Tuesday, 21 March 2023

मिनाक्षी नागराळे सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय उपक्रमशिल शिक्षिका पुरस्काराने सन्मानित

 *मिनाक्षी नागराळे यांना सुमतीबाई गोरे ट्रस्टचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर.*

सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराची सुरूवात केली आहे.शिक्षकांमधील शैक्षणिक उत्तरदायित्व, शैक्षणिक काम, सामाजिक काम, साहित्यिक रुची, समाजासाठी स्वतः चे अर्थिक योगदान, स्वतःची वाढवलेली शैक्षणिक पात्रता या सर्व गोष्टींचा विचार करून ट्रस्टच्या वतीने निवड केली जाते.यावर्षी साधारण ७०प्रस्ताव महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षकांकडून प्राप्त झाले होते त्यातील सर्वोच्च २०शिक्षक निवड समितीने निवडले आहेत.त्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील कोकलगाव जि.प.शाळेच्या आदर्श उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांना त्यांच्या साहित्यीक, सामाजिक, शैक्षणिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात येणार आहे.दरवर्षी प्रस्ताव न मागवता एक विशेष पुरस्कार दिला जातो तो यावर्षी अक्षरनंदन शाळेचे आदर्श शिक्षक अनिल आंधळे यांना जाहीर झाला आहे.
    ही माहिती प्रकल्प प्रमुख सोपान बंदावणे,कार्यकारी विश्वस्त राधाताई शिरसेकर,सुरेश धनकवडे,प्रभा गोगावले, रजनीताई धनकवडे,ज्योती मते,संगिता गोवळकर यांनी दिली . पुरस्कार वितरण रविवार दि १२मार्च २०२३ रोजी प्रसिद्ध साहित्यिक व ९५व्या साहित्य संमेलन अध्यक्ष मा भारत सासणे यांच्या उपस्थितीत उद्यान कार्यालय, सदाशिव पेठ,पुणे येथे सायं ४वा संपन्न होणार आहे.
     नुकताच या वर्षी मिनाक्षी नागराळे यांनी नवोपक्रम स्पर्धेत वाशिम जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक पटकावला आहे.त्यांचे अनेक नवोपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.मिनाक्षी नागराळे यांचे चार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.चिमणी पाखरं,उमलती फुले, स्वराज्याचे मावळे (महाराष्ट्रातला पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह -जृयांची निवड महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालयात निवड झाली आहे आणि महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.) समकालीन समिक्षा -(पि.एच.डी.करणा-यांसाठी संशोधन ग्रंथ) अशी चार पुस्तके प्रकाशित असून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.मिनाक्षी पी.नागराळे नावाचे शैक्षणिक युट्यूब चॅनल प्रसिध्द असून लाखो लोकांची पसंती दर्शविली आहे.संगीतमय पाढे या त्यांच्या व्हिडिओ ला ६० लाख लोकांनी पाहिला आहे.त्याचबरोबर त्यांचे http://meenakshi1412.blogspot.com या ब्लॉगवर अनेक शैक्षणिक पोस्ट आहेत.
          मोलाचा समजला जाणारा सुमतीबाई गोरे ट्रस्टचा  राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Tuesday, 24 January 2023

मनाचे मळभ(अभंग क्र.४०)

 मनाचे मळभ (अभंग क्र.४०)

मनाचे मळभ | करूयात दूर|
जायचे हो भूर्र | एकदिनी ||

आहे तोपर्यंत | आनंदाने जगा |
उगाचच त्रागा | कशापायी ||

निर्मळ मनाने | राहील जो आज |
दिर्घायुष्यी साज | मिळे तया ||

नको जळमटे | पवित्र हे मन |
देवाचेच धन | आहे बघ ||

मनमंदिरात | भगवंत वास |
लाभे सहवास | ठेव ध्यानी ||

आपण सारेच | ईशरूपी पक्षी |
आत्मा आहे साक्षी | प्रत्येकाचा ||

मनातली घाण | काढुनिया टाक |
स्वतःचाच धाक | असू द्यावा ||

निर्मळ मनाने | आनंदे भरीन |
जगण्याचा शीण | जाईल गा ||

मनाची श्रीमंती | जया वसतसे |
निर्मळ होतसे | मन त्याचे ||

दूर फेकुनिया | मनातली घाण |
स्वच्छ आणि छान | ठेव मन ||

मिनू म्हणे आता | खरेखुरे धन |
माणसाचे मन | ठेव ध्यानी ||

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम


Saturday, 21 January 2023

बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे -बालगीतांचा खजिना

 *बालकांचे भावविश्व समृद्ध करणारा बालकाव्यसंग्रह म्हणजे- बालगीतांचा खजिना*

    चंद्रपूर जिल्ह्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री सौ प्रीती जगझाप यांचा नंदादीप या काव्यसंग्रहानंतर दुसरा काव्यसंग्रह म्हणजे बालगीतांचा खजिना नुकताच वाचनात आला. लहान बालकांना बडबड गीते, बालकविता आणि गोष्टी खूप आवडतात. सो प्रीती जगझाप या मुळातच एक प्राथमिक शिक्षक असल्याने त्या बालकांचे भाव विश्व जाणतात. कायम बालकांच्या सानिध्यात राहत असल्याने बालकांच्या आवडीनिवडी, त्यांचा कल ओढा जाणून असल्याने त्यांचा २१ कवितांचा खजिना बालकांचे भावविश्व समृद्ध करेल यात शंकाच नाही. 'बालगीतांचा खजिना' या बालकाव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय सुंदर आणि बोलके असल्याने व बांधणी उत्कृष्ट असल्याने थोरामोठ्यांना, बालकांना पसंतीस पडणारे आहे. या बालकाव्यसंग्रहाला प्रस्तावना जेष्ठ साहित्यिक कवी चंद्रकांत वानखेडे पुणे यांची लाभली असून शुभेच्छा ग्रामगीताचार्य बंडोपंत बडेकर( अध्यक्ष झाडीबोली साहित्य संमेलन भंडारा )यांची लाभली आहे तर पाठराखण सुप्रसिद्ध बाल साहित्यकार एकनाथ आव्हाड यांची लाभली आहे.
           लहान बालकांना पावसात भिजायला आणि खेळायला खूप आवडतं. त्यांचे विश्वच वेगळं असतं. लहान बालकांना जसा पाऊस आवडतो तसेच प्राणी सुद्धा खूप आवडतात. प्राणी, पक्षी यांच्या बद्दल कुतूहल व आकर्षण असते. सौ. प्रीतीताईंनी नेमके तेच हेरले आहे. बालकात रममान होणाऱ्या त्या शिक्षिका असल्याने बालकांची आवड, बालकांचे भावविश्व त्या जाणतात त्यामुळेच तर बालगीतांचा खजिना त्यांच्या हाती सापडला आहे. बालकविता करणे इतकं साधं सोपं काम मुळीच नाही. बालकांच्या इतकच लहान व्हावं लागतं. तेंव्हा कुठे अशा बाल साहित्याचा जन्म होत असतो हेही तितकच खरं.
        बालपणी बालकांना जादूची छडी आवडते. बाहुली संगे खेळायला आवडते. परींच्या गोष्टी आवडतात. परींच्या कविता आवडतात. कवयित्री प्रीती ताईंनी वर्षाराणी या कवितेतून पावसाचे महत्व विशद केले आहे. पावसात भिजण्याचा बालमनाचा आनंद वर्षाला ती या कवितेतून पहायला मिळतो. 
           
