहर


201.    नजराणा – उपहार,भेट


202.   नवनीत – लोणी


203.   नवरा – वल्लभ,पती,भ्रतार,कांत,धव,भर्ता


204.   नमस्कार – वंदन,प्रणिपात,नमन,अभिवादन


205.   नदी – तटिनी,सरिता,जीवनदायिनी,तरंगिणी


206.   नृप – भूपाळ,भूपती,भूप,राजा,महीपती,नरेश


207.   नाथ – स्वामी,धनी


208.   निष्णात – प्रवीण,तरबेज


209.   नारळ – नारिकेल,श्रीफळ


210.    निर्जन – ओसाड


211.     निर्झर – झरा


212.    निर्वाळा – खात्रीपूर्वक


213.     निर्मळ – स्वच्छ


214.    नीच – अधम,तुच्छ,चांडाळ


215.     नेता – पुढारी,नायक


216.    नैपुण्य – कौशल्य


217.     नोकर – दास,सेवक,चाकर,उलिंग,आर्यिक


218.    नौदल – आरमार


219.    पशू – जनावर,श्वापद,प्राणी


220.   पती – भ्रतार,नवरा


221.    पक्षी – पाखरू,खग,द्विज,विहग,अंडज,विहंग


222.   पत्नी – बायको,कांता,अर्धांगिनी,दार,भार्या,कलत्र,जाया


223.   पर्वत – अद्री,गिरी,नग,अचल,शैल


224.   परिमल – सुगंध,सुवास


225.    पाणी – पय,जल,उदक,नीर,वारी,जीवन,सलील,अंबू,तोय


226.    पारंगत – तरबेज,निपुण


227.    पान – पत्र,पल्लव,पर्ण


228.   पार्वती – उमा,भवानी,गौरी,कन्याकुमारी,दुर्गा,काली


229.   पाय – पाद,पद,चरण


230.   पारिपत्य – शिक्षा,दंड,पराभव


231.    पुरुष – मर्द,नर


232.   पुढारी – नेता,नायक,धुरीण,अग्रणी


233.    पूजा – सेवा,अर्चना,अर्चा


234.   पैसा – दाम


235.    पोपट – रावा,शुक,राघू,कीर


236.   पोरका – आई-बाप नसलेला,निराधार


237.    पंक – चिखल


238.   पंक्ती – ओळ,पंगत,रांग


239.   पंडित – विद्वान,शास्त्री,बुद्धिमान


240.   प्रकाश – तेज,उजेड


241.    पृथ्वी – धरणी,धरती,वसुंधरा,रसा,भू,धरा,क्षमा,मही,भूमी,धरित्री


242.   प्रजा – रयत,लोक,जनता


243.   प्रपंच – संसार


244.   प्रतीक – खूण,चिन्ह


245.   प्रगल्भ – शहाणा,प्रौढ,गंभीर


246.   प्रासाद – वाडा,मंदिर


247.    प्रताप – शौर्य,पराक्रम


248.   प्रघात – पद्धत,चाल,रिवाज,रीती


249.   प्रवीण – कुशल,पटू,निपुण,हुशार,निष्णात,तरबेज


250.   प्राचीन – पुरातन,जुनाट,पूर्वीचा


251.     प्रात:काळ – उषा,पहाट,सकाळ


252.    प्रेम – लोभ,स्नेह,माया,प्रीती,अनुराग


253.    पर्वत – नग,गिरी,अचल,शैल,अद्री


254.   फूल – सुमन,सुम,कुसुम,पुष्प


255.    बहर – सुगी,हंगाम


256.   बक – बगळा


257.    बळ – शक्ती,जोर,ताकद,सामर्थ्य


258.   बाग – उद्यान,उपवन,बगिचा


259.    बाप – पिता,वडील,तात,जन्मदाता,जनक


260.   बाण – शर,तीर,सायक


261.    बिकट – कठीण,अवघड


262.   बेडूक – दर्दुर,मंडुक


263.   ब्राह्मण – द्विज,विप्र


264.   ब्रह्मदेव – विधी,चतुरानन,प्रजापती,कमलासन,ब्रह्मा,विरंची


265.   बांधेसूद – सुडौल,रेखीव


266.   बेढब – बेडौल


267.    बैल – पोळ,खोंड,वृषभ


268.    बंधन – मर्यादा,निर्बंध


