Tuesday, 14 July 2020
कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योद्धा वीर बाजी पासलकर
Labels:
लेख
स्वातंत्र्य देवता राजमाता जिजाऊ
*स्वराज्य संकल्पीका राजमाता जिजाऊ मासाहेब*
जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी.... या उक्तीप्रमाणे राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या पूर्ण विश्वामध्ये एक कर्तबगार स्त्री म्हणून ओळखल्या जाते जिजाऊ माँसाहेबांचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी सकाळी सहा वाजता सिंदखेड राजा येथे झाला. त्यांच्या आईचे नांव म्हाळसाबाई व वडिलांचे नाव लखुजी राजे जाधव होते. जिजाऊंना अगदी लहान वयात मध्येच वयाच्या दहाव्या वर्षी सर्व शिक्षणामध्ये पारंगत झाल्या होत्या. त्यांना अनेक भाषा त्याकाळी अवगत होत्या. सर्व युद्धकलेचे शिक्षण जिजाऊनी घेतले होते. अख्या विश्वामध्ये एका वीर पुरुषाची वीर आई म्हणून राजमाता जिजाऊ माँसाहेब ओळखले जातात.... जिजाऊंना युद्ध शिक्षण, राजनीति, भाषा, अनेक खेळ, समाजशास्त्र, अर्थशास्त्र युद्धशास्त्र, राज्यशास्त्र इत्यादी क्षेत्रात पारंगत केले होते. जिजाऊंचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला....
त्या काळामध्ये महाराष्ट्रावर आदिलशहा, निजामशहा यांच्या स्वा-या होवून लढाया होत होत्या.तो काळ फार अंधाधुंदीचा होता.जिकडे तिकडे स्वैराचार माजला होता.स्त्रीया सुरक्षित नव्हत्या,ना रयत सुरक्षित होती...ते रयतेवर जुलूम करायचे.रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित घर नव्हते. सगळीकडे अन्याय माजला होता.हे सर्व पाहून जिजाऊंना सतत वाटायचे आपले स्वराज्य निर्माण करायचे....शहाजी राजांची साथ होतीच. बाल शिवबाला अगदी लहान वयापासूनच जिजाऊंनी शूरवीरांच्या,रामाच्या, महाभारताच्या ,भिमाच्या, अभिमन्यू च्या कथा सांगितल्या. न्याय-निवाडा कसं करायचं छत्रपती शिवरायांना जिजाऊ सांगत असत इतकंच नाही तर त्यांना अगदी लहान वयापासून झाडावर चढणे, दांडपट्टा फिरवणे, भाला फेकणे धावत्या घोड्यावर बसणे,तलवारबाजी चालवणे इत्यादी युद्ध कलेमध्ये निपून करण्यासाठी जिजाऊ मासाहेब स्वतः शिवरायांना शिकवायच्या... त्यांचे शिक्षण त्यांना येणाऱ्या सर्व भाषा याकडे सुद्धा लक्ष द्यायच्या अगदी लहान वयापासूनच न्यायनिवाडा करण्यासाठी सुद्धा शिवबांना गादीवर बसवायच्या.... छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु राजमाता जिजाऊ मासाहेब आहेत....एवढेच नाही तर जिजाऊ मासाहेब शिवबांना म्हणायच्या भोसल्यांचे पूर्वज श्रीरामचंद्र..... श्रीरामचंद्रांनी दृष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले जाधव यांचे पूर्वज श्रीकृष्ण त्यानेसुद्धा दुष्ट कंसाचा ठार केले आणि प्रजेला सुखी केले श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील तु सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील आईच्या या उद्देशाने शिवरायांना हुरूप यायचा... रामकृष्ण,भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आठवायच्या हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण सुद्धा लढावे त्यांनी दुष्टाचा नाश केला तसा आपण सुद्धा करावा आणि प्रजेला सुखी करावे आपण न्यायी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटायचे आणि त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करायचे....
