Sunday, 15 April 2018

माझी कविता...निष्पाप बळी

            *निरजा काव्य प्रकार*

            *निष्पाप बळी*

मानवाच्या वाईट सवयी
     करतात वापर
        प्लॅस्टीक
         कॅरीबॅगचा
    आणि बळी
पडतात निष्पाप गायी....

मुक्या जनावरांना वाचवा
    पशुधन खरे
         धन
          गायीचे
       महत्त्व तुला
कधी कळेल मानवा....

कसलाच अधिकार नाही
    तुम्हाला प्लॅस्टीकचा
            वापर
            करून
      इतरांचा जीव
धोक्यात घालू नाही....

पशुपक्षी,निसर्ग,प्राणी
        हेच खरे
           धन
           नका
        करू तुम्ही
प्राण्यांना मारून हानी....

कधी कळेल तुला
    बुध्दजीवी माणसां
          नको
           करू
    -हास निसर्गाचा
होईल पश्चात्ताप तुला...

वापर प्लॅस्टीकचा टाळा..
         वाचवून करा
              समृद्ध
              मानवी
     आरोग्य जीवना
घाला प्रदुषणाला आळा...

चला संस्कृती जपूया...
       प्राण्यांना वाचवूया
          कमी
           करून
     प्लॅस्टीकचा वापर
भारत प्रदुषणमुक्त करूया....

गोमातेचे रक्षण करूया
      संस्कृतीची जपूया
            करून
              पूजन
     सर्व गोमातेला
सन्मानाने वाचवू या....

*कवयित्री:-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*

           

Friday, 13 April 2018

बदली

*कवयित्री:-मिनाताई पांडुरंग नागराळे*
  
         *बदली*

बदलीच काय घेवून बसलात
बदली तर होणारच ....!
आंतरजिल्हा असो की जिल्हांर्गत
ती तर होणारच....!
              *बदली तर होणारच*

संवर्ग 1 चे शिक्षक
पाहिजे तसं करणारच...!
संवर्ग 2 चे पतीपत्नी
30 कि.मी च्या आत रहाणारच...!
                 *बदली तर होणारच*

संवर्ग 3 चे अवघडवाले
सोप्या क्षेत्रात येणारच...
संवर्ग 4 वाल्यांना
जिथं देईल तिथे जाणारच....
            *बदली तर होणारच*

ऑनलाईन होवोत की
ऑफलाईन बदली तर होणारच...!
भ्रष्टाचारांना आळा मात्र
नक्की बसणारच...!
               *बदली तर होणारच*

आंतरजिल्हा बदलीमध्ये
कुणी अगोदर तर
कुणी नंतर जाणारच
राहिले ते वेटींगवर राहणारच
               *बदली तर होणारच*

100% बदल्या शासन करणारच
बदली तर होणारच....!

*कवयित्री:-मिनाताई पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा.सुकळी*
*ता.जि.वाशिम*

Monday, 9 April 2018

लेक वाचवा

*काव्यांजली काव्य प्रकार*

         *लेक वाचवा*

नका मारू
   गर्भ मुलीचा पोटात...
     जीव घोटतात...
        पालक...

कोवळ्या कळ्या
   खुलण्याआधी खुडू नका
       रडू नका...
         शेवटी...

लेकच खरी
   मायेची उबदार चादर
      करा आदर...
        मुलीचा...

लेक लाडकी
    आई आणि बाबाची
        मैत्रिणी ताईची
           आजोबाची...

लेकच असते
   खरा अखंड जिव्हाळा
      लाविते लळा..
         सर्वांना...

आजची लेक
    उद्याची सून होणार...
       सोडून जाणार...
          सासरी...

लेकही असते
   अंश आई बाबांचा...
       घोटता लेकीचा
             जीव...

मुलीची रूपे
    आठवा जनहो सारी..
       जगात नारी..
         श्रेष्ठ

नारीमुळेच मानवा
   जन्म तुला लाभला
      जप गर्भातला
         जीव...

शेवटी मानवा
    ठेव एकच ध्यानी
        जन्म स्त्रीतूनी
            तुझा...

लेक शिकवा
    लेकी सा-या वाचवा...
       मुलींना शिकवा..
          खूप...

नका करू
   हत्या मुलींची गर्भात
       येऊदे जगात
          आनंदाने

घराची पणती
   मुलगी असते खरी
     दोन्ही घरी
      सांभाळुन.

*कवयित्री:-मिनाताई पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*

Saturday, 24 March 2018

विशेष प्रगती....प्रगतीपत्रक नोंदी...

🚹 *प्रगती पत्रक नोंदी यादी.*🚹

🤡 _विशेष प्रगती._ ➡

1 शालेय शिस्त आत्मसात करतो
2 दररोज शाळेत उपस्थित राहतो
3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो
4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो
5 स्वाध्यायपुस्तिका स्वत: पूर्ण करतो
6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो
7 कविता पाठांतर करतो, सुरात गातो
8 इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो
9 ऐतिहासिक माहिती मिळवतो
10 चित्रकलेत विशेष प्रगती
11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो
12 गणितातील क्रिया अचूक करतो
13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो
14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो
15 सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो
16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते
17 खेळ उत्तम प्रकारे खेळते
18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो
19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो
20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो
21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो
22 चित्रे छान काढतो व रंगवतो
23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते
24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते
25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते
26 स्वाध्याय स्वत: समजून सोडवितो
27 शाळेत नियमित उपस्थित राहतो 
28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो
29 शब्दांचे वाचन स्पष्ट करतो
30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो
31  कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो
32 वाचन स्पष्ट व अचूक करतो
33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो
34 नियमित शुद्धलेखन करते
35 शालेय उपक्रमात सहभाग घेते
36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते
37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो
38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते
39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते
40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो
41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो
42 हिंदीतून पत्र लिहितो
43 परिपाठात सहभाग घेते
44 इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते
45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते
46 मुहावर्‍याचा वाक्यात उपयोग करते
47 प्रयोगाची कृती अचूक करते
48 आकृत्या सुबक काढते
49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो
50 वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते
51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग
52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते
53 व्यवहार ज्ञान चांगले आहे
54 अभ्यासात सातत्य आहे
55 वर्गात क्रियाशील असते
56 अभ्यासात नियमितता आहे
57 वर्गात लक्ष देवून ऐकतो
58  प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक  देतो
59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो
60 अभ्यासात सातत्य आहे
61 अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो
62 उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
63 वर्गात नियमित हजर असतो 
64 स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो
65 खेळण्यात विशेष प्रगती
66 Activity मध्ये सहभाग घेतो
67 सर्व विषयाचा अभ्यास उत्तम
68 विविध प्रकारची चित्रे काढते
69  इंग्रजी हिंदी वाचन सराव करावा

आवड /छंद➡

1 चित्रे काढतो
2 गोष्ट सांगतो
3 गाणी -कविता म्हणतो
4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
5 खेळात सहभागी होतो
6 अवांतर वाचन करणे
7 गणिती आकडेमोड करतो
8 कार्यानुभवातील वस्तु बनवितो
9 स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
10 कथा,कविता,संवाद लेखन करतो
11 वाचन करणे
12 लेखन करणे
13 खेळणे
14 पोहणे
15 सायकल खेळणे
16 चित्रे काढणे
17 गीत गायन
18 संग्रह करणे
19 उपक्रम तयार करणे
20 प्रतिकृती बनवणे
21 प्रयोग करणे
22 कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
23 खो खो खेळणे
24 क्रिकेट खेळणे
25  संगणक हाताळणे
26 गोष्टी ऐकणे
27 गोष्टी वाचणे
28 वाचन करणे
29 रांगोळीकाढणे
30 प्रवास करणे
31 नक्षिकाम
32 व्यायाम करणे
33 संगणक
34 नृत्य
35  संगीत ऐकणे