269.   बंधू – भ्राता,भाऊ


270.   ब्रीद – प्रतिज्ञा,बाणा


271.     भगिनी – बहीण


272.    भरवसा – खात्री,विश्वास


273.    भरभराट – चलती,समृद्धी,चलती


274.     भार – ओझे


275.    भाऊ – भ्राता,सहोदर,बंधू


276.     भान – जागृती,शुद्ध


277.    भांडण – झगडा,कलह,तंटा


278.     भाऊबंद – सगेसोयरे,नातेवाईक,आप्त


279.    भांडखोर – कलभांड,कलांट,कळाम,कलागती,कलाझंगडी


280.   भुंगा – भृंग,अलि,भ्रमर,मिलिंद,मधुप


281.    भू – धरा,भूमी,जमीन,धरित्री,धरणी


282.   भेद – भिन्नता,फरक


283.    भेकड – भीरु,भ्याड,भित्रा


284.   महिमा – मोठेपणा,थोरवी,माहात्म्य


285.   मनसुबा – विचार,बेत


286.   मकरंद – मध


287.    महा – मोठा,महान


288.   मलूल – निस्तेज


289.   मंदिर – देवालय,देऊळ


290.   मयूर – मोर


291.    मत्सर – असूया,द्वेष


292.    मार्ग – वाट,सडक,पथ,रस्ता


293.   माणूस – मनुज,मनुष्य,मानव


294.   मानव – माणूस,नर,मनुष्य,मनुज


295.   मित्र – सखा,स्नेही,दोस्त,सोबती,सवंगडी


296.   मासा – मत्स्य,मीन


297.    मित्र – स्नेही,सोबती,दोस्त,साथीदार,सवंगडी


298.   मुलामा – लेप


299.   मुलगा – आत्मज,सुत,लेक,पुत्र,नंदन,तनय,तनुज


300.  मुलगी – आत्मजा,तनया,पुत्री,दुहिता,सुता,कन्या,तनुजा,नंदिनी


301.    मूषक – उंदीर


302.   मेष – मेंढा


303.   मोहिनी – भुरळ


304.   मौज – गंमत,मजा


305.   मंगल – पवित्र


306.   याचक – भिकारी


307.   यज्ञ – मख,याग,होम


308.   यातना – दु:ख,वेदना


309.   यान – अंतराळवाहन


310.    युवती – तरुणी


311.     युद्ध – लढाई,रण,संग्राम,समर,संगर


312.    रक्त – असु,रुधिर,शोणित,असुत


313.     रात्र – यामिनी,रजनी,निशा,रात


314.    रस्ता – वाट,पथ,मार्ग


315.     रागीट – संतापी,कोपी,कोपिष्ट


316.    रुक्ष – नीरस,कोरडे


317.     राजा – भूपती,नरेश,नरेंद्र,भूपाल,नृप


318.     राग – क्रोध,रोष,त्वेष,संताप,कोप


319.    रयत – प्रजा,जनता


320.   रोष – राग


321.    रंक – गरीब


322.   लढा – संघर्ष,लढाई


323.   लाज – भीड,शरम


324.   लक्ष्मी – कमला,रमा,वैष्णवी,श्री,इंदिरा


325.    लाडका – आवडता


326.   लावण्य – सौंदर्य


327.    वर – भ्रतार,नवरा,पती


328.   वल्लरी – लता,लतिका,वेल


329.   वंदन – प्रणाम,नमन,नमस्कार,प्रणिपात,अभिवादन


330.   वर्षा – पावसाळा,पाऊस


331.    वचक – दरारा,धाक


332.   वस्त्र – वसन,कपडा,अंबर,पट


333.   वत्स – बालक,वासरू


334.   वारा – वात,वायू,मरुत,अनिल,समीर,पवन,मारुत,समीरण,हवा


335.    वासना – इच्छा


336.   वाली – कैवारी,रक्षणकर्ता


337.    वानर – मर्कट,कपी,शाखामृग,माकड


338.   वायदा – करार


339.   विलंब – उशीर


340.   विष्णू – रमेश,रमापती,मधुसूदन,चक्रपाणि,नारायण,केशव,हृषीकेश,गोविंद,पुरुषोत्तम