शहाजीराजे निजामशाहीत लढाया करत वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानगा शिवबा शिकत होता. शहाजीराजे हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते त्यांनी बंगलोरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. त्यामुळे शिवाजी महाराजांना संस्कृतमध्ये तरबेज केले. त्याचबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान शूर सेनानी आणि विख्यात मावळे ठेवले अंदाधुंदी चा काळ संपला आणि जिजाऊ शिवराय शिवनेरीच्या मातीत बाल शिवबा खेळत जिजाऊ पुण्यात राहू लागल्या आसपासच्या लोकांना ते समजले आणि त्या लोकांना मोठा धीर आला. जिजाऊनी सर्व लोकांना जवळ बोलावून दिलासा दिला. अनेक लोक पुण्यामध्ये येऊ लागले आणि शेतावर जाऊ लागले जिजाऊनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागले गाव लोकांनी गजबजू लागले अंधश्रद्धेच्या भीतीने लोकांनी गाव सोडून गेलेले होते पुण्यामध्ये काही कर्मट लोकांनी एका विशिष्ट जागेवर पहार रोवून त्याला फाटकेतुटके खेटर, फाटका झाडू बांधून टाकले होते. याशिवाय जाहीर दवंडी दिली होती की या भूमीवर कोणी वस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा निर्वंश होईल. अशी अंधश्रद्धा त्या काळामध्ये पसरवली गेली होती. या धार्मिक दहशतवादाला व अंधश्रद्धांना जिजाऊंनी प्रथम लाथ मारली....सोबत तरुण मावळ्यांची पोरं एकत्र करून ती पहार जिजाऊने उपटून फेकले आणि त्याच जागेवर सोन्याचा नांगर लावून ती जागा ताब्यात घेतली.... आणि या जागेवर लाल महाल बांधला अंधश्रद्धांना फाटा देणाऱ्या कर्मकांडांना लाथाडून अंधश्रद्धेमध्ये अडकवून ठेवणाऱ्या लोकांना चांगलाच धडा शिकवला... राजमाता जिजाऊंनी त्या काळामध्ये अनेक स्त्रिया पतीचे निधन झाले की त्याच चितेमध्ये उडी मारून आपला जीव द्यायच्या.... सती जात होत्या अशा स्त्रियांना सती जाण्यापासून विरोध केला त्यांना रोखलं आणि अशा स्त्रियांचं उर्वरित आयुष्य त्यांच्या मुलाबाळांत घालवण्यासाठी आवाज उठवला...प्रचार सुरू केला अशा लोकांचे उद्बोधन केलं....कोणाला ही पती वारल्यानंतर जास्त गरज ही आधाराची,मायेची असते हे समजून सांगितले....कितीतरी बहिणींना त्यांच्या मनाविरुद्ध सती जायला भाग पाडणा-या भटांचा खरपूस समाचार घेतला..आणि कितीतरी लहान मुलांना त्यांची आई मिळवून देत अशा अनिष्ठ रूढी परंपरा, अंधश्रद्धा अशा गोष्टींना थारा न देता अशा गोष्टींचा प्रखर विरोध करणाऱ्या माँसाहेब जिजाऊ ह्या त्या काळातील एक धाडशी, धैर्यवान कर्तृत्ववान स्त्री म्हणून आदर्श आहेत. त्या काळांमध्ये अंधश्रद्धा लाथाडून दिली नसती तर कदाचित आजचे पुणे शहर हे त्या जागी कधीच बसले नसते. एक शापित भूमी मधून राहिले असते बाल शिवबाला तयार करण्यासाठी माँसाहेब जिजाऊंनी सर्व प्रकारचे बळ एकत्रित केले अनेक किल्ले घेण्यासाठी बाल शिवबांना प्रवृत्त केलं एक-एक किल्ला स्वराज्यामध्ये सामील करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊंचा विचार घ्यायचे आणि त्या अनुषंगाने लढाया करायचे. त्यावेळी माँसाहेब जिजाऊ म्हणायच्या "स्वराज्याची किल्ले ही आपली खाजगी मालमत्ता नाही" याची प्रखर जाणीव त्यांनी करून दिली जिजाऊने राजनीतीचा अवलंब करून शहाजीराजांची मुक्तता केले आणि स्वराज्याचे रक्षण केले. स्वराज्य स्थापन करायचं स्वराज्य हे माझं स्वप्न आहे आणि ते तुम्ही पूर्ण करायचं" असं शिवाजी महाराजांना सांगितलं स्वराज्य निर्मितीसाठी कोणतेही नाते, कोणतीही भिंत नाही स्वराज्य निर्मिती हे जिजाऊंचे एकमेव स्वप्न ठरले होते. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊंनी निर्माण केला होता. अशा प्रचंड जिद्दीची व करारी बाण्याची जिजाऊ स्वराज्यनिर्मितीसाठी तयार झाली. शिवबा तयार नसते तर स्वतःच्या हाती तलवार घेऊन जिजाऊंनी स्वराज्याची निर्मिती केली असती. एवढा प्रचंड आत्मविश्वास जिजाऊ माँ साहेबांच्या मध्ये होता एकवटला होता. त्यासाठी त्यांनी राजनीतीचा अवलंब करून स्वराज्याचा पसारा वाढवत गेल्या. सर्वांचे सहकार्य मिळावे म्हणून शिवबाचे एकूण आठ विविध कुटुंबात वैवाहिक संबंध जोडले.... त्यामुळे आठ शूरवीर घराणे भोसले घराण्यांशी जोडले गेले पुण्याच्या नैऋतेला 64 किलोमीटर वर कानद खो-यात तोरणा किल्ला जिंकला आणि याच किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले....
