Sunday, 13 September 2020

इयत्ता दुसरी चे सर्व शैक्षणिक व्हिडिओ

https://www.youtube.com/channel/UCdtynqk0JCDVMpQk6PRRn9w

*शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी वरील लिंक ला टच करून चॅनल सबस्क्राइब करून ठेवा....*

🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*इयत्ता दुसरी चे भाषा विषयाचे सर्व व्हिडिओ*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

🎯 *फरक ओळखुया*👇
https://youtu.be/-JLXQwjeAmE

🎯 *चतुर हिराबाई*👇

https://youtu.be/xpCogRKUwUE

🎯 *चंपकला शाबासकी मिळाली.*

https://youtu.be/OKDb1t2gLH4

🎯 *पाऊसफुले*👇

https://youtu.be/-o8SRyFbQ4c

🎯 *वडेश बहरला*👇

https://youtu.be/Y7bMCys2PJ4

🎯 *भाज्यांचे भांडण,आजीचे जेवण*

https://youtu.be/1nYYg18ef3c

🎯 *मी आहे असा*

https://youtu.be/anhQbZPoixs

🎯 *चिंटू रूसला, चिंटू हसला*

https://youtu.be/lFgjWy_wbv8

🎯 *झरीपाडा*

https://youtu.be/tINfNjqHFfY

🎯 *दिनदर्शिका*

https://youtu.be/zygqp-uNKZ4

🎯 *संगणकाची करामत*

https://youtu.be/SH0rVSnStiY

*इयत्ता दुसरी चे सर्व पाठ एकत्रितपणे पाहण्यासाठी पालकांच्या समुहावर पाठवा....*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Tuesday, 8 September 2020

वडेश बहरला... इयत्ता दुसरी...

 https://youtu.be/Y7bMCys2PJ4


शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी माझे YouTube channel सबस्क्राईब करायला विसरू नका....


Saturday, 5 September 2020

जातीय विषमतेवर प्रहार करणारी- मुक्ता साळवे"

मुक्ता साळवे यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन....

"जातीय विषमतेवर प्रहार करणारी- मुक्ता साळवे"

सावित्री ज्योतिबांच्या शाळेतील पहिली दलित विद्यार्थिनी...