सुधारणा आवश्यक ➡

1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
2 अभ्यासात सातत्य असावे
3 अवांतर वाचन करावे
4 शब्दांचे पाठांतर करावे
5 शब्दसंग्रह करावा
6 बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे
7 नियमित शुद्धलेखन लिहावे
8 गुणाकारात मांडणी योग्य करावी
9 खेळात सहभागी व्हावे
10 संवाद कौशल्य वाढवावे
11 परिपाठात सहभाग घ्यावा
12 विज्ञानाचे प्रयोग करून पहावे
13 हिंदी भाषेचा उपयोग करावे
14 शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा
15 गटचर्चेत सहभाग घ्यावा
16 चित्रकलेचा छंद जोपासावा
17 वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे
18 संगणकाचा वापर करावा
19 प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा
20 गणित विषयाकडे लक्ष द्यावे
21 गटकार्यात सहभाग वाढवावे
22 गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे
23 हस्ताक्षरात सुधारणा करावी
24 विज्ञान प्रयोगात सहभाग असावा
25 इंग्रजी वाचन व लेखन सुधारावे
26 इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे
27 इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे
28 इंग्रजी वाचन व लेखन सराव करावा
29 शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा
30 शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे
31 शालेय परिपाठात सहभाग असावा
32 उपक्रमामध्ये  सहभाग असावा
33 लेखनातील चुका टाळाव्या
34 नकाशा वाचनाचा सराव करावा
35  उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा
36 नियमित अभ्यासाची सवय लावावी
37 नियमित उपस्थित राहावे
38 जोडाक्षर वाचनाचा सराव करावा
39 वाचन व लेखनात सुधारणा करावी
40 अवांतर पुस्तकाचे वाचन करावे
41 प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे
42 अक्षर सुधारणे आवश्यक
43 भाषा विषयात प्रगती करावी
44 अक्षर वळणदार काढावे
45 गणित सूत्राचे पाठांतर करावे
46 स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे
47 दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे
48 गणिती क्रियाचा सराव करा
49 संवाद कौशल्य आत्मसात करावे
50 गणितातील मांडणी योग्य करावे 51शुध्दलेखनाकडे लक्ष द्यावे .
52 इंग्रजी शब्दसंग्रह वाढवावा
🚹 *वरील नोंदी महत्वपुर्ण आहेत संग्रहीत ठेवाव्यात..*

संकलन:- *मिनाताई पांडुरंग नागराळे*
जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी.
ता.जि.वाशिम....

♦♦♦♦♦🌀♦♦♦♦♦

Thursday, 15 March 2018

शुद्धलेखनाचे नियम....

🎖🎖🎖🎖🎖

*मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून,*
*माझ्या श्रीमंत, प्रगल्भ मराठीचे*  
*विविध पैलू प्रकाशित करण्यासाठी*
*ही लेखमाला*. .............

📒📒📒📒📒📒📒

*माझ्या म-हाटीची बोलु कौतुके/*
*परि अमृतातेही पैजा जिंके  /*
*ऐसी अक्षरे रसिके मेळविन /*    
...............भाग17............

*शुद्धलेखनाचे  काही नियम*

1  स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
2  नामांच्या किंवा  सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर विभक्तीप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा.
उदा. घरात  - घरांत, , त्यांचा

3  खाताना, गाताना, चालताना, जेवताना यासारख्या शब्दातील 'त'  याअक्षरावर शीर्षबिंदू देऊ नये.

4  एकारान्त  शब्दांचे सामान्यरूप  याकारान्त करावे.
करणे --करण्यासाठी

5  पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व दीर्घ  बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यामुळे कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असते.

6  जोडाक्षरांचे  सामान्यरूप करतांना काही वेळा दोन्ही भागांचे सामान्यरूप होते.
उदा.  आंधळ्यापांगळ्यांना

7  उकारान्त  विशेषनामांचे सामान्यरूप होत नाही.
उदा. गणू --गणूस

8 जोडाक्षरांचे लेखन करताना उच्चारानुसारच लेखन करावे.
ब्रम्ह, ब्राह्मण

9   उपान्त्य अक्षर   ई   हा स्वर  असेल तर   'ई'   चा.    'य' होतो.
उदा. फाईल   फायलीत

10   उपान्त्य अक्षर  ऊ  असेल तर   ऊ  ऐवजी   व   वापरतात.
उदा. देऊळ--देवळात

11   तीन अक्षरी  शब्दात मधले  अक्षर द्वित  असेल म्हणजे  एकच  अक्षर दोनदा येऊन  जोडाक्षर झाले असेल तर त्या  सामान्यरूपाच्या वेळी द्वित्व नष्ट होते.
उदा. चप्पल. . चपलेचा
रक्कम --रकमेचा

12  तीन अक्षरी शब्दात पहिले अक्षर सानुस्वार   असेल व  दुसरे अक्षर म  असेल तर सामान्य रूपाच्या वेळी पहिले निरअनुस्वार होते.
उदा. अंमल --अमलात

13   पुल्लिंगी  शब्दांच्या शेवटी 'सा'   असल्यास   सामान्य  रूपाच्या वेळेस  'शा'  होते.
पैसा  पैशाची

संकलन:- मिनाताई पांडुरंग नागराळे
जि. प. शाळा.सुकळी
ता.जि.वाशिम...