अफजल खानाच्या भेटीसाठी शिवबास प्रत्यक्ष मृत्यूच्या दाढेत पाठवणा-या जिजाऊ ह्या खरंच एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून अख्ख्या विश्वाला वंदनीय अशाच आहेत त्यावेळी जिजाऊंनी शिवरायांना सांगितलं की शिवबा अफजलखानाला कडून जर तुला काही दगाफटका झाला तर आम्ही बालशंभूला गादीवर बसून राजकारभार करेन. इतकी धाडसी,कर्तुत्वान स्त्री जगाच्या पाठीवर कुठेही मिळणार नाही.
"हीच जिजाऊ जीच्या प्रेरणेने उजळे स्वराज्यज्योती
हीच जिजाऊ जिने घडविले राजे शिवछत्रपती"
याप्रमाणे छत्रपती शिवरायांना घडवण्यामध्ये व बाल संभाजींना घडवण्यामध्ये त्यांना आकार देण्यामध्ये राजमाता वीर माता जिजाऊ मासाहेबांचा हात आहे वयाच्या चौदाव्या वर्षी छत्रपती संभाजी राजांनी पन्हाळगडावर बुधभुषण नावाचा संस्कृत,राजकीय सामाजिक स्वरूपाचा ग्रंथ लिहिला शंभूराजांनी एकूण चार ग्रंथ लिहिले एवढा प्रचंड बुद्धिमान भाषापंडित शूरवीर,करारी, मुत्सुद्दी, बुद्धिवान, निर्व्यसनी, जिद्दी छत्रपती संभाजीराजे तयार केले त्यांना सर्व शिक्षण माँसाहेब जिजाऊंनी दिले एवढेच नव्हे तर आपली नातसून म्हणजेच महाराणी येसूबाई यांना सुद्धा धर्मनीती, राजनिती,संस्कृत, युद्धनीती या सर्व बाबीवर या सर्वांचे शिक्षण जिजाऊंने दिले होते. छत्रपती संभाजी राजांनी नखशिक, सातसतक नायिकाभेद या तीन ग्रंथांची रचना केली. शंभुराजासारखा आदर्श, कवी,साहित्यिक,पहिली तोफ निर्माण करणारा, शूरवीर, पराक्रमी,मुद्सुदी ,एकही लढाई न हारणारा, आदर्श राजा शोधुनही सापडणार नाही....
अशा साहसी,धाडसी, कर्तृत्ववान , वेळप्रसंगी हाती तलवार धरून अन्यायाचा प्रतिकार करणा-या आदर्श मातेचा आदर्श समस्त स्त्रीयांनी घेण्यासारखा आहे....
१७जून १६७४रोजी माँसाहेब जिजाऊ यांचा स्मृतिदिनी विनम्र अभिवादन....
*लेखिका/ कवयित्री -कु. मीनाक्षी विजयाई पांडुरंग नागराळे,
जि.प.प्राथ.शाळा कोकलगाव ता.वाशिम
जिल्हा-वाशिम*
---
Shared using https://www.writediary.com/getapp
Labels:
लेख
अलक अति लघु कथा
[5/4, 2:11 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एका गावात एक सावकार राहत होता.त्याच्याकडे खूप पैसाअडका होता.पण कधीही कोणाला मदत करीत नसे.एके दिवशी त्याच्या मोटारसायकलीचा अॅक्सीडेंट झाला.एक पाय तुटला... खूप रक्त वाहत होते.. तेवढ्यात एक गरिब माणसाने त्याला दवाखान्यात नेले.व सावकाराचे प्राण वाचले.शेवटी माणूसच मदतीला धावून आला....✒️✒️
*©️®️कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/6, 11:55 AM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एका घरात दोघे लहान भाऊ राहत होते.त्यातला मोठा भाऊ फार समजदार होता.घासातला घास आपल्या लहान भावासाठी काढून ठेवायचा.त्याचा खूप लाड करायचा.छोट्यांनी मात्र बाबांनी आणलेला पेढ्याचा बॉक्स लपवून ठेवला.तेवढ्यात आई जवळ आली.आई म्हणाली "कोणतीही गोष्ट वाटून खावं".छोट्याने शरमेने मान खाली घातली.✒️
*©️®️कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे, वाशिम*
[5/8, 3:51 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एका गावात एक उदार मनाचं दांपत्य राहत असे.त्यांची ख्याती सर्वदूर पसरली होती.गावच्या सरपंचाला त्यांचं मोठेपण बघवत नव्हतं.लोक सरपंचाला नमस्कार न घालता सुखी कुटुंबाला नमस्कार घालून मानत होते.एक दिवस अचानक सरपंचाच्या दिवशु चोरी झाली...होतं नव्हतं गेलं.सरपंच त्या उदार मनाच्या दांपत्याकडे मदतीसाठी गेले.मोठ्या मनाच्या माणसांनी सरपंचाला आर्थिक मदत केली.व धैर्य दिले.तेव्हा सरपंच स्वत:च्याच नजरेत पडला होता...
