Tuesday, 28 April 2026

मराठीतले वाक्य इंग्रजीत करूया झटपट

 





१. मला आंबा पाहिजे. — I want a mango.
२. मला पाणी पाहिजे. — I want water.
३. मला पुस्तक पाहिजे. — I want a book.
४. मला पेन पाहिजे. — I want a pen.
५. मला वही पाहिजे. — I want a notebook.

६. मला चहा पाहिजे. — I want tea.
७. मला दूध पाहिजे. — I want milk.
८. मला भाकरी पाहिजे. — I want bread.
९. मला भात पाहिजे. — I want rice.
१०. मला साखर पाहिजे. — I want sugar.

११. मला खुर्ची पाहिजे. — I want a chair.
१२. मला टेबल पाहिजे. — I want a table.
१३. मला बॅग पाहिजे. — I want a bag.
१४. मला कपडे पाहिजेत. — I want clothes.
१५. मला चप्पल पाहिजे. — I want slippers.

१६. मला मोबाइल पाहिजे. — I want a mobile phone.
१७. मला घड्याळ पाहिजे. — I want a watch.
१८. मला सायकल पाहिजे. — I want a bicycle.
१९. मला खेळणे पाहिजे. — I want a toy.
२०. मला चेंडू पाहिजे. — I want a ball.

२१. मला फळे पाहिजेत. — I want fruits.
२२. मला भाज्या पाहिजेत. — I want vegetables.
२३. मला सफरचंद पाहिजे. — I want an apple.
२४. मला केळे पाहिजे. — I want a banana.
२५. मला द्राक्षे पाहिजेत. — I want grapes.

२६. मला फुल पाहिजे. — I want a flower.
२७. मला झाड पाहिजे. — I want a plant.
२८. मला घर पाहिजे. — I want a house.
२९. मला खोली पाहिजे. — I want a room.
३०. मला पंखा पाहिजे. — I want a fan.

३१. मला टीव्ही पाहिजे. — I want a TV.
३२. मला रेडिओ पाहिजे. — I want a radio.
३३. मला संगणक पाहिजे. — I want a computer.
३४. मला कॅमेरा पाहिजे. — I want a camera.
३५. मला छत्री पाहिजे. — I want an umbrella.

३६. मला टोपी पाहिजे. — I want a cap.
३७. मला साबण पाहिजे. — I want soap.
३८. मला टॉवेल पाहिजे. — I want a towel.
३९. मला उशी पाहिजे. — I want a pillow.
४०. मला चादर पाहिजे. — I want a blanket.

४१. मला बूट पाहिजेत. — I want shoes.
४२. मला मोजे पाहिजेत. — I want socks.
४३. मला गाडी पाहिजे. — I want a car.
४४. मला बस पाहिजे. — I want a bus.
४५. मला तिकीट पाहिजे. — I want a ticket.

४६. मला नोकरी पाहिजे. — I want a job.
४७. मला मदत पाहिजे. — I want help.
४८. मला विश्रांती पाहिजे. — I want rest.
४९. मला आनंद पाहिजे. — I want happiness.

