Sunday, 22 November 2020
अंतर्मनाला स्पर्श करणारा काव्यसंग्रह म्हणजे- अंतर्मन....
Labels:
समिक्षण
Monday, 9 November 2020
*विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य फुलविणारा बालकवितासंग्रह म्हणजे ऐसा घडवू बालक*
*विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य फुलविणारा बालकवितासंग्रह म्हणजे ऐसा घडवू बालक*
बीड जिल्ह्यातील हाडाची शिक्षिका,सावित्रीच्या विचारांचा वारसा चालवणारी, तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती उषा बप्पासाहेब ढेरे यांचा नुकताच प्रकाशित झालेला "ऐसा घडवू बालक" हा बालकवितासंग्रह माझ्या वाचनात आला.याचे प्रकाशन अजिंक्य प्रकाशन वाशिम यांनी प्रकाशित केलेला असून काव्यसंग्रहाच्या मुखपृष्ठावर नावाला साजेसे बालकांचे मॅडम समवेत असलेले छायाचित्र असून याची पहिली आवृत्ती ५ सप्टेंबर 2020 रोजी प्रकाशित झालेली असून याचे मूल्य फक्त 120 रुपये आहे. या पुस्तकाला शुभेच्छा डॉ. गोविंद नांदेडे साहेब(पूर्व शिक्षण संचालक पुणे) तसेच संदीप राक्षे (गुडमॉर्निंग मराठी चित्रपटाचे निर्माते)सरांच्या शुभेच्छा आणि कचरू चांभारे सर(मुख्याध्यापक)बीड यांची प्रस्तावना लाभली आहे.आपल्या देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक व विद्यार्थी यांचे नाते कसे असावे ? विद्यार्थ्यांमध्ये कोणती मूल्य रुजवावे ? विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आपली मुले सुसंस्कारीत घडावीत म्हणून प्रत्येक शिक्षक प्रयत्नशील असतो. कवी मनाची उषाताई संवेदनशील व मूल्यसंस्कार रुजवून चांगल्या विचारांचे खतपाणी घालून आदर्श विद्यार्थी कसे घडवावे त्यासाठी सतत धडपड करणारी आहे.त्यांच्या स्वप्नातले विद्यार्थी कसे असावेत? हे हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर समजते.
विद्यार्थ्या प्रती प्रेम, आदरभाव, संवेदनशील मन, बालमनाची पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवताना झालेली बालमनाची घालमेल, शाळेतल्या बाई म्हणजे जणूकाही मुलांची आईच, स्वच्छतेचे महत्व काव्यातून पटवून देणाऱ्या कविता खरोखरच काळजाला स्पर्शून जातात.मुळात कवयित्री खूप संवेदनशील मनाची आहे तिला सतत मुलात राहायला आणि गायला आवडतं.
मनासारखे शिक्षण मिळते
धावतच शाळेत जायचं
पुस्तक,गणवेश मोफत येथे
दुकानात कशाला जायचं ?
वेळोवेळी साहित्य मिळते
लिहाया आणि वाचाया
आई आवर गं शाळेला निघाया
बाई आल्या असतील
मुलांना शिकवाया......!!
बालवयातच इयत्ता पहिलीला शिकवायला जर बाई (शिक्षिका )असतील तर नव्याने दाखल होणारी मुले रडत नाहीत. कारण त्यांना बाई या आई सारख्याच वाटतात. कवयित्रीचे मन अगदी बालवयातच घेऊन जातं. आज ग्रामिण भागातील सर्वच पालकांचा ओढा जिल्हा परिषद शाळेकडे ओढला जातो आहे कारण तिथे मनासारखे शिक्षण मिळते. बालकांच्या मनावर ना बर्डन असते ना ताण असतो. तिथे हसत-खेळत मोफत,ज्ञानरचनावादी,शिक्षण मिळते. पुस्तक, गणवेश, शिष्यवृत्ती आणि खिचडी सुद्धा मिळते मग दुकानात कशाला जायचं? या शब्दांमध्ये कवयित्री आपलं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करते आहे. दुकानातली विविध पदार्थ खाऊन विद्यार्थी आजारी पडतात त्या काळजी पोटी कवयित्री दुकानात कशाला जायचं म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना बजावते आहे. जिल्हा परिषद शाळेत वेळोवेळी वेगवेगळे साहित्य मिळतील आणि तिथे हसत-खेळत मनोरंजनात्मक शिक्षण मिळते. त्याच बरोबर लिहायला-वाचायला शिकवले जाते .असे उशीर झालेला मुलगा शाळेच्या ओढीने आपल्या आईला काव्यातून म्हणतो आहे. हे बालपणाचे विचार अगदी बालवयातच घेऊन जाणारे आहेत.
शाळेत आपण जाऊ चला
मूल्य सारे शिकू चला
स्वच्छतेचा मंत्र आपण
मना मनात रुजवू चला...!!
मुल्यसंस्काराबरोबरच कवयित्री विद्यार्थ्यांना स्वच्छतेची कास धरायला ही आवर्जून सांगते. भारतभूमीचे गुणगान ही बाल मनावर ठसवण्याचा प्रयत्न करते. आज धावत्या युगामध्ये वृक्षतोडीमुळे जमिनीची धूप वाढली आहे. त्यामुळे निसर्गाचे चक्र कोलमडले असताना कवयित्रीने निसर्गाच्या ऋणात राहून वृक्ष संगोपन करूया रे असं म्हणत बालकांच्या मनावर वृक्ष लागवडीचे महत्व पटवले आहे. वृक्षतोडी बरोबरच पर्जन्य संपले त्यामुळे पाणी संपले हे आवर्जून सांगण्याचा प्रयत्न कवयित्री करत आहेत.
प्रत्येक मूल हे शाळेत जास्त वेळ राहते.शाळा हा मानवी विकासाचा पाया आहे.त्यामुळे शाळेतून त्याच्यावर अनेक मूल्यसंस्कार रुजवण्यासाठी मूल्यवर्धनचे महत्त्व, शाळेची गोडी,शाळेतली उपक्रम, शाळा शिकले यामुळेच आयुष्याची पायाभरणी कशी होते? शाळेत हसत खेळत शिक्षण घेतले पाहिजे तरच विद्यार्थ्याचे चैतन्य हे कायम टिकेल असेही आपल्या काव्यातून कवयित्री सांगते.
विज्ञानाची कास धरू
कष्टाचा मंत्र जपू
अभ्यासातून ज्ञान घेऊ
देशाच्या कामी येवू
भाग्यशाली आपण सारे
गौरवगाण गाऊ...!!
वरील ओळींमधून कवयित्रीने विज्ञानाची कास धरत कष्ट करण्याचा मूलमंत्र दिला आहे. तसेच अभ्यासातून प्रगती साधता येते, ज्ञान मिळवता येते, तसेच बालकांना देशाच्या कामी म्हणजेच देश रक्षणार्थाचे आव्हान देते. आपण किती भाग्यशाली आहोत.असे ताठ अभिमानाने सांगते आहे. सैनिका प्रति प्रेम,आई बापाची तळमळ, पोरगं शिकावं म्हणून विकासाचे गाणे, तो बालवयातल्या आनंद, शाळेत मुलाला नेण्यासाठी बाईंनी मारलेली हाक, पावसाचा आनंद, वृक्षारोपणाची शपथ तर महाराष्ट्र गीता ची शान आणि उषा ताईच्या स्वप्नातला बालक अशा विविध पैलूंवर प्रकाश टाकत उषेच्या प्रभात समयी प्रमाणे डोंगररांगातून उगवणार्या तेजोमयी स्वयंप्रकाशित सूर्यकिरणां सारखांच आहे. सर्व बालक,पालक,शिक्षक यांनी विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य फुलंवण्याकरता आवर्जून वाचावा असाच हा "ऐसा घडवू बालक" बालकवितासंग्रह आहे.माझी सखी कवयित्री उषाताई यांना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....