341.    विमल – निर्मळ,निष्कलंक


342.   विवंचना – चिंता,काळजी


343.   विद्रूप – कुरूप


344.   विनय – नम्रता


345.   विस्तृत – विस्तीर्ण,विशाल


346.   विस्मय – नवल,आश्चर्य


347.    विहार – सहल,क्रीडा,भ्रमण


348.   विलग – अलग,सुटे


349.   विषण्ण – कष्टी,खिन्न


350.   वीज – चंचला,सौदामिनी,चपला,तडिता,विद्युल्लता,विद्युत


351.     वेश – पोशाख


352.    व्यथा – दु:ख


353.    व्रण – क्षत,खूण


354.   व्याकूल – कासावीस,दु:खी


355.    शव – प्रेत


356.   शंकर -महेश,महादेव,निळकंठ,रुद्र,सांब,महेश,भालचंद्र,त्रिनेत्र,दिगंबर,शिव


357.    शक्ती – जोर,बळ,सामर्थ्य,ताकद,ऊर्जा


358.   शर – तीर,बाण,सायक


359.   शत्रू – रिपू,अरी,वैरी,दुश्मन


360.   शेज – अंथरूण,शय्या,बिछाना


361.    शिकारी – पारधी


362.   शिक्षक – गुरु,मास्तर,गुरुजी


363.   शीघ्र – जलद,लवकर


364.   शीण – थकवा


365.   शेतकरी – कृषीवल,कृषक


366.   शेष – अनंत,वासुकी


367.    शिकस्त – पराकाष्ठा


368.   सज्जन – संत


369.   सह्याद्री – सह्याचाल,सहयगिरी


370.   समाधान – संतोष,आनंद


371.     समुद्र – सिंधू,रत्नाकर,सागर,जलनिधी,जलधी,पयोधी,उद्धी,अंबुधी


372.    समय – वेळ


373.    सकल -  अखिल,समस्त,सर्व,सगळा


374.    सनातनी – कर्मठ


375.    साप – भुजंग,सर्प,अही


376.    संहार – विनाश,नाश,विध्वंस,सर्वनाश


377.    स्वच्छ – साफ,निर्मळ,नीटनेटका


378.    स्तुती – कौतुक,प्रशंसा


379.    साधू – संन्यासी


380.   साथ – संगत,सोबत


381.    सुगम – सोपा,सुकर,सुलभ


382.   सुरेल – गोड


383.   सोने – हिरण्य,कांचन,कनक,हेम,सुवर्ण


384.   सुंदर – छान,देखणे,सुरेख,मनोहर,रम्य,रमणीय


385.   सीमा – मर्यादा,शीव,वेस


386.   सेवक – नोकर,दास


387.    सैन्य – दल,फौज


388.   संघ – चमू,समूह,गट


389.   संशोधक – शस्त्रज्ञ


390.   संदेश – निरोप


391.    संघर्ष – टक्कर,कलह,झगडा,भांडण


392.   संकल्प – मनसुबा,बेत


393.   स्वामी – मालक,धनी


394.   स्वेद – घर्म,घाम


395.   सूर्य – भास्कर,रवी,आदित्य,भानू,दिनमणी,दिनकर,वासरमणी,सविता,मित्र,मार्तंड,चंडांशू


396.   संग्राम – समर,संगर,लढाई,युद्ध


397.    संशय -शंका


398.   संहार – विनाश,नाश,सर्वनाश


399.   सिंह – केसरी,वनराज,मृगेंद्र,पंचानन,मृगराज


400.  स्त्री – वनिता,महिला,नारी,कामिनी,ललना,अबला


401.    हताश – निराश


402.   हरिण – कुरंग,सारंग,मृग


403.   हत्ती – कुंजर,गज,नाग,सारंग


404.   हात – हस्त,पाणि,कर,बाहू,भुजा


405.   हिम – बर्फ


406.   हिरमोड – विरस


407.   हिंमत – धाडस,धैर्य


408.  ह्रदय – अंत:करण,हिरित,अंतर


409.   हुशार – चाणाक्ष,चतुर,चलाख,कलमतारश,कसबी


410.    होडी – नौका,तर,नाव


411.     क्षत – माफी


412.    क्षय – ह्रास,झीज


413.    क्षीण – अशक्त


414.    क्षीर – दूध


415.    क्षुधा – भूक


416.    क्षेम – हित,कल्याण,कुशल


417.     क्षोभ – क्रोध