Saturday, 18 September 2021

वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित

*वाशिमच्या मीनाक्षी नागराळे राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित*

  जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव ता.जि.वाशिम येथील आदर्श शिक्षिका मीनाक्षी पांडुरंग नागराळे यांना रयतेचा कैवारी शैक्षणिक डिजिटल दैनिक वृत्तपत्राच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त "राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्काराने" १६ सप्टेंबर रोजी औरंगाबाद येथे सन्मानित करण्यात आले आहे.
     त्याचबरोबर त्यांनी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले असून दप्तर मुक्त शाळा,गोष्टीचा शनिवार, तंबाखू मुक्ती साठी बाबास पत्र लिहा, तंबाखूजन्य पदार्थाची होळी, पक्षी वाचवा उपक्रम तसेच शैक्षणिक pdf, PPT, flipbook तयार करणे आणि राज्यभरातील शिक्षिकांना 'उपक्रमशील व तंत्रस्नेही' व्हाट्सअप समूहाद्वारे लॉकडाउन काळामध्ये ऑनलाइन कार्यशाळेचे आयोजन करणे व लॉकडाऊन काळात हजारो शैक्षणिक व्हिडिओची निर्मिती करून युट्युबवर प्रसारित करीत शाळा बंद पण शिक्षण आहे सुरू या सदराखाली महाराष्ट्रातल्या लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर लॉकडाउन काळात माजी विद्यार्थ्यांकडून जे नोकरीवर लागले आहेत अशा विद्यार्थ्याकडून जिल्हा परिषद शाळेचे ऋण व्यक्त करण्याकरता लोकसहभाग गोळा करून शाळेची उत्कृष्ट रंगरंगोटी केली आहे. मिनाक्षी नागराळे यांचे शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांचे साहित्य क्षेत्रात महाराष्ट्रात नाव कमावले आहे. जि. प. शाळेच्या विद्यार्थ्यांचे राज्यातले व जिल्ह्यातले विद्यार्थ्यांचे पहिले काव्यसंग्रह 'उमलती फुले' स्वखर्चाने प्रकाशित केले असून त्यांचे 'चिमणी पाखरं' आणि स्वराज्याचे मावळे हा ऐतिहासिक काव्यसंग्रह शालेय शिक्षण सचिव नंदकुमार साहेब, खासदार भावना गवळी, आमदार पाटणी,आमदार अमित झनक व खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब (स्वराज्यरक्षक मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता )यांच्या हस्ते प्रकाशित झाले आहेत. स्वराज्याचे मावळे या ऐतिहासिक काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.त्यांचे अनेक लेख व जवळपास ४० पुस्तकावरची समीक्षेने, कविता, महाराष्ट्राच्या विविध वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाल्या आहेत. त्यांच्या शैक्षणिक व साहित्यिक कार्याची दखल घेत रयतेचा कैवारीच्या वतीने १६ सप्टेंबर रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र, औरंगाबाद येथे सेवानिवृत्त शिक्षण संचालक डॉक्टर गोविंद नांदेडे आणि सेवानिवृत्त प्राचार्य बी.बी. जाधव यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार निलेश लंके, राजूदास जाधव, अमृत बांगर, गोपीनाथ जगताप, रामदास रहाणे, परसराम निखाडे, संगीता नरवाडे, रेतीचा कैवारीचे मुख्य संपादक शाहू संभाजी भारती आदींची उपस्थिती होती.
       मिनाक्षी नागराळे यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह,शाल, पुष्पगुच्छ व मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाल्याने शिक्षण वर्गाकडून तसेच माजी शिक्षणाधिकारी अंबादास मानकर गट शिक्षणाधिकारी राजेंद्र शिंदे केंद्रप्रमुख विलास गोटे जिजाऊ ब्रिगेड, शिक्षण महर्षी पंजाबराव देशमुख शिक्षक संघटना वाशिम तसेच मराठा सेवा संघाचे वाशिम जिल्हा सचिव नारायणराव काळबांडे व सर्व शिक्षक वृंदाकडून अभिनंदन करण्यात आले आहे.

Wednesday, 8 September 2021

मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे कोवीड योध्दा म्हणून सन्मानित...