             डोळ्यावर बांधून कापडी पट्टी 
             चला खेळूया धावणी शिपटी
             तू धाव आधी मी धावतो मागे 
             पडले कोणीतरी येऊ नका रागे...!

           आजच्या सोशल मिडीयाच्या जमान्यात नवनवे तंत्रज्ञान जसजसे विकसित झाले तसतसे लहान बालकांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वजण मोबाईलच्या इंटरनेटच्या जमान्यात वावरू लागले. त्यामुळे पूर्वीच्या काळी खेळले जाणारी मैदानी खेळ आज दुरापास्त होत चालले आहेत. आजच्या काळातील बालकांना पारंपारिक खेळाची नावे पण माहिती नाहीत. पूर्वीचे खेळ आता खेळता येत नाहीत किंवा सरसर झाडावरही चढता येत नाही.पूर्वी डोळ्यावर पट्टी बांधून आंधळी कोशिंबीर किंवा शिवना पाणी असे खेळ खेळले जात होते. एक जण पुढे धावायचा दुसरा त्याचे मागे धावायचा धावता धावता कोणी पडले तर रागही यायचा नाही. अशा पद्धतीने वरील ओळीतून कवयित्री प्रीतीताईनी पूर्वीच्या काळच्या मैदानी खेळांची ओळख,खेळाचे महत्व आजच्या इंटरनेटच्या काळातील विद्यार्थ्यांना करून दिली आहे.
        कवयित्री प्रीती ताईंनी चाचा नेहरू या कवितेतून चाचा नेहरूंचे कार्य त्यांचे आवडनिवड सांगितली आहे.चाचा नेहरू देशाचे पहिले पंतप्रधान असून त्यांनी स्वदेशी साठीची लढाई त्यांनी त्यांच्या कवितेतून विशद करण्याचा प्रयत्न केला आहे.

             चला मुलांनो गाऊया
             भाज्यांची नावे पाहूया 
              हिरवी हिरवी ताजी ताजी 
              आवडते मला मेथीची भाजी 
               पालक चवळी शेपू माठ 
               सांबराचा सर्वत्र थाट 
                हिरवीच दिसते शिमला मिरची
                काटवल आणतात  जिभेवर सिर्शि
               भेंडीची आहे मी खूप दर्दी 
                पांढऱ्या भोंबुड्यावर तुफान गर्दी 
                चला मुलांनो गाऊया 
                भाज्यांची नावे पाहूया....!!

              वरील कवितेतून भाज्यांची नावे कवयित्रीने नमूद केली आहेत. प्रत्येक भाजी आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहे? लहान मुलांना सर्वच भाज्या आवडत नाहीत म्हणून प्रत्येक भाजीचे महत्त्व कवितेच्या माध्यमातून प्रीती ताईने सांगितले आहे.लौकिचा रस हृदयासाठी चांगला असतो तर कारले मधुमेह आजारावर गुणकारी औषध म्हणून काम करते. सुदृढ आणि निरोगी राहायचं असेल तर सर्व बालकांनी सर्वच भाज्या खाल्ल्या पाहिजेत या उद्देशाने कवयित्री गाण्याच्या रूपाने भाज्यांचे महत्त्व विशद करतात.

             खेळ , उपक्रम, विज्ञान वही 
            आठवतात मला माझ्या बाई 
            ऑनलाईन मला आता करमत नाही 
            डोळ्यांची होते लाही लाही
            जा रे जा रे कोरोना 
            मैं तुझसे डरू ना....!!

                  विद्यार्थ्यांना जेवढी शाळा आवडते तेवढ्याच शाळेतल्या मॅडम आवडतात.एकटेपण विद्यार्थ्यांना मुळीच आवडत नाही.लॉकडाऊन काळात शाळांना टाळे बंदी झाली आणि विद्यार्थ्यांना जवळपास दोन वर्ष घरीच राहून ऑनलाईन अभ्यास करावा लागला पण विद्यार्थी ऑनलाईन अभ्यासाला नंतर खूप कंटाळून गेले होते. विद्यार्थ्यांना केंव्हा एकदा शाळा सुरू होईल आणि शाळेत जाईन असं झालं होतं विद्यार्थ्यांना शाळेतले खेळ, उपक्रम,विज्ञान वही आणि शाळेतल्या बाई आठवत होत्या.मोबाईलवर ऑनलाइन अभ्यास करून डोळ्यांची खूप आग होत होती. जा रे कोरोना. आता आम्ही तुला घाबरणार नाही असं प्रत्येकाला वाटू लागलं होतं. कवयित्री प्रीती ताईंनी बालमनाच्या वास्तवतेचं दर्शन वरील ओळीमधून करून दिली आहे.

               हिमालयाच्या उंच शिखरावर 
               फडकत आहे निशाण
               हिंद आणि अरबी सागर 
               ज्याचे करीती गुणगान 
               प्रिय आमचा भारत देश महान...

