Sunday, 31 December 2017

कृतीयुक्त गीत.. .मिनाताई नागराळे...


      
🏆 *माझी शाळा-माझे उपक्रम* 🏆
════════════════
     🔘  *उपक्रमाचे नाव*  🔘
        💠  *कृतीयुक्त गीत*  💠
     🎈  *गंपूने केले साबनाचे फुगे* 🎈━━━━━━━━━━━━━━━━
*100 % मूलभूत वाचन वाचन क्षमता विकास कार्यक्रम प्रशिक्षण अंर्तगत.....*

🎈 *गंपूने केले साबनाचे फुगे.....२ वेळा*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे.....२ वेळा*

🎈 *एक फुगा...आ..हा..हा...एक फुगा...*
*एक फुगा बाबांच्या चष्म्यावर बसला...*
*गंपूला तो डोळाच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे....२वेळा*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे.... २ वेळा*

🎈 *एक फुगा... आ...हा...हा..२ वेळा*
*एक फुगा ताईच्या वेणीवर बसला..*
*गंपूला तो मोतीच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे...२वेळा*
*छोटे गेले पुढे नी..मोठे राहिले मागे..२ वेळा*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा..*
*एक फुगा दादाच्या बॅटवर बसला...*
*गंपूला तो चेंडूच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे....*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे..*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा..*
*एक फुगा आजीच्या हातावर बसला...*
*गंपूला तो लाडूच वाटला....*
*गंपूने केले साबनाचे फुगे...*
*छोटे गेले पुढे नी.. मोठे राहिले मागे...*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा*
*एक फुगा आईच्या गालावर बसला....*
*गंपूला तो पापाच वाटला....*
*गंपूने केले साबनाचे फुगे...*
*छोटे गेले पुढे नी मोठे राहिले मागे..*

🎈 *एक फुगा..आ..हा..हा..एक फुगा...*
*एक फुगा उडत उडत आकाशात गेला..*
*गंपूला तो सूर्यच वाटला...*
*गंपूने केले साबनाचे फुगे...*
*छोटे गेले पुढे नी मोठे राहिले मागे...*

संकलन:-*मीनाताई पांडुरंग नागराळे
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी
ता.जि.वाशिम...*
       
    

जोडाक्षर लेखन पध्दती....मिनाताई नागराळे.वाशिम.

🔵 _जोडाक्षर लेखन पद्धती_  🔵

1⃣ *शेवटी दंड असणारी व्यंजने*:::   (1) स्वतंत्र दंड असणारी व्यंजने ::  ग  ण श  याप्रकारा मध्ये दंड काढून जोडाक्षर तयार केले जाते उदा: रुग्ण ,अरण्य, अश्म.

(2) _जोडलेला दंड असणारी व्यंजने_:::: ख घ च ज झ त थ ध न प ब भ म य व ष स
सख्खा, विघ्न ,कच्चा, ज्वर, माझ्या, उत्कट, तथ्य,ध्यास, जन्म,आप्त,अब्ज,अभ्यास, म्यांन,हिय्या ,अव्यय,  मनुष्य, वास्तव. इ.

2⃣ *मध्यभागी दंड असलेली व्यंजने* :::: _क फ_
मध्ये दंड असणारी ही दोनच व्यंजने आहेत  याचे पुढील।प्रमाणे लेखन होते
पक्वान्न,  चाफ्याचे, भक्त क्लिष्ट

3⃣ *अर्धा दंड असलेली व्यंजने*:::   _छ ट ठ ड ढ द ल ह

1    ळ हे आधी आल्यास त्यातील दंड काढून टाकावा उदा मळ्यात फळ्यावर
2   छ हे व्यंजन आधी आल्यास त्यातील दंड काढून टाकू नये। उदा उच्छवास
3  ट ठ ड ढ ह ही व्यंजने आधी आल्यास व त्यापुढे य व्यंजन आल्यास पुढीलप्रमाणे।लेखन करावे:: कोट्यवधी साठ्यात पगड्या वेढ्यात कह्यात
4   द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास त्याच्यापुढे य आल्यास विद्या उद्यान असे करावे दय असे करू नये
5  जोडाक्षरात द, च्या पूढे ग,घ,ध,व, आल्यास द च्याखालील बाजूस अक्षर जोडावे
उदा बुद्धी प्रसिद्धी पद्धत,
द्वंद्व, द्वीप

