Sunday, 31 May 2020

*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*

 Date: 30 May 2020

*दानशूर,कर्तृत्वान,कुशल,राज्यकर्ती धाडसी स्त्री-अहिल्याबाई होळकर*

      इतिहासाच्या पानांमध्ये एक सुवर्णाक्षरी पान म्हणजे दानशूर,कर्तुत्वान आणि कुशल राज्यकर्ती स्त्री म्हणजे अहिल्याबाई होळकर होय.त्यांचा जन्म ३१ मे १७२५ अहमदनगर जिल्ह्यातील चौंढी या छोट्याशा गावात झाला.धनगर समाजात जन्माला आलेल्या अहिल्याबाई चे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचा मुलगा खंडेरावाशी झाला. त्यांना दोन अपत्ये झाली. मुलगा मालेराव व मुक्ताबाई ही कन्या... खंडेराव यांचा कुंभारी येथे लढाईत मृत्‍यू झाला. अहिल्याबाईंना वयाच्या २८ व्या वर्षी वैधव्याला  सामोरे जावे लागले.प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण सासरे मल्हारराव होळकरांनी "प्रजाहितासाठी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य तुम्हाला सांभाळायची आहे" असे म्हणल्यामुळे त्यांचा मान राखला व राज्यकारभारावर आपले लक्ष केंद्रित केले.मल्हाराव ज्यावेळी मोहिमेवर जात तेव्हा अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोखपणे राखीत असत.
          मल्हाराव होळकर यांना पेशव्याने इंदूर संस्थानाची जहागिरी दिली होती.दौलतीचा कारभार मोठा होता पण १७६६ मध्ये मल्हाररावांचे निधन झाले.त्यामुळे आलेल्या अहिल्याबाईवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली. पुढे २८ वर्षे राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालविला.अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. बाई काय राज्य कारभार करणार ⇨ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. अशी शंका घेणाऱ्यात त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता. राघोबादादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकावण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले.
        अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबादादास कळविले. राघोबांना ते अडचणीचे झाले. हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी ⇨ शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली. त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला. अशा रीतीने आहिल्याबाईंच्या लौकिकात आणखीच भर पडली.
अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकीक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लाविला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही. हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी कृतीही तशीच केली. यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला.
            अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली; मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले. पाटील-कुळकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भीलकवडी नावाचा कर वसूल करीत. तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला. त्यांच्याकडून पडिक जमिनींची लागवड करून घेतली. शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली. जमीन करार-पट्ट्याने देण्याची पद्धत सुरू केली.
             राजधानी इंदूरहून नर्मदातीरी महेश्‍वरला हलविली (१७७२). तिथे अनेक वास्तू बांधल्या. राजवाड्यात प्रशस्त देवघर होते. नदीला घाट बांधले. मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या. महेश्‍वरहे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते. बाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले, कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागाची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीदिली. होळकरांच्या टांकसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत.त्यांच्या धर्मपरायणतेला प्रांत मर्यादा नव्हती. त्यामुळे त्यांचे नाव आसेतू हिमाचल घेतले जाते. त्यांनी अन्नछत्रे उघडली, राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या. उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया, धर्मशाळा, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या.जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या. पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली. सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम-वैद्य नेमले. स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी, कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या. मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता. गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत, कपडे वाटत, थंडीच्या दिवसात घोंगड्या वाटल्या जात.
        आहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषतः अयोध्या, नाशिक, द्वारका, पुष्कर, हृषीकेश, जेजुरी, पंढरपूर, गया, उदेपूर, चौंढी येथे मंदिरे बांधली. यांशिवाय सोरटी सोमनाथ, ओंकारेश्वर,मल्लिकार्जुन, औंढानागनाथ, काशीविश्वेश्वर, विष्णुपाद, महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार केला.वाराणसी, प्रयाग, पुणतांबे, चौंढी, नाशिक, जांब (इंदूर), त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर, उज्जयिनी, रामेश्‍वर, भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली. सप्तपुरे-चार धामेया ठिकाणी घाट, बाग, मंदिरे, कुंडे, धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली. शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री, इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली.
        अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता. त्यात निर्णयसिंधू, द्रोणपर्व, ज्ञानेश्‍वरी, मथुरा माहात्म्य, मुहूर्त चिंतामणी, वाल्मिकी रामायण, पद्मपुराण, श्रावणमास माहात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या. विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मानसन्मान दिला जाई. मोरापंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर-सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले.अखेरच्या दिवसांत त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले. त्यांचे दोन भाऊ वारले. मुलीचा मुलगा नाथ्याबा ऐन तारुण्यात गेला (१७९०), तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसान झाले. त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली.अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव याने १७९२ मध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला. तेव्हा तरुणासही लाजवील अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला. त्यांच्या राज्यात सुबत्ता, संपन्नता व शांती होती. त्या अजातशत्रू होत्या; पण राज्यावर गुदरलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले.
मध्यम उंचीची, सावळ्या वर्णाची, डोईवर पदर घेतलेली ही स्त्रीकर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती, हे त्यांचे आयुष्यच सांगते.महेश्वर येथे वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
      अशा महान कर्तबगार धाडसी स्त्रीव्यक्तीमत्वाला मानाचा मुजरा... विनम्र अभिवादन....