           वरील ओळीतून कवयित्री प्रीती ताईंनी हिमालयाचे व आपल्या भारत देशाचे गुणगान गायले आहे.हिमालयाच्या उंच शिखरावर आपल्या भारत देशाचे निशान डौलाने फडकते आहे. हिंद आणि अरबी सागर सुद्धा भारत देशाचे गुणगान गातात. प्रिय आमुचा भारत देश महान...भारत देशाचे महती जाणाऱ्या गंगा, यमुना, नर्मदा, कृष्णा, कावेरी इ. नद्यांच्या देखील उल्लेख वरील कवितेत करताना कवयित्री दिसून येतात. कवयित्री प्रीती जगझाप यांनी बालमनाला भावणाऱ्या अनेक कविता या बालगीतांचा खजिना या बालकाव्यसंग्रहात घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांना आवडणारा पाऊस, परी, खेळ,चाचा नेहरू, आईची माया, भाज्यांची नावे,कोरोना,इकर बिल्ला टिकर बिल्ला,आवडीचे खेळ, शाळा बंद पण शिक्षण सुरू, स्वच्छता, भारत देश महान, विद्यार्थ्यांना आवडणारा फळा, मांजराला आवडणाऱ्या लोण्याचा गोळा, सृष्टी सौंदर्य, फुलपाखरू आणि माझी शाळा अशा अनेक विद्यार्थ्यांच्या बालमनाला स्पर्श करणारा हा बालगीताचा खजिना प्रीती ताईंनी वाचकांच्या हाती दिला आहे. या बालकाव्यसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय आकर्षक व दर्जेदार असल्याने प्रत्येक कवितेनुरूप त्यात चित्र असल्याने आणखीन सुंदर आकर्षक दिसत आहे. विद्यार्थ्यांच्या बालमनाला भावणारे आहे हे सर्व वाचकांना आवडेल यात शंकाच नाही.
          प्रीती ताईच्या हातून अनेक बालकाव्यसंग्रहाची निर्मिती होवो. त्यांना पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा...!!

              बालकाव्यसंग्रह-बालगीतांचा खजिना -प्रीती जगझाप 
             प्रकाशन -समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर 
             प्रकाशक- प्रवीण भाकरे 
             मुखपृष्ठ -संतोष घोंगडे 
             प्रथम आवृत्ती 15 जून 2022 
             मूल्य -केवळ साठ रुपये 

       समीक्षिका/ लेखिका/ शिक्षिका/ कवयित्री 
      मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
       मु. पो.कोकलगाव 
       तालुका /जिल्हा- वाशिम
       मो.नंबर 9767663257

Sunday, 1 January 2023

चला मुलांनो खेळ खेळूया...खेळता खेळता वाचन शिकूया... नवोपक्रम २०२२-२३

 नवोपक्रम २०२२ - २३ 

मिनाबाई पांडुरंग नागराळे (स.अ.)

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव

तालुका जिल्हा वाशिम, केंद्र तोंडगाव.

पिन : 444505 मो.: 9767663257,7020384279

ई-मेल :- mpm1412@gmail.com


१)नवोपक्रर्माची शीर्षक :-  चला मुलांनो खेळ खेळूया !

                                    खेळता खेळता वाचन शिकूया !!


२) नवोपक्रमाची गरज व महत्त्व :- इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांचे वाचनाचा पाया पक्का करण्यासाठी व वाचन हसत खेळत शिकण्यासाठी या    नवोपक्रमाची गरज निर्माण झाली. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वाचन विकास व संख्या वाचन अचूक करता येऊ लागले.

३) उपक्रमाचे वेगळेपण :- इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांना दररोज मध्यांनोत्तर ४ ते ५ पर्यंत एक तास खेळायचा. खेळाच्या माध्यमातून वाचन विकासाचा पक्का पाया करण्यासाठी या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना हसत खेळत वाचन विकास यामध्ये भाषाज्ञान व संख्याज्ञान अशा दोन विषयांचा एकत्रित सराव खेळाच्या माध्यमातून सहज करता येतो. संख्याज्ञान अचूक करता येऊ लागते अंक वाचन तसेच दोन अंकी संख्या वाचन इत्यादी. पहिलीसाठी अक्षर ओळख, साधे शब्द, कान्याचे शब्द, ऱ्हस्व व दीर्घ उकार असलेले शब्द, वेलांटीचे शब्द, मात्रेचे शब्द ते अनुस्वारापर्यंत चौदाखडीचे वाचन सहज सोप्या पद्धतीने खेळता खेळता वाचन करता येऊ लागले. हे या नवोपक्रमाचे खास वेगळेपण आहे.                                                                        

              या नवोपक्रमामुळे भाषा बरोबरच गणित म्हणजे संख्याज्ञानाचा फायदा या उपक्रमामुळे झाला. भाषा, गणित या विषयाबरोबरच शारीरिक शिक्षण विषयाला असा तिहेरी फायदा झाला. या नवोपपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अचूक संख्या वाचन आणि शब्द वाचन खेळाच्या माध्यमातून सहज हसत खेळत आनंददायी पद्धतीने वाचन विकास व संख्याज्ञान घेता आले. हसत खेळत आनंददायी पद्धतीने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला आणि उपस्थिती वाढली.

 ४) नवोपक्रमाची उद्दिष्टे :- 

                         १) हा नवोपक्रम खेळाच्या माध्यमातून असल्याने विद्यार्थ्यांना खूप आवडू लागला त्यामुळे उपस्थिती वाढली. 

                         २) खेळाच्या माध्यमातून भाषा गणित व शारीरिक शिक्षण असा तिहेरी विषयाचा अभ्यास होऊ लागला.

                         ३) भाषाज्ञान व संख्याज्ञान विद्यार्थ्यांना अचूक होऊ लागले. 

                         ४) वाचन विकास व संख्याज्ञान प्रत्येकाची वैयक्तिक तपासता येते. 

                         ५) भाषा, गणिताबरोबरच शारीरिक शिक्षण या विषयाची गोडी निर्माण झाली.