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे, वाशिम*
[5/9, 12:31 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एके दिवशी अचानक लॉकडाऊन झाले.आणि रघुनाथवर उपासमारीची वेळ आली..तो रस्त्याच्या कडेला चपला शिवण्याचे काम करत असे...पण संचारबंदीमुळे दोन पैसे मिळायचे ते पण बंद झाले.दोन दिवस झाले रघुनाथच्या घरची चूल पेटली नव्हती.त्याच्या लहान मुलीला खूप भूक लागली होती.जेव्हा मुलगी तिच्या बाबाला विचारते."बाबा आपल्याला जेवायला कांहीच नाही." तेव्हा रघुनाथ धान्य संपलं पैसे नाहीत म्हणाला.तेवढ्यात मुलगी घरात जाऊन एक थैली हातावर आणून ठेवते.त्यात दोनशे रूपये निघतात.हे कुठले पैसे रघू विचारतो.त्यावर मुलगी म्हणते."बाबा तुम्ही मला ना खाऊसाठी रोज एक रूपया द्यायचे ना...! तेच मी जमवले होते." रघुनाथचे मन भरून आले.डोळ्यांतून अश्रुंनी वाट मोकळी केली.
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/10, 5:56 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एका गावात सुमित्रा नावाची बाई राहत असे.ती आपल्या दोन्ही मुलींचा खूप लाड करायची.सुनांना मात्र माझ्या पोरी बघा किती हुशार आहेत.सासूची किती सेवा करतात म्हणून सतत टोमणे मारायची.एक दिवस सुमित्रा पाय घसरून सुमित्रा पडली.आणि पाय फॅक्चर झाला.तेंव्हा दोन्ही लेकी बघायला आल्या आणि लगेच परत जायला निघाल्या.आईच्या सेवेसाठी एकही मुलगी थांबली नाही.उलट जाताना "वहिणी आईची काळजी घ्या हं" म्हणून सांगून गेल्या.सुमित्राने सुनांसमोर गुपचूप मान खाली घातली.
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/11, 6:02 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एका गावात राम आणि शाम असे दोन मित्र होते.एके दिवशी राम पाणी आणण्यासाठी नदीवर गेला.तेवढ्यात रामचा पाय घसरला आणि राम बुटकुळ्या खाऊ लागला.तेवढ्यात राम वाचवा वाचवा ओरडू लागला.जवळच शामचे बाबांचे शेत होते.शाम चे बाबा धावत आले.नदीत उडी मारली.आणि रामचा जीव वाचवला.राम म्हणाला "काका तुमचे आणि माझ्या बाबाचे भांडण आहे तरी तुम्ही माझा जीव वाचवलात का ? त्यावर शामचे बाबा म्हणाले. "माणसापेक्षा भांडण मोठे नाही."
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे, वाशिम*
[5/12, 4:15 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एका गावात सुधाकर नावाचा गरीब माणूस होता.खूप प्रामाणिकपणे कष्ट करून खायचा.एक दिवस तो बाजारात गेला आणि त्याला पैशाने भरलेली थैली सापडली.सुधाकरला आश्चर्याचा धक्काच बसला.सुधाकर थेली हातात घेऊन प्रत्येकाला विचारू लागला.थैली माझी आहे कुणीच म्हणेना.शेवटी सुधाकर पोलीस ठाण्यात जाऊन पोलींसाकडे थैली जमा केली.पोलीसांनी त्यातले काही पैसे सुधाकरला बक्षिस रूपात देऊ केले.पण सुधाकरने घेतले नाहीत.कष्टाने कमवलेलेच पैसे खावं हे वाक्य सुधाकरच्या तोंडचे ऐकून पोलीसांना फार कौतुक वाटले...
