Monday, 13 April 2026
मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
उपक्रमशील व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या ५ व्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्याला शिवाजी हायस्कूल वाशिम येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.वत्सगुल्मी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे सरांची लाभली आहे तर पाठराखण प्रसिद्ध लेखक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मा.एकनाथ आव्हाड सर यांनी केली आहे.
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे यांचे यापुर्वीचे साहित्य म्हणजे त्यांचा पहिला काव्यसंग्रह चिमणी पाखरं,तसेच सुकळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कवितांचा बालकवितासंग्रह -उमलती फुले,(महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला काव्यसंग्रह व पहिले बालकविसंमेलन मिनाक्षी नागराळे यांनी सर्किट हाऊस वाशिम येथे घेतले होते.तिसरे पुस्तक म्हणजे 'स्वराज्याचे मावळे' हा पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांवर झाला.त्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास कवितेच्या रूपात मांडण्यात आला.याच स्वराज्याचे मावळे या काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुंबई येथील ग्रंथालयात निवड झाली तसेच महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली.या आगळ्यावेगळ्या काव्यसंग्रहाचे साहित्यप्रेमीनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर लॉकडाऊन काळात महाराष्ट्रभरातून पुस्तके समिक्षणासाठी भेट येत असतं त्या पुस्तकावरचे समिक्षण करून त्याचा समकालीन समिक्षा ग्रंथ निर्माण झाला.या ग्रंथाचा उपयोग पिएचडी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे.
शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक तालुक्यातून कवितेसाठी तीन नंबर काढण्यात आले होते.ते शिक्षक तालुक्यातून विभाग स्तरासाठी पात्र ठरले होते.त्या निवडक कवितांचा पाच जिल्ह्यांतील शिक्षकांच्या स्पर्धा या वाशिम जिल्ह्यात घेण्यात आल्या त्यामुळे या काव्यसंग्रहाला वत्सगुल्मी हे नांव देण्यात आले.
वाशिम जिल्ह्याला साहित्यिक वारसा राजा वाकाटक ते वत्सगुल्मीच्या काळापासूनचा असल्याने आणि वत्सगुल्मी ही एक साहित्यशैली असल्याने वाशिमचे जुने नांव वत्सगुल्म असल्याने या काव्यसंग्रहाला कवयित्री /लेखिका,समिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी खूप विचारपूर्वक दिले आहे.
मिनाक्षी नागराळे यांना सावित्रीमाई फुले कवयित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने २०२३/२४ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मध्ये जिल्हास्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आजपर्यंत मिनाक्षी नागराळे यांना ९१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९२,व ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेची निवड झाली होती.मिनाक्षी नागराळे यांना साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक,कार्यासाठी आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षकी पेक्षात तर अग्रेसर असणाऱ्या तळागाळातील गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाचा लळा लावणा-या या ध्येयवेड्या शिक्षिकेला उद्याच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या हार्दिक शुभेच्छा.... खूप खूप अभिनंदन
मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
Thursday, 2 April 2026
Saturday, 7 March 2026
उन्हाळ्यात लक्षात ठेवण्याच्या आरोग्य टीप्स
उन्हाळ्यात लक्षात ठेवण्याच्या आरोग्य टीप्स
*शरीराला आतून थंडावा देण्यासाठी आणि उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यासाठी तुमचा आहार, फळे आणि व्यायामाचे नियोजन खालीलप्रमाणे असावे:*
*१. शरीराला थंडावा देणारा आहार*
नुसते थंड पाणी पिण्यापेक्षा असे पदार्थ खा जे शरीराचे तापमान नैसर्गिकरित्या कमी राखतात:
* ताक (Buttermilk): ताक हे सर्वोत्तम 'नॅचरल कूलंट' आहे. यात थोडे जिरे पूड आणि कोथिंबीर टाकून प्यायल्याने पचन सुधारते आणि थंडावा मिळतो.
* दही आणि लस्सी: दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश करा. यामुळे प्रोबायोटिक्स मिळतात आणि पोट शांत राहते.
* सब्जा बिया: सब्जा बिया पाण्यात भिजवून त्या लिंबू सरबत किंवा दुधात टाकून प्या. हे शरीरातील उष्णता शोषून घेतात.
* नारळ पाणी: शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स संतुलित ठेवण्यासाठी आठवड्यातून ३-४ वेळा शहाळे प्या.
* बडशोप आणि खडीसाखर: जेवणानंतर बडशोप खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते.
*२. उन्हाळ्यातील सर्वोत्तम फळे*
ज्या फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते, ती फळे उन्हाळ्यात वरदान ठरतात:
* कलिंगड आणि टरबूज: यात ९०% पेक्षा जास्त पाणी असते, जे डिहायड्रेशनपासून वाचवते.
* काकडी: काकडी शरीरातील विषारी घटक बाहेर काढते आणि थंडावा देते.
* संत्री आणि मोसंबी: व्हिटॅमिन सी मुळे प्रतिकारशक्ती टिकते आणि थकवा कमी होतो.
* द्राक्षे: शरीरातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी द्राक्षे खावीत.
* काळा वाळा किंवा पन्हे: कच्च्या कैरीचे पन्हे उन्हाच्या झळांपासून (Heatstroke) रक्षण करते.
*३. उन्हाळ्यासाठी योग्य व्यायाम*
उन्हाळ्यात जास्त घाम गाळणारा व्यायाम करणे कधीकधी धोकादायक ठरू शकते, म्हणून खालील गोष्टी लक्षात घ्या:
* प्राणायाम (शीतली आणि सीत्कारी): हे खास शरीराला थंड करण्यासाठीचे प्राणायाम आहेत. यामुळे जिभेवाटे थंड हवा शरीरात जाते आणि मेंदू शांत होतो.
* योगासने: शवासन, बद्धकोणासन किंवा चंद्राभ्यास (Moon Salutation) यांसारखी संथ आसने करा.
* पोहणे (Swimming): उन्हाळ्यासाठी हा सर्वोत्तम व्यायाम आहे. यामुळे स्नायूंचा व्यायाम होतो आणि शरीराचे तापमानही वाढत नाही.
* वेळेचे भान: सकाळी ६ ते ८ किंवा संध्याकाळी ७ नंतरच व्यायाम करा. दुपारी व्यायाम करणे पूर्णपणे टाळा.
*टाळण्याच्या गोष्टी (Don'ts):*
* अति तिखट, मसालेदार आणि गरम मसाले असलेले पदार्थ कमी करा.
* कोरडे पदार्थ (उदा. बिस्किटे, फरसाण) टाळा, कारण ते पचायला जास्त पाणी लागते.
* जास्त मीठ असलेले पदार्थ खाऊ नका, कारण त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते.
*महत्त्वाची टीप: फ्रिजमधील एकदम कडक थंड पाणी पिण्याऐवजी मातीच्या माठातील पाणी पिणे आरोग्यासाठी सर्वात उत्तम असते.*
*विशेष सुचना :- हा मेसेज वेळात वेळ काढून ईतरांच्या माहीतीत भर पडावी म्हणून पुढे शेअर करावा*
*ह्या व अशा निशुल्क माहीती साठी घरगुती उपचार हा ग्रुप जॉईन करा*
*(कॉपी पेस्ट)*
.
Monday, 2 March 2026
मिनाक्षी नागराळे सन्मानित
Subscribe to:
Posts (Atom)