समीक्षिका, लेखिका, संपादिका,शिक्षिका, कवयित्री
कु. मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता. जि. वाशिम
Labels:
समिक्षण
Saturday, 31 October 2020
बाल स्वप्नांना गरूड भरारीची झेप घ्यायला लावणारा बालकविता संग्रह - डिझेलगाडी
*समीक्षण पुस्तक परिचय*
*बाल स्वप्नांना गरुड भरारीची झेप घ्यायला लावणारा बालकवितासंग्रह डिझेलगाडी*
प्रसिद्ध कवी शफी बोल्डेकर मु. पो. बोल्डा.तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली यांचा २०१४ साली प्रकाशित झालेला बालकवितासंग्रह डिझेलगाडी हा माझ्या वाचनात आला. हाती पुस्तक घेतल्यानंतर मी जणू बालवयातच गेल्याचा अनुभव प्रत्यक्षदर्शी आला. लहान मुलांना आवडेल असे बोलके मुखपृष्ठ त्यावर चिमुकल्यांनी एकमेकांच्या कपड्यांना धरून बनवलेली त्यांची झुक झुक गाडी आणि त्याखाली झुक झुक आगीनगाडीचे रंगीत चित्र कोवळ्या बाल मनाला स्पर्श करून जाते. प्रत्येक पृष्ठ दर्जेदार, घट्ट बांधणी, रंगीत कागद वापरून केलेले, लहान मुलांनी किती हाताळले तरी फाटायची भीती नाही अशी दर्जेदार बांधणी.
मलपृष्ठावर स्वातंत्र्यसैनिक तथा महाराष्ट्र शाहिरा अनुसयाबाई शिंदे यांच्या शुभेच्छा व आशीर्वाद अर्पण पत्रिकेवर ग्रामीण भागातले प्रभातसमयीचे चित्र, सानथोरासहित काळजाला भिडणारे, लेकरांच्या सर्व मित्रांना अर्पण केलेल्या त्या ओळी मनाला भुरळ टाकणाऱ्या आहेत. डिझेल गाडी शफी सरांचा तिसरा काव्यसंग्रह जरी असला तरी बालकविता संग्रहित करणारा पहिला बाल काव्यसंग्रह आहे.इतर विषयावर कविता करण्यामध्ये आजकाल बरेच नवीन तरुण मंडळी उतरताना दिसते आहे पण बालकविता करणाऱ्या कवींचे प्रमाण त्या मानाने कमीच त्याचे कारणही तसेच बाल कविता करणा-या कवीला अगदी बालवयातच जावे लागते लहान मुलांच्या इतकेच लहान व्हावे लागते.
डिझेलगाडी डिझेलगाडी
जोडी शहर खेडीपाडी
चला वाचूया थोडी-थोडी
स्टेशन,गावे,चौदाखडी....!!
बदलत्या काळाप्रमाणे कवीसुद्धा डिझेल गाडीचे स्वप्न रंगीत आगगाडी चे महत्व आपल्या काव्यातून सांगतो आहे. कवी हाडाचा शिक्षक असल्यामुळे बालकांच्या अंतर्मनात सहज डोकावू शकले आहेत. आगगाडी ही शहर आणि खेडी यांना जोडत जोडत व माणसं सोडत सोडत जाते. ग्रामीण भागातल्या लोकांना सुद्धा आगगाडी म्हणजेच रेल्वेचे दर्शन होते आणि प्रत्येक रेल्वे स्टेशन वर गावे,स्टेशन, इत्यादीची माहिती नकळत लोकांना होते. जुन्या काळातील आगगाडीचा संबंध कवीने आजच्या काळातील आधुनिकतेशी साधत आधुनिक युगातल्या चौदाखडीशी जोडला आहे.
एकाच कवितेतून महाराष्ट्राचे व संपूर्ण भारत देशाचे दर्शन घडविणारी ही डिझेल गाडी एकच कविता महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्याचे दर्शन घडवत आपल्या देशाची भारतीय संस्कृती, देवालय, प्रसिद्ध ठिकाणे, प्रत्येक जिल्ह्याचे आगळेवेगळे वैशिष्ट्य सांगत डिझेल गाडीच्या डब्यात प्रमाणे एकच कविता अख्ख्या भारताचे दर्शन चाळीस कडव्यात करत चोविसाव्या पृष्ठावर थांबते.