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/15, 12:11 AM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एका गावात एक गरीब म्हातारी होती.तीला फक्त एकच मुलगा होता.पण त्याचं लग्न झाल्यापासून तो आईकडे फारसं लक्ष देत नव्हता.दोघां नवराबायकोचं बोलणं चाललं होतं. सून म्हणत होती."या म्हातारीचं मला कांहीच करणं होतं नाही.तुम्हांला मी पाहिजे का आई?" यावर मुलगा उत्तरला "अगं वृध्दाश्रमात पुढच्या हप्त्यात जागा खाली होणार आहे." हे बोलणं आईने ऐकलं फार वाईट वाटले.आणि दुस-या दिवशी ऊन पडेपर्यंत म्हातारी उठलीच नाही.झोपेतच कायमची निघुन गेली.वृध्दाश्रमाचा प्रश्नच उरला नाही.
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे, वाशिम*
[5/16, 5:46 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एका गावात सीमा नावाची मुलगी होती.ती अभ्यासात फार हुशार होती.लॉकडाऊनमुळे शाळा बंद होती.पण सीमाला मात्र शाळेची खूप आठवण येत होती.ती सारखी दप्तर काढून बसायची.पुस्तक वाचायची,कविता म्हणायची,तर कधी स्वत:च मॅडम व्हायची.तेवढ्यात आई आली म्हणाली."काय करतेस बाळा?" सीमा म्हणाली "आई मॅडम मोठ्या फोनात अभ्यास टाकतात.आपण कधी आणायचा मोठा फोन?" आई क्षणभर निरूत्तर झाली.
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एकदा आजोबा खिडकीत बसले होते..आजोबांच्या डोळ्यांतून सारखे पाणी वाहत होते.तेवढ्यात नातू जवळ जाऊन विचारतो."आजोबा आजीची आठवण येतेय का"? त्यावर आजोबा म्हणतात."नाही रे राजा डोळ्यांत कांहीतरी गेलं." नातू पळत पळत हातात डबा घेऊन येतो.. आजोबा विचारतात. "हे काय आणलं रे बाळा...?" नातवाच्या एका मुठीत तुटलेला चष्मा व दुस-या हातात पैशाचा गल्ला असतो.नातू म्हणतो "आजोबा या पैशातून आपण तुमचा चष्मा नीट करून आणू." आजोबांच्या डोळ्यांतून अश्रू आपोआप ओघळू लागले....
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एक आजी आपल्या नातीला म्हणाली."मुग्धा मला पाणी आण बाळा". त्यावर मुग्धा म्हणाली "काय गं आजी? "मी टीकटॉक बघतेय ना" उठून घे तू...! तेवढ्यात मुग्धाचे बोलणे आईने ऐकले.आणि आई हातात लाटणंच घेऊन बाहेर आली.तशी मुग्धा चटकन उठली.पळत स्वयपाकघरात जाऊन पाण्याचा ग्लास आजीच्या हातावर ठेवला.आई मुग्धाला म्हणाली. "माणसांपेक्षा टिकटॉक प्रिय आहे का?आण तो मोबाईल...!" मुग्धा शरमेने मान खाली घालून निघून गेली....
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एके दिवशी राम बाजारात गेला.किराणा सामान घेऊन झाल्यावर पाणीपुरीच्या गाड्याजवळ थांबला.आणि पाणीपुरी खावू लागला.तेवढ्यात त्याचे लक्ष समोर रस्त्याच्या कडेला बसलेल्या म्हाता-या आजीकडे गेले.भुकेने व्याकुळ होऊन बसली होती.पण मागत कांहीच नव्हती.तेवढ्यात राम त्या आजीकडे गेला आणि पोटभर पाणीपुरी खाऊ घातला.आजीच्या चेह-यावर वेगळीच चमक दिसू लागली...
*©️®️कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एका गावात नंदा नावाची गुणी मुलगी होती.तिचे बाबा कुठेतरी निघून गेले होते.ती तिच्या आईसोबत रहायची.रोज शाळेला जाताना मारोतीच्या मंदीरासमोर दोन्ही हात जोडून प्रार्थना करायची म्हणायची "माझे बाबा लवकरात लवकर घरी येवोत." एक दिवस अचानक बाबा घरी आले तेंव्हा नंदाच्या डोळ्यांतून आनंदाश्रु वाहू लागले.नंदाने बाबाला घट्ट मिठी मारली....
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एक शेतकरी शेत नांगरायला शेतात निघाला.तेवढ्यात पुण्यावरून आलेला नातू म्हणाला.."अहो आजोबा कुठे चाललात"? 'लॉकडाऊन आहे ना' त्यावर शेतकरी आजोबांनी आपल्या नातवाला हसत हसत म्हणाले "शेतकरी थांबला तर जग मरेल" शेतक-याला कधीच लॉकडाऊन नसतं!!