Monday, 13 April 2026

मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन उपक्रमशील व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या ५ व्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्याला शिवाजी हायस्कूल वाशिम येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.वत्सगुल्मी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे सरांची लाभली आहे तर पाठराखण प्रसिद्ध लेखक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मा.एकनाथ आव्हाड सर यांनी केली आहे. मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे यांचे यापुर्वीचे साहित्य म्हणजे त्यांचा पहिला काव्यसंग्रह चिमणी पाखरं,तसेच सुकळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कवितांचा बालकवितासंग्रह -उमलती फुले,(महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला काव्यसंग्रह व पहिले बालकविसंमेलन मिनाक्षी नागराळे यांनी सर्किट हाऊस वाशिम येथे घेतले होते.तिसरे पुस्तक म्हणजे 'स्वराज्याचे मावळे' हा पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांवर झाला.त्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास कवितेच्या रूपात मांडण्यात आला.याच स्वराज्याचे मावळे या काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुंबई येथील ग्रंथालयात निवड झाली तसेच महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली.या आगळ्यावेगळ्या काव्यसंग्रहाचे साहित्यप्रेमीनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर लॉकडाऊन काळात महाराष्ट्रभरातून पुस्तके समिक्षणासाठी भेट येत असतं त्या पुस्तकावरचे समिक्षण करून त्याचा समकालीन समिक्षा ग्रंथ निर्माण झाला.या ग्रंथाचा उपयोग पिएचडी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे. शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक तालुक्यातून कवितेसाठी तीन नंबर काढण्यात आले होते.ते शिक्षक तालुक्यातून विभाग स्तरासाठी पात्र ठरले होते.त्या निवडक कवितांचा पाच जिल्ह्यांतील शिक्षकांच्या स्पर्धा या वाशिम जिल्ह्यात घेण्यात आल्या त्यामुळे या काव्यसंग्रहाला वत्सगुल्मी हे नांव देण्यात आले. वाशिम जिल्ह्याला साहित्यिक वारसा राजा वाकाटक ते वत्सगुल्मीच्या काळापासूनचा असल्याने आणि वत्सगुल्मी ही एक साहित्यशैली असल्याने वाशिमचे जुने नांव वत्सगुल्म असल्याने या काव्यसंग्रहाला कवयित्री /लेखिका,समिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी खूप विचारपूर्वक दिले आहे. मिनाक्षी नागराळे यांना सावित्रीमाई फुले कवयित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने २०२३/२४ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मध्ये जिल्हास्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आजपर्यंत मिनाक्षी नागराळे यांना ९१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९२,व ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेची निवड झाली होती.मिनाक्षी नागराळे यांना साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक,कार्यासाठी आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षकी पेक्षात तर अग्रेसर असणाऱ्या तळागाळातील गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाचा लळा लावणा-या या ध्येयवेड्या शिक्षिकेला उद्याच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या हार्दिक शुभेच्छा.... खूप खूप अभिनंदन

मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

Thursday, 2 April 2026

Saturday, 7 March 2026

उन्हाळ्यात लक्षात ठेवण्याच्या आरोग्य टीप्स

उन्हाळ्यात लक्षात ठेवण्याच्या आरोग्य टीप्स 

*शरीराला आतून थंडावा देण्यासाठी आणि उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी तुमचा आहार, फळे आणि व्यायामाचे नियोजन खालीलप्रमाणे असावे:*

*१. शरीराला थंडावा देणारा आहार*

नुसते थंड पाणी पिण्यापेक्षा असे पदार्थ खा जे शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी राखतात:
 * ताक (Buttermilk): ताक हे सर्वोत्तम 'नॅचरल कूलंट' आहे. यात थोडे जिरे पूड आणि कोथिंबीर टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि थंडावा मिळतो.
 * दही आणि लस्सी: दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यामुळे प्रोबायोटिक्स मिळतात आणि पोट शांत राहते.
 * सब्जा बिया: सब्जा बिया पाण्यात भिजवून त्या लिंबू सरबत किंवा दुधात टाकून प्या. हे शरीरातील उष्णता शोषून घेतात.
 * नारळ पाणी: शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यासाठी आठवड्यातून ३-४ वेळा शहाळे प्या.
 * बडशोप आणि खडीसाखर: जेवणानंतर बडशोप खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.

*२. उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळे*

ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ती फळे उन्हाळ्यात वरदान ठरतात:
 * कलिंगड आणि टरबूज: यात ९०% पेक्षा जास्त पाणी असते, जे डिहायड्रेशनपासून वाचवते.
 * काकडी: काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि थंडावा देते.
 * संत्री आणि मोसंबी: व्हिटॅमिन सी मुळे प्रतिकारशक्ती टिकते आणि थकवा कमी होतो.
 * द्राक्षे: शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी द्राक्षे खावीत.
 * काळा वाळा किंवा पन्हे: कच्च्या कैरीचे पन्हे उन्हाच्या झळांपासून (Heatstroke) रक्षण करते.

*३. उन्हाळ्यासाठी योग्य व्यायाम*

उन्हाळ्यात जास्त घाम गाळणारा व्यायाम करणे कधीकधी धोकादायक ठरू शकते, म्हणून खालील गोष्टी लक्षात घ्या:

 * प्राणायाम (शीतली आणि सीत्कारी): हे खास शरीराला थंड करण्यासाठीचे प्राणायाम आहेत. यामुळे जिभेवाटे थंड हवा शरीरात जाते आणि मेंदू शांत होतो.
 * योगासने: शवासन, बद्धकोणासन किंवा चंद्राभ्यास (Moon Salutation) यांसारखी संथ आसने करा.
 * पोहणे (Swimming): उन्हाळ्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो आणि शरीराचे तापमानही वाढत नाही.
 * वेळेचे भान: सकाळी ६ ते ८ किंवा संध्याकाळी ७ नंतरच व्यायाम करा. दुपारी व्यायाम करणे पूर्णपणे टाळा.

