Friday, 10 July 2020

इयत्ता पहिलीचा वर्ग घेताय तर हा विडीओ नक्की पहा.....

 https://youtu.be/N0cU20weyrA

Thursday, 2 July 2020

कृषितज्ञ वसंतराव नाईक...

Date: 30 Jun 2020

*कृषीतज्ञ -वसंतराव नाईक*

   महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री व कृषीतज्ञ वसंतराव नाईक यांचा जन्म १ जुलै १९१३ मध्ये महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद या गावाजवळील गहुली या छोट्याशा खेड्यातील एका सधन शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ आडनाव राठोड असे होते.परंतु त्यांचे आजोबा चतुरसिंग राठोड यांनी गहुली खेडे वसविले होते. पुढे ते बंजारा समाजाचे नाईक म्हणजेच पुढारी झाले. चतुरसिंग यांचा मुलगा फुलसिंग यांना राजूसिंग व हाजूसिंग अशी दोन मुले झाली.  हाजूसिंग छोटे बाबा या नावाने प्रसिद्ध होते. पुढे त्यांना वसंतराव हे नाव पडले. वसंतराव नाईक म्हणून ओळखले गेले .वसंतरावांचे प्राथमिक शिक्षण हे खेड्यात झाले. पुढील शिक्षण अमरावतीमध्ये घेऊन नागपूरच्या मॉरीस कॉलेजमधून पदवी घेतली व नंतर एल. एल. बी.ही पदवी मिळवली. विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांची छाप पडली होती.
       १९४३-४७ मध्ये पुसद कृषी मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले १९४६ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. १९४६ मध्ये पुसदच्या नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.१९५२-५६ मध्ये पहिल्या निवडणुकीत ते मध्यप्रदेश राज्यात महसूल खात्याचे उपमंत्री झाले. १९५६ नंतर राज्य पुनर्रचनेनंतर विदर्भ व मराठवाडा हे प्रदेश मुंबईच्या द्विभाषिक राज्यात समाविष्ट झाल्यानंतर वसंतराव यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात १९५७ मध्ये कृषिमंत्री झाले. १९६० मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर ते प्रथम महसूल मंत्री होते. पण कन्नमरावांच्या मृत्यूनंतर ते बहुमताने १९६३ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.या पदावर त्यांनी बारा वर्षे काम केले या काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक सुधारणा केल्या.
                प्रथमत: त्यांनी कृषिविषयक समस्या हाताळून धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल? याकडे लक्ष दिले. रोजगार हमी योजना याचे बरेचसे श्रेय वसंतरावांना जाते.नव्या शेती तंत्राला चालना देण्यात आली, संकरित बी बियाणे वाटप बरोबरच, पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमेला प्रोत्साहन देण्यात आले, पशुपालन, कुक्कुटपालन उद्योगाला प्रोत्साहन देण्यात आले,कृषी विद्यापीठाची स्थापना, कृषिमालाच्या भावावर नियंत्रण, एकाधिकार धान्य खरेदी,शेतीमालाला किंमत ई.यासाठी धोरण आखण्यात आले. दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी स्वतः फाशी जाईन असे त्यांनी १९६५ मध्ये सांगितले. त्यांचा प्रशासकीय दृष्टिकोन खूप व्यवहारी होता. शेतीविषयक त्यांना तळमळ होती. दारूच्या हातभट्ट्यांना आळा घालण्याचा प्रयत्न केला. कोणतीही समस्या ते विचार विनिमय करून सोडवत. त्यांना शेती व शिक्षण या दोन गोष्टीत लक्ष घालून अनेक सुधारणा केल्या विशेषत: पाझर तलाव व वसंत बंधारा त्याच्या निर्मितीचे श्रेय त्यांना जाते 20 फेब्रुवारी १९७५ रोजी शंकरराव चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन, मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज व सवलती देण्यात आल्या. शेतीक्षेत्रातील वसंतराव नाईक यांचे योगदान अतुलनीय आहे. एक यशस्वी मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द सदैव स्मरणात राहणार आहे. वसंतराव नाईक यांच्या कार्याला मानाचा मुजरा... 
विनम्र अभिवादन...


लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथमिक शाळा
कोकलगाव
ता.जि.वाशिम.

Monday, 22 June 2020

फक्त पाच दिवसांत केल्या १०० ऑनलाईन टेस्ट... उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुहाचा अनोखा उपक्रम...

