Friday, 13 May 2022

निसर्ग सौंदर्यातील अद्भुत शिल्पकलेचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे - वारसा शिल्पकलेचा

 *निसर्ग सौंदर्यातील अद्भुत शिल्पकलेचे दर्शन घडवणारे पुस्तक म्हणजे वारसा शिल्पकलेचा*

     निसर्गाची अत्यंत आवड असणारा निसर्गप्रेमी, प्रवासाची आवड,साहित्याची जाण, गायन, लेखन, प्रवास, भटकंती,गरजूंना मदत करणं, संवेदनशील हाडाचा शिक्षक, अभ्यासू व्यक्तिमत्व, चित्रपट निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे पुणे जिल्ह्यातील आमचे मानस बंधू संदीप दादा राक्षे यांचा प्रवास वर्णन असणारे पुस्तक म्हणजे 'वारसा शिल्पकलेचा'हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. तसे राक्षे दादांना गड-किल्ले, जंगल सफारी, शिल्पमंदिरे, पुरातन वास्तू इत्यादी पाहण्याचा छंद आहे. ते पाहून इतर लोकांच्या मनात ते ठिकाण पाहण्याची उत्सुकता जागृत होते. या पुस्तकातील प्रत्येक प्रवास वर्णन मी जेंव्हा फेसबूक वर पाहते. तेंव्हा खरंच दादासोबत आपणही प्रवास करतोय असं वाटते आणि कॅमेरातले चित्र पाहिले की स्वतः पाहिल्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. हे मात्र तितकेच खरे.
      वारसा शिल्पकलेचा या प्रवासवर्णन पुस्तकाचे प्रकाशन परीस पब्लिकेशन, पुणे यांनी प्रकाशित केले असून मुखपृष्ठ अतिशय देखणे नजरेत साठवून ठेवणारे सुप्रसिद्ध चित्रकार 'अरविंद शेलार' सर यांनी कोरीव अशा सुंदर शिल्प मंदिराचे रेखाटले आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १० मार्च २०२२ रोजी माननीय शरदचंद्र पवार साहेबांच्या हस्ते प्रकाशित झाली असून याचे मूल्य केवळ १८० रुपये असले तरी प्रवास वर्णन करणाऱ्या, भटकंती करणार्‍या, निसर्गप्रेमी लोकांसाठी उत्तम मार्गदर्शक ठरणारी आहे.
        सांस्कृतिक दृष्ट्या व इतिहासकालीन प्राचीन मंदिरे म्हणजे भारताचा सांस्कृतिक वारसा जपत जगाला नव्याने ओळख देणारा भारत संतांची भूमी, शूर वीरांची भूमी, समजली जाते इतर देशातील लोकं आपल्या देशात आल्यावर आपल्या भारताची माती आपल्या स्वतःच्या कपाळाला लावतात. निसर्गप्रेमी, कलाप्रेमी, शिल्पवास्तू प्रेमी असणारे संदीप दादा राक्षे यांना निरनिराळ्या शिल्पकलेची, निरनिराळ्या गड-किल्ल्यांची, भटकंती करायला, तेथील दृश्य डोळ्यात साठवायला आणि त्यावर सुंदर प्रवासवर्णन लिहायला आवडते. जणू त्यांचा युगानयुगांचा छंदच आहे. असाच छंद वाचकाला पण प्रेक्षणीय स्थळांची उत्सुकता वाढवणारा आहे. संदीप राक्षे यांनी या पुस्तकात ऐतिहासिक वास्तू, शिल्प मंदिरे, गडकिल्ले पाहत असताना प्रामुख्याने तेथील स्थळ, समाज, रूढी,परंपरा,लोक, संस्कृती यांची माहिती करून घेत पुरातन शिल्प मंदिर व स्थापत्य मंदिर यांचा सखोल अभ्यास करीत मंदिराच्या बाह्य अंगावर शिल्पित केलेल्या सुरसुंदरी, मकतोरण, जालवातायन, रंगशीला, विज्ञान, कीर्तीमुख, गजथर,देवकोष्ठ इ. कोरण्याचे प्रयोजन समजून घेऊन त्यावर लिहिण्याचा प्रयत्न संदीप राक्षे करतात. त्यामुळे वाचकाला वाचताना प्रत्यक्ष त्या ठिकाणी असल्याचा भास होतो.वारसा शिल्पकलेचा या पुस्तकात एकूण तेरा ठिकाणचे सुंदर प्रवासवर्णन मनाला भुरळ पाडणारे आहेत.
