Sunday, 17 May 2020

उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुहातील शिक्षिका भगिनींनी फक्त पाच दिवसांत १०० ऑनलाईन टेस्ट निर्मिती केली....

 Date: 16 May 2020

*राज्यस्तरीय उपक्रमशिल व तंत्रस्नेही समुहातील तंत्रस्नेही शिक्षिकांची ऑनलाईन चाचणी सिरीयल... work from home साठी सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त...*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

*१)शीला आळसपुरे*

https://forms.gle/3rnQ4bLmkqi7dnu88

*२)माधवी सातुनकर*

https://forms.gle/GcphEVY9JiAsP2qs5

*३)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/rEEBZgARefCKFnuZ8

*४)टेकांळे ए.ए.*

https://forms.gle/oZfnjA4rRfLwFb3t8

*५)रेणुका काटकर*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeFPAtacuwO8fyJI-ibTIF1Udl5jXas6qjxT9iS78HxgJOlHA/viewform?usp=sf_link

*६)जया कुलथे*

https://forms.gle/ePcurwaZhhb6Cy1R9

*७)प्रिती रामढवे*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdDG60A_3zA8npFsmlJ3-B8BfdFWJkkOapVIIj8xqJRqbNSUg/viewform?usp=sf_link

*८)जया कुलथे*

https://forms.gle/Yq3Aq3wrzFz71UL58

*९)सुचीता कुलकर्णी*

https://forms.gle/z44ZdwgNpMpqis3g8

*१०)प्रतिभा पगारे*

https://forms.gle/PP8xtGZijp3WptfFA

*११) मिनाक्षी नागराळे*
 https://forms.gle/TXdcYMJw1r5YDfdYA

*१२)सोनाली साळुंखे

https://forms.gle/jP2hyutL6qok79REA

*१३)*उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/P6yuNYAcAKq9FQ339

*१४)भावना पाटील 

https://forms.gle/D9ydzTHsE4DAwW2P6

*१५)सोळसे मनिषा*

https://docs.google.com/forms/d/1BDLZgsnzxU9VgIwgqglp3CwhB_YLkBPfzbW8T3e8UZs/edit

*१६) अनिता जाधव*
https://forms.gle/KiN8zdSRzjQKjs5m9

*१७)अर्चना वैद्य*
https://forms.gle/35YSkx3f16hKQUjR6

*१८) सुनिता जाधव*

https://docs.google.com/forms/d/1ZN--CIBV_Me575nQp50Dg7TrXOzKpAehJQt82k42BGI/edit

*१९) मिनाक्षी नागराळे* 
(जुनी नाणी ओळखा)

https://forms.gle/LzQobgJPMzUpXERv9

*२०) सुनिता पवार*

https://docs.google.com/forms/d/11l1wwTEilmKek28BgsVI9Fwgc

*२१)योगीता लोखंडे*
https://forms.gle/JJqry5JoVBqfGk7t9

*२२) सोनाली साळुंखे*
https://forms.gle/8gmiErzafWrbDdzZA

*२३)उषा ढेरे*
https://forms.gle/unS5SCxgGxoARemv9

*२४)भावना पाटील*

https://forms.gle/kMkzrmZbNz1dQe7u9

*२५)साधना पवार*

https://forms.gle/KqM8rhSo4U7zdLvY9

*२६)राणी जगदाळे*

https://forms.gle/8nyPLa7Wx2Zocqaq6

*२७)ज्योती परदेशी*

https://forms.gle/jgqWHdmZX7rXXK2H7

२८) *सोनाली* *साळुंखे* 

https://forms.gle/8gmiErzafWrbDdzZA

२९) *आशा कोवे*

https://forms.gle/vpnrr5X1chwdbb4K8

*३०)अर्चना वैद्य*
https://forms.gle/B8fP7kYhrqBeSGce9

*३१)जया कुलथे*
https://forms.gle/TvHH3YYN8wTTPc256

*३२)उज्जवला फटांगरे*
https://docs.google.com/forms/d/14El-269ydqUH_jkUafCIEp1r0UP4g6fmM7iL4Zf69Kg/edit

*३३)वंदना देवकर*
https://forms.gle/4mEbKPucCsQKoYjh7

*३४)हेमलता यादव*
https://forms.gle/w3wkvGwT4TiZkygb6

*३५)अर्चना पवळे*
https://forms.gle/CRgtzF4ncCSpYnJH8

*३६) आम्रपाली दातार*
https://forms.gle/Me13u1vRc5nVez3d8

*३७) सुचिता कुलकर्णी*
https://forms.gle/rTpSHyMWEbbokWq67

*३८)नेहा मांडवगडे*
https://forms.gle/zMeFFgvk7SSBhW3z8

*३९)भावना पाटील*
https://forms.gle/oTv67E7z1nqRqdu86


*४०)चंदा ढोले*

https://forms.gle/4UXpE4E92bPLiXNGA

*४१)जयश्री भड*

https://docs.google.com/forms/d/1ZN--CIBV_Me575nQp50Dg7TrXOzKpAehJQt82k42BGI/edit

*४२)गायत्री शिंदे*

https://docs.google.com/forms/d/1yBCqiqfC-TTopnsHbmhWfpm1m5MpvSMXnBWtu3wom4U/edit?chromeless=1

*४३)उषा ढेरे*
https://forms.gle/P6yuNYAcAKq9FQ339

*४४)आम्रपाली गडदणे*

https://forms.gle/dBaLR2mhqu5MMizY8

*४५)सुचीता कुलकर्णी*

https://forms.gle/nQXzJFkoGHrgPS7X9

*४६)नेहा मांडवगडे*
https://docs.google.com/forms/d/1aro8YeRjinUJyhNrl8PPB54VGF7OQiHlLHrHWRYorLw/edit