कवी शक्ती बोडेकर सरांच्या प्रत्येक ओळी मुलांना नवीन माहिती देणारी आणि बालकांच्या बालमनावर संस्कार करणारी व वाचनाची गोडी लावत चित्रासह काळजाला स्पर्श करणारी आणि आशेचे पंख लावणारी आहे.बालवयातच थोरांचे आदर्श पुढे ठेवणारी व देश प्रेमाची गोडी लावणारी आहे, गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत प्रवास लहान मुलांना घरातल्या घरात बसून भारत देशाचे भ्रमण करायला लावणारी ही एकच कविता खूप बोलकी आणि आजच्या काळातील तरुण पिढी व बालवयातील मुलांनी वाचावी अशीच प्रेरणादायी आहे.
"मराठी आमची राज्यभाषा
मुंबई राजधानी महाराष्ट्र देशा
शिवाजी छत्रपती जाणते राजे
जगात कीर्ती नाव गाजे
भोसले कुळभूषण कुळवाडी
झुक झुक झुक झुक डिझेलगाडी...!!"
वरील कडव्यामध्ये मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा असून महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे,महाराष्ट्रातले जाणते छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास अख्ख्या जगाला ठाऊक आहे.अख्या जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव गाजते आहे. असे कवी ठणकावून सांगतो आहे. सम्राट अशोका पासून ते चंद्रावर पहिले पाऊल ठेवणारा, नील आर्मस्ट्रॉंग पर्यंतचा सर्व प्रवास माहिती आपल्या काव्यातून मोती माणकासारखी उधळीत आहेत.इतकेच नाही तर कवी बाल विश्वात जाऊन इको फ्रेंडली घर बनविण्याची सुद्धा स्वप्न पाहतो आहे.
"शौचालय असावच घरोघरी
झोपायला हवी मऊ लपेडी..."
झोपायला जशी उबदार ,मऊ हवे तसेच प्रत्येकाच्या घरी शौचालय असावचं असं कवीला वाटतं. बालमनावर स्वच्छतेचे संस्कार रुजविणा-या या ओळी मनाला खूपच भावल्या.तुकारामाची गाथा, शेख महंमद यांची शिकवण, संत कबीर ते एकनाथ, दीक्षाभूमी ते बाबासाहेबांचा संघर्ष, संविधानाचे पाईक ते आग्र्याचा प्रसिद्ध ताजमहाल, स्वातंत्र्याची चळवळ ते देश प्रेमी महात्म्यांची ओळख, जय जवान ते जय किसान, जिजाबाई ते लक्ष्मीबाई, संशोधक ते संशोधना पर्यंत बालमनाच्या डिझेल गाडीतला प्रवास खरोखरच मनाला चेतना आणि प्रेरणा देणारा आहे. सर्व पालकांनी आपल्या लहान मुलांना (देशाचा खजिनाच) लपलेला हा काव्यसंग्रह आपल्या मुलांच्या हाती आवडीने द्यावा असाच आहे.
आज समाजात चित्र बदलत चालली आहे कारण जग झपाट्याने बदलत आहे.आज अवघ्या पाच-सहा वर्षापासून चि मुल इंटरनेटच्या जगामध्ये स्वतःला हरवून बसले आहे. लहान-लहान मुले पूर्वी मैदानावरचे खेळ खेळायची आज प्रत्येक मूल आई-बाबांचे बहीण किंवा भावाचे मोबाईल हातामध्ये घेऊन बसताना दिसते आहे. त्याचा शारीरिक मानसिक आणि बौद्धिक नुकसान तर होतच आहे परंतु प्रत्येक पालकांनी याला वेळीच आवर घालून सतर्क राहिले पाहिजे...बालवयातच असे अनेक बालकवितासंग्रह खरेदी करून आपल्या पाल्यांना वाचायला दिली पाहिजे.
कवी शफी बोल्डेकरांची साधी सोपी सरळ भाषा अंतर्मनाचा वेध घेत बाह्य जगाचे, देशाचे दर्शन घडवणारी आहे.संपूर्ण पुस्तकात एकच कविता डिझेल गाडीच्या डब्या प्रमाणे जसे स्टेशन बदलत जाते तसे कडवे बदलत नवनवीन माहिती देत, जगातल्या सात आश्चर्याची अभ्यास बालमनावर करणार आहे. यात ग्रामीण भागातली खेडी ते स्वातंत्र्य काळात पडलेली बेडी पर्यंत घेऊन जाते. मला तर वाटते हे पुस्तक प्रत्येक शाळेतच असायला हवे प्रत्येक शिक्षकांनी पहिलीच्या वर्गाला ही संपूर्ण कविता प्रात्यक्षिक व हावभावांनुरूप सादर केली तर परिपाठामध्ये जनरल नॉलेज घ्यायची वेळच येणार नाही. इतके भरभरून शफी सरांनी देण्याचा प्रयत्न केला आहे.