१) नवोपक्रमाचे नियोजन :-

(१) नवोपक्रमपूर्व स्थितीचे नियोजन :- हा नवोपक्रम एक जुलै २०२२ पासून सुरू केला. यापूर्वी विद्यार्थ्यांना अक्षरे वाचायचा कंटाळा यायचा. सलग क्रमाने अक्षरे वाचायची पण मधातली अदलून बदलून अक्षरे वाचायला लावल्यास अडखळाईची. शब्द वाचन करताना सलग वाचन, शब्द वाचन सहज करता येत नव्हती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अक्षर वाचन, शब्द वाचनाचा भरपूर सराव होऊ लागला. जे विद्यार्थी वाचनात मागे आहेत त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करता येणे सहज शक्य झाले. या उपक्रमामुळे ९५% विद्यार्थ्यांना वाचन सहज आनंददायी पद्धतीने करता येऊ लागले. भाषा विकासासोबत गणित विषयाची पण तयारी करण्याची युक्ती सुचली त्याप्रमाणे गणित विषयांमध्ये संख्याज्ञान,अंक ज्ञान, पक्के करण्यासाठी या नवोपपक्रमांचा चांगला उपयोग झाला.१०० % विद्यार्थ्यांना आदलून बदलून येणारे अंक सांगता येऊ लागली. दुसरी साठी पण दोन अंकी संख्यांचा चांगला सराव घेतला. १०० % विद्यार्थी संख्या वाचू लागले. संख्याज्ञान पक्के झाले.

२) संबंधित व्यक्तीशी / तज्ञांची चर्चा :- आमच्या केंद्राला मार्गदर्शन करणारे जिल्हा शिक्षक पर प्रशिक्षण संस्थेचे साधन व्यक्ती आदरणीय पांडुरंग गवळी सरांसोबत या नवोपप्रकमा बाबत चर्चा केली असता गवळी सरांनी सखोल मार्गदर्शन केले. खेळातून आनंददायी पद्धतीने घेतलेले ज्ञान विद्यार्थ्यांना खूप आवडते. कंटाळवाण्या अभ्यासापेक्षा प्रत्यक्ष कृतीतून ते व खेळातून मिळणारे शिक्षण आनंददायी असल्याने पक्के स्मरणात राहते व विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करते.                                                                                                                                                                                     

            एकाच नवोपकर्मातून तीन विषयाचे अध्ययन होत असल्याने मार्गदर्शन / तज्ञ असलेल्या गवळी सरांना चला मुलांनो खेळ खेळूया ! खेळता खेळता वाचन शिकूया !! असा तिहेरी फायदा असणारा उपक्रम खूप आवडला या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना बौद्धिक, मानसिक व शारीरिक विकास होईल असे श्री पांडुरंग गवळी सर म्हणाले. भाषा विषयांबरोबरच शब्द वाचन व संख्याज्ञान पक्के स्मरणात ठेवण्यासाठी खेळाच्या माध्यमातून हा उपक्रम झिरो खर्चिक असल्याने गवळी सरांना खूप आवडला. भाषा व गणित या विषयाबरोबरच शारीरिक शिक्षण या विषयांचा खेळ घेता येऊ लागला. विद्यार्थ्यांना खेळ खूप आवडतो. इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी खास उपक्रम आहे. असे तज्ञ मार्गदर्शक श्री पांडुरंग गवळी सर म्हणाले.

३) आवश्यक साधनांचा विचार :- इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे अक्षरे वाचन करतायावीत यासाठी अक्षर कार्ड तयार करण्यात आली. त्याचबरोबर शब्दकार्डे आणि संख्या कार्ड तयार करण्यात आली. या अक्षर कार्डाचा उपयोग फक्त खेळा पुरताच नाहीतर वर्गात रिकाम्या फावल्या वेळातही विद्यार्थी वेगवेगळी अक्षरे जोडून त्यांचे अर्थपूर्ण वाक्य तयार करू लागली. त्यामुळे अक्षर तयार करणे आणि शब्द कार्डांचा उपयोग शब्द वाचनासाठी चांगल्या पद्धतीने होऊ लागला. संख्या कार्डामुळे विद्यार्थ्यांना संख्याची सलग वाचन न करता आधले मधले अंक सहज वाजता येऊ लागले. कोणतीही संख्या विद्यार्थी पटकन वाचू लागले. दिलेल्या अक्षर कार्डापासून तयार होणारे अनेक शब्द मुले सांगू लागली. उदा क अक्षर कार्डापासून – कर, करवत, कपाट, कणीस, कमळ, कपडे, कपिला, कपाशी, कप इत्यादी अशी अनेक शब्द सांगू लागली. त्यामुळे नकळत शब्द संपत्ती वाढण्यास मदत झाली. शब्द वाचना बरोबर अंक वाचन ही घेता येते याची कल्पना सुचली. त्यानंतर अंक कार्ड बनवून घेतली. आखलेल्या  रिंगणाभोवती अंक कार्डे  सलग व  क्रमाने न ठेवता अंक अदलून बदलून ठेवले. त्यानंतर एका विद्यार्थ्यावर डाव येईल त्या विद्यार्थ्यांनी रिंगणाभोवती हळूहळू धावायचे. खंजिरी किंवा इतर कोणतेही वस्तू वाजवायची. जेव्हा आवाज थांबला तेव्हा धावणाऱ्या विद्यार्थ्यांनीही थांबायचे. आणि ज्या कार्डाजवळ थांबेल त्या कार्डावरचे अक्षर किंवा संख्या किंवा शब्द वाचायचा या पद्धतीने पुढचे अक्षर असे सर्व अक्षर, शब्द व अंक वाचनाचा सराव खेळाच्या माध्यमातून आनंददायी पद्धतीने घेता येतो. ज्या विद्यार्थ्याला अंक, शब्द, अक्षर, ओळखता आले नाही तो विद्यार्थी त्या खेळामधून बाद होईल आणि तो विशेष उपचारासाठी पात्र ठरेल. त्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाईल. या नवोपपक्रमामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे क्षमता तपासता येते आणि प्रत्येक विद्यार्थी कुठे आहे ते समजते.

४) करावयाच्या कृतीचा क्रम :-

(१) सर्वप्रथम इयत्ता १ ली व नंतर २ री. पहिलीचे ३६ आणि २ री  २४ विद्यार्थी निवडले ६० विद्यार्थी निवडले.

(२) मैदानावर एक गोल आखून घेतला.

(३) आखून घेतलेल्या गोलाभोवती तयार केलेली अक्षर कार्डे ठेवली.

(४) इयत्ता पहिलीच्या मुलांना रांगेत बसवले. त्यातील एक विद्यार्थी खेळ खेळण्यासाठी पुढे बोलावला त्याला खेळाचे नियम समजावून सांगितले.

(५) खंजिरी वाजवत राहिले तोपर्यंत खेळ खेळणारा विद्यार्थ्यांनी पळायचे.

(६) खंजिरी चा आवाज थांबला की विद्यार्थ्यांनी पण थांबायचे.