*४७)वंदना देवकर*

https://docs.google.com/forms/d/1iz0gUrvpnwW4oyuULPmCfNKnMdsUtgRGYxRkk1MSHa0/edit

*४८)भावना पाटील*
https://forms.gle/1wNo2TLDEvyZ3vf79

*४९)सोनाली साळुंखे*

https://forms.gle/WEgefkjX5GsSvspm8

*५०) मिनाक्षी नागराळे*

https://forms.gle/521ZmRcFTdpN4H6G6

*५१)ज्योती परदेशी*

https://forms.gle/521ZmRcFTdpN4H6G6

*५२)प्रिती रामढवे*

https://forms.gle/zVeMBJhyS6WYi2Dc7
*५३)शोभा दळवी*

https://forms.gle/KzA5FdbwWNRmvDhQ8

*५४) मिनाक्षी नागराळे,वाशिम*

https://forms.gle/jXUTqrSuAX9RFd3GA

*५५) श्रीमती उषा ढेरे,बीड*
https://forms.gle/vvJZZB9LdpDxJzJp8


*५६) मिनाक्षी नागराळे,वाशिम*

https://forms.gle/tupSQnyVj8XbjUY59

*५७)Ujjwala Phatangare*
 
https://docs.google.com/forms/d/1ltibc5kMgATaephiMDKE7o5zF7V9ajm4kE8VN_84xPg/edit

*५८ )आम्रपाली गडदणे,पुसद*

https://forms.gle/gCbFeGMYVjUm8tQR7


*५९)प्रतिभा पगारे*
https://forms.gle/H6uPdMfSN4Yejmy48

*६०) संगीता किसन तांबे*

https://docs.google.com/forms/d/13fj1OyD0oyE9k5PhtvjPtUhi3nCGO6u24nyud6IO10o/edit

*भाग 2*

61)नेहा मांडवगडे*

https://docs.google.com/forms/d/1cws0OrZW4ZwAvc7KDWn9SucDz6ZfsMHfLaY-Yo1uZ7A/edit

*६२)उज्जवला फटांगरे*

https://docs.google.com/forms/d/1Qb3CWbS9QiYGIkhSoIixhqvCDsIEUioibCCwvDsiy8I/edit

*६३) वैशाली यादव*

https://forms.gle/VWQWEFNfuNTGEPCn8

*६४)भावना पाटील*
https://forms.gle/CA7TyHFGJZtSc4go8

*६५) सुनिता पवार*

https://forms.gle/w1qwAXkUAsHLsESt8

*६६) मिनाक्षी नागराळे, वाशिम*

 https://forms.gle/QPi5iktBuDR19uTa7

*६७)अनिता जाधव*

https://forms.gle/yCE5MWufFFfNqnEX6

*६८)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/3fgc3yAtVWbGuAf89

*६९)उज्ज्वला फटांगरे 
https://docs.google.com/forms/d/1VoHlZiyuNamIY5dKNCaqwcj6BDSKvg3eZO92idxQPcw/edit

*७०)निता मनवर*

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfR63EpSkuz-RY-XWuxNhdQ9Y4BYMyzJdwJG2_Ljj--lJNuiQ/viewform

*७१)सुवर्णा पाटोळे*

https://docs.google.com/forms/d/13LkHmwE97yB1TGt657bl1I2PHhonwsW4ouUFM8AHlBg/edit


*७२) योगिता लोखंडे*
https://forms.gle/58e9FxpjZJeJpbj97


*७३) सुनिता जाधव*
https://forms.gle/PeyFrpujhGqYmuBM8


*७४)उज्ज्वला फटांगरे 
https://docs.google.com/forms/d/1chipFucz9PaZREc05e8qb68y4amFPs62HfSIxYUKjDs/edit


*७६)गायत्री शिंदे*
https://docs.google.com/forms/d/1Yo0VhuZ4T2hsgDPcy2C_gQHKV-V9Rv-ZwojDzqRwpzA/edit?chromeless=1


*७६)नेहा मांडवगडे*
https://forms.gle/B5nRquM41ZEWybob6


*७७) मिनाक्षी नागराळे, वाशिम*

https://forms.gle/rv5UVt9d1881ULXX8


*७८)उज्ज्वला फटांगरे 

https://docs.google.com/forms/d/1Q1xvslb4I7Ndui8Gtbap_yx95uM2S-Zm7sRoP4obgpg/edit

*७९)वंदना देवकर*

https://forms.gle/vjghd4uRkdLv3rb98

*८०)सरदार सर*

https://forms.gle/rMLsR6vP7Lad2QeQ8

*८१)मेघा जाधव*

https://forms.gle/esHdsoDdMnsf5fFP7

*८२)प्रिती रामढवे*

https://forms.gle/wGHx7Y6TedFJ2vrJ6

*८३)*हेमा यादव*   
https://forms.gle/qjiMGKtPCGbwHU7QA


*८४)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/ZaaCLsSRb1jPXT7w7


*८५) *श्रीमती सोनाली* *साळुंखे,जळगाव* 

https://forms.gle/U5scsYXgydpGWLLf7

*८६) उज्ज्वला फटांगरे 

https://docs.google.com/forms/d/14rgAtzgh1eUuih4AfSIv4kh1JvJgdCvLA2BP8QuyaOA/edit