*©️®️कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एक दिवस अर्पिता भरभर पावलं उचलत मॅडमच्या रूमकडे चालली होती.तेवढ्यात आईने अर्पिताला विचारले."कुठे चाललीस गं अर्पिता?" 'नाकाला रूमाल बांधून जा.' तेवढ्यात अर्पिता आईला म्हणाली..."अगं आई किती दिवस झाल्या शाळा बंद आहेत".."मॅडम अॉनलाईन अभ्यास देतात..."शाळेला सुट्टी आहे.अभ्यासाला नाही."! आई कौतुकाने अर्पिताकडे पहातच राहिली...
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एके दिवशी शुभांगी घाईघाईने आली आणि आईला पाच रूपये मागितले...आई म्हणाली "शुभांगी कशाला पाहिजेत पाच रूपये? त्यावर शुभांगी म्हणाली. "अगं आई फेव्हिकॉल आणायचा आहे." आई म्हणाली "आता फेव्हिकॉल कशाला पाहिजे बाळा"? त्यावर शुभांगी म्हणाली "अगं आई माझे जे पुस्तकं फाटली आहेत ना ते चिपकवायला पाहिजे" मोफत मिळाले म्हणून काय झाले...हे शुभांगीचे वाक्य ऐकून आईला खूप नवल वाटले.... आणि खूप अभिमान वाटला...!!
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एका गावात गौरव व सौरभ असे दोन चांगले मित्र होते.एकमेकांना अडीअडचणीत मदत करत होते.एक दिवस सौरभ खूप आजारी पडला.सतत अंधरूनाला खिळून राहू लागला.तसा गौरव सौरभकडे जाणे कमी केले.दवाखान्यासाठीही पैसे दिले नाहीत...सौरभने गौरवचे नांव घेतच अखेरचा श्वास घेतला...
*©️®️कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: *अलक*
एके दिवशी मधूच्या बाबांनी मधूला बाहेरुन आवाज दिला."मधू काय करतेस?" "ही पिशवी घे बाळा!" तेवढ्यात मधू बाहेर आली आणि बाबाला म्हणाली "काय हो बाबा! "तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की बाहेर जाताना तोंडाला मास्क लावा म्हणून!" बाबा म्हणाले अरे काय होतंय? "मी गावातच गेलो होतो भाजीपाला आणायला." त्यावर मधूने घरात जाऊन हॅन्डवॉश आणून बाबांच्या हातावर ठेवत म्हणाली..."मला तुम्ही पाहिजेत शेवटपर्यंत...!" बाबा स्तब्धपणे उभे पहातच राहिले.आपली मुलगी केवढी काळजी घेते याचं समाधान ही वाटलं....
*©️®️कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
[5/16, 5:57 PM] Tr.Meenakshi Nagrale: Date: 10 Dec 2019
अलक
एकाच घरात दोन चुली करून घराला वेगळे करून सासू सासऱ्यापासुन वेगळं राहण्यासाठी प्रयत्न करणारी सून
सून आज अचानक सासू सासऱ्यावर अतोनात जीव ओतीत होती.... काजू बदाम खायला आणून देत होती...नविन कपडे,साडी व सहा महिन्यांपासून तुटलेला चष्मा निट करून आणून देत होती.... वृद्ध झालेल्या म्हाताऱ्या माणसाची हल्ली इतकी काळजी काही रहस्यच कळत नव्हत... तेवढ्यात वृद्धाश्रमातून फोन आला....दोन जागा रिक्त आहेत....आपण मागे विचारायला आला होतात..... म्हणून सांगीतले.....!!
*©️®️कवयित्री- मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*
---
Shared using https://www.writediary.com/getapp
[5/17, 8:41 AM] Tr.Meenakshi Nagrale: अलक क्र.२०
एका गावात श्रेयस नावाचा मुलगा होता.अगदी पाच दिवसांचा असतानाच त्याची आई वारली.त्याच्या वडीलांनी श्रेयसला सांभाळण्यासाठी दुसरे लग्न केले.सावत्र आईने पोटच्या पोरासारखी माया,प्रेम दिलं.श्रेयस मोठा झाला.लग्न जमलं.एक दिवस मुलीला फोनवर बोलताना श्रेयस होणा-या पत्नीला म्हणत होता."अगं सावत्र आईला कशाला सोबत नेऊ लग्न झाल्यावर?" हे ऐकून पतीचे छत्र हरवलेल्या माऊलीच्या काळजाला बाण लागल्यासारख्या जखमा झाल्या...जखम दिसत नसली तरी अश्रूरूपाने रक्त भळाभळा वाहत होतं...