*टाळण्याच्या गोष्टी (Don'ts):*

 * अति तिखट, मसालेदार आणि गरम मसाले असलेले पदार्थ कमी करा.
 * कोरडे पदार्थ (उदा. बिस्किटे, फरसाण) टाळा, कारण ते पचायला जास्त पाणी लागते.
 * जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नका, कारण त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.

*महत्त्वाची टीप: फ्रिजमधील एकदम कडक थंड पाणी पिण्याऐवजी मातीच्या माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम असते.*

*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*

*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी घरगुती उपचार हा ग्रुप जॉईन करा*

*(कॉपी पेस्ट)*

 


.

Monday, 2 March 2026

मिनाक्षी नागराळे सन्मानित

Monday, 16 February 2026

शिव दत्ता चव्हाण यांनी ५० इंग्रजी शब्द तोंडपाठ करून सांगितल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...

शिव दत्ता चव्हाण यांनी ५० इंग्रजी शब्द तोंडपाठ करून सांगितल्याबद्दल हार्दिक अभिनंदन...

Thursday, 22 January 2026

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा:  शहाणपण थोडे जप पुन्हा  शब्द आहेत अमुल्य वेडे जपून वापर त्याचा कर पुन्हा  शब्द असे दुधारी तलवार सये निर्मळ मनाचा काय गुन्हा....!...

Thursday, 27 November 2025

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जांभरून नावजी येथे संविधानदिन विविध उपक्रम घेऊन साजरी...

 जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा जामरुन नावजे येथे प्रभात फेरी काढू संविधानाची प्रस्ताविका म्हणण्यात आले त्यानंतर संविधानावर आधारित संविधान गीत विद्यार्थ्यांनी सादर केले त्याचबरोबर संविधान चित्रकला स्पर्धा आणि उद्देशिका लेखन स्पर्ध घेण्यात आली. संविधान दिन मोठ्य उत्साहात साजरा करण्यात आला.२६ नोव्हेंबर संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

Sunday, 5 October 2025

*सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदान करणारी मनाने चिरतरूण असणारी शिक्षिका -चंदा वानखेडे*

 *सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानदान करणारी मनाने चिरतरूण असणारी शिक्षिका -चंदा वानखेडे*