          शिक्षणरत्न महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीआई फुले यांच्या शाळेतील पहिली विद्यार्थिनी मुक्ता साळवे मातंग समाजातील लहुजी साळवे यांची नात म्हणजे मुक्ता साळवे होय. मुक्ता साळवे यांचा जन्म ५ सप्टेंबर १८४३ मध्ये झाला.गंज पेठेत वास्तव्यास असणारी अवघ्या दहा- अकरा वर्षाची मुक्ताबाई ज्योती सावित्री च्या शाळेत १८४८ मध्ये दाखल झाली. ही घटना ऐतिहासिक ठरली. कारण मुक्ताबाई चा जन्म अस्पृश्य म्हणून हिणवल्या जाणाऱ्या जातीत झाला.अस्पृश्य समाजातील एक मुलगी ज्ञान संपादनासाठी सत्यशोधकांच्या शाळेत प्रवेश करते आणि नुसती मुळाक्षरे गिरवून आकडेमोड करून न थांबता सर्वांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे पहिले सत्यशोधक निबंध लिहून उगवत्या बुद्धिजीवी वर्गाची भागीदार बनते. ही एक ऐतिहासिक व क्रांतिकारी गोष्ट आहे.
            मुक्ता साळवे यांनी लिहिलेला निबंध जातिव्यवस्थेने लादलेल्या दुःखाबद्दल, समाजव्यवस्थेने लादलेल्या स्थानाबद्दल, तर स्पृश्य-अस्पृश्यतेवर प्रहार करणारीआहे. सत्यशोधक संस्कारामुळे मुक्ताला इतिहास, धर्म,संस्कृती, याकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन मिळाला. १८५५ मध्ये ज्ञानोदय च्या अंकात १५ फेब्रुवारी व १ मार्च च्या अंकात तिचा निबंध प्रसिद्ध झाला. या निबंधातून मुक्ताची सत्यशोधक लेखन शैली व विचारपद्धती प्रतीत होते.मुक्ताने तिच्या निबंधातून स्त्रियांचे दुःख, दलितांच्या होणाऱ्या कत्तली याबद्दलचे विवेचन मांडले. आहे मुक्ता साळवे म्हणजे विषमतेवर प्रहार करणारी धाडसी वृत्तीची स्त्री... त्या निबंधात लिहितात ब्राम्हण लोकं म्हणतात कि इतर जातीने वेद वाचू नयेत.याचा अर्थ आम्हास धर्मपुस्तक नाही मग आम्ही धर्म रहित आहोत का ? तर हे भगवान आम्हाला आमचा धर्म कोणता ते सांग?
             शिक्षणामुळे आत्मभान आलेल्या मुक्ताने आपल्या ज्ञाती बांधवांना शिक्षण घेण्याचे आव्हान या निबंधात केले होते.मुक्ता साळवे पुढे म्हणतात अहो दारिद्र्य आणि पडलेले मांग महार लोकंहो तुम्ही रोगी आहात तर तुमच्या बुद्धीला ज्ञानरूप औषध द्या म्हणजे तुम्ही चांगले ज्ञानी होऊन तुमच्या मनातील कल्पना जाऊन तुम्ही नीतिमान व्हाल. रात्रंदिवस तुमच्या ज्या जनावरांप्रमाणे हज-या घेतात त्या बंद होतील.तर आता उठून अभ्यास करा.दलित जातीवरील गुन्हेगारीच्या शिक्षक या विषयी बोलणारी मुक्ता ही सर्वात पहिली स्त्री ठरते अवघ्या तेरा चॏदा वर्षाची मुक्ता डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा निबंध लिहून विषमतेविरुद्ध प्रहार करते. अवघ्या दीड पानाच्या लेखनात तिने जाती, पुरूषसत्ताक समाजातील शोषणाचे धागेदोरे उलगडून दाखविले. सत्यशोधकी बना हे तिच्या निबंधाचे वैशिष्ट्य आहे. ज्ञानाचे सार्वत्रीकरण झाल्याशिवाय खरेखुरे समाज परिवर्तन होऊ शकत नाही. हे मुक्ताने जाणले होते. आपल्या समाजाला आजार झाला आहे. म्हणून ज्ञानरूपी रगुट्टी दिली पाहिजे असे उपायही मुक्ताने सुचवले आहेत.
          १३,१५ वर्षे वयाच्या मातंग समाजातील या विद्यार्थिनीने निबंध लिहिला व सदर निबंध तत्कालीन वृत्तपत्रांतूनही प्रसिद्ध झाला होता. इंग्रज सरकार मधील मेजर कँडी यांनी सण १८५५ मध्ये मुक्ताचा पुण्यात सत्कार केला होता. या निबंधात मेजर कँडी यांनी महागडे चॉकलेट आणले होते. मुक्ताने नम्रपणे चॉकलेट स्वीकारण्यास नकार दिली व म्हणाली sir please " give us good books  not chocolate's  धर्माचा किडा वळवळ करणाऱ्या लोकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. धर्मचिकित्सेचे धाडस दाखवत, सामाजिक विषमता, महिलांचे शोषण, याविरुद्ध निबंधातून आवाज उठवला आहे. आज एकविसाव्या शतकातही ऑनर किलिंग, बलात्कार, जाती-धर्माच्या नावावर होणारी हिंसा अशा अनेक घटना घडत असताना मुक्ता साळवे यांची आठवण झाल्यावाचून राहत नाही.
     अशा धाडसी सत्यशोधक लिखाण करणाऱ्या व पहिली निबंधकार असणाऱ्या मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....

*लेखिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे*
ता.जि.वाशिम....

Friday, 17 July 2020

आत्महत्या नको... जगायला शिका... वैचारिक लेख

उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी नागराळे यांची लॉक डाऊन काळात भरीव कामगिरी....



उपक्रमशील शिक्षिका मिनाक्षी नागराळे  यांची लॉकडाऊन काळात भरीव कामगिरी

लॉकडाऊनमधील हिरो
मीनाक्षी नागराळे

प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी शिक्षकांना अपार मेहनत घ्यावी लागते. प्राथमिक शिक्षणाचा बेस पक्का झाल्यानंतर तो विद्यार्थी भविष्यात कुठेच मागे राहत नाही. त्यामुळे प्राथमिक शाळांचे शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी प्रचंड कष्ट घेतात. मात्र,  यातही काही शिक्षकांचे कार्य ठळकपणे दिसून पडते. ज्या शाळा आदर्शवत ठरतात,  त्या शाळांच्या आदर्शत्वामागे त्या शाळेतील शिक्षकांचे असणारे योगदान कुणीही नाकारू शकत नाही. अशाच एक  आदर्श शिक्षिका आहेत की,  ज्यांनी ज्या ज्या  शाळांवर ज्ञानदान केले,  त्या शाळांचे रुपडे बदलण्यासह विद्यार्थ्यांनाही सुसंस्कारित करून सोडले आहे. एवढेच काय तर प्राथमिक शाळेतील मुलांचा एक बालकाव्यसंग्रह सुद्धा प्रकाशित केला. विद्यार्थ्यांसाठी अविरत काहीतरी करण्याचा ध्यास घेतलेल्या ह्या शिक्षिकेने लॉकडाऊन काळातील वेळही सत्कर्मी लावला आणि आपल्या शाळेच्या भिंतींना बोलके करून शाळेचे रूपडे पालटवले.  तसेच आपल्यासारख्याच राज्यभरातील शिक्षिकांना नव्या तंत्रज्ञानाची जोड देत “ई ” शिक्षणाचे ऑनलाईन प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले. लॉकडाऊन काळातील प्रत्येक दिवस आपल्या शैक्षणिक कार्यास समर्पित करून त्यांनी भरीव कामगिरी केली आहे.  मीनाक्षी पांडुरंग नागराळे असे त्यांचे नाव.

वाशिम तालुक्यातील आणि विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असणार्‍या कोकलगाव या गावातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या सहाय्यक शिक्षिका आहेत. त्यांचे मूळ गाव लातूर असले तरी, त्यांच्या  नोकरीची सुरुवातच वाशिम जिल्ह्यातून झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी दगड आणि शेणाचा मारा सहन करून मुलींना शिक्षित केल्याची घटनाच नागराळे मॅडमची प्रेरणा असल्याने त्यांनी नोकरीच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचे ठरविले होते. त्या १४ वर्षांपूर्वी सध्या कार्यरत असलेल्या कोकलगावच्या जिल्हा परिषद शाळेत पहिल्यांदा रुजू झाल्या होत्या. तेथे चार वर्षे ज्ञानदान केल्यानंतर त्यांची वाशिम तालुक्यातीलच सुकळी या गावात बदली झाली. सुकळी येथील जिल्हा परिषद शाळेत रुजू झाल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन इतर शिक्षकांच्या मदतीसह लोकसहभागातून या गावची शाळा डिजिटल केली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रचंड मेहनत घेतल्याने त्यांचे विद्यार्थी ठळकपणे झळकत होते. आपल्या कवयित्रीपणा आणि साहित्यकलेच्या प्रभावामुळे त्यांचे तिसरी,  चौथीतील विद्यार्थीही काव्यरचना करते झाले होते. त्यांच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या रचनांचा आणि बालविद्यार्थ्यांचा पहिलावहिला बालकाव्यसंग्रह “उमलती फुले” हा ग्रंथ प्रकाशित करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी याच शाळेत पार पाडले. तब्बल नऊ वर्षे सुकळी या गावात ज्ञानदान केल्यानंतर गतवर्षी त्यांची पुन्हा सुरुवातीच्या शाळेत म्हणजेच कोकलगाव येथील जि. प. शाळेत बदली झाली.