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/19, 4:54 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक २१
एका गावात नंदा नावाची धाडसी मुलगी होती.दुपारची वेळ होती.नंदा घराशेजारच्या विहीरीजवळ अभ्यास करत बसली असताना पाण्यात कांहीतरी पडल्याचा आवाज झाला.नंदाने क्षणाचाही विचार न करता विहीरीत उडी मारली.आणि ८ वर्षाचा मुलाचा जीव वाचवला.तेवढ्यात लोकं धावात आले.त्यातला एकजण नंदाला शाबासकी देत म्हणाला "पोरं रहावी तर अशी" नंदा म्हणाली "म्हणून कुठलीही गोष्ट शिकलेली कधीच वाया जात नाही".
*कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे, वाशिम*
[5/22, 1:19 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक २२
एका गावात वैदेही नावाची गुणी सून होती.नौकरी निमित्ताने रहायची मुंबईला पण लॉकडाऊन मुळे सध्या गावी आली होती. गावाकडची असल्याने सुसंस्कार बालपणीच रूजलेले होते.गावात शेजारी गरीब मजुरी करणारे कुटुंब कॉरनटाईन केलेले होते.एक दिवस वैदेही नव-याला म्हणाली."अहो त्या कुटुंबात लहान लहान मुलं आहेत.आपल्या घरचे एक पोतं गहू द्याल का? माझ्यासाठी हीच खरी अॅन्वरसरी..." नव-या कौतुकाने वैदेहीकडे पाहतच राहिला.
*©️®️कवयित्री कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे,वाशिम...*
[5/23, 6:00 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक
एका गावात शांताबाई राहत होती.तिला मुलंबाळं कोणीच नव्हते.उतारवयात मोलमजुरी करणं आता शांताबाईला जमत नव्हतं.एके दिवशी शांताबाई खूप आजारी पडली.दवाखाना करायला पैसे नव्हते.एके दिवशी अचानक मनीऑर्डर आली.त्यात १० हजार रूपये पाठवले होते.शांताबाईला काहीच कळेना पैसे कुणी पाठवले.तेवढ्यात पोस्टमनला फोन आला.ज्याने पैसे पाठवले त्याला शांताबाई कडेवर घेऊन अंगणवाडीत नेऊन सोडायची...ते अनाथ पोरं आज मोठा साहेब आहे...हे ऐकून शांताबाईचा आजार पळून गेला...
कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
[5/24, 4:53 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक (२४)
एका जंगलात एक शिकारी दबा धरून बसला होता.शिकार करण्यासाठी त्याने आदल्या दिवशी मोठा खड्डा करून ठेवला होता.शिकार कधी येईल ? वाट पहात बसला होता.शिकार कांहीं आले नाही....शिकार शोधण्याच्या नादात पुढे पुढे जात असताना अचानक शिकारी मोठ्या खोल खड्यात पडला.रात्र होत होती किती ही हाका मारल्या तरीही जंगलात कोणीच आले नाही.शिकारी पार घाबरून गेला.याने पाडलेला खड्डा तर दुसराच होता...मग हा खड्डा कोणी पाडला याचाच विचार शिकारी करू लागला.
*मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे, वाशिम*
~~~~~~~~~~~~~~~~
[5/25, 8:39 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक २५
एका गावात एक वेडा मुलगा राहत होता.तसा तो खूप हुशार होता.पण त्याच्या अति वेंधळटपणामुळे सर्वजण वेडा म्हणून चिडवायचे.एक दिवस दुपारी सर्वत्र शांतता होती.कसला तरी आवाज आला.लोकं आवाजाच्या दिशेने बाहेर आली.पाहतात तर वेड्या मुलांने चोराला पकडून ठेवले होते.त्या मुलाची आई आली.अभिमानाने उर भरून आला माऊलीचा....!
*©️®️कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/27, 1:09 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक २६
एका गावात एक व्यापारी राहत होता.खूप मेहनती व इमानी होता.एके दिवशी व्यापार करण्यासाठी पैशाने भरलेली थैली घेऊन निघाला..वाटेने खूप दमला.रात्र झाली थकून पैशाची थैली डोक्याखाली घेऊन झोपी गेला.तेवढ्यात चार चोर तिथे आले.चाकूचा धाक दाखवून थैली घेऊन पळून गेले.चौघात वाटणी करायची म्हणून थैली उघडून पाहतात तर कोळसे होते.व्यापारी अत्यंत हुशार असल्याने थैली जमिनीत माती उकरून ठेवली होती.म्हणून चोरी झाली नाही..
