Sunday, 24 May 2020
कर्तव्यनिष्ठ पराक्रमी योद्धा सरसेनापती बाजी पासलकर...
Labels:
लेख
Saturday, 23 May 2020
कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योद्धा सरसेनापती बाजी पासलकर....
Date: 23 May 2020
*कर्तव्यनिष्ठ, पराक्रमी योध्दा सरसेनापती बाजी पासलकर*
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांपैकी एक मावळा म्हणजे शूर वीर बाजी पासलकर हे होय.१२मावळा पैकी एक मोसे खोऱ्यातील ८४ खेड्याचे राजे होते. स्वराज्याचे पहिले सरसेनापती पद भूषविले. बाजी पासलकर हे हे मावळ खोऱ्याचे वतनदार निगुडे -मुसे गावापासून ते सांगरून- डावजेपासून धामण -ओव्होळ पर्यंतचा भाग ८४ खेडे यांच्या अखत्यारीत होती. अत्यंत शूर वीर असलेले बाजी पासलकर न्यायदान उत्तम करीत असत. तंटे सोडविण्यात अत्यंत हुशार होते.
विजापूरच्या आदिलशहाने शिवरायांचा बंदोबस्त करण्यासाठी सन १६४८ साली फत्तेखानास धाडले होते.फत्तेखानाने बेलसर येथे तळ ठोकला होता. खानाच्या सैन्याने शिरवळ जवळील सुभानमंगळ वर हल्ला करून तो किल्ला काबीज केला. मराठ्यांचा हा पहिलाच पराभव होता. छत्रपती शिवरायांनी कावजी मल्हार यास सुभानमंगळ भुईकोटावर चालून जाण्यास सांगितले. त्यांनी एका रात्रीत गड सर केला. तर फत्तेखानावर हल्ला करण्यासाठी बाजी पासलकर, कान्होजी जेधे, बाजी जेधे,गोदाजी जगताप बेलसर छावणीवर गेले. अचानक हल्ला करून त्यानी खानाच्या सैन्याची कत्तल केली. व पुरंदर चा पायथा गाठला.फत्तेखानाचा सरदार मुसेखानाने पुरंदरवर हल्ला केला. पुरंदरला खानाच्या सैन्याचा वेढा पडला. गडाजवळ फत्तेखानाच्या सैन्यांचे व मराठ्यांचे तुंबळ युद्ध झाले.फत्तेखानाचा सरदार मुसेखान व गोदाजी जगताप एकमेकांना भिडले. अखेरीस गोदाजीच्या वाराने फत्तेखानाच्या छाताडाचा वेध घेतला. आणि खान खाली कोसळला. लढताना एक घाव बाजी पासलकरांच्या पाठीमागून त्यांच्या समशेर धारी उजव्या हातावर झाला. अपार वेदना होत असतानाही बाजी वार करणा-यांचा प्रतिकार करीत होते. तेवढ्यात गनिमांची तलवार बाजी च्या छातीवर पडली. पासष्ट वर्षांचे बाजी पडले.
कावजी मल्हारला हे समजताच वाऱ्याच्या वेगाने सासवडला धावले.आपल्या धन्याची जखमी शरीर पाठीवर लादून वाहून नेणारी बाजींची यशवंती घोडी आणि कावजी मल्हार यांच्या दुःखाची जात एकच होती. पुरंदर किल्ला येईपर्यंत बाजींनी आपल्या शिवरायांना पाहण्यासाठी व अखेरचे शब्द बोलण्यासाठी श्वास रोखून ठेवला होता. गडाच्या पायथ्यापासून बाजींची पालखी वर आली आणि वाट चुकलेलं कोकरू आपल्या आईला -गोमातेला बघताच धावत सुटते. तसे राजे पालखी कडे धावले. शिवाजी महाराजांनी बाजीच्या डोक्याखाली आपली मांडी लावली. आणि मगच स्वामीनिष्ठ निष्ठावंत पराक्रमी बाजींनी आपला प्राण सोडला.तो दिवस म्हणजे २४ मे १६४९ होय.मराठ्यांनी स्वराज्याचा रणसंग्राम जिंकला पण बाजी पासलकर यांसारखा वीर रणी पडला.