जेंव्हा दोन वेगळ्या पदाच्या संयोगातून द जोडाक्षर तयार होते द चा पाय मोडून लिहले जावे
उदा भगवद्गीता उदघाटन
6 जोडाक्षरात ल आधी आल्यास  पाल्य उल्हास। आई करावे

4⃣ *दंड नसलेली व्यंजने*:::
मराठी वर्णमलेत "र" हे एकच व्यंजन आहे त्याला दंड नाही त्याचे।लेखन जोडाक्षरात पुढीलप्रमाणे असावे। उदा(1)
ग्रस्त, व्रण प्रमाण
(2) क व फ मध्यभागी दंड असणाऱ्या व्यंजनांतर र हे अक्षर आल्यास   वक्र आक्रोश असे लिहावे
(3) द अर्धा दंड असलेल्या अक्षरानंतर र आल्यास द च्या खालच्या दंडाला जोडून तयार करावे उदा द्रव द्रोह द्राक्षे
(4) छ ट ठ ड ढ या अर्धा दंड असलेल्या अक्षरानंतर र आल्यास
उदा ट्राम राष्ट्र ड्रम असे लिहावे
(5) एक स्वर व एक व्यंजन या दोहोंच्या मध्ये र हे व्यंजन येते तेंव्हा र च्या मागील स्वराला जोडून उच्चार केला जात असेल तर पुढील व्यंजनावर रफार देऊन दाखवला जावा उदा सूर्य  पूर्व पर्वा
*(5)आडवी किंवा उभी जोडणी*:::::  जोडाक्षरा मध्ये एकच व्यंजन दोनदा येते तेंव्हा व्यंजनाची जोडणी उभ्या किंवा आडव्या पद्धतीने करतात
उदा सच्चा सत्ता गप्पा
उभी जोडणी::: यात व्यंजने एका खाली एक जोडणी करतात  फक्त क,ट,ठ, ड, ढ, द, ल,  या व्यंजनाची जोडणी एका खाली एक करावी  उदा पट्टा, बट्टा, खड्डा
काही अक्षरे दोन्ही प्रकारच्या जोडणीने केली जातात सल्ला  किंवा अन्न
        
     

                   *🌷संकलन*🌷
         *मीनाताई पांडुरंग नागराळे
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी.
ता.जि.वाशिम...