आजच्या धावत्या युगात आपण पहातो मला वेळ नाही,मला खूप कामं आहे,मला आता काम होत नाही, मला सुट्टी पाहिजे होती,या कामातून स्वतः साठी वेळच मिळत नाही,नोकरी करून कंटाळा आला आहे,आता मला वयानुसार कामं होत नाही,सेवानिवृतृत झाल्यावर देवदेव करायचं,आता काय सेवा संपली हरिनाम करायचं,सेवा संपली आता सुखाचा संसार करूया,नोकरीवर असल्याने कुटुंबाला वेळच देता आला नाही. अशी एक नाही तर हजार कारणं पुढं करणारी लोकं आपण पहातो.पण या सगळ्या निगेटिव्ह विचारांना थारा न देणारी अशीच एक ध्येयवेडी शिक्षिका आहेत त्या म्हणजे सौ.चंदा वानखेडे मॅडम.चला आज पाहूया त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह विचार त्यांच्या कार्याची ओळख.
     सौ चंदा वानखेडे मॅडम या सेवेमध्ये शिक्षिका म्हणून 1990  साली लागल्या.सेवानिवृत्तीवेळी मॅडम अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा साखरा येथे कार्यरत होत्या.३१ जुलै २०२५ मध्ये त्या सेवावृत्त झाल्या.सतत हसरा चेहरा, चेहरा पाहिल्यावर अजूनही वाटत नाही की त्या सेवानिवृत्त झाल्या असतील इतकी चकाकी. नाहीतर काही लोकं सतत उदासीन असतात.सेवा निवृत्तीनंतरही गोरगरिबांच्या लेकरांना उदात्त हेतूने शिकवणाऱी मंडळी शोधणं म्हणजे हातात कंदील घेऊन सुई शोधल्यासारखं आहे.अशी ध्येयवेडी मनाने चिरतरूण असणारी शिक्षिका -चंदा वानखेडे मॅडम यांनी सेवानिवृत्त होत असताना त्यांच्याकडे जो वर्ग तोच वर्ग कन्टीन्यू करत आजही सेवासंमाप्तिनंतर अविरत सेवा देत आहेत.त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
        मी माननिय शिक्षणाधिकारी ससाणे साहेबांच्या कार्यशाळेमध्ये सहज मॅडमला भेटले आणि सहजच विचारले की 'अरे मॅडम तुम्ही तर रिटायर्ड झाल्या ना.मग तुम्ही इथं कसं काय? मॅडमनी हसून उत्तर दिलं मला घरी करमत नव्हतं म्हणून मी पुन्हा शाळेत जायला लागले.आजच्या काळात एक मिनिटही दुसऱ्याला न देणारी लोकं आहेत.विचारपूस, चौकशी तर सोडाच पण वाशिम जिल्ह्यातली मला आवडलेली एक गोष्ट आहे ती म्हणजे अधिका-यापासून ते शिक्षकांपर्यंत सर्वजण महिला शिक्षिकेचा खूप आदर करतात.( काही अपवाद वगळता) सौ चंदा वानखेडे मॅडमचा करारी बाणा म्हणा किंवा कार्याप्रती असलेली निष्ठा ही लक्षात येते.अशा शिक्षिकेला सर्व्हिसमध्ये खूप हसतमजेत आनंदाने कार्य करताना मी बघितलंय जेंव्हा मला समजलं की मॅडमने सेवानिवृत्ती नंतरही शाळा सुरूच ठेवली तेंव्हा खरंच मॅडम बद्दल खूप अभिमान वाटला.
     चंदा वानखेडे मॅडमकडून ही गोष्ट खरंच खूप शिकण्यासारखी आहे.नोकरी तर सर्वजणच करतात पण काहीजण सेवाव्रत साफल्यम म्हणल्यासारखे सेवेला जेंव्हा व्रत समजतात तेंव्हा खरच मला नाही वाटत की यानंतर कोणते व्रत करण्याची गरज आहे.आजच्या काळात मी अशीही मंडळी पाहिलीय जी सेवेत असतानाच साईड बिझनेस त्यांचे सुरू आहेत. हे बोलून मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत परंतु ही वस्तुस्थिती आहे.आणि आजच्या वस्तुस्थितीवर सहसा कुणी भाष्य करायला तयार होत नाही. का? तर संबंध खराब होतील.पण चांगले कार्य करणाऱ्या लोकांना तरी कुणी चांगलं म्हणत नाही.सेवा निवृत्ती नंतर जर एखादी महिला सेवा व्रत करत असेल कुठलीही आर्थिक मोबदला न घेता घरची सर्व कामं या वयात आटोपून जर पुन्हा नव्याने शाळेत ज्ञानदान करत असेल तर ती खरी सावित्रीची लेक आहे.अशा लेकीचं कौतुक करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
      चंदा वानखेडे मॅडमच्या या निर्णयाला पाठबळ देणारे त्यांचे पती खरोखर त्यांचे मनापासून कौतुक करायला हवे.आणखी एखादा पती म्हणला असता बसं झालं मॅडम आता घरादारांकडे बघा...स्त्रीच्या पाठीशी खंबीरपणे साथ देणारी माणसं जिथे असतात तिथे प्रगती झाल्याशिवाय राहत नाही.चंदा वानखेडे मॅडम म्हणजे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आहे. नोकरीला लागल्यानंतर मॅडमनी बी.ए.पूर्ण केलं,कुटुबाची जबाबदारी पार पाडत, नवनवीन अन्नपदार्थ बनवण्यापासून ते संगीत, गायन,वाचन, रांगोळी अशा अनेक कला जपत आता जे घरी बसून आराम करण्याच्या वेळेत मोफत सेवा म्हणण्यापेक्षा ज्ञानदान करत आहेत.अशा या सावित्रीच्या लेकीचं मनापासून कौतुक व आभार.मॅडमच्या विचारांना सलाम करते आणि थांबते.त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा.अशीच उर्जा ,निरोगी आयुष्य मॅडमला लाभो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना.