*८७) मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*

https://forms.gle/QJdd8H411rj6Lp2w5


*८८)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/evdCZCi9JJWy5jBB7

*८९) *श्रीमती सोनाली* *साळुंखे,जळगाव* 
https://forms.gle/uxFL1QSLzdJZzJAS8

*९०)श्रीमती वंदना देवकर* हिंगोली  https://forms.gle/hr2enMU8i65SMm9s7

*९१) श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/x1Zb3M53Mqo5bN3QA

९२) *सौ.हेमा यादव*
https://forms.gle/RG5PUTmgXRwdxNPA6
९३) *सौ. हेमा यादव*

https://forms.gle/uiXjkMHpgStAuMP66

*९४) उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/z14vTVYi7dVBQ4Mz8

९५) *गायत्री शिंदे,जळगाव*
https://forms.gle/kUD3Ji8gQx572nXJ‌8

*९६)वंदना देवकर*
https://forms.gle/zGLmGYetCjWAST9h9

*९७)श्रीमती उषा ढेरे,बीड*

https://forms.gle/xDAxGkjZuGU3hPU69

*९८)*आम्रपाली गडदणे ,पुसद*
https://forms.gle/GFfBn2mdLaTgN6Fb9

*९९)*शैला अळसपुरे*

https://forms.gle/WSUMKZkRmnsGfMds8   
                          
*१००)जयश्री भड*                                                  https://forms.gle/pmNNvaKmG3oYTxLq9


*उपक्रमशिल व तंत्रस्नेही शिक्षिका समुह,*
*समुहप्रमुख-मिनाक्षी नागराळे*

Sunday, 3 May 2020

१मे महाराष्ट्रदिन ई विशेषांक-समीक्षण....कु.मिनाक्षी नागराळे(आदर्श शिक्षिका/कवयित्री)

 
*समिक्षण*
*१ मे महाराष्ट्रदिन ई विशेषांक चला घडवूया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र समीक्षण*

      एक मे महाराष्ट्र दिन जसा महाराष्ट्राची कीर्ती सांगणारा, निर्मिती सांगणारा,व कामगार दिन म्हणून साजरा होणारा दिवस.. तसाच महाराष्ट्रातल्या तळागळातील ग्रामीण भागातील सर्व शिक्षिका भगिनींना एकत्र ठेवून त्यांचे शब्द,भाव, उपक्रम, गीत, लेख एका विशेषांकात प्रस्थापित करणारा हा विशेषांक आहे. हा ओन्ली सुपर ॲक्टिव शिक्षिका समूहाचा खास उपक्रम आहे... महाराष्ट्र दिन विशेषांक हा ई स्वरूपात 1 मे 1920 रोजी विशेषांक प्रकाशन सोहळा ओन्ली सुपर अॅक्टीव्ह समूहात आनंदात पार पडला...
     या विशेषांकाचे मुखपृष्ठ फार बोलके व नावाला साजेसे असेच आहे. स्वराज्य स्थापन करण्यासाठी अहोरात्र झटणारे छत्रपती शिवाजी महाराजांनी दुश्मनांशी, शत्रूंशी कशी टक्कर देऊन महाराष्ट्र वाचवला.. अशा छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र व कामगार दिनाच्या स्टॅच्यू घेतला आहे. त्यामध्ये चला घडवूया  प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हे ध्येय घेतले आहे. तर राज्यस्तर उपक्रमशील शिक्षिका समूहाचा लोगो ज्यात सावित्रीचा फोटो आहे. तो आणखीनच उठावदार दिसत आहे.
       *संपादक सुदाम दादा साळुंके सर आहेत.मुखपृष्ठ व सजावट उमेश साळुंखे यांनी केली आहे त्यांच्या अथक परिश्रमातून साकारण्यात आलेला हा विशेषांक शिक्षिका भगिनी साठी सुखाची पर्वणीच ठरली आहे*  तरीसुद्धा साळुंके दादा यांचे ब्रिद  *"ज्ञान-मान-सन्मान"*  या उक्तीप्रमाणे राज्यातल्या सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी ई साहित्याची निर्मिती केली. करुणाताई गावंडे, वैशाली भामरे,रेखा शिंदे यांनी सहकार्य केले. नाशिकच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर वैशाली झनकर मॅडम यांच्या शुभेच्छा लाभल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सगळं जग ठप्प असताना ओन्ली सुपर एक्टिव शिक्षिका समूहाचा मराठी मातीला मानवंदना देण्यासाठी हा अनोखा उपक्रम सर्वांना दिशादर्शक असाच आहे.