Date: 17 May 2020

    *राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहाचा अनोखा उपक्रम*

*फक्त पाच दिवसात केल्या शंभर ऑनलाइन चित्ररूप टेस्टची निर्मिती*

       सध्या करणामुळे राज्यात "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या धर्तीवर राज्यातले अनेक टेक्नोसॅव्ही शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी वर्क फ्रॉम होम साठी ऑनलाईन धडे देत आहेत. घरी रहा सुरक्षित रहा या अनुषंगाने "राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका" समूहाने त्यांच्या समूहात वेगवेगळ्या कार्यशाळा आयोजित करुन तंत्रस्नेही बनण्यासाठी प्रयत्न करत एक अनोखा विक्रम शिक्षिका भगिनींनी करून दाखवला आहे.
          तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज असल्यामुळे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची जिद्द मनात ठेवणाऱ्या उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका व समूह प्रशिका कुमारी मीनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम यांनी या समूहात एका हप्त्यात एक कार्यशाळा ठेवून समूहातील शिक्षिकांना तंत्रज्ञानाचे धडे देत त्यांना तंत्रज्ञान अवगत करून देण्याची संधी निर्माण करुन दिली आहे.
         उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहाची निर्मिती २०१७ मध्ये झालेली असून आजपर्यंत या समूहावर अनेक उपक्रम व अनेक कार्यशाळा घेण्यात आलेले आहेत.यामध्ये लॉकडाऊन पिरेडमध्ये या महिन्यातली *पहिली कार्यशाळा* ४ मे २०२० ला ब्लेंड कॉलेज ॲप द्वारे शैक्षणिक साहित्य निर्मिती कशी करायची? याचे तज्ञ मार्गदर्शन समूहाच्या समूह प्रशासिका कु. मीनाक्षी नागराळे, वाशिम यांनी ऑनलाइन कार्यशाळा घेतली. त्यात समूहातील सर्व शिक्षिका भगिनीने आवडीने सहभागी होत प्रतिसाद नोंदवून साहित्याद्वारे म्हणी,कोडी ,समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, बेरीज,वजाबाकी, गुणाकार, भागाकार इत्यादीचे उदाहरणे तयार करून ही साहित्य तयार करून त्याची पीडीएफ बनवून ती फ्लीप बुकसाठी शेअर करून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पर्यंत पालकांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
          *दुसरी कार्यशाळा* -दुसरी कार्यशाळा समूहात दिनांक ११ मे २०२० रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत जळगावच्या तंत्रस्नेही शिक्षिका श्रीमती सोनाली मधुकर साळुंके यांनी घेतली आहे. त्यांनी गुगल फॉर्मवर चित्रांचा वापर करून ऑनलाईन टेस्ट कशी तयार करायची? याची कार्यशाळा खूप छान पद्धतीने घेतली त्यामुळे समूहातील अनेक जिल्ह्यातील शिक्षिका भगिनींना सहभागी होता आले. आणि प्रत्येकीने एक नमुना चाचणी तयार करून दाखवली.समूह प्रशासिका कु.मिनाक्षी  नागराळे यांनी श्रीमती सोनाली साळुंखे यांचे आभार मानले.
         "अवघे होऊ तंत्रस्नेही" या उक्तीप्रमाणे बघता-बघता समूहातील सर्व शिक्षिका भगिनींना नवनिर्मितीचा आनंद मिळाला. व अवघ्या पाच दिवसात एकूण शंभर चाचण्या तयार करून एक अनोखा उपक्रम करून दाखवला आहे. या उपक्रमामुळे केंद्रप्रमुख नामदेव सरदार सर वाशिम यांनी सर्व शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले आहे. आतापर्यंत या चाचण्या राज्यातल्या हजारो विद्यार्थ्यांनी सोडवल्या आहेत. चाचणी सोडवल्यानंतर क्षणातच रिझल्ट पाहता येतो. किती गुण मिळाले ? हे विद्यार्थ्यांना पटकन दिसत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा "work from home" ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पालकांना समाधान वाटत आहे.

तिसरी कार्यशाळा-सुचिता कुलकर्णी जालना या तज्ञ मार्गदर्शक म्हणून दिनांक १८/५/२०२० ला फ्लीप बुक तयार करण्याची कार्यशाळा घेणार आहेत.

