Monday, 3 September 2018

स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा....

*स्पर्धेसाठी*

*विषय-स्त्रीशक्ती जागर जाणिवांचा*

*मुक्तछंद*

होय मीच स्त्री जी पडद्याआडून पदरेच्या आड अबलापणाच सावट धरून बसलेली..
नव्हीच एवढी हिंमत माझ्यात म्हणून सारं सारं उघड्या डोळ्यांनी पहात राहिलेली...
सासू सास-याचा मार आणि गलिच्छ शिव्यांचा भडीमार  सोसत आलेली...
डोळ्यांतले अश्रू पदराने दारामागे पुसत धुमसत असलेली...✒
पण ....बस्स

आता मी तसलं काहीच करत बसणार नाही
आणि उघड्या डोळ्यांनी अन्याय सहनही
करत बसणार नाही....
मी सावित्रीची लेक...आता अन्याय सहन करणार नाही..
आणि जिद्दीला पेटून चार भिंती फक्त चुल आणि मुल ही व्याख्याच बदलून टाकणारी...✒

मी सावित्रीच्या ज्ञानाबिंदूचे अमृत पिऊन
आकाश कवेत घेणारी...
मुक्ता साळवे सारखी शिकून स्वचं अस्तित्व जपत जपत स्वावलंबी बननारी...
बंदने माझी मीच मुक्त करून दाही दिशा
उड्डाण करणारी....✒

अत्याचार,अन्यायाला अजिबात थारा न देणारी जशी माॅ जिजाऊ होती...
तिचेच आदर्श जपत काळासोबत,विज्ञानाचा
हातात हात घालून चालणारी....
देवभोळी मी नव्हतीच खरी पण मला
त्यात ही लोटलं जायचं....
स्वतःसाठी नव्हे पण मला ते इतरांसाठी करावं
लागायचं....✒

पण माझी श्रद्धा खरी आहे...आणि ती मीही
मनापासून जपणारी ....
पण खरा आणि खोटा...साधू आणि ढोंगी यातला फरक समजून घेत चालणारी....
सोडून दिलीत सारी बंधने आणि तोडून दिलेत
सारे मानवाने निर्माण केलेले पाश...
आज मीच मोकळे केलंत माझ्याचसाठी हे
सुंदर,मोकळे आकाश...✒

मासिकपाळी ती तर नैसर्गिक कृती
पण तिलाही मंदीर प्रवेश नाकारणारी
पण पाहिलं का कोणी खरंच तीचं
निर्मळ मन गंगेसारखी पवित्र असणारी...
जो पुरूष निर्मितीची खाण स्त्री देवाचं खरं
दर्शन म्हणजे स्त्री असणारी....✒

जिच्या कुशीत राहतो जीव नऊ महिने
नऊ दिवस...घेतलास श्वास गर्भात
तरीही स्वहित सतत जपणारी...
वासनांध नजरेचा नजरा चुकवणारी...
स्वतःला स्वतःचं अस्तित्व दाखवून देणारी...✒

*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*ता.जि.वाशिम*

Friday, 27 July 2018

निरजा काव्य प्रकार

*निरजा काव्य प्रकार*

*विषय-निर्भय मन*

शाळा शिकून झाले
   निर्भय मन
     सावित्री
     ज्योतिबा
   नमन तुम्हां
धन्य जीवन झाले ...१

निर्भय मन माझे
    शोधते सत्य
      विश्वास
       मैत्री
   मांडते मत
ओळखून मन तुझे....२

सावित्रीने वसा घेतला
   केले स्वतःचे
      निर्भय
        मन
   उपसले कष्ट
दिप ज्ञानाचा पेटला....३

कधी हरली नाही
  जीवनाचे वाटे
      निर्भय
        मन
    करून मुलीस
शिकवणी हटवली नाही....४

लढत राहिली निकराने
   उत्साह माऊलीचा
       निर्भय
        मन
    करून ध्येय
गाठले स्व हिंमतीने.....५

ज्योतीबाचा साऊला आधार
    काढल्या शाळा
      निर्भय
      मन
   ठेवून केले
घेतली नाही माघार.....६

ज्योतीने ज्योत पेटवीली
    पहिली शिक्षिका
      निर्भय
       मन
   करून साऊने
लेकींना सा-या शिकवीली....७

*कवयित्री-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*

✍✍✍✍✍✍✍©®

Sunday, 15 April 2018

माझी कविता...निष्पाप बळी

            *निरजा काव्य प्रकार*

            *निष्पाप बळी*

मानवाच्या वाईट सवयी
     करतात वापर
        प्लॅस्टीक
         कॅरीबॅगचा
    आणि बळी
पडतात निष्पाप गायी....

