*कर्मभुमी*
कर्म हीच माझी पुजा आहे
वाशिम जिल्हाच माझी कर्मभुमी
आदर्श पेशा माझा शिक्षिकेचा
धाराशिव हीच माझी जन्मभूमी.....✒
आदर्श माझे राजमाता जिजाऊ
क्रांतीज्योती सावित्रीआई फुले
ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रात मला
आवडतात ही निष्पाप,निरागस मुले...✒
कामं ही माझी ईश्वर पुजा
विद्यार्थी हेच माझे दैवत आहे
शाळा माझे मंदीर
मी त्यांची पुजारी आहे....✒
जन्मभुमी पेक्षा कर्मभुमी श्रेष्ठ
सात्विकतेने आपले कार्य करावे
एक आदर्श घडवून समाजात
स्वाभिमानाने सदैव रहावे.....✒
आपुलकी,प्रेम,जिव्हाळा
असावा सदैव मनामनात
माणुसकीचा झरा पाझरावा
प्रत्येक माणसामाणसात.....✒
निष्ठा असावी कामांप्रती खूप
सत्य,न्याय प्रामाणिकपणा असावा
जिकडेतिकडे चोहीकडे
आपल्याच किर्तीचा सुगंध दरवळावा....✒
कर्मभुमी वाशिम जिल्हा माझा
आहे मला याचा अभिमान
जेव्हा जेव्हा असेल दूर मी
आठवणीने उंचावेल माझी मान...✒
*©®कवयित्री-कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*
✍✍✍✍✍✍✍✍
No comments:
Post a Comment