Friday, 22 December 2023

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण मनोगत


 


Friday, 20 October 2023

असाही वाढदिवस... आपणही समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून अनन्याच्या पालकांनी शाळेला भेट दिली सुंदर पुजेचे ताट...

 असाही एक वेगळा वाढदिवस...कु.अनन्या शिवाजी काळबांडे हिचा आज वाढदिवस...आपणही समाजाचं काही देणं लागतो...एकीकडे जिल्हा परिषदच्या शाळा बंद पाडण्याचे षडयंत्र सुरू असतानाच गावातली जिल्हा परिषदेची शाळा वाचली पाहिजे ती टिकली पाहिजे या जाणिवेतून शिवश्री शिवाजी काळबांडे भाऊंनी अनन्याच्या वाढदिवसानिमित्त पितळेचे सुंदर पुजेचे ताट त्यात निरांजन, आगरबत्ती स्टॅंन्ड,कुंकवाचा करंडा आणि दोन छोट्या वाट्या हे सर्व अटॅच असणा-या वस्तू पुजेचे ताट कायमस्वरूपी शाळेला आठवण राहील असे उपयोगी साहित्य सस्नेह भेट देऊन आगळावेगळा आपल्या लेकीचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव येथे साजरा केला....अशा उदार दातृत्वाचे मनापासून धन्यवाद....गोड अनन्या ला वाढदिवसाच्या पुन्हा एकदा भरभरून शुभेच्छा....*💐💐💐💐💐🎂🎂🎂🎂

Wednesday, 11 October 2023

चला ३ व २ पासून चित्र काढुया...

 


Tuesday, 10 October 2023

चला काही नवे करूया (चित्र काढून)

https://youtube.com/shorts/-ltw-IMhmrM?si=rHxc6OtgtOjhy0HB

Monday, 9 October 2023

आठवणीत राहणारा वाढदिवस...असाही वाढदिवस...अमन नारायण काळबांडे इयत्ता दुसरी....

 *आठवणीत राहणारा वाढदिवस...असाही...


आपणही समाजाचे काही देणं लागतो या भावनेतून शिक्षणप्रेमी श्री.नारायण प्रल्हाद काळबांडे यांनी मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव ला पंखा,फॅन भेट दिला...


*अमन नारायण काळबांडे(इयत्ता दुसरी)या विद्यार्थ्यांच्या पालकांनी अमनच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगावला पंखा भेट दिला त्याबद्दल सौ.मनिषा नारायण काळबांडे ताईचे शाळेच्या वतीने मनापासून धन्यवाद....अमनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...💐💐💐💐.गेल्या दोन महिन्यांपासून एक नवीन उपक्रम सुरू झाला.वाढदिवसानिमित्त चॉकलेट मुळे मुलांचे दात खराब होतात त्यापेक्षा पुस्तक,वृक्ष,पेन,वह्या अशा वस्तू भेट देण्यात आल्या...या उपक्रमास पालकांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे....*


Happy birthday dear aman