        पहिले रम्य ठिकाण म्हणजे पुण्यामधले अद्भुत त्रिशुंड गणेश मंदिर.पुण्यातील सोमवार पेठे पासून जवळच असणारे हे ठिकाण. जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर फिरवला ही पवित्र भूमी. पावन भूमी. अशा ठिकाणचे हे त्रिशुंड म्हणजे तीन सोंड असलेले गणेश मंदिर. जिथे सुवर्ण पाषाण त्रिशुंड गणेशाची शिल्प वास्तू.शिल्प या मंदिराचे एक खास आकर्षण अनेक वेगवेगळ्या शिल्पाकृती चा सुंदर नमुने या ठिकाणी पाहायला मिळतात. संदीप राक्षे यांनी फोटोसहीत छापल्याने वाचकाला प्रत्यक्ष शिल्पाकृती पहावयास मिळतात. दुसरे ठिकाण म्हणजे पेडगावचा धर्मवीर गड. तेराव्या शतकात देवगिरीच्या यादवांच्या काळात या भुईकोट किल्ल्याचे बांधकाम झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणजोबा वेरुळचे बाबाजी भोसले यांच्याकडे हा भुईकोट किल्ला देखभालीसाठी होता. मोगलांच्या ताब्यातून घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सोडवून घेतला. या किल्ल्याच्या आत उजव्या बाजूला भैरवनाथाचे मंदिर आणि त्या मंदिरावर देखणे शिल्प कोरीव काम केलेले दिसते. याच मंदिरात लक्ष्मीनारायणाची अद्भुत कलाकृती दिसते. जिथे किरणोत्सव जूनमध्ये पाहायला मिळते. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हीच वास्तू छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य स्मृती असलेले स्थळ म्हणजे धर्मवीर गड.
      तिसरे प्रेक्षणीय स्थळ म्हणजे गुप्तेश्वर. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील धारासुर गावचे गुप्तेश्वर मंदिर. मंदिराची भव्यता व शिल्पाकृती पाहून कोणीही मंत्रमुग्ध होईल यात शंकाच नाही. हे मंदिर चालुक्य काळातील अकराव्या शतकातील. या गुप्तेश्वर मंदिराचे शिखर अजूनही शाबूत दिसते. चौथे ठिकाण म्हणजे पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील कुकडेश्वर शिवालय ९१०व्या  दशकात झंझ राजाने बांधलेले कुकडेश्वर शिवालय हे मंदिर हरिश्चंद्रगडावरील शिवालय प्रति बद्रिनाथ-केदारनाथ म्हणून प्रसिद्ध आहे. पश्चिमाभिमुख असलेले हे शिवालय आतून बाहेरून अनेक शिल्पांनी नटलेली आहे. रायगड जिल्ह्यातील कोथळी गडाचा प्रवास वर्णन ऐकून मन भारावून जातं. पण गडाच्या पाय-या चढायला खूप अवघड जातं. गड चढायला लेखकाला संदीप राक्षे सरांना आईचे दूध आठवत होते. त्यात सोसाट्याचा वारा गड चढू देत नव्हता अशा परिस्थितीत द्राक्षे सरांच्या सोबत असलेली बालचमू मंडळी कशीबशी गड चढून वर जाते आणि राक्षे सर खाली धबधब्याजवळ उभे राहतात.कारण निसर्गाच्या समोर माणसाचे काही चालत नाही. धबधब्याजवळ रान हळदीची पिवळीधम्मक फुले मनाला भुरळ घालणारी आहेत. या गडावर अद्भुत आश्चर्य म्हणजे वास्तुशास्त्राचा सर्वोत्कृष्ट नमुना ठरते ठरलेली दगडी भुयार होय.