लेखिका
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा
जांभरूण नावजी
पंचायत समिती -वाशिम

Sunday, 3 August 2025

सोडू नये निती (अभंग क्र.५६)

 *सोडू नये निती(अभंग क्र.५६)*

कधी माणसाने | सोडू नये निती |
लोकांस प्रचिती | असतेच || १||

वंशावळ खोटी| खोटेची करिती |
जगा दाखविती | मोठेपण || २ ||

जग हे शहाणे | ओळखती सारे |
हव्यासाचे वारे | सुटलेले || ३||

शहाण्याला असे | शब्दांचा मार |
मुर्खाचा बाजार | मांडलासी || ४ ||

काय तुझी निती | केलास कचरा |
माणूस ना बरा | दिसलासी || ५ ||

आपुल्या हाताने | दगड घातला |
मनात सलला | आंतरीक || ६ ||

खोटेपण दिसे | लोकं ही हुशार|
मानवा लाचार | का झालास || ७ ||

अतिहव्यासाचे | रे दुष्परिणाम |
करी घामाघाम | निर्लज्जास || ८ ||

सत्याचे हे सार | सत्य जिंकतसे
नाही लपतसे | खोटेपण || ९ ||

केवढी फजिती | गध्याची होतसे |
लालसा दिसते | गाढवाला || ९ ||

गाढवास काय | गुळाची ती चव |
नाही काय भेव | आंतरिचे || २० ||

तुझे मन ग्वाही | तूच आहे चोर |
परि शिरजोर | ठरलासी || ११ ||

एकदिन ऐसा | उगवेल खास|
सत्याचीच आस | दिसेलगा || १३||

नियतीचा खेळ | आज ना उद्याला |
साथ दे न्यायाला | राहशील || १४ ||

जैसी रे करणी | वैसी रे भरणी |
डोळा येई पाणी | कळेलच || १५ ||

शब्दांचा हा मार | मुर्खास कळेना |
वळता वळेना | बुध्दीलाही || १६ ||

मिनू म्हणे आता | हो बाई सावध |
सत्याचा गे वध | होत असे || १७||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम...

Friday, 27 June 2025

कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळा प्रवेशोत्सव व नवांगतांचे स्वागत आगळ्यावेगळ्या पद्धतीने मिरवणूक कढत वाजतगाजत,नाचत धम्माल मिरवणूक काढण्यात आली.

 कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मातीशी नाळ जोडत पारंपारिक पद्धतीने केला प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

कोकलगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शाळा प्रवेशोत्सव व नवांगतांचे स्वागत महाराष्ट्राच्या पारंपरिक पद्धतीने बैलगाडी मध्ये चिमुकल्या मुलांनख बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.सर्वप्रथम लहानग्या दाखलपात्र मुलांना शाळेच्या गेटवरच कुंकुमतिलक लावून त्यांचे औक्षण करून डोक्यावर बर्थडे टोपी घालून प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढून,सर्वत्र फुगे लावून सर्जाराजा ची बैलजोड बैलगाडीला जुंफण्यात आली.संपुर्ण बैलगाडी फुग्यांनी सजवून बैलगाडी मध्येच दाखलपात्र विद्यार्थी बसवून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.विशेष म्हणजे विद्यार्थीप्रिय असणाऱ्या शिक्षिका नागराळे मॅडम या सुध्दा बैलगाडी बसल्या होत्या त्यांनासुद्धा बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला.मिरवणुकीत गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.बैलजोडी ज्या शेतकरी बांधवांनी दिली होती त्यांना शाल व श्रीफळ देऊन शाळेचे मुख्याध्यापक श्री रामकिसन वाकुडकर सर यांनी सत्कार केला.त्यांनंतर शाळा समितीचे अध्यक्ष डॉ दिनेश काळबांडे व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोफत गणवेश,मोफत पुस्तके,मोफत मसालेभात आणि जिलेबीचा खाऊ वाटप करण्यात आले.दाखलपात्र चिमुकल्यांची बैलगाडीतून वाजतगाजत मिरवणूक हे या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण सर्व गावकऱ्यांना मोहित करणारे व शाळेविषयी गावाविषयी आपुलकी वाटणारे वातावरण निर्मिती झाली.आगळ्यावेगळ्या पध्दतीने आनंदोत्सव व प्रवेशोत्सव साजरा केल्याबद्दल गावकऱ्यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले.

Friday, 13 June 2025

ऐक आतला आवाज

 ऐक आतला आवाज( १३/६/२०२५)

ऐक आतला आवाज
तुला पटलं तेच कर
सांगणारे सांगत असतात
तू सुखाची ओंजळ भर....!!

