🔵 _जोडाक्षर लेखन पद्धती_ 🔵
1⃣ *शेवटी दंड असणारी व्यंजने*::: (1) स्वतंत्र दंड असणारी व्यंजने :: ग ण श याप्रकारा मध्ये दंड काढून जोडाक्षर तयार केले जाते उदा: रुग्ण ,अरण्य, अश्म.
(2) _जोडलेला दंड असणारी व्यंजने_:::: ख घ च ज झ त थ ध न प ब भ म य व ष स
सख्खा, विघ्न ,कच्चा, ज्वर, माझ्या, उत्कट, तथ्य,ध्यास, जन्म,आप्त,अब्ज,अभ्यास, म्यांन,हिय्या ,अव्यय, मनुष्य, वास्तव. इ.
2⃣ *मध्यभागी दंड असलेली व्यंजने* :::: _क फ_
मध्ये दंड असणारी ही दोनच व्यंजने आहेत याचे पुढील।प्रमाणे लेखन होते
पक्वान्न, चाफ्याचे, भक्त क्लिष्ट
3⃣ *अर्धा दंड असलेली व्यंजने*::: _छ ट ठ ड ढ द ल ह
ळ
1 ळ हे आधी आल्यास त्यातील दंड काढून टाकावा उदा मळ्यात फळ्यावर
2 छ हे व्यंजन आधी आल्यास त्यातील दंड काढून टाकू नये। उदा उच्छवास
3 ट ठ ड ढ ह ही व्यंजने आधी आल्यास व त्यापुढे य व्यंजन आल्यास पुढीलप्रमाणे।लेखन करावे:: कोट्यवधी साठ्यात पगड्या वेढ्यात कह्यात
4 द हे व्यंजन जोडाक्षरात आधी आल्यास त्याच्यापुढे य आल्यास विद्या उद्यान असे करावे दय असे करू नये
5 जोडाक्षरात द, च्या पूढे ग,घ,ध,व, आल्यास द च्याखालील बाजूस अक्षर जोडावे
उदा बुद्धी प्रसिद्धी पद्धत,
द्वंद्व, द्वीप
जेंव्हा दोन वेगळ्या पदाच्या संयोगातून द जोडाक्षर तयार होते द चा पाय मोडून लिहले जावे
उदा भगवद्गीता उदघाटन
6 जोडाक्षरात ल आधी आल्यास पाल्य उल्हास। आई करावे
4⃣ *दंड नसलेली व्यंजने*:::
मराठी वर्णमलेत "र" हे एकच व्यंजन आहे त्याला दंड नाही त्याचे।लेखन जोडाक्षरात पुढीलप्रमाणे असावे। उदा(1)
ग्रस्त, व्रण प्रमाण
(2) क व फ मध्यभागी दंड असणाऱ्या व्यंजनांतर र हे अक्षर आल्यास वक्र आक्रोश असे लिहावे
(3) द अर्धा दंड असलेल्या अक्षरानंतर र आल्यास द च्या खालच्या दंडाला जोडून तयार करावे उदा द्रव द्रोह द्राक्षे
(4) छ ट ठ ड ढ या अर्धा दंड असलेल्या अक्षरानंतर र आल्यास
उदा ट्राम राष्ट्र ड्रम असे लिहावे
(5) एक स्वर व एक व्यंजन या दोहोंच्या मध्ये र हे व्यंजन येते तेंव्हा र च्या मागील स्वराला जोडून उच्चार केला जात असेल तर पुढील व्यंजनावर रफार देऊन दाखवला जावा उदा सूर्य पूर्व पर्वा
*(5)आडवी किंवा उभी जोडणी*::::: जोडाक्षरा मध्ये एकच व्यंजन दोनदा येते तेंव्हा व्यंजनाची जोडणी उभ्या किंवा आडव्या पद्धतीने करतात
उदा सच्चा सत्ता गप्पा
उभी जोडणी::: यात व्यंजने एका खाली एक जोडणी करतात फक्त क,ट,ठ, ड, ढ, द, ल, या व्यंजनाची जोडणी एका खाली एक करावी उदा पट्टा, बट्टा, खड्डा
काही अक्षरे दोन्ही प्रकारच्या जोडणीने केली जातात सल्ला किंवा अन्न
*🌷संकलन*🌷
*मीनाताई पांडुरंग नागराळे
जि.प.वरि.प्राथमिक शाळा.सुकळी.
ता.जि.वाशिम...
No comments:
Post a Comment