     पुढचे दैवत कोहिंडे बु.गावचा कोहिडेश्वर. पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यांमध्ये असणारे कुंडेश्वर महादेवाचे मंदिर. वनराईने नटलेले कुंडेश्वराचे डोंगर सात किलोमीटर घाटाचा रस्ता चढून मग कुंडेश्वराच्या दर्शनाला जावे लागते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे निमगिरी किल्ला. या किल्ल्यावर पूर्वीचे असे काहीच राहिले नाही. वरती फक्त छप्पर वजा मंदिर तयार केलेले आहे. त्यात गजलक्ष्मी व महादेवाची पिंड आहे पण दर्शन घेतल्यावर जी ऊर्जा मिळते ती स्वर्गसुखाचा पेक्षाही श्रेष्ठ आहे. असे संदीप राक्षे दादा सांगतात. या ठिकाणी घनदाट झाडीत ५० वीरगळी एका रांगेत आहेत.वीरगळ म्हणजे एखाद्या व्यक्तीला लढताना रणांगणावर वीरमरण तेथे त्यांच्या स्मृतीत वीरांचे दगडांच्या शिळेवर विशिष्ट प्रसंगाचे शिल्पांकन करून तो पाषाण स्तंभ स्मृती स्वरूपात जतन करणे.
   पुढचे ठिकाण आहे ओतूरच्या कपार्दिकेश्‍वराचे मंदिर. मांडवी नदीच्या तीरावर वसलेले हे तीर्थक्षेत्र पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. नव्या दशकात झंझ राजाने हे मंदिर बांधले होते .अप्रतिम शिल्पाकृती व सुंदर नक्षीकाम केल्यामुळे सभागृह अत्यंत देखणे दिसत होते. त्यानंतरचे ठिकाण म्हणजे पळशीचे विठ्ठल मंदिर. पारनेर तालुक्यातील पळशी गावचे विठ्ठल मंदिर. नागर शैलीतील बांधकाम व शिल्पकाम ज्या अठरा षटकोनी शिल्पजडित  स्तंभावर उभे आहे. शाळिग्राम दगडापासून कृष्ण अवतारात बनवलेली मूर्ती अतिशय देखणी, सुंदर रूप,कमरेवर हात, गळ्यामध्ये तुळशीचे हार, कस्तुरी-टिळाच्या आकाराची कुंडले असे मनोहारी रूप माणसाच्या काळजात साठवल्याशिवाय राहत नाही. जांबचे विष्णू मंदिर तसेच काठापुरचा वाघ वाडा डोळ्यात साठवण्याचे ठिकाण. या वाड्यात छोटी छोटी आणि सुंदर नक्षीकाम केलेली ऐतिहासिक  वास्तू आणि तिची आजच्या काळात झालेली दुरावस्था. हिंदवी स्वराज्याचे सरदार मल्हारराव होळकर यांनी हा वाडा १७५० साली बांधला होता. पानिपतच्या युद्धात सरदार संताजी वाघ यांना वीरमरण आले. त्यानंतर मल्हारराव होळकरांनी १७६५ साली सरदार संताजी वाघ यांच्या वंशजांना दिला. त्यानंतर ते आजपर्यंत हा वाडा वाघ वाडा म्हणून प्रसिद्ध आहे. इतक्या मोठ्या वैभवाची साक्ष देणारा हा वाडा आज अखेरचा श्वास घेत असल्याची खंत लेखक संदीप राक्षे व्यक्त करतात.
      पुढचे ठिकाण म्हणजे प्रसिद्ध ठिकाण आपेगाव. सूर्यदेवाचे किरण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मुखकमलावर विराजमान झाले. ना भूतो न भविष्यति असा चमत्कार लेखक संदीप राक्षे यांनी अनुभवला. पर्यावरणाची शिल्पकलेची, ऐतिहासिक, पुरातन वास्तूंची, गड किल्ल्यांची आवड असलेला हा अवलिया महाराष्ट्रातला पहिलाच आहे असं मला वाटतं. आज पर्यंत त्यांची अनेक प्रवास वर्णन व फोटो मी त्यांच्या फेसबुक पेजला पाहत होते पण आज त्यांचे पुस्तक वारसा शिल्पकलेचा हे वाचून व आतील चित्र पाहून स्वतः प्रवास केल्याचा अनुभव मला आला. खरंच शासनाने महाराष्ट्राचा अमोल ठेवा म्हणजे ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले, पुरातन मंदिरे यांचा जिर्णोध्दार  करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. हेही तितकंच खरं आहे.
          सर्वांनी आवर्जून वाचावे असे हे प्रवासवर्णन असणारे 'वारसा शिल्पकलेचा' हे पुस्तक प्रत्येक घरातील मुलांना वाचण्यास द्यावे.जेणेकरून मुलांना पुरातन वास्तूची जाण होईल. यात खूप सुंदर व सखोल माहिती आमचे माणस बंधू संदीप दादा राक्षे यांनी करून दिली आहे.
           संदीप राक्षे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७