लेखिका/कवयित्री
©️®️कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम...

उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समूहातील तंत्रस्नेही शिक्षिकांनी तयार केलेलीऑनलाइन चाचणी सिरीयल भाग 3

 *उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
 
🌹 *भाग ३*🌹

*उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची चाचणी सिरीयल... work from home ....*
 
🌹 *भाग ३*🌹

*101) योगिता लोखंडे*

https://forms.gle/u4VrADzJQwd1uydo7

*102)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/k7hgoswsNXFLAVL26

*103)गायत्री शिंदे*

https://forms.gle/zVNdzcYbxtWaD1G69

*104)उषा ढेरे, बीड*

https://forms.gle/Cp4VNfuKrQ5JSLXs6

*105)Urmila Lasurkar https://forms.gle/atf4bEro7Nya1Vn5A


*106)https://forms.gle/uAgvd6iGnEWtAKPm8

*107)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/wurYoWwGtKX1HiyS8

*108) मिनाक्षी नागराळे वाशिम*

https://forms.gle/wy2qvaz9KXqJffD57

*109) चंदा श्रीराम वानखडे वाशिम https://forms.gle/nWLsquaLuFHbDYLP8

*110)उषा ढेरे बीड*

https://forms.gle/G279rxnB4CTR5aBh7


*111) मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/kwgUdfgYr9JMVRH19

*112)भावना पाटील*
https://forms.gle/ZPTVZCeGAwHbNpLy6

*113)प्रतिभा पगारे*
 
https://forms.gle/dxEcpb2vfPeEpMEn6

*114)हेमा यादव*
https://forms.gle/bgCNdRvjA9JYKX7f9


*115) साधना पवार*
https://forms.gle/u8zJCgfwqCNKXABE6

*116) मीनाक्षी नागराळे, वाशिम*
 *वासाची किंमत-इयत्ता-३री*

https://forms.gle/5vZPYTfG4czUCecy8

*117)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/sgAPLpKfCer4Ry12A

*118) *सोनाली साळुंखे,जळगाव* 
https://forms.gle/YUpaQ2k5A8PtH1jQ6

*119)*हेमा यादव*
https://forms.gle/xKZaKY8A6NmbQqWu8

*120)https://docs.google.com/forms/d/16EKbmJ9hKnxKpGB-54Gk-pH_MUmR_mlMBMTBmUcWJd8/edit संगीता किसन तांबे मुंबई


*121)श्रीमती आम्रपाली टेंकाळे,हिंगोली
https://forms.gle/k8K2gauoA2v4fPbY7


*122)कु.अर्चना वैद्य वाशिम
https://forms.gle/9xRffgr2FPu8cHwg9


*123) मिनाक्षी नागराळे, वाशिम*
http://online.fliphtml5.com/kspr/duyf/

*124)मेघा जाधव, वाशिम*
https://forms.gle/fBB2twBrb7v5EEon8
*125)  मेघा जाधव,वाशिम https://forms.gle/PhTNpVt8riRqhkEP8                 
 *126)देशमुख शोभाताई अहमदनगर* 
 https://forms.gle/bPj2NFCY16NmRgLw7