बाजी पासलकर यांच्या बलिदानामुळे स्वराज्यातील मावळ्यांत सर्वस्वाचा त्याग करण्याचा आदर्श निर्माण झाला. बाजी पासलकर यांची समाधी पुण्यातील सासवड येथे आहे.अशा या थोर पराक्रमी योद्ध्याला मानाचा मुजरा यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन....
जय जिजाऊ जय शिवराय....
लेखिका/कवयित्री
कू.मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम
Labels:
लेख
Sunday, 17 May 2020
उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील शिक्षिका भगिनींनी फक्त पाच दिवसांत १०० ऑनलाईन टेस्ट निर्मिती केली....
Date: 16 May 2020
*राज्यस्तरीय उपक्रमशिल व तंत्रस्नेही समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची ऑनलाईन चाचणी सिरीयल... work from home साठी सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त...*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
*१)शीला आळसपुरे*
https://forms.gle/3rnQ4bLmkqi7dnu88
*२)माधवी सातुनकर*
https://forms.gle/GcphEVY9JiAsP2qs5
*३)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/rEEBZgARefCKFnuZ8
*४)टेकांळे ए.ए.*
https://forms.gle/oZfnjA4rRfLwFb3t8
*५)रेणुका काटकर*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFPAtacuwO8fyJI-ibTIF1Udl5jXas6qjxT9iS78HxgJOlHA/viewform?usp=sf_link
*६)जया कुलथे*
https://forms.gle/ePcurwaZhhb6Cy1R9
*७)प्रिती रामढवे*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdDG60A_3zA8npFsmlJ3-B8BfdFWJkkOapVIIj8xqJRqbNSUg/viewform?usp=sf_link
*८)जया कुलथे*
https://forms.gle/Yq3Aq3wrzFz71UL58
*९)सुचीता कुलकर्णी*
https://forms.gle/z44ZdwgNpMpqis3g8
*१०)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/PP8xtGZijp3WptfFA
*११) मिनाक्षी नागराळे*
https://forms.gle/TXdcYMJw1r5YDfdYA
*१२)सोनाली साळुंखे
https://forms.gle/jP2hyutL6qok79REA
*१३)*उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/P6yuNYAcAKq9FQ339
*१४)भावना पाटील
https://forms.gle/D9ydzTHsE4DAwW2P6
*१५)सोळसे मनिषा*
https://docs.google.com/forms/d/1BDLZgsnzxU9VgIwgqglp3CwhB_YLkBPfzbW8T3e8UZs/edit
*१६) अनिता जाधव*
https://forms.gle/KiN8zdSRzjQKjs5m9
*१७)अर्चना वैद्य*
https://forms.gle/35YSkx3f16hKQUjR6
*१८) सुनिता जाधव*
https://docs.google.com/forms/d/1ZN--CIBV_Me575nQp50Dg7TrXOzKpAehJQt82k42BGI/edit
*१९) मिनाक्षी नागराळे*
(जुनी नाणी ओळखा)
https://forms.gle/LzQobgJPMzUpXERv9
*२०) सुनिता पवार*
https://docs.google.com/forms/d/11l1wwTEilmKek28BgsVI9Fwgc
*२१)योगीता लोखंडे*
https://forms.gle/JJqry5JoVBqfGk7t9
*२२) सोनाली साळुंखे*
https://forms.gle/8gmiErzafWrbDdzZA
*२३)उषा ढेरे*
https://forms.gle/unS5SCxgGxoARemv9
*२४)भावना पाटील*
https://forms.gle/kMkzrmZbNz1dQe7u9
*२५)साधना पवार*
https://forms.gle/KqM8rhSo4U7zdLvY9
*२६)राणी जगदाळे*
https://forms.gle/8nyPLa7Wx2Zocqaq6
*२७)ज्योती परदेशी*
https://forms.gle/jgqWHdmZX7rXXK2H7
२८) *सोनाली* *साळुंखे*
https://forms.gle/8gmiErzafWrbDdzZA
२९) *आशा कोवे*
https://forms.gle/vpnrr5X1chwdbb4K8
*३०)अर्चना वैद्य*
https://forms.gle/B8fP7kYhrqBeSGce9
*३१)जया कुलथे*
https://forms.gle/TvHH3YYN8wTTPc256
*३२)उज्जवला फटांगरे*