        मा.पोपटराव काळे,शिवाजी नाईकवाडे, साहेबराव शिंदे,दिलीप ढेपले साहेब यांच्या शुभेच्छा लाभले आहेत. यात 24 लेख व 23 कविता प्रकाशित आहेत. श्रीमती उषा ढेरे यांची महाराष्ट्र भूमी हा पोवाडा मराठी मातीला साज चढवणारा आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या भूमिकेत पालकांचा सहभाग किती महत्त्वाचा आहे? हे प्रतिभा राऊत यांच्या लेखातून महत्त्व कळते. तर जया कुलथे यांची आई वरची रचना मातेचा गोडवा भरते. गुंफा कोकाटे यांचा टाळेबंदी  हा लेख माणसातला माणूस जागे करतो. वासंती कोंडाळे यांची महाराष्ट्राची महानता ही कविता काळजाला स्पर्शून जाते. तर  *मीनाक्षी नागराळे* (अर्थात माझी) ही कविता विज्ञानाची सांगड घालणारी व कवितेचे गुढ उकलते.अंजू जोशी यांचा लेख आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात कम्प्युटरचे महत्त्व विशद करतो धनश्री गांगुर्डे यांचा सावित्रीबाई फुले लेख विज्ञानाची महती सांगतो.
         मीनाक्षी काटकर यांची महाराष्ट्र गीत ही कविता थोर वीरांची महती सांगते *शेख नजमा यांची मंगेश शिष्यवृत्ती*  हा लेख वडिलांचे छत्र हरवलेल्या मंगेश ची यशोगाथा काळजाला स्पर्श करणारी आहे तर सुनीता इंगळे यांची पुस्तक कविता पुस्तकाचे महत्त्व विशद करून जाते. मानवी मनामध्ये विचारांचा कहर कसा चालतो? ही कल्पना झाल्टे यांची कविता सांगून जाते. मनीषा कुलकर्णी यांचा लेख समूहाचे महत्व विशद करणारा आहे.तर रांगोळ्या, स्केच, चित्र,शुभेच्छा यांनी आणखीन साज चढला आहे.उर्मिला लासूरकर वर्षा भोळे यांच्या महाराष्ट्राची यशो गाथा सांगणाऱ्या कविता आणखीन भर टाकतात. शोभा दळवी व मंगला अनासपुरे यांच्या शिक्षणातील तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज कशी ठरते हे सांगतो आहे.छाया कांबळे, सुनिता वावधाने यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून सांगितली आहे.ओंकारेश्वरी खडसे ह्या चिमुकल्या विद्यार्थिनीने "ओ "ची गंमत आपल्या काव्यातून सांगितली आहे. मनीषा शेजोळे यांनी काव्यातून महाराष्ट्राचे गुणगान गायले आहे.तर रेखा शिंदे यांचा लेख गुरुजींचे महती सांगतो.
        श्री अनुज ढुमणे यांनी लेखातून त्यांचे उपक्रमशील शाळेचे दर्शन घडवले आहे.कविता पुदाले यांनी व मंगला बोपचे यांनी महाराष्ट्राची महती काव्यातून रचली आहे. *मधुकर माळी व सुदाम साळुंखे सर निर्मित शाळा अॅप ची माहिती व डाऊनलोड क्यू आर कोड सहित विद्यार्थी व शिक्षकांसाठी देण्यात आलेला आहे.* वैशाली भामरे यांचा लेख कोरोना जनजागृती करतो आहे. नीलिमा चिंचकर यांचा वेबसाईट पर्यंतचा प्रवास लेखाद्वारे मांडला आहे. स्मिता नवघरे व छाया कांबळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्र गौरव गाथा काव्यातून व्यक्त केली आहे. सुनिता इंगळे यांनी स्टडी फ्रॉम होम चे महत्व विशद केले आहे. योगिता कोठेकर व कल्पना झाल्टे यांनी सावित्रीचे महत्त्व विशद केले आहे. प्रतिभा साळुंके यांनी महाराष्ट्राची प्रश्नमंजुषा तयार केली आहे. हे खेमनकर -कोरडकर यांनी मूल्य शिक्षणाचे महत्त्व विशद केले आहे. *करुणा गावंडे यांचे उपक्रम गुणवत्ता वाढीसाठी उपयोगी पडणारे आहेत.*  शितल मापारी, चित्ररेखा जाधव,अरुण पवार, वंदना कोषटवार यांनी पालकांना मुलांना खेळू द्या असे आवाहन केले आहे. तर सुरेखा ढोले यांचे बडबड-गीताने साद घातली आहे. स्मिता नवघरे यांनी क्रांती सूर्याला वंदन काव्यातून केले आहे.  *संपादक श्री सुदाम साळुंखे यांच्या आठवणीतील शाळा प्रवास सुंदरपणे शब्दबद्ध केला आहे.*
      शेवटी डिजिटल गॅलरी मध्ये वेगवेगळे ॲप्स बालभारती पुस्तके व राज्यातल्या आदर्श तंत्रस्नेही शिक्षक शिक्षकांचे ब्लॉग व त्यांचे Qr code च्या स्वरूपात दिली आहे. कोणत्याही Qr code ला टच केले की त्यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा एका सेकंदात पाहायला मिळतो. असे मलपृष्ठ अति महत्त्वाचे आहे.तसेच शेवटचे पान खूप महत्त्वाचे व जपून ठेवून उपयोगी पडणारी असेच आहे. एकूण 66 पानांचे हे महाराष्ट्र दिन विशेषांक प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दृष्टीने राज्यातल्या इतर शिक्षकांसाठी तंत्रज्ञानाचे एक पानच व तंत्रस्नेही ची जणू खाणच म्हणावी लागेल. या पहिल्या ऑनलाईन ई विशेषांकासाठी खूप खूप शुभेच्छा.....