एका कानाने घे ऐकून
दुसऱ्या कानाने दे सोडून
तुझ्या अंतर्मनाला पटलं तर
तू कर तुझे दोन्ही हात जोडून....!!

चांगलेभले तुला कळतेच
पण जशास तसे वागू नको
तु तुझे चांगले कर्म करत रहा
वेड्यांच्या नादी तु लागू नको....!!

प्रामाणिक रहा तू स्वतःशी
डागेलपणा तू करू नको
इथल्या इथेच आहे सारे
तू तुझा गर्व दाखवू नको....!!

क्षणभंगुर हे जीवन वेड्या
आनंदाने शिक जगायला
इथे रोज नवीन लढाई आहे
तू ही शिक आता लढायला....!!

काळानुसार नाती बदलतात
जग हे स्वार्थी आहे माणसा
तुझ्या आतला आवाज ऐक
तू चांगल्या मार्गाने चाल माणसा...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम

Thursday, 10 April 2025

महाराष्ट्र राज्य शासनाच्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये (२०२३) मिनाक्षी नागराळे यांना १७ पुरस्कार,१७ आणि ८१ हजाराचा धनादेश बक्षिस स्वरूपात देण्यात आले...

Tuesday, 4 March 2025

इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का?

 इतक्या क्रूरपणे  कुणाला मारायचं असतं का?(कविता मनातली)


इतक्या क्रुरपणे कुणाला मारायचं असतं का? || धृ||
एक चापट मारली म्हणून
हत्याच करायची असते का?
घाणेरड्या राजकारणासाठी
इतक्या क्रूरपणे मारायचं असतं का?

आका,बोका,खंडण्या काय चाललंय?
माझ्या शिवरायांच्या महाराष्ट्रात
अहो लाज वाटली पाहिजे थोडी तरी
स्वतःच्या स्वार्थासाठी मग
वडिलांचं छत्रच उडवायचं असतं का?

राजकारणी सगळेच एका माळेचे मणी
गरीबाला कोणी आहे का धनी?
अन्यायाला प्रतिकार केला म्हणून
जिवानिशी उडवायचं असतं का?

एका आईच्या पोटचा गोळा होता
एका मुलीच्या आधारस्तंभ होता
असं किड्या मुंग्यावानी कुणी दिवसाढवळ्या
उचलून नेऊन हत्या करतं का?
इतक्या निर्दयीपणे कुणी कुणाला मारतं का?

काय चूक होती त्या निष्पाप जिवाची?
इमानदारी तुमच्या आडवं येते का?
राजकारण्यांच्या वरहस्ताशिवायं
सांगा हे सगळं घडतं का?

संतोष देशमुखांना मारून
दोन महिने होतायेत
अजूनही सरकारला मोबाईल
सापडत नाहीयेत
सापडला मोबाईलातला डेटाच उडतो का?

देशमुखांच्या हत्येचे फोटो पाहून अचानक
माणसाच्या काळजाचा चुकतोय ठोका
कायद्याने फासावरती लटकवा दोषींना
जे कुणी असतील मास्टर माईंड आका बोका..

कायदा,संविधान,सर्व हाती घेत चाललेत
जनतेचे सेवकच आता दादा बनायलेत
आपल्याच भाकरीवर आपलीच पोळी  शेकायलेत 
आता जनतेनेच न्याय मागायचं का?
एक चापट मारली म्हणून हत्याच करायची असते का?

कवी,लेखक, आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ 
पत्रकार, कधी उठवणार आहेत तुमचा आवाज?
इतकं सारं महाराष्ट्रात घडूनही
 उघड्या डोळ्यांनी बघायचं का?
उघड्या डोळ्यांनी बघायचं का?

कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Tuesday, 4 February 2025

नवनीत कडून मिनाक्षी नागराळे आदर्श शिक्षिका म्हणून सन्मानित...

