*बालकांमध्ये धाडसी वृत्ती निर्माण करणारी बालकादंबरी म्हणजे "धाडसी राम"*
बुलढाणा जिल्ह्यातील प्राध्यापक देवबा पाटील सर यांची धाडसी राम ही बाल कादंबरी नुकतीच वाचनात आली. या बालकादंबरीच्या मुखपृष्ठावर धाडसी असणाऱ्या मुलांचे चित्र म्हणजेच राम चित्र आहे.बालपणी जर मुलांना धाडसाच्या, शौर्याच्या, पराक्रमाच्या कथा सांगितल्या किंवा बालकथा संग्रह,कादंबरी वाचण्यास दिली तर उद्याचे भावी नागरिक,उद्याची भावी पिढी जी आज बालके आहेत.त्यांना मोबाईलच्या दुनियेतून थोडेसे बाजूला सारून वाचावयास दिले तर नक्कीच भावी पिढीमध्ये धीटपणा, खंबीरपणा,धाडस येईल यात शंकाच नाही. या कादंबरीची द्वितीय आवृत्ती २३ ऑक्टोबर २०१४ ला प्रकाशित झाली. या कादंबरीचे प्रकाशन कादंबिनी प्रकाशन,जळगांव यांनी केले असून त्याची ४८ पुष्ठे आहेत.याचे मूल्य फक्त पन्नास रुपये आहे. पण यातील प्रसंग आणि रामच्या धाडसाच्या कथा लाखमोलाच्या आहेत.
लेखक,कवी,शिक्षक असा त्रिवेणी संगम असणारे प्राध्यापक देवबा पाटील यांची एकूण बत्तीस पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या अनेक साहित्याला नानाविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भौतिक शास्त्राच्या बी.एस.सी अभ्यासक्रमाची २१ इंग्रजी पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या "धाडसी राम" या बालकादंबरीला शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख व सौ कुसुमावती भीमराव जाधव बाल साहित्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. इतकेच नाही तर भारत सरकारच्या साहित्य अकादमीच्या मराठी भाषेच्या बालसाहित्य पुरस्कार सल्लागार समितीवर प्राध्यापक देवा पाटील यांची निवड झाली आहे.
छत्रपती शिवरायांना जिजाऊ मॉंसाहेबांनी बालपणी शूरवीरांच्या, पराक्रमाच्या,शौर्याच्या, रामायण महाभारतातल्य कथा सांगितल्या त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज शूरवीर बनले.जगात शूर वीर म्हणून ओळखले जातात. इतकेच नाही तर एका वीर पुरुषाची आई म्हणून साऱ्या जगाला जिजाऊ माँसाहेब ठाऊक आहेत. अगदी त्याप्रमाणेच प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसाला निर्जीव खेळणे किंवा टेडि देण्यापेक्षा धाडसी राम सारखे बालकादंबरी भेट दिले तर मुलांना वाचनाची गोडी लागेल. आज-काल काही मुलं आई-वडील घरी नसले की घरात पण जात नाहीत.भितात.. भीती वाटते असं म्हणतात. स्वप्नात रडतात, बोलतात इत्यादी विचित्र प्रकार घडतात.आजच्या काळातील लहान मुलांना तर पारंपारिक खेळच माहिती नाहीत. सुरपारंब्याचा खेळ, लपंडाव, विटी दांडू खेळणे,लगोरी खेळणे असे किती तरी खेळ कालबाह्य होत चालली आहेत कारण घरातले लहान मुलं टीव्हीवरील कार्टून्स मोबाईल वरील गेम्स मध्येच गुंतलेली आहेत. मैदानी खेळ,व्यायाम, कुस्ती,दंडबैठका इ.गोष्टीकडे मुलांना व पालकांना वेळच नाही. म्हणून पालकांनी जागृत होण्याची, आपल्या मुलांच्या आरोग्याकडे, त्याच्या व्यायामा कडे ,त्याच्या खेळाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजकाल मुलांची आई म्हणते झाडावर चढू नकोस पडशील. पडशील हा शब्द उच्चारून) भीती घालून दिल्यामुळे खरंच भ्यायला लागते आणि मग पुन्हा तो झाडावर चढण्याचा प्रयत्न करत नाही शहरातल्या तर बहुतांश मुलांना झाडावर चढता येत नाही.
या बाल कादंबरीतला राम सारंगपूर गावचा असून त्याची आई राधाबाई व वडील शामराव हे फार परोपकारी वृत्तीचे असतात.कोणालाही संकटात मदत करणारे, आदर्श कुटुंब होते. रामच्या बालपणी खरोखरच रामला चांगले वळण लावण्यासाठी रामचे आई-वडील खूप प्रयत्न करायचे. आई शूरवीरांच्या,शिवरायांच्या गोष्टी कथा सांगायची,संस्कारक्षम गाणी,कविता ,श्लोक पाठ करून घ्यायची त्यामुळे रामचे शब्द सुधारू लागले.बुद्धी तल्लख होत.गेली रामची आई जास्त शिकलेली नव्हती परंतु रामचा घरचा अभ्यास पूर्ण करून घ्यायची. रामच्या वडिलांचे ही गावातल्या शाळेत चांगले योगदान असायचे.