(७) विद्यार्थी ज्या ठिकाणी थांबला तिथले अक्षर वाचायचे.

(८) बरोबर अक्षर वाचल्यास खाली बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या.

(९) तोच विद्यार्थी नंतर गोलाच्या दिशेने पळणार नंतर परत खंजिरी वाजवायची पुन्हा आवाज थांबला की विद्यार्थी थांबणार जिथे थांबला तिथले अक्षर 

     वाचायचे.

(१०) सर्व काडे वाचून झाल्यास तो विद्यार्थी उत्कृष्ट खेळला म्हणून सर्वांनी टाळ्या वाजवून स्वागत करायचे.

(११) ज्या विद्यार्थ्याला जे अक्षर ओळखता आले नाही. त्या विद्यार्थ्यांचा त्या अक्षराचा किंवा अंकाचा सराव करून घ्यायचा.

(१२) ज्या विद्यार्थ्याला अंक किंवा अक्षर ओळखता आले नाही किंवा अंक व अक्षराचे वाचन करता आले नाही तो विद्यार्थी त्या खेळातून बाद होईल. 

       त्याच्या विद्यार्थ्याला विशेष मार्गदर्शन व उपचार करायचे.

(१३) एक आठवडा अक्षरांचा खेळ घेतला.

(१४) दुसऱ्या आठवड्यात एक ते दहा पर्यंत अंक वाचन सराव घेतला.

(१५) तिसऱ्या आठवड्यात अक्षरापासून तयार होणारे साधे शब्द वाचन घेतले जसे कप, कर, कस,कट,कन,खत,गट,घर,चट, अशा दोन अक्षरी, तीन अक्षर, 

       चार अक्षरी शब्दाचे वाचन करून घ्यायचे.

(१६) चौथ्या आठवड्यात दोन अंकी संख्यांचे वाचन जसे ११ ते २० पक्के करण्यासाठी दोन आठवडे हेच वाचन करून घ्यायचे.

(१७) पाचव्या आठवड्यात इंग्रजीचे अल्फाबेट्स वाचन करून घ्यायचे.

(१८) म्हणजे मराठी, गणित, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, अशा चार प्रकारे विद्यार्थ्यांना फायदा होतो.

(१९) दुसऱ्या वर्गाला दोन अंकी संख्या वाचन त्यानंतर शब्दापासून वाक्य तयार करून सांगा असा खेळ घेऊ लागले.

(२०) तिसऱ्या वर्गाला तीन अंकी संख्या.

(२१) चौथ्या वर्गाला चार अंकी संख्या वाचन किंवा उतारा वाचन या पद्धतीने घेऊ शकतो.

(२२) या नवोपकक्रमामुळे विद्यार्थ्यांचा हसत खेळत आनंददायी पद्धतीने भाषा विकास व संख्याज्ञान, संख्यावाचन, पक्के झाले.

(२३) एका खेळाचे अनेक फायदे झाल्याचे दिसून आले.

(२४) हा खेळ विद्यार्थ्यांना खूप आवडू लागला.

(२५) हसत खेळत आनंददायी पद्धतीने वाचन व संख्या ज्ञान सोपे झाले. प्रत्येक विद्यार्थी सहज वाचन करीत असल्याने खूप समाधान वाटले.

(२६) साध्या सोप्या उपक्रमातून भाषा, गणित, इंग्रजी, सामान्यज्ञान, शारीरिकशिक्षणाच्या पाच विषयांचा विविध अंगाने सराव झाला.

(२७) प्रत्येक दिवशी नवा प्रयोग घेता येऊ लागला त्यामुळे विद्यार्थ्यांचा अधिक सराव होऊ लागला.

(२८) विद्यार्थ्यांच्या वाचनाचा वेग वाढला.

(२९) विद्यार्थ्यांचा अधिक उत्साह व आत्मविश्वास दिसू लागला.

(३०) 0 रुपये खर्च असल्याने हा नवोपक्रम खूप यशस्वी ठरला त्यामुळे खेळाच्या माध्यमातून गुणवत्ता विकास घडून आले. त्यामुळे मला एक वर्ग शिक्षिका 

        म्हणून जो आनंद झाला तो शब्दात सांगू शकत नाही. ( फोटो १,२,३,४,५ )

६) उपक्रमोत्तर स्थितीचे निरीक्षण :-

(१) विद्यार्थ्यांना सर्व अक्षरे अंक,शब्द वाचता येऊ लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.

(२) वैयक्तिक मार्गदर्शन करता येऊ लागले.

(३) कोणताही विद्यार्थी नेमका कुठे आहे ते समजले.

(४) खेळातून शिक्षण असल्याने आनंददायी शिक्षण वाटू लागले.

(५) खेळातून हसत खेळत शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली.

(६) या नवोपक्रमामुळे वाचनाची आवड निर्माण झाली.

(७) फावल्या वेळात ही विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून स्वतःच  हा खेळ खेळता खेळता शिकू लागला.

(८) या नवोपक्रमामुळे तीन ते चार विषयाचा अभ्यास घेता येणे शक्य झाले.

(९) भाषा विषयाबरोबरच अंकज्ञान, संख्यावाचन, इंग्रजीचे अल्फाबेट्स,शारीरिक शिक्षण अशा चार विषयांचा अभ्यास घेता येऊ लागला.

(१०) अक्षरे, शब्द, वाक्य, तसेच अंक नंतर दोन अंकी संख्यांचे वाचन लहान मोठा सांगता येणे अशा पद्धतीने वाचन स्तर सहज वाढवता येवू लागला.

(११) सर्व विद्यार्थ्यांना नवोपक्रम खूप आवडल्यामुळे व वाचन करता येऊ लागल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूप वाढला.

१२) लहान वर्गापासून ते मोठ्या वर्गापर्यंत या खेळामध्ये कल्पकता घेऊन क्षमता स्तर वाढवता येऊ लागला.जसे तिसरीला तीन अंकी संख्यांचे वाचन 

       चौथीला चार अंकी संख्यांचे वाचन इंग्रजी अक्षरापासून इंग्रजी शब्द सांगा स्पेलिंग सांगा इत्यादी.

१३) खेळामधून शिक्षण असल्यामुळे हा नवोपक्रम विद्यार्थ्यांच्या खूप आवडीचा ठरला.

१४) विद्यार्थ्यांमध्ये समाधीटपणा वाढलेला दिसून आला. 

