🎖🎖🎖🎖🎖
*मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून,*
*माझ्या श्रीमंत, प्रगल्भ मराठीचे*
*विविध पैलू प्रकाशित करण्यासाठी*
*ही लेखमाला*. .............
📒📒📒📒📒📒📒
*माझ्या म-हाटीची बोलु कौतुके/*
*परि अमृतातेही पैजा जिंके /*
*ऐसी अक्षरे रसिके मेळविन /*
...............भाग17............
*शुद्धलेखनाचे काही नियम*
1 स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा.
2 नामांच्या किंवा सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्य रूपांवर विभक्तीप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावतांना अनुस्वार द्यावा.
उदा. घरात - घरांत, , त्यांचा
3 खाताना, गाताना, चालताना, जेवताना यासारख्या शब्दातील 'त' याअक्षरावर शीर्षबिंदू देऊ नये.
4 एकारान्त शब्दांचे सामान्यरूप याकारान्त करावे.
करणे --करण्यासाठी
5 पद्यात वृत्ताचे बंधन पाळताना ऱ्हस्व दीर्घ बाबतीत हे नियम काटेकोरपणे पाळता येणे शक्य नसल्यामुळे कवीला तेवढ्यापुरते स्वातंत्र्य असते.
6 जोडाक्षरांचे सामान्यरूप करतांना काही वेळा दोन्ही भागांचे सामान्यरूप होते.
उदा. आंधळ्यापांगळ्यांना
7 उकारान्त विशेषनामांचे सामान्यरूप होत नाही.
उदा. गणू --गणूस
8 जोडाक्षरांचे लेखन करताना उच्चारानुसारच लेखन करावे.
ब्रम्ह, ब्राह्मण
9 उपान्त्य अक्षर ई हा स्वर असेल तर 'ई' चा. 'य' होतो.
उदा. फाईल फायलीत
10 उपान्त्य अक्षर ऊ असेल तर ऊ ऐवजी व वापरतात.
उदा. देऊळ--देवळात
11 तीन अक्षरी शब्दात मधले अक्षर द्वित असेल म्हणजे एकच अक्षर दोनदा येऊन जोडाक्षर झाले असेल तर त्या सामान्यरूपाच्या वेळी द्वित्व नष्ट होते.
उदा. चप्पल. . चपलेचा
रक्कम --रकमेचा
12 तीन अक्षरी शब्दात पहिले अक्षर सानुस्वार असेल व दुसरे अक्षर म असेल तर सामान्य रूपाच्या वेळी पहिले निरअनुस्वार होते.
उदा. अंमल --अमलात
13 पुल्लिंगी शब्दांच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्य रूपाच्या वेळेस 'शा' होते.
पैसा पैशाची
संकलन:- मिनाताई पांडुरंग नागराळे
जि. प. शाळा.सुकळी
ता.जि.वाशिम...
No comments:
Post a Comment