Friday, 24 November 2017

जनरल नाॅलेज

* जनरल नॉलेज *
*भारतातील पहिली रेल्वे लाइन?Answer- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*भारतातील पहिले तारायंत्र?Answer- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*भारतातील पहिली सूत गिरणी?Answer- मुंबई (१८५४)*
*भारतातील पहिले स्वातंत्र्य युद्ध?Answer- इ.स. १८५७*
*भारतातील पहिले जलविद्युत यंत्र?Answer- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र?Answer- मुंबई (१९२७)*
*भारतातील पहिला बोलपट?Answer- आलमआरा (१९३१)*
*भारतातील पहिली पंचवार्षिक योजना?Answer- १९५१*
*भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका?Answer- १९५२*
*भारतातील पहिली परमाणु चाचणी?Answer- पोखरण, राजस्थान*
*भारतातील पहिले क्षेपणास्त्र?Answer- (पृथ्वी १९८८)*
*भारतातील पहिला उपग्रह?Answer- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी?Answer- अप्सरा तुर्भे मुंबई* *(१९५६)*
*भारतातील पहिला तेल शुद्धिकरण कारखाना?Answer- दिग्बोई (१९०१)*
*भारतातील पहिला आधुनिक पोलाद कारखाना?Answer- दुल्टी (१८८७)*
*भारतातील सर्वप्रथम घटना
*पहिली रेल्वे लाइन- ठाणे ते मुंबई (१८५३)*
*पहिले तारायंत्र- कलकत्ता आणि डायमंड हार्बर (१८५३)*
*पहिले पोस्टाचे तिकीट* *१*
*ऑक्टोबर १८५४*
*पहिली सूत गिरणी- मुंबई (१८५४)*
*पहिले स्वातंत्र्य युद्ध- इ.स. १८५७*
*पहिले जलविद्युत यंत्र- दार्जिलिंग (१८९७-९८)*
*पहिला आकाशवाणी केंद्र- मुंबई (१९२७)*
*पहिला बोलपट- आलमआरा (१९३१)*
*पहिली पंचवार्षिक योजना- १९५१*
*पहिल्या सार्वत्रिक निवडणुका- १९५२*
*पहिली परमाणु चाचणी- पोखरण, राजस्थान*
*पहिले क्षेपणास्त्र- (पृथ्वी १९८८)*
*पहिला उपग्रह- आर्यभट्ट (१९७५)*
*भारतातील पहिली अणुभट्टी- अप्सरा तुर्भे मुंबई (१९५६)*
*पहिला तेल शुद्धिकरण कारखाना- दिग्बोई (१९०१)*
*पहिला आधुनिक पोलाद कारखाना- दुल्टी (१८८७)*
*भारतातील पहिले
*भारताचा पहिला गव्हर्नर जनरल- वॉरन हेस्टिंग्ज*
*पहिला व्हाइसरॉय- लॉर्ड कॅनिंग स्वतंत्र भारताचे*
*पहिले गव्हर्नर जनरल- लॉर्ड माऊंट बॅटन*
*राष्ट्रीय सभेचे पहिले अध्यक्ष- व्योमेशचंद्र बॅनर्जी*
*पहिले राष्ट्रपती- डॉ. राजेंद्र प्रसाद*
*पहिले पंतप्रधान- पं. जवाहरलाल नेहरू*
*पहिले कायदामंत्री- डॉ. बाबासाहेब आंबेडकर*
*पहिले वर्तमानपत्र- दि बेंगॉल गॅजेट (२१ जानेवारी १७८१)*
*स्वतंत्र भारताचे पहिले सेनाप्रमुख- फिल्ड मार्शल करिअप्पा*
*पहिला भारतीय आयसीएस अधिकारी- सत्येंद्रनाथ टागोर*
*भारताचे पहिले फिल्ड मार्शल- जनरल माणेकशा (१९७२)*
*इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय- राजा राममोहन राय*
*सर्वात लहान राज्य- गोवा (क्षेत्रफळ)*
*सर्वात लहान लोकसंख्येचे राज्य- सिक्कीम*
*सर्वात कमी लोकसंख्येची घनता - अरुणाचल प्रदेश.*
*भारतातील सर्वात उंचशिखरकोणते ?Answer- कांचनगंगा*
*भारतातील सर्वात उंचपुतळाकोणते ?Answer- बुद्ध पुतळा, हुसेनसागर (हैदराबाद)*
*भारतातील सर्वात उंचमिनारकोणते ?Answer- कुतूबमिनार (दिल्ली) २९० फूट*
*सर्वात उंचवृक्षकोणते ?Answer- देवदार*
*भारतातील सर्वात मोठेसरोवर?Answer वुलर सरोवर (काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा जिल्हा?Answer- लडाख (जम्मू- काश्मीर)*
*भारतातील सर्वात मोठा मानवनिर्मित कालवा?Answer- इंदिरा गांधी कालवा (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ)?Ans
wer- राजस्थान*
*भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले राज्य?Answer- उत्तर प्रदेश*
*भारतातील सर्वात मोठे धरण?Answer- भाक्रा (७४० फूट)*
*भारतातील सर्वात मोठा धबधबा?Answer- गिरसप्पा (कर्नाटक)*
*भारतातील सर्वात मोठे वाळवंट?Answer- थर (राजस्थान)*
*भारतातील सर्वात मोठा प्लॅटफॉर्म?Answer- खरगपूर (प. बंगाल)*
*भारतातील सर्वात मोठे क्रीडांगण?Answer- प्रगती मैदान (दिल्ली)*
*भारतातील सर्वात मोठी मस्जिद?Answer- जामा मशीद*
*भारतातील सर्वाधिक वनक्षेत्रे असलेले राज्य?Answer- मध्य प्रदेश*
*भारतातील सर्वात उंच दरवाजा?Answer- बुलंद दरवाजा*
*भारतातील सर्वात मोठे गुरुद्वारा?Answer- सुवर्ण मंदिर (अमृतसर)*
*भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?*
*Answer- मावसिनराम (मेघालयं)
संकलन:- *मीनाताई पांडुरंग नागराळे*
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी
ता.जि.वाशिम

