महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (SCERT) पुणे तथा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचे सादरीकरण दिनांक 21 डिसेंबर रोजी रिसोड रोड, लाखाळा वाशिम. येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे प्रेरणास्थान डॉ.ज्ञानेश्वर नागरे (प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम) मार्गदर्शक डॉ.सुलक्षणा पवार मॅडम (अधिव्याख्याता तथा जिल्हा समन्वयक नवोपक्रम), परिक्षक श्री शिवशंकर मोरे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री जगदीश करडे (अधिव्याख्याता डायट वाशिम), श्री रोकडे सर (प्राचार्य शिवाजी अध्यापक विद्यालय वाशीम) यांनी जिल्ह्यातील नवोपक्रम स्पर्धेतील पात्र शिक्षकांच्या सादरीकरणाच्या परीक्षणाचे काम पाहिले.
सन 2021- 22 या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे याकरिता दरवर्षी प्रमाणे याही वर्षी राज्यातील नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी यांच्याकडून राज्यातून उपक्रमशील शिक्षकांकडून नवोपक्रम शासन स्तरावर मागवले जातात. नवनवीन उपक्रम व शिक्षकांची कल्पकता या नाविन्यपूर्ण उपक्रमातून दिसून येते. अशा उपक्रमांची यादी राज्यस्तरावरून (SCERT)पुणे यांच्याकडून डाएट कडे येते. यात प्रथम फेरीत निकषानुसार स्पर्धेचे आयोजन वाशिम येथे करण्यात आले. या स्पर्धेमध्ये वाशिम जिल्ह्यातून प्राथमिक गटांमध्ये एकूण 13 व माध्यमिक स्तर एक असे 14 नवोपक्रम सादर झाले होते. पहिल्या फेरीची निवड होऊन प्राथमिक गटातून सात शिक्षक व माध्यमिक गटातून एका शिक्षकाची निवड झाली. यामध्ये दुसऱ्या फेरीमध्ये एकूण आठ शिक्षकांच्या नवोक्रमाचे पीपीटी द्वारे सादरीकरण झाले. त्यामध्ये पाच मुद्यांना धरून सात मिनिटांमध्ये सादरीकरण करावयाचे होते. परीक्षकांनी गुणांकन करून स्पर्धेचा निकाल जाहीर केला.
प्राथमिक गटातून श्री.रंजीत जाधव, मानोरा यांनी प्रथम मानांकन प्राप्त केले तर वाशिम पंचायत समिती मधील आरती गंगावणे यांनी दुसरा आणि मीनाक्षी नागराळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. कारंजा येथील कु. नीता तोडकर व मुरलीधर जाधव कारंजा यांना उत्तेजनार्थ मानांकन मिळाले. माध्यमिक गटातून संजय धांडे, रिसोड यांनी प्रथम मानांकन मिळवले. प्रज्ञा देवळीकर कारंजा व संध्या पिंजरकर, मंगरूळपीर यांनी सहभाग घेतला. सहभागींना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि जिंकलेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
जि.प.प्राथमिक शाळा कोकलगाव केंद्र तोंडगाव पंचायत समिती वाशिम येथे कार्यरत असलेल्या मिनाक्षी नागराळे या त्यांच्या शाळेत अनेक उपक्रम राबवत असतात.याही वर्षी त्यांनी गणित विषयावर आधारित नवोपक्रम SCERT pune यांच्याकडे सादर केला होता.या उपक्रमाचे सादरीकरण २१डिसेंबर रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वाशिम येथे आयोजित करण्यात आले होते.त्यात मिनाक्षी नागराळे वाशिम यांच्या उपक्रमास तृतीय मानांकन मिळाले.स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.गट शिक्षणाधिकारी मा.राजेंद्र शिंदे साहेब व केंद्रप्रमुख विलास गोटे सर,शाळेचे मुख्याध्यापक रामकिसन वाकुडकर सर व केंद्रातील तसेच वाशिम पंचायत समिती मधील सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री राजेश सुर्वे (जिल्हा समुपदेशक डायट वाशिम) यांनी केले तर तंत्रज्ञान टेक्निकल श्री विश्वंभर आळणे (विषय सहाय्यक डायट ) यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री विलास कडाळे (अधिव्याख्याता )स्वाती ढोबळे (डायट, वाशिम)श्रीमती संजीवनी दारोकार (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) श्रीमती स्मिता इंगळे (जिल्हा समन्वयक समावेशित शिक्षण) आदींनी अथक परिश्रम घेतले.आभार प्रदर्शन श्री.विश्वंभर आळणे सरांनी मानले. सर्व विजयी स्पर्धकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.