नवनीत कडून मिनाक्षी नागराळे सन्मानित.... वाशीम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील आदर्श शिक्षिका महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कृत

Tuesday, 1 October 2024

महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मिनाक्षी नागराळे यांना जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय क्रमांक पटकावला

 *महाराष्ट्र राज्य शासनाच्या व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मिनाक्षी पांडुरंग नागराळे मॅडम,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव, केंद्र -तोंडगाव,ता.जि.वाशिम यांना जिल्हास्तरीय ६ वेळा आणि तालुकास्तरीय ११ वेळा पुरस्कृत*

उपक्रमशील व तंत्रस्नेही असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथील मिनाक्षी नागराळे मॅडम यांना जिल्हास्तरीय व्हिडीओ निर्मिती स्पर्धेमध्ये

१ ली ते २ री- गणित - प्रथम
६ ते ८ वी      गणित - द्वितीय
६ ते ८ वी      इंग्रजी - तृतीय
६ ते ८ वी      विज्ञान- द्वितीय
६ ते ८ वी.     सा.शास्त्र.तृतीय
११ वी १२.    भाषा.    द्वितीय


तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये मिनाक्षी नागराळे मॅडम

१ ते २ री     भाषा.       प्रथम
१ ते २ री.    गणित.      द्वितीय
१ ते २ री     इंग्रजी.      तृतीय
३ ते ५ वी.    भाषा.       प्रथम
३ ते ५ वी.    गणित.      प्रथम
३ ते ५ वी     इंग्रजी.      प्रथम
६ ते ८ वी.    भाषा.       प्रथम
६ ते ८ वी.     गणित.     प्रथम
६ ते ८ वी.      इंग्रजी     द्वितीय
६ ते ८ वी.     विज्ञान.     प्रथम
६ ते ८ वी.     सा.शास्र    प्रथम

*असे तब्बल ११ वेळा तालुकास्तरीय व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत यशस्वी झाले याचा आम्हांला मनस्वी आनंद होत आहे... 

*मिनाक्षी नागराळे मॅडमचे हार्दिक अभिनंदन पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...💐💐💐मॅडम आम्हांला तुमचा सार्थ अभिमान आहे...*

*शुभेच्छूक-*

श्री.रामकिसन वाकुडकर सर
श्री.धम्मसेवक विसावे सर
श्री.राजेंद्र गोटे सर
श्री.ज्ञानेश्वर काळबांडे सर
श्री.डॉ.दिनेश काळबांडे (शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष,सर्व सदस्य)
*समस्त कोकलगावनगरी*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव...*


Monday, 1 July 2024

अतिशय बिकट परिस्थितीवर मात करत कोकलगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकलेला माझा विद्यार्थी विमानसेवेत रूजू झाला... खूप खूप अभिनंदन शिवशंकर अंभोरे...💐💐💐

 माझा पहिल्या वर्गातला विद्यार्थी... शिवशंकर अंभोरे
अगदी लहान वयापासून चुणचुणीत,गरीब,शांत स्वभाव अभ्यासात एकदम हुशार,दिलेला अभ्यास मन लावून करणारा...म्हणतात ना बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे मला त्याचा अभ्यास पाहून,शिकण्याची जिद्द पाहून तेंव्हा ही वाटायचं की हा पुढे जाऊन काहीतली चांगला बनणार... शिवशंकरची परिस्थिती खूपच बिकट,त्यात अचानक त्याच्या बाबा वर विज कोसळून वडीलांचंही छत्र हरवलं.आईने दोन मुलींची लग्न केली स्वबळावर,आजची कष्ट उपसतच असते रात्रंदिवस...आईसारखाच होतकरू मुलगा शिवशंकर सुध्दा..मागे माझ्या शाळेत कै.गोटे सरांचं आकस्मिक निधन झाले आणि चार शिक्षकांचा पट पण माझ्या शाळेत दोनच शिक्षक राहिलो...मी दोन वर्ग घ्यायची, वाकुडकर सरांना दोन वर्ग आणि मुख्याध्यापकाचा रोल त्यामुळे फार कठीण चाललं होतं...मग मला शिवशंकर आठवला. मी गावातील पालकांना रिक्वेस्ट केली की शिवशंकरला एका वर्गाला जसं जमेल तसं शिकवा म्हणून बिचा-याने क्षणाचाही विलंब न करता वेगवेगळ्या परिक्षांचा अभ्यास करत माझ्या शाळेतल्या चिमुकल्यांना ज्ञानदानाचं पवित्र कार्य केलं त्याचंच फलित (पुण्य) आणि त्याची जिद्द, चिकाटी,ध्यास, प्रयत्न यांच्या जोरावर आज एयर इंडिया, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे नोकरी लागली...वडीलाचं छत्र हरवलेल्या लेकरांना खरंच खूप जाणिव असते परिस्थितीची...माझा विद्यार्थी म्हणून मला तर गर्वच आहे.आणि अभिमान सुध्दा वाटतो...आज शिवशंकरनी आकाशाला गवसणी घातली....कोण म्हणतं मुलं इंग्रजी शाळेत शिकल्यावर चांगल्या पदाला जातात? मी म्हणते शाळा कोणतीही असो विद्यार्थी चांगले असले आणि पहिली ते चौथीपर्यंत मातृभाषेतून शिकले की मुलं चांगल्या पदावर पोहचतात....