*समिक्षिका/लेखिका/शिक्षिका/कवयित्री*
*कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम*
*जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव*
*ता.जि.वाशिम...*
*मो.९७६७६६३२५७*

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


Thursday, 30 April 2020

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज....



*राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आजच्या समाजाला गरज*

        सर्वधर्मसमभाव हे या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते. त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सर्वधर्मीय प्रार्थनेचा पुरस्कार केला. तुकडोजी महाराजांचा जन्म ३० एप्रिल, १९०९ रोजी अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी झाला.त्यांचे पुर्ण नांव माणिक बंडोजी इंगळे असे होते.त्यांच्या गुरुचे नांव अडकोजी महाराज असे होते....अडकोजी महाराजांनी त्यांचे माणिक है नांव बदलून तुकडोजी असे ठेवले.
विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला.खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल? याविषयीची जी उपाययोजना महाराजांनी सुचविली होती. ती अतिशय परिणामकारक ठरली.ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे,ग्रामोद्योग संपन्न व्हावे, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळावे असा त्यांचा प्रयत्न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट, कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी प्रयत्न केले.
         भारत हा खेड्यांचा देश आहे. हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल. अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती. समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल? याविषयी त्यांनी चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्याच्या  स्थितीची पुरेपुर कल्पना होती. त्यामुळे ग्राम विकासाच्या मूलभूत समस्यांचा विचार केला.
     तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत. धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला. आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी प्रभावी खंजिरी भजनातून विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला. म्हणून त्यांनी कारावासही भोगला. कुटुंबव्यवस्था,समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते. हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले.
          राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची गरज खरी समाजाला आहे. सर्वधर्मसमभाव सर्वांनी सारखा जपला पाहिजे पण आजच्या काळात प्रत्येक जण माझा धर्म कसा मोठा? मी कसा मोठा? हे दाखविण्यात गुंतला आहे. लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी धर्माचे वेगवेगळे रंग ही वाटून घेतले आहेत.आणि राष्ट्रपुरुष सुद्धा वाटून घेतले आहेत. जे थोर पुरुष त्यांनी कधीही कोणत्याही धर्माबद्दल तिरस्कार केला नाही. सर्वधर्मसमभावाची भावना पुरस्कृत केली. आज त्याच महामानवांना आजच्या समाजाने वाटून घेतले आहे ही फार मोठी शोकांतिका आहे.
        राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना वाटायचे की देशातले तरूण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे रक्षण करू शकतील.पण आजच्या समाजातील तरुण हे व्यसनाच्या आहारी गेलेले दिसत आहेत. व्यायाम करून बलोपासक तर दूरच सर्व तरुण मंडळी त्या मोबाईलच्या आभासी दुनियेत टिकटॉक बघण्यात तासन्तास गुंतलेली आहेत.समाजाचे तर सोडाच, देशाचे पण यांना घेणेदेणे राहिलेली नाही. त्यामुळेच तर देशात दर मिनिटाला एका मुलीवर अन्याय, अत्याचार होतो आहे. सुसंस्कार पोरका झाल्यासारखा वाटत आहे. आई-वडिलांना वृद्धाश्रमात स्वतः सोडून येणारी ही आजच्या काळातली पिढी आहे. काही अपवाद असतीलही पण खरंच आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची समाजाला खरी गरज आहे.
          आजच्या काळातल्या तरुण पिढीने त्यांचे १०१ मौलिक विचार जरी वाचून आत्मसात केले. तरी खूप झाले. केवळ मूर्ती पुजेच्या मागे न लागता आपले ध्येय प्राप्तीकरिता मुख्य चरित्राचे चिंतन करून त्याचे गुण अंगी बाणवणे. ही खरी पूजा आहे. त्यामुळे मनाचा संकल्प दृढ होऊन वृत्ती ध्येयरूपी तदाकार होते. हे आजच्या समाजाने लक्षात ठेवले पाहिजे. कोणत्याही मनुष्यमात्रात जेंव्हा कांही कमतरता दिसून येईल तेंव्हा त्याचा उपवास करू नका. त्याला आपल्या तुलनेस येण्याचे ज्ञान द्या. आणि त्याचा जन्म सफल करा. याच्या इतके पुणे जगात दुसरे नाही... कसं वागावं? कसं जगावं? कसं राहावं? हे जर आजच्या समाजातील लोकांना समजत नसेल तर त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली ग्रामगीता वाचून आचरण त्याप्रमाणे करावे तेव्हा या  सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतील.
         धर्म हा धंदा म्हणून आचरणाचा विषय नव्हे, किंवा ते एक विचित्र पुढेही नव्हे, तर तो व्यष्टीसमष्टीच्या उन्नतीकरिताच असतो. म्हणूनच त्यांची मूलतत्त्वे अबाधित असतात. मानवाने प्रत्येक धर्माची जी मूलतत्वे आहेत. ते मुलतत्वे अभ्यासावेत. ती उन्नतीकरिता दिलेली आहेत. पण आज माणूस मुलतत्वे बाजूला सारून ती मुलतत्वे किंवा महापुरुषांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी धर्म किंवा त्याच्या धर्मातील महापुरुष डोक्यावर घेऊन नाचताना दिसत आहेत.
      अंधश्रद्धेवर कडाडून टीका करणारे तुकडोजी महाराज यांच्या विचारांची खरी गरज आजच्या समाजाला आहे आज अंधश्रद्धेपायी मोठमोठे खून होताना ,निष्पाप जनावरे बळी जाताना दिसताहेत स्वतःची सदसद्विवेकबुद्धी  जागृत ठेवून वैज्ञानिक दृष्टिकोनातून माणसाने पाहिले पाहिजेत. भारत देशाच्या रक्षणासाठी युवकांनी सदैव तयार असले पाहिजेत.
      
लेखिका/कवयित्री
कु.मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे वाशिम
मो.९७६७६६३२५७

Friday, 24 April 2020

छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र....!!




*छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र*

    स्वराज्याचे स्वप्न जिजाऊ माँसाहेबांचे पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मूठभर मावळ्यांसह भक्ती,शक्ती,युक्ती या त्रीसंगमाचा  वापर करून मोठ्या पराक्रमाने, धैर्याने,निकराने परकीय सत्तांशी लढा देऊन ३५०गड किल्ले जिंकून, मोगलशाही, पातशाही,आदिलशाही, निजामशाही,डच, फ्रेंच,पोर्तुगीज अशा सर्व बाजूंनी शत्रूंनी वेढलेल्या महाराष्ट्राच्या मातीत, पवित्र संताच्या भूमीत,धाडसी मातेच्या कुशीत जन्म घेतलेल्या शिवरायांनी सर्व सत्ता धुडकावून लावल्या. शत्रूला सळो कि पळो करून सोडले. ज्यांची कीर्ती अख्ख्या जगाला विश्ववंदनीय आहे अशा महाराष्ट्राच्या शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र बघितला तर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही.
           महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा अदिलशहा या दोन सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते. प्रजेवर जुलूम करणारे होते. खूप अन्याय करणारे होते.या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती. त्या काळात उघडपणे पूजाअर्चा लोक करू शकत नव्हते. रयतेला  पोटभर अन्न मिळत नसे. सुरक्षित निवारा नव्हता. सर्वत्र अन्याय माजला होता.
          राजमाता जिजाऊंनी हे सर्व पाहिले आणि स्वतःचे स्वराज्य उभ करण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी बाल शिवबाला सुरुवातीपासूनच युद्धाचे धडे देत तयार केले. सर्वच क्षेत्रात निपुण झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या सोबतीने शस्त्र नसतानासुद्धा मूठभर मावळ्यांच्या मदतीने एक एक गड जिंकत स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. सर्व जाती-धर्माच्या सगळ्यांना सोबत घेऊन न्यायाचे, लोकहिताचे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली.छत्रपती शिवरायांच्या फौज मध्ये अठरापगड जातीचे लोकं सामील होते. वेळप्रसंगी जिगरबाज मावळ्यांनी आपल्या जीवाची बाजी लावत स्वराज्यासाठी बलिदान दिले होते.त्यांच्या फोजेमध्ये महार,मांग, मातंग, रामोशी, वडार,चांभार, धनगर, बंडगर, मुस्लिम अशी अनेक अठरापगड जातीतले मातब्बर शूरवीर मावळे सोबत होते. सर्वांच्या मनात एकच होतं ते म्हणजे "स्वराज्य" आपल्या धन्यासाठी व धनी रयतेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता शत्रूला मातीत घालणारे जिगरबाज मावळ्यांच्या इतिहासाची साक्ष आजही गड-किल्ले देत आहेत.
         छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र हा संताचा वारसा लाभलेला. संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी.प्रत्येक मावळा आपल्या  राजासाठी जिवाची बाजी लावायला तयार असायचे यातच त्यांचे सर्वस्व समजून घ्यायला हवं....छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले. त्रासलेल्या रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापन करून राज्याभिषेक करून घेतला. शेतकऱ्यांच्या काडीलाही कोणी धक्का लावणार नाही असा आदेश जारी केला. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणा-यांचे हात पाय कलम करून न्याय दिला स्त्रियांचा आदर करणार, मान सन्मान करणारे प्रत्येक स्त्रीला मातेसमान पाहणारे छत्रपती जगाच्या पाठीवर दुसरे होणे शक्यच नाही. हिरकणीची गोष्ट समजताच हिरकणी ला साडीचोळी देऊन मान सन्मान केला‌. आणि त्या बुरुजाला हिरकणी बुरूज असे नाव दिले. वीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश जिंकून साडेतीनशे किल्ले जिंकले छत्रपती शिवरायांनी अनेक संकटावर मात करून स्वराज्य निर्माण केले व त्यांचे व्यवस्थापन कौशल्य वाखाणण्याजोगे होते.
         छत्रपती शिवरायांनी वनदुर्ग, जलदुर्ग, गिरीदुर्ग या तिन्ही प्रकारचे किल्ले बांधले. राजगड, प्रतापगड,सिंधुदुर्ग या सारखी नवीन किल्ले छत्रपती शिवरायांनी बांधलेले गडकोटांच्या संरक्षणाची निश्चित व्यवस्था महाराजांनी केली होती प्रत्येक किल्ल्यावर किल्लेदार,मुजुमदार, सबनीस, कारखानीस हे सुरक्षितेसाठी ठेवले होते. तोफा तयार करून घेतल्या होत्या. तोफा खराब होऊ नये म्हणून त्यावर मेणाचा लेप लावत असत.अनेक आरमार उभे केले.स्वराज्याच्या आरमारातील कोळी, भंडारी,आगरी यासारखे विविध जाती धर्मातील लोक होते... छत्रपती शिवाजी महाराजांचे हेर खाते खूप छान होते त्या हेरखात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हे होते.
       गनिमी कावा -गनिमी कावा म्हणजे युद्धतंत्र... आपल्या सोयीच्या ठिकाणी शत्रूवर हल्ला करून शत्रु सावरतो न सावरतो तोपर्यंत सुरक्षित ठिकाणी पोहोचणे याला गनिमी कावा असे म्हणत. स्वराज्य व्यवस्थित चालावे म्हणून राज्यकारभाराची आठ खात्यात विभागणी करून अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. राज्यात प्रजेला अन्न,वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण केल्या स्त्रियांचा सन्मान केला कोणावरी अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. पटकन प्रजेला न्याय दिला जायचा.शेती आणि उद्योगधंद्याचा विकास होऊ लागला प्रजा सुखासमाधानाने राहू लागली.
           गरजू गरीब शेतकऱ्यांना छत्रपती शिवरायांनी बैल जोड्या दिल्या पर्यावरणातील विविध घटकांचा नाश होणार नाही याची दक्षता त्या काळात घेतली जायची. जंगले नष्ट होणार नाहीत. याकडे शिवरायांनी अधिक लक्ष दिले. आरमारासाठी जहाजे, वल्ले,सॉर्ट इत्यादी तयार करून घेतले.एकही झाड तोडू नये असा हुकूम छत्रपती शिवाजी महाराजांचा होता. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण होत होते...गावोगावी छोटे मोठे बंधारे बांधून लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले. बंधाऱ्यांना पाट काढून शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले त्यामुळे रयतेचे उत्पन्न वाढले.स्वराज्यात रयतेला कधीही दुष्काळ जाणवला नाही. पावसाळ्यापूर्वी स्थळे व टाक्या बांधून पावसाचे पाणी अडवले जायचे. दुष्काळग्रस्त काळात शिवराय शेतकऱ्यांना विविध सवलती देत. व सारा माफ करीत असत. सरकारी कोठारातील धान्य रयतेला मोफत वाटून देत असत.प्रत्येकाला रोजगार मिळवून देत असत. बारा बलुतेदारांच्या हाताला काम देऊन रोजगाराची संधी निर्माण करून देत असत त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बलुतेदार व कारागीर सुद्धा सुखी झाले होते.
      स्वराज्यातील व्यापार वाढावा म्हणून बाहेरुन येणाऱ्या वस्तूवर जास्त कर बसवला.स्वराज्यात मिठाचा व्यापार वाढला.स्वराज्यात व्यापार उद्योग धंद्याची वाढ केली.कर्नाटकातील गडीच्या रक्षणार्थ "मलमा देसाई" या शूर महिलेने मोठा संघर्ष केला. तिला धाकटी बहीण मानून गडी व गाव सन्मानपूर्वक साडीचोळीसाठी भेट दिले व तिला "सावित्रीबाई" हा किताब दिला... इतकेच नव्हे तर स्वच्छतेविषयी छत्रपती शिवाजी महाराज फार जागरूक होते प्रत्येकाच्या घरात शेजारी स्वच्छता पाहण्यासाठी सूचना केल्या जायच्या.
         मोठ्या बाजारपेठेत कचरा राहणार नाही याची दक्षता घेतली जात असत‌.कचरा जाळून टाकून त्याची राख भाजीपाल्यासाठी खत म्हणून वापरावे अशी आज्ञा केली होती. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दारूगोळा आरमार पर्यावरणाचे संरक्षण, जलव्यवस्थाप,,सागरी व्यापार व्यापार पेठा स्वच्छतेविषयी दक्षता, महिलांचा मानसन्मान, न्याय कायदा सुव्यवस्था, सैनिक त्यांचे धार्मिक धोरण आणि अठरापगड जातीधर्माच्या लोकांना एकत्र ठेवून शेतकऱ्यांना रयतेला प्रजेला सुखी ठेवण्याचे तंत्र आजही महाराष्ट्राला दिशा दर्शक असा आहे. त्याकाळी कोणीही आत्महत्या करीत नसत सर्व प्रजा सुखाने नांदत होती म्हणून तर जगाच्या पाठीवर फक्त छत्रपतीनाच लोककल्याणकारी जाणता राजा असे म्हणतात....
महाराष्ट्राच्या कडेकपारी गड किल्ल्यातून सह्याद्रीच्या कणाकणातून एकच नाद घुमतोय...