मुक्या जनावरांना वाचवा
    पशुधन खरे
         धन
          गायीचे
       महत्त्व तुला
कधी कळेल मानवा....

कसलाच अधिकार नाही
    तुम्हाला प्लॅस्टीकचा
            वापर
            करून
      इतरांचा जीव
धोक्यात घालू नाही....

पशुपक्षी,निसर्ग,प्राणी
        हेच खरे
           धन
           नका
        करू तुम्ही
प्राण्यांना मारून हानी....

कधी कळेल तुला
    बुध्दजीवी माणसां
          नको
           करू
    -हास निसर्गाचा
होईल पश्चात्ताप तुला...

वापर प्लॅस्टीकचा टाळा..
         वाचवून करा
              समृद्ध
              मानवी
     आरोग्य जीवना
घाला प्रदुषणाला आळा...

चला संस्कृती जपूया...
       प्राण्यांना वाचवूया
          कमी
           करून
     प्लॅस्टीकचा वापर
भारत प्रदुषणमुक्त करूया....

गोमातेचे रक्षण करूया
      संस्कृतीची जपूया
            करून
              पूजन
     सर्व गोमातेला
सन्मानाने वाचवू या....

*कवयित्री:-मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*

           

Friday, 13 April 2018

बदली

*कवयित्री:-मिनाताई पांडुरंग नागराळे*
  
         *बदली*

बदलीच काय घेवून बसलात
बदली तर होणारच ....!
आंतरजिल्हा असो की जिल्हांर्गत
ती तर होणारच....!
              *बदली तर होणारच*

संवर्ग 1 चे शिक्षक
पाहिजे तसं करणारच...!
संवर्ग 2 चे पतीपत्नी
30 कि.मी च्या आत रहाणारच...!
                 *बदली तर होणारच*

संवर्ग 3 चे अवघडवाले
सोप्या क्षेत्रात येणारच...
संवर्ग 4 वाल्यांना
जिथं देईल तिथे जाणारच....
            *बदली तर होणारच*

ऑनलाईन होवोत की
ऑफलाईन बदली तर होणारच...!
भ्रष्टाचारांना आळा मात्र
नक्की बसणारच...!
               *बदली तर होणारच*

आंतरजिल्हा बदलीमध्ये
कुणी अगोदर तर
कुणी नंतर जाणारच
राहिले ते वेटींगवर राहणारच
               *बदली तर होणारच*

100% बदल्या शासन करणारच
बदली तर होणारच....!

*कवयित्री:-मिनाताई पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा.सुकळी*
*ता.जि.वाशिम*

Monday, 9 April 2018

लेक वाचवा

*काव्यांजली काव्य प्रकार*

         *लेक वाचवा*

नका मारू
   गर्भ मुलीचा पोटात...
     जीव घोटतात...
        पालक...

कोवळ्या कळ्या
   खुलण्याआधी खुडू नका
       रडू नका...
         शेवटी...

लेकच खरी
   मायेची उबदार चादर
      करा आदर...
        मुलीचा...

लेक लाडकी
    आई आणि बाबाची
        मैत्रिणी ताईची
           आजोबाची...

लेकच असते
   खरा अखंड जिव्हाळा
      लाविते लळा..
         सर्वांना...

आजची लेक
    उद्याची सून होणार...
       सोडून जाणार...
          सासरी...

लेकही असते
   अंश आई बाबांचा...
       घोटता लेकीचा
             जीव...

मुलीची रूपे
    आठवा जनहो सारी..
       जगात नारी..
         श्रेष्ठ

नारीमुळेच मानवा
   जन्म तुला लाभला
      जप गर्भातला
         जीव...

शेवटी मानवा
    ठेव एकच ध्यानी
        जन्म स्त्रीतूनी
            तुझा...

लेक शिकवा
    लेकी सा-या वाचवा...
       मुलींना शिकवा..
          खूप...

नका करू
   हत्या मुलींची गर्भात
       येऊदे जगात
          आनंदाने

घराची पणती
   मुलगी असते खरी
     दोन्ही घरी
      सांभाळुन.

*कवयित्री:-मिनाताई पांडुरंग नागराळे*
*जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी*
*ता.जि.वाशिम*