चाणाक्ष धाडसी रामचे वडील शामराव आणि पारंपारिक व्यायामाची गोडी लावण्यासाठी रामला योगासने प्राणायाम दंड-बैठका,सूर्यनमस्कार,धावणे इत्यादी गोष्टींमध्ये पारंगत केले. धावण्यांमध्ये तर राम कोणालाच ऐकत नसे. शरीर चपळ बनण्यासाठी राम खूप व्यायाम करू लागला. ग्रामीण भागातला राम आई-वडिलांसारखंच परोपकारी वृत्तीचा होता. इतकेच नाही तर खूप संवेदनशील मनाचा होता एकदा शेतातील कपिला गायीचे वासरू रामला लंगडताना दिसले. छोट्याशा वासराच्या खांद्यावरून पोटावरून हात फिरवत फिरवत रामने हळूच वासराच्या खुरात शिरलेला काटा काढला त्यामुळे प्राणिमात्राविषयीचे रामचे प्रेम प्रेम दिसून येते.एकदा राम शेतातील हौदात पडला तेव्हा तेच वासरू उडी मारून रामचा जीव वाचवतो. त्यानंतर रामला पोहणे शिकण्याची उत्कंठा वाढत जाते. आणि राम चांगल्या पट्टीचा पोहणारा होतो सारंगा नदीच्या शेजारी काही बायका धुणं धुण्यासाठी गेल्या असताना त्यातील एका बाईचे मुल नदी शेजारी खेळता-खेळता पाय घसरून नदित पडते. आणि बुटकुळ्या खात असते.त्यावेळी प्रसंगावधानी राम पळण्यात चपळ असलेला पळत जाऊन त्या मुलाचे प्राण वाचवतो अशा धाडसी रामचे गावात सर्वत्र कौतुक होते.
एक वेळ रस्त्यावरून जाणाऱ्या बाईचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावून घेतले . पळत सुटणाऱ्या चोराला पकडण्यासाठी राम एक युक्ती करतो. आणि त्या व्यक्तीमुळे चोराला पकडले जाते त्यामुळे संपूर्ण गाव रामचे कौतुक करतात हा किस्सा लहान मुलांसाठी खूप धाडस निर्माण करणारा व पुढील गोष्टी वाचण्यासाठी उत्कंठा निर्माण करणारा आहे.एखाद्या लहान मुलाने कसे राहावे त्याने कोणकोणते खेळ खेळावेत यासाठी ही बालकादंबरी म्हणजे धाडसी वृत्तीचा जणू खुराकच आहे.
रात्रीच्या वेळी घराच्या गच्चीवरून गोफणीने दगड मारून चोरांना पिटाळून लावणाऱ्या राम व त्याचे सर्वच किस्से कौतुक करण्यासारखे आहेत.इतकेच नाही तर गुणवत्ता झालेल्या माकडांना पिटाळून लावण्यासाठी राम नी केलेली भज्याची युक्ती खूप प्रशंसनीय आहे जे काम गावातील भल्याभल्यांना जमले नाही ते काम धाडसी राम करून दाखवतो.गावच्या पाण्यात टाकीत विष टाकणारा माणूस फक्त त्यामुळे कसा पकडतो.असे रामच्या अनेक किस्से बालकांची उत्कंठा वाढवणारे व वाचनाला गोडी लावणारे आहेत.
वेदपुरच्या डोंगरात राम व त्याचे सवंगडी धबधबा पाहण्यासाठी जातात तिकडे माणसांची वर्दळ मुळीच नव्हती.तितक्यात अतिरेकी येऊन बंदुकीचा धाक दाखवून राम व त्याच्या मित्रांना अतिरेक्यांची टोळी पकडून नेते. एका अंधारकोठडीत हात-पाय बांधून डांबून रामला टाकतात. रात्र झालेली असते मुलांना भूक लागून व्याकुळ झालेले असतात तेव्हा राम ने केलेले धाडस वाखाणण्याजोगे आहे.रामने आपल्या तोंडाने दुसऱ्या मुलाच्या हाताची दोरी सोडून एकमेकांच्या दोऱ्या सोडून मुलांचा मनोरा करून त्यावर चढून राम बंद कोठडीच्या झरोक्यातून बाहेर पडतो रात्रभर चालत चालत पोलीस स्टेशनला जाऊन पोहोचतो पहाट होण्याअगोदर पोलिसांना सोबत घेऊन राम त्याच्या मित्राकडे पोहोचतो पोलिसांनी चौफेर वेढा घालून पळवलेल्या सर्व मुलांना सुखरूप सुटका करतात सर्व मुलांच्या जीवात जीव आला पण पोटात कावळे ओरडत होते पोलीस इन्स्पेक्टरने ५० बिस्कीटचे पुढे नेले होते ते सर्व मुलांना थर्मास मधला चहा आणि बिस्कीट खायला देतात ही बातमी सारंगपूर गावामध्ये वाऱ्यासारखी पसरते.सगळे धाडसी रामचे कौतुक करतात व त्याच्या स्वागतासाठी वाट पाहत असतात तितक्यात पोलिसांची गाडी गावात येते.प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदी आनंद दिसतो तेवढाय इस्पेक्टर येतात.धाडसी रामजी खूप कौतुक करतात आणि राम चे नाव राष्ट्रपती पुरस्कारासाठी पाठविले जाईल अशी घोषणा करतात.
आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी "धाडसी राम"ही बाल कादंबरी वाचली तर नक्कीच विद्यार्थ्यांना दुसऱ्याला मदत करण्याची भावना वाढीस लागेल आणि आपली सुद्धा भावी पिढी मोबाईलच्या महाजालात न पडता धाडसी बनेल यात शंकाच नाही त्यासाठी सर्व पालक शिक्षक यांनी अशी पुस्तके मुलांना भेट म्हणून द्यावीत. प्राध्यापक देवबा पाटील यांचा साहित्यिक प्रवास असाच अविरतपणे चालू राहावा यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा
*समीक्षिका लेखिका संपादिका शिक्षिका कवयत्री*
*कु.मीनाक्षी पांडुरंग नागराळे*
जिल्हा प.प्राथ. शाळा कोकलगाव