Monday, 9 May 2022

*दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे काईमेरा*

 *दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे -काईमेरा कादंबरी*

      विदर्भाच्या मातीत जन्मलेले प्रसिद्ध लेखक संजय महल्ले यांची विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा नुकतीच वाचनात आली. २०२०-२१ साली अख्ख्या जगावर कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले होते. लाखो जीवांचे खूप हाल झाले.लाखो जीव व्हेंटिलेटरवर न ठेवल्याने मरण पावले. स्मशानापर्यंत जायला ही जागा मिळत नव्हती. असा भयानक काळ सर्वांनी अनुभवलाय.काईमेरा म्हणजे एका महाभयंकर विषाणू ची जन्म . कथा एका महाभयंकर विषाणूच्या जन्माचे रहस्य उलगडून दाखवणारे विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा
       काईमेरा या कादंबरीचे लेखक संजय महल्ले अमरावती यांनी खूप अभ्यास पूर्वक इतिहास व चीनच्या चीनच्या मानवी महत्त्वकांक्षीची , युद्धखोर नीतीची आणि मगर राष्ट्रवादाची मराठी साहित्याला ओळख करून देणारे विदर्भाच्या मातीतून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा रूप आणि आशयाच्या विविध संकेत आसन उगवलेली काईमेरा ही पहिलीच कादंबरी असावी. या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिशिंग हाऊस , अमरावती असून लेखकांचे स्वतःचे प्रकाशन आहे.याची प्रथम आवृत्ती २६ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली. या कादंबरीचे मूल्य केवळ १५० रुपये असून याचे मुखपृष्ठ कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीचे दृश्य दाखवणारे,मास्क घातलेल्या व्यक्तीचे आहे. या कादंबरीची मांडणी अत्यंत उत्कृष्ट असून प्रस्तावना प्राध्यापक राजेंद्र राऊत यांची लाभली आहे. पाठराखण डॉ. संजय लोहकरे यांची लाभली आहे. ही कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच असून ती ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
         covid-19 च्या रूपाने अत्यंत गंभीर परिणाम सर्वच देश भोगत असताना काईमेरा ही कादंबरी समस्त वैज्ञानिक जगताला डोळेसता प्रदान करते. सामरिक स्पर्धेत चीन अमेरिकेपुढे हतबल होत असतानाच शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रो.यांग महाभयंकर विषाणूचा प्रयोग करू इच्छितात. ते अमेरिकेतील प्रख्यात व विषाणूतज्ञ डॉ. डेव्हिड यांना बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनचे प्रख्यात जैवविषाणूतज्ञ डॉ.डेव्हिड यांना चीनला बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनची प्रख्यात व्हॉयरॉलॉजिस्ट डॉ.फेन देतात. पुढे कथानक जसे जसे वळण घेत जाते तसतशी वाचकाची उत्सुकता वाढत जाते.
       जगावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या चीनचा जगाला कसा धोका होऊ शकतो?  मानवी जीवन न युद्ध करता कसे संपवता येईल?  जैविकाचे शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल? याची संपूर्ण तयारी चीन देश करीत होता. याचे सखोल चित्रण या कादंबरीत आले आहे. यांत्रिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या चीन या देशाचे सुरक्षा सल्लागार प्रो.यांग यांनी कोलंबिया विद्यापीठात ऍडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लिट करीत असताना त्यांचे अमेरिकेचे मित्र डॉ. डेव्हीड यांना चीनमध्ये संशोधन करण्यासाठी बोलावतात. डेव्हिड यांनी बरीच वर्ष त्यांचा आग्रह टाळला होता.