*मराठा सेवा संघातर्फे मिनाक्षी नागराळे सन्मानित*

          मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनानिमित्त वाशिम येथील सर्कीट हाऊसमध्ये कोवीड १९ च्या काळात सेवा करणारे डॉक्टर्स,नर्स, पोलीस,शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा स्वयंसेविका यांना कोरोना योध्दा म्हणून ग्रंथ, पुष्पगुच्छ, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा विभागीय अध्यक्ष शिवश्री अशोकराव महाले, उद्घाटक आमदार अॅड किरणराव सरनाईक, प्रमुख अतिथी आमदार अमित झनक बाबाराव पाटील खडसे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अविनाश अहेर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.विनोद वानखेडे, पत्रकार परिषदेचे अध्यक्ष माधवराव अंभोरे,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री.राजुभाऊ चौधरी, जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्ष सौ.संजिवनीताई बाजड,मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव शिवश्री.नारायणराव काळबांडे, नागेश काळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले.त्यांनी कोरोना काळात लोकवर्गणीतून शाळा रंगरंगोटी केली.तसेच विद्यार्थ्यांना इयत्तेनुसार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती करून ऑफलाईन शिक्षण दिले.'शाळा बंद शिक्षण आहे सुरू' या सदराखाली अनेक शैक्षणिक पिडीएफ,पी.पीटी,फ्लीपबुक ची निर्मिती केल्याबद्दल 'कोवीड योध्दा' म्हणून मिनाक्षी नागराळे वाशिम यांना मराठा सेवा संघातर्फे प्रमाणपत्र, ग्रंथभेट, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वाबळे सर यांनी केले,तर आभार शिवश्री नारायणराव काळबांडे यांनी मानले.या कार्यक्रमास जिल्ह्यातील  प्रातिनिधिक स्वरूपात प्रतिष्ठित डॉक्टर्स, पोलिस,नर्स, पत्रकार, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स,शिक्षक आदि उपस्थित होते.

Saturday, 28 August 2021

बालकांच्या सकस बुध्दीचा आहार म्हणजे-'नभाची कोडी'(विज्ञानाधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)

 *बालकांच्या बुद्धीचा सकस आहार म्हणजे- नभाची कोडी(विज्ञानधारित कोड्यांचा बालकाव्यसंग्रह)*


     मुलांना कोडी खूप आवडतात. बालपणी मुलांची बुद्धी फार तल्लख व फार चिकित्सक असते. आपल्या आजूबाजूला शेजारीपाजारी एखादे लहान मूल असते. त्याच्याकडे बारकाईने पाहिल्यास असे लक्षात येते की लहान मुलं खूप प्रश्न विचारतात व घरातील आई-बाबांना भंडावून सोडतात. का? असेच का? तसेच का? असे का नाही? तसे का नाही? कुठे गेला ? केंव्हा येणार? अशा प्रश्नांची मालिका सुरूच असते. काही लहान लहान मुलं तर आकाशातला चंद्रच मागतात. मग आई त्याची समजूत काढते. तो चांदोमामा आहे.आपल्यापासून खूप दूर असतो तेवढ्या लहानपणापासून चंद्र, चांदण्या,आभाळ, ढग, पाऊस, दिवस-रात्र यांच्याविषयी उत्सुकता वाढायला लागते. त्यात मुलांना खेळ, गाणी,गोष्टी,कोडी तर फारच आवडतात.अशाच विज्ञानाधारित कोड्यांची मेजवानी म्हणजे- नभाची कोडी. 

             बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील लेखक, कवी,प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचा नुकताच प्रकाशित झालेला कोड्यांचा बाल काव्यसंग्रह नभाची कोडी हा बाल काव्यसंग्रह वाचनात आला.या पुस्तकाचे मुखपृष्ठ बाल मनाला आकर्षित करणारे असून विद्यार्थ्यांची वाचण्याची उत्सुकता निर्माण करणारे देखणे मुखपृष्ठ आहे. प्रत्येक पानावर बालकांच्या चित्रासह आश्चर्य दाखवणारे, उत्साहवर्धक,मनोवेधक चित्रे रेखाटली आहेत. या पुस्तकाचे  प्रकाशन श्री राजू बर्वे पुणे यांनी दिलिपराज प्रकाशन द्वारा केले आहे.याची प्रथमावृत्ती ५ऑगस्ट २०२१ ला प्रकाशित झाली आहे.या पुस्तकाला प्रस्तावना प्राध्यापक, डॉ.राणे अंबरनाथ यांची लाभली असून पाठराखण प्राध्यापक डॉ.किसन पाटील जळगाव यांनी केली आहे. या पुस्तकाची किंमत 120 रुपये असली तरी यातल्या कोडे कविता विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या, विद्यार्थ्यांच्या  बुद्धीचा कस वाढवणाऱ्या आहेत.