    फक्त पाच दिवसात १०० चाचण्या तयार करण्यासाठी राज्यातल्या अनेक तंत्रस्नेही शिक्षिकांनी पुढाकार घेऊन या अनोखा उपक्रमांमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यामध्ये मीनाक्षी नागराळे वाशिम (समुह प्रशासिका) सोनाली साळुंखे जळगाव,सुचिता कुलकर्णी जालना, उषा ढेरे बीड, शीला अनासपुरे, माधवी सातूनकर, प्रतिभा पगारे, टेंकाळे ए.ए., रेणुका काटकर,जया कुलथे, प्रिति  रामढवे,भावना पाटील, मनीषा सोळसे, अनिता जाधव, सुनिता जाधव, अर्चना वैद्य, सुनीता पवार,योगिता लोखंडे, साधना पवार,राणी जगदाळे,ज्योती परदेशी,आशा कोवे, उज्वला फटांगरे,वंदना देवकर, हेमलता यादव, अर्चना पवळे, आम्रपाली दातार, नेहा मांडवगडे, चंदा ढोले, जयश्री भड, गायत्री शिंदे, आम्रपाली गडदणे, नेहा मांडवगडे, शोभा दळवी, संगीता तांबे, वैशाली यादव, नीता मनवर,सुवर्णा पाटोळे,योगिता लोखंडे, मेघा जाधव, श्री.नामदेव सरदार (केंद्रप्रमुख) नारायण काळबांडे (स.शि)
      यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून हा अनोखा उपक्रम पूर्णत्वास नेला आहे.या उपक्रमाचे सर्व पालक वर्गातून खुप कौतुक होत आहे. सर्वात जास्त पश्चिम महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी जास्त ऑनलाईन टेस्ट सोडवल्याचा रिस्पॉन्स पाहायला मिळत आहे.

     *लेखिका, कवयित्री, शििक्षिका,समुह प्रशासिका*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
(उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुह)

सावित्रीच्या ख-या वारसदार...

 *सावित्रीच्या खऱ्या वारसदार*

कार्येषु दासी करणेषु मंत्री
रुपेषु लक्ष्मी क्षमाया धरित्री
भोज्येषु माता शयनेषु रभ्भा
षटकर्मयुक्ता कुलधर्मपत्नी
    कार्यप्रसंगात मंत्री, गृह कार्यात दासी भोजन बनवताना माता, रती प्रसंगात  रंभा, लक्ष्मीच्या रूपात धर्मकार्यासाठी अनुकूल क्षमा करताना धरतीप्रमाणे असे स्त्रियांचे वर्णन संस्कृत पुराणात केलेले आहे. पण आता एकविसाव्या शतकात याहीपुढे जाऊन स्त्रिया प्रत्येक क्षेत्र काबीज करण्याचा प्रयत्न करत आहेत.अगदी आकाशाला सुद्धा गवसणी घातली आहे. अशाच आहेत आमच्या उपक्रमशील व तंत्रस्नेही समूहाच्या शिक्षिका. शाळेत जाऊन फक्त मुलांना शिकविणे एवढेच आपले काम नसून, आपल्या पुढे असणारे चिमुकले बालक हे या देशाचे आधारस्तंभ आहेत असा विचार करून त्यांना घडवण्यासाठी त्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. सतत नावीन्याचा ध्यास आणि माझ्यातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना कसे देता येईल याचा विचार त्या करतात. गेली दोन महिने मी या व्हाट्सअप समूहाला  जोडले गेले यातील प्रत्येक शिक्षिके मध्ये वेगळेपण दडले आहे.
         समूह प्रशासिका आहेत कु. मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे ज्या स्वतः उपक्रमशील शिक्षिका सोबतच उत्तम कवयित्री, लेखिका व तंत्रस्नेही सुद्धा आहेत. त्यांची अनेक पुस्तके व कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कोरोना काळात त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या क्रांतिकारकांच्या जीवनावर 'थोर क्रांतिकारक' नावाचे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये असे क्रांतिकारक की जे समाज व शासनाकडून उपेक्षित राहिले आहेत, अशांची नोंद त्यांनी या पुस्तकात घेतली आहे. तसेच हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी शिवाजी महाराजांसोबत आपल्या सर्वस्वाचे बलिदान करणारे मावळे यांच्या जीवनावर 'स्वराज्याचे मावळे' नावाचा काव्यसंग्रह त्यांनी लिहिला या काव्यसंग्रहाची महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. स्वराज्यातील मावळ्यांच्या जीवनावर अशा प्रकारचा हा पहिलाच ऐतिहासिक काव्यसंग्रह आहे. अनेक पुरस्कारांनी त्या सन्मानित झालेल्या आहेत. 
  
 14 मे पासून त्यांच्या मार्गदर्शनात समूहातील इतर शिक्षिका यांनी मिळून अनेक कार्यशाळा घेतल्या आहेत. 'जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे 
शहाणे करूनी सोडावे सकलजन'
या उक्तीप्रमाणे या सर्व शिक्षिका इतर मैत्रिणींना आपल्या जवळचे ज्ञान वाटण्याचे काम करतात. यामध्ये