कालांतराने डेव्हिड यांच्या यांच्या एका अतिशय संशोधनाबद्दलची चर्चा प्रो.यांग यांच्या कानावर आली.काही जातीच्या वटवाघुळामुळे जिवंत मानवी शरीराला कुजवू शकतील असे महाभयंकर घातक विषाणू असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्याचा संसर्ग झाल्यास अतिशय वेगाने पसरू शकणाऱ्या या महामारीने संपूर्ण मानवी जीवन संकटात येईल. असा इशाराही त्यांनी दिला होता. या संशोधनासाठी डॉ.डेव्हिड यांनी अमेरिकाच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेतील घनदाट जंगले ही पालथी घातल्याचे प्रो.यांग यांना समजले होते.
       प्रो.यांग यांनी तायवानवर हल्ला करून तो ताब्यात घेण्यासाठी 'ऑपरेशन १००' ही गुप्त मोहीम काढली होती. या मोहिमेत जैविक शस्त्रांचा वापर गुप्तपणे करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी प्रो.यांग यांनी डॉ.डेव्हीड यांची निवड केली होती. डॉ. डेव्हिड वर अतिविश्वास असलेल्या प्रो.यांगने जैविक युद्धाची तयारी दर्शवली होती. शास्त्रज्ञ यांना सोबत घेऊन पुरोहित यांनी एक प्लॅनिंग संरक्षण मंत्र्यांना दिलं. डॉ. डेव्हिड यांनी हॉर्स शूली दोन वेगवेगळे कोरोना विषाणू संक्रमित केले. एकाच वेळी एकत्रितपणे दिले त्यामुळे दोन विषाणूच्या युतीतून जन्माला येईल तिसरा महाभयंकर स्ट्रॉंग विषाणू काईमेरा. निसर्गात कुठेही आढळून येणार नाही असा घातक विषाणू म्हणजे काईमेरा होय.
        डॉक्टर डेव्हिड यांनी महाभयंकर विषाणूची निर्मिती केली खरी पण तो महाभयंकर न ठेवता फक्त श्वसनाचा जास्त त्रास होणाऱा विषाणू तयार केला. मला फसवलं ही बातमी जेव्हा मेजर प्रो.यांग यांना सांगितलं. तेव्हा कोणाचाच विश्वास बसेना असा झाला चिनी लष्कराने तायवान विरुद्ध ऑपरेशन 100 ही गुप्त मोहीम उघडण्याची व त्यात जैविक शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी घातक विषाणूचा शोध सुरू केल्याची कुणकुण अमेरिकेला लागली होती. त्यामुळे ते ऑपरेशन फेल करण्याची जबाबदारी गुप्तहेर डॉ.डेव्हिड यांच्यावर सोपविण्यात आली. यांनी त्यांच्या स्वभाव बद्दल माहिती होते मानवी शरीर कुजणाऱ्या विषाणूची खोटी बातमी ॉक्टर डेव्हिड यांनी पसरली आणि ऑपरेशन 100 ठेवले त्याची सर्व माहिती अमेरिकेला पुरवली. एक दिवस डॉक्टर वटवाघुळ और प्रयोग करून फरार झाले जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांचा स्वतःवरच विश्‍वास बसेना त्याची मती गुंग झाली.
      दोन देशाचा महासंग्रामात एका महाभयंकर विषाणूचा जन्म होतो.तो म्हणजे काईमेरा. संजय महल्ले यांनी तिसऱ्या महायुद्धाची जैविक आणि जैविक युद्ध करू पाहणाऱ्या चीनची पोल-खोल अतिशय सविस्तरपणे, तपशिलासह, विनोदी प्रसंग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा घातकी दुरुपयोग या कादंबरीच्या रुपाने प्रकाशित केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन काईमेरा ही विज्ञान कादंबरी साहित्य क्षेत्रातील पहिलीच कादंबरी असावी....
      प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशीच विज्ञानाधारित कादंबरी म्हणजे काईमेरा 
       लेखक संजय महाले यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