https://docs.google.com/forms/d/14El-269ydqUH_jkUafCIEp1r0UP4g6fmM7iL4Zf69Kg/edit
*३३)वंदना देवकर*
https://forms.gle/4mEbKPucCsQKoYjh7
*३४)हेमलता यादव*
https://forms.gle/w3wkvGwT4TiZkygb6
*३५)अर्चना पवळे*
https://forms.gle/CRgtzF4ncCSpYnJH8
*३६) आम्रपाली दातार*
https://forms.gle/Me13u1vRc5nVez3d8
*३७) सुचिता कुलकर्णी*
https://forms.gle/rTpSHyMWEbbokWq67
*३८)नेहा मांडवगडे*
https://forms.gle/zMeFFgvk7SSBhW3z8
*३९)भावना पाटील*
https://forms.gle/oTv67E7z1nqRqdu86
*४०)चंदा ढोले*
https://forms.gle/4UXpE4E92bPLiXNGA
*४१)जयश्री भड*
https://docs.google.com/forms/d/1ZN--CIBV_Me575nQp50Dg7TrXOzKpAehJQt82k42BGI/edit
*४२)गायत्री शिंदे*
https://docs.google.com/forms/d/1yBCqiqfC-TTopnsHbmhWfpm1m5MpvSMXnBWtu3wom4U/edit?chromeless=1
*४३)उषा ढेरे*
https://forms.gle/P6yuNYAcAKq9FQ339
*४४)आम्रपाली गडदणे*
https://forms.gle/dBaLR2mhqu5MMizY8
*४५)सुचीता कुलकर्णी*
https://forms.gle/nQXzJFkoGHrgPS7X9
*४६)नेहा मांडवगडे*
https://docs.google.com/forms/d/1aro8YeRjinUJyhNrl8PPB54VGF7OQiHlLHrHWRYorLw/edit
*४७)वंदना देवकर*
https://docs.google.com/forms/d/1iz0gUrvpnwW4oyuULPmCfNKnMdsUtgRGYxRkk1MSHa0/edit
*४८)भावना पाटील*
https://forms.gle/1wNo2TLDEvyZ3vf79
*४९)सोनाली साळुंखे*
https://forms.gle/WEgefkjX5GsSvspm8
*५०) मिनाक्षी नागराळे*
https://forms.gle/521ZmRcFTdpN4H6G6
*५१)ज्योती परदेशी*
https://forms.gle/521ZmRcFTdpN4H6G6
*५२)प्रिती रामढवे*
https://forms.gle/zVeMBJhyS6WYi2Dc7
*५३)शोभा दळवी*
https://forms.gle/KzA5FdbwWNRmvDhQ8
*५४) मिनाक्षी नागराळे,वाशिम*
https://forms.gle/jXUTqrSuAX9RFd3GA
*५५) श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/vvJZZB9LdpDxJzJp8
*५६) मिनाक्षी नागराळे,वाशिम*
https://forms.gle/tupSQnyVj8XbjUY59
*५७)Ujjwala Phatangare*
https://docs.google.com/forms/d/1ltibc5kMgATaephiMDKE7o5zF7V9ajm4kE8VN_84xPg/edit
*५८ )आम्रपाली गडदणे,पुसद*
https://forms.gle/gCbFeGMYVjUm8tQR7
*५९)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/H6uPdMfSN4Yejmy48
*६०) संगीता किसन तांबे*
https://docs.google.com/forms/d/13fj1OyD0oyE9k5PhtvjPtUhi3nCGO6u24nyud6IO10o/edit
*भाग 2*
61)नेहा मांडवगडे*
https://docs.google.com/forms/d/1cws0OrZW4ZwAvc7KDWn9SucDz6ZfsMHfLaY-Yo1uZ7A/edit
*६२)उज्जवला फटांगरे*
https://docs.google.com/forms/d/1Qb3CWbS9QiYGIkhSoIixhqvCDsIEUioibCCwvDsiy8I/edit
*६३) वैशाली यादव*
https://forms.gle/VWQWEFNfuNTGEPCn8
*६४)भावना पाटील*
https://forms.gle/CA7TyHFGJZtSc4go8
*६५) सुनिता पवार*
https://forms.gle/w1qwAXkUAsHLsESt8
*६६) मिनाक्षी नागराळे, वाशिम*
https://forms.gle/QPi5iktBuDR19uTa7
*६७)अनिता जाधव*
https://forms.gle/yCE5MWufFFfNqnEX6
*६८)श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/3fgc3yAtVWbGuAf89
*६९)उज्ज्वला फटांगरे
https://docs.google.com/forms/d/1VoHlZiyuNamIY5dKNCaqwcj6BDSKvg3eZO92idxQPcw/edit
*७०)निता मनवर*
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfR63EpSkuz-RY-XWuxNhdQ9Y4BYMyzJdwJG2_Ljj--lJNuiQ/viewform
*७१)सुवर्णा पाटोळे*