          'नभाची कोडी'  या पुस्तकातील सर्वच कविता कवितेचा हात धरून विज्ञानाकडे नेणाऱ्या आहेत. ज्ञानदायी आहेत. सर्व कविता या भूगोल व खगोल शास्त्राची ओळख करून देणार्‍या आहेत. प्रत्येक कवितेत तालबद्ध, रंजकता उत्सुकता व उत्साह भरभरून भरलेला आहे. मुलांना कल्पनाशक्तीच्या जगात घेऊन जाणार्‍या रहस्यमय कविता मुलांना खूप आवडतात. या पुस्तकातील भाषा कवी देवबा पाटील यांनी आकलनसुलभ, सहजरित्या, साधी, सरळ, सोपी भाषा वापरली असल्यामुळे अतिशय मनोरंजक व उत्साह वाढवणार्‍या या सर्वच कविता आहेत. यातल्या बर्‍याच कविता मोठ्यांच्या ज्ञानात भर घालणा-या आहेत.


         खांब नाही 

         सरी नाही 

          दांडे नाही 

          टेके नाही 

   

           खाली मुळीच 

            पडत नाही 

            वर जाता 

            वरच जाई


              आदी नाही 

              अंत नाही 

              ग्रहताऱ्यांनी

              व्यापून राही


                निळा निळा 

                 त्याचा रंग 

                ओळखा तयास

                 होऊन दंग....!!


          बालमनाचा उत्साह व उत्सुकता वाढवणारी कोडी मुलांना शेवटपर्यंत कोड्यात टाकणारे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन बुद्धीचा कस वाढवणारी आहेत.विद्यार्थ्यांचा उत्साह वाढून कुतूहल वाढवणाऱ्या बालकविता प्राध्यापक देवपा पाटील यांनी रचल्या आहेत. प्राध्यापक  देवबा पाटील हे प्राध्यापक असले तरी लहान मुलांना समजतील अशा बालकथा व बाल कवितांचे त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. प्राध्यापक देवबा पाटील हे खरे तर विज्ञानाचे शिक्षक परंतु लहान मुलांच्या प्रति त्यांचा असलेला लळा वाचकास दिसून येतो. प्राध्यापक देवबा पाटील यांची 'धाडसी राम'  ही कादंबरी खूप वाचनीय व प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे 'नभाची कोडी' हा विज्ञानाधारित कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या अत्यंत उपयोगी आहे. 'नभाची कोडी' या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना सूर्य, ग्रह, तारे, आकाशगंगा, सूर्यमाला, चंद्र, पृथ्वी, आभाळ,संधिप्रकाश, वारा, पाऊस, गारा, इंद्रधनुष्य, ढगफुटी,उल्का, धूमकेतू, चांदण्या, सौर ऊर्जा, कृत्रिम उपग्रह, इत्यादीची माहिती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रत्येक कविता अतिशय मनोरंजक असल्याने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी निर्माण करणारी आहे. या नभाची कोडी या काव्यसंग्रहामध्ये एकूण 23 कोडे कवितेच्या रुपात प्राध्यापक देवबा पाटील यांनी रचली आहेत.शेवटी प्रत्येक कोडे कवितेची उत्तरे शेवटच्या पानावर दिली आहेत.

         प्राध्यापक देवबा पाटील यांची आज पर्यंत एकूण 53 पुस्तके प्रकाशित आहेत. तसेच त्यांच्या विविध पुस्तकांना अनेक पुरस्कार आज पर्यंत मिळाले असून त्यांच्या अनेक कविता विविध वृत्तपत्रांमधून प्रकाशित होत असतात.नभाची कोडी हा कोडे काव्यसंग्रह प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञानात भर घालणारा असल्याने प्रत्येक घरात, प्रत्येक विद्यार्थ्याकडे असावे असेच आहे.