येथे आल्यानंतर त्यांना या शाळेची दुरावस्था तसेच गावकऱ्यांची शाळेबद्दल असलेली अनास्था स्वस्थ बसू देत नव्हती. या शाळेला अत्याधुनिक करत आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन पालकांनी या शाळेत आपली मुले टाकण्यासाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी पाऊल उचलले, पुढाकार घेतला. त्यानंतर गावातील शिक्षणप्रेमींना प्रोत्साहित करण्याचे काम सुरू केले.  म्हणतात ना, “इच्छा तेथे प्राप्ती” या उक्तीनुसार नागराळे मॅडमच्या शाळेसंदर्भातील तळमळीमुळे गावातील शिक्षणप्रेमी युवकांनी या शाळेकडे विशेष लक्ष घालून गावात शाळा बचाव समितीच्या माध्यमातून काही पैसा उभा केला. आणि शाळेच्या रंगरंगोटी ला सुरुवात झाली. त्यानंतर कळकट मळकट दिसणार्‍या शाळेच्या भिंती सुंदर रेखाटन चित्रांनी खुलून दिसू लागल्या. अश्याप्रकारे  या शाळेचे रुपडे बदलण्याच्या कामाला गती येताच कोरोना या  महामारीचा राज्यात शिरकाव झाला आणि लॉकडाऊन सुरू झाले. मात्र, नागराळे मॅडम यांनी  पुढाकार घेत सुरू केलेले शाळेच्या रंगरंगोटीचे काम सुरूच ठेवले.  आणि महिना दोन महिन्यात शाळेला एक नवा आयाम दिला.  पेंटिंग काम करणाऱ्या पेंटरला योग्य मार्गदर्शन करून शाळेच्या प्रत्येक भिंतीला बोलके केले, आणि लॉकडाऊन काळातही आपले कर्तव्य चोखपणे बजावले.
तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देण्यासाठी पालकांचा “माझी जि प शाळा” हा व्हाट्स अँप ग्रुप तयार केला आणि शैक्षणिक बाबींची माहिती देत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे कार्य सुरू ठेवले. जे आजही अव्याहतपणे सुरू आहे. एप्रिल महिन्यात
त्यांनी तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन मुलांना कसे शिकवावे . याचे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यभरातील शिक्षिकांचा “राज्यस्तरीय उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका” हा व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. स्वतः ॲडमिन होऊन त्यांनी राज्यभरातील शिक्षिकांना सहभागी करून घेत एप्रिल आणि मे महिन्यात प्रत्येकी चार वेळा ऑनलाइन तंत्रस्नेही कार्यशाळा घेतली. या माध्यमातून "ई"  शैक्षणिक साहित्य निर्मिती, ऑनलाईन चाचण्या कशा करणे, क्लिप बुक चा वापर, व्हिडिओ निर्मिती अशा विविध प्रकारांचे ऑनलाईन प्रशिक्षण त्यांनी  दिले. या कार्यशाळेत सहभागीतांची स्पर्धा घेत त्यांनी प्रमाणपत्रेही दिलीत. नागराळे मॅडम यांनी यापूर्वीही आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देतांनाचे शेकडो प्रकारचे विविध उपक्रमशील व्हिडिओ  आपल्या यु ट्युब  चॅनल प्रकाशित केले आहेत. त्यांचे “मीनाक्षी पी नागराळे” या नावाचे यूट्यूब चॅनल असून या चॅनल वर त्यांनी संगितमय पाढे म्हणतांनाचा  विद्यार्थ्यांचा टाकलेला व्हिडिओ तब्बल ३३  लाख लोकांनी आजवर पाहिला आहे. हा "यु ट्युब"  क्षेत्रातील विक्रमच म्हणता येईल. या व्हिडिओ मुळे त्यांचे नावलौकिक संपूर्ण राज्यभर आहे.
त्या कवी आणि साहित्यिक सुद्धा आहेत. आजवर त्यांची चिमणी पाखरे, उमलती फुले, आणि स्वराज्याचे मावळे हे काव्यसंग्रह प्रकाशित असून थोर क्रांतिकारक आणि माणुसकीचा झरा हे दोन ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांना कवी म्हणून तीन पुरस्कार तर आदर्श शिक्षिका म्हणून १८ पुरस्कार मिळाले आहेत. ऑनलाइन स्पर्धेतील प्रमाणपत्र तर १ हजार  च्याही वर त्यांना मिळाली आहेत. लॉकडाऊन काळात त्यांनी शाळेच्या भौतिक सुविधा, शिक्षिकांची ऑनलाईन तंत्रस्नेही कार्यशाळा घेण्यासह विविध विषयांवर ३० लेख प्रकाशित केले आहेत. अशाप्रकारे शिक्षण क्षेत्रात अत्युच्च आदर्श ठरणारे कार्य नागराळे मॅडम यांच्या हातून होत आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या कार्याची प्रेरणा त्यांनी घेतल्यामुळे विद्यार्थीच नव्हे तर एक संस्कारक्षम पिढी घडविण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.