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/29, 4:52 AM] Tr.Meenakshi Nagrale: अलक २७
एका गावात एक गरीब विधवा बाई होती.तिचा पती अपघातामध्ये मरण पावला होता.बिचारीला आधाराची फार गरज होती.समाजाच्या वखवखलेल्या नजरा जणू तिला खायला उठायच्या.आपल्यासोबत कांहीं वाईट होऊ नये म्हणून एका भल्या माणसाच्या प्रेमात पडली....त्याच्याच आधाराने राहू रागली.पण त्याच भल्या माणसाने तिचा विश्वास घात केला...
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/29, 4:55 AM] Tr.Meenakshi Nagrale: अलक २८
एका गावात एक वरून दिसायला सोज्वळ पण आतुन तांबरट, मनानी खुणशी माणूस होता. कोणालाही मदत करायचा पण संधी आली की त्या संधीचा लाभ घ्यायचा...तरीही लोकांना तो सज्जन वाटायचा.
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[5/30, 12:14 AM] Tr.Meenakshi Nagrale: अलक २९
एका जंगलात एक धुर्त कोल्हा राहत होता.जंगलापासून दूरच्या झोपडीमध्ये शेळी तिच्या दोन पिलांसह राहत होती.एके दिवशी शेळी जंगलात चरायला निघून गेली.तोच तिचे पिल्ले खाण्यासाठी कोल्हा आला.आणि वेगळा आवाज काढून दारावर आवाज दिला.पण पिलांनी दार उघडलं नाही.कारण शेळी त्यांच्या आईने कोड वर्ड सांगीतला होता.तोच आवाज आला तर दार उघडायचं अन्यथा नाही.आईच्या हुशारीमुळे पिल्लांचा जीव वाचला.
*कवयित्री कु मिनाक्षी नागराळे वाशिम*
[6/1, 10:16 AM] Tr.Meenakshi Nagrale: अलक ३०
एका गावात जनाबाई नावाची बाई राहत होती.सुनेला मुलगा होता नाही म्हणून टोचून बोलायची.चार नाती पाहून तिचं डोकंच उठायचं.या वेळी सुनेला मुलगा व्हावा म्हणून नवस करत होती.परत मुलगीच झाली.जनाबाईने उचलली आणि एका शेतात सोडून दिली.पुढे याच जनाबाईला खूप वाईट दिवस आले..रस्त्याच्या कडेला भीक मागत बसली.एक दिवस कार मधून एक मुलगी खाली उतरली आणि जनाबाईच्या राहण्याची व्यवस्था केली...ती मुलगी म्हणजे जनाबाईने शेतात मरण्यासाठी सोडून आलेलं अर्भक होती...
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[6/7, 2:47 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक ३१
एका जंगलात एक धुर्त कोल्हा राहत असे.त्याने पक्ष्यांना खाण्यासाठी गोड गोड फळं टोपलीत भरून ठेवली.जसे का पक्षी फळं खायला टोपलीजवळ आली की त्यांच्यावर तो झडप घालायचा.असे एकवेळ झाले.दुस-या वेळी हे सर्व झाडावर बसलेली चिमणी पाहत होती.जसे पक्षी फळं खाण्यासाठी उतरू लागली की चिमणी जोरजोराने चिवचिवाट करायची.आणि सर्व पक्षी वेळीच सावध व्हायचे.एका चिमणीने धुर्त कोल्ह्याला चांगलाच धडा शिकवला.
*कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
[6/11, 11:06 PM] Tr.Meenakshi Nagrale: अलक ३२
एका गावात एक अडाणी बाई राहत होती.पण खूप हुशार होती.ती दाखवत नव्हती की ती आडाणी आहे.आणि प्रत्येक व्यवहार सफाईदारपणे करायची.तिचे छोटेसे दुकानाचे खोके होते.एक दिवस एका माणसाचे पैसे चुकून जास्त जातात..म्हातारी एक नोट परत करते.माणूस म्हणाला "कितवी पर्यंत शाळा शिकली आजी" आजी म्हणाली "मी अंगुठे बहाद्दर" माणसाला आश्चर्याचा धक्काच बसला "मग तुम्हांला एक नोट जास्त आलेली कशी कळली?" म्हातारी म्हणाली नोटाच्या रंगावरून....!!
कवयित्री कु मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
Labels:
अति लघु कथा
इयत्ता पहिली... वाचन पाठ 3
Monday, 13 July 2020
देव तारी त्याला कोण मारी.... मुलगी वाचवा... लेख.... स्वाभिमानी छावा मध्ये प्रकाशित
Labels:
लेख
Subscribe to:
Posts (Atom)