Wednesday, 22 November 2017

महाराष्ट्राची माहिती....

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर
क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
भारतातील जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇👇
सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी
सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम
🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
जगाचे जनरल नॉलेज
👇👇👇👇👇👇
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अॅमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
फक्त स्वत : चेच नॉलेज वाढवु नका, दुसरयाचे सुद्धा नॉलेज वाढवा. धन्यवाद.
👏👏👏👏👏👏👏👏
संकलन:-मिनाताई नागराळे
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी...
वाशिम

Saturday, 9 September 2017

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द

अभिनेता -नट
उदर -पोट
एकता -एकी, ऐक्य
अंचल -स्थिर, शांत, पर्वत
अनर्थ -अरिष्ट, संकट
कट -कारस्थान
आज्ञा -आदेश, हुकूम
आरसा -दर्पण
अपराध -गुन्हा
उणीव -कमतरता,न्यून, न्यूनता
अंगार -निखारा
चाड -आवड, गरज, गोडी
अविरत- सतत, अखंड
औक्षण -ओवाळणे
मनोरंजन -मनोरंजन
आसक्ती- लाभ, हव्यास
गवई -गायक
ग्रंथ -पुस्तक
किमया -जादू, चमत्कार
अवर्षण -दुष्काळ (पाऊस न पडणे)
कृपण -कंजूष, चिकट
कृश -हडकुळा, बारीक
खडक- दगड, पाषाण
खटाटोप- प्रयत्न, मेहनत, धडपड
गनीम- शत्रु, अरी
गरुड -खगेंद्र, व्दिजराज, वैनतेय
गाणे -गीत
गाय -धेनू, गो, गोमाता
चौफेर- भोवताली, सर्वत्र
ठेकेदार -मक्तेदार, कंत्राटदार
छंद- आवड, नाद
जयघोष -जयजयकार
गौरव -सत्कार
तृष्णा -तहान, लालसा
छिद्र -भोक
दुजा -दुसरा
नजराणा -भेट, उपहार
नवनीत -लोणी
तारू -जहाज, गलबत
तरुण -जवान, युवक
थवा -समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव
टंचाई -कमतरता
झोका- हिंदोळा
नारळ -श्रीफळ, जारियल
निर्जन -ओसाड
नौदल -आरमार
पंक्ती -ओळ, पतंग, रांग
मत्सर- व्देष, असूया
मुलामा -लेप
ब्रीद -बाणा, प्रतिज्ञा
प्राप्त:काळ -उषा, सकाळ, पहाट
मकरंद -मध
मलूल- निस्तेज
रुक्ष नीरज, कोरडे
बैल- वृषभ, खोंड,
मोहिनी -भुरळ
प्रपंच -संसार
शिकस्त- पराकाष्ठा
शव- प्रेत,मुडदा
विषण्ण -कष्टी
स्वेद -घाम, धर्म
क्षुधा -भूक
सुरेल- गोड
विनय -नम्रता
विवंचना -चिंता, काळजी
क्षीण- अशक्त
शेज -शय्या, बिछाना, अंथरूण
शिक्षक -मास्तर, गुरु, गुरुजी
*संकलन* मीनाताई पांडुरंग  नागराळे
जि.प.व. प्राथमिक  शाळा  सुकळी