 समीक्षिका /शिक्षिका/ लेखिका/ कवियित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता. जि.वाशिम
मोबाईल -9767663257

Thursday, 21 April 2022

शाळापूर्व तयारी अभियान २०२२/२३

 https://drive.google.com/file/d/1XU8u4Xjv-l0q6auWm3I6Oe4NVvX__Bfb/view?usp=drivesdk

Friday, 8 April 2022

संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी

*संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी*

      उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रसिद्ध लेखक,प्राध्यापक एम. ए. मराठी, सेट नेट, पी.एच.डी. प्राप्त प्राध्यापक डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी सर यांचा आठ ते दहा वर्षाचा संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी नुकताच वाचनात आला. डॉ. दीपक सूर्यवंशी सर हे मराठवाड्यातील नामांकित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सर्वपरिचित आहेत. प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांनी २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने रंगनाथ तिवारी या सदर विषयावरील सखोल संशोधनासाठी पी.एच.डी. बहाल केली. फक्त पदवी मिळविण्याकरिता अनेकजण संशोधन करणारे भरपूर मिळतात. पण एका लेखकाचा अभ्यास जगाला माहित व्हावा या उदात्त हेतूने दुसऱ्या लेखकावर लिहिणारे अत्यंत दुर्मिळच आहेत. लेखक प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सरांनी संशोधनाची शिस्त पाळूनही लेखकावर प्रचंड निष्ठा ठेवून अभ्यासपूर्ण संशोधनाचे कार्य केले आहे. डॉ. सूर्यवंशी सरांनी एका व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलाच आहे पण त्यांच्या साहित्यविश्वाचाही चिकित्सक अभ्यास देखील केल्याने नवीन पिढीला व्यक्ती आणि वाॾमय ग्रंथ रंगनाथ तिवारी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरला आहे.
          रंगनाथ तिवारी या ग्रंथाचे प्रकाशन अरुणा प्रकाशन लातूर यांनी केले असून या ग्रंथाची प्रथमावृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली सुंदर व सुरेख मुखपृष्ठ सरदार जाधव औरंगाबाद यांनी लेखक रंगनाथ तिवारी व त्यांचे साहित्य खूप सुंदर पणे रेखाटले आहे. या ग्रंथाला प्रस्तावना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, लातूर यांची लाभली असून पाठराखण प्रसिद्ध लेखक भास्कर चंदनशिव यांनी केली आहे. या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अनुदान देऊन सहकार्य केल्याबद्दल ग्रंथ अधिक मोलाचा ग्रंथ वाटतो. या ग्रंथाचे मूल्य केवळ ३५० रुपये असून व्यक्ती आणि वांॾमय त्यादृष्टीने अधिक तोलामोलाचा आहे. प्रत्येक चिकित्सक व अभ्यासू व्यक्तीने आवर्जून वाचावा आणि प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असावा असाच आहे.
           या ग्रंथाचा विषय असलेले रंगनाथ तिवारी हे हिंदीबरोबरच मराठीतील प्रतिभाशाली लेखक म्हणून सर्वपरिचित आहेत. १९७० ते ८० च्या दशकात त्यांनी लेखनास प्रारंभ केला. सलग तीन दशके रंगनाथ तिवारी यांनी साहित्याची सेवा अखंडपणे केली. रंगनाथ तिवारी हे मुलत: मराठीभाषिक नसले तरी त्यांनी मराठीतून विपुल प्रमाणात लिहिले पण मराठी लेखकाकडून उपेक्षितच राहिले. रंगनाथ तिवारी यांनी कथा, कादंबरी, नाटक आणि स्फुटलेखन करून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण सहा प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात रंगनाथ तिवारी यांचे व्यक्तिमत्त्व आणि वांड़मयीन प्रवास त्यांच्या जीवनाची जडणघडण अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून मुलाखत घेऊन, त्यांच्या सानिध्यात राहून सांगितली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक, पार्श्वभूमीवर त्यावर झालेले संस्कार यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती ही खऱ्या अर्थाने त्याच्या सभोवतीच्या पर्यावरणाची निर्मिती असते.