https://docs.google.com/forms/d/13LkHmwE97yB1TGt657bl1I2PHhonwsW4ouUFM8AHlBg/edit
*७२) योगिता लोखंडे*
https://forms.gle/58e9FxpjZJeJpbj97
*७३) सुनिता जाधव*
https://forms.gle/PeyFrpujhGqYmuBM8
*७४)उज्ज्वला फटांगरे
https://docs.google.com/forms/d/1chipFucz9PaZREc05e8qb68y4amFPs62HfSIxYUKjDs/edit
*७६)गायत्री शिंदे*
https://docs.google.com/forms/d/1Yo0VhuZ4T2hsgDPcy2C_gQHKV-V9Rv-ZwojDzqRwpzA/edit?chromeless=1
*७६)नेहा मांडवगडे*
https://forms.gle/B5nRquM41ZEWybob6
*७७) मिनाक्षी नागराळे, वाशिम*
https://forms.gle/rv5UVt9d1881ULXX8
*७८)उज्ज्वला फटांगरे
https://docs.google.com/forms/d/1Q1xvslb4I7Ndui8Gtbap_yx95uM2S-Zm7sRoP4obgpg/edit
*७९)वंदना देवकर*
https://forms.gle/vjghd4uRkdLv3rb98
*८०)सरदार सर*
https://forms.gle/rMLsR6vP7Lad2QeQ8
*८१)मेघा जाधव*
https://forms.gle/esHdsoDdMnsf5fFP7
*८२)प्रिती रामढवे*
https://forms.gle/wGHx7Y6TedFJ2vrJ6
*८३)*हेमा यादव*
https://forms.gle/qjiMGKtPCGbwHU7QA
*८४)श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/ZaaCLsSRb1jPXT7w7
*८५) *श्रीमती सोनाली* *साळुंखे,जळगाव*
https://forms.gle/U5scsYXgydpGWLLf7
*८६) उज्ज्वला फटांगरे
https://docs.google.com/forms/d/14rgAtzgh1eUuih4AfSIv4kh1JvJgdCvLA2BP8QuyaOA/edit
*८७) मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
https://forms.gle/QJdd8H411rj6Lp2w5
*८८)श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/evdCZCi9JJWy5jBB7
*८९) *श्रीमती सोनाली* *साळुंखे,जळगाव*
https://forms.gle/uxFL1QSLzdJZzJAS8
*९०)श्रीमती वंदना देवकर* हिंगोली https://forms.gle/hr2enMU8i65SMm9s7
*९१) श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/x1Zb3M53Mqo5bN3QA
९२) *सौ.हेमा यादव*
https://forms.gle/RG5PUTmgXRwdxNPA6
९३) *सौ. हेमा यादव*
https://forms.gle/uiXjkMHpgStAuMP66
*९४) उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/z14vTVYi7dVBQ4Mz8
९५) *गायत्री शिंदे,जळगाव*
https://forms.gle/kUD3Ji8gQx572nXJ8
*९६)वंदना देवकर*
https://forms.gle/zGLmGYetCjWAST9h9
*९७)श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/xDAxGkjZuGU3hPU69
*९८)*आम्रपाली गडदणे ,पुसद*
https://forms.gle/GFfBn2mdLaTgN6Fb9
*९९)*शैला अळसपुरे*
https://forms.gle/WSUMKZkRmnsGfMds8
*१००)जयश्री भड* https://forms.gle/pmNNvaKmG3oYTxLq9
*उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुह,*
*समुहप्रमुख-मिनाक्षी नागराळे*
Labels:
लेख
Sunday, 3 May 2020
१मे महाराष्ट्रदिन ई विशेषांक-समीक्षण....कु.मिनाक्षी नागराळे(आदर्श शिक्षिका/कवयित्री)
*समिक्षण*
*१ मे महाराष्ट्रदिन ई विशेषांक चला घडवूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र समीक्षण*
एक मे महाराष्ट्र दिन जसा महाराष्ट्राची कीर्ती सांगणारा, निर्मिती सांगणारा,व कामगार दिन म्हणून साजरा होणारा दिवस.. तसाच महाराष्ट्रातल्या तळागळातील ग्रामीण भागातील सर्व शिक्षिका भगिनींना एकत्र ठेवून त्यांचे शब्द,भाव, उपक्रम, गीत, लेख एका विशेषांकात प्रस्थापित करणारा हा विशेषांक आहे. हा ओन्ली सुपर ॲक्टिव शिक्षिका समूहाचा खास उपक्रम आहे... महाराष्ट्र दिन विशेषांक हा ई स्वरूपात 1 मे 1920 रोजी विशेषांक प्रकाशन सोहळा ओन्ली सुपर अॅक्टीव्ह समूहात आनंदात पार पडला...