या पुस्तकाची किंमत फक्त ५०/ रुपये आहे. ती वाचक,बालक व पालक यांनी जरूर वाचावी अशीच आहे बालमनाला आशेचे स्वप्नांचे पंख लावून गरुड भरारीची झेप घ्यायला लावणारा हा बालकवितासंग्रह डिझेलगाडी आहे. कवीला पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.....
*समीक्षिका,लेखिका,शिक्षिका,संपादिका, कवयित्री*
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
तालुका जिल्हा वाशिम
९७६७६६३२५७
Labels:
समिक्षण
Friday, 23 October 2020
अपंगांचे प्रकार
♿🧬💉👂🏻👀🗣🧠👅🦵🏻🕶♿
*दिव्यांगाचे / अपंगत्वाचे 21 प्रकार*
♿🧬💉👂🏻👀🗣🧠👅🦵🏻🕶♿
*(१) पूर्णतः अंध - (Blindness)*
• दृष्टिचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टिहीन असणे,
• डोळे जन्मतः बंद असणे.
• हालचाल करताना अडचणी येतात.
*(२) अंशतः अंध - (Low Vision)*
• सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे.
• दूरचे/जवळचे कमी दिसणे.
• पुस्तकातील मजकूर पाहताना, वाचताना लिहिताना, अडचणी येतात.
• उपचार करूनही डोळ्यांना बरोबर न दिसणे.
*(३) कर्णबधिर - (Hearing Imapairment)*
• कोणताही आवाज ऐकू न येणे,
• कमी ऐकू येणे,
*(४) वाचा दोष - (Speech and Language Disability)*
• अडखळत बोलणे, स्पष्ट न बोलणे, शब्दांची तोडफोड करणे.
बोलताना शब्द मागे पुढे करणे, त्यात तारतम्य नसणे यालाच 'वाचा दोष' असे म्हणतात.
• जीभ जाड असणे, जिभेला शेंडा नसणे, तोतरे बोलणे.
टाळूला छिद्र असणे.
• clept palete.
*(५) अस्थिव्यंग -(Locomotor Disability)*
• ज्यांची हाडे ,सांधे, स्नायू हे योग्य प्रकारे कार्य करत नाही अशा मुलांना ‘अस्थिव्यंग मुले' असे
म्हणतात.
हालचाल करण्यास अक्षम.
सहज दिसणारे अपगत्व,
*(६) मानसिक आजार - (Mental Illness)*
• असामान्य किंवा अस्वाभाविक वर्तन,
• खूप कमी बोलणे किंवा खूप जास्त बोलणे.
भयानक स्वप्न पडणे.
भ्रम आभास असतो.
• कोणत्याही वस्तूला पटकन घाबरतात किंवा घाबरत नाही.
*(७) अध्ययन अक्षमता -(Learning Disability)*
• वाचन, लेखन, गणितीय क्रियांत अडचण .
आकलन करण्यास अवघड जाते.
| अंक ओळखण्यात गोंधळ, अक्षर उलटे लिहणे, शब्द गाळून वाचणे.
काही मुलांमध्ये वर्तन समस्या असतात.
• कमी संभाषण दिसून येते.
• बुध्यांक सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त राहू शकतो.
• विशिष्ट अध्ययनात अडचणी येतात.
*(८) मेंदूचा पक्षाघात - (Cerebral Palsy)*
• हालचालींवर नियंत्रण नसते.
• अवयवांमध्ये ताठरता असते.
मेंदूचा शरीरावर ताबा राहत नाही.
• हालचालीची क्षमता कमी असते.
*(९) स्वमग्न - (Autism)*
स्वतःच्याच विश्वात हरवलेले असतात.
भाषिक कौशल्य कमी विकसित झालेले असतात.
बदल न आवडणे, त्या बदलाला तात्काळ राग व्यक्त करणे.