        रंगनाथ रामदयाल तिवारी यांचा जन्म २१ जानेवारी १९३३ रोजी सोलापूर येथे संस्कृती संपन्न अशा मारवाडी कुटुंबात झाला. यांचे मूळ घराणे राजस्थानातील. तेंव्हाचे राजस्थान आजच्या इतके प्रगत नव्हते. पाऊस नसल्याने शेती पिकत नव्हती. त्यामुळे रोजगाराच्या शोधात हे कुटुंब सोलापूर येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले. रंगनाथ तिवारी बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान. त्यांना वाचन, संगीत, क्रिकेट याची खूप आवड होती. रंगनाथ तिवारी यांचा पिंडच मुळात शिक्षकाचा त्यामुळे क्लार्कची नोकरी सोडून देऊन शिक्षक झाले. अभ्यासाचा व्यासंग वाढतच होता. संपल्या सुरावटी, देवगिरी, बिलावल ही रंगनाथ तिवारी यांची कादंबरी. याचबरोबर उत्तम पुरुष एक वचन, मौनाची महासभा, गुरुदेव, बेगम समरू, अनन्वय, काया, परकाया असे अनेक साहित्य प्रसिद्ध आहे. मराठी कादंबरी विश्वात मैलाचा दगड ठरलेला वज्राघात, स्वामी, श्रीमान योगी, पानिपत या ऐतिहासिक कादंबर्‍या, परंपरेतील बेगम समरू ही रंगनाथ तिवारी यांची महत्त्वाची कादंबरी बहुचर्चित कादंबरी ठरली आहे.
          डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचा वांड़मय प्रकाराची सुंदर ओळख करून दिली आहे. लेखकाने रंगनाथ तिवारी त्यांच्या कादंबरी लेखनाची प्रमुख बलस्थाने नोंदवली आहे. कथानक, वातावरण, प्रसंग निर्मिती, निवेदन शैली, पात्र, संघर्ष आणि भाषा इत्यादी घटकांच्या माध्यमातून रंगनाथ तिवारी यांच्या कादंबरी लेखनाचा व्यापक आढावा लेखकाने घेतला आहे. रंगनाथ तिवारी यांची ऐतिहासिक कादंबरी बेगम समरू यामध्ये स्त्री जीवन किती शोषित, पीडित होते. हे खूप मार्मिकपणे मांडले आहे. याशिवाय स्वधर्म, स्वसंस्कृती, हट्टी आणि स्त्रीत्वाचा अहंकार असलेली मुत्सद्दी, राजकारणी, शारीरिक भूक आणि वखवखलेली क्रूर आणि तेवढीच प्रेमातुर अशी स्त्री जीवनाची नानाविध रूपे त्यांच्या कादंबऱ्यांमधून उभी राहतात. रंगनाथ तिवारी यांच्या उत्तम पुरुष एक वचन या कादंबरीत ताई,उमा, हौसा आणि मावशी या स्त्री व्यक्तिरेखा जागीरदार यांच्या गडीतील निजाम कालीन स्त्री जीवनाचे वास्तव प्रस्तुत व्यक्तिरेखा मधून रंगनाथ तिवारींनी समर्थपणे मांडले आहे. १९४७ नंतर मराठवाड्यात रझाकारांनी धुमाकूळ घातला. त्यांचे संवेदन गर्भ चित्रण रंगनाथ तिवारीने प्रस्तुत कादंबरीतून केला आहे.
        डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचे जीवन, जीवन संघर्ष, शिक्षण त्यांची जडणघडण त्यांचे वांड़मयीन प्रेरणा, त्यांची मुल्यदृष्टी त्यांचे चौफेर व्यासंग, त्यांच्या वांड़मयीन व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व, त्यांचे कादंबरीलेखन, मराठी वाड्मयातील कादंबरीचे अनेक प्रकार, ऐतिहासिक कादंबरीचे विशेष, क्रूर राजकारण, धार्मिक जीवन, स्त्री जीवनाचे दर्शन, साहित्यातील कलाविष्कार, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे चित्रण, त्यांची कथा लिहिण्याची विविध वैशिष्ट्ये यावर सूक्ष्मपणे डॉ.प्राध्यापक दीपक सूर्यवंशी यांनी संशोधनात्मक चिकित्सा केली आहे.
       एकाच व्यक्तीवर व त्यांच्या वाड़मयीन प्रवास सर्वांसमोर मांडण्याचा कौतुकास्पद प्रवास म्हणजे रंगनाथ तिवारी हा व्यक्ती आणि वांड़मय ग्रंथ खरंच सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे. सदरील ग्रंथ वाचताना लेखक आणि दहा वर्षे केलेली चिकित्सा जाणवल्याशिवाय राहत नाही. डॉ. दीपक सूर्यवंशी सरांची लिखाण करण्याची वेगळी हातोटी या ग्रंथामध्ये दिसून येते.
        प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!

समीक्षिका/ लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम 
मो. 9767663257

Thursday, 7 April 2022

कोल्ह्याची फजिती (मजेशीर गोष्ट)

कोल्ह्याची फजिती