नागराळे मॅडम यांचे वडील शेतकरी होते. त्यांना दोन भाऊ आहेत. त्यांचे दहावीचे शिक्षण झाल्यानंतरच त्यांचे लग्न झाले होते. मात्र, विवाहानंतर अवघ्या चार वर्षांनंतरच त्यांच्या पतींचे निधन झाले होते. त्यावेळी त्यांना एक मुलगा झाला. पतीच्या निधनानंतर त्यांनी खचून न जाता आपल्या मुलाला वडिलांकडे ठेवून बारावीचे शिक्षण घेऊन नंतर डी एड पूर्ण केले. आणि शिक्षकाच्या नोकरीसाठी त्या पात्र ठरल्या. पुढे त्यांनी शिक्षकी नोकरी करतांनाच एम ए ची पदवी प्राप्त केली. आज त्यांचा मुलगा वैभव हा बी ए एम एस हे डॉक्टरकिचे शिक्षण घेत आहे. त्याला पुढे एम डी करण्यासह एम पी एस सी किंवा यु पी एस सी ची तयारी करून  अधिकारी बनविण्याचा त्यांचा मानस आहे. अशाप्रकारे उद्भवलेल्या परिस्थितीला तोंड देत एक आदर्श शिक्षिका म्हणून आपल्या कार्याचा आमिप ठसा उमटविनाऱ्या  मीनाक्षी नागराळे मॅडम यांचे शैक्षणिक क्षेत्रातील कार्य वाखाणण्याजोगे असून कौतुकास पात्र ठरणारे आहे. त्यांच्या या एकूणच कार्यासह त्यांनी लॉकडाऊन काळात केलेल्या विशेष कार्याची आम्ही प्रकर्षाने दखल घेतली आहे. त्यांचे हे कार्य आमच्या “लॉकडाऊनमधील हिरो” या सदरासाठी पात्र ठरले असले तरी त्यांना आम्ही महिला भगिनी  या नात्याने “लॉकडाऊनमधील हीरोईन” म्हणून संबोधत आहोत. त्यांच्या या एकूणच कार्यास आम्ही “दै. सिटीन्यूज सुपरफास्ट” च्या वतीने मानाचा मुजरा करत आहोत. सॅल्युट करत आहोत.

गजानन धामणे
मुक्त पत्रकार, वाशिम...