*127) मिनाक्षी नागराळे वाशिम*

https://forms.gle/iZFnHFbAwUpvL5Kp8

*128)https://forms.gle/q8Z9fkyRSyRLrMWn7
*योगिता लोखंडे जळगाव*

*129)https://forms.gle/PJyq4Ak8QL4YiPvM9
*अनुपमा अरुणकुमार यादव*

*130)https://forms.gle/TmfRb3mhDG2ECtsY6देशमुख शोभाताई अहमदनगर 

*131)उज्ज्वला फटांगरे 
https://docs.google.com/forms/d/1XgrU5-XUb36jB8fz6O_LB0hEDPp1KEc6qDUKoZYUQMk/edit

*132)उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/UmfFB4Kjoqzd7ggV7

*133)मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/8CDG8DsRRJ3PjoKR9

*134) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/9hL1PQALU7CRbFBS8
*135) योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/oa5mb1PoTW5ZAidF9


*136) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/! 

137) प्रतिभा पगारे

इयत्ता - ३ री
विषय - भाषा
https://forms.gle/rEEBZgARefCKFnuZ8

138) https://forms.gle/vsFtuYjviMnr8WDY8

Urmila Lasurkar 
Z.P. Primary school Sutarkhede, Taluka: Chandwad, Dist: Nashik.

139:-) *राणी जगदाळे, सातारा* 

https://forms.gle/dCFG82b8GGprXt2X9

140) *yogita lokhande*Jalgaon
https://forms.gle/Ztit6fZXmQgFdj

141) सौ.हेमा यादव
https://forms.gle/Qp91AZ5yiYYDLCRQ8

     १४२)सौ.वैशाली भोईर
https://docs.google.com/forms/d/1P5nCFuG234CZJYm_iEn10CEEJOQWKz51AQ2uqcfKX-A/edit

143)   जयश्री भड, कारंजा https://forms.gle/98mtKxbisYH93b7L8  

144) सुनिता शिरसाठ https://forms.gle/Xoryu9Cx3ChdBGZx9 

(145) वंदना देवकर ,हिंगोली https://forms.gle/tvbL7MAZgEjEsYPw5 

(146)वंदना देवकर(ढोकणे) https://forms.gle/stDNWRSWodoQxqLS7

148)*योगिता लोखंडे जळगाव*
https://forms.gle/XXSDn9viEJkCeUsr7  

(149) श्रीमती वंदना देवकर,ढोकणे ,हिंगोली https://forms.gle/iSyjRotSRzrho8
qw6 

*150)सुनिता शिरसाठ* https://docs.google.com/forms/d/1YRcSaqE2Pa_LC-DSEEXTDj2m4agjXu0P-kLb9wZPDiI/edit

Thursday, 28 May 2020

बहुजनांच्या शिक्षणाचे शिल्पकार...

लोकसहभागातून बदलले कोकलगाव जि.प.शाळेचे रूपडे...

सावित्री वंदना( प्रार्थना)

 Date: 26 May 2020

*सावित्री वंदना(प्रार्थना)*

या चला सावित्रीला
वंदुया चला....वंदुया चला...धृ !!

शिक्षणाची होती जिद्द
बांधली निश्चयाची गाठ
प्लेगबाधित मुलीला वाचविण्यासाठी
दिली त्यांनी आपली पाठ.....

हो ओ हो...S s s
या चला सावित्रीला.....१!!

ज्ञानाची भूक भागविण्यासाठी
काढल्या मुलीसाठी शाळा
ज्ञानज्योत पेटविण्यासाठी
स्वत: आधी शिकली शाळा....

हो ओ हो s s s
या चला सावित्रीला......२!!

ज्ञानामृत पाजण्यासाठी
शेण खरकटे झेलली
ज्योतीबाच्या संगतीने
ज्ञान धनुष्य पेलली

हो ओ हो...s. S.  S
या चला सावित्रीला.....३!!

तुझ्यामुळेच माते
उघडला तिसरा डोळा
तुझ्यामुळेच सावित्रीआई
फुलला शिक्षणाचा मळा...!!

हो ओ हो....s....s....s
या चला सावित्रीला.........४!!

*स्वरचित प्रार्थना*
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे,*
*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव,वाशिम*