१५) निर्णय क्षमता वाढलेली दिसून आली.

७) कार्यवाहीचे टप्पे :- ( वेळापत्रक )

 हा उपक्रम दररोज ४ ते ५ या वेळात घेतला जायचा. 

वर्ग १ ला (अक्षर वाचन, शब्द वाचन, अंक वाचन, इंग्रजी अल्फाबेट्स. ४ ते ५ या वेळेत.)

वर्ग २ रा (वाक्य वाचन, अक्षरा पासून शब्द तयार करून सांगा.शब्दावरून वाक्य तयार करा व दोन अंकी संख्यांचे वाचन. वेळ ३ ते ४.)

वर्ग ३ रा  (समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, तीन अंकी संख्यांचे वाचन. इत्यादी वेळ १२  ते १ )

वर्ग ४ (वाक्यप्रचाराचा अर्थ सांग, शब्दावरून गोष्ट सांग, चार अक्षरी संख्या वाच इत्यादी. वेळ ११ ते १२)

उपक्रमासाठी इतरांची मदत :-

(१) माझ्या शाळेतील माझे सहकारी शिक्षक श्री. रामकिसन वाकुडकर सर यांची खूप मदत झाली.

(२) अंक कार्ड  व अक्षर कार्ड  बनविण्यासाठी माझ्या शाळेतील सहकारी शिक्षक श्री उमेश खुळे सर यांची मदत झाली.

(३) हा नवोपक्रम घेण्यासाठी इयत्ता पहिलीचा वर्ग मॉनिटर श्रेयश काळबांडे याची मदत झाली. इयत्ता दुसरीचा विद्यार्थी समर्थ माधव लोखंडे याची मदत  

     झाली. इयत्ता तिसरीचा विद्यार्थीनी किरण राजू राऊत तर इयत्ता चौथीची विद्यार्थिनी संतोषी गोकुळ गोडघासे या विद्यार्थी ची मदत झाली.

उपक्रमासाठी सादर करावयाची पुरावे :-

१)उपक्रम घेताना चे फोटो



C:\Users\Parv\Downloads\WhatsApp Image 2022-11-17 at 14.48.42.jpegC:\Users\Parv\Downloads\WhatsApp Image 2022-11-17 at 14.48.43 (1).jpeg 










C:\Users\Parv\Downloads\WhatsApp Image 2022-11-17 at 14.48.43.jpegC:\Users\Parv\Downloads\WhatsApp Image 2022-11-17 at 14.48.41.jpegC:\Users\Parv\Downloads\WhatsApp Image 2022-11-17 at 14.48.44.jpeg


(२) उपक्रमाचे युट्युब वर अपलोड केलेले व्हिडिओची लिंक .

https://youtu.be/QSpFDuuyw_0

https://youtu.be/Tvj22L4ZXGk

https://youtu.be/8Hn1leQsy4k

https://youtu.be/B9mHEjGDXWg

https://youtu.be/Yg2s-rkLVyc

https://youtu.be/xbPGsZwyqC4

https://youtu.be/JnUigDpY_0w

नवोपक्रमाची  कार्यपद्धती :-

 १  पूर्वस्थितीचे निरीक्षणे व त्याच्या नोंदी :-

(१) पूर्वी विद्यार्थ्यांना वाचन, अंक ओळख, बोजड व कंटाळवाणे वाटायचे.

(२) विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास खूप कमी होता.

(३) अक्षर, शब्द, वाक्य, वाचायला विद्यार्थ्यांना भीती वाटायची.

(४) चार भिंतीच्या आत कोंदट कंटाळवाणे वाटायचे .

(५) शिक्षणामध्ये रस व आनंद वाटायचा नाही.

(६) प्रत्येक विषयाला विशेष प्राधान्य देता येते.

(७) भाषाज्ञान व संख्याज्ञान म्हणजे FLN पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान या नवोपपक्रमाच्या  माध्यमातून मिळाल्याने पहिलीचा पाया पक्का होण्यास मदत झाली.

(८) प्रत्येक विषयाला वेगळा स्वतंत्र वेळ दिल्याने वेळ जास्त लागायचा.

(९) या नवोपक्रम पद्धतीमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला.

(१०) तिहेरी विषयाचा अभ्यास एकाच खेळातून हसत खेळत दिल्याने विद्यार्थ्यांचा उत्सव खूप वाढला.

(११) १ ते ४ साठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

(१२) इय्यतावार क्षमता वाढवत नेह्ता येत असल्याने सर्व वर्गासाठी या नवोपक्रमाचा उपयोग घेता येतो. फक्त काठीण्य पातळी वाढवत नेण्याची गरज असते.

२)  कार्यवाही दरम्यान निरीक्षणे व माहिती संकलन :-

१) खेळाच्या माध्यमातून हा नवोपक्रम असल्याने हसत खेळत आनंददायी वाटतो.

(२) सर्व विद्यार्थी आवडीने सहभागी होऊ लागली.

(३) एकच खेळातून या नवोक्रमाद्वारे इतर भाषा,गणित, इंग्रजी, शारीरिक शिक्षण, अशा चार विषयांचा सराव होऊ लागला.

(४) पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान पक्के होऊ लागले.

(५) अक्षरे, शब्द, वाक्य, सांगण्यासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ लागली.

(६) खेळाच्या माध्यमातून हा नवोपक्रम असल्याने विद्यार्थ्यांना जास्त मनोरंजक वाटू लागला.

(७) भाषा, गणित, विषयाबरोबर शारीरिक शिक्षण विषयाची गोडी वाढली.

(८) विद्यार्थ्यांच्या शारीरिक, बौद्धिक, मानसिक विकास होऊ लागला.

(९) प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देता येऊ लागले.

(१०) अपात्र विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करता येऊ लागले.

(११) काहीच खर्च लागत नसल्याने वेळ व पैसा वाचवता येऊ लागला.

उपक्रम पूर्ण झाल्यावर निरीक्षणे व त्यांच्या नोंदी :-

(१) विद्यार्थ्यांना कोणत्याही अक्षराचे शब्दाचे संख्याचे वाचन अचूकपणे करता येऊ लागले.

(२) दोन अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द व दोन संख्या जोडून संख्या तयार होणारी संख्या सांगता येऊ लागली.

(३) खेळाच्या माध्यमातून हा नवोपक्रम असल्याने विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली.