    प्राध्यापक देवबा पाटील यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.....


समिक्षिका/शिक्षिका/लेखिका/कवयित्री

कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे

जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव

ता.जि.वाशिम

पीन ४४४५०५

मो.९७६७६६३२५७


Wednesday, 4 August 2021

रोमन अंक 101 ते 200

 101=CI

102=CII

103=CIII

104=CIV

105=CV

106=CVI

107=CVII

108=CVIII

109=CIX

110=CX

111=CXI

112=CXII

113=CXIII

114=CXIV

115=CXV

116=CXVI

117=CXVII

118=CXVIII

119=CXIX

120=CXX

121=CXXI

122=CXXII

123=CXXIII

124=CXXIV

125=CXXV

126=CXXVI

127=CXXVII

128=CXXVIII

129=CXXIX

130=CXXX

131=CXXXI

132=CXXXII

133=CXXXIII

134=CXXXIV

135=CXXXV

136=CXXXVI

137=CXXXVII

138=CXXXVIII

139=CXXXIX

140=CXL

141=CXLI

142=CXLII

143=CXLIII

144=CXLIV

145=CXLV

146=CXLVI

147=CXLVII

148=CXLVIII

149=CXLIX

150=CL

151=CLI

152=CLII

153=CLIII

154=CLIV

155=CLV

156=CLVI

157=CLVII

158=CLVIII

159=CLIX

160=CLX

161=CLXI

162=CLXII

163=CLXIII

164=CLXIV

165=CLXV

166=CLXVI

167=CLXVII

168=CLXVIII

169=CLXIX

170=CLXX

171=CLXXI

172=CLXXII

173=CLXXIII

174=CLXXIV

175=CLXXV

176=CLXXVI

177=CLXXVII

178=CLXXVIII

179=CLXXIX

180=CLXXX

181=CLXXXI

182=CLXXXII

183=CLXXXIII

184=CLXXXIV

185=CLXXXV

186=CLXXXVI

187=CLXXXVII

188=CLXXXVIII

189=CLXXXIX

190=CXC

191=CXCI

192=CXCII

193=CXCIII

194=CXCIV

195=CXCV

196=CXCVI

197=CXCVII

198=CXCVIII

199=CXCIX

200=CC

रोमन अंक १०० ते. २००

 

101=CI

102=CII

103=CIII

104=CIV

105=CV

106=CVI

107=CVII

108=CVIII

109=CIX

110=CX

111=CXI

112=CXII

113=CXIII

114=CXIV

115=CXV

116=CXVI

117=CXVII

118=CXVIII

119=CXIX

120=CXX

121=CXXI

122=CXXII

123=CXXIII

124=CXXIV

125=CXXV

126=CXXVI

127=CXXVII

128=CXXVIII

129=CXXIX

130=CXXX

131=CXXXI

132=CXXXII

133=CXXXIII

134=CXXXIV

135=CXXXV

136=CXXXVI

137=CXXXVII

138=CXXXVIII

139=CXXXIX

140=CXL

141=CXLI

142=CXLII

143=CXLIII

144=CXLIV

145=CXLV

146=CXLVI

147=CXLVII

148=CXLVIII

149=CXLIX

150=CL

151=CLI

152=CLII

153=CLIII

154=CLIV

155=CLV

156=CLVI

157=CLVII

158=CLVIII

159=CLIX

160=CLX

161=CLXI

162=CLXII

163=CLXIII

164=CLXIV

165=CLXV

166=CLXVI

167=CLXVII

168=CLXVIII

169=CLXIX

170=CLXX

171=CLXXI

172=CLXXII

173=CLXXIII

174=CLXXIV

175=CLXXV

176=CLXXVI

177=CLXXVII

178=CLXXVIII

179=CLXXIX

180=CLXXX

181=CLXXXI

182=CLXXXII

183=CLXXXIII

184=CLXXXIV

185=CLXXXV

186=CLXXXVI

187=CLXXXVII

188=CLXXXVIII

189=CLXXXIX

190=CXC

191=CXCI

192=CXCII

193=CXCIII

194=CXCIV

195=CXCV

196=CXCVI

197=CXCVII

198=CXCVIII

199=CXCIX

200=CC