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा हा महाराष्ट्र शूरवीरांचा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा....
आम्ही धन्य धन्य झालो आमचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाला....

जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र

कवयित्री लेखिका शिक्षिका
कुमारी मीनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
तालुका जिल्हा वाशिम
मो.९७६७६६३२५७


उर्जा देणारा काव्यसंग्रह म्हणजे वादळातील दीपस्तंभ

 कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांनी केलेले रसग्रहण ! धन्यवाद ताईंचे !
__________________________________
"नवऊर्जा देणारा काव्यसंग्रह: "वादळातील दीपस्तंभ "

आजच्या तरूणाईला नवऊर्जा प्रदान करून जगायची प्रेरणा देणारा काव्यसंग्रह म्हणजे मु.आर्वी, जि. वर्धा येथील माझे मार्गदर्शक शिक्षक व प्रसिद्ध कवी, समिक्षक अरूण विघ्ने यांचा "वादळातील दीपस्तंभ " ! त्यांचा पहीला काव्यसंग्रह "पक्षी " सन 2000 मध्ये प्रकाशीत झाला .
     या काव्यसंग्रहाची प्रस्तावना घाटंजी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक , प्रसिद्ध साहित्तिक क.वि. नगराळे यांनी समर्पक व कवितेला न्याय देणारी लिहीली आहे . मुखपृष्ठ प्रसिद्ध चित्रकार अरविंद शेलार यांनी रेखाटले आहे . एकेकाळी काही विशिष्ट लोकांना शिक्षणाचा हक्क नव्हता . त्यांची लेखणी ही बंदिस्त होती . पण बाबासाहेबांनी देशाला दिलेल्या संविधानाने हे हक्क बहाल केले आणि पिढ्यांपिढ्याच्या बंदीस्त लेखणीचे बंध तोडलेत .सर्वांसाठी शिक्षण खुले झाले . ही संकल्पना मुखपृष्ठावरील चित्रात चित्रकाराने हुबेहुब साकारली आहे .तलवार ही रक्तरंजीत क्रांती करते पण लेखणी ही रक्तविरहीत क्रांती करते . बाबासाहेबांच्या लेखणीने जगविख्यात रक्तविरहीत क्रांती केली आहे. हा काव्यसंग्रह परीस प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केला असून त्यात विविध काव्य प्रकारातील , विविध विषय आणि आशय असलेल्या  एकूण 110 कवितांचा समावेश आहे .
   अरूण विघ्ने हे हाडाचे शिक्षक असले तरी त्यांच्या कविता शेतक-यांच्या शेतीमातीशी कृतज्ञतेचा भाव जपणा-या ,सैनीकाबद्दल आदरभाव जपणा-या, आई-वडील, बहीण यांच्याबद्दलचा प्रेमभाव जपणारा, वीरांच्या कार्याशी नतमस्तक होणारा,  राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले , डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी करणारे छ.शिवाजी महाराजांविषयी आदरभाव व्यक्त करणारा आहे.
कवींना त्यांचे कवीमन स्वस्थ बसू देत नव्हते .त्यांचे निसर्गाशी आपुलकीचे नाते असल्याने पाणी, शेती, पशु, पक्षी अनेक सजीव, निर्जीव वस्तूवर प्रेम करायला शिकविणारी त्यांची कविता वाचक मनाला भावणारी  आहे . परिस्थितीपायी ज्या बालकांना काम करावं लागतं ही त्यांच्याविषयीची मांडलेली व्यथा " बालकामगारांचं शल्य " या कवितेतील हृदय हेलावून टाकणारी आहे .