(४) भाषा, गणित, जनरल नॉलेज, शारीरिक शिक्षण या विषयाबद्दल रुची अधिक वाढली.

(५) विद्यार्थ्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढलेला दिसून आला.

(६) शब्दावरून वाक्यरचना तयार करता येऊ लागली.

(७) विद्यार्थ्याचे जनरल नॉलेज सामान्य ज्ञान वाढले.

(८) सहज साधा सोपा उपक्रम असून पण त्याची परिणामकारकता दिसून आली.

(९) शब्दावरून वाक्य तयार करताना विचार करण्याची पातळी वाढली.

(१०) हसत खेळत पहिलीचा पाया पक्का सहज करता येऊ लागला.

कार्यवाहीत आलेल्या अडचणी :-

(१) प्रत्येक विद्यार्थ्यांची क्षमता तपासण्यासाठी शिक्षकाची कसरत वाढायची.

(२) एकाच खेळात अनेक विषयाची कार्ड सांभाळावी लागायची.

    माहितीचे विश्लेषण :-

विषय 

जुलै 

ऑगस्ट 

सप्टेंबर 

ऑक्टोबर 

नोव्हेंबर 

डिसेंबर

जानेवारी 

फेब्रुवारी 

मराठी 

अक्षर ओळख 

स्वर ओळख 

शब्द वाचन 

काना लावून शब्द वाचन 

वेलांटी  लावून शब्द वाचन

उकार व मात्रा, २ मात्रे लावून शब्द वाचन

वाक्य वाचन 

शब्दावरून वाक्य तयार करणे 

गणित 

१ ते १० पर्यंत अंक ओळख 

१ ते १० पर्यंत आंख वाचन 

तोंडी बेरीज 

११ ते २० अंक वाचन 

२१ ते ३०,

४१ ते ५० 

अंक वाचन

५१ ते ६० 

६० ते ७० 

७० ते ८० 

८० ते ९० 

९० ते १०० तोंडी वजाबाकी

एकक दशक सांगणे 

इग्रजी 

A,B,C,D,…..

अल्फाबेट 

A TO Z ओळख व वाचन

Big Letter 

abcdef

small letters ओळख 

a to z

ओळख व वाचन small letters

Small words ओळख 

I, YOU, WE, GO, TO, 

RHYME,SINGING,

DO THE ACTION


      या पद्धतीने वेगवेगळे विषयाच्या वेगवेगळ्या घटक आनंददायी पद्धतीने घेण्यात आला विद्यार्थ्यांचा उत्साह खूप वाढलेला दिसून आला या नवोपक्रमाचा खूप फायदा झाला.

६) नवोपक्रमाची यशस्विता / फलनिष्पती (उद्दिष्टानुसार) :-

१) या नवोपक्रमामुळे १०० % विद्यार्थ्यांना अक्षर ओळख, अक्षर वाचन, शब्द वाचन करता येऊ लागले 

२) खेळातून शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांना आनंददायी वाटले. 

३) यांना उपक्रमामुळे १०० % विद्यार्थ्यांना अंकज्ञान समजले प्रत्येक अंकाची अचूक वचन करू लागले. 

४) भाषा, गणित या विषयाबरोबरच इंग्रजी विषय घेतले गेल्याने इंग्रजी विषय सोपा वाटू लागला. 

५) खेळातून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांचे शारीरिक विषय वेगळे घेण्याची गरज भासली नाही. म्हणजे शारीरिक, बौद्धिक, मानसिक असा 

    विकास झाला.

६) खेळातून शिक्षण असल्याने आनंददायी हसत खेळत खेळ विद्यार्थ्यांना खूप आवडला. 

७) शब्दापासून सुरू होणारे वाक्य मुली सांगू लागली. 

८ ) वाचून सुधारले व अचूक वाचन करू लागले.

९) प्रत्येक महिन्यात नवनवीन व वेगवेगळे विषय शिकता येऊ लागले. 

१०) अक्षरे जुळवून विद्यार्थी शब्द स्वतःतयार करू लागले.

११) भाषाज्ञान पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान पक्के झाली.

१२) एकच खेळातून चार विषयाचा अभ्यास घेता आला. 

१३) विद्यार्थ्यांचा वचन स्तर वाढला. 

१४) विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास खूप वाढला. 

१५) अंकज्ञान व गणितासारखा किचकट विषय सोपा वाटू लागला. 

१६) या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढली.

१७) खेळता खेळता शिकता येऊ लागल्याने हा नवोपकर्म खूप महत्त्वाचा उपयोगही ठरला.

१८) विद्यार्थ्यांचा उत्साह वाढला. 

१९) वैयक्तिक संधी मिळाल्याने प्रतेकाकडे वैयक्तिक लक्ष देता येऊ लागले.

२०) विद्यार्थ्यांच्या क्षमता तपासणीसाठी हा नवोपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.

२१) या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला.

२२) चला मुलांनो खेळ खेळूया खेळता खेळता वाचन शिकूया ! या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना शिक्षकांना खूप फायदा झाला.

२३) विद्यार्थ्यांना खेळ खूप आवडतो खेळातून आनंददायी शिक्षण खूप आवडत असल्याने या उपक्रमामुळे उपस्थिती वाढण्यास मदत झाली.

२४) नवोपक्रम हजर खेळत असल्याने विद्यार्थ्यांचा ताण व दडपण कमी झाले.

२५) प्रत्येक इयत्ता नुसार व त्यांच्या क्षमतानुसार या नवोपक्रमातून क्षमता वाढवून हा खेळ घेता येतो.इयत्ता चौथीसाठी शब्द वाचन, उतारा वाचन, 

       अक्षरापासून शब्द तयार करणे, चार अंकी, पाच अंकी, संख्या सांगता येणे इंग्रजीचे शब्द वाचन करता येऊ लागले.

