पुण्याचे लेखक सोपान बंदावणे यांचे चला खेळूया शिकूया हे पुस्तक नुकतेच वाचनात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर त्याचा बौद्धिक, मानसिक, शारीरिक विकास साधला तरच सर्वांगीण विकास झाला असे म्हणता येईल.soundmindin a sound body या उक्तीप्रमाणे निरोगी शरीरात निरोगी मन वास करते. आणि निरोगी शरीर ठेवायचे असेल तर खेळ फार आवश्यक आहे. खेळामुळे शरीर चपळ बनते. बुद्धी तल्लख होते आणि शरीरातील रक्ताचे रक्ताभिसरण चांगल्या पद्धतीने होते. शरीरातील स्थूलपणा नाहीसा होतो. ताजेतवाने वाटते. यासाठी मैदानी खेळ, बैठे खेळ आणि मनोरंजनात्मक खेळ खेळणे फार आवश्यक आहे.
आज प्रत्येक मूल मोबाईलच्या आहारी गेलेले दिसते. बऱ्याच मुलांना खेळ खेळायला नको पण टिव्ही कार्टून आणि मोबाईलच्या खेळांमध्ये गुंतलेली दिसतात. त्यामुळे बालकांचा चिडचिडेपणा, हट्टीपणा भयंकर वाढलेला दिसतो. लहान मुलांना mindly fresh ठेवायचे असेल तर प्रत्येक पालकांनी, शिक्षकांनी असे पुस्तक स्वतः वाचावेत व मुलांना भेट म्हणून द्यावेत. वेळात वेळ काढून किमान दररोज एक तरी खेळ मुलांसोबत खेळला पाहिजे.
लेखक सोपान बनवणे यांच्या चला खेळूया शिकूया या पुस्तकाचे प्रकाशन राज्य साधन केंद्र पुणे यांनी प्रकाशित केली आहे. याची प्रथमावृत्ती आक्टोबर २०१७ ला झाली आहे.मुखपृष्ठावर सांघिक खेळ खेळणारी मुले रेखाटली आहेत. आतील चित्र खेळा व मैदानी आकृत्यांसह आकर्षक करण्याचा प्रयत्न केला आहे.या पुस्तकाचे मुल्य फक्त शंभर रुपये जरी असले पण त्यातील खेळ विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाला चालना देणारे आहेत.
राज्य साधन केंद्र पुणे या संस्थेअंतर्गत साक्षर भारत या कार्यक्रमातील विविध पातळीवरील घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात चला खेळूया शिकूया यातील खेळाचा समावेश करण्यात आला आहे.या पुस्तकाची बांधणी अतिशय उत्कृष्ट असून पुस्तकाची मांडणी मनोरंजनात्मक खेळ,शर्यती (स्पर्धात्मक खेळ ),अभ्यास खेळ व सावलीतले खेळ या चार टप्प्यात केली आहे.मनुष्याला कोणत्याही कामात यश मिळवायचे असेल तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. याच प्रयत्नांची पायाभरणी अशा खेळातून होत असते. मुले मैदानात जिंकण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करतात. स्वतःला विसरून अधिक पुढे जायचे अधिक प्रगती करण्यासाठी धडपडतात. हीच प्रेरणा पुढे मुलांना यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते. यासाठी उदाहरण म्हणजे गल्लीगोळा मध्ये क्रिकेट खेळणारा सचिन तेंडुलकर साऱ्या जगाला माहिती आहे.त्यानेच भारताची मान जगात उंच केली. मग एखाद्या मुलांने म्हटले मला सचिन व्हायचे तर फारसे वावगे ठरणार नाही.बालपणीचे प्रयत्नच यशाच्या उंच शिखरावर नेऊन ठेवते. खेळामुळे हार-जीत चा सामना करण्याचे धाडस निर्माण होते.तेच धाडस जीवनाचा संघर्ष यश-अपयश पचवायला शिकवते. जे मुले अभ्यासात हुशार नसतात. त्यांच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. तो न्यूनगंड दूर करायचा असेल तर खेळ फार आवश्यक आहे.
शाळेमध्ये सुद्धा विद्यार्थी खेळ म्हणले की एकदम आवाज जोरात काढून टाळी वाजवून आनंद व्यक्त करतात.हुर्रर रे.. करत चेहरे उल्हासित होतात.प्रत्येक बालकाला खेळ फार आवडतात.सोपान बंदावणे सरांनी मनोरंजनात्मक खेळ लिहिलेले आहेत.त्यामध्ये राम राम पाहुणे, राम-रावण,कोंबडी व कोंबडीची पिल्ले,हम भी बाजार जायेंगे, वर्तुळाचा राजा, आज्ञापालन, वाघ-शेळी, चपळ कोण, पोलीस कोठडी, विमानतळ,चल माझ्या घरी, भारत किसका हैं| माझा भाऊ सापडला, कोळी आणि मासा इत्यादी अनेक खेळ विद्यार्थ्यांचे फक्त मनोरंजनच नाही तर त्यांचा सर्वांगीण विकास घडवणारे आहेत. आज्ञापालन या खेळांमध्ये श्रवण कौशल्य विकसित होऊन आज्ञापालनाची सवय लागेल.
काठी शर्यत,अडथळा शर्यत अशा अनेक शर्यती किंवा स्पर्धात्मक खेळ घेतल्याने मुलांचा आत्मविश्वास वाढीस लागेल. सहकाऱ्याला मदत करण्याची वृत्ती वाढीस लागेल. अडथळा शर्यती मुळे काम लक्षपूर्वक करण्याची सवय लागेल. बोगदा शर्यती मुलांची सांघिक भावना वाढीस लागेल. बटाटा शर्यतीमुळे कोणतेही काम घाईने न करता संयमाने जिंकता येते याचा अनुभव येईल. वर्तुळ युद्ध मध्ये स्वतःच्या ताकदीचा अंदाज येईल.बंडू पुढे की चेंडू पुढे या खेळामुळे झेलणे,पळणे हे कौशल्य प्राप्त होते.अभ्यास खेळामुळे वाचन विकास होईल. अभ्यासाची सवय लागेल.शब्दसंग्रह वाढवूया या खेळामुळे अध्ययन अध्यापनातला कंटाळा किंवा थकवा दूर होईल. विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह वाढेल. स्मरणशक्तीला चालना मिळेल. उलटे अंक म्हणूया या खेळामुळे स्मरणशक्ती वाढीस लागून दृढीकरण होईल.
सावलीतले खेळ यामध्ये चित्र पूर्ण करा या खेळामुळे चित्रकला सुधारण्यास मदत होईल.निरीक्षणशक्ती वाढीस लागेल. दुसऱ्यांची स्वतःची तुलना करता येईल. खाऊचा डबा या मनोरंजन मनोरंजनात्मक खेळामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळेल. लेखक सोपान बंदावणे सर यांनी लिहिलेले चला खेळूया शिकूया या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणे शक्य होईल. विद्यार्थ्यांची सर्वात प्रिय गोष्ट म्हणजे खेळ- मुलांना भरपूर खेळ खेळू दिल्याने त्यांचा शारीरिक,बौद्धिक, मानसिक विकास होईल. त्यामुळे असे पुस्तक प्रत्येक शाळेत असणे. प्रत्येक शाळेतल्या प्रत्येक शिक्षकांकडे असणे फार महत्त्वाचे आहे.
लेखक सोपान बंदावणे सरांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा..
समिक्षिका,लेखिका,शिक्षिका, कवयित्री
कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम