Saturday, 9 September 2017

समानार्थी शब्द

समानार्थी शब्द

अभिनेता -नट
उदर -पोट
एकता -एकी, ऐक्य
अंचल -स्थिर, शांत, पर्वत
अनर्थ -अरिष्ट, संकट
कट -कारस्थान
आज्ञा -आदेश, हुकूम
आरसा -दर्पण
अपराध -गुन्हा
उणीव -कमतरता,न्यून, न्यूनता
अंगार -निखारा
चाड -आवड, गरज, गोडी
अविरत- सतत, अखंड
औक्षण -ओवाळणे
मनोरंजन -मनोरंजन
आसक्ती- लाभ, हव्यास
गवई -गायक
ग्रंथ -पुस्तक
किमया -जादू, चमत्कार
अवर्षण -दुष्काळ (पाऊस न पडणे)
कृपण -कंजूष, चिकट
कृश -हडकुळा, बारीक
खडक- दगड, पाषाण
खटाटोप- प्रयत्न, मेहनत, धडपड
गनीम- शत्रु, अरी
गरुड -खगेंद्र, व्दिजराज, वैनतेय
गाणे -गीत
गाय -धेनू, गो, गोमाता
चौफेर- भोवताली, सर्वत्र
ठेकेदार -मक्तेदार, कंत्राटदार
छंद- आवड, नाद
जयघोष -जयजयकार
गौरव -सत्कार
तृष्णा -तहान, लालसा
छिद्र -भोक
दुजा -दुसरा
नजराणा -भेट, उपहार
नवनीत -लोणी
तारू -जहाज, गलबत
तरुण -जवान, युवक
थवा -समुदाय, घोळका, गट, चमू, जमाव
टंचाई -कमतरता
झोका- हिंदोळा
नारळ -श्रीफळ, जारियल
निर्जन -ओसाड
नौदल -आरमार
पंक्ती -ओळ, पतंग, रांग
मत्सर- व्देष, असूया
मुलामा -लेप
ब्रीद -बाणा, प्रतिज्ञा
प्राप्त:काळ -उषा, सकाळ, पहाट
मकरंद -मध
मलूल- निस्तेज
रुक्ष नीरज, कोरडे
बैल- वृषभ, खोंड,
मोहिनी -भुरळ
प्रपंच -संसार
शिकस्त- पराकाष्ठा
शव- प्रेत,मुडदा
विषण्ण -कष्टी
स्वेद -घाम, धर्म
क्षुधा -भूक
सुरेल- गोड
विनय -नम्रता
विवंचना -चिंता, काळजी
क्षीण- अशक्त
शेज -शय्या, बिछाना, अंथरूण
शिक्षक -मास्तर, गुरु, गुरुजी
*संकलन* मीनाताई पांडुरंग  नागराळे
जि.प.व. प्राथमिक  शाळा  सुकळी

Sunday, 3 September 2017

अष्टविनायक गणपती संपूर्ण माहिती

[01/09, 11:17 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 महड 🍀*

महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ.स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 मोरगांव 🍀*

अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

जवळच कऱ्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यांत व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 थेऊर 🍀*

अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 रांजणगाव 🍀*

अष्टविनायकांपैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-अहमदनगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की :- त्रिपुरासुर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासुर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारिवदे(?) महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो. त्यांनी या देवळातला लाकडी सभामंडप बांधून दिला आहे.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 सिद्धटेक 🍀*

सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जीर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरुड यांच्या प्रतिमा आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून १९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून २३ कि. मी. अंतरावर आहे. दौंडहून गेल्यास वाटेत भीमा नदी लागते, ती ओलांडायला होड्या असतात. (हल्ली पूल झाला आहे, असे समजते.)
*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 ओझर 🍀*

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 लेण्याद्री 🍀*

अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायऱ्या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
[01/09, 11:18 p.m.] ‪+91 90962 05201‬: *🍀 पाली 🍀*

पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणाऱ्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

*♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧♧*
संकलन: -मिनाताई नागराळे. वाशिम

Sunday, 23 July 2017

माझे स्वनिर्मित vidio मालिका पाहण्यासाठी भेट द्या माझ्या blog ला

*🔴स्वनिर्मित व्हिडिओ मालिका🔴* *खालील लिंक वर क्लिक करून आपण व्हिडिओ पाहू शकता...व्हिडिओ आवडल्यास like व माझे utube channel subscribe करायला विसरू नका.* ---------------------------------------------------------- मीनाताई पांडुरंग नागराळे ... जि .प .वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी ता .जि .वाशिम .... चला तंत्रस्नेही होऊ या 🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲 Vidio *1* https://youtu.be/xiOu8eKdAsQ *इयत्ता ३री चा मराठी चा पाठ ४ था ...पाणी किती खोल ? माझा स्वनिर्मित विडिओ पहा....आवडल्यास नक्की subcrieb करा*..👆 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎 vidio 2: https://youtu.be/myelzy2A6Qw *watch this 3 rd std ..vidio .1 st poem ...fun time , play time ...now enjoying ...& do the subcribe & share ...plz .created by -meetatai nagrale mam zp .washim* 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎 vidio 3 :- https://youtu.be/qycAKkVY8Tw *इयत्ता* *3 री . विषय - परिसर अभ्यास ...अबब ! किती प्रकारचे हे प्राणी ....स्वनिर्मिती विडिओ पहा ... आवडल्यास माझ्या youtube channel ला सबस्क्राइब करा* ...🙏👍 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎 vidio 4 :- https://youtu.be/KcrXKBVBAI0 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 1 to 10- english & marathi स्वनिर्मित शैक्षणिक विडिओ पहा ....इयत्ता 1 ली साठी ... आणि सब्स्काराईब करा ...👆 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎 vidio 6 :- https://youtu.be/F9r-aY-UW8M 🌳🌳🌳🌳🌳🌳🌳 *प्राण्यांची ओळख* स्वनिर्मित शैक्षणीक विडिओ पहा ...इयत्ता 1 ली साठी ..आणि माझ्या youtube चैनेल ला subsribe करा .... 🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎🍎 Shared with https://goo.gl/9IgP7

Monday, 10 July 2017

Educational apps ...आताच download करा आणि दाखवा आपल्या मुलांना .....नवनवीन रंजक पध्दतीने .....

*Educational Apps*

*मुलांना मोबाईल फार आवडतो... ?*

पण काळजी घ्या..
गेम खेळण्याचे फार भयंकर तोटे आहेत.त्यापेक्षा अनेक शैक्षणिक अॅपस् आहेत प्लेस्टोर्स मध्ये ते डाऊनलोड करा व बनवा तुमचा मोबाईल इलर्निंग मोबाईल..
अन्‌ खेळू द्या त्यांना थोडेसे..॥
काही शैक्षणिक अॅपस् ची यादी देतो.. खालीलप्रमाणे...

(मुले,पालक व शिक्षकांसाठी उपयक्त)

*Educational Apps*

1. Kidsmath
गणित प्रक्रिया बालकांकरीता उपयुक्त
2. Barakhadi 2.0
बाराखडी साधे शब्द
3. Animal ABC
4. eschool4scratch
खेळातून मनोरंजन, शब्दसंपत्तीत वाढ
5. Animal 4D
आभासी प्रतिमा दाखवणे
6. Hello English
इंग्रजी सराव करीता उपयुक्त
7.Attendance taker
विद्यार्थी हजेरी
8.Anatomy 4D
मानवी शरीर अंतर्बाह्य रचना
9. Space4D
अंतराळ अभ्यास
10. Marathi kids
धुळपाटी सारखा वापर, वर्णमाला, अंकओळख, गणित, भाषा वापर
11.
50 marathi stories
50 छान छान गोष्टी आहेत
12. Android Balwaadi
मराठी, इंग्रजी वाचन लेखन
13. Writings ABC 123
इंग्रजी मुळाक्षरे कसे लिहावे
14. Kings of Math
वर्ग ५ चे गणित
15. Jay Maharashtra
थोर व्यक्तींची माहीती
16. Numbers
अप्रगत मुलांसाठी
17. Kinemaster
व्हिडिओ बनवू शकतो
18. How to make origami
कागदापासून वस्तू कशा तयार कराव्यात याचे चलचित्र
19. Google Maps
एखाद्या ठिकाणचा नकाशा पाहणे
20. Kids paint
विद्यार्थ्यांकरीता ड्राईंग
21. Educational Games
एकत्रित मनोरंजन खेळ
22. Google Earth
गूगल मॅपला सबस्टिट्यूट
23. Solar system
सर्व प्लॅनेट विषयी माहिती देता येते
24. Quiz maker
ऑफलाइन टेस्ट बनविणारे apps
25. Tricks for GK
प्रत्येक गोष्ट लक्षात राहण्यासाठी tricks
26. Anmol goshti
बालकांकरीता कथा
27. Marathi dictionary
समानार्थी शब्द
28. English Marathi Dictionary
इंग्रजी मराठी शब्द
29. Khagol vishw
भूगोल teaching साठी उपयुक्त
30. ezpschool
पाठपुस्तक pdf दाखवणे
31. Google translation
कोणत्याही भाषेतून भाषांतर
32. Foxit pdf
पुस्तकांसोबत interactions
33. Starchart
अवकाश अभ्यासासाठी उपयुक्त
34. Gurukul study
इ 1 ली ते 8 वी अभ्यासक्रमातील प्रश्न
35. Gom gr
शासन निर्णय
36. TeamViewer
37. Mirrorop
38. Share it
39. Mobizen
40. Airdroid
हे सर्व apps स्क्रिन कास्ट करीता
41. Google Googles
चित्र वरुन searching करा
42. Skype
व्हिडिओ कॉल अत्युत्तम 2G वर पण
शैक्षणिक
43. Math tips and tricks
गणितातील क्लृप्त्या
44. Vedik Math
45. Xallaps multiplication
46. – – Addition
47. – – greater than less than
48. Math formulae
49. Clock learning
50.eduDroid
51. amazing india in hindi
52. shivaji & Maratha empire
53. ABC handwriting free
54. kid science : biology
55. Fun with Dots – kids learning
56. 35 pictures stories for kids
57. my class shedules
58. sky guide for kids
59. olympaid quiz
60.  Nasa app
61. Chota bheem
62. Indian currancy game
63. math challenge
64. science game for kids
65. kelvin
66. kids gk test
67. science experiment with water
68. Abacus
69. Match and spell
70. Animal planet
71. Brain Trainer special
72.English conversation
73.Lanets space facts
74.Fun easy learn english
75.Evo memo
76.1St std marathi
77. Cursive lite
78. Fun do science
79. colourful vitamins
80. hindi writing
81. Junior science master
82. Creative kids
83.marathi mulalshare
84. Kids craft ideas
85. kidzoo
86. kids experiments
87.sage kids
88. kids encyclopedia
89. forts of maharashtra
90. Tux4kids
गणिताचा सराव
91. Hello English
नविन शब्दांचे उपयोजन सोदाहरण
92. Qr droid
Q R code ला scan करणेकरीता, अभ्यासक्रम पुस्तके या qr कोड सह आलेली आहेत.
93. Picsart
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
94. Blendcollage
फोटो कोलाज, फोटो एडिटिंग
95. Way 2 SMS
फ्रि SMS जगभर
96. Paytm
डेबिट कार्ड वरुन रिचार्ज
97. Vidmate
98. Tubemate
यू ट्यूब व्हिडीओ डाऊनलोडर
99. Kingsoft office
100. Office suit
Ms office चा वापर
101. Marathi Greetings
शुभेच्छापत्र बनविणे
102. Passport pics
पासपोर्ट बनविणे
103. Lumosity
बुद्धि ला खुराक
104. Flowers color
106. Flash card for kids
107. Gadwat
किल्ले
108. Khara mitr
109. Varnmala lite
110. Kids doodle
111. Zebra paint
113. Pratiyogita mantra
114. Table
115. Flute
116. Piano
117. Dumpster app
मोबाइल चे recycle bin
118. Google Drive
मोफत १५ जीबी
119. Text fairy
फोटोवरचा मजकूर कॉपी करा
120. Sidebook
आकर्षक PDF reader
121. Grade stalk
ऑनलाइन अध्ययन
122. Apps backup & restore
123. Android tutorial
124. S2G Excel
एक्सल मराठीत शिका
125. Telegami
अँनिमेशन व्हिडीओ
126. Varshik Niyojan
meenakshee nagrale
z .p school sukali
dist .washim

Thursday, 6 July 2017

इयत्ता 3री ...विषय मराठी ...स्वाध्याय वासाची किंमत

*स्वाध्याय इयत्ता 3 री*
*@@@@@@@@@@@*
*only active शिक्षिका समूह* *सदस्या*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
*आजचा माझा उपक्रम ...*.
*संकलन :-मीनाताई पांडुरंग नागराळे ...*

-------------------------------------
*1)  शिवानी कुठे राहत असे ?*
उत्तर :-----------------------------
*२)   कुंदापूर चा बाजार कोणत्या रोजी भरायचा ?*
उत्तर :-----------------------------
*३)  शिवानीचा आवडता उद्योग कोणता होता ?*
उत्तर :-----------------------------
*४)  शिवानी फिरता फिरता कोणत्या दुकानापाशी आली ?*
उत्तर :-----------------------------
*५) शीवानीने आईला काय मागितले ?*
उत्तर :-----------------------------
*६)   पिशवीचा आवाज कसा झाला ?*
उत्तर :-----------------------------
*७)  मिठाईवाल्याला शेवटी पैसे मिळाले का ?*
उत्तर :-----------------------------
*८)  शिवानी किती वर्षाची होती ?*
उत्तर :-----------------------------
*९)  शिवानीचे आई-बाबा बाजारात कशाला जायचे ?*
उत्तर :-----------------------------
*१०)  मिठाईवाल्यांने शीवानीला कशाचे पैसे मागीतले ?*
उत्तर :-----------------------------
*©संकलन :-*
*मीनाताई पांडुरंग नागराळे ....*
*जि .प .वरिष्ठ प्राथमिक शाळा सुकळी ...ता. जि.वाशिम*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