My dear students congratulations...u get big achivements in air india job...As the saying goes, the baby's feet are seen in the cradle, you were in the first class, little by little, until you finally achieved success, with the strength of determination and perseverance, you climbed the sky without the support of your father. I am proud of you.💐💐💐💐👌👌✌️

*शब्दांकन-मिनाक्षी नागराळे मॅडम*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव*

#drxshivshankarambhore
#airindiaairlines

Monday, 22 April 2024

उष्माघाताच्या लाटेपासून बचावासाठी काय करावे? काय करू नये?

 उष्माघाताच्या लाटेपासून बचावासाठी नक्की काय करावे? काय करु नये

नंदुरबार (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -उन्हाळी हंगामात व वातावरणातील बदलामुळे तापमानात वाढ होत असून उष्णतेची लाट निर्माण होत असून नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव करण्यासाठी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी, तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण हरिष भामरे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.


वातावरणातील बदलामुळे विशेषतः उन्हाळी हंगामात वाढत्या तापमानामुळे मे महीन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून मोठ्या प्रमाणात तापमाणात वाढ होत असते. उष्णतेची लाट अथवा उष्माघाटाचा विचार करता सामान्य तापमानापेक्षा 4.5 डिग्री सेल्सियस पेक्षा जास्त तापमानाची वाढ होणे उष्मतेची लाट आहे असे समजून होणाऱ्या परिणामाला सामोरे जाण्यासाठी दक्ष राहणे अत्यावश्यक आहे. वातावरणातील तापमानासोबत हवेतील आद्रता जास्त असल्यास त्याठिकाणी उष्णतेच्या लाटेचे अधिक दुष्परिणाम जाणवतात या शिवाय काही भागात रात्रीच्या वेळी तापमान कमी न होता अधिक उष्ण राहत असल्याने हा भाग अतिसंवेदनशील व उष्माघात प्रवण बनतो. अशा परिस्थितीत मानवी शरीरावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो. विशेषतः झोपडपट्टी मध्ये राहणारे, रस्त्या शेजारील अथवा फिरते विक्रेते, बस स्थानक, रेल्वे स्थानक, यात्रचे ठिकाणे, विविध धार्मिक स्थळे, विवाह सोहळे, बाजार समितीत काम करणारे, नियमित बाजार अथवा आठवडा बाजारातील विक्रेते येथे भेट देणारे वयोवृद्ध, लहान मुले, महिला यांच्यावर उष्णतेचे जास्त परिणाम दिसून येतो. यासाठी उन्हाळ्यामध्ये नागरिकांनी उष्मालाटेपासून बचाव होण्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.

उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी काय करावे ?
· पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही दर अर्धा तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
· घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावे.
· सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा वापर करा,
· उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
· हलकी, पातळ व सच्छिद्र सूती कपडे वापरावेत.
· उन्हात काम करीत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपडयाने डोके, मान, चेहरा झाकण्यात यावा.
· प्रवासात पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
· शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनवण्यात आलेली लस्सी, कैरीचे पन्हें, लिंबू-पाणी, ताक इत्यादीचा वापर नियमित करावा.
· अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा.
· गुरांना छावणीत ठेवण्यात यावे तसेच त्यांना पुरेसे पाणी पिण्यास देण्यात यावे.
· घर थंड ठेवण्यासाठी पड़दे शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवण्यात याव्यात.
· पंखे, ओले कपड़े याचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे.
· कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.
· सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करण्यात यावे.
· पहाटेच्या वेळी जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. तसेच बाहेर कामकाज करीत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करावा.
· गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिक काळजी घेण्यात यावी.

उष्मालाटेपासून बचाव होण्यासाठी काय करु नये ?
· उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.
· मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.
· दुपारी 13 ते 3 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
· उच्य प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
· लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
· गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
· बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत.
· उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.