" पोटाची खळगी भरण्या
बनावं लागतं बाल कामगार
समजू नये कुणी हौस आमची
नाही स्वमर्जीने हे काम करणार ! "

या ओळीतून परिस्थितीशी झुंज देणा-या बाल कामगारांची सल कवींनी खुप भावनीकतेने मांडली आहे .समाजाला लागलेली सर्वात मोठी कीड म्हणजे अंधश्रद्धा . या अंधश्रद्धेपायी समाजातील अनेक निष्पाप लोकांचे हकनाक बळी गेलेले आहेत . म्हणून कवी आपल्या "अंधश्रद्धा " या कवितेत म्हणतात ...!

" विज्ञानाच्या कसोटीवर
बघा ती घासून श्रद्धा
स्विकारा तीला डोळंस
मग कशी होईल अंधश्रद्धा ? "

या ओळीतून अंधश्रद्धेची पट्टी बांधून वावरणा-या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातण्याचा प्रयत्न केला आहे. हळव्या मनाच्या कवीमध्ये खुळचटपणाची भावना अजीबात कुठेही दिसून येत नाही .
 " उध्वस्त वावरातले रस्ते " या कवितेतून कवी होणा-या भ्रष्टाचारावर वार करतात. त्यांच्या कवितेतून आपल्याला त्यांची विद्रोही भावना दिसून येते . ते म्हणतात..!

" तुम्ही खुशाल बांधा
उध्वस्त वावरात रस्ते
आणि आमच्या करपलेल्या भावनांचे बंगले ...
बंगल्यावर चढवा बिनधोक इमलेच इमले ,
आमच्या उजेडाच्या स्वप्नांच्या कत्तली करून ..!"

गोरगरीब शेतक-यांचा जीव की प्राण म्हणजे त्यांची शेती . आणि शासन ती शेती कवडीमोल भावाने अधिग्रहीत करून त्यांच्या शेतात कुचकामी मोठमोठे रस्ते बांधतात . बिचा-या त्या शेतक-याला भूमीहीन करून माय लेकराला वेगळे केल्याचे पाप जेव्हा येथे घडते, तेव्हा कवींच्या मनात हळहळ, चीड, राग, विद्रोह निर्माण होतो आणि मग अशी कविता जन्मास येते .
     अंधारात चाचपडणा-यां लोकांना अरूण विघ्नेंचा  " वादळातील दीपस्तंभ " हा कवितासंग्रह प्रकाश देणारा, दिशादर्शक आहे . कवी हे मुळात शिक्षकी व्यवसायातील असल्याने त्यांच्या कविता संस्कार करणा-या, प्रगल्भ चिंतन करायला लावणा-या , अन्यायाविरूद्ध विद्रोह करायला लावणा-या , वादळातील समस्त दीपस्तंभांवर प्रेम करायला लावणा-या आहेत .

" गीत जीवनाचे । गाऊ आनंदानं ।
राहू दोघंजनं । सुखामंदी ।। 

मागे हा अरूण । एकची वचन ।
नको अभिमान । मनाठायी ।। "

या अभंगातून कवी जीवनाच्या वाटेवर आनंदानं रहायला, गीत सुखाचे गायला सांगतात .येणा-या प्रत्येक परिस्थितीवर मात करीत आनंदानं जगून घ्यावं. हा जन्म पुन्हा नाही असं सांगतात . तसेच हळव्या मनाचे कवी स्वतःला कुठलाच अभिमान नको , अभिमानाचा, गर्वाचा लवलेशही नको असं मागनं मागतांना दिसतात .
   अस्पृश्यतेच्या नावाखाली अनेक अन्याय, जुलूम अत्याचार केलेल्या व्यवस्थेला कवी 14 आँक्टोबर 1956 चा महीमा सांगण्याचा प्रयत्न कवींनी केला आहे .

"महीमा तो काय ।
वर्णावा बाबांचा । 
कोटी वंचितांचा ।
उद्धारक ।। "

या अभंगातून वर्णव्यवस्थेवर कवी कडाडून हल्ला चढवत जनतेला जगण्याची नवी दिशा देणा-या बाबासाहेबांचा परीचय नव्या पिढीला करून देतात .

" अवघे करूया
सिमोल्लंघन अनिष्ट रूढीचे
पापी विचारांचे
मनोभावे !"

या काव्यांजली प्रकारातील रचनेत कवी अनिष्ट रूढी परंपरांवर कडाडून हल्ला चढवितांना दिसतात . हा माणुसपण नाकारणारा विचार मनातून हद्दपार करूया आणि बंधुभावाने सारे मिळून जगूया असा संदेश देतात .
     कवी शब्दांचा दीवा हाती घेऊन अंधारातून प्रकाशपर्वाच्या दिशेने वाट शोधीत सक्षमपणे वादळातील दीपस्तंभाप्रमाणे पुढे सरकतो आहे . त्यांच्या अनेक कविता ह्या समाजभान ठेऊन वाईट गोष्टींचा बिमोड करणा-या ठरतात . एकूणच हा काव्यसंग्रह वाचकांच्या मनाला भावणारा आहे . तो दिशादर्शक वाटतो . नव्या पिढीला नवऊर्जा देणारा वाटतो . वाचक निश्चितच याचे स्वागत करतील . असा मला ठाम विश्वास आहे . त्यासाठी कवी अरूणजी विघ्ने यांचे अभिनंदन करून पुढील साहित्य प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा देते !

कु. मिनाक्षी पांंडुरंग नागराळे
(स.शिक्षिका,कवयित्री,लेखीका, संपादिका)
वाशीम, 
मो. 9767663257