1ब्लेंड कोलाज-मीनाक्षी नागराळे

2 ऑनलाइन टेस्ट तयार करणे-सोनाली साळुंखे

3 फ्लिप बुक तयार करणे-सुचिता कुलकर्णी

4 पोस्टर तयार करणे गायत्री शिंदे

5 पीडीएफ तयार करणे-सोनाली साळुंखे

6 फेसबुक वरील व्हिडीओ डाऊनलोड करणे-सुनीता पवार

7 लोगो तयार करणे-मीनाक्षी नागराळे
अशाप्रकारे विविध विषयावरील सात कार्यशाळा त्यांनी घेतल्या. लॅाकडाऊन मुळे सर्व मंडळी घरात बसून कंटाळले आहेत पण या सर्व शिक्षिका रोज नवनवीन शिकतात व शिकवतात. कार्यशाळेची वेळ तीन ते पाच च्या दरम्यान ठेवतात म्हणजेच घरातील सर्व कामे आटोपून यांना कार्यशाळेला हजर होता येईल. प्रत्येकीच्या   मागे घरातील भरपूर काम आहे. सुट्टी असल्यामुळे सर्व मंडळी घरी, विविध पदार्थ बनवून सर्वांना खाण्यासाठी देणे ,कामवाल्या बाया बंद असल्यामुळे घरातील सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे. हे सर्व करून उरलेल्या वेळेमध्ये काही तरी नवीन शिकण्याचा ध्यास खरंच कौतुकास्पद आहे. कार्यशाळेच्या नंतर दोन-तीन दिवसातच त्या कार्यशाळेत झालेल्या विषयावर एक स्पर्धा आयोजित करतात. नंतर दोन-तीन दिवसांमध्ये त्या स्पर्धेचा निकाल जाहीर करणे, सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तिपत्रके देणे हे सर्व नियोजन करण्यासाठी त्यांचा कितीतरी वेळ यासाठी त्या खर्ची घालतात.सर्वजणी ठरलेल्या वेळी ऑनलाईन येऊन प्रशस्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम सुद्धा पार पाडतात. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे नियोजित करतात. सर्वांचे टाळ्या वाजून स्वागत करतात. सावित्रीचा फोटो गृप वर टाकतात.लगेच फोटोला हार घालतात. सर्वजणी टाळ्या वाजवतात प्रथम, द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या सखीला पेढा किंवा स्वीट पदार्थ पाठवतात. हे सर्व पाहताना मला फार मज्जा वाटते. किती उत्साहाने  करतात हे सर्व. याबरोबरच उन्हाळाभर रोज विद्यार्थ्यांचा ऑनलाईन क्लास घेणे व होमवर्क देणे हे काम सुद्धा त्यांचे सुरूच आहे गुगल फॉर्म वर अनेक टेस्ट सोडवायला त्यांनी दिलेले आहेत. होमवर्क पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोबाईल वरच व सन्मानचिन्ह सुद्धा पाठवतात.म्हणजे स्वतः सतत बिझी व विद्यार्थ्यांनाही सतत बिझी ठेवतात. यापैकी अनेक शिक्षिकांचे युट्युब चॅनल सुद्धा आहेत स्वतःच्या शाळेचे ब्लॉग सुद्धा त्यांनी बनवलेले आहेत, भरपूर व नवनवीन  उपक्रम राबवतात. बऱ्याच शिक्षिका लेखिका, कवयित्री व विविध पदावर कार्यरत आहेत. आतापर्यंत स्त्रियांबद्दल ची लोकांची धारणा होती की स्त्रियाच स्त्रियांना मागे ओढतात पण हे चुकीचं आहे. सावित्रीबाई फुले यांनी ज्या उदात्त हेतूने मुलींच्या शिक्षणासाठी  सर्वस्व अर्पण केले, त्याचे सार्थक होत आहे असे वाटते. शिक्षकांच्या तुलनेत शिक्षिका या जास्त प्रयत्नशील व कृतीशील आहेत सतत नवनवीन प्रयोग करणे ज्ञानरचनावाद, हसत खेळत शिक्षण, या ना त्या मार्गाने विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी त्या प्रयत्न करतात .ज्याप्रमाणे आई ही पहिली गुरु असते त्याप्रमाणे शिक्षिका गुरु आणि आई अशा दोन्ही भूमिका निभावत असतात व विद्यार्थ्यांना परिपूर्ण करतात. या समूहातील शिक्षका महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातील आहेत. सांगली, सातारा, सोलापूर, जळगाव नाशिक ,अमरावती, वाशिम अशा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या सर्व शिक्षिका एकत्र येऊन आपल्या ज्ञानाचा वसा एकमेकींना देत  आहेत हेच तर अपेक्षित होते सावित्रीबाईंना.

'हमे भी हवा के साथ चलना आ गया
हमे भी रुख बदल ना आ गया
हमे जो ठोकर लगी रस्ते मे
जमाने को संभलना आ गया
रहो होशियार अब दरिया की मॊजो
किनारो को भी उछलना आ गया'
मैत्रिणींनो सलाम तुमच्या कार्याला.

*सौ.हर्षा अविनाश पसारकर*
*प्राचार्य विठाबाई पसारकर विद्यामंदिर केकत उमरा*
*जि .वाशिम*

Saturday, 13 June 2020

My logo