खेळणी, वस्तू यांसोबत अधिक रमतात.
*(१०) बहुविकलांग - (Multiple Disability)*
• एक किंवा जास्त अपंगत्व असते.
• अशा ब-याच मुलांना चालताना, बोलताना, उभे राहताना, शि- श असे दैनंदिन कार्य करताना
समस्या असतात. (ADL)
*(११) कुष्ठरोग - (Leprosy Cured Persons)*
• हा सावकाश पसरणारा जिवाणूजन्य आजार आहे.
• त्वचेवर चट्टे, काळे डाग असतात.
• हात, पाय, बोटे सुन्न पडतात.
*(१२) बुटकेपणा - (Dwarfism)*
• सामान्य मुलांपेक्षा खूप कमी उंची असते.
*(१३) बौधिक अक्षमता - (Intellectual Disability)*
• बौद्धिक क्षमता(IQ) ७० पेक्षा कमी असते.
• दैनंदिन कार्य, सामाजिक कार्य, दैनंदिन व्यवहार करण्यास कठीण जाते.
• तार्किक प्रश्न सोडवताना अडचणी येतात.
• नवीन वातावरणात समायोजन करताना अडचणी येतात.
• काही मुलांना वर्तन समस्या असतात.
*(१४) मांसपेशीय क्षरण - (Mascular Disability)*
• गटागटाने मांसपेशी कमकुवत होतात .
• उभे होताना हाताचा व गुडघ्याचा आधार घ्यावा लागतो.
० मुलींपेक्षा मुलांमध्ये हा आजार जास्त असतो .
*(१५) मज्जासंस्थेचे तीव्र आजार - (Chronic Neurological Conditions)*
• मेंदूमध्ये सेंट्रल नर्व्हस सिस्टिममध्ये विकृती झाल्याने हा आजार होतो.
*(१६) मल्टिपल स्क्ले रोसिस - (Multiple sclerosis)*
. हातापायातील स्नायूमधील ताठरपणा किंवा कमजोरी संवेदनांमध्ये परिवर्तन होतो.
• स्नायूमध्ये शिथिलता येते व स्नायू काम करणे कमी करतात.
• मलमूत्र क्रियांवरील नियंत्रण कमी होते व कार्य कमी होते.
*(१७) बॅलॅसेमिया - (Thalassemia)*
• रक्ताची कमतरता
वारंवार रक्त पुरवावे लागते.
• चेहरा सुकलेला असतो.
• वजन वाढत नाही.
• श्वास घेण्यात त्रास होतो.
• वारंवार आजारी पडतात.
*(१८) अधिक रक्तस्राव - (Hemophilia)*
० हा आनुवांशिक रक्तविकार आहे.
• रक्त वाहिन्यांतील बिघाडामुळे हा रोग होतो.
• यामध्ये रक्तस्राव होतो.
• जखमा झाल्यास अधिक रक्तस्राव होतो .
• कधी कधी रक्तस्राव थांबत नाही.
• रक्तस्राव बंद न झाल्याने शरीराचा भाग फुगतो.
*(१९) सिकल सेल - (Sickle Cell Disease)*
• रक्ताचे प्रमाण कमी असणे.
रक्ताच्या कमतरतेमुळे शरीराचे अवयव अशक्त होतात.
• शरीरातील पेशींचा आकार विळ्यासारखा होतो.
• हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी होऊन थकवा जाणवतो.
*(२०) अॅसिड अॅटॅक - (Acid Attack Victim)*
• अॅसिड अॅटॅकमुळे चेहरा, हात, डोळे यांवर परिणाम होतो.
• त्वचा भाजल्यासारखी दिसते.
• चेहरा विद्रुप होतो.
*(२१) कंपवात रोग - (Parkinson's Disease)*
• डोपामिन रेणूच्या अभावामुळे रोग्याला कंप सुटतो.
• हालचाली संथ होतात, स्नायू ताठर होतात .
• वजन कमी होत जाते.
• ५० ते ६० वयाच्या दरम्यान होतो.
♿🧬💉👂🏻👀🗣🧠👅🦵🏻🕶♿
Labels:
अपंग माहिती
Saturday, 17 October 2020
Subscribe to:
Posts (Atom)