युट्युब वरील लिंक https://youtube.com/@MEENAKSHEEPNAGRALE 

७) समारोप :-(१०० शब्द )

      चला मुलांनो खेळ खेळूया खेळता खेळता वाचन शिकूया या नवोपक्रमामुळे इयत्ता १ ते ४ च्या विद्यार्थ्यांचा वाचनाचा पाया पक्का झाला खेळातून आनंददायी पद्धतीने अक्षर वाचन, शब्द वाचन, उत्तरा वाचन, अंक वाचन, संख्या वाचन, वाक्य वाचन सहज करता येऊ लागले नवोपक्रम खेळाच्या माध्यमातून असल्याने विद्यार्थ्यांना खूप आवडला प्रत्येकाच्या क्षमता तपासता येऊ लागल्या या नवोपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शारीरिक बौद्धिक मानसिक विकास झाला. चार विषयांचा अभ्यासातून व खेळातून वाचन विकास व संख्याज्ञान पक्के झाले या नवोपक्रमामुळे १०० % विद्यार्थ्यांना वाचन करता येऊ लागली. त्यामुळे उपस्थिती वाढली हा नवोपक्रम विद्यार्थ्यांना, शिक्षकांना खूप आवडला पायाभूत साक्षरता,संख्याज्ञान (FLN) विद्यार्थ्यांचे पक्के झाले. नवोपक्रम विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरला.

८) संदर्भसूची व परिशिष्टे :-  

१) जीवन शिक्षण मासिक 

२) इयत्ता पहिली, दुसरी, तिसरी, चौथीचे पाठ्यपुस्तक 

३) दिशा उपक्रमाची पुस्तक

Thursday, 8 September 2022

दररोज बोलले जाणारे १०० इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह

 दररोज बोलले जाणारे 100 इंग्रजी वाक्य मराठी अर्थासह भाग 1 




1.Are You OK ? बरा आहेस का ? ठीक आहेस का ?


2.     Welcome. स्वागत ! सुस्वागतम !


3.     Get ready. तयार हो.


4.     Sit here. इथे बस.  इथे बसा.


5.     Who? कोण?


6.     Well done! शाब्बास ! चांगले केले.


7.     He fell.तो पडला.


8.     Hold this. हे धर. हे धरा.


9.     Leave it.  ते सोड.


10.  Run! पळ.


11.  Sit down! खाली बस ! खाली बसा.


12.  Wait here. इथे थांब. इथे थांबा.


13.  Go inside. आत जा.


14.  We saw it. आम्ही ते बघितलं. आपण ते बघितलं.


15.  I won . मी जिंकलो.


16.  Who am I ? मी कोण आहे ?


17.  Wow ! वाह !


18.  What's up ? काय चाललंय ?


19.  Stand up !  ऊभे व्हा ! उभी रहा. उभा रहा.


20.  We're shy. आम्ही लाजाळू आहोत. आपण लाजाळू आहोत.


21.  They won. ते जिंकले.


22.  We won. आपण जिंकलो.आम्ही जिंकलो.


23.  We talked. आम्ही बोललो.


24.  Who is it ? कोण आहे ?


25.  Use this.  हे वापर. हे वापरा.


26.  No way ! शक्यच नाही !


27.  Who knows ? कोणास ठाऊक ? कोणाला माहीत आहे ?


28.  Get up ! ऊठ !


29.  Start now. आता सुरू करा. आता सुरू कर.


30.  I know. मला माहीत आहे.


31.  Who is he ? तो कोण आहे ?


32.  I want it. मला ते हवं आहे.


33.  I'm OK. मी ठीक आहे.


34.  Listen. ऐक.


35.  Try again. पुन्हा प्रयत्न कर. पुन्हा प्रयत्न करा.


36.  We waited. आम्ही वाट बघितली. आपण वाट बघितली.


37.  Really ? खरंच का ?


38.  Try it on. घालून बघ. घालून बघा.


39.  Thanks. धन्यवाद.


40.  Why me ? मीच का ?


41.  I lost. मी हरलो.


42.  I saw you. मी तुला बघितलं.


43.  They lied. ते खोटं बोलले.


44.  That's it. बरोबर.


45.  Ask him त्याला विचार.त्याला विचारा.


46.  Take mine. माझे घे. माझा घे.


47.  It's new.  ते नवीन आहे.


48.  Don't ask. विचारू नका. विचारू नकोस.


49.  What for ? कशासाठी ?


50.  I shouted. मी ओरडलो. मी ओरडले.


51.  Don't cry. रडू नकोस. रडू नका.


52.  They left. ते निघाले.


53.  Who came ? कोण आलं ?


54.  Take care ! काळजी घे. काळजी घ्या.


55.  Dogs bark. कुत्रे भुंकतात.


56.  They lost. ते हरले.


57.  Did I win ? मी जिंकलो का ? मी जिंकले का ?


58.  He knits. तो विणतो.


59.  Thank you. धन्यवाद.


60.  Call me. मला फोन करा. मला बोलवा.


61.  Forget me. मला विसरून जा.


62.  He came. तो आला.


63.  Sign here. इथे सही करा.इथे सही कर.


64.  Call us. आम्हाला फोन करा. आम्हाला फोन कर.


65.  Come on ! चल ! चला !


66.  Stop them. त्यांना थांबव. त्यांना थांबवा.


67.  He knows. त्याला माहीत आहे.


68.  Don't lie. खोटं बोलू नकोस. खोटं बोलू नका.


69.  Come in. आत ये.


70.  Forget it. विसरून जा.


71.  Take this. हे घे. हे घ्या.


72.  Fold it. घडी घाल.


73.  He left.  तो निघाला.


74.  Stay back. मागे राहा.


75.  She walks. ती चालते.


76.  I'm right. मी बरोबर आहे.


77.  Get out. बाहेर हो. बाहेर व्हा.


78.  I'm young. मी तरूण आहे.


79.  Call Dipak.दिपकला बोलव.


80.  Get down. खाली हो.


81.  Go home. घरी जा.


82.  Have fun. मजा कर.


83.  I'm fat. मी जाडा आहे. मी जाडी आहे.


84.  Sit there. तिथे बस.तिथे बसा.


85.  He runs. तो पळतो.


86.  He spoke. तो बोलला.


87.  Help us. आम्हाला वाचवा.आमची मदत करा.


88.  I'm ill. मी आजारी आहे.


89.  It's here. इथे आहे.


90.  Stay away. दूर रहा.


91.  It's me ! मी आहे !


92.  Let me go. मला जाऊ द्या.


93.  Let's ask. विचारू या.


94.  I’m Santosh.मी संतोष आहे.


95.  Shut up ! गप्प हो ! गप्प व्हा !


96.  She cried. ती रडली.


97.  It's OK. ठीक आहे.


98.  She tried. तिने प्रयत्न केला.


99.  Me, too. मी पण. मला पण.


100.        See below. खाली पाहा.


संकलन -मिनाक्षी पांडुरंग नागराळे