या विशेषांकाचे मुखपृष्ठ फार बोलके व नावाला साजेसे असेच आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी अहोरात्र झटणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनांशी, शत्रूंशी कशी टक्कर देऊन महाराष्ट्र वाचवला.. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र व कामगार दिनाच्या स्टॅच्यू घेतला आहे. त्यामध्ये चला घडवूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे ध्येय घेतले आहे. तर राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाचा लोगो ज्यात सावित्रीचा फोटो आहे. तो आणखीनच उठावदार दिसत आहे.
*संपादक सुदाम दादा साळुंके सर आहेत.मुखपृष्ठ व सजावट उमेश साळुंखे यांनी केली आहे त्यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेला हा विशेषांक शिक्षिका भगिनी साठी सुखाची पर्वणीच ठरली आहे* तरीसुद्धा साळुंके दादा यांचे ब्रिद *"ज्ञान-मान-सन्मान"* या उक्तीप्रमाणे राज्यातल्या सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी ई साहित्याची निर्मिती केली. करुणाताई गावंडे, वैशाली भामरे,रेखा शिंदे यांनी सहकार्य केले. नाशिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली झनकर मॅडम यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं जग ठप्प असताना ओन्ली सुपर एक्टिव शिक्षिका समूहाचा मराठी मातीला मानवंदना देण्यासाठी हा अनोखा उपक्रम सर्वांना दिशादर्शक असाच आहे.
मा.पोपटराव काळे,शिवाजी नाईकवाडे, साहेबराव शिंदे,दिलीप ढेपले साहेब यांच्या शुभेच्छा लाभले आहेत. यात 24 लेख व 23 कविता प्रकाशित आहेत. श्रीमती उषा ढेरे यांची महाराष्ट्र भूमी हा पोवाडा मराठी मातीला साज चढवणारा आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या भूमिकेत पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे? हे प्रतिभा राऊत यांच्या लेखातून महत्त्व कळते. तर जया कुलथे यांची आई वरची रचना मातेचा गोडवा भरते. गुंफा कोकाटे यांचा टाळेबंदी हा लेख माणसातला माणूस जागे करतो. वासंती कोंडाळे यांची महाराष्ट्राची महानता ही कविता काळजाला स्पर्शून जाते. तर *मीनाक्षी नागराळे* (अर्थात माझी) ही कविता विज्ञानाची सांगड घालणारी व कवितेचे गुढ उकलते.अंजू जोशी यांचा लेख आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात कम्प्युटरचे महत्त्व विशद करतो धनश्री गांगुर्डे यांचा सावित्रीबाई फुले लेख विज्ञानाची महती सांगतो.
मीनाक्षी काटकर यांची महाराष्ट्र गीत ही कविता थोर वीरांची महती सांगते *शेख नजमा यांची मंगेश शिष्यवृत्ती* हा लेख वडिलांचे छत्र हरवलेल्या मंगेश ची यशोगाथा काळजाला स्पर्श करणारी आहे तर सुनीता इंगळे यांची पुस्तक कविता पुस्तकाचे महत्त्व विशद करून जाते. मानवी मनामध्ये विचारांचा कहर कसा चालतो? ही कल्पना झाल्टे यांची कविता सांगून जाते. मनीषा कुलकर्णी यांचा लेख समूहाचे महत्व विशद करणारा आहे.तर रांगोळ्या, स्केच, चित्र,शुभेच्छा यांनी आणखीन साज चढला आहे.उर्मिला लासूरकर वर्षा भोळे यांच्या महाराष्ट्राची यशो गाथा सांगणाऱ्या कविता आणखीन भर टाकतात. शोभा दळवी व मंगला अनासपुरे यांच्या शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज कशी ठरते हे सांगतो आहे.छाया कांबळे, सुनिता वावधाने यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून सांगितली आहे.ओंकारेश्वरी खडसे ह्या चिमुकल्या विद्यार्थिनीने "ओ "ची गंमत आपल्या काव्यातून सांगितली आहे. मनीषा शेजोळे यांनी काव्यातून महाराष्ट्राचे गुणगान गायले आहे.तर रेखा शिंदे यांचा लेख गुरुजींचे महती सांगतो.
श्री अनुज ढुमणे यांनी लेखातून त्यांचे उपक्रमशील शाळेचे दर्शन घडवले आहे.कविता पुदाले यांनी व मंगला बोपचे यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून रचली आहे. *मधुकर माळी व सुदाम साळुंखे सर निर्मित शाळा अॅप ची माहिती व डाऊनलोड क्यू आर कोड सहित विद्यार्थी व शिक्षकांसाठी देण्यात आलेला आहे.* वैशाली भामरे यांचा लेख कोरोना जनजागृती करतो आहे. नीलिमा चिंचकर यांचा वेबसाईट पर्यंतचा प्रवास लेखाद्वारे मांडला आहे. स्मिता नवघरे व छाया कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्र गौरव गाथा काव्यातून व्यक्त केली आहे. सुनिता इंगळे यांनी स्टडी फ्रॉम होम चे महत्व विशद केले आहे. योगिता कोठेकर व कल्पना झाल्टे यांनी सावित्रीचे महत्त्व विशद केले आहे. प्रतिभा साळुंके यांनी महाराष्ट्राची प्रश्नमंजुषा तयार केली आहे. हे खेमनकर -कोरडकर यांनी मूल्य शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. *करुणा गावंडे यांचे उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी पडणारे आहेत.* शितल मापारी, चित्ररेखा जाधव,अरुण पवार, वंदना कोषटवार यांनी पालकांना मुलांना खेळू द्या असे आवाहन केले आहे. तर सुरेखा ढोले यांचे बडबड-गीताने साद घातली आहे. स्मिता नवघरे यांनी क्रांती सूर्याला वंदन काव्यातून केले आहे. *संपादक श्री सुदाम साळुंखे यांच्या आठवणीतील शाळा प्रवास सुंदरपणे शब्दबद्ध केला आहे.*
शेवटी डिजिटल गॅलरी मध्ये वेगवेगळे ॲप्स बालभारती पुस्तके व राज्यातल्या आदर्श तंत्रस्नेही शिक्षक शिक्षकांचे ब्लॉग व त्यांचे Qr code च्या स्वरूपात दिली आहे. कोणत्याही Qr code ला टच केले की त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा एका सेकंदात पाहायला मिळतो. असे मलपृष्ठ अति महत्त्वाचे आहे.तसेच शेवटचे पान खूप महत्त्वाचे व जपून ठेवून उपयोगी पडणारी असेच आहे. एकूण 66 पानांचे हे महाराष्ट्र दिन विशेषांक प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने राज्यातल्या इतर शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाचे एक पानच व तंत्रस्नेही ची जणू खाणच म्हणावी लागेल. या पहिल्या ऑनलाईन ई विशेषांकासाठी खूप खूप शुभेच्छा.....
*समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव*
*ता.जि.वाशिम...*
*मो.९७६७६६३२५७*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Labels:
समिक्षण
Thursday, 30 April 2020
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज....
*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज*
सर्वधर्मसमभाव हे या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल, १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला.त्यांचे पुर्ण नांव माणिक बंडोजी इंगळे असे होते.त्यांच्या गुरुचे नांव अडकोजी महाराज असे होते....अडकोजी महाराजांनी त्यांचे माणिक है नांव बदलून तुकडोजी असे ठेवले.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल? याविषयीची जी उपाययोजना महाराजांनी सुचविली होती. ती अतिशय परिणामकारक ठरली.ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे,ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट, कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केले.
भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल. अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल? याविषयी त्यांनी चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्याच्या स्थितीची पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे ग्राम विकासाच्या मूलभूत समस्यांचा विचार केला.
तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी प्रभावी खंजिरी भजनातून विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. म्हणून त्यांनी कारावासही भोगला. कुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते. हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज खरी समाजाला आहे. सर्वधर्मसमभाव सर्वांनी सारखा जपला पाहिजे पण आजच्या काळात प्रत्येक जण माझा धर्म कसा मोठा? मी कसा मोठा? हे दाखविण्यात गुंतला आहे. लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचे वेगवेगळे रंग ही वाटून घेतले आहेत.आणि राष्ट्रपुरुष सुद्धा वाटून घेतले आहेत. जे थोर पुरुष त्यांनी कधीही कोणत्याही धर्माबद्दल तिरस्कार केला नाही. सर्वधर्मसमभावाची भावना पुरस्कृत केली. आज त्याच महामानवांना आजच्या समाजाने वाटून घेतले आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटायचे की देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे रक्षण करू शकतील.पण आजच्या समाजातील तरुण हे व्यसनाच्या आहारी गेलेले दिसत आहेत. व्यायाम करून बलोपासक तर दूरच सर्व तरुण मंडळी त्या मोबाईलच्या आभासी दुनियेत टिकटॉक बघण्यात तासन्तास गुंतलेली आहेत.समाजाचे तर सोडाच, देशाचे पण यांना घेणेदेणे राहिलेली नाही. त्यामुळेच तर देशात दर मिनिटाला एका मुलीवर अन्याय, अत्याचार होतो आहे. सुसंस्कार पोरका झाल्यासारखा वाटत आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात स्वतः सोडून येणारी ही आजच्या काळातली पिढी आहे. काही अपवाद असतीलही पण खरंच आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे.
आजच्या काळातल्या तरुण पिढीने त्यांचे १०१ मौलिक विचार जरी वाचून आत्मसात केले. तरी खूप झाले. केवळ मूर्ती पुजेच्या मागे न लागता आपले ध्येय प्राप्तीकरिता मुख्य चरित्राचे चिंतन करून त्याचे गुण अंगी बाणवणे. ही खरी पूजा आहे. त्यामुळे मनाचा संकल्प दृढ होऊन वृत्ती ध्येयरूपी तदाकार होते. हे आजच्या समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही मनुष्यमात्रात जेंव्हा कांही कमतरता दिसून येईल तेंव्हा त्याचा उपवास करू नका. त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या. आणि त्याचा जन्म सफल करा. याच्या इतके पुणे जगात दुसरे नाही... कसं वागावं? कसं जगावं? कसं राहावं? हे जर आजच्या समाजातील लोकांना समजत नसेल तर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता वाचून आचरण त्याप्रमाणे करावे तेव्हा या सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
धर्म हा धंदा म्हणून आचरणाचा विषय नव्हे, किंवा ते एक विचित्र पुढेही नव्हे, तर तो व्यष्टीसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो. म्हणूनच त्यांची मूलतत्त्वे अबाधित असतात. मानवाने प्रत्येक धर्माची जी मूलतत्वे आहेत. ते मुलतत्वे अभ्यासावेत. ती उन्नतीकरिता दिलेली आहेत. पण आज माणूस मुलतत्वे बाजूला सारून ती मुलतत्वे किंवा महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी धर्म किंवा त्याच्या धर्मातील महापुरुष डोक्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.
अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे तुकडोजी महाराज यांच्या विचारांची खरी गरज आजच्या समाजाला आहे आज अंधश्रद्धेपायी मोठमोठे खून होताना ,निष्पाप जनावरे बळी जाताना दिसताहेत स्वतःची सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणसाने पाहिले पाहिजेत. भारत देशाच्या रक्षणासाठी युवकांनी सदैव तयार असले पाहिजेत.
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
मो.९७६७६६३२५७
Labels:
लेख
Subscribe to:
Posts (Atom)